07-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला आपल्या योग बळाद्वारे सृष्टीला पावन बनवायचे आहे, तुम्ही योगबळा द्वारेच माये वरती विजय प्राप्त करुन जगजीत बनू शकता"

प्रश्न:-
बाबांची भूमिका कोणती आहे,त्या भूमिकेला तुम्ही मुलांनी कोणत्या आधारे जाणले आहे?

उत्तर:-
बाबांची भूमिका आहे सर्वांचे दुःख दूर करून सुख देणे.रावणाच्या साखळ्या मधून सोडवणे.जेव्हा बाबा येतात,भक्तीची रात्र पूर्ण होते.बाबा तुम्हाला आपला आणि आपल्या खजाण्याचा परिचय देतात.तुम्ही एक बाबांना जाणल्या मुळे सर्व काही जाणता.

गित:-
तुम्हीच माता,पिता तुम्हीच आहात...

ओम शांती।
मुलांनी ओम शांती चा अर्थ समजला आहे,बाबांनी समजवले आहे आम्ही आत्मा आहोत,या सृष्टी नाटकांमध्ये आमची भूमिका मुख्य आहे.कोणाची भूमिका आहे?आत्मा शरीर धारण करून अभिनय करते.बाबा मुलांना आत्म अभिमानी बनवत आहेत.इतके दिवस देह अभिमानी होते.आता स्वतःला आत्मा समजुन बाबांची आठवण करायची आहे.आपले बाबा नाटकाच्या नियोजना नुसार आले आहेत.बाबा रात्री मध्ये येतात.कधी येतात त्यांची तिथी तारीख नाही.तिथी तारीख त्यांचीच असते जे लौकिक जन्म घेतात.हे तर पारलौकिक पिता आहेत.यांचा लौकिख जन्म नाही. कृष्णाची तिथी तारीख वेळ इत्यादी सर्व देतात.यांचा तर दिव्य जन्म म्हटले जाते. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून म्हणतात,हे बेहदचे नाटक आहे.त्यामध्ये अर्धाकल्प रात्र आहे.जेव्हा रात्र म्हणजे अज्ञानाचा अंधार असतो,तेव्हा मी येतो.तिथी तारिख नाही.यावेळी भक्ती पण सतोप्रधान आहे.अर्धाकल्प बेहदचा दिवस आहे.बाबा स्वता: म्हणतात मी यांच्या मध्ये प्रवेश केला आहे.गीतेमध्ये आहे भगवानु्वाच परंतु भगवान मनुष्य होऊ शकत नाहीत.कृष्ण पण दैवी गुणांचे आहेत.हा मनुष्य लोक आहे.हा देवलोक नाही.गायन पण आहे,ब्रह्मा देवताये नम:... ते तर सूक्ष्मवतन वासी आहेत.मुलं जाणतात तेथे हड्डी मास नसते.तेथे सूक्ष्म शरीर सफेद सावली सारखे असते,हाड्डी असणारे नाही.या गोष्टीला मनुष्य जाणत नाहीत.बाबाचं येऊन ऐकवतात.ब्राह्मणच ऐकतात,दुसरे कोणी ऐकत नाहीत.ब्राह्मण वर्ण भारतामध्येच असतो,तो पण तेव्हाच असतो,जेव्हा परमपिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्राह्मण धर्माची स्थापना करतात.आता ब्रह्मांना रचनाकार म्हटले जात नाही.नवीन कोणतीही रचना करत नाहीत,फक्त परिवर्तन करतात.हे बाबा,पतीत दुनिया मध्ये येऊन आम्हाला पावन बनवा,असे बोलवत राहतात.आता तुम्हाला पावन बनवत आहेत.तुम्ही परत योग बळाद्वारे या सृष्टीला पावन बनवतात.माये वरती विजय प्राप्त करून,तुम्ही जगजीत बनतात.योगबळाला विज्ञानाचे बळ पण म्हटले जाते.ऋषीमुनी इत्यादी सर्व शांतीची इच्छा ठेवतात परंतु शांतीचा अर्थ तर जाणत नाहीत.या सृष्टी वरती अभिनय तर जरूर करायचा आहे.शांतीधाम गोड शांती चे घर आहे. तुम्हाला माहित आहे की आपले घर शांतीधाम आहे.येथे आम्ही अभिनय करण्यासाठी आलो आहोत.बाबांना बोलवतात,हे पतित-पावन दुखहर्ता सुखकर्ता या,आणि आम्हाला रावणाच्या साखळ्या मधून सोडवा.भक्ती रात्र आहे,ज्ञान दिवस आहे.रात्र मुर्दाबाद होते,परत ज्ञान जिंदाबाद होईल.हा खेळ सुख आणि दुःखाचा आहे.तुम्ही जाणता प्रथम आम्ही सुखधाम मध्ये होतो परत खाली उतरत उतरत नरका मध्ये आलो.कलियुग कधी नष्ठ होईल,आणि परत सतयुग कधी येईल,हे कोणीच जाणत नाहीत.तुम्ही बाबांना जाणल्यामुळे बाबा द्वारे सर्व काही जाणले आहे.मनुष्य ईश्वराला शोधण्यासाठी खूप धक्के खातात, बाबांना तर जाणत नाहीत.बाबांना तेव्हाच जाणतील,जेव्हा स्वता: बाबा येऊन आपला आणि आपल्या संपतीचा परिचय देतील.वारसा पित्या द्वारे मिळतो, मातेकडून नाही.यांना मम्मा पण म्हणतात परंतु यांच्याद्वारे वारसा मिळत नाही.यांची आठवण पण करायची नाही.ब्रह्मा विष्णू शंकर पण शिव बाबांची मुलं आहेत,हे कोणीही जाणत नाहीत. बेहदचे रचनाकार एक बाबाच आहेत बाकी सर्व त्यांची रचना किंवा हदचे रचनाकार.आता बाबा तुम्हा मुलांना म्हणतात,माझी आठवण करा,तर तुमचे विकर्म विनाश होतील.मनुष्य बाबांना जाणत नाहीत,तर आठवण कोणाची करायची?म्हणून बाबा म्हणतात खूपच विना धनीचे झाले आहेत. ही पण नाटकांमध्ये नोंद आहे.भक्ती आणि ज्ञान दोघां मध्ये सर्वात श्रेष्ठ कर्म,दान करणे आहे.भक्ती मार्गामध्ये ईश्वरा अर्थ दान करतात,कशासाठी? कोणती कामना तर जरूर राहते.जसे कर्म तसे फळ मिळेल असे समजतात.या जन्मामध्ये जे कराल,त्याचे दुसऱ्या जन्मांमध्ये मिळेल,असे समजतात.जन्म जन्मातंर मिळणार नाही.एका जन्मा साठी च फळ मिळते.सर्वात चागले कर्म दान करणे आहे.दानीला पुण्यात्मा म्हटले जाते. भारताला महादानी म्हटले जाते.भारता मध्ये जेवढे दान होते,तेवढे दुसर्‍या खंडांमध्ये होत नाही.बाबाच येऊन मुलांना दान करतात,परत बाबांना मुलं दान करतात.असे म्हणतात बाबा तुम्ही याल तर,आम्ही आपले तन मन धन सर्व आपल्या हवाली करू,तुमच्या शिवाय आमचे कोणी नाही.बाबा पण म्हणतात माझ्यासाठी तुम्ही मुलंच आहात.मला म्हणतात स्वर्गीय ईश्वरी पिता,म्हणजे स्वर्गाची स्थापना करणारे.मी येऊन तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो.मुलं माझ्यासाठी सर्व काही अर्पण करतात, बाबा सर्वकाही आपल्या साठी आहे.भक्ती मार्गामध्ये पण म्हणत होते,बाबा हे सर्व काही आपण दिलेले आहे,परत तेच चालले जाते तर दुःखी होतात.ते भक्तीचे अल्प काळाचे सुख आहे.बाबा म्हणतात भक्ती मार्गा मध्ये तुम्ही मला अप्रत्यक्ष पणे दान करतात,त्याचे फळ तुम्हाला मिळत राहते. आता या वेळेस मी तुम्हाला कर्म अकर्म विर्कमाचे रहस्य स्पष्ट करतो.भक्ती मार्गामध्ये जसे कर्म करत आले त्याचे अल्पकाळाचे सुख पण,माझ्या द्वारे तुम्हाला मिळते.या गोष्टीची दुनिया मध्ये कुणालाच माहिती नाही.बाबा कर्माची गती समजवतात.सतयुगा मध्ये कोणी वाईट कर्म करत नाही.नेहमी सुखच सुख असते. सुखधाम स्वर्गाची आठवण करतात.आता तुम्ही नर्का मध्ये बसले आहात.तरीही म्हणतात,अमका स्वर्गवासी झाला. आत्म्याला स्वर्ग खूप प्रिय वाटतो.आत्माच म्हणते अमका स्वर्गवासी झाला परंतु तमोप्रधान असल्यामुळे त्यांना काहीच माहित होत नाही,स्वर्ग काय आहे,नर्क काय आहे?बेहदचे बाबा समजवतात,तुम्ही सर्व खूप तमोप्रधान बनले आहात.बेहद नाटकाला जाणत नाहीत.असे समजतात, सृष्टीचे चक्र जरूर फिरत राहते,तर जरूर हुबहू फिरेल ना.ते फक्त असेच म्हणतात.आता संगम युग आहे.या एका संगम युगाचे गायन आहे.अर्धा कल्प देवतांचे राज्य चालते,परत राज्य कुठे गेले, कोण जिंकतात?हे कोणालाच माहिती नाही.बाबा म्हणतात रावण जिंकुन घेतो. त्यांनी परत देवता आणि आसुरांची लढाई दाखवली आहे.आता बाबा समजवतात पाच विकारा रुपी रावणा द्वारे हारतात,परत रावणावर विजय प्राप्त करतात.तुम्हीच पूज्य होते परत पुजारी पतीत बनले आहात,म्हणजे रावणापासून हरले ना.हा तुमचा दुश्मन असल्यामुळे तुम्ही त्यांना नेहमी जाळत आले परंतु तुम्हाला माहीत नाही.आता बाबा समजवतात रावणा मुळे पतित बनले आहात,या विकारालाच माया म्हटले जाते.मायाजीत जगजीत. हा रावण तुमचा सर्वात मोठा दुश्मन आहे.आता श्रीमता द्वारे तुम्ही या पाच विकारा वरती विजय मिळतातत.बाबा आले आहेत विकारा वरती विजय मिळवून देण्यासाठी.हा खेळ आहे ना.माये पासुन हरल्ल्या नंतर हार आणि मायेला जिंकल्यानंतर जीत आहे. विकारावर विजय बाबाच मिळवून देतात म्हणून त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. रावण पण कमी शक्तिमान नाही परंतु तो दुःख देतो म्हणून त्यांचे गायन नाही.रावण फार मोठा दुश्मन आहे.तुमची राजाई हिरावून घेतो.आता तुम्ही समजले आहात, आम्ही कसे हारतो परत कसे जिकंतो? आत्म्याची इच्छा आहे शांती मिळावी. आम्ही आपल्या घरी जाऊ.भक्त भगवंताची आठवण करतात परंतु पत्थर बुद्धी झाल्यामुळे समजत नाहीत.भगवान पिता आहेत तर बाबा पासून जरूर वारसा मिळतो परंतु कधी मिळतो,परत कसा गमावतो हे जाणत नाहीत.बाबा म्हणतात मी ब्रह्मा तनाद्वारे तुम्हाला समजावतो. मलापण कर्मेंद्रिये पाहिजेत ना.मला स्वतःची कर्म इंद्रिय तर नाहीत.सूक्ष्मवतन मध्ये पण कर्मेंद्रिये आहेत.चालता-फिरता जसा मुव्ही,सिनेमा असतो,हे मुवी टाँकी सिनेमा आत्ता निघाले आहेत.तर बाबाना पण समजून सांगण्यासाठी सहज होते. त्यांचे बाहुबल आहे,तुमचे योगबळ आहे. रशिया आणि अमेरिका जर आपसात मिळाले तर विश्वा वरती राज्य करू शकतात परंतु आत्ता त्यांच्यामध्ये खूप फुट पडली आहे.तुम्हा मुलांना शांतीचा शुद्ध घमंड राहायला पाहिजे.तुम्ही मनमनाभव च्या आधारे,शांतीच्याआधारा द्वारे जगतजीत बनतात.ते विज्ञान घमंडी आहेत.तुम्ही शांतीचे घमंडी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करतात.तुम्ही बाबांच्या आठवणी द्वारे सतोप्रधान बनाल.खूपच सहज उपाय सांगतात.तुम्ही जाणता शिवबाबा आले आहेत,आम्हा मुलांना परत स्वर्गाचा वारसा देण्यासाठी. तुमचे जे पण कलियुगी कर्मबंधन आहेत, बाबा महणतात,त्यांना विसरा.५ विकार दान मध्ये द्या.तुम्ही जे माझे माझे करत आले,माझा पती,माझा मुलगा...हे सर्व विसरून जावा.सर्व पाहून पण त्यांच्याद्वारे ममत्व नष्ट करा.या सर्व गोष्टी मुलांनाच समजवतात.जे बाबांना जाणतच नाहीत, ते या भाषेला समजू शकणार नाहीत.बाबा येऊन मनुष्य पासून देवता बनवतात.देवता सतयुगा मध्ये असतात.कलियुगा मध्ये मनुष्य असतात.आजपर्यंत यांची लक्षणे आहेत अर्थात चित्र आहेत.मला म्हणतातच पतित पावन.माझ्या कला कमी होत नाहीत.तुम्ही म्हणता आम्ही पावन होतो,परत कला कमी होऊन पतित बनलो आहोत.आता तुम्ही येऊन पावन बनवा तर आम्ही घरी जाऊ.हे अध्यात्मिक ज्ञान आहे.अविनाश ज्ञान रत्न आहेत ना.हे नवीन ज्ञान आहे.आता तुम्हाला हे ज्ञान शिकवत आहेत.रचनाकार आणि रचनेच्या आदी,मध्य,अंत चे रहस्य सांगतो.आता ही जुनी दुनीया आहे.यामध्ये तुमचे जे पण मित्र संबंधित आहेत,सर्वा मधून बुध्दी योग काढून टाका.तुम्ही मुलं आपले सर्वकाही बाबांच्या स्वाधीन करतात.बाबा परत स्वर्गाची बादशाही २१जन्मासाठी स्वाधीन करतात.देवान-घेवान तर होते ना.बाबा तुम्हाला२१जन्मासाठी राज्य भाग्य देत आहेत.२१जन्म,२१ पिढ्याचे गायन आहे ना,म्हणजे२१जन्म पूर्णपणे जीवन चालत राहते.अचानक कधीच मृत्यू होऊ शकत नाही.तुम्ही अमर बणुन अमर पुरी चे मालक बनतात.तुम्हाला कधी काळ खाऊ शकत नाही.आता तुम्ही मरण्यासाठी पुरुषार्थ करत आहात.बाबा म्हणतात देहा साहित देहाचे सर्व संबंध सोडून,एका बाबा सोबत सर्व संबंध ठेवायचे आहेत.आता सुखाच्या संबंधांमध्ये जायचे आहे म्हणून दुखाच्या बंधनाला विसरून जावा.गृहस्थ व्यवहारा मध्ये राहत पवित्र बनायचे आहे. बाबा म्हणतात माझीच आठवण करा. दैवी गुणांची पण धारणा करायची आहे.या देवता सारखे बनायचे आहे.मुख्य लक्ष हेच आहे.हे लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते,यांनी कसे राज्य मिळवले,परत कुठे गेले,हे कोणालाच माहिती नाही.आता तुम्हा मुलांना दैवी गुण धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही.बाबाच दुखहर्ता सुखकर्ता आहेत,तर तुम्हाला पण सुखाचा रस्ता सर्वांना सांगायचा आहे, म्हणजेच अंधाची काठी बनायची आहे. आता बाबांनी तुम्हाला तिसरा नेत्र दिला आहे.तुम्ही जाणता बाबा कशी भूमिका करतात.आता बाबा आम्हाला शिकवत आहेत,परत हे शिक्षण प्रायलोप म्हणजेच नष्ट होईल.देवतांमध्ये हे ज्ञान राहत नाही. तुम्ही ब्रह्मा वंशावली ब्राह्मणच रचनाकार आणि रचनेच्या ज्ञानाला जाणतात,दुसरे कोणी जाणू शकत नाहीत.या लक्ष्मी नारायण इत्यादी मध्ये पण हे ज्ञान असते तर परंपरा चालत आले असते.तेथे ज्ञानाची आवश्यकता राहत नाही कारण स्वर्गामध्ये सर्वांची सद्गती असते.आता तुम्ही सर्वकाही बाबांना अर्पण करतात,परत बाबा तुम्हाला सर्व काही २१जन्मासाठी देतात.असे दान कधी होत नाही.तुम्ही सर्व काही देतात, बाबा हे सर्व काही आपले आहे,तुम्ही पण आमचे आहात.त्वमेव माता च पिता त्वमेव, भूमिका तर करतात ना.मुलांना दत्तक घेतात आणि स्वतः शिकवतात,परत स्वतः सर्वांना घेऊन जातात.तुम्ही माझी आठवण करा परत मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल.हा यज्ञ स्थापन केलेला आहे. हा शिव ज्ञानयज्ञ आहे,या मध्ये तुम्ही सर्व तन,मन,धन सर्व काही अर्पण करतात. आनंदाने सर्व अर्पण होते.बाकी आत्मा राहते.बाबा बस आपल्या श्रीमता नुसार चालू. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत पवित्र बनायचे आहे.साठ वर्षाचे जेव्हा आयुष्य असते,तेव्हा वानप्रस्थ अवस्थांमध्ये जाण्यासाठी तयारी करतात परंतु ते कोणीही परत जाण्यासाठी,तयारी करत नाहीत.आता तुम्हाला सद्गुरु चा मनमनाभव हा मंत्र मिळालेला आहे. भगवानुवाच तुम्ही माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील.सर्वांना सांगा तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबाची आठवण करा,आता आपल्या घरी जायचे आहे.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कलियुगी सर्व कर्म बंधनांना विसरून पाच विकाराचे दान करून, आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे.एकाच शांतीच्या शुद्ध अहंकारा मध्ये राहायचे आहे.

(२) रुद्र यज्ञामध्ये आनंदाने आपले तन मन धन सर्व अर्पण करून सफल करायचे आहे.या वेळेत सर्वकाही बाबांच्या हवाली करून २१जन्मासाठी बादशाही बाबाकडून घ्यायची आहे.

वरदान:-
निमित्त भावाच्या स्मृती द्वारे हलचल समाप्त करणारे नेहमी अचल अडोल भव.
 

निमित्त भावाद्वारे अनेक प्रकारचा मी पणा,माझे पणा सहजच नष्ट होतो.ही स्मृती सर्व प्रकारच्या हलचल मधून सोडवून अचल स्थितीचा अनुभव करवते.सेवांमध्ये कष्ट करावे लागत नाहीत कारण निमित्त बंनणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये नेहमी हेच राहते की,जे आम्ही करू त्याला पाहून सर्व करतील.सेवेच्या निमित्त बनणे म्हणजेच रंगमंचावर(स्टेजवर)येणे.रंगमंचा कडे स्वतः च सर्वांची नजर जाते.तर हे स्मृतीच सुरक्षेचे साधन बनते.

बोधवाक्य:-
सर्व गोष्टींमध्ये अनासक्त बना तर परमात्म पित्याच्या आधाराचा अनुभव होईल.