07-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुम्हाला जे बाबा ऐकवतात तेच ऐका , आसुरी गोष्टी ऐकू नका , बोलू नका , वाईट पाहू नका , वाईट ऐकू नका "

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणता निश्चय , बाबाद्वारेच झाला आहे ?

उत्तर:-
बाबा तुम्हाला निश्चय करतात की, मी तुमचा पिता पण आहे, शिक्षक पण आहे आणि सदगुरु पण आहे. तुम्ही पुरुषार्थ करा या स्मृतीमध्ये राहण्यासाठी परंतु माया तुम्हाला विसरवते. अज्ञान काळामध्ये तर मायेची गोष्टच नाही.

प्रश्न:-
कोणती दिनचर्या ( चार्ट ) लिहिण्या साठी विशाल बुद्धी पाहिजे ?

उत्तर:-
स्वतःला आत्मा समजून बाबांची किती वेळ आठवण केली,हा चार्ट लिहण्यांमध्ये खुप विशाल बुद्धी पाहिजे. देही अभिमानी होऊन बाबांची आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.

ओम शांती।
विद्यार्थ्यांनी हे समजले की शिक्षक आले आहेत.हे तर मुलं जाणतात ते पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत आणि सर्वोच्च सदगुरु पण आहेत.मुलांना स्मृती आहे परंतु क्रमानुसार,पुरुषार्था नुसार आहे.असा कायदा म्हणतो,जेव्हा एकदा जाणले की शिक्षक आहेत किंवा पिता आहेत,गुरु आहेत तर परत विसरू शकत नाही,परंतु हे माया विसरवते.अज्ञान काळामध्ये पण माया कधी विसरवत नाही. मुलगा कधी आपल्या पित्याला आणि त्यांच्या कर्तव्याला विसरत नाही.मुलांना खुशी राहते आम्ही,पित्याच्या धनाचे मालक आहोत.जरी स्वतः शिकतात परंतु वडिलांची संपत्ती तर मिळते ना.येथे पण तुम्ही मुलं शिकतात आणि बाबांच्या संपत्ती तुम्हाला मिळते.तुम्ही राजयोग शिकत आहात.बाबा द्वारे निश्चय होतो की आम्ही शिवबाबाचे आहोत.बाबाच सदगतीचा रस्ता सांगत आहेत,म्हणून तेच सतगुरू पण आहेत. या गोष्टी विसरायचं नाहित.जे बाबा ऐकावतात तेच ऐकायचे आहे.माकडाची एक खेळणी आहे,वाईट ऐकू नका,वाईट पाहू नका,वाईट बोलू नका,तसे तर हे मनुष्यासाठी आहे.बाबा म्हणतात,आसुरी गोष्टी बोलू नका,ऐकू नका.अगोदर खेळणी माकडाचे बनवत होते.आता तर मनुष्याची बनवतात.तुमच्याजवळ नलिनी मुली चे बनवले आहे.तर तुम्ही बाबाच्या निंदेच्या गोष्टी ऐकू नका.बाबा म्हणतात,माझी खूप निंदा करतात.तुम्हाला माहित आहे कृष्णाच्या भक्तां पुढे अगरबत्ती लावत होते,तर रामाचे भक्त नाक बंद करत होते. एक दोघाचा सुगंध पण चांगला वाटत नाही.आपसा मधे जसे दुश्मन होतात. आता तुम्ही राम वंशी आहात.दुनिया सारी रावण वंशी आहे.येथे तर धुप आगरबत्ती ची गोष्ट नाही.तुम्ही जाणतात शिव पित्याला सर्वव्यापी म्हटल्यामुळे खूपच दुर्गति झाली आहे. दगडा मातीमध्ये म्हटल्यामुळे बुद्धी पण तशीच झाली आहे.बेहद चे बाबा तुम्हाला जो वारसा देतात,त्यांची खूप निंदा केली आहे. ज्ञान तर कोणामध्ये नाही.ते ज्ञान रत्न नाहीत परंतु दगड-माती आहेत.आता तुम्हाला बाबांची आठवण करावी लागेल.बाबा म्हणतात मी जसा आहे,जो आहे,मला कोणीच जाणत नाहीत.मुलां मध्ये पण क्रमा नुसार आहेत.बाबांची आठवण यर्थात रित्या करायची आहे.ते पण सूक्ष्म बिंदू आहेत.त्यांच्यामध्ये सर्व भूमिका भरलेली आहे.बाबांना चांगल्या प्रकारे जाणून आठवण करायची आहे आणि स्वतःला आत्मा समजायचे आहे.जरी आपण मुलं आहोत परंतु असे नाही बाबांची आत्मा मोठी,आणि आमची छोटी आहे,नाही.जरी बाबा ज्ञानाचे सागर आहेत परंतु आत्मा मोठी होऊ शकत नाही.तुमच्या आत्म्या मध्ये ज्ञान आहे परंतु नंबरा नुसार आहे.शाळेमध्ये पण नंबरा नुसारच पास होतात.शून्य गुण कुणाचे नसतात,काही ना काही गुण मिळतात.बाबा म्हणतात मी तुम्हाला जे ज्ञान ऐकवतो,ते प्रायलोप होते, तरीपण चित्र आहेत.ग्रंथ पण बनवले आहेत.बाबा तुम्हा आत्म्यांना म्हणतात, वाईट ऐकू नका..या आसुरी दुनियेला काय पाहिचे आहे.या खराब दुनिया पासून जसे डोळे बंद करायचे आहेत.आता स्मृति आली आहे की,ही जुनी दुनिया आहे.या दुनियाशी काय संबंध ठेवायचा आहे? या जुन्या दुनियेला पाहून पण न पाहिल्या सारखे करायचे आहे.आपल्या शांतीधाम आणि सुखधाम ची आठवण करायची आहे.आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे,तर ज्ञानाचे स्मरण करायचे आहे.भक्तिमार्ग मध्ये पण सकाळी उठून माळ जपतात.सकाळचा मुहूर्त,वेळ चांगली असते. ब्राह्मणांचा मुहूर्त आहे.ब्रह्मा भोजनाची पण महिमा आहे.ब्रह्म भोजन नाही,ब्रह्मा भोजन.तुम्हालापण ब्रह्माकुमारी च्या ऐवजी ब्रह्मकुमारी म्हणतात.काहीच समजत नाहीत.ब्रह्माची मुलं तर ब्रह्माकुमार असतील.ब्रह्म तत्व राहण्याचे ठिकाण आहे, त्याची काय महिमा असेल.बाबा मुलांची तक्रार करतात,मुलांनो तुम्ही एकीकडे पूजा करतात,दुसरीकडे परत सर्वांची निंदा करतात.निंदा करत करत तमोप्रधान बनले आहात.तमोप्रधान पण बनायचे आहेच. चक्राची पुनरावृत्ती होते.जेव्हा कोणी मोठे मनुष्य येतात तर त्यांना चक्रा वरती जरूर समजून सांगायचे आहे.हे चक्र पाच हजार वर्षाचे आहे,त्याच्यावरती खूप लक्ष द्यायचे आहे.रात्रीच्या नंतर दिवस जरूर होणार आहे,असे होऊ शकत नाही की रात्रीनंतर दिवस येणार नाही.कलियुगा नंतर सतयुग जरूर येणार आहे.या विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे.

तर बाबा समजवतात गोड मुलांनो स्वतःला आत्मा समजा,आत्मा सर्व काही करते,अभिनय करते.हे कुणालाच माहीत नाही की,जर आम्ही अभिनय करतो तर नाटकाचे आदी मध्य अंत जरूर समजायला पाहिजे.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते,तर हे नाटक झाले ना.सेकंद सेकंद त्याचीच पुनरावृत्ती होते,जे भूतकाळात होऊन गेले आहे.या गोष्टी दुसरे कोणीही समजू शकत नाहीत. कमी बुद्धी वाले तर हमेशा नापास होतात,यामध्ये शिक्षक काय करू शकतील.शिक्षकाला म्हणतील का,कृपा करा,आशीर्वाद करा.हे पण शिक्षण आहे, या गीता पाठशाला मध्ये स्वतः भगवान राजयोग शिकवत आहेत.कलियुग बदलुन सतयुग जरूर बनायचे आहे.नाटका नुसार बाबांना पण यायचे आहे.बाबा म्हणतात मी कल्प कल्प संगम युगा वरती येतो.दुसरे कोणी असे म्हणू शकत नाही की,मी सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान ऐकण्यासाठी आलो आहे.स्वताला शिवोहम् म्हणतात त्यामुळे काय फायदा झाला? शिवबाबा सहज राजयोग शिकण्यासाठी आले आहेत.कोणताही साधुसंत इत्यादी ना भगवान म्हणू शकत नाहीत.असे तर खूप म्हणतात,आम्हीच कृष्ण आहोत,आम्हीच लक्ष्मीनारायण आहोत,असे म्हणतात. आता कुठे ते श्रीकृष्ण,सतयुगाचे राजकुमार,कुठे हे कलयोगी पतीत मनुष्य. असे थोडेच म्हणाल यांच्यामध्ये भगवान आहे.मंदिरामध्ये जाऊन विचारू शकता हे तर सतयुगा राज्य करत होते,ते परत कुठे गेले?सतयुगाच्या नंतर जरूर त्रेता,द्वापर, कलियुग आले ना.सतयुगा मध्ये सूर्यवंशी राज्य होते,त्रेता मध्ये चंद्रवंशी.हे सर्व ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे.इतके ब्रह्मकुमार कुमारी आहेत तर जरूर प्रजापिता पण असतील.परत ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टीची स्थापना करतात.रचनाकार ब्रह्माला म्हटले जात नाही.ते परत ईश्वरीय पिता आहेत.कशी रचना करतात ते तर शिवबाबा सन्मुख समजवतात. हे ग्रंथ तर नंतर बनले आहेत.जसे ख्रिस्ताने समजवले नंतर,त्याचे बायबल ग्रंथ बनले.परत त्याचे वर्णन करत राहतात.सर्वांचे सद्गगती दाता, सर्वांचे मुक्तिदाता,पतित पावन एकच बाबाचे गायन आहे.त्यांचीच आठवण करतात,हे प्रभू दया करा.पिता तर एकच असतो ना.सार्या विश्वाचे पिता आहेत. मनुष्याला तर माहित नाही की,सर्व दुःखा पासून मुक्त करणारे कोण आहेत?आता सृष्टी पण जुनी,मनुष्य पण तमोप्रधान झाले आहेत.ही लोहयुगी दुनिया आहे.सुवर्णयुग होते,परत जरूर येईल.हे विनाश होऊन जाईल.विश्व युद्ध होईल,अनेक नैसर्गिक आपत्ती येतील.वेळ तर हीच आहे.मनुष्य सृष्टीची खूपच वृध्दी झाली आहे.तुम्ही म्हणत राहतात,भगवान आले आहेत.तुम्ही मुलं सर्वांना आव्हान देतात,की ब्रह्मा द्वारा एका आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे.अविनाश नाटका नुसार सर्व ऐकत राहतात.दैवी गुण पण धारण करतात.तुम्ही जाणतात आमच्यामध्ये काहीच गुण नव्हते.नंबर एक अवगुण आहे काम विकाराचा,जो खूपच त्रास देतो.माया ची कुस्ती चालते ना.इच्छा नसता ना मायचे वादळ विकारांमध्ये घेऊन जातात. लोहयुग आहे ना,काळे तोंड करतात.सावळे तोंड म्हणणार नाहीत.कृष्णासाठी म्हणतात कालिया सापाने डसले,त्यामुळे सावळा झाला.इज्जत ठेवण्यासाठी सावळे म्हणतात.काळे तोंड केल्याने इज्जत चालली जाते.तर दूर देश,निराकार देशा वरून प्रवासी आला आहे.लोहयुगी दुनिया मध्ये,काळ्या(पतित) शरीरामध्ये येऊन,यांना गोरा बनवतात.आता बाबा म्हणतात तुम्हाला परत सतोप्रधान बनायचे आहे.माझी आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही विष्णुपुरी चे मालक बनाल.या ज्ञानाच्या गोष्टी समजून घ्यायचे आहेत.बाबा रूप आहेत आणि बसंत पण आहेत.तेजोमय बिंदू रूप आहेत.त्यांच्यामध्ये ज्ञान पण आहे ना.नावा रूपापेक्षा वेगळे तर नाहीत,त्यांचे रूप काय आहे, हे दुनिया जाणत नाही.बाबा तुम्हाला समजवतात,मला पण आत्मा म्हणतात, फक्त परम आत्मा म्हणतात.परम आत्मा मिळून परमात्मा म्हटले जाते.पिता पण आहेत आणि शिक्षक पण आहेत. असे म्हणतात ते ज्ञानाचे सागर आहेत.ते समजतात ज्ञान सागर म्हणजे सर्वांच्या मनातील जाणनारे,जर परमात्मा सर्वव्यापी आहेत तर सर्वच ज्ञानाचे सागर झाले ना.परत त्या एकालाच का म्हणतात?मनुष्य खूपच तुच्छ बुद्धी झाले आहेत.ज्ञानाच्या गोष्टीला बिलकुलच जाणत नाहीत.बाबा ज्ञान आणि भक्ती चा फरक समजवतात.प्रथम ज्ञान दिवस सतयुग त्रेता,परत द्वापर कलियुग रात्र. ज्ञानाद्वारे सदगती होते.हे राजयोगाचे ज्ञान हठयोगी समजावू शकत नाहीत,न गृहस्थी समजावू शकतात,कारण अपवित्र आहेत.आता राजयोग कोण शिकवेल? जे म्हणतात माझीच आठवण करा तर विकर्म विनाश होतील.निवृत्तीमार्गा चा धर्म वेगळा आहे.येथे सर्व म्हणतात ईश्वर सत्य आहेत. बाबाच सत्य ऐकवणारे आहेत.आत्म्याला आत्ता स्मृति आली आहे,म्हणून आम्ही बाबांची आठवण करतो,की येऊन आम्हाला खरी खरी कथा ऐकवा,नरा पासून नारायण बनण्याची.तुम्हाला सत्यनारायणा ची कथा ऐकवतो ना. अगोदर तुम्ही खोटी कथा ऐकत होते, आता तुम्ही खरी ऐकतात. खोटी कथा ऐकुन,ऐकुन कोणीही नारायण तर बनू शकत नाहीत.परत ती सत्यनारायणाची कथा कशी होऊ शकते? मनुष्य कुणाला नरा पासून नारायण बनवू शकत नाहीत. बाबाच येऊन स्वर्गाचे मालक बनवतात. बाबा येतातच भारतामध्ये,परंतु ते कधी येतात हे समजत नाहीत. शिव शंकर ला एक करुन गोष्टी बनवल्या आहेत. शिवपुराण पण आहे.गीता कृष्णाची म्हणतात,परत शिव पुराण मोठे झाले ना. वास्तव मध्ये ज्ञान तर गीतेमध्ये आहे. भगवानुवाच मनमनाभव. हे शब्द गिते शिवाय दुसऱ्या कोणत्या ग्रथा मध्ये नाहीत. गायन पण आहे सर्व शास्त्र शिरोमणी भगवद्गगिता.एका भगवंताचे श्रेष्ठ मत आहे.प्रथमतः हे सांगायचे आहे,थोड्या वर्षांमध्ये नवीन श्रेष्ठाचारी दुनिया ची स्थापना होईल.आत्ता भ्रष्टाचारी दुनिया आहे.श्रेष्टाचारी दुनिया मध्ये खूप थोडे मनुष्य असतात.आता तर असंख्य मनुष्य आहेत,त्यासाठी विनाश समोर उभा आहे.बाबा म्हणतात,मी राजयोग शिकवत आहे.बाबा कडूनच वारसा मिळतो.पित्या कडूनच सर्वकाही मागतात.कुणाला धन जास्त असेल,मुलगा असेल,तर म्हणतात भगवंताने दिला.तर भगवान एकच झाले ना,परत सर्वांमध्ये भगवान कसे होऊ शकतात.आता म्हणतात माझी आठवण करा.आता आत्म्यांना बाबा म्हणतात, माझी आठवण करा.आत्मा म्हणते,आम्हाला परमात्मा ने ज्ञान दिले आहे ते,परत भावांना देतो.बाबांची किती वेळ आठवण केली,हा चार्ट ठेवण्या मध्ये खूपच विशाल बुद्धी पाहिजे.देहीअभिमानी होऊन बाबांची आठवण करावी लागेल, तेव्हाच विकर्म विनाश होतील.ज्ञान तर खूपच सहज आहे.बाकी आत्मा समजून बाबा ची आठवण करत,स्वतःची प्रगती करायची आहे.हा चार्ट फार थोडेच ठेवतात.देही अभिमानी होऊन बाबांची आठवण केल्यामुळे कोणाला दुःख देणार नाहीत.बाबा येतातच सुख देण्यासाठी,तर मुलांना पण सर्वांना सुख द्यायचे आहे, कधीच कोणाला दुःख द्यायचे नाही. बाबांच्या आठवणीमुळे सर्व भूत पळून जातील. हे गुप्त कष्ट आहेत.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेम पूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
श्रेष्ठ वृक्ती द्वारा वृक्तीचे परिवर्तन करणारे , नेहमी सिद्धी स्वरूप भव .

सिध्दी स्वरुप बनण्या साठी,वृत्तीचे वृत्ती द्वारे,संकल्प द्वारा संकल्पाचे परिवर्तन करण्याचे कार्य करा,याचे संशोधन करा. जेव्हा या सेवेमध्ये व्यस्त रहाल तर ही सूक्ष्म सेवा स्वतःच अनेक कमजोरी नष्ट करेल.आता याचे नियोजन करा तर जिज्ञासू पण जास्त वाढतील,भंडारी पण वाढेल,इमारत पण मिळेल,सर्व सिद्धी सहज होईल.ही विधी सिद्धी स्वरूप बनवेल.

बोधवाक्य:-
वेळेला सफल करत राहाल तर वेळेच्या धोक्या पासून सुरक्षित राहाल .