07-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , हे पावन बनण्याचे शिक्षण , सर्व शिक्षणापेक्षा श्रेष्ठ आहे , हे ज्ञान मुलं , जवान , वृध्द , सर्व घेऊ शकतात , फक्त 84 जन्मला जाणायचे आहे .

प्रश्न:-
प्रत्येक लहान किंवा मोठ्यांना कोणता अभ्यास जरूर करायला पाहिजे ?

उत्तर:-
प्रत्येकाला मुरली वाचण्याचा अभ्यास जरूर करायला पाहिजे,कारण तुम्ही मुरलीधर ची मुलं आहात,जर तुम्ही मुरली ऐकवत नाही तर,श्रेष्ठ पद मिळू शकत नाही.कोणाला ऐकवत राहाल तर अभ्यास होत राहील.प्रत्येकाला बाबा सारखे शिक्षक जरूर बनायचे आहे,जे शिकतात ते दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे.लहान मुलांना पण हा अभ्यास करण्याचा हक्क आहे.ते पण बेहदच्या बाबाकडून वारसा घेण्याचे अधिकारी आहेत.

ओम शांती।
आता शिवबाबाची जयंती येत आहे,त्यावरती कसे समजून सांगायचे?बाबांनी तुम्हाला समजवले आहे,तुम्ही परत दुसऱ्यांना समजायचे आहे.असे तर नाही,बाबा तुम्हाला शिकवतात तसे,बाबांनाच सर्वांना शिकवायचे आहे.शिवबाबानी तुम्हाला शिकवले आहे,तुम्ही जाणता या शरीराद्वारे शिकवले आहे.बरोबर आम्ही शिवबाबाची जयंती साजरी करतो.आम्ही शिवबाबाचे नाव घेतो,ते तर निराकार आहेत,त्यांना शिव म्हटले जाते.ते लोक म्हणतात शिव जन्म मृत्यू रहीत आहेत. परत त्यांची जयंती कशी होईल?हे तर तुम्ही जाणता,कसे नंबरा नुसार साजरी करतात,साजरी करत राहतील.त्यांना पण समजून सांगावं लागेल.बाबा आधार घेतात,मुख तर जरूर पाहिजे,म्हणून गोमुखा ची महिमा आहे.या रहस्य युक्त गोष्टी आहेत.शिव बाबांच्या कर्तव्याला पण समजायचे आहे.आमचे बेहदचे बाबा आले आहेत, त्यांच्याकडून आम्हाला बेहदचा वारसा मिळतं आहे.बरोबर भारताला बेहदचा वारसा मिळाला होता.दुसऱ्या कोणाला नाही.भारताला सचखंड म्हटले जाते आणि बाबांना सत्य म्हटले जाते.तर या गोष्टी समजून सांगायला लागतात परत कोणी लवकर समजतात,कोणी समजत पण नाहीत.योग आणि ज्ञान दोन्ही विसरण्याचा गोष्टी आहेत.त्यामध्ये पण योग जास्त विसरतो,ज्ञान तर बुद्धीमध्ये राहते,ते बुद्धी द्वारे समजू शकतो.प्रथम नंबर मध्ये येतात ते 84जन्म घेतात,पुर्वी पासून सत्यनारायण कथा प्रसिद्ध आहे.पौर्णिमेच्या दिवशी अनेक ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालते.आता तुम्ही जाणतात आम्ही खरोखर, बाबा द्वारे नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण घेत आहोत.हे पावन बनण्याचे ज्ञान दुसऱ्या सर्व ज्ञानापेक्षा खूपच सहज आहे.८४जन्माच्या चक्राला जाणायचे आहे.हे शिक्षण सर्वासाठी एकच आहे,वृद्ध,मुलं,जवान जे पण आहेत,सर्वांसाठी एकच शिक्षण आहे,लहान मुलांचा पण हक्क आहे.जर मात पिता त्यांना थोडे थोडे शिकवत राहतील,वेळ तर आहेच. मुलांना हे शिकवले जाते की बाबांची आठवण करा.आत्मा आणि शरीर दोघांचे पिता वेगवेगळे आहेत.आत्मा मुलगा पण निराकारी आणि त्याचा पिता पण निराकारी आहे.हे पण तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे.ते निराकार शिव बाबा आमचे पिता आहेत,किती सूक्ष्म आहेत.या गोष्टी चांगल्या रीतीने आठवण करायचे आहेत,विसरायचं नाही.आम्ही आत्मा पण बिंदू सारखे सूक्ष्म आहोत.असे नाही वरती जाऊ तर मोठी दिसायला लागेल,खालून छोटी दिसेल,नाही.ती तर बिंदी आहे.वरती जाल तर,तुम्हाला दिसू पण शकणार नाही,बिंदी आहे ना.बिंदूला तुम्ही कसे पाहणार,या गोष्टी वरती मुलांना विचार करायला पाहिजे.आम्ही आत्मा परमधाम वरून या शरीराद्वारे भूमिका घेण्यासाठी आलो आहोत.आत्मा कधीच कमी जास्त होत नाही. कर्मेंइंद्रिया प्रथम लहान असतात परत मोठ्या होतात. आता जसे तुम्ही समजले आहे,तसेच दुसऱ्यांना पण समजून सांगायचे आहे.हे तर जरूर आहे,नंबरा नुसार जे जितके शिकतील,तेवढेच शिकवतील.सर्वांना शिक्षक बनायचे आहे.बाबा मध्ये तर ज्ञान आहे,ती खुपच लहान पण परम आत्मा आहे. सदैव परमधाम मध्ये राहतात,येथे एकदाच संगमा वरती येतात.बाबांना पुकारतात पण तेव्हाच,जेव्हा जास्त दुःख होते.मुलं म्हणतात येऊन आम्हाला सुखी बनवा.मुलं आत्ता जाणतात,आम्ही पुकारत होतो बाबा येऊन आम्हाला पतीत दुनिया पासून,नवीन पावन सुखी दुनिये मध्ये घेऊन चला किंवा तेथे जाण्याचा रस्ता सांगा.ते पण स्वतः येतील तेव्हाच रस्ता दाखवतील ना.ते तेव्हाच येतात जेव्हा परिवर्तन होणार असेल.या खूपच सहज गोष्टी आहेत,ज्याची नोंद करायची आहे.बाबांनी आज हे समजवले आहे,आम्ही पण असेच समजवतो.असा अभ्यास करत करत तुम्हाला सवय लागेल.तुम्ही मुरलीधर ची मुलं आहात,तुम्हाला मुरलीधर जरूर बनायचे आहे.जेव्हा दुसऱ्यांचे कल्याण कराल तेव्हाच नवीन दुनिया मध्ये उच्चपद प्राप्त करू शकाल.ते शिक्षण तर याच दुनियेसाठी आहे.हे राज योगाचे ज्ञान तर भविष्य नवीन दुनिये साठी आहे.तेथे तर सदैव सुखच सुख आहे.तेथे तंग करणारे पाच विकार नसतात.येथे रावण राज्य म्हणजेच,परक्याच्या राज्यामध्ये आहोत.तुम्ही तर प्रथम आपल्या राज्यामध्ये होते,तुम्ही म्हणणार नवीन दुनिया,परत भारतालाच जुनी दुनिया पण म्हणतात.गायन पण आहे नवीन दुनिये मध्ये भारत.असे नाही म्हणणार नवीन दुनिये मध्ये ईस्लामी,बौद्धी होते, नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे बाबा येऊन आम्हा मुलांना जागृत करतात. अविनाशी नाटकांमध्ये त्यांचीभूमिका अशीच आहे.भारताला येऊन स्वर्ग बनवतात.भारतच प्रथम देश आहे.भारत देशालाच स्वर्ग म्हटले जाते.भारताचे आयुष्य पण मर्यादित आहे.लाखो वर्ष समजणे अमर्यादित होते.लाखो वर्षाची ची कोणती गोष्ट स्मृतीमध्ये पण येऊ शकत नाही.नवीन भारत होता,आता जुना भारतच म्हणनार.भारता मध्येच नवीन दुनिया असेल.आता नवीन दुनिये चे मालक बनत आहात.बाबांनी श्रीमत दिली आहे,तुम्ही माझी आठवण करा,तर आत्मा नवीन पवित्र बनेल,परत शरीर पण नवीन मिळेल.आत्मा आणि शरीर दोघे सतोप्रधान बनतात.तुम्हाला राज्य मिळते,ते सुखासाठीच.हे अविनाशी नाटक बनलेले आहे.नविन दुनिये मध्ये सुख आणि शांती आहे.तेथे कोणते वादळ इत्यादी नसते.बेहदच्या शांती मध्ये सर्व शांत होतात.येथे अशांती असल्यामुळे सर्वच अशांत बनले आहेत.सतयुगा मध्ये सर्व शांत असतात.आश्चर्यकारक गोष्टी आहेत ना.हे अनादी पुर्वनियोजीत नाटक आहे.या सर्व गोष्टी बेहदच्या आहेत.ते वकिली,इंजिनिअरिंग इत्यादी शिकतात.तुमच्या बुद्धी मध्ये ज्ञान आहे.हे नाटकाचे रहस्य एकाच वेळेस बाबा येऊन समजवतात.अगोदर तर तुम्ही हे ज्ञान ऐकले नसेल की,हे बेहदचे नाटक कसे चालते.आता हे समजता की,सतयुग त्रेता जरूर होऊन गेले आहेत.त्या युगामध्ये यांचे राज्य होते.त्रेतायुगा मध्ये रामराज्य होते,परत दुसरे दुसरे धर्म आले.इस्लामी बौध्दी,क्रीश्चन इत्यादी सर्व धर्माची माहिती तुम्हाला आहे.हे सर्व २५००वर्षाच्या आत मध्ये आले आहेत. त्यामध्ये१२५०वर्षे कलियुग आहे.सर्व हिशोब आहे ना.असे तर नाही,सृष्टीचे आयुष्यच २५०० वर्ष आहे,नाही.अच्छा,परत दुसरे कोण होते,विचार केला जातो.त्यांच्या अगोदर बरोबर देवी देवता धर्म होता,ते पण मनुष्यच होते परंतु त्यांच्यामध्ये दैवी गुण होते.सूर्यवंशी चंद्रवंशी २५०० वर्ष आणि बाकी सर्व २५००वर्षे असतात.यामध्ये जास्तीचा हिशेब तर कोणी काढू शकत नाही.पुर्ण,पाऊण,अर्धा,पाव बरोबर चार भाग आहेत.कायदेशीर तुकडे करतील ना.अर्ध्या मध्ये तर हे आहेत.असे म्हणतात सतयुगा मध्ये सूर्यवंशी राज्य,त्रेतामध्ये चंद्रावंशी श्रीरामाचे राज्य,हे तुम्ही सिद्ध करून सांगू शकतात.तर जरूर सर्वात मोठे आयुष्य त्यांच्ये असेल,जे सुरुवाती पासुन सतयुगा मध्ये येतात.कल्पच पाच हजार वर्षाचे आहे.ते लोक ८४ लाख योनी म्हणतात.तर कल्पाचे आयुष्य पण लाखो वर्ष म्हणतात.कोणी मानणार पण नाही.इतकी मोठी दुनिया होऊ शकत नाही. तर बाबा बसून समजतात,ते सर्व अज्ञान आहे आणि हे ज्ञान आहे.ज्ञान कोठुन आले त्यांना माहित नाही.ज्ञानसागर तर एकच बाबा आहेत.तेच मुखाद्वारे ज्ञान देतात.गायन गऊ मुखाचे आहे.या गऊ माते द्वारे तुम्हा सर्वाना दत्तक घेतात.याथोड्याशा गोष्टी समजण्यासाठी खूप सहज आहेत.एक दिवस समजुन,सोडून दिले तर बुध्दी परत दुसऱ्या गोष्टी मध्ये लागली जाईल.शाळे मध्ये एक दिवस शिकवले जाते की नियमित.ज्ञान एका दिवसात समजवले जाऊ शकत नाही.बेहदचे बाबा आम्हाला शिकवतात,तर जरूर बेहदचे ज्ञान असेल ना.बेहदचे राज्य देतात.भारतामध्ये बेहदचे राज्य होते.हे लक्ष्मीनारायण बेहदचे राज्य करत होते.कोणाच्या स्वप्नामध्ये पण येणार नाही,जे विचारतील लक्ष्मीनारायणने राज्य कसे घेतले? त्यांच्यामध्ये पवित्रता जास्त होती,योगी आहेत ना,म्हणून आयुष्य पण जास्त होते.आम्ही पण योगी होतो,परत८४जन्म घेऊन भोगी पण जर बनायचे आहे.मनुष्य हे जाणत नाहीत,की हे पण जरूर पुनर्जन्म मध्ये आले असतील.यांना भगवान भगवती म्हटले जात नाही.यांच्या पूर्वी तर कोणी ८४ जन्म घेतले नाहीत.प्रथम जे सतयुगा मध्ये राज्य करत होते,तेच ८४जन्म घेतात,परत नंबरा नुसार खाली येतात.आम्ही आत्माच देवता बनू परत क्षत्रिय वैश्य शूद्र अशा कला कमी होत जातात.गायन पण आहे तुम्हीच पुज्य पासुन पुजारी बनतात. सतोप्रधान पासून तमोप्रधान बनतात.असे पुर्नजन्म घेत घेत उतरत जातात.हे खूपच सहज आहे परंतु माया अशी आहे जे सर्व गोष्टी विसरवते.या सर्व ज्ञानाच्या गोष्टी एकत्र करून पुस्तक बनवले,परंतु ते पुस्तके काय राहणार नाहीत.हे तात्पुरते आहे.बाबानी काही गीता ऐकवली नव्हती.बाबा तर आत्ता जसे समजवत आहेत,तसेच समजवले होते.हे वेद शास्त्र इत्यादी सर्व नंतर बनतात.हे सर्व नष्ट होतील, विनाश होईल तर हे सर्व जळून जातील. सतयुग त्रेतामध्ये मध्ये कोणते पुस्तक नसते,परत भक्तिमार्ग मध्ये बनतात.अनेक गोष्टी बनत राहतात.रावणाला पण बनवतात परंतु समजत काहीच नाहीत.काहीच स्पष्ट करू शकत नाहीत.बाबा समजवतात रावणाला प्रत्येक वर्षी जाळतात,तर जरूर हा मोठा दुश्मन आहे,परंतु दुश्मन कसा आहे, हे कोणी पण जाणत नाहीत.ते समजतात,सीतेचे अपहरण केले म्हणून मोठा दुश्मन आहे.रामाच्या सीतेचे अपहरण केलं म्हणजे तर मोठा डाकू झाला ना.कधी अपहरण केले? त्रेतामध्ये म्हणायचे की त्रेताच्या अंतकाळात म्हणायचे,या गोष्टीवर विचार केला पाहिजे. कोणत्या रामाच्या सीतेचे अपहरण केले. राम-सीताची पण राजधानी चालते ना.एकच राम-सीताची राजाई चालत आली काय? ग्रंथामध्ये अशा गोष्टी लिहिल्या आहेत.विचार केला जातो कोणती सीता?त्रेतायुगामध्ये राम-सीता च्या राजाई घराण्याचे बारा पिढ्या असतात.तर कोणत्या सीतेचे अपहरण केले.जरुर अंत काळातील म्हणावे लागेल ना.हे जे म्हणतात रामाच्या सीतेचे अपहरण केले, आता रामाच्या राज्यांमध्ये सर्व वेळ,एकाचेच राज्य तर नसेल,जरूर राजाई घराणे चालत असेल.तर कोणत्या नंबरच्या सितेचे अपहरण झाले.या खूपच समजण्याच्या गोष्टी आहेत.तुम्ही मुलं खूपच शितलताने,हे सर्व रहस्य कुणाला पण समजावून सांगू शकता.

बाबा समजवतात भक्तीमध्ये मनुष्य अनेक धक्के खाऊन दुःखी झाले आहेत.जेव्हा खूप दुःखी होतात तेव्हा खूप ओरडतात,पुकारतात,बाबा आम्हाला या दुःखापासून सोडवा.रावण तर कोणती गोष्ट नाही, जर असेल तर आपल्या राजाला प्रत्येक वर्षी का जाळतात?रावणाची जरूर पत्नी पण असेल ना.मंदोदरी दाखवतात,परंतू मंदोदरी चा पुतळा बनवून कधीच जाळत नाहीत.तर बाबा बसून सर्व गोष्टी समजत आहेत,ही आहे खोटी माया,खोटी काया,खोटा सर्व संसार.आता तुम्ही खोट्या मनुष्य पासून खरे देवता बनत आहात,तर फर्क झाला ना.तेथे तर नेहमीच खरे बोलतात.तो आहेच सत्यखंड,हा आहे खोटा खंड,तर खोटे बोलतच राहतात,अच्छा.

गोड गोड , फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात . आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ज्ञानसागर बाबा जे,रोज ज्ञान देतात त्यावरती विचार सागर मंथन करायचे आहे.जे आपण शिकलो आहोत,ते दुसऱ्यांना पण शिकवायचे जरूर आहे.

(२) हे बेहदचे नाटक कसे चालत आहे,हे अनादी,पूर्वनियोजित आश्चर्यकारक नाटक आहे,या रहस्याला चांगल्या रीतीने समजून परत समजवायचे आहे.

वरदान:-
आपल्या सूक्ष्म शक्ती वरती विजय मिळवणारे राजऋषि , स्वराज्य अधिकारी आत्मा भव .

कर्मेंद्रिया वरती विजय मिळवणे तर सहज आहे परंतु मन बुद्धी संस्कार,या सूक्ष्म शक्ती वरती विजय मिळवणे,हा फारच सूक्ष्म अभ्यास आहे.ज्यावेळेस जो संस्कार,जो विचार करायचा असेल तोच होत राहील,यालाच सूक्ष्म शक्ती वरती विजय मिळवणे अर्थात राजरूर्षी स्थिती प्राप्त करणे म्हणतात. संकल्प शक्तीला आदेश द्या की,आत्ता एकाग्रचित्त होऊन जावा,तर राजाचा आदेश त्याच वेळेत तसाच मानणे,हेच राज्याधिकारीची लक्षणे आहेत. या अभ्यासाद्वारे अंतिम पेपर मध्ये पास व्हाल.

बोधवाक्य:-
सेवा द्वारे जे आशीर्वाद मिळतात , हीच सर्वात मोठी उपाधी आहे , बक्षीस आहे .