07-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो बाबा आले आहेत,तुम्हाला आत्मिक कला शिकवण्यासाठी,ज्या कलेद्वारे तुम्ही सूर्य चंद्रा पेक्षा पण दूर, शांतीधाम मध्ये जाऊ शकतात."

प्रश्न:-
विज्ञानाचा अहंकार आणि शांतीच्या अहंकारांमध्ये कोणते अंतर आहे?

उत्तर:-
विज्ञान घमंडी किंवा अहंकारी चंद्र ताऱ्यां वरती जाण्यासाठी खूप खर्च करतात,आपल्या जिवाची पर्वा न करता जातात.त्यांना हे भय राहते रॉकेट कुठे बंद पडायला नको.तुम्ही मुलं विज्ञानाच्या मदती शिवाय,काही न खर्च करता, सूर्य चंद्रा पेक्षा पण दूर मूळ वतन मध्ये चालले जातात. तुम्हाला कोणतेच भय नाही, कारण तुम्ही शरीराला येथेच सोडून जातात.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना सन्मुख समजावत आहेत. मुलं ऐकत राहतात की, वैज्ञानिक चंद्रावरती जाण्यासाठी प्रयत्न करत राहतात.ते लोक फक्त चंद्रापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतात,त्यासाठी खूप खर्च करत राहतात, वरती जाण्यासाठी खूप घाबरतात पण.आता तुम्ही मुलं विचार करा,तुम्ही कुठले राहणारे आहात,ते तर चंद्रावरती जातात,तुम्ही तर सूर्य चंद्रा पेक्षा पण दूर जातात,एकदम मूळ वतन मध्ये जातात.ते लोक चंद्रावरती जातात,तर त्यांना खूप पैसे मिळतात, वरती चक्र लावून आल्यानंतर त्यांना लाखो रुपयाचे बक्षीस मिळतात.शरीराची पर्वा न करता जातात.ते आहेत विज्ञानाचे अहंकारी,विज्ञानाचे घमंडी, तुमच्याजवळ आहे शांतीचा शुद्ध अहंकार.तुम्ही जाणता आम्ही आत्मा आपल्या शांतीधाम ब्रह्मांड मध्ये जातो.आत्मच सर्वकाही करते,त्यांची आत्मा शरीरासोबत वरती जाते.खूप भयंकर आहे, घाबरतात पण,वरतून खाली पडले तर शरीर नष्ट होऊन जाईल.ती सर्व आहे शारीरिक कला,तुम्हाला तर बाबा आत्मिक कला शिकवतात.ही कला शिकल्यामुळे,तुम्हाला खूप मोठे बक्षीस मिळते,ते पण २१ जन्माचे बक्षीस मिळते,परंतु नंबरा नुसार पुरुषार्थ प्रमाणे मिळत राहते.आज-काल शासन पण लॉटरी काढते,येथे बाबा पण तुम्हाला बक्षीस देतात,आणखी काय शिकवतात?तुम्हाला खूपच वरती घेऊन जातात,जिथे तुमचे घर आहे.आता तुम्हाला आठवण येते की आमचे घर कोठे आहे? आणि राजधानी जी गमावली होती ती कोठे आहे? रावणाने सर्व हिरावून घेतले,आता परत आम्ही आपल्या मूळ घरी जात आहोत आणि परत राज्य पण मिळेल.मुक्तिधाम आपले घर आहे, हे कोणालाच माहिती नाही.आता तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी,पहा बाबा कोठून येतात,खूप दूरवरून येतात.आत्मा पण रॉकेट आहे ना.खुप प्रयत्न करत राहतात,चंद्रावर जाऊन पाहू,तेथे काय आहे,ताऱ्यांमध्ये काय आहे.तुम्ही मुलं जाणता हे सूर्य,चंद्र,तारे तर या पृथ्वीला लाईट देणारे आहेत. मंडप मध्ये लाईट लावतात,संग्रहालयामध्ये पण तुम्ही मुलं लाईट लावत राहतात.ही परत बेहदची दुनिया आहे,यामध्ये सूर्य-चंद्र तारे प्रकाश देणारे आहेत.मनुष्य परत समजतात,सूर्य, चंद्र, देवता आहेत परंतु वास्तव मध्ये हे देवता नाहीत.आता तुम्ही समजता बाबा कसे येऊन आम्हाला मनुष्या पासून देवता बनवतात.ज्ञान सूर्य,ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान भाग्यशाली तारे आहेत.ज्ञानाद्वारे तुम्हा मुलांची सद्गगती होत आहे.तुम्ही खूप दूर जातात.बाबानी तुम्हाला घराचा रस्ता दाखवला आहे.बाबांच्या शिवाय परत आपल्या घरी कोणीही घेऊन जाऊ शकत नाही.बाबा जेव्हा येऊन शिक्षा देतात तेव्हाच तुम्ही जाणतात.हे पण समजतात आम्ही आत्मा पवित्र बनू तेव्हाच आपल्या घरी जाऊ शकू,परत योग बळाने किंवा सजा च्या द्वारे पावन बना. जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे तुम्ही पावन बनाल.आठवण करणार नाहीत,तर पतितच राहून जाल,परत खूप सजा खावी लागेल आणि पद पण भ्रष्ट होईल.बाबा तुम्हाला खूपच चांगल्या रीतीने सन्मुख समजावत राहतात,तुम्ही अशा प्रकारे घरी जाऊ शकता.ब्रह्मांड काय आहे,सूक्ष्म वतन काय आहे,काहीच माहिती नाही.विद्यार्थी अगोदर थोडेच काही जाणतात,जेव्हा शिकणे सुरू करतात, तेव्हाच ज्ञान मिळते.ज्ञान पण कोणते लहान, कोणते मोठे असते.भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पास केली तर म्हणतात ज्ञानसंपन्न आहेत,या पेक्षा श्रेष्ठ ज्ञान, दुसरे कोणते नसते. आता तुम्ही मुलं,श्रेष्ठ ज्ञान घेत आहात.बाबा तुम्हाला पवित्र बनवण्याची युक्ती सांगतात,मुलांनो माझीच आठवण करा, तर तुम्ही पतिता पासून पावन बनाल.वास्तव मध्ये तुम्ही आत्मे पावन होते,परमधाम मध्ये,आपल्या घरी राहणारे होते.जेव्हा तुम्ही सतयुगा मध्ये पावन होते जीवनमुक्त अवस्थेमध्ये होते, बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये राहत होते.मुक्ती आणि जीवनमुक्ती दोघांनाही शिवालय म्हणू शकता.मुक्तीधाम मध्ये शिवबाबा राहतात.आम्ही मुलं,आत्मे तेथेच राहतो.हे आत्मिक सर्वोच्च ज्ञान आहे.ते म्हणतात आम्ही चंद्रावरती जाऊन राहू,खूपच प्रयत्न करत राहतात,बहादूरी दाखवतात,लाखो किलोमीटर वरती जातात परंतु त्यांची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमची इच्छा पूर्ण होते.त्यांचे शारीरिक घमंड आहे,तुमचे आहे शुद्ध आत्मिक घमंड.ते मायेची खूप बहादुरी दाखवतात,मनुष्य खूप प्रतिसाद देतात,अभिनंदन करतात.मिळते पण खूप,पाच दहा कोटी मिळतील.तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की,त्यांना हे जे पैसे मिळतात,ते सर्व नष्ट होऊन जातील,बाकी थोडे दिवसच आहेत.हे समजून घ्या,आज काय आहे,उद्या काय असेल.आज तुम्ही नर्कवासी आहात,उद्या तुम्ही स्वर्गवासी बनाल,वेळ काय खुप लागत नाही.त्यांची आहे शारीरिक शक्ती,तुमची आहे आत्मिक शक्ती,हे फक्त तुम्हीच जाणतात. शारीरिक शक्तीद्वारे चंद्र-ताऱ्यां पर्यंत पोहचतात आणि लढाई सुरू होईल,परत सर्व नष्ट होऊन जाईल,त्यांची ही कला येथेच नष्ट होऊन जाईल.ते आहे शारीरिक शक्तीचे शिखर,तुमचे हे आत्मिक कलेचे शिखर.तुम्ही शांतीधाम मध्ये जातात,त्याचे नाव गोड घर,स्वीट होम आहे.ते लोक खूप दूर जातात आणि तुम्ही आपला हिशोब करा तुम्ही किती किलोमीटर वरती जातात.तुम्ही कोण आहात,आत्मे आहात.बाबा म्हणतात मी किती किलोमीटर वरती राहतो,मोजू शकत नाहीत. त्यांच्याजवळ तर मोजण्याचे साधन आहेत, सांगतात इतक्या किलोमीटर वरती गेले, परत येतात पण,खूप खबरदारी घेतात,असे उतरु, हे करू,त्यांचा खूप आवाज होतो,प्रसिद्धी मिळते. तुमचा कोणता आवाज आहे,किती प्रसिद्धी मिळते, तुम्ही कुठे जातात आणि परत कसे येतात,हे कोणालाच माहिती नाही.तुम्हाला कोणते बक्षीस मिळते,ते तुम्हीच जाणतात,आश्चर्यकारक आहे. बाबांची पण कमाल आहे,कोणालाच माहिती नाही. तुम्ही तर म्हणाल या नवीन गोष्टी थोड्याच आहेत, प्रत्येक ५००० वर्षानंतर आम्ही हा अभ्यास करत राहू. तुम्ही या सृष्टी रुपी नाटकाच्या आदि मध्यं अंतच्या कालावधीला चांगल्या रीतीने जाणतात,तर तुम्हाला मनामध्ये आनंद व्हायला पाहिजे.बाबा आम्हाला खूपच श्रेष्ठ ज्ञान शिकवत आहेत.खूप उच्च पुरुषार्थ करवत राहतात. या सर्व गोष्टी दुसरे कोणीच जाणत नाहीत बाबा पण गुप्त आहेत तुम्हाला किती दिवसापासून समजवत आहेत. तुम्हाला ज्ञान देत आहेत.ते सूर्य चंद्रावरती काही सीमित भागापर्यंत जातात, तुम्ही तर बेहद मध्ये जातात.ते चंद्रावरती जातात,ते तर प्रकाश देणारे आहेत,बाकी तेथे काहीच नाही. चंद्रावरून पृथ्वी फारच छोटी दिसून येते,तर त्यांचे शारीरिक ज्ञान आणि तुमच्या आत्मिक ज्ञानामध्ये खूपच फरक आहे.आत्मा खूप सूक्ष्म आहे परंतु रॉकेट तर फार मोठे आहे.आत्मे वरती राहतात, परत येथे अभिनय करण्यासाठी येतात.बाबा सुप्रीम आत्मा आहेत, परंतु त्यांची पूजा कशी होईल,भक्ती पण जरूर होणार आहे.

बाबांनी समजवले आहे,अर्धाकल्प ज्ञान दिवस आणि अर्धाकल्प भक्ती रात्र आहे.आता संगम युगामध्दे तुम्ही,हे ज्ञान घेत आहात.सतयुगा मध्ये हे ज्ञान नसते,म्हणून याला पुरुषोत्तम संगम युग म्हणले जाते.सर्वांना पुरुषोत्तम बनवतात,तुमची आत्मा खूपच दूर दूर जाते.तुम्हाला खुशी आहे ना. कला दाखवतात तर त्यांना खुप पैसे मिळतात, जरी कितीही पैसे मिळाले परंतु तुम्ही समजता ते काही बरोबर येणार नाहीत.आत्ता मृत्यू झाला की झाला.सर्व नष्ट होणार आहे.आत्ता तुम्हाला ज्ञानाचे अनमोल रत्न मिळत आहेत,यांची किंमत कोणी काढू शकत नाही.लाखो रुपयाचे एक एक महावाक्य आहेत,किती वर्षापासून तुम्ही हे अनमोल रत्न ऐकत आले आहात.गीते मध्ये पण खूपच मूल्यवान ज्ञान आहे.ही एकच गिता आहे, ज्याला खूपच मूल्यवान म्हणतात,सर्वशास्त्रमई शिरोमणी श्रीमत भगवद्गीताच आहे.ते लोक जरी याचा अभ्यास करतात परंतु खरा अर्थ थोडेच समजतात.गीतेचा अभ्यास केल्याने काय होईल, आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनालं.जरी ते गीता वाचतात परंतु एकाचा ही योग बाबांशी नाही.पित्यालाच सर्वव्यापी म्हणतात.पावन पण बनू शकत नाहीत.आत्ता या लक्ष्मीनारायण चे चित्र तुमच्यासमोर आहे,यांना देवता म्हटले जाते,कारण त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत.तुम्हा सर्व आत्म्यांना पवित्र बणुन,आपल्या घरी जायचे आहे.नवीन दुनियेमध्ये इतके मनुष्य नसतात,बाकी सर्व आत्म्यांना आपल्या घरी जावे लागेल.तुम्हाला बाबा हे आश्चर्यकारक ज्ञान देत आहेत,ज्यामुळे तुम्ही मनुष्यापासून देवता,खूपच श्रेष्ठ बनतात,तर अशा अभ्यासावरती खूपच लक्ष द्यायला पाहिजे.हे पण समजतात ज्यांनी कल्पा पूर्वी जितके लक्ष दिले आहे,तेवढेच देतील.माहिती होत राहते.बाबा सेवेचा समाचार ऐकून खुश होतात.बाबांना कधी पत्र लिहीत नाहीत तर समजतात त्यांचा बुद्धी योग दगडा मातीमध्ये लागलेला आहे,देहअभिमाना मध्ये आहेत आणि बाबांना विसरले आहे. कुणाकुणाचे विचार बदलतात, तर पत्नीला पण मारून टाकततत. बाबासोबत तुमचे लव मॅरेज आहे,बाबा येऊन तुम्हाला आपला परिचय देतात,तुम्ही स्वतःहून परिचय प्राप्त करत नाहीत,बाबांना यावे लागते. बाबा येतातच तेव्हा,जेव्हा दुनिया जुनी होते. तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात,तर अशा बाबांच्या सोबत खूपच प्रेम पाहिजे.परत तुम्ही असे का म्हणतात,बाबा मी विसरुन जातो.बाबा सर्वोच्च आहेत,यांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणी होऊ शकत नाही. मुक्तीसाठी मनुष्य खूप माथा मारतात,अनेक उपाय करतात अनेक ठिकाणी फसतात,खोटे चालत राहते.महर्षी इत्यादीचे नाव खूप प्रसिद्ध आहे. शासन दहा वीस एकर जमीन पण देते.असे पण नाही की,शासन काही धार्मिक आहे.त्यांच्यामध्ये काही मंत्री धार्मिक आहेत,तर काही अधार्मिक आहेत.कोणी धर्माला मानत पण नाहीत.धर्मामध्ये शक्ती आहे असे म्हणले जाते.क्रिश्चन मध्ये पण शक्ती होती ना,साऱ्या भारताला हप करून गेले, आता भारतामध्ये काहीच शक्ती राहिली नाही. खूपच लढाई भांडण करत राहतात,तोच भारत पूर्वी काय होता? बाबा कसे,कुठे येतात कुणालाच माहिती नाही. तुम्ही जाणतात मगध देशांमध्ये येतात,जिथे मगर मासे इत्यादी असतात.मनुष्य असे बनले आहेत जे सर्व काही खात राहतात. सर्वात जास्त वैष्णव पण भारतच होता.हे वैष्णव राज्य आहे ना.कुठे महान पवित्र देवता,कुठे आजकालचे मनुष्य,काय काय करत राहतात. भारताचे काय हाल झाले आहेत पहा.आता तुम्हाला सर्व रहस्य समजवत आहेत,सतयुगा पासुन कलियुगा पर्यंत,संपूर्ण ज्ञान बाबा देत आहेत प्रथम तुम्हीच पृथ्वी वर होते,परत मनुष्य वृद्धी होत गेले. आता थोड्या दिवसात हाहाकार होईल,परत हाय हाय करत राहतील.स्वर्गा मध्ये किती सुख असते. जे मुख्य लक्ष आहे त्याला पहा.या सर्व गोष्टीची मुलांनी धारणा पण करायची आहे.खूपच उच्च शिक्षण आहे.बाबा स्पष्ट करून समजवत राहतात. माळेचे पण रहस्य समजले आहे,वरती फुल शिवबाबा आहेत,परत मेरु प्रवृत्ती मार्ग आहे ना. निवृत्ती मार्गा साठी तर माळा जपण्याचा हुकूम नाही. ही देवतांची माळ आहे.त्यांनी कसे राज्य घेतले, तुमच्यामध्ये पण नंबरा नुसार आहेत. कोणी कोणी तर बेधडक होऊन कोणालाही समजावून सांगतात, या तुम्हाला अशी गोष्ट सांगतो,जी दुसरे कोणी सांगू शकत नाहीत.शिवबाबा शिवाय दुसरे कोणी जाणत नाहीत.ंत्यांना हा राजयोग कोणी शिकववाला?खूपच गोड भाषेत समजावून सांगायला पाहिजे.देवता ८४ जन्म कसे घेतात, परत क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी बनतात.बाबा खूपच सहज सांगतात परत पवित्र पण बनवायचे आहे,तेव्हाच उच्च पद मिळू शकेल.साऱ्या विश्वावरती शांती स्थापन करणारे तुम्हीच आहात. बाबा तुम्हाला राज्य भाग्य देत आहेत ना. ते काहीच घेत नाहीत, तुमच्या शिक्षणाचे हे बक्षीस आहे,असे बक्षीस दुसरे कोणी देऊ शकत नाहीत. तर अशा बाबांची का प्रेमाने आठवण करायची नाही.शारीरिक पित्याला तर जन्मभर आठवण करत आले,पारलौकिक पित्याची का आठवण करायची नाही.बाबा स्पष्ट करतात हे युद्धाचे मैदान आहे.पावन बनण्यासाठी वेळ लागतो,इतका वेळ लागतो तो पर्यंत लढाई पूर्ण होईल.असे नाही सुरुवातीला जे आले आहेत,ते पूर्ण पावन बनले असतील. बाबा म्हणतात मायेची लढाई खूपच जोरात चालत राहते,चांगल्या चांगल्या मुलांना हारवते, इतकी बलवान आहे.जे विकारात जातात, ते परत मुरली कसे ऐकू शकतील.सेवा केंद्रामध्ये येतच नाहीत, तर त्यांना कशी माहिती होईल.माया एकदमच कवडी तुल्य बनवते.मुरली जेव्हा वाचतील तेव्हाच सुजाग होतील.खराब कामांमध्ये लागून जातात,कोणी समजदार मुलगा असेल तर, अशा मुलांना समजून सांगेल.तुम्ही मायेशी हार खाल्ली आहे,बाबा तुम्हाला काय बनवतात,परत तुम्ही कुठे जात आहात.माया यांना खात आहे पाहतात, तर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.कुठे माया चांगल्या रीतीने हप करायला नको.परत सुजाग व्हायला पाहिजे,नाहीतर उच्च पद मिळणार नाही. सद्गुरुंची निंदा करत राहतात, अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबांपासून शांतीची कला शिकून या हदच्या दुनिया पासून बेहद मध्ये जायचे आहे. नशा राहायला पाहिजे बाबा आम्हाला खूपच आश्चर्यकारक ज्ञान देऊन,खूप मोठे बक्षीस देत आहेत.

(२) बेधडक होऊन खूपच चांगल्या रीतीने ज्ञान देण्याची सेवा करायची आहे. मायेच्या लढाईमध्ये बलवान बनवून विजय मिळवायचा आहे.मुरली ऐकून सुजाग व्हायचे आहे आणि सर्वांना जागृत करायचे आहे.

वरदान:-
स्वराज्याच्या संस्कारा द्वारे भविष्य राज्य अधिकार प्राप्त करणारे भाग्यवान आत्मा भव.

अनेक दिवसाचे राज्याधिकारी बनण्याचे संस्कार अनेक दिवस भविष्य राज्याधिकारी बनवतील. जर सारखे सारखे विकाराच्या वश होतात तर अधिकारी बनण्याचे संस्कार नाहीत,तर राज्य अधिकाऱ्यांच्या राज्यामध्ये येतील परंतु राज्य भाग्य प्राप्त होणार नाही.तर ज्ञानाचा आरस्या मध्ये आपल्या भाग्याचा चेहरा पहा.अनेक दिवसाच्या अभ्यासाद्वारे आपल्या विशेष सहयोगी कर्मचारी किंवा राज्य कारभारी सोबत्यांना आपल्या अधिकारा द्वारे चालवा. राजा बना तेव्हांच भाग्यवान आत्मा बनाल.

बोधवाक्य:-
सकाश देण्याची सेवा करण्यासाठी, बेहदच्या वैराग वृत्तीला स्वतःमध्ये धारण करा.