07-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, पुरुषार्थ करून दैवी गुणांची चांगल्या रीतीने धारणा करायची आहे,कोणालाही दुःख द्यायचे नाही,तुमचे कोणतेही आसुरी कार्य असायला नको"

प्रश्न:-
कोणते आसुरी गुण तुमचा शृंगार बिघडून टाकतात?

उत्तर:-
आपसामध्ये लढणे-भांडणे, रुसने,सेवा केंद्रावरती गोंधळ करणे, दुःख देणे,हे आसुरी गुण आहेत,जे तुमचा शृंगार बिघडवतात.जी मुलं बाबाचे बनून,या सर्व आसुरी गुणांना सोडत नाहीत,उल्टे कर्म करतात, त्यांचे खूप नुकसान होते.त्यांच्यासाठी भोगच भोग आहेत.बाबांच्या सोबत धर्मराज पण आहे.

गीत:-
भोलेनाथ पेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत,बिगडलेल्या मनुष्यांना सुधारणारे दुसरे कोणी नाहीत

ओम शांती।
आत्मिक मुलांनी हे तर जाणले आहे की,उच्च ते उच्च भगवान आहेत.मनुष्य गायन करतात आणि तुम्ही दिव्यदृष्टी द्वारे पाहतात.तुम्ही बुद्धी द्वारे पण जाणतात की,आम्हाला ते शिकवत आहेत.आत्माच शरीराद्वारे शिकते.सर्वकाही शरीराद्वारे आत्माच करते.शरीर विनाशी आहे,ज्याला आत्मा धारण करून भूमिका वठवते. आतम्या मधेच सर्व भुमिकेची नोंद आहे.८४ जन्माची पण आत्म्या मध्ये नोंद आहे.प्रथम तर स्वतःला आत्मा समजायचे आहे.बाबा सर्वशक्तिमान आहेत,त्यांच्याद्वारे तुम्हा मुलांना शक्ती मिळते.योगाद्वारे जास्त शक्ती मिळते, ज्याद्वारे तुम्ही पावन बनतात.बाबा तुम्हाला शक्ती देतात ज्याद्वारे तुम्ही विश्वावर राज्य करतात.ते वैज्ञानिक इत्यादी तर विनाशासाठी सामग्री तयार करतात,त्यांची बुद्धी विनाशासाठी आहे आणि तुमची बुद्धी अविनाशी पद मिळवण्यासाठी आहे. तुम्हाला खूप शक्ती मिळते,ज्याद्वारे तुम्ही विश्वावर राज्य करतात.तेथे प्रजाचे प्रजा वरती राज्य नसते.तेथे राजा राणीची राज्य असते.उच्च ते उच्च भगवान आहेत,आठवण पण त्यांचीच करतात.लक्ष्मी-नारायणाचे फक्त मंदिर बनवून पूजा करतात,तरी उच्च ते उच्च भगवंताचे गायन आहे. आता तुम्ही समजत आहात,हे लक्ष्मी- नारायण विश्वाचे मालक होते.बेहद्दच्या पित्याकडून उच्च ते उच्च विश्वाची बादशाही मिळते. तुम्हाला खूप उच्च पद मिळते,तर मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे. ज्याद्वारे काही मिळते,तर त्यांची आठवण केली जाते न.कन्याचे पतीसोबत खूप प्रेम राहते,पती च्या पाठीमागे प्राण द्यायला तयार होते. पतीचा मृत्यू होतो तर खूप दिवस रडत राहते.हे तर पतींचे पती आहेत. उच्च ते उच्च पद प्राप्त करण्यासाठी,तुमचा खुप श्रूगांर करतात.तर तुम्हा मुलांना खूप नशा असायला पाहिजे.दैवी गुण पण, तुम्हाला येथेच धारण करायचे आहेत. अनेकांमध्ये आज-तागायत आसुरी गुण आहेत,लढणे-भांडणे,रुसने,सेवा केंद्रावरती गोंधळ घालणे.अनेक सेवा केंद्रावरुन समाचार येतात.बाबा तर जाणतात.काम महाशत्रू आहे, तर क्रोध पण काही कमी शत्रू नाही.आमक्या वरती स्नेह आहे, माझ्या वरती का नाही,आमकी गोष्ट यांना विचारली,मला का नाही विचारली?असे बोलणारे संशय बुद्धी खुप आहेत.राजधानी स्थापन होत आहे ना,अशा मुलांना काय पद मिळेल? पदांमध्ये तर खूप फरक राहतो.मेहतर पण चांगल्या महलांमध्ये राहतात,कोणी कुठे,कोणी कुठे राहतात.प्रत्येकाला आपला पुरुषार्थ करून चांगले दैवी गुण धारण करायचे आहेत.देह अभिमानामध्ये आल्यामुळे आसुरी व्यवहार होतो.जेव्हा देही अभिमानी बनून चांगल्या रीतीने धारणा करतात, तेव्हाच उच्च पद मिळते.दैवी गुण धारण करण्याचा पुरुषार्थ असा करायचा आहे,ज्यामुळे कोणाला दुःख मिळणार नाही.तुम्ही मुलं दुखहर्ता सुखकर्ता बाबांची मुलं आहात,तर कोणालाही दुःख द्यायचे नाही.जे मुलं सेवाकेंद्र सांभाळतात, त्यांच्यावरती खूप जवाबदारी आहे. जसे बाबा म्हणतात,मुलांनो कोणी चूक करतात,तर त्याला शंभर पटीने दंड मिळतो.देहाभिमान आल्यामुळे खूप नुकसान होते,कारण तुम्ही ब्राह्मण सुधारण्यासाठी निमित्त आहात.जर स्वतःच सुधरत नाही तर, दुसऱ्यांना कसे सुधारणार.खूप नुकसान होते.पांडव सरकार आहे ना. उच्च ते उच्च बाबा आहेत, त्यांच्यासोबत धर्मराज पण आहे. धर्मराजा द्वारे खूप सजा मिळते.असे काही काम करतात,खूप नुकसान होते.कर्मभोग खुप बनतात.बाबांच्या जवळ पूर्ण लेखाजोखा,हिशेब राहतो. भक्तिमार्गा मध्ये पण हिशेबच हिशोब आहे.असे म्हणतात,भगवान तुमचा हिशोब घेईल.येथे बाबा स्वतः म्हणतात,धर्मराज खूप हिशेब घेईल, परत त्या वेळेत काय करू शकणार? साक्षात्कार होईल,आम्ही हे-हे केले. तेथे तर थोडाच मार खावा लागतो,येथे तर खूप मार खावा लागेल.तुम्हा मुलांना सतयुगा मध्ये गर्भजेल मध्ये यायचे नाही.तेथे तर गर्भमहल असतात.कोणी पाप इत्यादी करत नाहीत.तर असे राज्य भाग्य घेण्यासाठी मुलांना खूप खबरदार राहायचे आहे.काही मुलं, ब्राह्मणी ( शिक्षके ) पेक्षा पुढे जातात, हुशार असतात.भाग्य ब्राह्मणी पेक्षा उच्च बनते.हे पण बाबांनी समजवले आहे,जे चांगल्या प्रकारे सेवा करत नाहीत,तर जन्म जन्मांतर दासदासी बनतील.बाबा मुलांच्या समोर येताच विचारतात,मुलांनो देही अभिमानी होऊन बसला आहात.बाबांचे मुलांप्रती महावाक्य आहेत,मुलांनो आत्मअभीमानी बनण्याचा खूप पुरुषार्थ करायचा आहे.

चालता-फिरता विचार सागर मंथन करत राहायचे आहे.अनेक मुलांची इच्छा आहे,लवकर-लवकर,या नरकमय छी-छी दुनिया मधून सुखांमध्ये जाऊ.बाबा म्हणतात चांगले चांगले महारथी आहेत,ते योगा मध्ये नापास आहेत,त्यांना पण पुरुषार्थ करवला जातो.योग नाही तर एकदम विकारात जातात.ज्ञान तर खूप सहज आहे,इतिहास-भूगोल सर्व बुद्धीमध्ये येते.अनेक चांगल्या चांगल्या मुली आहेत,ज्या प्रदर्शनी समजवण्या मध्ये हुशार आहेत परंतु योग नाही,दैवी गुण पण नाहीत.कधी कधी विचार येतो,आणखी मुलांची कशी अवस्था आहे.जुन्या दुनिये मध्ये खूप दुःख आहे.लवकर दुःखाची दुनिया नष्ट व्हावी,वाट पाहत आहेत. सुखधामला लवकर जावे.काही तर तडपत आहेत.जसे बाबांना भेटण्यासाठी तडपतात,कारण बाबा आम्हाला स्वर्गाचा रस्ता दाखवतात. अशा बाबांना पाहण्यासाठी तडपतात.ते समजतात,अशा बाबांच्या सन्मुख जावून मुरली ऐकावी.आता तर समजतात,येथे कोणती झंझटची गोष्ट राहत नाही. बाहेर गेल्यावर सर्वांशी निभावून घ्यावे लागते,नाहीतर खूप खिटपीट होते,म्हणून सर्वांना धैर्य देतात.यामध्ये खूप कष्ट आहेत.आठवणीचे कष्ट कोणी घेत नाहीत.गुप्त आठवणीमध्ये राहिले तर,बाबांच्या श्रीमतानुसार पण चालतील.देह अभिमानामुळे बाबांच्या श्रीमता वरती चालत नाहीत.बाबा म्हणतात,आपला चार्ट (दिनचर्या) लिहा,तर खूप प्रगती होईल.हे कोणी म्हटले,शिवबाबांनी.शिक्षक जे काम देतात,तर ते करायचे आहे ना.येथे चांगल्या चांगल्या मुलांना पण माया करू देत नाही.चांगल्या चांगल्या मुलांचा चार्ट बाबांच्या जवळ आला, तर बाबा सांगतील कसे आठवणीमध्ये राहत आहेत.मुलं समजतात,आम्ही आत्मारुपी सजनी आहोत, एका साजनच्या. ते शारीरिक साजन सजनी तर अनेक प्रकारचे असतात.तुम्ही खूप जुन्या सजनी आहात.आता तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे.काही ना काही सहन करावे लागेल.पोपटा सारखे बनायचे नाही.बाबा असेच थोडेच म्हणतात की, हाडे यज्ञांमध्ये द्या.बाबा तर म्हणतात,तंदुरुस्त बना,ज्यामुळे सेवा पण चांगल्या रीतीने करू शकाल.आजारी असाल तर घरीच पडून राहाल.काही काहीतर दवाखान्यांमध्ये पण समजून सांगण्याची सेवा करतात,तर डॉक्टर लोक म्हणतात,हे तर फरिश्ते आहेत. चित्र पण सोबत घेऊन जायचे आहेत. जे अशी सेवा करतात,त्यांना दयावान म्हटले जाते.सेव करतात तर,कोणी ना कोणी ज्ञान घेतात.जितके आठवणीच्या बळांमध्ये रहाल,तेवढे मनुष्याला तुम्ही आकर्षित कराल.या मध्येच शक्ती आहे.पवित्रता प्रथम आहे,असे म्हटले जाते.प्रथम पवित्रता,शांती,नंतर संपत्ती म्हणतात. आठवणीच्या शक्तीद्वारे तुम्ही पवित्र बनतात,त्यासोबत ज्ञानाचे बळ आहे. बाबांची महिमा तर तुम्ही जाणतात. बाबा खूप सुख देतात,२१ जन्मासाठी सुखाचे लायक बनवतात.कधीच कोणाला दुःख द्यायला नाही पाहिजे. काही मुलं सेवेमध्ये विघ्न घालून आपल्याला जसे श्रापित करतात. दुसऱ्याला खूप तंग करतात.कपूत मुलगा बनले तर, स्वतःलाच श्रापित करतात.सेवेमध्ये विघ्न घातल्यामुळे एकदम खाली पडतात.अनेक मुलं आहेत,जे विकारामध्ये जातात,किंवा शिक्षण सोडून देतात.अनेक प्रकारची मुलं इथे बसले आहेत.येथून ताजेतवाने होऊन जातात,परत चुकी बद्दल पश्चाताप करतात.तरीही पश्चात्तापा मुळे काही माफ होऊ शकत नाही.बाबा म्हणतात क्षमा स्वतःवरच करायची आहे,आठवणीमध्ये राहा.बाबा कोणाला क्षमा करत नाहीत.हे तर शिक्षण आहे.बाबा शिकवतात, मुलांनो,स्वतःवरच कृपा करायची आहे.चांगले चलन ठेवायचे आहे. बाबा ब्राह्मणीला म्हणतात,रजिस्टर घेऊन या,एका,एकाचा समाचार ऐकून,त्यांना समजून सांगितले जाते. तर समजतात, ब्राह्मणीने समाचार दिला आहे,तर आणखीनच सेवेमध्ये विघ्न घालतात.खूप कष्ट लागतात. माय खूप मोठे दुश्मन आहे. माकडापासून मंदिर लायक बनू देत नाही.उच्च पद मिळवण्याच्या ऐवजी आणखीनच विकारांमध्ये जातात, परत कधीही उभे राहू शकत नाहीत,सोडून जातात.बाबा मुलांना नेहमीच समजवतात,हे खूप मोठे लक्ष्य आहे,विश्वाचे मालक बनायचे आहे.मोठ्या मनुष्याची मुलं खूप चांगल्या रीतीने चालतात,कुठे पित्याची इज्जत जायला नको.दुसरे म्हणतात,तुमचे पिता तर खूप चांगले आहेत आणि तुम्ही तर कपुत आहात. तुम्ही आपल्या पित्याची इज्जत घालवत आहात.येथे तर प्रत्येकजण आपली इज्जत गमावतात.खूप सजा खावी लागते.बाबा इशारा देतात,खूप खबरदार बनून चला.जेल मधील पक्षी बनू नका.जेल मधील पक्षी पण येथेच असतात.सतयुगा मध्ये कोणताही जेल नसतो,तरीही शिकून उच्चपद मिळवायचे आहे.गफलत करू नका.कोणालाही दुःख देऊ नका.आठवणीच्या यात्रेवरती रहा. आठवणच कामाला येईल. प्रदर्शनीमध्ये मुख्य गोष्ट सांगा,बाबा च्या आठवणी द्वारेच पावन बनाल. पावन बनायची इच्छा तर सर्वांचे असते ना.ही तर पतित दुनिया आहे. सर्वांची सदगती करणारे तर एकच पिता येतात.ख्रिस्त बुद्ध इत्यादी कोणाची सद्गती करू शकत नाहीत. तरीही ब्रह्माचे नाव घेतात.ब्रह्माला पण सद्गती दाता म्हणू शकत नाहीत. जे देवी देवता धर्माचे निमित्त आहेत. जरी देवी देवता धर्माची स्थापना तर शिवबाबा करतात,तरीही नाव तर आहे ना ब्रह्मा विष्णू शंकर.त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात.बाबा म्हणतात,हे पण गुरु नाहीत.गुरु तर एकच आहेत, त्यांच्याद्वारे तुम्ही आत्मिक गुरु बनतात.बाकी ते धर्म संस्थापक आहेत.धर्म स्थापकांना सद्गती दाता कसे म्हणू शकतात?या गोष्टी समजण्याच्या आहेत.अन्य धर्म संस्थापक तर,फक्त धर्म स्थापन करतात.ज्यांच्यानंतर सर्व येतात,ते काही सर्वांना परत घेऊन जाऊ शकत नाहीत,त्यांना तर पुनर्जन्मा मध्ये यायचेच आहे.सर्वांसाठी हे ज्ञान आहे.एक पण गुरु सदगतीसाठी नाहीत.बाबा समजवतात,गुरु पतित पावन तर एकच आहेत.सर्वांचे सद्गती दाता,मुक्तिदाता आहेत.तुम्ही सांगायला पाहिजे आमचे गुरु तर एकच आहेत.जे सद्गती देतात, शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातात.सतयुगाच्या सुरुवातीला खूप थोडे असतात.तेथे कोणाचे राज्य होते,चित्र दाखवतात ना.भारतवासीच मानतात,देवतांचे पुजारी लगेच मानतील की बरोबर,हे तर स्वर्गाचे मालक आहेत.स्वर्गा मध्ये यांचे राज्य होते,बाकी सर्व आत्मा कोठे होते? जरूर म्हणाल निराकारी दुनिया मध्ये होते.हे पण तुम्ही समजतात,प्रथम काहीच माहिती नव्हते.आता तुमच्या बुद्धीचे चक्र फिरत राहते,बरोबर पाच हजार वर्ष पूर्व भारतामध्ये यांचे राज्य होते.जेव्हा ज्ञानाचे प्रारब्ध पूर्ण होते, तेव्हा भक्ती सुरू होती,परत जुन्या दुनिये पासून वैराग्य पाहिजे.बस आता आम्ही नवीन दुनिये मध्ये जाऊ.जुन्या दुनियेशी मन लागत नाही.तेथे पती मुलं इ.सर्व असे मिळतील.बेहद्दचे बाबा तर आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत.

जे विश्वाचे मालक बनणारी मुलं आहेत,त्यांचे विचार खूप उच्च आणि चलन खूप श्रेष्ठ असेल.भोजन पण खूप कमी करतात,जास्त लालच असायला नको.आठवणीमध्ये राहणाऱ्यांचे भोजन पण खूप कमी असेल.अनेकांची बुद्धी खाण्याकडे चालली जाते.तुम्हा मुलांना तर खुशी आहे,आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत.असे म्हटले जाते,खुशी सारखे खुराक नाही.खुशी मध्ये नेहमी रहा तर खान- पण खूप थोडे होईल.खूप भोजन केल्यानंतर भारी होतात,जांभळ्या येतात,परत मुलं म्हणतात,बाबा झोप येते.भोजन सदैव एकरस व्हायला पाहिजे,असे नाही की चांगले भोजन आहे,तर खूप खाऊन घ्या.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)आम्ही दुखहर्ता सुखकर्ताचे मुलं आहोत, आम्हाला कोणालाही दुःख द्यायचे नाही.सेवेमध्ये विघ्न घालून स्वतःला श्रापित करायचे नाही.

(२)आपले विचार खूप उच्च आणि श्रेष्ठ ठेवायचे आहेत.दयावान बनून सेवेत तत्पर राहायचे आहे.लालच सोडायची आहे.

वरदान:-
वैश्विक नाटकाच्या ज्ञानाद्वारे स्थिती बनवणारे,प्रकृती किंवा मायाजीत भव.

प्रकृती किंवा माया द्वारे,कसे पण पेपर येतील परंतु जराही हालचाल व्हायला नको.हे काय,हे कसे,असे प्रश्न आले,थोड्या पण कोणत्या समस्यांनी आघात केला,तर नापास व्हाल म्हणून काही पण होऊ द्या परंतु मनातून आवाज यायला पाहिजे की,वाह! गोड वैश्विक नाटक,हाय!हे कसे झाले,असा संकल्प यायला नको.अशी स्थिती व्हायला पाहिजे जे कोणत्याही संकल्पा मध्ये हलचल यायला नको.नेहमी अचल अडोल स्थिती राहिल,तेव्हाच प्रकृतीचे व मायाजीतचे वरदान मिळेल.

बोधवाक्य:-
खुशखबरी ऐकून खुशी देणेच,सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे.