07-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड,मुलांनो,तुम्ही ईश्‍वरीय पित्याचे विद्यार्थी आहात,तुम्हाला खरे-खुरे रूप बसंत बनून आपल्या मुखाद्वारे नेहमी ज्ञान रत्नच काढायचे आहेत"

प्रश्न:-
बाबा मुलांना जागृत करण्यासाठी कोणती संजीवनी बुटी देतात?

उत्तर:-
मनमनाभव म्हणजे बाबांची आठवण करा,नशा राहावा परमात्मा द्वारे आम्ही देवता बनण्यासाठी किंवा राज्यपद मिळवण्यासाठी हे शिक्षण घेत आहोत,ही स्मृतीच संजीवनी बुटी आहे,जी जागृत करवते,त्यांची अवस्था कधी कोमेजत नाही.ते नेहमी स्वतःची तपासणी करून दुसऱ्यांना पण सावधान करत राहतात.

ओम शांती।
हे कॉलेज आहे ना.जसे शाळेमध्ये विद्यार्थी बसतात,तर समजतात आम्ही शिक्षकाच्या पुढे बसलो आहोत.कोणती परीक्षा पास करण्यासाठी बसलो आहोत,हे पण बुद्धीमध्ये असते.सत्संग इत्यादीमध्ये जे वेद ग्रंथ इत्यादी ऐकवतात,तेथे असे काही मुख्य लक्षण नसते.ते ग्रंथ इत्यादी तुमच्या बुद्धी मधून निघाले आहेत.तुम्ही जाणतात आम्ही मनुष्यापासून देवता,भविष्य २१ जन्मासाठी बनत आहोत.विद्यार्थी घरांमध्ये बसले असतील तरीही बुद्धी मध्ये राहते,आम्ही ही परीक्षा पास करू.तुम्ही मुलं पण वर्गामध्ये बसले आहात, जाणतात आम्ही देवता बनत आहोत.तुम्ही पण स्वतःला विद्यार्थी समजता ना.आम्ही आत्मा आहोत,या शरीराद्वारे अभ्यास करत आहोत.आत्मा जाणते की,हे शरीर सोडून भविष्यामध्ये आम्ही नवीन शरीर घेऊ,त्यांना देवता म्हटले जाते. हे तर विकारी पतित शरीर आहे. आम्हाला परत नवीन शरीर मिळेल, ही समज आता मिळाली आहे. आम्ही आत्मा शिकत आहोत, ज्ञानसागर शिकवत आहेत.येथे तुम्हाला ग्रहस्थ व्यवहारांमध्ये चिंता नाही.बुद्धीमध्ये हेच राहते की आम्ही भविष्य मध्ये मनुष्यापासून देवता बनत आहोत.देवता स्वर्गामध्ये राहतात.हे नेहमी चिंतन केल्यामुळे मुलांना आनंद राहिल आणि पुरुषार्थ पण करतील.मनसा वाचा कर्मणा पवित्र राहतील.सर्वांना आनंदाचा संदेश ऐकवत राहाल.ब्रह्माकुमार तर खूप आहेत ना.सर्व विद्यार्थी जीवनात मध्ये आहेत.असे नाही की कामधंद्या मध्ये गेल्यामुळे विद्यार्थी जीवन विसरते.जसे हा मिठाई वाला आहे,समजतो मी विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला कधी मिठाई बनवावी लागते का?येथे तर तुमच्या गोष्टीच वेगळ्या आहेत.शरीर निर्वाह साठी धंदा पण करायचा आहे,सोबत हे आठवणीत राहावे की,आम्ही परमपिता परमात्मा द्वारे राजयोग शिकत आहोत.तुमच्या बुद्धीमध्ये राहते,की या वेळेत सर्व दुनिया नर्कवासी आहे,परंतु हे कोणी समजत नाही की आम्ही भारतवासी नर्कवासी आहोत.आम्ही भारतवासी स्वर्गवासी होतो.तुम्हा मुलांना सर्व दिवस हाच नशा राहत नाही,घडी घडी विसरते.जरी तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहात,शिक्षक आहात, शिक्षण देतात,मनुष्याला देवता, नर्कवासींना स्वर्गवासी बनवत आहात,तरीही विसरते.तुम्ही जाणता यावेळेत सर्व दुनिया आसुरी संप्रदाय आहे.आत्मा पण पतित तर शरीर पण पतित आहे.आता तुम्हा मुलांना या विकारापासून घ्रुणा आहे.ते काम क्रोध इत्यादी सर्व घ्रुणा च्या गोष्टी आहेत ना.सर्वात घ्रुणेची गोष्ट विकार आहे.संन्याशा मध्ये पण थोडा क्रोध राहतो,कारण जसे अन्न तसे मन,गृहस्थीचे भोजन घेतात.काही धान्य घेत नाही परंतु पैसे तर घेतात ना.पतितांचा त्यावरती प्रभाव तर राहतो.पतितांचे अन्न पतितच बनवतील.पवित्रते वरती तुम्ही विशेष जोर देतात.तुमचा प्रचार वाढत जाईल.सर्वांची इच्छा होईल आम्ही पवित्र बनू.या गोष्टी मनाला लागतील,कारण पवित्र बनल्याशिवाय स्वर्गाचे मालक बनू शकत नाही.हळूहळू सर्वांच्या बुद्धीमध्ये येईल.जे स्वर्गवासी बनायचे असतील,तेच बनतील.ते म्हणतील आम्ही तर पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक जरूर बनू.हे कल्याणकारी संगमयुग आहे,जेव्हा पतित दुनिया पावन बनते,यालाच पुरुषोत्तम युग म्हटले जाते.हे कल्याणकारी युग आहे,म्हणून सृष्टीचे कल्याण होते.बाबा कल्याणकारी आहे,तर मुलांना पण बनवतील ना.बाबा येतात आणि मनुष्याला देवता बनवतात.

तुम्ही जाणतात,ही आमची मुख्य शाळा आहे.येथे काही काम धंदा तर नाही.बाहेर गेल्यानंतर काम धंद्यामध्ये व्यस्त राहतात.तर हे आठवणीत राहत नाही की,आम्ही विद्यार्थी आहोत.आम्ही नर्क वासीपासून स्वर्गवासी बनत आहोत. हे विचार बुद्धीमध्ये तेव्हाच चालतात, जेव्हा वेळ असेल,प्रयत्न करुन वेळ काढायला पाहिजे.हे आठवणीत राहिले पाहिजे की,आम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहोत.एक बाबांची आठवण करायची आहे. धंद्या मध्ये पण थोडा वेळ तर मिळतोच.बुद्धीमध्ये प्रयत्न करून आठवण यायला पाहिजे.बुद्धीमध्ये आठवणीत राहिले पाहिजे,आम्ही ईश्वरीय पित्याचे विद्यार्थी आहोत. उदर निर्वाहासाठी हा धंदा इत्यादी करत आहोत.तो तर मायावी धंदा आहे,हा तुमचा खरोखर उदरनिर्वाह आहे.भविष्यासाठी खरी कमाई तर ही आहे,यामध्ये खूप चांगली बुद्धी पाहिजे.स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्माची आठवण करायची आहे.हे समजायचे आहे, आत्ता आम्हा आत्म्यांना घरी जायचे आहे.बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत.सर्व दिवस बुद्धीमध्ये अशाप्रकारे विचार सागर मंथन करायचे आहे.जसे गाय रवंथ करते,असेच मुलांना पण विचार सागर मंथन करायचे आहे.मुलांना अविनाशी जजाना मिळत आहे,हे आत्म्यासाठी भोजन आहे.हे आठवणीत यायला पाहिजे,आम्ही परमपिता परमात्मा द्वारे शिकत आहोत,देवता बनण्यासाठी किंवा राज्यपद घेण्यासाठी.आठवण करायची आहे.मुलं विसरतात तर आनंदाच्या ऐवजी अवस्था कोमेजून जाते.ही तर संजीवनी बुटी आहे,जी आपल्या जवळ ठेवायची आहे आणि दुसर्यांना पण द्यायची आहे,जागृती करण्यासाठी. ग्रंथांमध्ये तर खूप लांबलचक गोष्टी लिहिल्या आहेत. बाबा तर या सर्वांचे रहस्य सन्मुख समजवतात.मनमनाभव म्हणजेच बाबांची आठवण करा,तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल.स्वतःच्या मनाला विचारत राहा,तपासत राहा, एक-दोघांना सावधान करत राहा.काही खिटपीट होते,तर बुद्धी त्यामध्ये लागून राहते,त्यामुळे कोणी काही सुचना देतात,तर आवडत नाही.माया कडे बुद्धी जाते,परत त्याची चिंता राहते,तुम्हा मुलांना तर खुश राहायला पाहिजे.बाबांची आठवण करा,परंतु आपणच संभ्रमात राहाल,तर ते औषध कामाला येणार नाही,संभ्रमित होत राहतील,असे करायला नाही पाहिजे. विद्यार्थी अभ्यासाला थोडेच सोडतात.तुम्ही मुलं जाणतात,हा आमचा अभ्यास भविष्यासाठी आहे, यामध्येच आमचे कल्याण आहे.कामधंदा इत्यादी करत हा कोर्स घ्यायचा आहे.सृष्टीचे चक्र कसे फिरते,हे पण ज्ञान बुद्धी मध्ये ठेवायचे आहे.बाबांची आठवण संजीवनी बुटी आहे,एक-दोघांना आठवण देत राहीले पाहिजे. पती-पत्नीने,एक दोघांना बाबांची आठवण देत राहयचे आहे.शिवबाबा ब्रह्मा द्वारे शिकवत आहेत. शिवबाबांच्या रथाचा शृंगार करत आहोत,तर शिवबाबांची आठवण यायला पाहिजे.सर्व दिवस आठवण राहणे तर कठीन आहे.ती अवस्था तर अंत काळात होईल.जोपर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही,तोपर्यंत महारथीशी माया लढत राहील.गायन पण आहे,एक दोघांना सावधान करत प्रगती करत राहा.अधिकारी लोक नौकराला पण म्हणतात,या गोष्टीची आठवण करून द्या.तुम्ही पण एक दोघांना आठवण देत राहा.लक्ष खूप श्रेष्ठ आहे.बाबा म्हणतात,माझी आठवण केल्या मुळेच पावन बनाल.या गोष्टी कोणी जाणत नाही.तुम्ही लाखो करोडो वेळा हे ज्ञान ऐकले आहे,परत ऐकाल.असे कोणत्याही सत्संगा मध्ये सांगणारा नसेल,की कल्प कल्प ज्ञान ऐकले आहे.आत्ता ऐकत आहोत,परत ऐकू.असे कोणी म्हणू शकत नाही.बाबा समजवतात तुम्ही अर्धा कल्प भक्ती केली आहे.आता परत तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, ज्याद्वारे सद्गती होते.बाबांची आठवण केल्यामुळेच पाप नष्ट होतात.ही तर समजण्याची गोष्ट आहे.पुरुषार्थ करायचा आहे. न्यायाधीश किंवा मोठ्या मनुष्यांच्या मुलांनी उलटे काम केले,तर नाव बदनाम होते.तुम्ही पण बाबाचे बनले आहात,तर असे कोणते कर्म करायचे नाही,नाहीतर बाबाची निंदा कराल. सद्गुरूचे निंदक श्रेष्ठ पद मिळवू शकत नाहीत.ईश्वराची संतान बनल्यावर आसुरी कर्माला घाबरायला पाहिजे.श्रीमतावर चालायचे असते,आपल्या मतावर चालून धोका मिळतो,पदभ्रष्ट होते. तुम्ही विचारू शकता,मी श्रीमता नुसार चालत आहे.बाबांची प्रथम श्रीमत आहे,मज पित्याची आठवण करा.कोणतेही काम करू नका, कोणते विकर्म करु नका. बाबा, माझ्या कडून कोणते विकर्म होतात,तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा? माहिती असेल तर सांगतील,अशाप्रकारे तुमच्याकडून चुका होत राहतात,त्याला विकर्म म्हटले जाते.सर्वात मोठे विकर्म आहे, काम विकाराचे,जास्ती भांडणं त्यावरतीच चालतात.मुलांनी हिम्मत ठेवायला पाहिजे,विचार करायला पाहिजे.कुमारींचा झुंड असायला हवा,जे म्हणतील आम्ही तर लग्न करणार नाही,आत्ता कल्पाचा संगम आहे,ज्यामध्ये पुरुषोत्तम बनायचे आहे.या लक्ष्मी नारायणला पुरुषोत्तम म्हटले जाते.विकारींना थोडेच पुरुषोत्तम म्हणाल.आत्ता तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात,सर्वांना पुरुषोत्तम बनण्याचा अधिकार आहे. पुरुषोत्तम महिन्यामध्ये तुम्ही खूप सेवा करू शकतात.हे पुरुषोत्तम युग उत्तम आहे.ज्यावेळेस मनुष्य नर्कवासी पासून स्वर्गवासी बनतात. ही तर साधारण गोष्ट आहे.तुम्हा मुलांना चांगल्या प्रकारे समजायचे आहे.हे समजायचे आहे पुरुषोत्तम सतयुगा मध्येच असतात, कलियुगामध्ये तर कोणी उत्तम पुरुष नाहीत.ही तर पतित दुनिया आहे. तेथे तर पवित्रच पवित्र आहेत.या सर्व गोष्टी बाबाच मुलांना समजवतात,तर दुसऱ्यांना पण समजून सांगा.संधी पाहून समजवले पाहिजे.तुम्ही इथे बसले आहात, तुम्ही समजता आम्हाला निराकार बाबा परमपिता परमात्मा राजयोग शिकवत आहेत,आम्ही विद्यार्थी आहोत.या शिक्षणाद्वारे स्वर्गाचे देवी-देवता बनू शकतात.सर्वात मोठ्यात मोठी परीक्षा आहे,राजाई प्राप्त करण्यासाठीची परीक्षा.जे परमात्म्याच्या शिवाय कोणी शिकवू शकत नाहीत.बाबा तर परोपकारी आहेत,स्वतः स्वर्गाचे मालक बनत नाहीत.स्वर्गाचे राजकुमार श्रीकृष्णच बनतात.निष्काम सेवा बाबाच करतात,ते म्हणतात मी राजा बनत नाही.तुम्हाला राजांचे राजा बनवतो. या गोष्टी कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाहीत.असे खूप आहेत,जरी येथे सावकार आहेत, तेथे गरीब बनतील आणि जे येथे गरीब आहेत ते खूप सावकार बनतील.विश्वाचे मालक बनणे, ही तर बेहदची गोष्ट आहे ना.गायन पण आहे ,मी तुम्हाला राजांचा राजा बनवतो, स्वर्गाचे मालक बनवतो.तुम्ही जाणता,आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत.खूप नशा राहिला पाहिजे की,आम्हाला शिकवणारे परमपिता परमात्मा आहेत.आम्ही आता नरा पासून स्वर्गवासी देवता बनत आहोत.हे पण आठवणीत राहील तर,यामुळे खुशीचा पारा चढलेला राहील. विद्यार्थी जीवन खूप चांगले आहे,पुरुषार्थ करून राजाराणी बनायला पाहिजे.असे नाही सांगायला पाहिजे की,आम्ही राजा बनू परत रंक बनू.हे सागायला नाही पाहिजे.तुम्ही विचारा,तुम्ही काय बनू इच्छिता,सर्व जण म्हणतील आम्ही तर विश्वाचे मालक बनू.ते तर भगवंत पिताच बनू शकतात.असे म्हणतात माझी आठवण करा तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.खूप सहज गोष्टी आहेत,कोणीही बनू शकते. जरी कितीही गरीब आहेत,यामध्ये पैशाची गोष्ट नाही,म्हणून भगवंताला गरीब नवाज म्हणतात.

बाबांची आठवण करून,पापाचा घडा खाली करायचा आहे.जितके जे कष्ट करतील,तेवढीच मिळकत होईल.शिडीमध्ये पाहू शकता,किती उंच चढू शकता.प्रगती केली तर राजाई रस मिळेल,पडले तर चकनाचुर होतील.विकारांमध्ये गेले, सोडचिठ्ठी दिली,तर खूप अधोगती होईल.सुपात्र मुलं पुरुषार्थ करून आपले जीवन हिऱ्या सारखे बनवतील.मुलांना खूप हुशार करायचे आहे,आता जे करतील. सर्वांना म्हणतात मात पित्याचे अनुकरण करा,आपल्या सारखे बनवा.जितके दयाळू बनतील तेवढा फायदा आहे.आपला वेळ वाया घालवायचा नाही.दुसऱ्याला पण युक्ती सांगत राहायचे आहे,नाहीतर इतके उच्च पद मिळू शकत नाही.अंत काळात तुम्हाला खूप साक्षात्कार होतील,परत त्या वेळेस तुम्ही काही करू शकणार नाही. परीक्षा मध्ये एकदा नापास झाले की झाले.असे नाही अंत काळात पश्चाताप करावा लागेल,परत पुरुषार्थ करू शकणार नाहीत, म्हणून जितके शक्य होईल स्वतःचे आणि दुसर्‍याचे कल्याण करायचे आहे. अंधाची काठी बनायचे आहे. कल्प कल्पांतर स्वर्गाची स्थापना केली आहे,तर आत्ता पण जरूर करतील. अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. आता जे करतील त्यांना मिळेल. बाबांची लाडकी मुलं तर लपून राहू शकत नाहीत.रुप बसंत बनून, मुखाद्वारे ज्ञान रत्न काढायचे आहेत. धुतीपणा करायचा नाही, दुसर्‍याचे नुकसान करायचे नाही. तुम्हाला कोणी उलटेसुलटे ऐकवले,तर समझा धुतीपणा करतात, त्यांच्यापासून सांभाळ करायची आहे.आपल्या बेहद्दचा वारसा,बेहद्दच्या बाबापासून घेण्यामध्ये तत्पर राहायचे आहे,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपले आणि दुसऱ्याचे कल्याण करायचे आहे.अंधाची काठी बनायचे आहे.कधी कोणत्या उल्टया गोष्टी ऐकवेल तर त्यांच्या पासून सावधान राहायचे आहे.

(२) मन्सा वाचा कर्मणा पवित्र बनायचे आहे.आम्ही विद्यार्थी आहोत,भगवान आम्हाला देवता बनवण्याचे शिक्षण देत आहे,याच खुशी मध्ये राहायचे आहे.

वरदान:-
शक्तिशाली आरशा द्वारे सर्वांना स्वतःचा साक्षात्कार करवणारे साक्षात्कार मूर्त भव.

जसे आरशाच्या पुढे जातात,तर स्वतःचा स्पष्ट साक्षात्कार होतो परंतु जर आरसा स्पष्ट,चांगला नसेल तर वास्तविकतेच्या ऐवजी दुसरे रूप दिसून येते.कोणी लहान दिसेल, कोणी मोठे दिसेल, म्हणून असे शक्तिशाली दर्पण बना,ज्यामुळे सर्वांना स्वतःचा साक्षात्कार करू शकाल,म्हणजेच आपल्या पुढे येताच देहभान विसरून,आपल्याच देही स्वरूपा मध्ये स्थिर होतील. वास्तविक सेवा हीच आहे,याद्वारे जय-जयकार होईल.

बोधवाक्य:-
ज्ञानाचे आचरण करणारेच ज्ञानस्वरूप, प्रेमस्वरूप आत्मा आहेत.