06-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही आता ईश्वरीय सेवेत आहात, तुम्हाला सर्वांना सुखाचा मार्ग दाखवायचा आहे. शिष्यवृत्ती घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे"

प्रश्न:-
मुलांच्या बुद्धीमध्ये जेव्हा ज्ञानाची चांगल्या प्रकारे धारणा होते, तर कोणते भय निघून जाते ?

उत्तर:-
भक्तीमध्ये जे भय असते की, गुरू श्राप द्यायला नको. हे भय ज्ञानामध्ये आल्यामुळे, ज्ञानाची धारणा करण्यामुळे निघून जाते, कारण ज्ञान मार्गामध्ये कोणी श्राप देऊ शकत नाहीत. रावण श्राप देतात, बाबा वारसा देतात. रिध्दी-सिध्दी शिकलेले, असे तंग करण्याचे, दुःख देण्याचे काम करतात. ज्ञानामध्ये तुम्ही मुलं सर्वांना सुख देतात.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांप्रति आत्मिक पिता सन्मुख समजावत आहेत. तुम्ही सर्वप्रथम आत्मा आहात. हा पक्का निश्चय पाहिजे. मुलं जाणतात आम्ही आत्मे परमधाम मधुन, शरीर घेऊन भूमिका वठवण्यासाठी येतो. आत्माच भूमिका वठवते. मनुष्य परत समजतात, शरीरच भूमिका वठवते. ही मोठ्यात मोठी चूक आहे, या कारणामुळे आत्म्याला कोणी जाणत नाहीत. या आवागमन मध्ये आम्ही आत्मा येत जात राहतो. या गोष्टीला विसरल्यामुळे बाबा येऊन आत्माभिमानी बनवतात. या गोष्टी कोणी जाणत नाहीत. बाबा समजवतात, आत्मा कशी भूमिका वठवते? मनुष्याचे जास्तीत जास्त ८४ जन्म आणि कमीत कमी १-२ जन्म होतात. आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. याद्वारे सिद्ध होते, अनेक जन्म घेणारे, पुनर्जन्म घेत राहतात, थोडे जन्म घेणारे कमी पुनर्जन्म घेतात. जसे नाटकांमध्ये कोणी सुरुवाती पासून शेवटपर्यंत भुमीका करतात, तर कोणाची थोडी भूमीका असते. हे कोणी मनुष्य जाणत नाहीत. आत्मा स्वतःला जाणत नाही, तर परमपित्याला कसे जाणेल. आत्म्याची गोष्ट आहे ना. शिवबाबा आत्म्यांचे पिता आहेत. कृष्णतर आत्म्याचे पिता नाहीत. कृष्णाला निराकार पण म्हणता येत नाही. साकार मध्येच त्यांना ओळखले जाते. आत्मा तर सर्वांची आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये भूमिका नोंदलेली आहे. या गोष्टी तुमच्या मध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे समजावू शकतात. आता तुम्ही मुलं जाणतात, आम्हा आत्म्याने ८४ जन्म कसे घेतले? असे नाही की आत्मा म्हणजेच परमात्मा, नाही. असे समजले आहे, आम्ही आत्माच प्रथम देवता बनतो, आता पतित तमोप्रधान आहे, परत सतोप्रधान बनवायचे आहे. बाबा तेव्हाच येतात, जेव्हा सृष्टी जुनी होते. बाबा येऊन जुन्याला नवीन बनवतात. नवीन दुनियेची स्थापना करतात. नवीन दुनिये मध्ये आदी सनातन देवी-देवता धर्म असतो. त्यांच्यासाठीच म्हणाल प्रथम कलयुगी शूद्र धर्माचे होते. आता प्रजापिता ब्रह्माची मुख वंशावळ बनून ब्राह्मण बनले आहात. ब्राह्मण कुळांमध्ये येतात. ब्राह्मण कुळाची राजाई नसते. ब्राह्मण कुळ काही राजाई करत नाही. या भारतामध्ये न ब्राह्मण राज्य करतात, ना शूद्र राज्य करतात. दोघांची ही राजाई नसते. तरीही त्यांचे प्रजेचे, प्रजेवरती राज्य चालत राहते. तुम्हा ब्राह्मणांचे कोणतेही राज्य नाही. तुम्ही विद्यार्थी अभ्यास करत राहतात. बाबा तुम्हालाच समजवतात की, हे चक्र कसे फिरते. सतयुग, त्रेता, द्वापर कलियुग परत संगम येते. या संगमयुगा सारखी महिमा, दुसऱ्या कोणत्या युगाची नाही. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. सतयुगा मधुन त्रेता मध्ये येतात, तर दोन कला कमी होतात, तर त्यांची महिमा काय करणार? विकारांमध्ये जाणाऱ्यांची महिमा थोडीच होते. कलियुगाला जुनी दुनिया म्हटले जाते. आत्ता नविन दुनियेची स्थापना होणार आहे. तेथे देवी-देवतांचे राज्य असते. ते पुरुषोत्तम होते, परत कला कमी होत होत कनिष्ठ शुद्र, बुद्धी बनतात. त्यांना पत्थरबुद्धी पण म्हटले जाते. असे पत्थर बुद्धी बनतात, ज्यांची पूजा करतात, त्यांच्या जीवन कहानीला पण जाणत नाहीत. मुलांनी जर पित्याच्या जीवनाला जाणले नाही, तर वारसा कसा मिळेल? आता तुम्ही मुलं बाबांच्या जीवनाला जाणतात, त्यांच्याद्वारे तुम्हाला वारसा मिळत आहे. बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना खूप सुख देण्यासाठी आलो आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान चांगल्याप्रकारे राहायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनतात. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही जाणतात आम्हीच देवता बनतो. आता शूद्रा पासून ब्राह्मण बनलो आहोत. कलियुगी ब्राह्मण पण आहेत तर खरे ना. ते ब्राह्मण लोक तर जाणत नाहीत की, आमचा धर्म किंवा कुळ, कधी स्थापन झाला, कारण ते कलियुगी आहेत. तुम्ही आता प्रत्यक्ष प्रजापिता ब्रह्माचे संतान बनले आहात आणि सर्वात उच्च कोटीचे आहात. बाबा सन्मुख तुमच्या शिक्षणाची सेवा, पालन-पोषण करण्याची सेवा आणि सुंदर बनवण्याची सेवा करत आहेत. तुम्ही पण ईश्वरीय सेवेमध्ये आहात. ईश्वरीय पिता पण म्हणतात, मी सर्व मुलांच्या सेवेसाठी आलो आहे. मुलांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे. बाबा म्हणतात आत्ता घरी चला. मनुष्य भक्ती मुक्तीसाठीच करतात, जरुर जीवनामध्ये बंधनं आहेत. बाबा दुःखापासून सोडवतात. तुम्ही मुलं जाणतात, त्राही त्राही करतील. हाहाकार च्या नंतर जयजयकार होईल. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे, खूप हाय हाय करतील, जेव्हा नैसर्गिक आपत्ती ईत्यादी होईल. युरोपवासी यादव पण आहेत, बाबांनी समजावले आहे, युरोपवासींना यादव म्हटले जाते. असे दाखवतात पोटातून मुसळ निघाले आणि श्राप दिला. आता श्राप इत्यादीची तर गोष्टच नाही. हे तर वैश्विक नाटक आहे. बाबा वारसा देतात, तर रावण श्राप देतात, हा एक खेळ बनलेला आहे. बाकी श्राप देणारे तर दुसरे मनुष्य असतात, त्या श्रापाला उतरणारे पण मनुष्य असतात. गुरु गोसावींना पण मनुष्य घाबरतात की, श्राप द्यायाला नको. वास्तव मध्ये ज्ञानमार्गा मध्ये कोणी श्राप देऊ शकत नाही. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गा मध्ये श्राप इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही. रिद्धी सिद्धी इत्यादी शिकतात, ते श्राप देतात. लोकांना खूप दुखी करतात, पैसे पण खूप कमवतात. भक्त लोक हे काम करत नाहीत. . . बाबांनी हे पण समजवले आहे संगमयुगाच्या सोबतच पुरुषोत्तम अक्षर जरूर लिहा. त्रिमूर्ती अक्षर पण जरूर लिहायचे आहे आणि प्रजापिता अक्षर पण जरुरी आहे. कारण ब्रह्मांचे नाव पण अनेकांचे आहेत. प्रजापिता अक्षर लिहाल तर समजतील, साकारमध्ये प्रजापिता आहेत. फक्त ब्रह्मा लिहिल्यामुळे सूक्ष्मवतन निवासी समजतात. ब्रह्मा विष्णू शंकरला भगवान म्हणतात.

प्रजापिता म्हणाल, तर समजू शकता प्रजापिता तर येथे आहेत. सूक्ष्मवतन मध्ये कसे होऊ शकतात. विष्णूला तर दाखवतात, ब्रह्माच्या नाभीद्वारे निघाले. तुम्हा मुलांना पण ज्ञान मिळाले आहे. नाभी इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही. ब्रह्माच विष्णू, परत ब्रह्मा कसे बनतात. सर्व चक्राचे ज्ञान तुम्ही या चित्राद्वारे समजावू शकतात. चित्रा शिवाय समजुन सांगण्या मध्ये कष्ट होतात. ब्रह्माच विष्णू, परत विष्णूच ब्रह्मा बनतात. लक्ष्मीनारायण ८४चे चक्र लावून परत ब्रह्मा-सरस्वती बनतात. बाबांनी अगोदरच नावं दिली होती, जेव्हा भट्टी बनली तर नावं दिली. तरीही अनेक जण सोडून गेले, म्हणून समजवले जाते, ब्राह्मणांची माळ बनत नाही, कारण ब्राह्मण पुरुषार्थी आहेत. कधी प्रगती कधी अधोगती होत राहते. ग्रहचारी बसत राहते. बाबा जवाहरी होते ना. मोती इत्यादींची माळ कशी बनते, त्याचे अनुभवी होते ना. ब्राह्मणांची माळ अंत काळात बनते. आम्ही ब्राह्मणच दैवीगुण धारण करून परत देवता बनतो. परत शिडी उतरायची आहे, नाहीतर ८४ जन्म कसे घेतील. ८४ जन्माच्या द्वारे हे निघू शकतात. तुमचा अर्धा वेळ पूर्ण होतो, तेव्हा दुसरे धर्माचे येत राहतात. माळ बनवण्यामध्ये खूप कष्ट लागतात. खूप कष्टाने मोत्यांना टेबलावरती ठेवून माळ बनवली जाते की, कुठे जायला नको. परत सुई द्वारे माळ बनवली जाते. माळ ठीक नाही बनली तर परत तोडावी लागते. ही तर खूप मोठी माळ आहे. तुम्ही मुलं जाणतात, आम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहात. बाबांनी समजावले आहे, सुविचार बनवा, आम्ही शुद्रच ब्राह्मण परत ब्राह्मण पासून शुद्र कसे बनतो, हे येऊन समजून घ्या. या चक्राला जाणल्यामुळे तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. स्वर्गाचे मालक बनाल. असे सुविचार बनवून मुलांना शिकवायला पाहिजेत. बाबा युक्ती तर खूप सांगत राहतात. वास्तव मध्ये तुम्ही मूल्यवान आहात. तुम्हाला हिरो हिरोईन ची भूमिका मिळते. हिऱ्यां सारखे तुम्ही बनतात, परत ८४ चे चक्र लावून कवडी सारखे बनतात. आता जेव्हा हिऱ्या सारखा जन्म मिळतो, तर कवड्यांच्या पाठीमागे का लागतात? असे पण नाही, घरदार सोडायचे आहे? बाबा तर म्हणतात ग्रहस्थ मध्ये राहत कमलफुला समान पवित्र रहा आणि सृष्टी चक्राचे ज्ञानाला जाणुन दैवी गुण धारण करा, तर तुम्ही हिऱ्या सारखे बनाल. बरोबर भारत पाच हजार वर्षापूर्वी हिऱ्या सारखा होता. हे मुख्य लक्ष्य आहे. या लक्ष्मीनारायणच्या चित्राला खूप महत्त्व द्यायचे आहे. तुम्हा मुलांना खूप सेवा करायची आहे. प्रदर्शनी, संग्रहालय इत्यादीमध्ये सेवा करायची आहे. विहंग मार्गाच्या सेवे शिवाय तुम्ही प्रजा कशी बनवू शकाल. जरी हे ज्ञान ऐकतात, तरीही उच्च पद थोडेच मिळवतात. त्यांच्यासाठी म्हटले जाते करोडो मधून कोणीच हे ज्ञान घेतात. शिष्यवृत्ती पण काही जणच घेतात ना. शाळेमध्ये चाळीस-पन्नास मुलं असतात, तर त्यांच्यामधील एखादा शिष्यवृत्ती घेतो. कोणाचे थोडे गुण कमी असतील तर, त्यांनाही शिष्यवृत्ती देतात. हे पण असेच होते. शिष्यवृत्ती घेणारे अनेक आहेत. माळ्याचे आठ मणी आहेत, ते पण क्रमानुसार आहेत ना. ते प्रथम राजगादीवर बसतील, परत कला कमी होत जातात. लक्ष्मीनारायणचे चित्र क्रमांक एकचे आहे. त्यांचे पण घराने चालत राहते. परंतु चित्र लक्ष्मीनारायण चे दिलेले आहे. येथे तुम्ही जाणतात, तर चित्र बदलत जातात. चित्र दिल्यामुळे काय फायदा होईल. नाव रूप देश काळ सर्व बदलत जाते.

गोड गोड मुलांनो, आत्मिक पिता सन्मुख समजावत आहेत. कल्पापूर्वी पण बाबांनी समजावले होते. असे नाही, कृष्णाने गोप गोपिकांना ज्ञान ऐकवले. कृष्णाच्या गोपी नसतात, न त्यांना ज्ञान शिकवले जाते. ते तर सतयुगाचे राजकुमार आहेत. तेथे कसे राजयोग शिकवतील किंवा त्यांना पावन कसे बनवाल. आता तुम्ही आपल्या पित्याची आठवण करा. शिवपिता शिक्षक पण आहेत. शिक्षकाला विद्यार्थी कधी विसरू शकत नाहीत. पित्याला मुलं कधी विसरू शकत नाहीत. गुरुला पण विसरू शकत नाहीत. पिता तर जन्मापासूनच असतात. शिक्षक पाच वर्षानंतर भेटतात, परत गुरु वानप्रस्थ मध्ये भेटतात. जन्मानंतर लगेच गुरु केल्याने काय फायदा होत नाही. गुरूचे शिष्य बणून दुसऱ्या दिवशी मरतात, तर गुरु काय करतील? गायन पण करतात सतगुरु शिवाय गती नाही. सद्गुरुला सोडून परत गुरु म्हणतात. गुरु तर खूप आहेत. बाबा तर म्हणतात मुलांनो, तुम्हाला कोणत्याही देहधारी गुरु इत्यादी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कोणाकडून काहीच मागायचे नाही. असे म्हटले जाते, मागण्या पेक्षा मेलेले चांगले. सर्वांना चिंता राहते की, आम्ही कसे आपले पैसे परिवर्तन करू. दुसऱ्या जन्मासाठी ते ईश्वरार्थ दान पुण्य करतात, तर त्या मोबदल्यात, याच जुन्या सृष्टीमध्ये अल्प काळाचे मिळते. येथे तर तुमचे नवीन दुनियेसाठी साठी सर्व परिवर्तन होत आहे. तन-मन-धन, प्रभू च्या पुढे अर्पण करायचे आहे. ते जेव्हा येतील तेव्हाच अर्पण कराल ना. प्रभूला तर कोणी जाणत नाहीत, तर गुरुला पकडतात. धन इत्यादि गुरूच्या पुढे अर्पण करतात. वारिस नसतात, तर सर्व गुरूंना देतात. आजकल कायद्यानुसार ईश्वरास पण कोणी देत नाहीत. बाबा समजवतात मी गरीब निवाज आहे, म्हणून मी भारतामध्ये येतो. तुम्हाला येऊन विश्वाचे मालक बनवतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मध्ये खूप फरक आहे. ते जाणत काहीच नाहीत. असे म्हणतात मी ईश्वरार्पण करतो. सर्व अज्ञान आहे. तुम्हा मुलांना समज म्हणजे ज्ञान मिळाले आहे, ज्यामुळे तुम्ही अज्ञानी पासून ज्ञानी बनतात. बुद्धीमध्ये ज्ञान आहे, बाबा तर कमाल करतात. जरूर बेहद्दच्या बाबा कडुन वारसा मिळायला पाहिजे. बाबा द्वारे तुम्ही वारसा घेतात, फक्त दादा द्वारे. दादा पण त्यांच्याद्वारे वारसा घेतात, देणारे एकच आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, मुलांनो यांच्या अनेक जन्मांच्या अंत मध्ये येतो, यांच्यामध्ये प्रवेश करून त्यांना पावन बनवतो, परत हे फरिश्ता बनतात. बैज वरती पण तुम्ही खूप चांगली सेवा करू शकतात. तुमचा बैज सर्व अर्थ सहित आहे. हे तर जीवनदान देणारे चित्र आहे, यांची किंमत कोणालाच माहिती नाही. बाबांना नेहमी मोठ्या गोष्टी पसंत पडतात. जे कोणी दूरवरून पण वाचू शकतात, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)बाबा पासून बेहदचा वारसा घेण्यासाठी प्रत्यक्षात आपले तन मन धन ईश्वराच्या पुढे अर्पण करण्यामध्ये आपले सर्वकाही २१ जन्मासाठी परिवर्तन करायचे आहे.

(२) जसे बाबा शिकवण्याचा, संभाळ करण्याचा, आणि शृंगार करण्याची सेवा करतात. असे बाप समान सेवा करायची आहे. जीवन बंधनांमधून काढून सर्वांना जीवन मुक्ती मध्ये घेऊन यायचे आहे.

वरदान:-
सर्व खजाण्याच्या बचतीचे अंदाजपत्रक बनवणारे महिन पुरुषार्थी भव.

जसे लौकिक मध्ये जर बचत करणारे, घर नसेल तर ठीक रितीने चालू शकत नाही. असेच जर निमित्त बनलेल्या मुलांमध्ये बचत करणारे नसतील तर, सेवा केंद्र चालू शकत नाही. ती हदची प्रवृत्ती आहे आणि ही बेहद्दची प्रवृत्ती आहे. तर तपासयला पाहिजे की, संकल्प बोल आणि शक्तीमध्ये, काय काय जास्त खर्च केले. या सर्व खजाण्याचे बचतचे अंदाजपत्रक बनवून, त्यानुसार चालतात त्यांनाच महिन पुरुषार्थी म्हटले जाते. त्यांचे संकल्प बोल कर्म व ज्ञानाची शक्ती काहीच व्यर्थ जाऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
स्नेहाच्या खजान्या द्वारे मालामाल बनून सर्वांना स्नेह द्या आणि स्नेहा घ्या.