06-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,पतित पावन बाबाच्या श्रीमतावर तुम्ही पावन बनतात म्हणून तुम्हाला पावन दुनियेची राजाई मिळते,आपल्या मतावरती पावन बनणाऱ्यांना कोणतीच प्राप्ती होत नाही"

प्रश्न:-
मुलांना सेवेत,विशेष कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवायला पाहिजे?

उत्तर:-
जेव्हा सेवेमध्ये जातात तर, कधी लहान मोठ्या गोष्टींमध्ये एक दुसऱ्यां वरती रुसू नका म्हणजे नाराज होऊ नका.जरा आपसामध्ये खाऱ्या पाण्यासारखे राहतात,बोलत नाहीत,तर सेवेच्या ऐवजी सेवेमध्ये विघ्न आणणारे बनतात.काही मुलं तर बाबांशी पण रुसतात,उलटे कर्म करावयास लागतात,परत अशा मुलांचा दत्तक पणा रद्द होतो.

ओम शांती।
पतित पावन बाबा जे पावन बनतात,त्यांनाच समोर बसून समजावून सांगतात.पतित-पावन बनणारी मुलंच,पावन बनवणाऱ्या पित्याला बोलवतात.पूर्वनियोजित नाटकानुसार,रावण राज्य असल्यामुळे सर्व मनुष्य पतित आहेत.पतित त्यांनाच म्हटले जाते, जे विकारांमध्ये जातात.असे खूप आहेत,जे विकारांमध्ये जात नाहीत, ब्रह्मचारी राहतात.ते समजतात आम्ही निर्विकारी आहोत.जसे पादरी लोक आहेत,मुल्ला काझी आहेत,बौध्दी पण आहेत,जे पवित्र राहतात.त्यांना पवित्र कोणी बनवले? ते स्वतः बनले.दुनियेमध्ये अनेक धर्मामध्ये,असे आहेत जे विकारांमध्ये जात नाहीत परंतु त्यांना पतित-पावन शिवपिता तर पावन बनवत नाहीत,म्हणून ते पावन दुनियेचे मालक बनू शकत नाहीत. पावन दुनियेमध्ये जाऊ शकत नाहीत.संन्यासी पण पाच विकारांना सोडतात परंतु त्यांचा संन्यास कोणी करवला? पतित-पावन परमपिता परमात्मा ने तर संन्यास करवला नाही ना?पतित पावन शिव पित्याशिवाय सफलता मिळू शकत नाही,पावन दुनिया शांतीधाम मध्ये जाऊ शकत नाहीत.येथे तर बाबा येऊन,तुम्हाला पावन बनवण्याची श्रीमत देतात.सतयुगाला निर्विकारी दुनिया म्हटले जाते.या द्वारे सिद्ध आहे की,सतयुगा मध्ये येणारे पवित्र जरूर बनतील.सतयुगामध्ये पवित्र होते,शांतीधाम मध्ये पण आत्मे पवित्र आहेत.या रावण राज्यांमध्ये सर्व पतित आहेत.पुनर्जन्म तर घ्यायचा आहे.सतयुगामध्ये पण पुनर्जन्म घेतात,परंतु विकाराद्वारे घेत नाहीत,ती संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे.जरी त्रेता मध्ये दोन कला कमी होतात,परंतु विकारी तर म्हणू शकत नाहीत.भगवान श्रीराम भगवती श्रीसीता म्हणतात.सोळा कला ऐवजी १४ कला होतात,चंद्रमाचे पण असे होते ना.तर याद्वारे सिद्ध होते की,जोपर्यंत पतित पावन बाबा येऊन पावन बनवत नाहीत,तोपर्यंत मुक्ती जीवन मुक्ती मध्ये कोणी जाऊ शकत नाही.बाबा गाईड आहेत या दुनिया मध्ये पवित्र तर खूप आहेत, संन्याशांना पण पवित्रते मुळे मान्यता आहे,परंतु बाबाच्या श्रीमताद्वारे तर पवित्र बनत नाहीत.आता तुम्ही मुलं जाणतात,आम्हाला पावन बनवणारे निराकार परमपिता परमात्मा आहेत. ते तर आपल्याच मतानुसार पवित्र बनतात.तुम्ही बाबाच्या श्रीमताद्वारे पवित्र बनतात,पतित पावन बाबा द्वारेच पावन दुनियेचा वारसा मिळतो.बाबा म्हणतात,हे मुलांनो काम विकार तुमचा महा दुश्मन आहे,या विकाराला जिंका,या काम विकारा मुळेच अधोगती होते.असे पण कधी लिहीत नाहीत की,आम्ही क्रोध केला,तोंड काळे केले.काम विकारासाठीच म्हणतात,आम्ही काळे तोंड केले.या गोष्टींना तुम्ही मुलंच जाणतात.हे दुनिया जाणत नाही.बेहद्द नाटका नुसार ज्यांना ब्राह्मण बनायचे आहे,ते येऊन बनतील.दुसऱ्या सत्संगामध्ये तर कोणतेही लक्ष, उद्देश नसतो. शिवानंद इत्यादीचे शिष्य तर खूप आहेत,परंतु त्यांच्यामध्ये काही संन्यास घेतात,ग्रहस्थी तर घेऊ शकत नाहीत,बाकी घरदार सोडणारे खूप थोडे असतात.संन्यासी बनतात परत पुनर्जन्म घ्यावा लागतो. शिवानंद साठी थोडेच म्हणतील, ज्योती ज्योती मध्ये सामवला.तुम्ही समजता,सर्वांचे सद्गती दाता पिता आहेत,तेच गाईड आहेत.गाइड शिवाय कोणी घेऊन जाऊ शकत नाहीत.तुम्ही मुलं जाणता आमचे पिता,पिता पण आहेत, ज्ञान संपन्न पण आहेत.मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत.सर्व मनुष्य सृष्टीचे आदी मध्य अंताचे ज्ञान तर,बिजालाच असेल ना.पिता तर सर्व म्हणतात ना.मुलं जाणतात,आमचे ईश्वरीय पिता तर एकच आहेत,तर सर्वांवरती दया पण त्यांनाच येईल ना.अनेक मनुष्य आहेत,किती जीवजंतू आहेत. सतयुगा मध्ये मनुष्य थोडेच असतात,तर जीव जंतू पण थोडेच असतात.सतयुगा मध्ये कलयुगा सारखी कचरा पट्टी नसते,येथे अनेक रोग इत्यादी निघत राहतात,त्यासाठी परत नवीन औषधे वगैरे काढावे लागतात.बेहद्द नाटकानुसार अनेक प्रकारच्या कला शिकत राहतात,संशोधन करत राहतात.त्या सर्व मनुष्याच्या कला आहेत, पारलौकिक पित्याची कोणती कला आहे? शिवबाबासाठी म्हणतात,हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन पावन बनवा.असे म्हणतात हे पतित पावन,दुखहर्ता सुखकर्ता या. एकालाच बोलतात ना.आपापल्या भाषेमध्ये आठवण जरूर करतात. मनुष्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो,तर म्हणतात,भगवंताची आठवण करा,असे समजतात दुसरे कोणी आधार देणार नाहीत,म्हणून ईश्वरीय पित्याची आठवण करा.ख्रिश्चन लोकं पण म्हणतात ईश्वर पित्याची आठवण करा.असे म्हणत नाहीत ख्रिस्ताची आठवण करा.ते जाणतात ख्रिस्ताच्या वरती ईश्वर आहेत.ईश्वर तर सर्वांचे एकच असतील ना.आत्ता तुम्ही मुलं जाणतात,मृत्यू लोक काय आहे,अमरलोक काय आहे?दुनियेत कोणीही जाणत नाहीत.ते तर म्हणतात,स्वर्ग-नरक सर्व इथेच आहे. काही जण समजतात,सतयुग होते, देवतांचे राज्य होते.आज पर्यंत अनेक नवनवीन मंदिर बनवत राहतात.तुम्ही मुलं जाणतात एका बाबा शिवाय,दुसरे कोणी आम्हाला पावन बनवून परत आपल्या घरी घेऊन जाऊ शकत नाही.तुमच्या बुद्धी मध्ये आहे की,आम्ही आपल्या गोड घरी जात आहोत.बाबा आम्हाला परत घेऊन जाण्यासाठी लायक बनवत आहेत,हे आठवणीत राहिला पाहिजे.

बाबा समजवतात, मुलांनो तुम्ही इतके जन्म घेतले आहेत.आता आम्ही शूद्र पासून ब्राह्मण बनलो आहोत.ब्राह्मण पासून देवता बनायचे आहे आणि स्वर्गा मध्ये जायचे आहे. आता संगमयुग आहे.विराट रूपामध्ये ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध आहे.हिंदूंसाठी पण शेंडी खूण आहे.मनुष्य तर मनुष्य आहेत. खालसे,मुसलमान,इत्यादी असे बनतात,जे तुम्हाला माहीत पण पडणार नाही,कोण आहेत? बाकी चिनी आहेत,आफ्रिकन आहेत, त्यांच्याबद्दल माहिती होते,त्यांचा चेहराच वेगळा आहे.ख्रिश्चनांचा भारता सोबत संबंध आहे,तर हे शिकले आहेत.अनेक धर्म आहेत, त्यांचे रिती-रिवाज कपडे इत्यादी वेगळे आहेत.आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे,आम्ही सतयुगाची स्थापना करत आहोत.तेथे कोणता दुसरा धर्म नव्हता,आत्ता तर सर्व धर्माचे येथे उपस्थित आहेत.आत्ता अंत मध्ये,बाकी कोणता धर्म स्थापन करणार? होय, नविन आत्मे पावन असतात,म्हणून जे नविन आत्मे येतात,तर त्यांची काही ना काही महिमा,प्रसिद्धी होत राहते.अंत काळात येतील तर,त्यांना प्रथम जरूर सुख मिळेल.महिमा होईल परत दुःख पण होईल.आहेच एक जन्म,जसे तुम्ही सतयुगा मध्ये खूप सुखामध्ये राहतात.ते परत शांतीधाम मध्ये खूप राहतात.अंत काळापर्यंत वृध्दी होत राहते.सृष्टी रुपी झाड खूप मोठे आहे ना.या वेळेत मनुष्याची खूप वृद्धी होत राहते, म्हणून नियंत्रण करण्यासाठी उपाय शोधत राहतात,परंतु याद्वारे काहीच होऊ शकत नाही.तुम्ही जाणतात, पुर्वनियोजीत नाटकानुसार वृध्दी जरुर होणार आहे.नवीन पानं येत राहतात,परत फांद्या निघत राहतात. खूप विविधता आहे.आत्ता तुम्ही मुलं जाणतात,आमचा दुसरा कोणता संबंध नाही.बाबाच आम्हाला पावन बनवतात आणि सृष्टीच्या आदी मध्य अंतचे समाचार ऐकवतात.तुम्ही पण त्यांनाच बोलवतात,हे पतित-पावन, येऊन आम्हाला पावन बनवा,तर जरुर दुनियेचा विनाश होईल.हा पण हिशोब आहे,सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य राहतात.कलियुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत.तुम्हा मुलांना, बाबा सावधान करतात.बाबा आम्हाला समजवतात,आत्ता जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. स्थापना पण बाबाच करवतात, भगवानुवाच मी स्थापना करतो, विनाश तर पूर्वनियोजित नाटकानुसार होतोच.भारतामध्ये चित्र पण आहेत.ब्रह्मा द्वारा ब्राह्मण,ब्रह्मा मुखवंशावळ पाहा किती आहेत.ते कुख वंशावळ ब्राह्मण आहेत.ते तर बाबांना जाणत नाहीत.तुम्हाला आता उमंग उत्साह आला आहे. तुम्ही जाणता,कलियुगाचा विनाश होऊन सतयुग येणार आहे.हे राजस्व अश्वमेध,अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे,यामध्ये जुन्या दुनियेची आहूती पडणार आहे.जुन्या दुनियेची दुसरी तर कोणती आहूती तर नाही.बाबा म्हणतात,मीच सर्व सृष्टीवरती हा राजस्व यज्ञ रचला आहे.सर्व भूमी वरती हा यज्ञ रचलेला आहे.यज्ञकुंड असतात ना.यामध्ये सर्व दुनिया स्वाह होईल.यज्ञकुंड बनवतात.ही सारी सृष्टी यज्ञकुंड बनलेली आहे. या यज्ञकुंडात मध्ये काय होईल? यामध्ये सर्व खलास होईल.हा कुंड पवित्र नवीन होईल,परत देवता येतील. समुद्र तर चहूबाजूला आहेच, सर्व दुनिया नवीन होईल.उथल पाथल तर खूप होईल.अशी कोणती जागा नाही,जी कुणाचीच नाही.सर्व जण म्हणतात ही माझी आहे.आता माझे-माझे म्हणनारे सर्व नष्ट होतील. बाकी मी ज्यांना पवित्र बनवतो,तेच सर्व दुनिया मध्ये राहतील.प्रथम आदी सनातन देवी-देवता धर्म असेल,त्यांचे यमुना नदीच्या कंठावर राज्य असेल.या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धी मध्ये बसायला पाहिजेत,खुशी राहायला पाहिजे.मनुष्य एक दुसऱ्याला गोष्टी ऐकवत राहतात ना. ही पण सत्यनारायणाची कहाणी आहे आहे,ही बेहद्दची कहाणी आहे.तुमच्या बुद्धीमध्येच या गोष्टी आहेत.तुमच्यामध्ये पण जे चांगले चांगले,सेवाधारी आहेत,त्यांच्या बुद्धीमध्ये धारणा होत राहते,झोळी भरत जाते.दान देत राहतात म्हणून म्हणतात,धन दान केल्यानंतर संपत नाही.ते समजतात दान दिल्यामुळे धनाची वृद्धी होईल.तुमचे तर अविनाशी धन आहे.आता धन दिले तर कधी संपणार नाही.जितके दान द्याल तेवढी खुशी राहील.ऐकते वेळेस कोणा कोणी खुशीमध्ये झुलत राहतात.काहीतर तवाई सारखे बसून राहतात.बाबा खूप चांगल्या चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत राहतात.तर ऐकते वेळेस आपोआप खुशीमध्ये झुलत राहतात.येथे मुलं बांबाकडे ताजेतवाने होण्यासाठी येतात.बाबा खूप युक्तीने ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत राहतात.तुम्ही जाणतात भारतामध्ये देवदेवतांचे राज्य होते.भारताला स्वर्ग म्हटले जाते.आता तर नर्क आहे, बदलून स्वर्ग होईल,बाकी सर्वांचा विनाश होईल.तुमच्या साठी तर स्वर्ग कालची गोष्ट आहे,काल राज्य करत होते,दुसरे कोणी असे म्हणू शकत नाही.असे म्हणतात ख्रिस्तपूर्व इतके वर्ष स्वर्ग होता,तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता.द्वापर पासून सर्व धर्म येतात.खूप सहज गोष्टी आहेत परंतु मनुष्याची बुद्धी इकडे नाही,त्यामुळे समजू शकत नाहीत.ईश्वराला बोलवतात, पतित पावन या,तर येऊन जरूर पतितांना पावन बनवतील ना.येथे तर कोणी पावन होऊ शकत नाही.सतयुगाला निर्विकारी म्हटले जाते.आता तर विकारी दुनिया आहे.मुख्य गोष्ट पवित्रतेची आहे,यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात.तुम्ही जाणतात,आज पर्यंत जे झाले,ते पूर्वनियोजित नाटकानुसारच आहे. यामध्ये आम्ही कोणाला वाईट चांगले म्हणू शकत नाही,जे काय होते,याची पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद आहे.बाबा समजावून सांगतात, अशा प्रकारे सेवा करा,अशा प्रकारे करू नका,नाहीतर विघ्न येतील. बाबाच सांगतात,ना तुम्ही आपसामध्ये अगदी गोडीगुलाबीने राहा.काहीजण समजतात आम्ही तर खाऱ्या पाण्यासारखे राहतो,एक दुसऱ्याशी गोष्टी करत नाहीत,परत कोणाला काही म्हटलं तर एकदम बिघडतात.शिवबाबांना विसरतात, म्हणून समजवले जाते,नेहमी शिवबाबाची आठवण करा.बाबा मुलांना सावधानी देत राहतात,असे काम केल्यामुळे दुर्गती होईल परंतु भाग्यामध्ये नाहीतर समजत नाहीत. शिवबाबा ज्यांच्याकडून वारसा मिळतो,त्यांच्याशी पण रुसतात, ब्राह्मणीशी पण रुसतात,ब्रह्माशी पण रुसतात,परत मुरली ऐकण्यासाठी येत नाहीत.शिवबाबांशी तर कधीच रूसायचे नाही ना,त्यांची मुरली तर जरूर वाचायची आहे,आठवण पण त्यांचीच करायचे आहे.बाबा म्हणतात मुलांनो,स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा,तर सद्गती होईल.देह अभिमान मध्ये आल्यामुळेच देहधारीशी रुसतात. वारसा तर शिवबाबा कडूनच मिळेल ना.पित्याचे बनले तर जरूर दादाकडून वारसा मिळेल.पित्याला च सोडचिट्टी देतात,तर वारसा कसा मिळेल.ब्राह्मण कुळा मधून निघून शूद्र कुळामध्ये जातात,तर वारसा रद्द होतो.दत्तक पणा रद्द होतो,तरीही समजत नाहीत.माया अशी आहे, एकदम तवाई बनवते.अशा गोड बाबांची खूप प्रेमाने आठवण करायला पाहिजे परंतु आठवण करत नाहीत. शिव बाबाचा मुलगा आहे, जे आम्हाला विश्वाचे मालक बनवतात.जरूर भारतामध्येच जन्म घेतात,शिवजयंती साजरी करतात ना.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते,तर प्रथम शिव बाबाच स्वर्गाची स्थापना करतील. तुम्ही जाणतात,आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळत आहे.बाबाच येऊन स्वर्गवासी बनवतात.बाबाच नवीन दुनियेसाठी राजयोग शिकवतात. तुम्ही जाऊन नवीन दुनिया मध्ये राज्य करतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या, मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बुद्धी रुपी झोळी मध्ये अविनाशी ज्ञान रत्न भरून परत दान करायचे आहे.दान केल्यामुळे खुशी वाढत जाईल.ज्ञान धन वाढत जाईल.

(२) कधीही आपसामध्ये भांडून खाऱ्या पाणी सारखे राहायचे नाही. खूप गोडी गुलाबीने राहायचे आहे.बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे आणि मुरली ऐकायची आहे.तवाई बनायचे नाही.

वरदान:-
नेहमी पुण्यांचे खाते जमा करणारे आणि करवणारे मास्टर शिक्षक भव.

आम्ही मास्टर शिक्षक आहोत, मास्टर म्हटल्यामुळे बाबांची स्वतः आठवण येते,बनवणाऱ्याची आठवण आल्यामुळे

स्वतः निमित्त आहोत,ही स्मृती स्वतःच येते.विशेष स्मृती राहते की,मी पुण्यात्मा आहे,पुण्यांचे खाते जमा करायचे आहे आणि करवायचे आहे.ही विशेष सेवा आहे.पुण्यात्मा कधीही पापाचा एक टक्का संकल्प पण करू शकत नाहीत.मास्टर शिक्षक म्हणजे नेहमी पुण्यांचे खाते जमा करणारे आणि करवणारे बाप समान असतात.

बोधवाक्य:-
संगठनच्या महत्वाला जाणनारे,संगठन मध्येच स्वताची सुरक्षा अनुभव करतात.