08-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , हा आत्मिक दवाखाना तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी सदा निरोगी बनवणारा आहे , तुम्ही देही अभिमानी होऊन बसा ..."

प्रश्न:-
धंदा इत्यादी करत पण कोणत्या सूचना बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत ?

उत्तर:-
बाबांच्या सूचना आहेत तुम्ही कोणत्या साकारी किंवा आकारी व्यक्तीची आठवण करू नका,एका बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.कोणी असे म्हणू शकत नाही,यासाठी वेळ नाही.सर्व काही करत असताना आठवण करू शकता.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना बाबांचे सुप्रभात,नंतर मुलांना म्हटले जाते,बाबांची आठवण करा.हे पतित पावन येऊन पावन बनवा असे म्हणतात.तर बाबा पण प्रथम म्हणतात,आत्मिक पित्याची आठवण करा.आत्मिक पिता तर सर्वांचे एकच आहेत,त्यांना कधीच सर्वव्यापी म्हटले जात नाही.तर जितके शक्य होईल मुलांनी प्रथम बाबा ची आठवण करायची आहे.कोणत्या पण साकारी किंवा आकारी मनुष्याची आठवण करू नका,शिवाय एका बाबांच्या.हे तर खूपच सहज आहे ना.मनुष्य म्हणतात आम्ही फार व्यस्त राहतो,वेळ नाही परंतु यासाठी नेहमीच वेळ आहे.बाबा युक्ती सांगतात,मुलं हे पण जाणतात बाबांची आठवण केल्यामुळेच आमचे पाप भस्म होतील.मुख्य गोष्टच ही आहे.धंदा इ. करण्यास मनाई नाही,ते सर्व काही करत फक्त बाबांची आठवण करा तर,विकर्म विनाश होतील.हे तर समजतात आम्ही पतित आहोत.साधुसंत ऋषीमुनी इत्यादी सर्वच भगवंताला भेटण्या साठीच साधना करतात.भगवंताला भेटण्यासाठी साधना केली जाते,जोपर्यंत त्यांचा परिचय नाही तोपर्यंत भेटू शकत नाहीत.तुम्ही जाणतात बाबा चा परिचय दुनिया मध्ये कोणालाच नाही.देहाचा परिचय तर सर्वांना आहे.मोठ्या गोष्टीचा परिचय तर लगेच होतो.आत्म्याचा परिचय तर जेव्हा बाबा येतील तेव्हाच समजावतील.आत्मा आणि शरीर दोन वेगळ्या गोष्टी आहेत.एक तारा आहे आणि तो खूप सूक्ष्म आहे,त्यांना कोणी पाहू शकत नाही.तर येथे जेव्हा बसतात तेव्हा देही अभिमानी होऊन बसायचे आहे.हा पण एक दवाखाना आहे ना,नेहमी निरोगी बनण्यासाठी.आत्मा अविनाशी आहे,त्याचा कधीच विनाश होत नाही.आत्म्याचीच सर्व भूमिका आहे.आत्मा म्हणते माझा कधीच विनाश होत नाही.इतके सर्व आत्मे अविनाशी आहेत,तर शरीर विनाशी आहे.आता तुमच्या बुद्धीमध्ये बसले आहे की आम्ही आत्मा अविनाशी आहोत.आम्ही 84 जन्म घेतो,हे अविनाशी नाटक आहे.यामध्ये धर्म संस्थापक कोण कोण,कधी येतात,किती जन्म घेतात,हे तर तुम्ही जाणतात.८४ जन्माचे जे गायन आहे,ते जरूर कोणत्या एका धर्माचे च असतील. सर्वांचे तर 84 जन्म होऊ शकत नाहीत.सर्व धर्म एकत्रित येत नाहीत.आम्ही दुसऱ्याचा हिशेब का काढायचा?आम्ही जाणतो अमक्या वेळेत धर्म स्थापन करण्यासाठी येतात.त्याची परत वृध्दी होते.सर्व सतोप्रधान पासून तमोप्रधान तर होतातच.दुनिया जेव्हा तमोप्रधान होते तेव्हाच बाबा येऊन सतोप्रधान बनवतात.आता तुम्ही मुलं जाणतात,आम्ही भारतवासी परत नवीन दुनिया मध्ये येऊन राज्य करू,तेथे दुसरा कोणताच धर्म नसेल.तुम्हा मुलांमध्ये पण ज्यांना श्रेष्ठ पद घ्यायचे असेल,ते जास्त आठवणी मध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ करतील आणि समाचार लिहतील बाबा मी इतका वेळ आठवणी मध्ये राहतो.काहीजण तर लाज वाटते म्हणून दिनचर्या लिहुन पाठवत पण नाहीत.असे समजतात बाबा काय म्हणतील परंतु बाबांना माहिती तर पडते ना.शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात,तुम्ही जर अभ्यास केला नाही,तर नापास व्हाल.लौकिक मात पिता पण मुलांच्या अभ्यासानुसार समजतात,ही तर खूप मोठी शाळा आहे.येथे क्रमानुसार बसवले जात नाही.बुद्धी द्वारे समजले समजले जाते,क्रमा नुसार तर असतात ना.आत्ता बाबा चांगल्या चांगल्या मुलांना कुठे पाठवतात,ते लगेच चालत जातात आणि दुसरे लिहतात,आम्हाला महारथी पाहिजेत तर जरूर समजतात त्यांच्या पेक्षा हुशार प्रसिद्ध आहेत.प्रदर्शनीमध्ये पण अनेक प्रकारचे येतात तर गाईडने पण उभे राहायला पाहिजे, तपासणी करण्यासाठी. रिसीव करणारे तर जाणतात हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे,तर त्यांना परत इशारा करायला पाहिजे कि,तुम्ही यांना समजून सांगा.तुम्ही पण समजता,प्रथम दर्जाचे,दुसऱ्या दर्जाचे किंवा तिसऱ्या दर्जाचे आहेत.येथे तर सर्वांना सेवा करायची च आहे.कोणी मोठा मनुष्य असेल तर जरूर त्यांची खात्री तर करतातच. हा पण कायदा आहे.पिता किंवा शिक्षक मुलांची मुरलीच्या वर्गा मध्ये महिमा करतात,ही पण खात्री करणे आहे. नाव काढणाऱ्या मुलांची महिमा किंवा खात्री केली जाते.हा अमका धनवान आहे धार्मिक आहे, ही पण खात्री आहे ना.आत्ता तुम्ही हे तर जाणता कि भगवान उच्च ते उच्च आहेत.असे म्हणतात बरोबर उच्च ते उच्च आहेत परंतु,त्यांना विचारले यांचे जीवन चरित्र सांगा, तर ते म्हणतात सर्वव्यापी आहेत.एकदम त्यांची महिमा कमी करतात.आता तुम्ही समजू शकता की सर्वात उच्चतम भगवान आहेत,ते मूळ वतनचे रहिवासी आहेत.सूक्ष्म वतन मध्ये देवता राहतात.येथे मनुष्य राहतात.ते उच्च ते उच्च भगवान तर निराकारी आहेत.

आता तुम्ही जानता आम्ही जे आम्ही हिऱ्या सारखे होतो,परत कवडी सारखे बनलो परत भगवंताला स्वतःपेक्षा जास्ती खाली घेऊन गेले,म्हणजे निंदा केली. ईश्वराला ओळखतच नाहीत.तुम्हा भारतवासींनाच त्यांचा परिचय मिळाला आहे,परत परिचय कमी होत जातो.आता तुम्ही बाबांचा परिचय सर्वांना देत राहतात. अनेकांना बाबांचा परिचय मिळेल.तुमचे मुख्य चित्र आहे त्रिमूर्ती, गोळा( सृष्टीचक्र) आणि झाड याद्वारे खूप ज्ञानाचा प्रकाश मिळतो.हे तर कोणी पण म्हणेल हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे चे मालक होते. अच्छा सतयुगा च्या पूर्वी काय होते?हे पण तुम्ही आत्ता जाणतात,आता कलियुगाचा अंत आहे आणि प्रजाचे प्रजा वरती राज्य आहे.आता राजाई तर नाही,खूपच फरक आहे.सतयुगाच्या सुरुवातीला राजे होते आणि आता कलियुगामध्ये पण राजा आहेत.जरी ते पावन नाहीत परंतु कोणी पैसे देऊन पण ती पदवी घेतात.महाराजा तर कोणी नाहीत.पदवी खरेदी करतात, जसे पटीयाला चे महाराजा,जोधपूर बिकानेर चे महाराजा,नाव तर घेतात ना. हे नावं अविनाश चालत येतात.प्रथम पवित्र महाराजा होते,आता अपवित्र महाराजा आहेत.हे अक्षरं तर चालत येतात.या लक्ष्मी-नारायण ला म्हणाल सतयुगा चे मालक होते,कुणी राज्य घेतले?आता तुम्ही जाणता राजाई ची कशी स्थापन होत आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला २१जन्मा साठी शिकवत आहे,ते शिक्षण घेऊन या जन्मांमध्ये वकील इत्यादी बनतात.आता तुम्ही हे शिक्षण घेऊन भविष्यामध्ये महाराजा महारानी बनतात.अविनाशी नाटका नुसार नवीन दुनिया ची स्थापना होत आहे. आत्ता जुनी दुनिया आहे,जरी किती पण चांगले चांगले,मोठे मोठे महल आहेत परंतु हिऱ्या जवाहाराचे महल बनवण्याची ताकत कोणा मध्येच नाही. सतयुगा मध्ये हे सर्व हिऱ्या जवाहराचे महल बनवतात,महल बनवण्यामध्ये पण खूप कमी वेळ लागतो.येथे भूकंप इत्यादी होता तर खूप कारागीर लागतात,एक-दोन वर्षांमध्ये सर्व शहर उभे करतात.नवी दिल्ली बनवण्या मध्ये आठ दहा वर्ष लागले असतील परंतु येथील कामगार आणि तेथील कामगारां मध्ये खूप फरक राहतो ना.आजकाल तर नवीन नवीन संशोधन निघत राहते.इमारती बनवण्या मध्ये विज्ञानाचा पण जोर आहे.सर्वकाही रेडिमेड मिळते,लगेच इमारती तयार होतात.खूप लवकर लवकर बनवतात. हे सर्व स्वर्गा मध्ये कामाला येते.हे सर्व सोबत येते संस्कार तर राहतात ना.हे विज्ञानाचे संस्कार पण सोबत येतील.तर आत्ता बाबा मुलांना समजावतात,पावन बनायचे आहे आणि पित्याची आठवण करायची आहे. बाबा सुप्रभात म्हणून,परत सावधान करतात की मुलांनो बाबांच आठवणी मध्ये बसले आहात.चालता-फिरता बाबांची आठवण करा कारण जन्म जन्मांतर चे पापाचे ओझे डोक्या वरती आहे.शिडी उतरत उतरत ८४ जन्म घेतले आहेत.आता परत एका जन्मांमध्ये चढती कला होते. जितकी बाबांची आठवण कराल तेवढी खुशी राहिल,ताकत मिळत राहील.अनेक मुलं आहेत ज्यांना पुढे केले जाते परंतु आठवणीमध्ये बिलकुल रहात नाहीत.जरी ज्ञाना मध्ये हुशार आहेत परंतु आठवणीची यात्रा मध्ये राहत नाहीत.बाबा तर मुलांची महिमा करतात.हे पण नंबर वन मध्ये आहेत,तर कष्ट करत असतील ना.तुम्ही हमेशा समजा की शिवबाबा समजवतात तर बुद्धी त्यांच्याकडेच लागेल.हे ब्रह्मा पण शिकत असतील ना.ते ही म्हणतात शिव बाबांची आठवण करा.कुणाला समजवण्या साठी हे चित्र आहेत.भगवंताला निराकार म्हटले जाते.ते येऊन शरीर धारण करतात.एका भगवंताची मुलं सर्व भाऊ भाऊ आहेत.आता या शरीरा मध्ये विराजमान आहेत.सर्व अकालमुर्त आहेत. हे अकालमूर्त आत्म्याचे तख्त आहेत. अकाल तख्त दुसरी कोणती गोष्ट नाही.हे तख्त अकालमूर्त चे आहे.भ्रुकुटी च्या मध्ये आत्मा विराजमान होते,याला म्हटले जाते अकाल तख्त.अकाल तख्त अकालमुर्त चे आहे.आत्मे सर्व अकाल आहेत,खूपच सूक्ष्म आहेत.बाबा तर निराकार आहेत,ते आपले तख्त कोठून घेऊन येतील.बाबा म्हणतात माझे पण हे तख्त आहे.मी येऊन या ब्राह्माचे तख्त भाड्याने घेतो.ब्रह्माच्या साधारण वृद्ध तना मध्ये येऊन अकाल तख्त वर बसतो.आत्ता तुम्ही जाणले आहे सर्व आत्म्याचे हे तख्त आहे.मनुष्याची गोष्ट केली जाते,जानवरची तर गोष्टच नाही. मनुष्य जनावरांपेक्षा पण खराब झाले आहेत.प्रथम मनुष्य जे जनावरा पेक्षा खराब झाले आहेत,ते तर सुधारावेत. कोणी जनावराची गोष्ट विचारली,तर बोला प्रथम स्वतःला तर सुधारा.सतयुगा मध्ये तर जनावरं पण खूप चांगले असतात,जरा पण घाण करत नाहित.घाण इ.काहीच नसेल. राजांच्या महला मध्ये कबूतर इत्यादींचा कचरा झाला तर दंड करतात.थोडा पण कचरा नको.तेथे खूप सावधानी राहते. सुरक्षेसाठी सैनिक तैनात राहतात.कधी कोणते जनावर पक्षी इत्यादी आत मध्ये येऊ शकत नाही.खूप स्वच्छता राहते. लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये पण खूप स्वच्छ राहते.शंकर-पार्वतीच्या मंदिरांमध्ये कबूतर इत्यादी दाखवतात, तर जरूर मंदिर खराब करत असतील.ग्रंथांमध्ये खूपच दंतकथा लिहल्या आहेत.आता बाबा मुलांना समजवतात,मुलांमध्ये पण थोडेच आहेत,जे धारणा करतात.बाकी तर काहीच समजत नाहीत.बाबा मुलांना खूपच प्रेमाने समजवतात.मुलांनो खूप खूप गोड बना. मुखाद्वारे नेहमी रतन काढत रहा.तुम्ही रुप बसंत आहात,तुमच्या मुखाद्वारे दगड(खराब) निघायला नको.आत्म्याची महिमा होते.आत्मा म्हणते मी राष्ट्रपती आहे,माझ्या शरीराचे हे नाव आहे.अच्छा आत्मे कोणाची मुलं आहेत? एका परमात्म्याची.तर जरूर त्यांच्याद्वारे वारसा मिळत असेल.ते परत सर्वव्यापी कसे असू शकतील.तुम्ही समजता आम्ही पण अगोदर काहीच जाणत नव्हतो.आत्ता बुद्धीचे कुलूप उघडले आहे.तुम्ही कोणत्याही मंदिरांमध्ये जाता,तर समजतात हे सर्व चित्र खोटे आहेत.दहा भुजा असणारे,हत्तीचे तोंड असणारे,असे कोणते चित्र नसते.ही सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे.वास्तव मध्ये भक्ती एक शिवबाबाची करायला पाहिजे,जे सर्वांची सद्गगती करतात.तुमच्या बुद्धीमध्येआहे,हे लक्ष्मी नारायण पण 84 जन्म घेतात,परत बाबा येऊन सर्वांची सद्गगती करतात. त्यांच्यापेक्षा मोठे कोणीच नाहीत.या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्यामध्ये पण नंबरा नुसारच धारण करू शकतात.धारण करत नाहीत,तर ते काय कामाचे नाहीत.तर अंधाची काठी बनण्याच्या ऐवजी स्वतः अंध बनतात.गाई जर दूध देत नाहीत,तर त्यांना पांजरपोळ मध्ये ठेवतात.हे पण ज्ञानाचे दूध देऊ शकत नाहीत.अनेक जण आहेत,जे काहीच पुरुषार्थ करत नाहीत. असे समजत नाही की,आम्ही कोणाचे तरी कल्याण करायला पाहिजे.आपल्या भाग्याची काळजी घेत नाहीत.बस जे काय मिळाले ते चांगले.तर बाबा म्हणतात भाग्या मध्ये नाही.आपली सद्गगती करण्यासाठी पुरुषार्थ पण करायला पाहिजे.देही अभिमानी बनायचे आहे.बाबा उच्च ते उच्च आहेत आणि येतात कसे पतित दुनिया पतीत शरीरा मध्ये.त्यांना बोलवतातच पतित दुनिया,पतित शरिरा मध्ये.जेव्हा रावण दुःख देतात,बिल्कुलच भ्रष्ट करतात,तेव्हा तर बाबा येऊन श्रेष्ठ बनवतात.जे चांगला पुरुषार्थ करतात ते राजाराणी बनतात,जे पुरुषार्थ करत नाही ते गरीब बनतात.भाग्य मध्ये नाही तर पुरुषार्थ पण करू शकत नाहीत.काही तर खूपच चांगल्या प्रकारे भाग्य बनवतात. प्रत्येकजण स्वतःला पाहू शकतो की आम्ही काय सेवा करत आहोत?अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
प्रवृत्तीच्या विस्तारा मध्ये राहत फरिश्ता स्वरुपा चा साक्षात्कार करवणारे साक्षात्कार मूर्त भव .

प्रवृत्तीचा विस्तार असताना पण विस्ताराला समेटणे आणि उपराम राहण्याचा अभ्यास करा.आता आता स्थुल कार्य करत आहात, आत्ता अशरीरी,हा अभ्यास फरिश्ता स्वरुपाचा साक्षात्कार करवेल.उच्च स्थितीमध्ये राहण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्यक्त भावाची अनुभूती होईल. जसे उंचावरती गेल्यामुळे खालचा भाग आपोआप सुटतो.कष्टापासून मुक्त राहाल, वेळ पण वाचेल.सेवा पण तीव्र गतीने होईल.बुद्धी एवढी विशाल होईल,जे एका वेळेस अनेक कार्य करू शकाल.

बोधवाक्य:-
खुशीला कायम ठेवण्यासाठी आत्मा रूपी दिपकामध्ये ज्ञानाचे तेल घालत चला .