07-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा दुर देशांमधून तुम्हा मुलांसाठी नवीन राज्य,स्थापन करण्यासाठी आले आहेत,तुम्ही आत्ता स्वर्गाच्या लायक बनत आहात"

प्रश्न:-
ज्या मुलांचा शिव बाबांवरती अतुट निश्चय आहे,त्यांची लक्षणं काय असतील?

उत्तर:-
ते डोळे बंद करून बाबाच्याश्रीमतावर चालतील,जी आज्ञा मिळेल.कधी विचार पण येणार नाही की,यामध्ये काही नुकसान होईल, कारण अशा निश्चय बुद्धी मुलांचे जवाबदार बाबा आहेत.त्यांना निश्चयाचे बळ मिळते.अवस्था अचल आणि अबोल बनते.

गीत:-

तुम्हीच माता,पिता तुम्हीच आहात.

ओम शांती।
महिमा कोणाची ऐकली? ज्यांना शिवाय तुम्हा मुलांच्या दुनिया मध्ये दुसरे कोणी जाणत नाहीत.ही उच्च ते उच्च बाबांची महिमा आहे. बाकी दुसऱ्यांची जी पण महिमा करतात,ती फालतू होते.उच्च ते उच्च बाबाच आहेत परंतु बाबांचा परिचय कोण देतील.स्वतः येऊन आत्मा आणि स्वतःचा परिचय देतात. कोणत्याही मनुष्याला आत्म्याचा सत्य परिचय नाही.जरी म्हणतात महान आत्मा,जीव आत्मा.शरीर जेव्हा सुटते तर म्हणतात आत्मा निघून जाते,शरीर तर मृत होते. आत्मा अविनाशी आहे,कधी नष्ट होत नाही.आत्मा जी बिंदू सारखी आहे,अतिसूक्ष्म आहे,या डोळ्याद्वारे दिसून येत नाही.कर्तव्य सर्व आत्माच करते परंतु सारखे सारखे देह अभिमानामध्ये येतात,तर म्हणतात मी अमका आहे,मी हे करतो.वास्तव मध्ये सर्व काही आत्माच करते. शरीर तर कर्मेंद्रिये आहेत.हे साधू इत्यादी पण जाणतात की,आत्मा तर खूप सूक्ष्म आहे,जी भृकुटी मध्ये राहते परंतु त्यांना हे ज्ञान नाही की, आत्म्या मध्ये ही भूमिका वठवण्याचे संस्कार आहेत.कोणी म्हणतात आत्म्यामध्ये संस्कार नसतात,आत्मा निर्लेप आहे.कोणी म्हणतात संस्कारा नुसार जन्म मिळतो.मतभेद तर खूप आहेत.हे पण कोणालाही माहिती नाही की,कोणती आत्म ८४जन्म घेते.तुम्ही जाणता,सूर्यवंशीच ८४ चे चक्र लावतात.आत्माच ८४ चे चक्र लावून पतित बनते.त्यांना आता पावन कोण बनवेल.पतित-पावन एकच बाबा आहेत.त्यांची महिमा सर्वात उच्च आहे.८४ जन्म तर सर्वच घेत नाहीत,नंतर येणारे ८४ जन्म घेऊ शकत नाहीत.सर्व एकत्रपणे येऊ शकत नाहीत.जे प्रथम सतयुगा मध्ये येतील,सूर्यवंशी राजे आणि प्रजा,त्यांचेच ८४ जन्म होतात.नंतर मनुष्याची खूप वृध्दी होते.परत कोणाचे ८३ कोणाचे ८० जन्म होतात.तेथे सतयुगामध्ये पूर्ण दीडशे वर्षे आयुष्य असते.कोणी लवकर मरू शकत नाहीत.या गोष्टी बाबाच सन्मुख समजवतात.आत्ता कोणी परमपिता परमात्माला जाणत नाहीत.बाबा म्हणतात जशी तुमची आत्मा आहे,तसेच माझी पण आत्मा आहे.तुम्ही फक्त जन्म मृत्यू मध्ये येतात,मी येत नाही. मला तेव्हाच बोलवतातच,जेव्हा सर्व पतित बनतात.जेव्हा खूप दुःखी होतात तेव्हा बोलवतात.या वेळेत तुम्हा मुलांना शिवबाबा शिकवत आहेत. कोणी विचारतात,हे कसे मानायचे की,परमात्मा येतात?तर त्यांना समजावून सांगायचे आहे की,सर्व बोलवतात हे पतित-पावन या.आता ते तर निराकार आहेत,त्यांना स्वतःचे शरीर नाही.त्यांना पतित दुनिया मध्ये यायचे आहे.पावन दुनिया मध्ये तर येऊ शकत नाहीत, अशाप्रकारे समजावयला पाहिजे.हे पण समजायचे आहे की, परमात्मा इतके लहान बिंदू आहेत,जशी आत्मा पण लहान बिंदू आहे परंतु ते मनुष्य सृष्टी चे बीजरूप,ज्ञानाचे सागर आहेत.बाबा म्हणतात की तुम्ही मला परमपिता परमात्मा म्हणतात, बोलवतात,तर जरूर येतील ना. गायन पण आहे की,दूर देशाचे राहणारे,परक्यांच्या देशांमध्ये आले. आता बाबा द्वारा माहिती झाले आहे की,आता आम्ही परक्याचा देश म्हणजे रावणाच्या देशांमध्ये आलो आहोत.सतयुग त्रेता मध्ये आम्ही ईश्वरीय देश म्हणजेच आपल्या देशामध्ये होतो परत द्वापर युगा पासून आम्ही परक्याच्या देशांमध्ये, परक्याच्या राज्यांमध्ये येतो.वाममार्गा मध्ये येतो परत भक्ती सुरू होते. प्रथम शिवबाबांची भक्ती करायला लागतात,भक्त लोक शिवाचे इतके मोठे लिंग बनवतात परंतु इतके मोठे तर ते नाहीत.आता तुम्ही समजले आहे की,आत्मा आणि परमात्मा मध्ये काय फरक आहे.ते ज्ञानसंपन्न नेहमी,पावन सुखाचे सागर, आनंदाच्या सागर आहेत,ही परमात्म्याची महिमा आहे ना.आत्ता बोलवतात,हे पतित-पावन या.ते परमपिता आहेत,जे कल्प-कल्प येतात.दूर देशांमध्ये राहणाऱ्या प्रवाशाला बोलवतात.त्यांची महिमा गातात.ब्रह्मा-सरस्वतीला तर बोलवत नाहीत.निराकार परमात्म्याला बोलवतात. आत्मा बोलवते की दूर देशाचे राहणारे,आता परक्याच्या देशांमध्ये या, कारण सर्व पतित बनले आहेत.मी पण तेव्हाच होईल जेव्हा रावण राज्य नष्ट होईल.मी येतो पण संगम मध्ये,हे कोणालाही माहिती नाही.असे म्हणतात की ते परमात्मा बिंदी आहेत.आजकल परत म्हणतात आत्माच परमात्मा, परमात्माच आत्मा आहेत. आत्मा तर परमात्मा होऊ शकत नाही. आत्मा आणि परमात्मा दोन्ही वेगवेगळे आहेत.दोघांचे रूप एक सारखे आहे परंतु आत्मा पतित बनते, ८४ जन्माची भूमिका वठवावी लागते.परमात्मा तर जन्म-मरण रहित आहेत.जर आत्मा-परमात्मा म्हणतात,तर काय सतोप्रधान परमात्मा तमोप्रधान मध्ये येतात, नाही.असे तर होऊ शकत नाही. बाबा म्हणतात मी येतो सर्व आत्म्यांची सेवा करण्यासाठी.माझा जन्म तर म्हणत नाहीत.मी येतोच नर्कवासींना स्वर्गवासी बनवण्यासाठी.तेही परक्याच्या देशांमध्ये आलो आहे,आपला स्वर्ग स्थापन करण्यासाठी.आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवतात.हे पण समजवले आहे की,आत्म्याची भूमिका आपापली आहे.परमात्मा जन्म मृत्यू रहित आहेत.ते येतात पण जरुर,तेव्हा तर शिवरात्री साजरी करतात परंतु ते कधी येतात,हे कोणीच जाणत नाहीत.असेच शिवजयंती साजरी करतात.जरुर संगमयुगामध्ये स्वर्ग स्थापन करण्यासाठी आले असतील. पतितांना पावन बनवण्यासाठी जरूर संगम मध्ये येतील.पावन सृष्टी स्वर्ग आहे.पतित-पावन या असे म्हणतात,तर जरूर पतित दुनियेच्या विनाशाची वेळ असेल, तेव्हा तर स्थापन करतील.युगे-युगे तर येत नाहीत.बाबा म्हणतात मला संगम युगामध्येच येऊन पतितांना पावन बनवायचे आहे. हा परक्याचा देश, रावणाचा देश आहे परंतु हे कोणी मनुष्य थोडे जाणतात की, रावणाचे राज्य चालत आहे.कधी पासून सुरु झाले,काहीच माहिती नाही.प्रथम मुख्य गोष्ट परमात्मा चे रहस्य समजावयचे आहे.परत समजायचे आहे की,ते कल्पाच्या संगम युगामध्ये पावन बनवण्यासाठी येतात,हे त्यांचेच काम आहे,ना की श्रीकृष्णाचे.श्रीकृष्ण तर स्वतः ८४ जनम घेऊन सिडी उतरतात. सूर्यवंशी पण सर्व सिडी उतरतात. झाड अर्धे चांगले,अर्धे जुने असे थोडेच होते.जडजडीभुत अवस्था तर सर्वांची होते.कल्पाच्या कालावधी बाबत,तर मनुष्याला काहीच माहिती नाही.ग्रंथांमध्ये कल्पाचे आयुष्य लांबलचक लिहिले आहे. बाबा सन्मुख समजवतात,यामध्ये दुसरा प्रश्न उठू शकत नाही. रचनाकर बाबा सत्य सांगतात.इतके ब्रह्मकुमार कुमारी आहेत,सर्व मानतात,तर जरूर आहेत,तेव्हा तर मानतात.पुढे चालून जेव्हा निश्चय होईल,तेव्हा समजमध्ये येईल.प्रथम तर मनुष्यांना हे समजावयाचे आहे की,परमपिता परमात्मा निराकार देश मधून आले आहेत,परंतु कोणत्या शरीरांमध्ये आले आहेत?सुक्ष्मवतन मध्ये येऊन काय करतील? जरूर येथे यावे लागेल.प्रजापिता ब्रह्मा पण येथे पाहिजेत.ब्रह्मा कोण आहेत, हे पण बाबा सन्मुख समजवतात. ज्यांच्या मध्ये प्रवेश केला,ते आपल्या जन्माला जाणत नाहीत.तर मुलं पण जाणत नव्हते.तेव्हाच जाणतात, जेव्हा मी दत्तक घेतो.मी साकार सहीत मुलांना समजावतो की, काय तुम्ही आपल्या जन्माला विसरले आहात.आता सृष्टी चक्र पूर्ण होते, परत त्याची पुनरावृत्ती होईल.मी पावन बनवण्यासाठी, राजयोग शिकवण्यासाठी आलो आहे,दुसरा कोणता रस्ता नाही.जर मनुष्य हे रहस्य समजतील तर,गंगा इ.वरती स्नान करण्यासाठी,यात्रा इत्यादी करण्यासाठी जाणार नाहीत.या पाण्याच्या नद्यांमध्ये तर नेहमी स्नान करत राहतात.द्वापार पासून करत आलेले आहेत.असे समजतात गंगा मध्ये स्नान केल्यामुळे पाप नाश होतील,परंतु कोणाचे पाप नाश होत नाहीत.प्रथमतः आत्मा आणि परमात्मा चे रहस्य सांगा. आत्माच परमात्मा पित्याला बोलवते.ते निराकार आहेत,आत्मा पण निराकार आहे.या कर्मेंद्रिये द्वारा आत्मा बोलवते.भक्तीच्या नंतर भगवंताला यायचे आहे.ही पण पुर्व नियोजीत नाटकांमध्ये भूमिका आहे. बाबा म्हणतात,मला नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी यावे लागते. असे ग्रंथामध्ये आहे की,भगवंताला संकल्प आला तर जरूर, पूर्वनियोजित नाटकातील नियोजनानुसार संकल्प आला असेल.अगोदर या गोष्टींना थोडेच समजत होते.दिवसेंदिवस समजत जातील.बाबा म्हणतात मी तुम्हाला नवीन नवीन रहस्ययुक्त गोष्टी ऐकवतो.ऐकत ऐकत समजत जातात.अगोदर असे म्हणत नव्हते की,शिवबाबा शिकवत आहेत.आता तर चांगल्या रीतीने समजले आहे, आणखी समजण्यासाठी खूप काही आहे.बाबा समजावत राहतात की,कसे कोणाला समजून सांगायचे. प्रथम तर हे निश्चित करा की,बेहदचे बाबा सन्मुख समजवतात. तर ते जरूर सत्य सांगतील.यामध्ये संशयाची गोष्ट नाही.काही मुलं पक्के आहेत,तर काही कच्चे आहेत.कच्चे आहेत तर ते,कोणाला समजावू शकणार नाहीत.हे तर शाळेमध्ये पण क्रमानुसार असतात.अनेकांना संशय येतो की,आम्ही कसे समजू की परमपिता परमात्मा येऊन शिकवतात,कारण त्यांच्या बुद्धी मध्ये आहे की,श्रीकृष्णाने ज्ञान ऐकवले. आता पतित दुनिया मध्ये तर ये येऊ शकत नाहीत.हे त्यांना सिद्ध करून सांगा की,परमात्म्याला यावेच लागते,पतित दुनिया आणि पतित शरीरांमध्ये.बाबा हे पण समजतात की,प्रत्येकाला आपापली बुद्धी आहे. काही तर लगेच समजतात.जितके शक्य होईल तेवढे समजावून सांगायचे आहे.ब्राह्मण पण सर्व एकसारखे नसतात परंतु देह अभिमान मुलांमध्ये खूप आहे.हे बाबा पण जाणतात की,क्रमानुसार आहेत.श्रीमतावर मुलांना चालावे लागेल.मोठे बाबा जे म्हणतील ते मानले पाहिजे. गुरु इत्यादी ला तर मानत आले आहात.आत्ता बाबा जे स्वर्गात घेऊन जाणारे आहेत,त्यांची गोष्ट तर डोळे बंद करून म्हणायला पाहिजे,परंतु असे निश्चिय बुद्धी नाहीत.मग त्यामध्ये नुकसान किंवा फायदा होवो,मानायला पाहिजे. समजा,नुकसान होईल.तरीही बाबा म्हणतात,नेहमी असे समजा की,शिवबाबाच म्हणतात,ब्रह्मासाठी समजू नका.जवाबदार शिवबाबा आहेत.त्यांचा हा रथ आहे,ते ठीक करतील.बाबा म्हणतात, मी बसलो आहे.नेहमी समजा शिवबाबा म्हणतात,हे काहीच जाणत नाहीत, असेच समजा.एकीकडे निश्चय ठेवायला पाहिजे.बाबा म्हणतात माझे मानत राहा तर तुमचे कल्याण होईल.हे ब्रह्मा पण काही सांगतात तर,त्यांचेही जवाबदार बाबा आहेत. तुम्ही मुलं काळजी करू नका, शिवबाबांची आठवण केल्यामुळेच, अवस्था आणखीच पक्की होईल. निश्चयामुळेच विकर्म पण विनाश होतील,बळ पण मिळेल.

जितके शक्य होईल बाबांची आठवण करा,तेवढेच जास्त बळ मिळेल.जे श्रीमतावर चालून सेवा करतात,तेच उच्चपद मिळवतात. अनेकांमध्ये देहाभिमान खूप राहतो. बाबा सर्व मुलांसोबत खूप प्रेमाने चालतात.सर्वांशी प्रेमाने गोष्टी करत राहतात.मुलांशी विचारतात,ठीक बसले आहात,काही कष्ट तर नाहीत. मुलांसाठी प्रेम राहते ना.बेहद्दच्या बाबांचे मुलांवरती खूप प्रेम आहे.जे श्रीमतावर सेवा करतात,त्यानुसार प्रेम राहते.सेवा करण्यामध्येच फायदा आहे.सेवांमध्ये हाडे पण द्यायची आहेत. कोणतीही सेवा करत राहतील तर ते हृदयासीन राहतात,की हा मुलगा फार चांगला आहे.परंतु चालता चालता कधी कोणावरती ग्रहचारी बसते.मायेचा सामना होत राहतो,त्या मुळे परत ज्ञान घेऊ शकत नाहीत. काही तर परत कर्मणा सेवा अथक होऊन करतात.

तुमचे काम आहे सर्वांना सुखधामचे मालक बनवणे.कोणालाही दुःख द्यायचे नाही.ज्ञान नाहीतर परत खूप दुःख देतात,परत कितीही समजावून सांगा,समजत नाहीत.प्रथम तर आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान द्यायचे आहे,कसे आत्म्यामध्ये ८४ जन्माची भूमिका भरलेली आहे.जी अविनाश भूमिका आहे,कधी बदलत नाही,नाटकांमध्ये नोंदलेली आहे.हा निश्चय असणारे कधी डळमळीत होणार नाहीत.अनेक डळमळीत होतात.अंत काळात जेव्हा भंभोरला आग लागेल,तेव्हा अचल बनाल. आता तर खूप युक्तीद्वारे समजावयाचे आहे.चांगली चांगली मुलं सेवा करत राहतात.हृदयात राहतात,खूप हुशार बनतात.खूप कष्ट करतात,त्यांना सेवेची खूप आवड राहते. ज्यांच्यामध्ये गुण आहेत,ते बाबा वर्णन करतात, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सेवेमध्ये सर्वस्व द्यायचे आहे.कोणत्याही गोष्टी मध्ये संशय घ्यायचं नाही.सर्वांना सुख द्यायचे आहे,दुःख नाही.

2. निश्चयाच्या बळाद्वारे आपली अवस्था अढळ बनवायची आहे.जे श्रीमत मिळते,त्यामध्ये कल्याण सामावले आहे,कारण जबाबदार बाबा आहेत, म्हणून काळजी करायची नाही.

वरदान:-
सहज योगाला नैसर्गिक आणि स्वभाविक बनवणारे प्रत्येक विषयामध्ये संपूर्ण भव.

जसे बाबाची मुलं आहात,यामध्ये काही टक्केवारी नाही.असेच निरंतर सहज योगी किंवा योगी बनण्याच्या स्थितीमध्ये पण टक्केवारी नष्ट व्हायला पाहिजे.नैसर्गिक आणि स्वाभाविक आठवण राहायला पाहिजे.जसे कोणाचा विशेष स्वभाव असतो,त्या स्वभावा वश इच्छा नसतानी पण चालत राहतात.असेच हे पण नैसर्गिक बनायला पाहिजे. काय करू,कसे करू,योग लागत नाही,या गोष्टी नष्ट व्हायला पाहिजेत, तेव्हाच प्रत्येक विषयामध्ये संपूर्ण बनाल.संपूर्ण म्हणजे परिणाम आणि दोषापासून दूर.

बोधवाक्य:-
सहन करायचे असेल, तर आनंदाने करा,मजबुरीने नाही.