07-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आत्म अभिमानी होऊन बसा,मनामध्ये घोटत राहा- मी आत्मा आहे,देही अभिमानी बना,खरी दिनचर्या लिहा,तर समजदार बनत जाल,त्यामुळे खूप फायदा होईल"

प्रश्न:-
बेहदच्या नाटकाला समजणारी मुलं, कोणत्या एका कायद्याला किंवा नियमाला चांगल्या रीतीने समजतात?

उत्तर:-
हे अविनाश नाटक आहे, यामध्ये प्रत्येक कलाकाराला, आपली भूमिका वठवण्यासाठी, आपल्या वेळेनुसार यायचे आहे. कोणी म्हणतील आम्ही नेहमी शांतीधाम मध्ये बसून राहू,तर हा कायदा नाही.त्यांना तर कलाकार म्हणनार नाही.या बेहद्दच्या गोष्टी बेहद्दचे बाबाच ऐकवतात.

ओम शांती।
स्वतःला आत्मा समजून बसा.देह अभिमान सोडून बसा.बाबा मुलांना समजावत आहेत,त्यांनाच समजावले जाते,जे बेसमज आहेत.आत्मा समजते की बाबा खरे सांगत आहेत की,आम्ही आत्मा बेसमज बनलो होतो.मी आत्मा अविनाशी असून,शरीर तर विनाशी आहे.मी,आत्म-अभिमान सोडून देह अभिमानामध्ये फसलो आहे.तर बेसमज झाले ना.बाबा म्हणतात सर्व मुलं,देह अभिमानामध्ये येऊन बेसमज बनले आहेत,परत तुम्ही बाबाद्वारे देही अभिमानी बनतात,तर खूप समजदार बनतात.काही तर बनले आहेत,काही पुरुषार्थ करत आहेत. बेसमज बनण्यासाठी अर्धा कल्प लागला आहे.या अंतीम जन्मांमध्ये परत समजदार बनायचे आहे.अर्ध्या कल्पा पासून बेसमज बनत-बनत,परत १००% बेसमज बनतात.देह अभिमनामध्ये येऊन वैश्विक नाटका नुसार तुम्ही खाली उतरत आले आहात,अधोगती होत आली आहे.आता तुम्हाला समज मिळाली आहे,तरीही पुरुषार्थ खूप करायचा आहे,कारण मुलांमध्ये दैवी गुण पण पाहिजेत.मुलं जाणतात आम्ही सर्वगुणसंपन्न,१६ कला संपूर्ण,संपूर्ण निरंकारी होतो.या वेळेत परत निर्गुण आहेत. कोणताही गुण राहिला नाही.तर तुम्हा मुलांमध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे,या खेळाला समजतात.असे समजत-समजत पण किती वर्ष झाले आहेत.तरीही जे नवीन मुलं आहेत,ते चांगले समजदार बनत आहे.ते दुसऱ्यांना पण समजदार बनवण्याचा पुरुषार्थ करत आहेत.काहींनी तर अगदीच समजले नाही,बेसमजच बेसमज राहिले आहेत.बाबा समजदार बनवण्यासाठी आले आहेत.मुलं समजतात मायेमुळे आम्ही खूप बेसमज बनलो आहोत.आम्ही पूज्य होतो,तर समजदार होतो,परत आम्हीच पुजारी बनून,बेसमज बनलो आहोत.आदी सनातन देवी देवता धर्म प्रायलोप झाला आहे.या दुनिया मध्ये कोणालाच माहिती नाही.लक्ष्मीनारायण खूप समजदार होते,राज्य करत होते.बाबा म्हणतात,तुम्ही पण राज्य करत होते.तुम्ही पण स्वतःसाठी असेच समजा.या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत.बाबा शिवाय कोणी समजावू शकणार नाहीत.आता त्याची जाणीव होते की,बाबाच उच्च ते उच्च,समजदार ते समजदार, असतील ना.एक तर ज्ञानाचे सागर पण आहेत.सर्वांचे सदगती दाता आणि पतित-पावन पण आहेत. एकाची च महिमा आहे.इतके उच्च ते उच्च बाबा येऊन,मुलं-मुलं म्हणून,खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात.मुलांनो आता पावन बनायचे आहे,त्यासाठी एक बाबाच औषध देतात,ते म्हणतात, योगाने तुम्ही २१ जन्म निरोगी बनाल.तुमचे सर्व रोग,दुःख नष्ट होतील,तुम्ही मुक्तिधाम मध्ये चालले जाल.अविनाश सर्जन ज्यांच्याजवळ एकच औषध आहे,एकच इंजेक्शन आहे,ते आत्म्याला देतात.असे नाही कोणी मनुष्य वकील बनतील,परत इंजिनिअरिंग करतील,नाही.प्रत्येक मनुष्य आपल्या धंद्या मध्येच तत्पर राहतात.बाबांना म्हणतात,पतिता पासून पावन बनवा,कारण पतित पणामध्येच दुःख आहे.शांतीधामला पावन दुनिया म्हणणार नाही. स्वर्गालाच पावन दुनिया म्हणू शकतो. हे पण समजावले आहे, मनुष्य शांती आणि सुखाची इच्छा ठेवतात. शांती तर तेथे आहे,जेथे शरीर नाही,त्याला शांतीधाम म्हटले जाते.अनेक जण म्हणतात शांती मध्ये राहावे परंतु कायदा नाही.ते तर कलाकार झाले नाही.मुलांनी वैश्विक नाटकाला पण समजले आहे.जेव्हा कलाकाराचा अभिनय पूर्ण होतो,तेव्हा सर्व कलाकार रंगमंचावर येतात.या बेहद्दच्या गोष्टी बाबाच समजवतात. ज्ञानसागर पण त्यांनाच म्हटले जाते,सर्वांचे सद्गतीदाता पतितपावन पण आहेत.सर्वांना पावन बनवणारे तत्व होऊ शकत नाहीत.पाणी इत्यादी सर्व तत्व आहेत,ते मनुष्यांची सद्गती कसे करतील? आत्माच अभिनय करते, हठयोगाची भूमिका किंवा अभिनय पण आत्माच करते.या गोष्टी पण जे समजदार आहेत,तेच समजू शकतात.बाबानी खूप समजवले आहे,कोणती अशी युक्ती शोधा,जे मनुष्य समजतील,कसे पुज्यपासून पुजारी बनू शकतो.नवीन दुनिये मध्ये पुज्य आहेत,तर जुन्या दुनिया मध्ये पुजारी आहेत.पावनला पुज्य तर पुजारीला पतित म्हटले जाते. येथे तर सर्व पतित आहेत कारण विकारापासून जन्म घेतात.तेथे श्रेष्ठ आहेत,गायन पण आहे संपूर्ण श्रेष्ठाचारी.आता तुम्हा मुलांना असे बनायचे आहे,यामध्येच कष्ट आहेत. मुख्य आठवण करण्याची गोष्ट आहे.सर्वजण म्हणतात, आठवणीमध्ये राहणे खूप कठीण आहे.आम्ही जितके पाहिजे तेवढे आठवणी मध्ये राहू शकत नाही.कोणी जर खरोखर दिनचर्या लिहिली,तर खूप फायदा होऊ शकतो.बाबा मुलांना ज्ञान देतात की, मनमनाभव होऊन राहा.

तुम्ही अर्थ सहित म्हणतात,तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट,अर्थ सहित समजतात.बाबांना मुलं अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात,बाबा मुलांना आवडण्यासाठी प्रतिसाद देतात परंतु बाबा म्हणतात माझे काम पतिता पासून पावन बनवणे आहे. मला तर यासाठीच बोलवतात.तुम्ही जाणतात,आम्ही आत्मा शरीर सहित पावन होतो. आता तीच आत्मा शरीरा सहीत पतित बनली आहे.८४ जन्माचा हिशोब आहे ना.तुम्ही जाणतात,ही दुनिया काट्याचे जंगल बनली आहे. लक्ष्मीनारायण तर फूल फुलासारखे आहेत,त्यांच्यापुढे काटे म्हणजे विकारी मनुष्य म्हणतात,तुम्हीच सर्वगुणसंपन्न इत्यादी आहात. आम्ही तर पापी कपटी आहोत. सर्वात मोठा काटा, काम विकाराचा आहे,यावरती विजय मिळून जगजीत बना.मनुष्य पण म्हणतात, भगवंताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यायचे आहे,भागीरथा वरती विराजमान होऊन यायचे आहे.भगवंताला जुन्या दुनियेला नवीन बनवायचे आहे.नवीन दुनियेला सतोप्रधान तर जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते. जेव्हा आता जुनी दुनिया आहे,तर बाबांना जरुर यावेच लागेल.बाबांनाच रचनाकार म्हटले जाते.बाबा तुम्हा मुलांना खूप सहज स्पष्ट करुन समजवतात.तर खूप आनंद व्हायला पाहिजे,बाकी कोणाचा कर्मभोग आहे,तर काही ना काही भोगावे लागते.यामध्ये बाबा आशीर्वाद करत नाहीत.मला बोलवतातच,बाबा येऊन आम्हाला वारसा द्या.बाबा कडून कोणता वारसा मिळवू इच्छिता? मुक्ती जीवनमुक्तीचे दाता,ज्ञानाचे सागर बाबाच आहेत,म्हणून त्यांनाच ज्ञानदाता म्हटले जाते.भगवंताने ज्ञान दिले होते परंतु कधी दिले? कोणी दिले,हे कोणालाच माहिती नाही.सर्व संभ्रम यामध्येच आहे. कोणाला ज्ञान दिले,हे पण कोणाला माहिती नाही.आता हे ब्रह्मा आहेत, त्यांना माहिती आहे की,आम्हीच नारायण होतो,परत ८४ जन्म घेतले. हे क्रमांक एक मध्ये आहेत.ब्रह्माबाबा सांगतात माझे डोळे तर उघडले.तुम्ही पण म्हणणार आमचे तर डोळे उघडले आहेत.तिसरा नेत्र तर उघडतो. तुम्ही म्हणाल,आम्हाला शिवपित्याचे,सृष्टीचक्राचे पूर्ण ज्ञान मिळाले आहे.मी जो आहे,जसा आहे,माझे डोळे तर उघडले आहेत. किती आश्चर्य आहे.आम्ही प्रथम आत्मा आहोत आणि परत आम्ही स्वतःला देह समजून बसलो आहोत.आत्मा म्हणते आम्ही एक शरीर सोडून दुसरे घेतले आहे. तरीही आम्ही स्वतःला आत्मा विसरून देहाभिमानी बनलो आहोत म्हणून आता तुम्हाला प्रथम हे ज्ञान देतो की स्वतःला आत्म समजून राहा.मनामध्ये याची पुनरावृत्ती करा किंवा घोटत राहा,मी आत्मा आहे. आत्मा न समजल्या मुळेच बाबांना पण विसरतात.तुम्हाला जाणीव होते की,बरोबर आम्ही सारखे देह अभिमानामध्ये येतो.आत्मा व समजण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.येथे बसलो आहोत,तर आत्म-अभिमानी होऊन बसा.बाबा म्हणतात तुम्हा मुलांना राजाई देण्यासाठी आलो आहे.अर्धाकल्प तुम्ही माझी आठवण केली.कोणतीही गोष्ट समोर येते,तर म्हणतात हे राम परंतु ईश्वर किंवा राम कोण आहेत,हे कोणालाही माहिती नाही.तुम्हाला स्पष्ट करून सांगायचे आहे की, ज्ञानाचे सागर पतित-पावन,सर्वांचे सद्गतीदाता, त्रिमूर्ती परमपिता परमात्मा शिव आहेत.ब्रह्मा विष्णू शंकर तिघांचा जन्म एकत्रीत आहे. फक्त शिवजयंती म्हणायचे नाही, परंतु त्रिमूर्ती शिवजयंती म्हणायचे आहे.जरूर जेव्हा शिवाची जयंती असेल,तर ब्रह्माची पण जयंती असेल.शिवाची जयंती करतात,तर ब्रह्माने काय केले?लौकिक, पारलौकिक,आणि हे अलौकिक पिता आहेत.हे प्रजापिता ब्रह्मा आहेत.बाबा म्हणतात नवीन दुनियेसाठी हे नवीन ज्ञान,आता तुम्हाला मिळत आहे,जे परत नष्ट होते.ज्यांना शिवपिता रचनाकार आणि रचनेचे ज्ञान नाही,तर ते अज्ञानी झाले ना.अज्ञान निद्रामध्ये झोपले आहेत.ज्ञानापासून दिवस, भक्ती पासून रात्र होते.शिवरात्रीचा अर्थ पण जाणत नाहीत,म्हणून त्याची सार्वजनिक सुट्टी पण देत नाहीत.

आता तुम्ही जाणतात बाबा सर्वांची ज्योत जागृत करण्यासाठी आले आहेत.तुम्ही हे बत्ती,लाइट इत्यादी लावणार तर,समजतात यांचा कोणता मोठा दिवस असेल.आता तुम्ही अर्थ सहित जागृत करतात.ते लोक थोडेच समजतात.तुमच्या भाषणाद्वारे अर्थ सहित समजत नाहीत.आता साऱ्या विश्वा वरती रावणाचे राज्य आहे,या राज्यांमध्ये मनुष्य खूप दुःखी आहेत. रिद्धी-सिद्धी वाले पण खूप तंग करत राहतात.वर्तमान पत्रामध्ये पण येते की,यांच्यामध्ये भटकणारी आत्मा आहे,ती खूप दुःख देत राहते.बाबा म्हणतात या गोष्टीशी आमचा कोणताही संबंध नाही. बाबा तर सहज गोष्टी समजवतात मुलांनो तुम्ही माझी आठवण करा तर पावन बनाल आणि तुमचे सर्व दुःख दूर होतील.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) अर्थ सहित बाबांची आठवण करणे किंवा आत्म अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.खरी-खुरी दिनचर्या लिहायची आहे.यामध्ये खूप फायदा आहे.

(२) सर्वात जास्त दुःख देणारा काटा काम विकाराचा आहे,याला योगाद्वारे विजय मिळवून पतिता पासून पावन बनायचे आहे,बाकी कोणत्या गोष्टीशी तुमचा संबंध नाही.

वरदान:-
विघ्नमुक्त चमकणारे फरिश्ता वस्त्र धारण करणारे नेहमी विघ्नविनाशक भव.

स्वतःच्या प्रति आणि सर्वांच्या प्रति नेहमीच विघ्नविनाशक बनण्यासाठी प्रश्नचिन्ह ला निरोप द्या आणि पूर्णविराम द्वारे सर्व शक्तींचा भांडार भरपूर करा.नेहमी विघ्न मुक्त चमकणारे फरिश्ताचा चे वस्त्र घालून ठेवा.देहरुपी मातीचे कपडे घालू नका.सोबतच सर्व गुणांच्या दागिन्या द्वारे शृंगारिक रहा.नेहमी अष्टशक्ती शस्त्रधारी,संपन्न मूर्ती बणून राहणे आणि कमल पुष्पाच्या आसना वरती आपल्या श्रेष्ठ जीवनाचे पाउल ठेवत जाणे.

बोधवाक्य:-
राजयोगाच्या अभ्यासावरती पूर्णपणे लक्ष द्या,तर प्रथम क्रमांक मध्ये येऊ शकाल.


मातेश्वरी जींचे अनमोल महावाक्य.

हे ईश्वरीय ज्ञान सर्व मनुष्य ज्ञान साठी आहे.

प्रथम तर स्वतः एक मुख्य,ज्ञानाचा मुद्दा विचारांमध्ये आवश्य ठेवायचा आहे.जेव्हा मनुष्य सृष्टी झाडाचे बिजरूप परमात्मा आहेत,तर त्या परमात्मा द्वारे जे ज्ञान मिळत आहे, ते सर्व मनुष्यांसाठी जरुरी आहे. सर्व धर्मवासींना हे ज्ञान घेण्याचा अधिकार आहे.जरी प्रत्येक धर्माचे ज्ञान आप आपले आहे.प्रत्येकाचे ग्रंथ आप आपले आहेत.प्रत्येकाचे मत आप आपले आहे,प्रत्येकाचे संस्कार आपले आहेत,परंतु हे ईश्वरीय ज्ञान सर्वांसाठी आहे.जरी ते या ज्ञाला घेऊ शकणार नाहीत, आपल्या ईश्वरीय कुळामध्ये येऊ शकणार नाहीत,परंतु सर्वांचे पिता असल्यामुळे त्यांच्याशी योग लाभल्यामुळे पवित्र अवश्य बनतील.या पवित्रते मुळेच आपल्या धर्मामध्ये पण अवश्य चांगले पद मिळवतील,कारण योगाला तर सर्व मनुष्य आत्मा मानतातच.अनेक मनुष्य असे म्हणतात,आम्हाला मुक्ती पाहिजे,परंतु सजा पासून मुक्त होण्याची शक्ती पण,या योगा द्वारेच मिळू शकते.

अजपाजाप म्हणजेच निरंतर ईश्वरी आठवण.

हे जे मन आहे,श्वासो श्वास जप करत रहा,याचा अर्थ काय आहे? जेव्हा आम्ही म्हणतो,अजपाजाप तर याचा अर्थ आहे,जपा शिवाय श्वासोश्वास,आपला बुद्धी योग आपल्या परमपिता परमात्माच्या सोबत निरंतर लावणे आणि ही ईश्वरीय आठवण,श्वोस श्वास चालत येते.त्या निरंतर ईश्वरीय आठवणी ला अजपाजाप म्हणतात.बाकी काही मुखाद्वारे जप करणे,म्हणजे राम राम म्हणने,मनामध्ये कोणता मंत्र उच्चारण करणे,हे तर निरंतर चालू शकत नाही.ते लोक समजतात,आम्ही मुखाद्वारे मंत्र उच्चारण करत नाही,परंतु मनामध्ये उच्चारण करणे,हे आहे अजपाजाप. परंतु हे तर सहज विचार करण्याची गोष्ट आहे,जेथे आपला शब्दच अजपाजाप आहे,ज्याला जपण्याची पण आवश्यकता नाही.मनामध्ये मूर्तीचे ध्यान पण करायचे नाही, न काही स्मरण करायचे आहे,कारण ते पण निरंतर खाता-पिता राहू शकत नाहीत.परंतु आम्ही जी ईश्वरीय आठवण करतो,ती निरंतर राहू शकते कारण की खूप सहज आहे.जसे समजा मुलगा आहे, आपल्या पित्याची आठवण करतो, तर त्या वेळेत त्याचा फोटो समोर घ्यावा लागत नाही,परंतु मनसा वाचा कर्मणा,पित्याचे कर्तव्य

व गुणांसह आठवण येते,बस.ती आठवण आल्यामुळे मुलांचे पण ते कार्य चालत राहते.तेव्हाच म्हणतात मुलगा वडिलांना प्रत्यक्ष करतो. तसेच स्वतः पण सर्वांची आठवण मनापासून काढून टाकणे आणि त्या एकाच खऱ्या पारलौकिक परमपिता परमात्माच्या आठवणी मध्ये राहणे,यामध्ये उठता-बसता,खाता-पिता निरंतर आठवणी मध्ये राहू शकतात.त्या आठवणीद्वारेच कर्मातीत बनतात.या सहज आठवणीलाच अजपाजाप म्हणतात. अच्छा.