08-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला नशा राहायला पाहिजे की आम्ही ब्राह्मण च देवता बनत आहोत,आम्हा ब्राह्मणालाच बाबांची श्रेष्ठ मत मिळत आहे"

प्रश्न:-
ज्यांचे नविन रक्त आहे,त्यांना कोणती आवड आणि कोणती मस्ती असायला हवी?

उत्तर:-
ही दुनिया जी जुनी लोहयुगी बनली आहे,तिला सुवर्ण युगी बनवण्याची,जुन्याला नविन बनवण्याची आवड असावी हवी.कन्यांचे नविन रक्त आहे,तर आपल्या समवयस्कला ज्ञान द्यायचे आहे.नशा कायम ठेवायचा आहे.भाषण करण्याची खूपच मस्ती असायला हवी.

गीत:-
े:-हे रात्रीच्या प्रवाशानो थकून जाऊ नका...

ओम शांती।
मुलांनी या गिताचा अर्थ तर समजला असेल.आत्ता भक्तीमार्गाची काळोखी रात्र पुर्ण होत आहे.मुलं समजतात की, आम्हाला आत्ता मुकुट मिळणार आहे.येथे बसलो आहोत, मुख्य लक्ष्य, मनुष्या पासून देवता बनायचे आहे. ज‌से संन्याशी समजवतात, तुम्ही स्वता:ला म्हैस समजा,तर ते स्वरुप बनाल.ते भक्ती मार्गाचे उदाहरण आहे.जसे हे पण उदाहरण आहे की,रामाने वानराची सेना घेतली.तुम्ही येथे बसले आहात, जाणतात आम्हीच देवी देवता दुहेरी मुकुटधारी बनू.जसे शाळेमध्ये शिकतात,तर म्हणतात डॉक्टर बनू, अभियंता बनू‌.तुम्ही समजता आम्ही या शिक्षणाद्वारे देवी-देवता बनत आहोत. हे शरीर सोडतो आणि आम्हाला मुकुट मिळेल.ही तर खूपच खराब दुनिया आहे ना.नविन दुनिया खूपच चांगली आहे.जुनी दुनिया खराब दुनिया आहे.ही तर नष्ट होणार आहे.नविन विश्वाचे मालक बनवणारे,विश्वाचे रचनाकार च असतील ना.दुसरे कोणी शिकवू शकत नाही.शिवबाबाच तुम्हा मुलांना शिकवतात.बाबांनी समजवले आहे,आत्म अभिमानी पूर्ण रीतीने बनले,तर बाकी काय पाहिजे.तुम्ही ब्राह्मण तर आहातच. तुम्ही जाणता आम्ही देवता बनत आहोत. देवता खूप पवित्र होते.हे तर खूप पतित मनुष्य आहेत.जरी चेहरा मनुष्याचा असला परंतु कर्म कसे आहेत? जे देवतांचे पुजारी आहेत, ते स्वतः पण त्यांच्यापुढे महिमा गातात,तुम्ही सर्वगुणसंपन्न,१६ कला संपुर्ण... आम्ही तर विकारी, पापी आहोत. चेहरा तर त्यांचा पण मनुष्यांचा आहे परंतु त्यांच्या जवळ जाऊन महिमा गातात,स्वतःला विकारी समजतात,आमच्या मध्ये कोणते गुण नाहीत.तसे तर मनुष्य म्हणजे मनुष्यच आहेत.आता तुम्ही समजता,आम्ही आता परिवर्तीत होऊन देवता बनू.कृष्णाची पूजा करतात म्हणून कृष्णपुरी मध्ये जाऊ परंतु हे माहित नाही की,कधी जाऊ.भक्ती करत राहतात की, भगवान येऊन भक्तीचे फळ देतील. प्रथम तुम्हाला निश्चित करायला पाहिजे की,आम्हाला कोण शिकवत आहेत? ही श्री श्री शिवबाबांची मत आहे.शिवबाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत.ज्यांना हे माहीत नाही,ते श्रेष्ठ कसे बनवू शकतात.इतके सर्व ब्राह्मण, श्री श्री शिवबाबांच्या श्रीमतावर चालतात. परमात्म्याची श्रीमतच श्रेष्ठ बनवते.ज्यांच्या भाग्या मध्ये असेल त्यांच्या बुद्धीमध्ये बसेल, नाहीतर काहीच समजणार नाहीत.जेव्हा समजेल तेव्हा खूप मदत करायला लागतील.त्यांना काय माहिती, हे कोण आहेत म्हणून बाबा कोणाशी भेटत नाहीत.ते तर आपलेच मत देतील.श्रीमताला न जाणल्यामुळे त्यांनापण आपले मत द्यायला लागतात.आता बाबा, तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनवण्यासाठी आले आहेत.पाच हजार वर्षांपूर्वी पण बाबा येऊन भेटले होते,ज्यांना माहित नाही, ते प्रतिसाद देऊ शकत नाहीत.मुलांना राजयोगाच्या अभ्यासाच्या खूप नशा राहिला पाहिजे, हे शिक्षण तर खूपच उच्च आहे परंतु माया पण विरोधी बनते. तुम्ही जाणता आम्ही हे शिक्षण घेतो ज्याद्वारे आम्ही दुहेरी मुकुटधारी बनतो.भविष्य जन्म जन्मांतर दुहेरी मुकुटधारी बनतो. तर यासाठी पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना. त्याला राजयोग म्हटले जाते.खूप आश्चर्य आहे,बाबा नेहमी समजवतात,लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये जावा,पुजारी ना पण तुम्ही समजावू शकता. पुजारी कोणाला बसून समजतील की, ह्या लक्ष्मीनारायण ला हे पद कसे मिळाले, हे विश्वाचे मालक कसे बनले? अशा गोष्टी ऐकल्या तर पुजाऱ्यांचा पण मान होईल.तुम्ही म्हणू शकता, आम्ही आपल्याला समजावून सांगतो की,या लक्ष्मीनारायण ला हे राज्य कसे मिळाले?गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना.मी तुम्हाला राजयोग शिकवून राजांचा राजा बनवतो. स्वर्गवासी तर तुम्ही बनतात ना.तर मुलांना खूप नशा राहिला पाहिजे, यामध्ये खर्च तर काहीच नाही.

राजाईच पोषाख तर लगेच बनू शकतो.तर त्यांची नेहमी आठवण राहील की, आम्हीच देवता बनत आहोत. तर खुशाल शिवबाबा चे चित्र द्या.हे पण चित्र काढावे लागतील. तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात.हे शरीर सोडून, आम्ही जाऊन देवता बनू,कारण आम्ही राजयोग शिकत आहोत.तर हे फोटो पण मदत करतील.वरती शिव परत राजाईचे चित्र.खाली तुमचे साधारण चित्र.शिवबाबा कडून राजयोग शिकून आम्हीच देवता बनून मुकुटधारी बनत आहोत.चित्र ठेवले असतील तर कोणीही विचारतील,तर आम्ही सांगू शकतो, आम्हाला शिकवणारे स्वतः शिवबाबा आहेत.चित्र पाहिल्या नंतरच मुलांना नशा चढेल.खुशाल दुकानांमध्ये चित्र ठेवा.भक्ती मार्गामध्ये बाबा नारायणचे चित्र ठेवत होते,पॉकेट मध्ये पण ठेवत होते.तुम्ही पण आपला फोटो ठेवा, तर आठवण येईल,आम्हीच देवी-देवता बनत आहोत.आठवण करण्याचा उपाय शोधला पाहिजे. बाबांना विसरल्यामुळेच अधोगती होते. विकारांमध्ये गेल्यामुळे परत लाज वाटेल,आता तर आम्ही देवता बनू शकत नाहीत.विकारी बनलेल्या मुलांचा फोटो काढून टाका,सांगा तुम्ही स्वर्गामध्ये येण्याच्या लायक नाहीत. तुमचा पासपोर्ट रद्द झाला. स्वतःला पण जाणीव होईल.आम्ही तर विकारांमध्ये गेलो,आता आम्ही स्वर्गामध्ये कसे येऊ शकतो.जसे नारदाचे उदाहरण देतात ना.त्यांना म्हटले तुम्ही स्वतःचा चेहरा तर पहा,लक्ष्मी सोबत स्वयंवर करण्याचे लायक आहात.तर चेहरा माकडासारखा दिसला.तर मनुष्यांना पण लाज वाटेल की, आमच्यामध्ये तर हे विकार आहेत. परत आम्ही श्रीनारायण किंवा श्री लक्ष्मी सोबत स्वयंवर कसे करू शकतो. बाबा युक्त्या तर सर्व सांगत राहतात परंतु कोणी विश्वास पण ठेवतील ना.विकाराचा नशा असेल, तर समजतील या हिशोबाने आम्ही राजांचे राजा दुहेरी मुकुटधारी कसे बनू शकतो? पुरुषार्थ तर करायला पाहिजे ना. बाबा समजावत राहतात,की अशा युक्त्या शोधा आणि सर्वांना समजावत राहा.राजयोगा द्वारे स्थापना होत आहे.आता विनाश समोर उभा आहे.दिवसेंदिवस वादळ जोरात येत राहतील.बाॅम्बस इत्यादी पण तयार होत आहेत. तुम्ही हे शिक्षण भविष्यामध्ये उच्च पद मिळवण्यासाठी घेत आहात. तुम्ही एकाच वेळेत पतितापासून पावन बनतात.मनुष्य थोडेच समजतात,की आम्ही नरकवासी आहोत,कारण पत्थरबुद्धी आहेत ना.आता तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनत आहात.भाग्या मध्ये असेल तर लगेच समजतील. नाही तर तुम्ही किती पण माथा मारा, बुद्धी मध्ये बसणार नाही.बाबांनाच जाणत नाहीत तर नास्तिक म्हणजेच विनाधनीचे आहेत.तर धनीचे बनायला पाहिजे ना.जेव्हां शिवबाबाची मुलं आहेत. येथे ज्यांना ज्ञान आहे,ते आपल्या मुलांना विकारापासून वाचवत राहतील.अज्ञानी लोक आपल्यासारखेच मुलांना पण विकारांमध्ये फसवत राहतील.तुम्ही जाणतात येथे विकारापासून वाचवले जाते.कन्यांना तर प्रथम वाचवायला पाहिजे.मातपिता तर जसे मुलांना विकारांमध्ये फसवतात.तुम्ही जाणतात,ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. श्रेष्ठाचारी दुनियेची इच्छा ठेवतात.भगवानुवाच मी जेव्हा श्रेष्टाचारी बनवण्यासाठी येतो,तेव्हा सर्व भ्रष्टाचारी असतात. मी सर्वांचा उद्धार करतो. गीतेमध्ये लिहिले आहे की,भगवान च येऊन साधुसंत इत्यादी सर्वांचा उद्धार करतात.एकच भगवान पिता येऊन सर्वांचा उद्धार करतात.आता तुम्हाला आश्चर्य वाटते की, मनुष्य किती पत्थर बुद्धी बनले आहेत.या वेळेत जर मोठ-मोठ्यांना माहिती पडेल की, गीतेचे भगवान शिव आहेत, तर माहित नाही काय होईल? हाहाकार होईल परंतु आणखी थोडा वेळ आहे. नाहीतर सर्वांचे आखाडे हालायला लागतील.अनेकांचे आसन हालतात.जेव्हा लढाई होते,तर माहित होते, यांचे आसन अस्थीर होऊ लागले आहे,आत्ता पडतील. आता हे हालले तर खूप हलचल होईल.पुढे चालून असे होईल. पतितपावन सर्वांचे सद्गती दाता स्वतः म्हणतात,बरोबर ब्रह्मा तनाद्वारे स्थापना होत आहे.सर्वांची सद्गती अर्थात उध्दार करत आहेत. भगवानुवाच ही पतित दुनिया आहे,या सर्वांचा उद्धार मला करायचा आहे.आता सर्व पतित आहेत,परत पतित कोणाला पावन कसे बनवू शकतील.प्रथम स्वतः पावन बनतील.भाषण करण्यासाठी खूप मस्ती पाहिजे.कन्यांचे तर नवीन रक्त आहे.तुम्ही जुन्या पासून नवीन बनत आहात.तुमची आत्मा जी लोहयुगी बनली आहे,ती आत्ता नवीन सुवर्णयुगी बनत आहे. आत्म्यातील मिलावट,बनावट निघत जाते.तर मुलांना खूप आवड पाहिजे,नशा कायम ठेवला पाहिजे. आपल्या समवयस्कांना ज्ञान द्यायचे आहे.गायन पण केले जाते गुरु माता.तर माता गुरु कधी होती,ते पण ते तुम्हीच जाणता.जगदंबाच परत राज राजेश्वरी बनते,परत तेथे कोणतेही गुरु राहत नाहीत.गुरूंची पद्धत आता चालते. मातांना बाबा ज्ञानामृताचा कलश देतात. सुरुवाती पासूनच असे होते.सेवा केंद्रासाठी पण ब्रह्मकुमारी शिक्षिका पाहिजेत ना.बाबा म्हणतात तुम्हीच सेवा केंद्र चालवा, हिम्मत नाही का?असे का म्हणतात,बाबा ब्रह्मकुमारी शिक्षिका पाहिजे.हे पण ठीक आहे, मान देतात.आजकाल तर दुनिये मध्ये एक दोघांना मान पण देत नाहीत. आज पंतप्रधान आहेत,उद्या त्यांचाही खून करतात. कायमस्वरूपी सुख कोणाला मिळत नाही.या वेळेत तुम्हा मुलांना कायमस्वरूपी राज्य-भाग्य मिळत आहे.तुम्हाला बाबा अनेक प्रकारे समजवत राहतात.स्वतःला नेहमी हर्षित ठेवण्यासाठी खूप चांगल्या युक्त्या शोधायच्या आहेत.शुभ भावना तर ठेवायच्या आहेत ना. ओहो! आम्ही असे लक्ष्मीनारायण बनत आहोत,परत कोणाच्या भाग्य मध्ये नाही,तर पुरुषात कसा करतील.बाबा पुरुषार्थ तर करायला सांगतात ना.पुरुषार्थ कधी व्यर्थ जात नाही. हा तर नेहमीच सफल होतो. राजधानी स्थापन होईल,विनाश पण महाभारत लढाई द्वारे होत आहे. पुढे चालून तुम्ही सर्वांना ज्ञान द्याल तर सर्व जण येतील.आता समजत नाहीत परंतु त्यांची राजाईच नष्ट होईल.अनेक गुरु लोक आहेत.असे कोणी मनुष्य नाहीत,जे कोणत्या गुरूंचे शिष्य बनत नाहीत.येथे तर तुम्हाला एक सद्गुरु मिळाला आहे,सद्गती देणारा.हे चित्र खूप चांगले आहेत. ही सद्गती म्हणजे सुखधाम, हे मुक्तिधाम आहे.बुद्धी पण म्हणते की,आम्ही सर्व निर्वाणधाम मध्ये राहतो,तेथून परत या स्थुल दुनिये मध्ये येतो.तेथील रहिवासी आहोत. हा खेळ पण भारतावरती बनलेला आहे.

शिवजयंती पण येथेच साजरी करतात.बाबा म्हणतात मी आलो आहे नंतर परत येईल.प्रत्येक पाच हजार वर्षानंतर बाबा येताच स्वर्ग बनतो.असे म्हणतात ख्रिस्त पूर्व स्वर्ग होता,आता नाही परत स्वर्ग येणार आहे.तर जरुर नर्कवासींचा विनाश,स्वर्गवासींची स्थापना व्हायला पाहिजे.ते पण तुम्ही स्वर्गवासी बनत आहात.नर्कवासी सर्व विनाश होतील.ते तर समजतात अजून इतके लाखो वर्ष शिल्लक आहेत.मुलांना मोठे करून त्यांचे लग्न इत्यादी करावे.तुम्ही थोडेच असे म्हणनार.जर मुलगा मतावर चालत नाही,तर परत श्रीमती घ्यावी लागेल की, स्वर्गवासी बनत नाही, तर काय करायचे?बाबा म्हणतात, आज्ञाधारक नाही, तर जाऊद्या. यामध्ये पक्की नष्टोमोहा अवस्था पाहिजे.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) श्री श्री बाबाच्या श्रेष्ठ मतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. श्रीमतांमध्ये मनमत मिसळायचे नाही.ईश्वरीय शिक्षणाच्या नशेमध्ये राहायचे आहे.

(२) आपल्या समवयस्काचे कल्याण करण्याचे उपाय शोधायचे आहेत. सर्वांप्रती शुभ भावना ठेवत एक-दोघांना खरा मान द्यायचा आहे. खोटा मान द्यायचा नाही.

वरदान:-
आत्मिक व्यायाम आणि स्वनियंत्रणा द्वारा महिनता चा अनुभव करणारे फरिश्ता भव.

बुध्दीची महिनता किंवा हलका पण ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे. महिनताच महानता आहे परंतु यासाठी रोज अमृतवेळेला अशरीरी पणाचा आत्मिक व्यायाम करा आणि व्यर्थ संकल्पाच्या भोजनाचे पथ्य ठेवा.पथ्य ठेवण्यासाठी स्वतःवर नियंत्रण करा.ज्यावेळेस जो संकल्प रुपी भोजन स्विकार करायचे आहे,त्यावेळेस तेच करा. व्यर्थसंकल्पाचे भारी भोजन करू नका तेव्हा महिन बुद्धी बनून फरिश्ता स्वरूपाच्या लक्ष्याला प्राप्त करू शकाल.

बोधवाक्य:-
महान आत्मा तेच आहेत, जे प्रत्येक सेकंद, प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार टाकतील.