07-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,वाईट ऐकू नका,एका बाबा द्वारे ऐकायचे आहे,ग्रहस्थ व्यवहार मध्ये राहत,कमल फुलासारखे राहयचे आहे"

प्रश्न:-
कोणत्या खेळाला अर्थसहित जाणल्यामुळे तुम्ही मुलं संभ्रमित होऊ शकत नाहीत?

उत्तर:-
दुःख आणि सुख, भक्ती आणि ज्ञानाचा जो खेळ चालतो, याला अर्थसहित जाणल्यामुळे कधी गोंधळून जाणार नाहीत.तुम्ही जाणतात,भगवान कोणालाही दुःख देत नाहीत,ते दुखहर्ता सुखकर्ता आहेत.जेव्हा सर्व दुःखी होतात,तेव्हा दुःखापासून मुक्त करण्यासाठी ते येतात.

गीत:-
कोण आले आज सकाळी- सकाळी,माझ्या मनाच्या द्वारे.

ओम शांती।
मुलांनी काय ऐकले? भक्तीला इंग्रजीमध्ये तत्त्वज्ञान म्हणतात.तत्वज्ञानाचे डॉक्टर अशी पदवी मिळते.आत्ता तत्वज्ञान(भक्ती) तर लहान-मोठे सर्व मनुष्य जाणतात.कोणालाही विचारा ईश्वर कुठे राहतात,तर म्हणतील सर्वव्यापी आहेत.हे पण तत्वज्ञान झाले ना. आता ग्रंथामधील कोणतीही गोष्ट बाबा ऐकवत नाहीत.कोणत्याही भक्ताला ज्ञानसागर म्हटले जात नाही,न त्यांच्यामध्ये ज्ञान आहे,न ज्ञान सागराचे मुलं आहेत.ज्ञान सागर बाबांना कोणी जाणत नाहीत,ना स्वतःला मुलं समजतात.ते सर्व भक्ती करतात,भगवंताला भेटण्यासाठी, परंतु भगवंताला जाणत नाहीत,तर भक्तीने काय फायदा होईल. अनेकांना तत्वज्ञानाचे डॉक्टर ही पदवी मिळते.त्यांच्या बुद्धीमध्ये एकच गोष्ट असते की, ईश्वर सर्वव्यापी आहेत.त्याला तत्वज्ञान समजतात,त्यामुळेच खाली उतरत आले आहेत,याला धर्माची ग्लानी म्हटले जाते.आम्ही कोणत्याही मनुष्य बरोबर ग्रंथांमधील गोष्टीशी वादविवाद करू शकत नाहीत.आम्ही काही मनुष्या पासून शिकलेलो नाही,बाकी सर्व मनुष्य,मनुष्यपासून शिकले आहेत.वेद ग्रंथ इत्यादी सर्व मनुष्या द्वारे शिकत आहेत.हे सर्व मनुष्यांनीच बनवले आहेत.तुम्हाला हे ज्ञान ऐकणारे तर,एकच आत्मिक पिता आहेत,ते एकाच वेळेत येऊन समजवतात.आता तुम्हाला कोणत्याही मनुष्या पासून शिकायचे नाही.तुम्हाला आत्ता अध्यात्मिक पित्याचे ज्ञान आहे,ते मनुष्याचे ज्ञान आहे.हे ब्रह्मा बाबा पण मनुष्य आहेत.तुम्ही सांगा,आत्मिक पिता यांच्याद्वारे ऐकवत आहेत,आम्ही आत्मा ऐकतो.आम्ही आत्मा परत शरीराद्वारे दुसऱ्यांना ऐकवतो.हे आत्मिक ज्ञान आहे,बाकी सर्व शारीरिक ज्ञान आहे.भक्तीमधे पण शरीराची पूजा करतात.बाबा म्हणतात,तुम्ही स्वतःला मनुष्य किंवा भक्त समजू नका,स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहात. गायन पण आहे,आत्मा परमात्मा वेगळे राहिले बहूकाळ.आता आम्हाला कोणत्याही मनुष्या पासून ऐकायचे नाही.कोणी प्रश्न विचारले तर सांगा,आमचं काही ग्रंथांचे ज्ञान नाही.आम्ही त्याला तत्त्वज्ञान म्हणतो म्हणजे भक्तिमार्गाचे ज्ञान आहे. सद्गती देणारे ज्ञान फक्त एक शि्वपिताच देतात.सर्वांचे सद्गती दाता,एकाचे गायन केले आहे.तर तुम्हा मुलांना,कोणाशी वाद-विवाद करायचं नाही.

बाबाच ज्ञानाचे अधिकारी,ज्ञानसागर बीज आहे.मी तुम्हाला कोणते ग्रंथ, इत्यादी ऐकवत नाहीत.आमचे आत्मिक ज्ञान आहे. बाकी सर्व शारीरिक ज्ञान आहे.ते सत्संग इत्यादी सर्व भक्तिमार्ग साठी आहेत. हे आत्मिक पिता,आत्मिक मुलांना समजवतात,म्हणून देह अभिमानी बनण्यामध्ये मुलांना कष्ट लागतात.आम्ही आत्मे बाबा पासून वारसा घेत आहोत.बाबांची मुलं जरूर पित्याच्या गादीचे वारस बनतील ना.लक्ष्मीनारायण देहधारी आहेत,त्यांची मुलं शारीरिक पित्यापासून वारसा घेतात.या गोष्टी वेगळ्या आहेत.सतयुगा मध्ये पण शारीरिक गोष्टी होतात.तेथे हे म्हणू शकणार नाहीत की,आत्मिक पित्याकडून वारसा मिळाला आहे. देहाभिमानाला नष्ट करायचे आहे. आम्ही आत्मा आहोत आणि बाबांची आठवण करायची आहे.याच भारताच्या प्राचीन योगाचे गायन केलेले आहे.याद(आठवण) अक्षर हिंदीचे आहे.तर हे ज्ञान तुम्हाला आत्ता कोण देत आहेत,हे कोणी मनुष्य जाणत नाहीत.जन्म-जन्मांतर मनुष्य, मनुष्यांशी गोष्टी करत आले आहेत.आता आत्मिक पिता, आत्मिक मुलांशी गोष्टी करतात. परम आत्मा ऐकवतात,म्हणून याला आत्मिक अध्यात्मिक ज्ञान म्हटले जाते.गीतेला पण ते अध्यात्मिक ज्ञान समजतात परंतु त्यामध्ये नाव कृष्ण देहधारीचे नाव लिहले आहे.बाबा म्हणतात, कोणत्याही मनुष्या मध्ये,हे ज्ञान होऊ शकत नाही.कधी तुमच्याशी कोणी वाद-विवाद करतात,तर बोला हे तुमचे भक्तिमार्गाचे ज्ञान आहे. मनुष्यांनी बनवलेले,हे ग्रंथा मधील ज्ञान आहे.सत्य ज्ञान ज्ञानसागर बाबांच्या जवळच आहे,ते स्वतः ज्ञान देत आहेत,त्यांना सर्वोच्च पिता म्हणतात.पुजा पण त्या निराकारची होते.मातीचे शाळीग्राम बनवून पूजा करतात,रुद्र यज्ञाची स्थापना करतात.तुम्ही जाणतात,ते परमपिता परमात्मा निराकारी दुनिया मध्ये राहतात.आम्ही आत्मे पण तिथेच राहतो,ते ज्ञानाचे सागर येऊन ज्ञान देऊन सर्वांचे सद्गती करतात.ते परे ते परे राहणारे,परमपिता परमात्मा आहेत.सर्व आत्म्यांना भावाची भूमिका मिळालेली आहे.जे परत शरीर धारण करून भाऊ-बहीण बनतात.आत्मा सर्व एक पित्याची मुलं आहेत.आत्मा जेव्हा शरीर धारण करते,तर स्वर्गामध्ये सुख, नरकामध्ये दुःख मिळते.हे का होते, समजावले जाते ज्ञान आणि भक्ती. तो दिवस आहे आणि ती रात्र आहे. ज्ञानाद्वारे सुख,भक्ती द्वारे दुःख हा खेळ बनलेला आहे.असे नाही की दुःख सुख सर्व भगवानच देतात. भगवंताला बोलवतात,जेव्हा दुःखी असतात.असे समजतात,ते सुख देणारे आहेत.जेव्हा सुखाचा वेळ पूर्ण होतो,परत रावण पाच विकारामुळे दुःख सुरू होते.हा खेळ आहे,ज्याला अर्थ सहित समजायचे आहे,यालाच आत्मज्ञान म्हटले जाते. बाकी सर्व शारीरिक ज्ञान आहे,ते आम्ही ऐकू इच्छित नाही.आम्हाला आदेश मिळाला आहे,फक्त निराकार पित्याचे ऐका.बाबा म्हणतात,वाईट ऐकू नका.आम्ही एका भगवंता द्वारे ऐकतो.तुम्ही मनुष्य द्वारा ऐकत आहात,रात्रंदिवसाचा फरक आहे. मोठ-मोठे विद्वान, ग्रंथ इत्यादी वाचतात,ते तर आम्ही खूप वाचले आहेत.आता भगवान म्हणतात, तुम्ही खूप गुरु केले,आता त्यांना सोडा,मी जे ऐकवतो,ते ऐका. भगवंत निराकार आहेत,त्यांचे नाव शिव आहे.आता आम्ही त्यांच्याद्वारे ऐकत आहोत.बाबा स्वत आपला परिचय आणि आपल्या रचनेच्या आदी मध्य अंतचा परिचय देतात. परत आम्ही आपल्याकडून ग्रंथ इत्यादीच्या गोष्टी का ऐकू?आम्ही आपल्याला आत्मिक ज्ञान एकवतो, ऐकायचे असेल तर ऐका.यामध्ये संभ्रमित किंवा गोंधळून जाण्याची गोष्टच नाही.सर्व दुनिया एकीकडे आणि तुम्ही किती थोडे आहात. बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर तुमच्यावरती जे पापाचे ओझे आहे,ते उतरेल आणि तुम्ही पवित्र बनाल.जे पवित्र बनतील, तेच पवित्र दुनिया चे मालक बनतील.आता जुनी दुनिया बदलणार आहे, कलियुगाच्या नंतर सतयुग येणार आहे,सतयुग पावन दुनिया आहे. कलियुगामध्ये मला बोलतात,येवून पावन दुनिया बनवा,तर मी आलो आहे,तर माझीच आठवण करा.आत्ता दुनिया बदलत आहे.हा अंतिम जन्म आहे.या जुन्या दुनिये मधील आसुरी राज्य नष्ट होऊन,राम राज्य स्थापन होत आहे,म्हणून आता अंतिम जन्मामध्ये ग्रहस्थ व्यवहारात राहत कमलफुल समान पवित्र बना. हा विषय सागर आहे ना.कमळ फुल पाण्याच्या वरती राहते.तर आता तुम्हाला ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत कमळ फुलासारखे पवित्र बनायचे आहे.तुम्ही मुलं जाणता आम्ही राजाई स्थापन करत आहोत.आता सर्व दुनिया बदलत आहे.ते धर्म स्थापक फक्त आपापले धर्म स्थापन करतात.प्रथम ते पावन असतात, परत पतित बनतात.सद्गुरु तर एकच सद्गती दाता आहेत.मनुष्य गुरु करतात तेव्हाच,जेव्हा सद्गती मध्ये जाऊ इच्छितात.जेव्हा पाप खुप होतात,तेव्हा आत्मिक पिता येऊन ज्ञान ऐकवतात.भक्तीचे फळ ज्ञान, तुम्हाला भगवंता कडून मिळते. भगवान काही भक्ती शिकवत नाहीत,ते तर ज्ञान देतात.ते म्हणतात माझीच आठवण करा,तर तुमचे विकर्म विनाश होतील,दुसरा कोणता,पावन बनण्याचा रस्ता नाही. नवीन दुनियेमध्ये सर्व स्वर्गवासी होते,आता जुन्या दुनियेमध्ये सर्व नर्कवासी आहेत,म्हणून बाबा म्हणतात,मी सर्वांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे.मीच येऊन आत्मज्ञान देतो.बाबा आपला परिचय देतात,मी तुमचा पिता आहे.आता ही दुनिया नर्क आहे.नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते.असे कसे म्हणू शकतो की,येथेच स्वर्ग आणि नर्क आहे.ज्यांच्याकडे खूप धन आहे,ते स्वर्गामध्ये आहेत.स्वर्ग तर नवीन दुनियेत असतो,येथे स्वर्ग कुठून आला,म्हणून आम्ही कोणत्या मनुष्याच्या गोष्टी ऐकत नाहीत.तर तुम्हाला तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे,तर माझीच आठवण करा.सर्व दिवस बुद्धीमध्ये ज्ञान राहिले पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) एक शिव पित्याकडूनच आत्मिक गोष्टी ऐकायच्या आहेत.कोणाशीही दुसऱ्या गोष्टीबाबत वाद-विवाद करायचा नाही.

(२) देहीअभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.सतोप्रधान बनण्यासाठी एक शिव पित्याच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
बाबांचा हात आणि साथ,या स्मृती द्वारे कठीणला सहज बनवणारे बेफिक्र किंवा निश्चिंत भव.

कोणत्या मोठ्या मनुष्याच्या हातामध्ये हात असतो,तर स्थिती बेफिक्र किंवा निश्चिंत राहते.तसे प्रत्येक कर्मामध्ये हे समजले पाहिजे की, बापदादा माझ्यासोबत आहेत आणि आमच्या अलौकिक जीवनाचा हात त्यांच्या हातामध्ये आहे,म्हणजेच जीवन त्यांच्या हवाली आहे,तर त्यांची जबाबदारी होते.सर्व ओझे बाबांच्या वरती ठेवून,स्वतःला हलके करा.ओझे उतरण्याचा किंवा कठीणला सहज बनवण्याचे साधन आहे बाबांचा हात आणि साथ.

बोधवाक्य:-
पुरुषार्था मध्ये जर खरे पणा आहे,तर बापदादांच्या जास्त मदतीचा अनुभव कराल.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य - " ज्ञान योग आणि दैवी गुणांची धारणाच , जीवनाचा आधार आहे "
हा तर स्वतःला निश्चय आहे की, परमपिता परमात्मा द्वारे आम्हाला ज्ञान मिळत आहे.या ज्ञानामध्ये मुख्य तीन मुद्दे आहेत,ज्यासाठीआपल्याला पूर्ण पुरुषार्थ करण्याचे लक्ष ठेवायचे आहे.ज्यामध्ये प्रथम योग किंवा ईश्वरीय निरंतर आठवण आहे, ज्याद्वारे विकर्माचा विनाश होतो. दुसरे आहे ज्ञान,म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांड,सृष्टीचा आदी मध्य अंत कसा होतो,जेव्हा हे ज्ञान होते,तेव्हा या जीवनात प्रत्यक्षामध्ये परिवर्तन घडून येते आणि आम्ही भविष्य प्रारब्ध चांगल्या प्रकारे बनवू शकतो. तिसरा मुद्दा आहे शिक्षण,तर आम्हाला सर्व गुण संपन्न १६ कला संपून अवश्य बनायचे आहे,त्यामुळे देवता बनू शकतो.तर स्वतःला चालता-फिरता, खाता-पिता या तीन गोष्टींवर लक्ष जरूर द्यायचे आहे.या एका जन्मामध्ये ज्ञानबळ, योगबळ आणि दैवी गुणांची धारणा होते.तर तिन्ही गोष्टीचा आपसामध्ये संबंध आहे.ज्ञानाशिवाय योग लागू शकत नाही आणि योगा शिवाय दैवी गुणांची धारणा होत नाही.या तिन्ही गोष्टीवरती सर्व जीवनाचा आधार आहे,तेव्हाच विकर्माचे खाते नष्ट होऊन चांगले कर्म बनतील.यालाच ईश्वरीय जीवन म्हटले जाते.

(२) "भारताचा प्राचीन योग, परमात्मा द्वारे शिकवला आहे" आपला हा ईश्वरीय योग भारतामध्ये प्राचीन योगाच्या नावाने प्रसिद्ध आहे.या योगाला अविनाशी योग का समजतात,कारण अविनाशी परमपिता परमात्मा द्वारे शिकवला गेलेला आहे.जरी योग दुसरे मनुष्य आत्मे पण शिकवतात म्हणून योगाश्रम वगैरे उघडत राहतात परंतु तो प्राचीन योग शिकवू शकत नाहीत.जर असा योग असता, तर परत ते बळ कुठे आहे? भारत तर दिवसेंदिवस निर्बल होत जात आहे, याद्वारे सिद्ध होते की तो योग अविनाश योग नाही.बाकी दुसऱ्या सोबत योग लावायचा च नाही,तर परत कसे शिकवतील?हे तर स्वतः परमात्माच कार्य करू शकतात.तेच आम्हाला पूर्ण रहस्य सांगू शकतात. बाकी तर चहूबाजूला म्हणत राहतात,आम्ही योग शिकवू.हे तर आम्हीच जाणतो,खरा योग तर परमात्माच शिकवून,सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्याची किंवा दैवी राज्याची स्थापन करतात.आता तो प्राचीन योग परमात्माच येऊन कल्प कल्प आम्हाला शिकवतात.ते म्हणतात,मज परमात्म्याच्या सोबत निरंतर योग लावा,तर तुमचे पाप नष्ट होतील,अच्छा.