07-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आत्ता बाबासारखे देही अभिमानानी बना, बाबांची हीच इच्छा आहे की, मुलांनी माझ्यासारखे बनून माझ्यासोबत घरी चालावे "

गीत:-
जिसका साथी है भगवान. . .

ओम शांती।
हे गित मुलांसाठी आहे. ज्यांचा सोबती सर्वशक्तिमान परमपिता, परमात्मा आहे, त्यांना मायेचे वादळ काय करू शकते? ती वादळं नाहीत, ही तर मायेची वादळं, आत्म्याची ज्योत विझवतात. आत्ता तुम्हाला जागृत करणारा सोबती मिळाला आहे, मग माया काय करू शकते? नावच महावीर ठेवले आहे, माया रावणावर विजय मिळवणारे. कसा विजय मिळवायचा? तर मुलं समोर बसलेली आहेत. बापदादा बसले आहेत. दादा आणि बाप यांना पिता आणि आजोबा म्हणतात. तर बापदादा झाले. तुम्ही मुले जाणता की, आत्मिक पिता आपल्या समोर बसले आहेत. आत्मिक पिता आत्म्यांशी बोलतात. आत्मा ही कर्म इंद्रियाद्वारे ऐकते, बोलते. तुम्हा मुलांना देहभानात राहण्याची सवय लागली आहे. तुम्ही अर्धा कल्प शरीराच्या अभिमाना मध्ये राहतात. एक शरीर सोडून दुसरे शरीर घेतले. नाव शरीरावरती च पडते, कोणी म्हणतील की मी परमानंद आहे, कोणाचे नाव काय, इतरांचे नाव काय बाबा म्हणतात की, मी तर सदैव देही अभिमानी आहे. मला कधीच शरीर मिळत नाही, तर मला कधीच देहभान येत नाही. हा देह या दादाचा आहे. मी नेहमी आत्म अभिमानी असतो. मला तुम्हा मुलांना पण, माझ्या सारखे बनवायचे आहे, कारण आत्ता तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे. तर देहभान सोडावे लागेल, यासाठी वेळ लागतो. देहबुद्धीने जगण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. आत्ता बाबा म्हणतात, हे शरीरही सोडा, माझ्या सारखे बना, कारण तुम्हाला माझे पाहुणे व्हायचे आहे. तुम्हाला माझ्याकडे परत यायचे आहे, म्हणून मी म्हणतो की, स्वतःला आत्मा निश्चय करा. मी हे फक्त आत्म्याशी बोलतो. तुम्ही बाबाचे स्मरण करा, तर ती देहदृष्टी संपेल. यामध्येच कष्ट आहेत. आम्हा आत्म्यांची सेवा करत आहेत. आत्मा इंद्रियांद्वारे ऐकते. मी आत्मा, जो तुम्हाला बाबांचा संदेश देतो. आत्मे स्वतःला पुरुष किंवा स्त्री म्हणणार नाहीत. पुरुष किंवा स्त्री तर नाव शरीरावरून पडते. ते परमात्मा आहेत. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, तुम्ही ऐकता का? आत्मा म्हणते होय, मी ऐकतो. तुम्ही तुमच्या पित्याला ओळखता का, ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही आत्मा आहात, त्याचप्रमाणे मी तुमचा पिता आहे, ज्याला परमपिता, परमात्मा म्हणतात, त्यांना स्वतःचे शरीर नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना स्वतःचे रूप आहे. आत्म्याला आत्माच म्हणतात. माझे नाव शिव आहे. शरीरावर अनेक नावे आहेत. मी शरीर घेत नाही, म्हणून मला भौतिक नाव नाही. तुम्ही साळीग्राम आहात. तुम्ही आत्मा म्हणता, हे आत्म्यांनो, तुम्ही ऐकता का? तुम्हाला हे आचरणात आणायचे आहे, आत्म अभिमानी बनायचे आहे. आत्मे या इंद्रियांद्वारे ऐकतात आणि बोलतात. बाबा इथे बसून आत्म्यांना समजावून सांगतात. पित्याला विसरल्यामुळे आत्मा अज्ञानी झाला आहे. असे नाही की, कृष्ण देखील परमात्मा आहेत. ते म्हणतात की, परमात्मा दगड धोंड्यात आहेत. उलटे ज्ञान जगभर पसरलेले आहे. आपण पिता, परमात्माची मुलं आहोत, हेही अनेकांना समजते. पण बहुसंख्य परमात्मा सर्वव्यापी आहेत, असे म्हणतात. प्रत्येकाला या दलदली मधून काढावे लागेल. संपूर्ण जग एका बाजूला, पिता दुसऱ्या बाजूला. पित्याची स्तुती गायली जाते. हे परमेश्वरा, तुमची लीला. . . अहो माझे मत, ज्याद्वारे माणसाला गती किंवा सदगती मिळते. मोक्ष देणारा एकच आहे. मनुष्य सदगती साठी खूप डोकं मारतात. जीवनमुक्ती आणि मुक्ती दोन्ही देणारा सतगुरू एकच आहेत. बाबा म्हणतात, या सर्व साधू संताची सदगती करण्यासाठी मला यावे लागते. सर्वांना सदगती देणारा मीच आहे. मी आत्म्याशी बोलतो. मी तुमचा पिता आहे आणि कोणीही म्हणू शकत नाही की, तुम्ही सर्व आत्मे माझी मुलं आहात. परमात्मा सर्वव्यापी आहेत, असे ते म्हणतात. मग असे कधीच म्हणता येणार नाही. बाबा स्वतः म्हणतात की, मी भक्तांना भक्तीचे फळ देण्यासाठी आलो आहे. गाणे देखील आहे -भगवान भक्तांची काळजी घेणारा आहे. सर्व भक्त आहेत, तर जरूर भगवान नक्कीच वेगळी गोष्ट आहे. भगत जर भगवान असेल तर, त्याला भगवंताचे स्मरण करण्याची गरज नाही. काहीजण त्यांच्या भाषेत परमात्माला काय म्हणतात, काहीजण काय म्हणतात. पण खरे नाव शिव आहे. कोणी कोणाची बदनामी किंवा दोष देतात तर, त्यांच्यावर खटला भरतात. पण हे नाटक आहे. त्यामध्ये कोणाची गोष्ट चालू शकत नाही. तुम्ही दुःखी झाला आहात, हे बाबा जाणतात, तरीही हे होणारच. त्यानंतरही गीता ग्रंथ वगैरे तशीच निघतील. मात्र, नुसते गीता वगैरे वाचून कोणाला कळत नाही. येथे तर आपल्याला शक्तीची आवश्यकता आहे. शास्त्र सांगणारे, कोणासाठी म्हणतील की, माझ्यासमवेत योगाभ्यास केल्याने तुझी पापे नष्ट होतील, असे म्हणू शकत नाहीत. फक्त गीतेचा ग्रंथ वाचून ऐकवतात. तुम्ही आता अनुभवी आहात, तुम्हाला माहित आहे की, आम्ही 84 च्या चक्रात कसे येतो. नाटकात प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळेवर घडते. हे पिता मुलांशी, आत्म्याशी बोलतात की, तुम्हीही अशा प्रकारे शिका की, आपण आत्म्याशी बोलतो आणि आपली आत्मा या मुखाने बोलते. तुमची आत्मा या कानांनी ऐकते. मी पित्याचा संदेश देतो, मी आत्मा आहे. हे स्पष्ट करणे खूप सोपे आहे. तुमची आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर घेते. आत्म्याने ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता बाबा म्हणतात, परमात्मा सर्वव्यापी होता, तर मग त्याला जीव परमात्मा म्हणा ना? जीव आत्मा का म्हणता? हे आत्म्याशी गोष्टी करतात. माझ्या भावांनो, आत्म्यांनो समजता की मी, पित्याचा संदेश सांगत आहे, पाच हजार वर्षांपूर्वी प्रमाणे. पिता म्हणतात, माझे स्मरण करा. ही दु:खाची भूमी आहे. सुवर्णयुग ही सुखाची भूमी आहे, अहो आत्म्यांनो, तुम्ही सुखाच्या देशात होता. तुम्ही च ८४ चे चक्र लावले, नाही का. तुम्हाला निश्चितपणे सतोप्रधानाकडून सतो, रजो आणि तमोकडे यावे लागेल. आता परत श्रीकृष्णपुरी कडे जाऊ, तुम्हाला काय बनायचे आहे? महाराजा महाराणी बनणार की, तुम्ही दास दासी? अशा प्रकारे आत्म्यांशी बोलावे. उत्साह असावा. मी परमात्मा आहे, असे नाही. भगवंत हा एकमेव ज्ञानाचा सागर आहे आणि ते कधीच अज्ञानाचा सागर बनत नाहीत. आपण ज्ञान आणि अज्ञानाचे सागर बनतो. बाबाकडून ज्ञान घेऊन, तुम्ही मास्टर सागर बनता, वास्तविक सागर हा एकच बाबा आहेत. बाकी सर्व नद्या आहेत. फरक नाही का? जेव्हा आत्मा अज्ञानी असतो, तेव्हा आत्म्याचा उलगडा होतो. स्वर्गात कोणी कोणाला समजावत नाही. इथे प्रत्येकजण संवेदनाहीन, पतित आणि दुःखी आहे. हे ज्ञान फक्त गरीब लोक आरामात बसून ऐकतील. सावकारांला स्वतःचा नशा असतो. त्यापैकी कोणी एखादा च निघेल. राजा जनकाने सर्वकाही दिले, नाही का? येथे सर्व जनक आहेत. ते जीवनमुक्तीसाठी ज्ञान घेत आहेत. म्हणून तुम्ही आत्मा आहात, हे पक्के करावे लागेल. बाबा, आम्ही तुमचे खूप आभार मानले पाहिजेत. अविनाशी नाटकानुसार तुम्हाला वारसा द्यायलाच पाहिजे, यामध्ये आम्हांला तुमचा मुलगा बनायचे आहेच, यामध्ये काय आभार मानायचे ? आम्हाला तुमचे वारसदार बनायचे च आहे, यामध्ये आभार मानण्याची काय गोष्ट आहे. बाबा स्वतः येऊन तुम्हाला समजावून, लायक बनवतात. भक्तीमार्गात स्तुती करतात आणि उपकाराचे शब्द निघतात. पित्याला आपले कर्तव्य पार पाडावे लागते. ते पुन्हा येतात आणि तुम्हाला स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवतात. बेहद्दच्या नाटकानुसार बाबांना येऊन तुम्हाला राजयोग शिकवायचा आहे आणि तुमचा वारसा द्यायचा आहे. परत तुम्ही केलेल्या प्रयत्नानुसार, तुम्ही स्वर्गात जाल. बाबा तुम्हाला पाठवतील, असे नाही. आपोआप, तुम्ही जितके प्रयत्न कराल त्यानुसार तुम्ही स्वर्गात जाल. बाकी आभार मानण्यासारखे काही नाही. बाबांनी कोणता खेळ दाखवला, याचे आपल्याला आश्चर्य वाटते. यापुर्वी तर आपण जाणत नव्हतो, आता जाणले आहे. बाबा, हे ज्ञान आम्ही पुन्हा विसरणार काय? होय मुलांनो, हे ज्ञान तुमच्या बुद्धीतून नाहीसे होईल. मग ज्ञान देण्याची वेळ येईल, तेव्हा मी वेळेत प्रकट होईल. आत्ता तर आम्ही निर्वाण धाम मध्ये जाऊ. मग मी भक्तीमार्गात माझी भूमिका बजावतो. ते संस्कार आत्म्यात आपोआप प्रवेश करतात. मी कल्पानंतरही या शरीरात येईन, हे बुद्धीमध्ये राहते. पण तरीही तुम्हाला आत्म्याचे भान ठेवावे लागेल. अन्यथा, तुम्ही देह अभिमानी बनाल. मुख्य गोष्ट हीच आहे. पिता आणि वारशाची आठवण करा. कल्प-कल्प, पुरुषार्था नुसार तुम्ही वारसा मिळवता. बाबा खुप सहज समजावून सांगतात. बाकी जे आपले लक्ष्य आहे, त्यावर चालण्यासाठी गुप्त कष्ट आहेत. आत्मा प्रथम येते, तर ती पुण्यवान आत्मा, सतोप्रधान असते आणि परत त्याला पाप आत्मा आणि तमोप्रधान जरूर बनावे लागते. आता पुन्हा तुम्हाला तमोप्रधानातून सतोप्रधान नक्कीच बनायचे आहे. माझे स्मरण करा असा संदेश पित्याने दिला आहे. संपूर्ण रचनेला बाबाकडून वारसा मिळत आहे. ते सर्वांचे सदगती दाता आहेत. ते सर्वांवर दया करणारे आहेत, म्हणजेच तो दयावान आहेत. सुवर्णकाळात कोणते ही दु:ख होणार नाही. इतर सर्व आत्मे शांतीधाम मध्ये जाऊन राहतात. तुम्हा मुलांनी जाणले आहे की, आता विनाशाची वेळ आली आहे. योग सामर्थ्याने दु:खाचा हिशेब चुकता करावा लागेल, परत ज्ञान आणि योगाच्या बळावर भविष्यातील सुखासाठीही जमा करावे लागेल. जेवढे जमा कराल तेवढे सुख मिळेल आणि दु:खाचा हिशेब चुकता होईल. आपण आता कल्पाच्या संगमात आलो आहोत आणि आपल्या दु:खाचा चौपडा साफ करून, दुसऱ्या बाजूला जमा करतात. हा व्यवसाय आहे ना. बाबा तुम्हाला ज्ञानाचे रत्न देऊन सद्गुणी बनवतात, परत जितके जे धारण करतील. एक एक रत्न ही लाखांची संपत्ती आहे, ज्याद्वारे तुम्ही भविष्यात नेहमी सुखी राहाल. ही दु:खाची भूमी आहे आणि ती सुखाची भूमी आहे. संन्याशांना हे माहीत नाही की, स्वर्गात नेहमी सुख असते. गीतेद्वारे भारताला एवढे श्रेष्ठ बनवणारे एकच पिता आहेत. ते लोक खूप शास्त्र वगैरे ऐकवतात. परंतू दुनिया तर जुनी होणार च आहे. नवीन दुनियेत देवता पूर्वी रामाच्या राज्यात होत्या. आत्ता तर देवता नाहीत? कुठे गेल्या? मग ८४ जन्म कोणी भोगले? आणि कोणाच्या ८४ जन्मांचा हिशोब मिळू शकणार नाही. केवळ देवता धर्माचे लोक निश्चितपणे ८४ जन्म घेतात. लक्ष्मी, नारायण वगैरे भगवान आहेत, असे मनुष्य समजतात. जिकडे पाहावे तिकडे तुम्हीच आहात. अच्छा, सर्वव्यापीच्या ज्ञानाने तुम्ही सुखी होऊ शकता का? हे सर्वव्यापीचे ज्ञान चालू आहे, तरीही भारत गरीब आणि नरक बनला आहे. भक्तीचे फळ भगवंताला द्यावेच लागते. जे संन्यासी स्वतः अध्यात्मिक साधना करत राहतात, त्याचे फळ काय देतील? मनुष्य सदगती दाता नाहीत. जे या धर्माचे आहेत, ते परत येतील. असे तर अनेक संन्यास धर्मांत धर्मांतरीत झाले आहेत, आणि तेही येतील. या सर्व गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. बाबा समजावतात, मी आत्मा आहे, हा अभ्यास करायचा आहे. शरीर हे आत्म्याच्या आधारावर उभे आहे. शरीर नाशवंत आहे, आत्मा अविनाशी आहे. संपूर्ण भुमिका या लहान आत्म्यात आहे. काय आश्चर्य आहे, वैज्ञानिक पण या गोष्टींना समजू शकत नाहीत. ही अविनाशी भुमिका इतक्या लहान आत्म्यात आहे. आत्मा देखील अविनाशी आहे, आणि भुमिका पण अविनाशी आहे. अच्छा.

गोड गोड खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मात पिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१)कल्पांच्या संगमावर योगसामर्थ्याने दु:खाचे हिशोब (लेखा-पुस्तक) चुकता करायचा आहे. नवीन जमा करायचे आहे. ज्ञानाची रत्ने धारण करून, गुणवान बनायचे आहे.

(२) मी आत्मा आहे, आत्मा भावाशी बोलतो, शरीर नाशवंत आहे. मी माझ्या भावाच्या आत्म्याला संदेश ऐकवत आहे. असा सराव करायचा आहे.

वरदान:-
श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ भाव द्वारे, सर्वांचे प्रिय बनून विजय माळेमध्ये गुंफणारे विजयी भव.

कुणीही कोणत्याही भाव द्धारे बोलेल किंवा चालेल, परंतू तुम्ही नेहमी सर्वांप्रती शुभ भाव श्रेष्ठ भाव ठेवा, यातच विजयी व्हा आणि मग माळेत गुंफण्याचे अधिकारी बनाल. कारण सर्वांचे प्रिय बनण्याचे एकमेव साधन म्हणजे, संबंध संपर्कातील प्रत्येकाप्रती श्रेष्ठ वृत्ती धारण करणे. ज्याच्या मनात अशी श्रेष्ठ भावना असते, तो सदैव सर्वांना सुख देतो आणि सुख घेतो. ही सुद्धा सेवाच आहे आणि शुभ भावना हे सेवेचे सर्वोत्तम साधन आहे. तर अशी सेवा करणारे विजयी माळेचे मणी बनतात.

बोधवाक्य:-
योगाचा कृतीतून अनुभव घेणे, म्हणजे कर्मयोगी होणे होय.