06-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,या जुन्या दुनिये पासून बेहद्दचे वैरागी बना,कारण बाबा तुमच्यासाठी नवीन स्वर्ग रूपी घर बनवत आहेत"

प्रश्न:-
या अविनाशी रुद्र यज्ञामध्ये कोण कोणत्या गोष्टी मुळे विघ्न येतात?

उत्तर:-
हे शिवबाबाचे स्थापन केलेले अविनाश रुद्र यज्ञ आहे,यामुळे तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पवित्र बनतात,भक्ती इत्यादी सोडतात,त्यामुळे विघ्न येतात.लोक म्हणतात शांती व्हावी,विनाश होऊ नये आणि बाबांनी हा रुद्र रुद्र ज्ञान यज्ञ स्थापन केलेला आहे,जुन्या दुनियाच्या विनाशासाठी.याच्यानंतर शांततेची दुनिया येईल.

ओम शांती।
ओम शांती चा अर्थ तर बाबांनी मुलांना समजवला आहे. मज आत्म्याचा स्वधर्म शांत आहे. शांतीधाम मध्ये जाण्यासाठी काही पुरुषार्थ करावा लागत नाही.आत्मा स्वतःच शांत स्वरूप,शांतीधाम मध्ये राहणारी आहे.येथे थोड्या वेळासाठी शांत राहू शकता.आत्मा म्हणते माझ्या कर्मेंद्रिया चा बाजा थकलेला आहे.मी आपल्या स्वर्धमात स्थिर राहतो,शरीरापासून वेगळा होतो परंतु कर्म तर करायचेच आहेत.शांती मध्ये किती काळ बसून राहणार?आत्मा म्हणते मी शांतीधाम देशाची रहिवासी आहे,फक्त इथे शरीरांमध्ये आल्यामुळे टॉकी बनते.मी आत्मा आणि माझे शरीर आहे.आत्माच पतित आणि पावन बनते.आत्मा पतित बनते,तर शरीर पण पतित बनते,कारण सतयुगा मध्ये पाच तत्व पण सतोप्रधान असतात,येथे पाच तत्व पण तमोप्रधान आहेत. सोन्यामध्ये खाद पडल्यामुळे,भेसळ झाल्यामुळे पतित बनते,परत त्याला साफ करण्यासाठी अग्नी मध्ये टाकतात,याला योग अग्नी म्हटले जात नाही.योगा अग्नी पण आहे, ज्याद्वारे पाप जळतात.आत्म्याला पतिता पासून पावन बनणारे परमात्मा आहेत.नाव एकच आहे, बोलवतात पण हे पतित-पावन या.पूर्वनियोजित नाटका नुसार सर्वांना पतित तमोप्रधान बनायचे आहेच.हे झाड आहे ना,त्या झाडाचे बीज खाली असते,याचे वरती आहे. बाबांना जेव्हा बोलवतात,तर बुद्धी वरती चालली जाते,ज्याद्वारे तुम्ही वारसा घेतात.ते आत्ता खाली आले आहेत.बाबा म्हणतात,मला यावे लागते.जे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे,ते अनेक विविध धर्माचे आहे.आता ते तमोप्रधान पतित जड जडीभुत अवस्थेला मिळालेले आहे. बाबा सन्मुख मुलांना समजवतात, सतयुगामध्ये प्रथम देवी देवता असतात.आता कलियुगामध्ये आसुर आहेत,बाकी असुर आणि देवतांची लढाई लागलेली नाही.तुम्ही या आसुरी पाच विकरावरती योगबळा द्वारे विजय मिळवता.बाकी काही हिंसक लढाईची गोष्टच नाही.तुम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा करु शकत नाहीत.तुम्ही कोणाला हात पण लावत नाहीत.तुम्ही तर डबल अहिसंक आहात.काम कटारी चालवणे हे तर सर्वात मोठे पाप आहे.बाबा म्हणतात,ही काम कटारी आदी मध्य अंत दुःख देणारी आहे. विकारांमध्ये जायचे नाही.देवतांच्या पुढे महिमा गातात,तुम्ही सर्व गुण संपन्न, संपूर्ण निर्विकारीआहात. आत्मा या कर्मेंद्रिया द्वारे जाणते,असे म्हणतात आम्ही पतित बनलो आहोत,तर जरूर कधीकाळी पावन होतो,जे म्हणतात आम्ही पतित बनलो आहोत.पतित-पावन या,असे बोलवतात.जेव्हा पावन आहेत,तेव्हा कोणी बोलवत नाहीत,त्याला स्वर्ग म्हटले जाते.तर साधु-संत इत्यादी खूप धून लावतात,पतित पावन सिताराम.जिथे पण जातात,गात राहतात.बाबा समजावतात,सर्व दुनिया पतित आहे,रावण राज्य आहे ना.रावणाला जाळतात परंतु त्यांचे राज्य कधी झाले,कोणालाच माहित नाही.भक्तिमार्गाची खूप सामग्री आहे,कोणी काय करतात,कोणी काय करतात.संन्यासी पण किती योग शिकवतात.वास्तव मध्ये योग कशाला म्हटले जाते,हे कोणालाच माहीत नाही.हा पण कोणाचा दोष नाही,हे नाटक पूर्वनियोजित आहे. जोपर्यंत मी येत नाही,तोपर्यंत यांना आपली भूमिका वठवायची आहे. ज्ञान आणि भक्ती,ज्ञान दिवस आहे सत्य त्रेता आणि भक्ती रात्र द्वापर कलियुग, परत वैराग्य आहे.जुन्या दुनिये पासून वैराग आहे.हा बेहद्दचा वैराग्य आहे.तुम्ही जाणतात,ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे.नवीन घर बनवतात,तर जुन्या पासून वैराग्य येते.

तुम्ही पाहा पिता कसे आहेत, तुम्हाला स्वर्ग रूपी घर बनवून देतात.स्वर्ग नवीन दुनिया आहे,नर्क जुनी दुनिया आहे.नवीन पासून जुनी आणि परत नवीन बनते.नवीन दुनियाचे आयुष्य किती आहे,हे कुणालाही माहित नाही.आता जुन्या दुनिया मध्ये राहून आम्ही नवीन दुनिया बनवत आहोत.जुन्या कबरस्थान वरती आम्ही परीस्थान बनवू.हाच यमुना नदीचा किनारा आहे,यावरतीच महल बनतील.हीच दिल्ली,यमुना नदीच्या किनाऱ्यावर असेल.बाकी असे दाखवतात, पांडवाचे किल्ले होते,हे सर्व पूर्वनियोजित नाटका नुसार परत बनतील.जसे तुम्ही यज्ञ तप दान इत्यादी करत राहतात,हे परत करावा लागेल.प्रथम शिवाची भक्ती करतात. खूप चांगले मंदिर बनवतात,त्यास अव्यभिचारी भक्ती म्हटले जाते. आता तुम्ही ज्ञान मार्गात आहात.हे अव्यभिचारी ज्ञान आहे,एकाच बाबा कडून तुम्ही ऐकत आहात.ज्याची प्रथम तुम्ही भक्ती केली,त्या वेळेत दुसरे कोणते धर्म नव्हते.त्यावेळी तुम्ही खूप सुखी होते.देवता धर्म खूप सुख देणारा आहे,नाव घेतल्यानेच तोंड गोड होते.तुम्ही एक बाबा कडुन ज्ञान ऐकतात.बाबा म्हणतात दुसऱ्या कडून तुम्ही ऐकू नका.हे तुमचे अव्यभिचारी ज्ञान आहे.बेहद्दच्या पित्याचे तुम्ही बनले आहात.बाबा कडूनच,क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे वारसा मिळेल.बाबा थोड्या वेळा करता साकार शरीरांमध्ये आले आहेत,ते म्हणतात मला तुम्हा मुलांना ज्ञान द्यायचे च आहे.माझे हे कायमस्वरूपी शरीर नाही,यांच्या मध्ये प्रवेश करतो.शिवजयंती नंतर लगेच गीता जयंती येते,त्याद्वारे ज्ञान सुरू करतात.ही आत्मिक विद्या सर्वोच्च आत्माच देतात.पाण्याची गोष्ट नाही,पाण्याला थोडेच ज्ञान म्हणाल.पतित पासून पावन ज्ञानाद्वारेच बनतील.पाण्यापासून थोडेच पावन बनतील.नद्या तर सर्व दुनिया मध्ये आहेत.ज्ञानसागर शिव पिता येतात,ब्रह्मामध्ये प्रवेश करून ज्ञान ऐकवतात.गौमुख वरती जातात,वास्तव मध्ये तुम्ही चैतन्य मध्ये गौमुख आहात.तुमच्या मुखाद्वारे ज्ञानामृत निघते.गाय द्वारे तर दूध मिळते,पाण्याची गोष्टच नाही.हे सर्वकाही बाबाच समजवतात,जे सर्वांचे सदगती दाता आहेत.आता तर सर्व दुर्गती मध्ये आले आहेत.अगोदर तुम्ही जाणत नव्हते,रावणाला का जाळतात.तुम्ही जाणतात दसरा होणार आहे.ही सर्व दुनिया एक बेट आहे आणि त्यावरती रावणाचे राज्य आहे.ग्रंथा मध्ये वानराची सेना होती आणि पूल बनवला,या सर्व दंतकथा आहेत. भक्ती तर चालत राहते.प्रथम तर अव्यभिचारी भक्ती असते,परत व्यभिचारी भक्ती होते.दसरा, रक्षाबंधन इत्यादी सर्व सण आत्ताचे आहेत.शिवजयंतीच्या नंतर कृष्ण जयंती येते.आता कृष्णपुरीची स्थापन होत आहे.आज कंसपुरी आहे, उद्या कृष्णपुरी असेल.कंस आसुरी संप्रदायाला म्हटले जाते. पांडव आणि कौरवाची लढाई ची गोष्ट नाही.कृष्णाचा जन्म सतयुगा मध्ये असतो,ते प्रथम राजकुमार आहेत,शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात.जेव्हा मोठे होतात तर राज गादीवरती बसतात.महिमा सर्व शिवबाबा ची आहे,तेच पतितपावन आहेत.बाकी रासलीला इत्यादी द्वारे आपसामध्ये आनंद साजरा करत राहतात.बाकी कृष्ण कोणाला ज्ञान कसे ऐकवतील? असे होऊ शकत नाही.बाबा म्हणतात, कोणालाही मना करायची नाही की,भक्ती करू नका.भक्ती आपोआप सुटेल.भक्ती सोडतात, विकार सोडतात,यावरती हंगामा, गोंधळ होतो.बाबांनी म्हटले आहे,मी रुद्र यज्ञाची स्थापना करतो. यामध्ये आसुरी संप्रदायाचे विघ्न येतात.हा शिव बाबाचा बेहद्दचा यज्ञ आहे, ज्याद्वारे मनुष्यापासून देवता बनतात.गायन पण आहे,ज्ञान यज्ञाद्वारे विनाश ज्वाळा प्रगट झाली. जेव्हा जुन्या दुनियेचा विनाश होईल, तेव्हा तुम्ही नवीन दुनिया मध्ये राज्य कराल.ते लोक म्हणतात आम्हाला शांती हवी,हे ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात,विनाश व्हावा,ज्ञान न समजल्यामुळे असे बोलतात.बाबा समजवतात,ही सर्व जुनी दुनिया आहे,या ज्ञान यज्ञामध्ये स्वाहा होईल. जुन्या दुनियेला आग लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती येतील,मोहरी सारखे सर्व भरडले जातील आणि नष्ट होतील.बाकी काही आत्मा राहतील,आत्मा तर अविनाशी आहे. आत्ता बेहद्दची होळी होणार आहे, ज्यामध्ये सर्व शरीर नष्ट होतील. बाकी आत्मा पवित्र बनवून चालली जाईल.अग्नीमध्ये गोष्टी शुद्ध होतात, हवन शुद्धतेसाठीच करतात.या सर्व शारीरिक गोष्टी आहेत.आता सर्व दुनिया स्वाहा होणार आहे. विनाशाच्या अगोदर जरुर स्थापना होईल.कोणालाही समजून सांगा प्रथम स्थापना,नंतर विनाश होतो. ब्रह्मा द्वारा स्थापना.प्रजापिता प्रसिद्ध आहेत आदी देव,आदी देवी,जगदंबा चे लाखो मंदिरं आहेत.खूप यात्रा भरतात.तुम्ही जगदंबाची मुलं ज्ञान- ज्ञानेश्वरी,परत राज-राजेश्वरी बनाल. तुम्ही खूप धनवान बनतात,परत भक्ती मार्गामध्ये लक्ष्मी द्वारे दिवाळीला विनाश धन मागतात.येथे तुम्हाला सर्व काही मिळते, आयुष्यमान भव, पुत्रवान भव.तेथे दीडशे वर्ष आयुष्य राहते.तुम्ही जितका योग लावल,तेवढे आयुष्य वाढत जाईल.तुम्ही ईश्वरापासून योग लावून योगेश्वर बनतात.भगवान म्हणतात, मी धोबी आहे.सर्व अस्वच्छ कपड्यांना स्वच्छ करतो, परत शरीर पण शुद्ध मिळेल. सेकंदांमध्ये दुनिया चे कपडे स्वच्छ करतो.फक्त मनमनाभव झाल्यामुळे आत्मा आणि शरीर पवित्र बनतील. हा तर छूमंत्र झाला ना.सेकंदामध्ये जीवन मुक्ती,खूप सहज उपाय आहे. चालता-फिरता फक्त बाबांची आठवण करा,बाकी कोणतेही कष्ट देत नाही.आता तुमची एका सेकंदामध्ये प्रगती होते.भगवान स्वतः म्हणतात,मी तुम्हा मुलांचा सेवक बनवून आलो आहे.तुम्ही बोलावले,हे पतित पावन या आणि आम्हाला पावन बनवा,तर सेवक झाले ना.जेव्हा तुम्ही खूप पतित बनतात,तर जोरात बोलवत राहतात. आता मी आलो आहे.मी कल्प-कल्प येऊन मुलांना मंत्र देतो की, माझी आठवण करा,मनमनाभवचा अर्थ पण हा आहे,परत विष्णुपुरीचे मालक बनाल.तुम्ही विष्णुपुरीचे राज्य घेण्यासाठी आले आहात. रावणपुरी च्या नंतर विष्णुपुरी येते, त्यानंतर कृष्णपुरी.खूप सहज समजावले जाते.बाबा म्हणतात, जुन्या दुनिया पासून ममत्व काढून टाका.आता आम्ही ८४ जन्म पुर्ण केले,हे जुने शरीर सोडून आम्ही नवीन दुनिया मध्ये जाऊ.बाबाच्या आठवणी द्वारेच तुमचे पाप नष्ट होतील.इतकी हिंमत ठेवायला पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मा मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मुखाद्वारे नेहमी ज्ञान अमृत काढायचे आहे.ज्ञानाद्वारेच सर्वांचे सद्गती करायची आहे.एका बाबा द्वारे ज्ञान ऐकायचे आहे,दुसऱ्याकडून नाही.

(२) प्रगती करण्यासाठी, चालता-फिरता बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे. जुन्या दुनिये पासून ममत्व काढून टाकायचे आहे.

वरदान:-
एकच रस्ता आणि एका बरोबरच सर्व संबंध ठेवणारे, संपूर्ण फरिश्ता भव.

निराकार किंवा साकार रूपाद्वारे बुद्धीचा संग किंवा नाते,एक बाबाशी हवे, तर फरिश्ता बनाल.जितके सर्व संबंध किंवा सर्व नाते एका सोबत आहेत, तेच फरिश्ता आहेत.जसे शासन रस्त्यामध्ये बोर्ड लावते की,या रस्त्याचे काम चालू आहे,रस्ता बंद आहे.असे सर्व रस्ते बंद करा तर बुद्धीचे भटकणे बंद होईल.बाप दादाचा आदेश आहे की, सर्व रस्ते बंद करा,यामुळे सहज फरिश्ता बनाल.

बोधवाक्य:-
नेहमी सेवेच्या उमंग उत्साहा मध्ये राहणे, हेच मायेपासून वाचण्याचे साधन आहे.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य -
" ईश्वरीय आठवण करण्याची बैठक "
आता जेव्हा परमात्माच्या आठवणी मध्ये बसतात,तर बसण्याचा उद्देश काय आहे?आम्हाला फक्त परमात्म्याच्या आठवणी मध्ये बसायचे नाही परंतु आपली ईश्वरीय आठवण तर चालता-फिरता प्रत्येक वेळेत करायची आहे आणि आठवण पण त्या वस्तूची राहते,ज्याचा परिचय आहे.त्यांचे नाव रूप काय आहे,जर आम्ही म्हणू,ईश्वर नावरूपापेक्षा वेगळा आहे,तर कोणत्या रुपाची आठवण करणार. जर म्हणू ईश्वर सर्वव्यापी आहे,तर त्याची व्यापकता तर सर्वत्र झाली, परत आठवण कोणाची करायची? जर आठवण शब्द आहे तर,आवश्य आठवणीचे रूप पण असेल. आठवणी चा अर्थ हा आहे की,एक आठवण करणारे,दुसरे ज्याची आठवण करतात,तर जरूर आठवण करणारे त्यापेक्षा वेगळे आहेत,तर परत ईश्वर सर्वव्यापी झाले नाही ना.जर कोणी म्हणतील की,आम्ही आत्मे परमात्म्याचा अंश आहे,तर काय परमात्मा तुकडा तुकडा होतो,परत तर परमात्मा विनाशी झाले,त्यांची आठवण पण विनाशी झाली.आता या गोष्टीला लोक जाणत नाहीत,परमात्मा पण अविनाशी आहेत,आम्ही अविनाशी परमपिता परमात्माची संतान आत्मा पण अविनाशी आहोत.तर आम्ही वंश झालो,ना की अंश.आता हे ज्ञान पाहिजे,जे परमात्मा स्वतःहून आम्हा मुलांना देतात.परमात्माचे आम्हा मुलांप्रति महावाक्य आहेत,मुलांनो मी जो आहे जसा आहे,त्या रूपामध्ये आठवण केल्यामुळे तुम्ही मला अवश्य प्राप्त कराल.जर मी दुःख सुखा पेक्षा वेगळा पिता सर्वव्यापी असतो,तर परत खेळामध्ये सुख दुःख झाले नसते.तर मी सर्वव्यापी नाही,मी पण आत्मा सदृश्य आत्मा आहे.परंतु सर्व आत्म्या पेक्षा माझे गुण श्रेष्ठ आहेत, म्हणून मला परम आत्मा म्हणजे परमात्मा म्हणतात,अच्छा.