08-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो, तुम्हाला फुलासारखे बनुन सर्वांना सुख द्यायचे आहे, फुलासारखी मुलं खूप गोड बोलतील"

प्रश्न:-
फुलासारखे बनणाऱ्या मुलांच्या प्रति भगवंतांची कोणती अशी शिक्षा आहे, ज्याद्वारे ते नेहमीच सुगंधित बनून राहतील?

उत्तर:-
हे माझ्या फुला सारख्या मुलांनो, तुम्ही स्वतःला पहा,माझ्या मध्ये कोणता आसुरी अवगुण रुपी काटा तर नाही?जर मनामध्ये कोणता काटा, अवगुण असेल तर,जसे दुसऱ्यांच्या अवगुणांपासून तिरस्कार येतो,तसेच आपल्या आसुरी अवगुणांचा तिरस्कार करा, तर काटा म्हणजे अवगुण निघून जाइल.स्वतःला पाहत राहा,मन्सा-वाचा -कर्मणा असे कोणते विकर्म तर होत नाहीत,ज्याचा दंड भोगावा लागेल.

ओम शांती।
आत्मिक मुलांप्रति आत्मिक पिता सन्मुख समजावत आहेत.या वेळेत हे रावणराज्य असल्यामुळे मनुष्य सर्व देहाभिमानामध्ये आहेत,म्हणून याला काट्याचे जंगल म्हटले जाते. हे कोण समजवत आहे, बेहद्दचे बाबा. जे आत्ता काट्या पासून फुलासारखे बनवत आहेत.कुठे कुठे माया अशी येते,जे फुलासारखे बनत-बनत परत काट्यासारखे बनतात,याला म्हटले जाते काट्याचे जंगल.यामध्ये अनेक प्रकारच्या जनावरां सारखे मनुष्य राहतात,तसे तर मनुष्यच आहेत परंतु एक दोघांमध्ये जनावरासारखे भांडत राहतात.घरा-घरा मध्ये भांडणं आहेत. विषय सागर मध्ये सर्व बुडलेले आहेत.ही सारी दुनिया मोठा विषयाचा सागर आहे,यामध्ये मनुष्य अखंड बुडत राहतात.याला पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हटलं जाते.आता तुम्ही काट्या पासून फूलांसारखे बनत आहात. बाबांना बागवान पण म्हटले जाते.बाबा सन्मुख समजवतात,गिते मध्ये ज्ञानाच्या गोष्टी आहेत,परत मनुष्यांची चलन कशी आहे,ते भागवत ग्रंथामध्ये वर्णन आहे.काय काय गोष्टी लिहिल्या आहेत.सतयुगामध्ये असे थोडेच म्हणाल.सतयुग तर आहे फुलांची बाग. आता तुम्ही फुलं बनत आहात.फुल बनून परत काही मुलं काटे बनतात. आज चांगली चलन आहे,परत मायाचे वादळ येते,बसल्या बसल्या माया काय हाल करते.बाबा म्हणतात, मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो.भारतवासीं साठीच म्हणतात,तुम्ही विश्वाचे मालक होते,कालची गोष्ट आहे. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, हिरे रत्नांचे महल होते,त्याला म्हटले जाते अल्लाह ची बाग.जंगल येथे आहे,परत बाग पण येथेच असेल ना.भारत स्वर्ग होता,त्यांच्यामध्ये फुलंच फुल होती. बाबा फुलांची बाग बनवतात.फुल बनत-बनत परत संगदोषांमध्ये येऊन खुप बिघडतात,बस बाबा मी तर लग्न करतो.मायेचा भपका पाहतात ना.येथे तर बिल्कुल शांती आहे.ही सर्व दुनिया जंगल आहे.जंगलाला जरूर आग लागेल.तर जंगलामध्ये राहणारे पण नष्ट होतील.तीच आग लागणार आहे जी पाच हजार वर्षांपूर्वी लागली होती,याचे नाव महाभारत लढाई ठेवले आहे.ॲटॉमिक बाॅम्बस द्वारे लढाई तर प्रथम यादवांची लागते,त्याचे पण गायन आहे.विज्ञानाद्वारे मिसाइल्स बनवल्या आहेत.ग्रंथांमध्ये तर खूप गोष्टी लिहिल्या आहेत.बाबा मुलांना समजावून सांगतात,असे पोटामधून थोडेच मुसळ म्हणजे मिसाईल निघू शकतात.आता तुम्ही पाहता, विज्ञानाद्वारे अनेक बॉम्स इत्यादी बनवत राहतात,फक्त दोन बॉम्बस जपानमध्ये पडल्यामुळे अनेक शहरं नष्ट झाली,अनेक मनुष्य आत्म्यांचा मृत्यू झाला.लाखो मनुष्यांचा मृत्यू झाला असेल.आता इतक्या मोठ्या जंगलामध्ये,करोडो मनुष्य राहतात, याला आग लागणार आहे.

शिवबाबा समजवतात,पिता तरीही दयावान आहेत.बाबांना तर सर्वांचे कल्याण करायचे आहे,परत जातील कोठे.ते पाहतील,बरोबर आग लागत आहे,तर बाबांची शरण घेतील.बाबा सर्वांचे सद्गती दाता आहेत.आता तुमच्या बुद्धी मध्ये सर्व ज्ञान आहे.मित्र संबंधी इत्यादी बरोबर पण तोड निभावयाची आहे.त्यांच्यामध्ये आसुरी गुण आहेत,तर तुमच्या मध्ये दैवी गुण आहेत.तुमचे काम आहे दुसऱ्यांना पण शिकवणे, मंत्र देत रहा.प्रदर्शनी द्वारा तुम्ही खूप समजावत राहतात.भारत वासींच्या ८४ जन्माचे गायन केले आहे. आता बाबा आले आहेत,मनुष्यांपासून देवता बनवण्यासाठी म्हणजे नर्कवासी मनुष्यांना स्वर्गवासी बनवण्यासाठी. देवता स्वर्गामध्ये राहतात.आता स्वतःच्या आसुरी गुणांपासून तिरस्कार येतो.स्वतःला पाहयचे आहे,आम्ही दैवी गुण असणारे बनलो आहोत.माझ्या मध्ये कोणता अवगुण तर नाही.मन्सा वाचा कर्मणा मी कोणते असे कर्म तर केले नाही,जे असुरी कार्य आहे.आम्ही काट्यापासून फुलासारखे बनवण्याचा धंदा करतो की नाही?बाबा बागवान आहेत आणि तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी माळी आहात.अनेक प्रकारचे माळी असतात.काही तर आनाडी असतात जे कोणाला आपल्यासारखे बनवू शकत नाहीत.प्रदर्शनीमध्ये तर बागवान जातील ना,माळी जाणार नाहीत.हे माळी पण शिव बाबांच्या सोबत आहेत, म्हणून जाऊ शकत नाहीत.तुम्ही माळीच सेवा करण्यासाठी जातात. चांगल्या चांगल्या माळ्यांना बोलावले जाते.बाबा पण म्हणतात अनाडी मुलांना बोलवू नका.बाबा नाव घेत नाहीत,तिसऱ्या दर्जाचे पण माळी आहेत ना.बागवान प्रेम त्यांनाच करतील,चे चांगले चांगले फुल बनवून दाखवतील,त्यांच्यावरतीच बागवान खुश होतात.मुखाद्वारे नेहमी रत्न काढायचे आहेत म्हणजेच,गोड बोलत राहायचे आहे.कोणी रत्नांच्या ऐवजी दगड काढतील तर बाबा काय म्हणतील.शिवाच्या वरती धोत्र्याचे फुल पण चढवतात ना.चलन तर पाहा कशी आहे.काटे पण चढवतात ना,अर्पण होऊन परत जंगलामध्ये चालले जातात.सतोप्रधान बनण्याऐवजी आणखीनच सतोप्रधान बनत जातात. त्यांची परत काय गत होईल.

बाबा म्हणतात मी एक निष्कामी आहे आणि दुसरे म्हणजे परोपकारी आहे. परोपकार करतो तेही भारतवासी मुला वरती,जे माझी निंदा करतात.बाबा म्हणतात मी या वेळेत येऊन स्वर्गाची स्थापना करतो.कोणाला म्हटले स्वर्गामध्ये चला तर म्हणतात,आम्ही तर येथेच स्वर्गामध्ये आहोत.अरे स्वर्ग तर सतयुगामध्ये असतो ना.कलियुगामध्ये स्वर्ग आला कोठून?कलियुगाला म्हटले जाते नर्क,जुनी तमोप्रधान दुनिया आहे. मनुष्यांना माहित नाही की, स्वर्ग कुठे असतो?स्वर्ग तर आकाशामध्ये समजतात.दिलवाडा मंदिरामध्ये पण स्वर्ग वरती दाखवला आहे,खाली तपस्या करत आहेत.मनुष्य म्हणतात की अमका स्वर्गवासी झाला,स्वर्ग कुठे आहे? सर्वांसाठीच म्हणतात स्वर्गवासी झाले.हा तर विषय सागर आहे. क्षिरसागर विष्णुपुरी ला म्हटले जाते, त्यांनी परत पूजा करण्यासाठी एक मोठा तलाव बनवला आहे,त्यामध्ये विष्णूला बसवले आहे.आता तुम्ही मुलं स्वर्गामध्ये जाण्याची तयारी करत आहात.जेथे दुधाच्या नद्या असतील. आता तुम्ही मुलं फुलासारखे बनत जातात,अशी कोणती चलन नको,जे कोणी म्हणतील हा तर काटा आहे.नेहमी फुलासारखे बनण्यासाठी पुरुषार्थ करत राहा.माया काटा बनवते म्हणून आपली खूप खूप संभाळ करायची आहे.बाबा म्हणतात कमलफुल समान पवित्र बनायचे आहे. बागवान बाबा काट्या पासून फुलासारखे बनवण्यासाठी आले आहेत.आम्ही फुलासारखे बनलो आहोत,हे तपासायचे आहे.फुलासारख्या मुलांना सेवेसाठी जिकडेतिकडे बोलवत राहतात.मुलं लिहतात,बाबा गुलाबाचे फुल पाठवा,म्हणजे हुशार मुलांना सेवेसाठी पाठवा.तसे तर दिसून येते की,हे कोणते फुल आहेत?बाबा म्हणतात मी येतोच तुम्हाला राजयोग शिकवण्यासाठी.ही सत्यनारायणाची कथा आहे.सत प्रजा बनण्याची कथा नाही.राजा-राणी बनाल तर प्रजा पण बनेल ना.आता तुम्ही समजता,राजाराणी किंवा प्रजा कसे क्रमानुसार बनते.गरीब ज्यांच्याकडे दोन चार रुपये पण शिल्लक राहत नाहीत,ते काय देतील. त्यांना पण तेवढेच मिळते,जितके हजार देणाऱ्यांना मिळते.सर्वात जास्त गरीब भारत आहे.कोणालाही आठवत नाही,आम्ही स्वर्गवासी होतो. परंतु अर्थ समजत नाहीत.आज-काल गीता ऐकवणारे पण खूप आहेत.माता पण गिता ऐकवत राहतात.गीता द्वारे कोणता धर्म स्थापन झाला,हे कोणी जाणत नाहीत.कोणी रिद्धी सिद्धी दाखवली बस,असे समजतात ते भगवान आहेत.गायन पण आहे पतित पावन,तर पतित आहेत ना.बाबा म्हणतात विकारांमध्ये जाणे हा क्रमांक एकचा पतित पणा आहे.ही सारी दुनिया पतित आहे,तेव्हाच बोलवतात पतित-पावन या.आता त्यांना यायचे आहे की,गंगा स्नान केल्यामुळे पावन बनायचे आहे.बाबा मनुष्याला देवता बनवण्यासाठी खूप कष्ट घेतात.माझी आठवण करा तर तुम्ही काट्या पासून फुलासारखे बनाल.मुखाद्वारे कधी दगड म्हणजे कटूवचन काढायचे नाहीत. फुलां सारखेपणा बना.हे पण शिक्षण आहे ना.काही मुलांसाठी चालता-चालता ग्रहचारी बसते,ते नापास होतात.आशावादी पासून निराशवादी बनतात,परत म्हणतात आम्ही बाबांच्या जवळ जाऊ.इंद्र सभेमध्ये पतित थोडेच येऊ शकतात. इंद्रसभा आहे ना.ब्राह्मणी जी घेऊन येते,त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. ते विकारांमध्ये गेले,तर ब्राह्मणी वरती जवाबदारी राहते म्हणून सांभाळ करून, कोणाला घेऊन यायला पाहिजे.पुढे चालून तुम्ही पाहाल साधू-संत इत्यादी सर्व बाबांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहतील.भिष्म पितामहा पण इत्यादी चे नाव तर आहे ना.मुलांची खूप विशाल बुद्धी पाहिजे. तुम्ही कोणाला सांगू शकता भारत फुलांचा फुलांची बाग होता,देवी-देवता राहत होते.आता तर काटे बनले आहेत. तुमच्या मध्ये ५ विकार आहेत ना.रावण राज्य म्हणजे जंगल.बाबा येऊन फुलांसारखे बनवतात, तर विचार करायला पाहिजे,आम्ही गुलाबाचे फुल नाही बनलो, तर जन्मजन्मांतर रुईचे फुल बनू.प्रत्येकाला स्वतःचे कल्याण करायचे आहे.शिवबाबांवरती उपकार थोडेच करतो. उपकार तर स्वतःवरतीच करायचा आहे.आत्ता श्रीमतावर चालायचे आहे.बागेमध्ये कोणी गेले तर सुगंधित फुलंच पाहतील.रुईचे फुल थोडेच पाहतील. फुलांचा शो असतो ना.हा पण फुलांचा शो आहे.खूप मोठे बक्षीस मिळते.खूप चांगले फुल बनायचे आहे. खूप गोड बनायचे आहे. क्रोधीसोबत अगदी नम्रतेने चालायला पाहिजे.आम्ही श्रीमतावर पवित्र बनून पवित्र दुनिया स्वर्गाचे मालक बनू इच्छीतो.युक्त्या तर खूप आहेत.मातांमध्ये त्रिया-चरित्र खूप असतात.पवित्र राहण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे.तुम्ही म्हणू शकता कि भगवानुवाच काम महाशत्रू आहे.पवित्र बना तर सतोप्रधान बनाल. तर आम्ही काय भगवंताचे मानणार नाही.युक्ती द्वारे स्वतःला वाचवायचे आहे.विश्वाचे मालक बनण्यासाठी थोडेफार सहन केले, तर काय झाले? तुम्ही स्वतःसाठीच करतात ना.ते राजाई साठी लढाई करतात,तुम्ही स्वतःसाठी सर्व काही करतात तर पुरुषार्थ करायला पाहिजे.बाबांना विसरल्यामुळे विकारा मध्ये जातात,परत लाज वाटते, आम्ही देवता कसे बनू? अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१)मायेच्या ग्रहचारी पासून वाचण्यासाठी मुखाद्वारे नेहमी ज्ञानाचे रत्न काढायचे आहेत.संगदोषा पासून आपली सांभाळ करायची आहे.

(२) सुगंधित फूल बनण्यासाठी अवगुणांना काढून टाकायचे आहे.
श्रीमतावरती खुप खुप नम्र बनायचे आहे. काम महाशत्रू द्वारे कधी हार खायची नाही.युक्ती द्वारे स्वतःला वाचवायचे आहे.

वरदान:-
नेहमी शक्तिशाली वृत्ती द्वारा सेवेमध्ये तत्पर राहणारे हद्दच्या गोष्टीपासून मुक्त भव.

जसे साकार बाबांना सेवेशिवाय काहीच दिसून येत नव्हते,तसेच तुम्ही मुलं पण आपल्या शक्तिशाली वृत्ती द्वारे,सेवेमध्ये नेहमी तत्पर राहा.तर हद्दच्या गोष्टी स्वतः नष्ट होतील.हद्दच्या गोष्टींमध्ये वेळ देणे,हा पण बाहुल्यांचा खेळ आहे. यामध्ये वेळ आणि शक्ती वाया जाते म्हणून लहान लहान गोष्टी मध्ये वेळ किंवा जमा झालेल्या शक्ती व्यर्थ जायला नको.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर बोल आणि चाल-चलन शक्तिशाली हवी.