08-03-2020    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   04.12.1985   ओम शान्ति   मधुबन


संकल्पाची भाषा सर्वश्रेष्ठ भाषा.


आज बाप दादांच्या समोर डबल रूपांमध्ये डबल सभा लागली आहे.दोन्ही स्नेही मुलांची सभा आहे.एक साकार रूप धारी मुलांची सभा,दुसरी आकारी स्नेही स्वरूप मुलांची सभा.स्नेहाचे सागर बाबांना भेटण्या साठी चारही बाजूचे आकारी रुपधारी मुलं आपल्या स्नेहाला बापदादांच्या पुढे प्रत्यक्ष करत आहेत. बाप दादा,सर्व मुलांच्या स्नेहाचे संकल्प, मनातील वेगवेगळ्या उमंग उत्साहाचे संकल्प,हृदयाच्या वेग वेगळ्या भावनांच्या सोबत,स्नेहाच्या संबंधाच्या अधिकारा द्वारे,अधिकार रूपाच्या गोड गोड गोष्टी ऐकत आहेत.प्रत्येक मुलगा आपल्या मनातील हालचाल,आपल्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या परिस्थितीची हालचाल,सेवेच्या समाचारा ची हालचाल, डोळ्यांच्या भाषे द्वारे,श्रेष्ठ स्नेहाच्या संकल्पाच्या भाषा द्वारे,बाबांच्या पुढे स्पष्ट करत आहेत.बापदादा सर्व मुलांचे आत्मिक संवाद तीन्ही रुपा द्वारे ऐकत आहेत.एक डोळ्यांच्या भाषा द्वारे बोलत आहेत,दोन भावनांच्या भाषा मध्ये,तीन संकल्पाच्या भाषा मध्ये बोलत आहेत.मुखाची भाषा तल साधारण आहे.परंतु या तीन प्रकारच्या भाषा योगी जीवनाच्या भाषा आहेत. ज्याला आत्मिक मुलं आणि आत्मिक पिताच जाणतात आणि अनुभव करतात. जितके जितके अंतर्मुखी गोड शांतीच्या स्वरूपामध्ये स्थितीत होत जाल तेवढे या तीन भाषा द्वारे सर्वाना त्याचा अनुभव करू शकाल.ही अलौकिक भाषा खूप शक्तिशाली आहे.मुखाची भाषा ऐकून किंवा ऐकवून अनेक लोक थकले आहेत.मुखाच्या भाषेद्वारे कोणत्याही गोष्टीला स्पष्ट करायला वेळ लागतो परंतु डोळ्याची भाषा इशारा देण्याची भाषा आहे.मनाच्या भावना ची भाषा,चेहऱ्या द्वारे भाव रूपामध्ये प्रसिद्ध होते.चेहऱ्याचा भाव मनाच्या भावना सिद्ध करतो.जसे कोणीही कोणाच्या समोर जातो,एक तर स्नेहा द्वारे जातो किंवा दुश्मनी द्वारे जातो किंवा कोणी स्वार्थाने जातात,तर त्यांच्या मनातील भाव चेहऱ्या द्वारे स्पष्ट दिसून येतात.कोणी कोणत्या भावना द्वारे आले आहेत,ते डोळ्याद्वारे समजतात.तर भावने ची भाषा चेहऱ्याच्या भावा द्वारे जाणू पण शकतात, बोलू पण शकतात.असेच संकल्पाची भाषा पण खूपच श्रेष्ठ भाषा आहे,सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे,मूळ शक्ती आहे आणि सर्वात तीव्र गतीची भाषा पण संकल्पाची भाषा आहे.कोणी किती ही दूर असेल,कोणते साधन नसतील परंतू संकल्पाच्या भाषेद्वारे कोणाला ही संदेश पाठवू शकतात.अंत काळामध्ये संकल्पाची भाषाच कामांमध्ये येईल.विज्ञानाचे साधन तेव्हा कामाला येणार नाहीत.तेव्हा शांतीचे साधन कामांमध्ये येथे येतील परंतु कोणतेही संबंध जोडण्यासाठी नेहमी लाईन स्पष्ट पाहिजे. जितके जितके एक बाबा आणि त्यांच्या द्वारे ऐकलेले ज्ञान आणि त्याच ज्ञानाद्वारे सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहण्याचे अभ्यासी असतील तेवढेच श्रेष्ठ संकल्पा मुळे लाईन स्पष्ट राहील.व्यर्थ संकल्पच अडथळा आहेत.जितके व्यर्थ समाप्त होतील,समर्थ संकल्प चालतील,तेवढीच संकल्पाची श्रेष्ठ भाषा इतकी स्पष्ट अनुभव कराल.जसे मुखाच्या भाषेद्वारे अनुभव करतात.संकल्पाची भाषा सेकंदामध्ये मुखाच्या भाषे पेक्षा जास्त,अनुभव करू शकते.तीन मिनिटाच्या भाषणाचे रहस्य सेकंदामध्ये संकल्पाच्या भाषेद्वारे अनुभव करवू शकतो.सेकंदामध्ये जीवनमुक्तीचे,जे गायन आहे ते अनुभव करवू शकता.

आंतरमुखी आत्म्याची भाषा च अलोकिक भाषा आहे.आता वेळेनुसार या तीन भाषेद्वारे सहज विजय मिळवू शकतो. कष्ट पण कमी,वेळ पण कमी लागेल परंतु सफलता सहज आहे,म्हणून आता या आत्मिक भाषेचे अभ्यासी बना.तर आज बाप दादा पण मुलांच्या या तीन प्रकारच्या भाषा ऐकत होते आणि त्याला प्रतिसाद देत आहेत.सर्वांच्या अती स्नेहाचे स्वरूप बापदादा पाहून स्नेहाला,स्नेहाच्या सागरा मध्ये सामावत आहेत.सर्वांच्या आठवणीला नेहमी साठी यादगार रुप बनवण्या साठी श्रेष्ठ वरदान देत आहेत.सर्वांच्या मनाच्या वेगवेगळ्या भावाला जाणून,सर्व मुलांच्या प्रती,सर्व भावा चा प्रतिसाद,नेहमी निर्विघ्न भव,समर्थ भव, सर्व शक्तिसंपन्न भवच्या शुभ भावना देत आहेत.बाबांची शुभभावना,जी पण सर्व मुलांची शुभकामना आहे,परिस्थिती प्रमाणे सहयोगाची भावना किंवा शुभ कामना आहे,तर ती सर्व शुभकामना,बापदादाच्या श्रेष्ठ भावने द्वारे संपन्न होत जातील.कधी कधी,चालता-चालता कोणत्या मुलांच्या पुढे जुने कर्मभोग परीक्षेच्या रुपा मध्ये येतात. ते तनाच्या व्याधीच्या रूपामध्ये किंवा मनाच्या व्यर्थ तुफानाच्या रुपमध्ये किंवा संबंध संपर्का च्या रुपा मध्ये येतील.जे खूप जवळ,सहयोगी असतील,त्यांच्या द्वारे पण सहयोगाच्या ऐवजी हलक्या रूपामध्ये टक्कर पण होते,परंतु हे सर्व जुने खाते, जुने कर्ज, समाप्त होत आहेत म्हणून या हलचल मध्ये न जाता,बुद्धीला शक्तिशाली बनवाल तर बुध्दीबळा द्वारे,हे जुने कर्ज, कर्जाच्या ऐवजी नेहमी चे कर्तव्य अनुभव कराल.काय होते,बुद्धिबळ नसल्यामुळे कर्ज,एक ओझ्याच्या रूपामध्ये अनुभव करतात आणि बोज असल्यामुळे बुद्धी द्वारा जे यर्थाथ निर्णय व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाहीत आणि यथार्थ निर्णय न झाल्यामुळे ओझे आणखी खाली घेऊन येते.सफलता ची शिडी कडे जाऊ शकत नाही म्हणून चुक्तू करण्याच्या ऐवजी कुठे-कुठे आणखीच कर्मभोग वाढत जातात,त्यामुळे जुन्या कर्जाला चुक्तू करण्याचे साधन आहे नेहमी आपल्या बुद्धीची लाइन स्पष्ट ठेवा.बुद्धीमध्ये ओझे ठेवू नका,बुद्धीला हलके ठेवाल,तेवढे बुद्धिबळ सफलता प्राप्त करेल,म्हणून घाबरू नका.व्यर्थ संकल्प का आले?काय झाले,कदाचित असे असेल,असे ओझ्याचे संकल्प समाप्त करून बुद्धीची लाईन स्पष्ट ठेवा,हलकी ठेवा तर हिम्मत तुमची मदत बाबांची सफलता सहज अनुभव होत राहील,समजले. डबल लाईट होण्याच्या ऐवजी,डबल ओझे घेतात.एक पाठीमागील कर्मभोग दुसरे व्यर्थ संकल्पाचे ओझे,तर डबल ओझे वरती घेऊन जाईल,की खाली घेऊन येईल म्हणून बाप दादा सर्व मुलांना विशेष लक्ष देण्यास सुचीत करतात,की नेहमी बुद्धीच्या ओझ्या पासुन मुक्त व्हा.कोणत्याही प्रकारचे ओझे,बुद्धी योगाच्या ऐवजी कर्मभोगा मध्ये बदलते,म्हणून नेहमी आपल्या बुद्धीला हल्के ठेवा,तर बुद्धिबळ कर्मभोग नष्ट करेल. सेवेचे वेग वेगळ्या उमंग पण सर्वांचे पोहोचले आहेत.जे जेवढे खऱ्या मनाद्वारे भावना द्वारे सेवा करत आहेत,अशा खऱ्या मनावरती नेहमी साहेब खुश आहेत आणि त्या खुशीची लक्षणे मनाचे संतुष्टता आणि सेवेची सफलता आहे.जे पण आत्तापर्यंत केले आहे आणि करत आहेत ते सर्व चांगले आहे,पुढे चालून आणखी चांगले होणार आहे,म्हणून चोहू बाजूच्या मुलांना बाप दादा नेहमी प्रगती करत रहा, विधीप्रमाणे वृद्धी करत रहा,या वरदानाच्या सोबतच बाप दादा पदम गुणा प्रेमळ आठवण देत आहेत.हाता ने लिहिलेले पत्र किंवा मनाचे पत्र दोघांचा प्रतिसाद बापदादा सर्व मुलांना अभिनंदनाच्या रूपामध्ये देत आहेत.श्रेष्ठ पुरुषार्थ,श्रेष्ठ जीवनामध्ये नेहमी जिवंत रहा,प्रगती करत रहा,अशा स्नेहाच्या श्रेष्ठ भावना सहित सर्वांना प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

बालक च मालक आहेत. आज बाप दादा आपल्या शक्ती सेनेला पहात आहेत की ही आत्मिक शक्ती सेना मनजीत जगजीत आहे?मनजीत म्हणजे मनाचे व्यर्थ संकल्प,विकल्प जीत आहे.असे जिंकलेले मुलं विश्वाचे राज्याधिकारी बनतात म्हणून,मनजीत जगजीत गायन आहे.जेवढे या वेळेत संकल्प शक्ती म्हणजेच मनाला स्वतःच्या अधिकारां मध्ये ठेवतात तेवढेच विश्वाचे राज्याधिकारी बनतात.आता या वेळेत ईश्वरीय बालक आहात आणि आत्ताचे बालकच विश्वाचे मालक बनतील,बालक बनल्या शिवाय मालक बनू शकत नाहीत. जो पण आजच्या मालक पणाचा नशा आहे त्याला समाप्त करून हदच्या मालक पणा मधुन बालकपणा मध्ये यायचे आहे. तेव्हा बालकच मालक बनतील म्हणून भक्ती मार्गामध्ये कोणते कितीही मोठ्या देशाचे मोठे मालक असतील, खूप धनाचे मालक असतील,परिवाराचे मालक असतील परंतु बाबांच्या पुढे सर्व "बालक तुमचे" म्हणून प्रार्थना करतात.मी अमका मालक आहे असे कधीच म्हणत नाहीत. तुम्ही ब्राह्मण मुलं पण बालक बनतात तेव्हाच आत्ता पण बेफिक्र बादशहा बनतात आणि भविष्या मध्ये विश्वाचे मालक किंवा बादशहा बनतात.बालक च मालक आहोत ही स्मृति नेहमी निरहंकारी निराकारी स्थितीचा अनुभव करवते. बालक बनणे म्हणजे हदच्या जीवनाला परिवर्तन करणे.जेव्हा ब्राह्मण पणाचे बनले तर ब्राह्मण पणाच्या जीवनाचा प्रथम सहज धडा कोणता शिकले?मुलांनी म्हटलं बाबा आणि बाबांनी म्हटले मुलगा,म्हणजेच बालक.त्या एका शब्दाच्या धड्या द्वारे ज्ञानसंपन्न बनतो. बालक किंवा मुलगा हा एक शब्दाचा अभ्यास केला तर सार्‍या विश्वाचे काय परंतु तिन्ही लोकांच्या ज्ञानाचा अभ्यास केल्या सारखे आहे.आजच्या दुनिया मध्ये कितीही मोठे ज्ञानी असतील परंतु तिन्ही लोकांचे ज्ञान जाणू शकत नाहीत.या गोष्टीमध्ये तुम्ही एक शब्दाचा अभ्यास केला आहे,या पुढे कितीही मोठे ज्ञानवान पण अज्ञानी आहेत.असे मास्टर ज्ञानसंपन्न किती सहज बनले आहात.बाबा आणि मुलगा एका शब्दांमध्ये सर्वकाही सामावले आहे.जसे बिजा मध्ये सर्व झाड सामावलेले आहे,तर बालक किंवा मुलगा बनणे म्हणजेच नेहमीसाठी माये पासून सुरक्षित राहणे.माये पासून सुरक्षित राहणे म्हणजेच आम्ही बालक आहोत,या स्मृती मध्ये राहणे.नेहमी हीच स्मृति ठेवा मुलगा म्हणजेच सुरक्षित राहणे.हा धडा कठीण आहे का सहज आहे?सहज आहे ना.परत का विसरतात?अनेक मुलं विचार करतात हे आम्ही विसरू इच्छित नाही परंतु विसरतो.का विसरतो ?तर म्हणतात अनेक काळाचे संस्कार आहेत किंवा जुने संस्कार आहेत परंतु जेव्हा मरजीवा बनले तर मेल्यानंतर काय करतात,अग्निसंस्कार करतात.तर जुन्याचे संस्कार केले तेव्हा तर नवीन जन्म मिळाला.जेव्हा संस्कार केला परत जुने संस्कार कुठून आले.जसे शरीराचे संस्कार करतात तर नावरूप समाप्त होते. जर नाव पण घेतील तर म्हणतील अमका होता,आहेत असे म्हणणार नाहीत.तर शरीराचे संस्कार झाल्यानंतर शरीर तर नष्ट झाले.ब्राह्मण जीवनामध्ये कोणते संस्कार करतात.शरीर तर तेच आहे परंतु जुने संस्कार,जुन्या स्मृतीच्या स्वभावाचा संस्कार करतात,तेव्हाच मरजीवा म्हणू शकता. जेव्हा संस्कार केला,तर जुने संस्कार आले कुठून?संस्कार केलेला मनुष्य परत तुमच्यासमोर आला,तर त्याला काय म्हणतात,भूत म्हणणार ना?तर हे पण जुने संस्कार केलेले,जर जागृत होतात,तर काय म्हणणार,हे पण मायचे भूत म्हणनार ना. भुतांना पळवले जाते ना? वर्णन पण केले जात नाही.हे जुने संस्कार म्हणून आपल्याला च धोका देतात. जर तुम्हाला जुन्या गोष्टी चांगल्या वाटतात,तर वास्तव मध्ये जुन्यात जुन्या,आदी काळाच्या संस्काराची आठवण करा.हे तर मध्य काळाचे संस्कार होते.हे प्राचीन नाहीत. मध्यला मध्यभागी(द्वापर चे) म्हणतात.तर मध्य काळ म्हणजेच द्वापरची आठवण करणे म्हणजेच नदी मधील भवऱ्या मध्ये फसणे,म्हणून कधीच अशा कमजोरी च्या गोष्टीचा विचार करू नका.नेहमी हे दोन शब्द आठवणीत ठेवा,बालकच मालक आहेत.बालक पणाच,मालक पणाला स्वतःच स्मृति मध्ये घेऊन येतो.बालक बणने येत नाही का?

बालक बना म्हणजे सर्व ओझ्या पासून हलके बनाल.कधी तुझे,कधी माझे हेच कठीण बनवते.जेव्हा कोणी कठीण अनुभव करतात तेव्हा म्हणतात तुमचे काम तुम्हीच जाना आणि ज्या वेळेस सहज असते त्यावेळेस माझे म्हणतात.माझे पण समाप्त होणे म्हणजेच बालक-पासुन मालक बनणे.बाबा म्हणतात अगदी बेगर बना,हे घर पण तुमचे नाही.हे भाड्याने मिळाले आहे,फक्त ईश्वरी सेवेसाठी बाबा ने भाड्याने देऊन विश्वस्त बनवले आहे. ईश्वरीय ठेव आहे.तुम्ही तर सर्व काही तुझे म्हटले आणि बाबांना दिले हा वायदा केला होता ना, की विसरले?वायदा केला आहे, की अर्धे तुझे,अर्धे माझे.जर सर्व काही तुमचे म्हटले तर माझे समजून कार्यामध्ये लावले तर काय होईल ?त्याद्वारे सुख मिळेल? सफलता मिळेल? म्हणून ईश्वरीय ठेव समजून चालाल तर बालक पासून मालकणाच्या खुशीमध्ये नशेमध्‍ये स्वत:च राहाल, समजले. हा पाठ तर नेहमी पक्का ठेवा.हा पाठ किंवा धडा पक्का केला, की आपपल्या स्थानावरती जाऊन परत विसराल.अभुल बना.अच्छा.

नेहमी आत्मिक नशेमध्ये राहणाऱ्या बालक पासून मालक बनणाऱ्या मुलांना,नेहमी बालपण म्हणजेच बेफिक्र बादशहा च्या स्मृतीमध्ये राहणाऱ्या,सदा ठेव म्हणून मिळालेले विश्वस्त बनवून सेवेमध्ये लावणाऱ्या मुलांना,नेहमी नविन उमंग नवीन उत्साहा मध्ये राहणाऱ्या मुलांना, बाप दादांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
विशेष शब्दाच्या स्मृती द्वारे संपूर्ण तेच्या लक्षा ला प्राप्त करणारे स्व परिवर्तक भव.

नेहमी हीच स्मृती राहावी कि आम्ही विशेष आत्मा आहोत,विशेष कार्याच्या निमित्त आहोत आणि विशेषता दाखवणारे आहोत. हा विशेष शब्द विशेष आठवणीत ठेवा. बोलणे पण विशेष,पाहणे पण विशेष, करणे पण विशेष,विचार करणे पण विशेष, प्रत्येक गोष्टींमध्ये विशेष शब्द वापरल्या मुळे सहज स्व परिवर्तक पासून विश्व परिवर्तक बनाल आणि जे संपूर्णता चे लक्ष आहे त्या लक्ष्याला सहज प्राप्त करू शकाल.

सुविचार:-
विघ्नाला घाबरण्याची ऐवजी परीक्षा समजून त्यातून रस्ता काढा.