07-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा जुन्या भक्तांना भक्तीचे फळ देण्यासाठी, भक्तीचे फळ ज्ञान आहे, ज्याद्वारे तुमची सदगती होते"

प्रश्न:-
काही मुलं चालता-चालता आपल्याच भाग्याला नष्ट करतात, कसे?

उत्तर:-
जर बाबांचे बनून सेवा करत नाहीत, स्वता:वर किंवा दुसऱ्यावर दया करत नाहीत, तर ते आपल्या भाग्यालाच (शुट) नष्ट करतात, म्हणजेच पद भ्रष्ट करतात. चांगल्या रितीने शिकले योगामध्ये राहिले तर पद पण चांगले मिळेल. सेवाधारी मुलांना तर सेवेची खूप आवड असली पाहिजे.

गीत:-
कोण आले सकाळी सकाळी, माझ्या मनाच्या द्वारे

ओम शांती।
आत्मिक मुलं समजतात आम्ही आत्मा आहोत, ना की शरीर आणि परमात्माकडून हे ज्ञान आत्ताच मिळते. बाबा म्हणतात जेव्हा मी आलो आहे, तर तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आत्माच शरीरा मध्ये प्रवेश करते. एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा बदलत नाही, शरीर बदलते. आत्मा अविनाशी आहे, तर स्वता:ला आत्मा समजायचे आहे. हे ज्ञान कोणी कधीही देऊ शकत नाही. बाबा मुलांनी बोलवल्यामुळे आले आहेत. हे पण कोणाला माहित नाही, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. बाबा येऊन समजवतात, मी कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये येतो, जेव्हा सर्व विश्व पुरुषोत्तम बनते. या वेळेत तर सर्व विश्व कनिष्ठ पतित आहे. त्याला अमरपुरी म्हटले जाते, हे मृत्युलोक आहे. मृत्युलोका मध्ये आसुरी गुण असणारे मनुष्य आहेत, अमरलोका मध्ये दैवीगुण असणारे मनुष्य आहेत म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. येथे पण ज्यांचा स्वभाव चांगला असतो, त्यांना म्हणतात हे तर जसे देवता आहेत. कोणी दैवी गुण असणारे असतात, या वेळेत सर्व आसुरी अवगुण असणारे मनुष्य आहेत. पाच विकारांमध्ये फसलेले आहेत, म्हणून तर गायन करतात, या दुःखापासून आम्हाला मुक्त करा. कोणत्या एका सितेला सोडवले नाही. बाबा ने समजवले आहे, भक्तीला सीता म्हटले जाते. भगवंताला राम म्हटले जाते. जे भक्तांना फळ देण्यासाठी येतात. या बेहद्दच्या रावण राज्यामध्ये सर्व दुनिया फसलेली आहे, त्यांना मुक्त करून राम राज्यात घेऊन जातात. रघुपति राघव राजाराम ची गोष्ट नाही, ते तर त्रेता युगाचे राजा होते. आता तर सर्व आत्मे तमोप्रधान, जडजडीभुत अवस्थेमध्ये आहेत. शिडी उतरत उतरत खाली आले आहेत. पुज्य पासून पुजारी बनले आहेत. देवता कोणाची पूजा करत नाहीत. ते तर पूज्य आहेत. परत ते जेव्हा वैश्य, शुद्र बनतात, तर पुजा सुरू होते. वामार्गामध्ये आल्यामुळे पुजारी बनतात. पुजारी देवतांच्या चित्रां पुढे नमन करतात. या वेळेत कोणीपण पूज्य होऊ शकत नाही. उच्च ते उच्च भगवान, त्यांच्या नंतर सतयुगातील देवता आहेत. यावेळी तर सर्व पुजारी आहेत. प्रथम तर शिवाची पूजा होते, ती झाली अव्यभिचारी पूजा. ती सतोप्रधान पुजा, परत देवतांची पुजा सोडून, मनुष्य, पक्षी इत्यादीची पूजा करायला लागतात. दिवसें दिवस अनेकांची पूजा होते. आजकाल तर धार्मिक संमेलन पण खूप होत राहतात. कधी आदी सनातन धर्माचे, तर कधी जैन लोकांचे, कधी आर्य समाजाचे संमेलन होत राहतात. अनेकांना बोलवत राहतात, कारण प्रत्येक धर्म स्वतःला उच्च समजतात. प्रत्येक धर्मामध्ये कोणते न कोणते विशेष गुण असल्यामुळे, ते स्वतःला मोठे समजतात. जैनीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ५-७ प्रकरचे असतील. त्यांच्या मध्ये कोणी नग्न राहतात, नग्न राहण्याचा, अर्थ पण समजत नाहीत. भगवानुवाच आहे नग्न म्हणजे अशरीरी आले होते, परत अशरीरी बनून जायचे आहे. ते परत कपडे उतरून नग्न बनतात. भगवानुवाच या अर्थला पण समजत नाहीत. बाबा म्हणतात तुम्ही आता येथे शरीर धारण करून भूमिका वठवण्यासाठी आले आहात, परत जायचे आहे, या गोष्टीला तुम्ही मुलंच समजतात. आत्माच भूमिका वठवण्यासाठी येते, झाड वृद्धी होत राहते. नव-नवीन प्रकारचे धर्म येत राहतात, यामुळे याला विविधतेचे नाटक म्हटले जाते. विविध धर्माचे झाड आहे. इस्लामी पहा किती काळे आहेत त्यांच्या पण खूप शाखा निघत राहतात. मुहम्मद तर नंतर आले आहेत. प्रथम इस्लामी आहेत. मुसलमानाची संख्या खूप आहे. आफ्रिकेमध्ये खूप सावकार आहेत, सोन्या हिऱ्यांच्या खाणी आहेत. जेथे खूप धन पाहतात, तर त्याप्रदेशा बरोबर लढाई करून धनवान बनतात. ख्रिश्चन पण खूप धनवान बनले आहेत. भारतामध्ये पण धन आहे, परंतु गुप्त आहे. सोनं इत्यादी खूप पकडत राहतात. आता दिगंबर जैन, संमेलन इत्यादी करत राहतात, कारण प्रत्येक जण स्वतःला मोठे समजतात ना. हे इतके धर्म सर्व वाढत राहतात, कधी विनाश पण होणार आहे, हे काही समजत नाहीत. सर्व धर्मामध्ये उच्च तर तुमचा ब्राह्मण धर्म आहे, ज्याला कोणी जाणत नाहीत. कलयुगी ब्राह्मण पण खूप आहेत, परंतु ते कुख वंशावळ ब्राह्मण आहेत. प्रजापिता ब्रह्माचे मुख वंशावळ ब्राह्मण तर, सर्व भाऊ-बहीण व्हायला पाहिजेत. जर ते स्वतःला ब्रह्माची संतान म्हणतात, तर भाऊ-बहिण झाले, परत लग्न पण करु शकत नाहीत. यावरून सिद्ध होते, ते ब्राह्मण ब्रह्माचे मुख वंशावळ नाहीत, फक्त नाव ठेवतात. वास्तव मध्ये देवतांपेक्षा उच्च ब्राह्मण आहेत, शेंडी म्हणजे उच्च आहेत. हे ब्राह्मणच मनुष्याला देवता बनवतात, परमपिता परमात्मा शिकवणारे आहेत. ते स्वतः ज्ञानाचे सागर आहेत. हे कोणालाही माहिती नाही. बाबांच्या जवळ येऊन ब्राह्मण बनून परत शूद्र बनतात. जुने संस्कार परिवर्तन होण्यामध्ये खूप कष्ट लागतात. स्वतःला आत्मा निश्चय करून बाबा पासून वारसा घ्यायचा आहे. आत्मिक पित्याद्वारे आत्मिक मुलंच वारसा घेतील. बाबांची आठवण करण्यामध्येच माया विघ्न आणते. बाबा म्हणतात, हाताने काम करा आणि मनाने बाबांची आठवण करा, खूप सहज आहे. जसे साजन- सजनी असतात, तर पाहिल्या शिवाय राहू शकत नाहीत. बाबा तर साजन आहेत. सजनी सर्व मुलं आहेत, जे बाबांची आठवण करत राहतात. एक बाबाच आहेत, जे कधी कोणाकडे आकर्षित होत नाहीत, कारण त्यांच्या पेक्षा उच्च तर कोणी नाही बाकी होय मुलांची महिमा करतात. तुम्ही भक्तिमार्ग मध्ये मज साजनच्या सर्व सजनी आहात. मला बोलवतातच की येऊन दुःखापासून मुक्त करून पावन बनवा. तुम्ही सर्व वधू आहात, तर मी वर आहे. तुम्ही सर्व आसुरी जेल मध्ये फसले आहात, मी येऊन सोडवतो. येथे खूप कष्ट आहेत. विकारी दृष्टी धोका देते, पवित्र दृष्टी बनवण्यामध्ये खूप कष्ट लागतात. देवतांचे खूप चांगले चरित्र आहे. आता असे देवता बनवणारे पण जरूर पाहिजेत ना.

संमेलन मध्ये विषय ठेवला आहे, "मनुष्य जीवनामध्ये धर्माची आवश्यकता" . वैश्विक नाटकाला न जाणल्यामुळे संभ्रमित झाले आहेत. तुमच्या शिवाय कोणी समजावू शकत नाहीत. ख्रिश्चन किंवा बौध्दी इत्यादींना थोडेच माहिती आहे की, परत ते कधी येतील. तुम्ही तर लगेच सांगू शकतात. तर समजावयला पाहिजे, धर्माची आवश्यकता आहे ना. प्रथम कोणता धर्म होता, परत कोणते धर्म आले. आपल्या धर्माचे पण पुर्णपणे समजत नाहीत. योग करत नाहीत. योगा शिवाय शक्ती येत नाही. बाबांनाच सर्वशक्तिमान अधिकारी म्हटले जाते. तुम्ही पण सर्वशक्तिवान, विश्वाचे मालक बनतात. तुमचे राज्य कोणी घेऊ शकणार नाहीत. त्या वेळेत दुसरा कोणता खंड नसतो, आता तर खूप खंड आहेत. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते?पाच हजार वर्षाचे हे चक्र आहे. बाकी सृष्टी खूप लांबलचक आहे, त्याचे थोडेच मोजमाप करु शकतात. तरीही याचे मोजमाप करु शकतील, परंतू समुद्राचे मोजमाप तर कोणी करू शकणार नाहीत. आकाश आणि समुद्राचा अंत कोणाला मिळू शकत नाही. तर समजावयाचे आहे की, धर्माची आवश्यकता का आहे?सर्व चक्र धर्मावरतीच बनलेले आहे. हे विविध धर्माचे झाड आहे, हे झाड म्हणजे अंधाच्या पुढे आरसा आहे.

तुम्ही आता बाहेर सेवेसाठी जातात, हळूहळू तुमची वृद्धी होत जाते. वादळाचा तडाखा बसल्यामुळे अनेक पानं(आत्मे) खाली पडतात. दुसऱ्या धर्मांमध्ये वादळाची गोष्टच नसते. त्यांना तर वरून यायचे आहे, येथे तर तुमची स्थापना खूपच आश्चर्यकारक आहे. प्रथम जे जुने भक्त आहेत, त्यांनाच भगवंताला आपल्या घरी नेहून, फळ द्यायचे आहे. असे बोवलतात पण, की आपल्या घरी घेऊन चला. हे कोणालाच माहीत नाही, बाबा स्वर्गाचे राज्यभाग्य देतात. संन्यासी लोक तर सुखाला मानत नाहीत, त्यांची इच्छा असते मोक्ष मिळावा. मोक्षला वारसा म्हटले जात नाही, स्वतः बाबांना पण आपली भूमिका वठवावी लागते, परत कोणाला मोक्षमध्ये कसे ठेवू शकतो? तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आपल्या धर्माला आणि सर्वांच्या धर्माला जाणतात. तुम्हाला दया यायला पाहिजे. चक्राचे रहस्य समजावयाला पाहिजे. तुम्ही समजावू शकता, प्रत्येकाला सतोतप्रधान पासून सतो-रजो- तमो मध्ये यायचे च आहे. आता रावण राज्य आहे. तुमची खरी गिता आहे, जे बाबा ऐकवतात. भगवान निराकारला म्हटले जाते. आत्मा, निराकार ईश्वर पित्याला बोलवते. जेथे तुम्ही आत्मे राहतात. तुम्हाला परमात्मा थोडेच म्हणू शकतो. परमात्मा एकच आहेत, उच्च ते उच्च भगवान, परत सर्व आत्मे मुलं आहेत. सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत, परत देवता आहेत. त्यांच्यामध्ये पण क्रमांक एकमध्ये कृष्ण आहेत, कारण आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहे. तुम्ही संगमयुगी आहात. तुमचे जीवन अमूल्य आहे, देवतांचे म्हणणार नाही. ब्राह्मणांचे अमूल्य जीवन आहे. बाबा तुम्हाला मुलगा बनवून परत तुमच्यावरती खूप कष्ट घेतात. देवता थोडेच इतकं कष्ट करतील. ते तर शिकण्यासाठी मुलांना शाळेत पाठवतात. येथे बाबा आम्हाला शिकवत आहेत, तेच पिता, शिक्षक, गुरु आहेत. तर खूप आदर ठेवायला पाहिजे. सेवाधारी मुलांना सेवेची खूप आवड असायला पाहिजे. खूप थोडे आहेत, जे हुशार आहेत आणि सेवेमध्ये तत्पर राहतात. मदतगार तर पाहिजेत ना. लढाईच्या मैदानात जाण्यासाठी ज्यांना शिकवतात, त्यांची नोकरी इत्यादी सर्व सोडवतात. त्यांच्या जवळ यादी राहते, परत मिलिटरी ला कोणी नाकारू शकत नाहीत की, आम्ही लढाईच्या मैदानात जाणार नाही. व्यायाम शिकवतात तर जरूर बोलवतील. न येणाऱ्यावरती केस करतात. येथे तर ती गोष्ट नाही. येथे परत जे चांगल्या रीतीने सेवा करत नाहीत तर, पद भ्रष्ट होते. सेवा करत नाहीत म्हणजेच स्वतःलाच नष्ट करतात, पद भ्रष्ट होते. आपल्या भाग्यालाच नष्ट करतात. चांगल्या प्रकारे शिकले, योगा मध्ये राहीले तर चांगले पद मिळेल. आपल्या वरती दया करायला पाहिजे. स्वता:वर दया करतील तर दुसऱ्या वरती पण करतील. बाबा प्रत्येक प्रकारे समजावून सांगतात की, हे दूनियाचे नाटक कसे चालते. तर राजधानी पण स्थापन होणार आहे. या गोष्टीला दुनिया जाणत नाही. आता निमंत्रण तर मिळतात, पाच दहा मिनिटांमध्ये कसे समजाऊ शकतो. ज्ञान स्पष्ट करण्यासाठी तर १-२ तास पाहिजेत, तेव्हाच समजावू शकतो. वैश्विक नाटकाला तर जाणत नाहीत. ज्ञानाच्या चांगल्या- चांगल्या गोष्टी सर्व ठिकाणी लिहायला पाहिजेत, परंतू मुलं विसरतात. बाबा निर्माता आहेत, तर मुलांची रचना करतात. आपले बनवले आहेत तर दिग्दर्शक बनून मार्गदर्शन पण देतात. श्रीमत देतात परत कार्य पण करतात. ज्ञान ऐकवतात, त्यांचे उच्च ते उच्च कार्य आहे ना. वैश्विक नाटकाच्या निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य कलाकाराला जाणले नाही तर, काय जाणले? अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता, बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या अमूल्य जीवनामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाचा खूप आदर ठेवायचा आहे. ज्ञान-योगाच्या अभ्यासा मध्ये हुशार बनून सेवा करायची आहे. स्वतःवर ती स्वतःच दया करायचे आहे.

(२) स्वतःला सुधारण्यासाठी सुसंस्कृत बनायचे आहे. आपले चरित्र सुधारायचे आहे. मनुष्याला देवता बनवण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
संकल्प आणि बोल च्या विस्ताराला अंतर्मुखी बनून विस्ताराला सार रुपामध्ये मध्ये स्थिर करणारे अंतर्मुखी भव.

व्यर्थ संकल्पाच्या विस्ताराला समेटून सार रूपांमध्ये स्थिर करणे किंवा मुखाच्या आवाजाच्या व्यर्थला समेटून समर्थ रुपामध्ये घेऊन येणे, हीच अंतर्मुखता आहे. असे अंतर्मुखी मुलं शांतीच्या शक्तीद्वारे भटकणाऱ्या आत्म्यांना खरा ठिकाण देऊ शकतात. ही शांतीची शक्ती अनेक आत्मिक रंग दाखवते. शांतीच्या शक्तीद्वारे प्रत्येक आत्म्याच्या मनाचा आवाज, इतका जवळ ऐकू येतो, जसे कोणी समोर बोलत आहेत.

बोधवाक्य:-
स्वभाव, संस्कार, संबंध, संपर्का मध्ये हलके राहणे म्हणजेच फरिश्ता बनणे होय.