08-05-22    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.90  ओम शान्ति   मधुबन


तपस्या हा सर्वात मोठ्यात मोठा सोहळा आहे, तपस्या म्हणजे बाबांच्या आठवणीद्वारे आनंदी राहणे.


आज बापदादा सभोवतालच्या सर्व नवीन ज्ञानाद्वारे, प्रत्येक वेळेत, नवीन जीवन, नवीन दृष्टीकोन, नवीन दृष्टी, नवीन जग अनुभवणाऱ्या मुलांना, प्रेमाचा आशीर्वाद देत आहेत. यावेळी चहूजूबाजूची मुलं, आपल्या ह्रदयाच्या दूरदर्शनच्या माध्यमातून, वर्तमान वेळेतील दिव्य दृश्याला पाहत आहेत. प्रत्येकाचा एकच संकल्प असतो की, दूर असताना पण जवळचा अनुभव करायचा आहे. बापदादा सुद्धा सर्व मुलांना पहात आहेत. प्रत्येकाच्या उमंग उत्साहाचे, मनापासून अभिनंदनाचे संगीत ऐकत आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्नेहा चे संगीत अतिशय सुंदर आहे, त्यामुळे ते सर्वांना एकत्रित स्नेहाचा प्रतिसाद देत आहेत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवा उमंग, उत्साह आणि सदैव तुमच्यात दिव्यत्व येण्यासाठी शुभेच्छा. आज केवळ नवीन वर्षामुळेच शुभेच्छा नाहीत, तर अविनाशी पित्याच्या, अविनाशी प्रेमामुळे संगमयुगातील प्रत्येक क्षण, जीवनात नावीन्य आणणारा आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण अविनाशी पित्याचा अविनाशी आशीर्वाद देणारा आहे. सर्व ब्राह्मण केवळ बापदादांच्या विशेष आनंदाच्या अभिनंदनानेच प्रगती साधत आहेत. ब्राह्मण जीवनाच्या पालनेचा आधार म्हणजे बाबाकडून मिळणाऱ्या शुभेच्छा. या शुभेच्छा मुळेच तुम्ही पुढे जात आहात. पित्याच्या स्वरूपाने सर्वकाळ शुभेच्छा मिळत आहेत. शिक्षकाच्या स्वरूपाने, प्रत्येक वेळी, आदराचे, स्तुतीचे शब्द चांगल्या गुंणाने पास करवत आहेत. सद्गुरूंच्या रूपाने, प्रत्येक श्रेष्ठ कर्माचे आशीर्वाद, तुम्हाला सहज आणि आनंदाचे जीवन अनुभवायला लावत आहेत, म्हणून पद्मपदम भाग्यवान आहात. भाग्यविधाता भगवंताची मुलं बनले आहेत, म्हणजेच ते पूर्ण भाग्याचे हक्कदार झाले आहेत. लोक खास दिवसांच्या खास शुभेच्छा देतात आणि तुम्हाला फक्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळतात, का? जर पहिल्या तारखे नंतर दुसरी तारीख आली तर, शुभेच्छा समाप्त होतील का? प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण तुमच्यासाठी खास आहे. संगमयुग हे विशेष युग आहे, आशीर्वादाचे युग आहे. रोज अमृतवेळाला पित्याचे आशीर्वाद मिळतात ना? हे तर निमित्त मात्र दिवसा साजरा करतात. पण प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मजाच मजा आहे ना? कुणी विचारलं तुमच्या आयुष्यात काय आहे? तर काय उत्तर देणार? मजाच मजा आहे, नाही का? तुम्ही या जीवनात संपूर्ण कल्पातील सुख अनुभवता कारण, पित्याच्या भेटीचा आनंदाचा अनुभव, तुम्हाला सर्व कल्पाचे राज्याधिकारी आणि पुज्य अधिकारी दोघांचा अनुभव करवतो. पुज्यपनाचा आनंद आणि राज्य करण्याचा आनंद, दोघांचे ज्ञान आत्ता आहे, त्यामुळे आत्ता मौज आहे. या वर्षी काय करणार? तुम्ही काही नाविन्य करणार का? हे वर्ष समारंभ वर्षे म्हणून साजरे करा. तपश्चर्या करावी की समारंभ साजरा करावा, असा विचार करत आहात? तपस्या करणे हा सर्वात मोठा सोहळा आहे, कारण हठयोग तर करायचा नाही. तपस्या म्हणजे पित्याच्या आठवणी द्वारे आनंदी राहणे. भेटीचा आनंद, सर्व प्रप्तीचा आनंद, बाप समान स्थितीचा आनंद. त्यामुळे हा सोहळा झाला, नाही का? सेवेचे मोठ मोठे समारंभ केले जाणार नाहीत, परंतु भाषणाच्या सोहळ्यापेक्षा तपस्याचे वातावरण पित्याकडे अधिक आकर्षित करेल. तपस्या हे एक आध्यात्मिक चुंबक आहे आणि आत्म्यांना दुरूनच शांती आणि शक्तीचा अनुभव मिळेल. मग तुम्ही स्वतःमध्ये कोणते नावीन्य आणाल? प्रत्येकाला नावीन्य आवडते, नाही का? तेव्हा नेहमी स्वत:ला तपासा की, या दिवशी तुम्ही तुमच्या मनात, अर्थात संकल्प शक्ती मध्ये कोणते खास वैशिष्ट्य आणले? आणि इतर आत्म्यांची मानसिक सेवा करून, म्हणजे सद्भावना आणि शुभेच्छा देऊन तुम्ही किती वाढ केली? म्हणजेच, उत्कृष्टतेची नवीनता काय आणली? त्यासोबतच शब्दांत गोडवा, समाधान आणि साधेपणा किती नावीन्य आणले? ब्राह्मण आत्म्याचे शब्द सामान्य शब्द नाहीत. स्वतःला आणि इतर आत्म्यांना, आपल्या वचना द्वारे, या तीन गोष्टी अनुभूती करवून द्या, याला नवीनता म्हणाल. त्याच वेळी, प्रत्येक कृतीत नावीन्य, म्हणजेच प्रत्येक कृती स्वत: आणि इतर आत्म्यांना प्राप्तीचा अनुभव देईल. कर्माचे थेट फळ आणि भविष्यातील ठेवींचे फळ अनुभवा. वर्तमान वेळेत, शाश्वत आनंदाचा अनुभव आणि शक्तीच्या प्रसन्नतेचा अनुभव आणि भविष्यातील संचिताचा अनुभव व्हावा. त्यामुळे, तुम्ही नेहमी स्वतःला खूप परिपूर्ण असल्याचा अनुभव घ्याल. कर्माचे बीज प्राप्तीच्या वृक्षाने भरले जावे. रिकामे राहू नका, पूर्ण आत्म्याचा नैसर्गिक नशा अलौकिक आहे. मग असे नवनवीन कृत्ये केलीत का? सोबतच संबंध-संपर्का मध्ये, काय नावीन्य आणायचे आहे? या वर्षी दाताची मुलं, मा. दाता या स्मृती मध्ये अनुभव करा. ब्राह्मण आत्मा असो, वा सामान्य आत्मा असा, कोणीही सान्निध्यात येईल, त्या आत्म्यांना मा. दातांच्या द्वारे प्राप्तीचा अनुभव व्हावा. त्यांना धैर्य मिळो, उमंग आणि उत्साह मिळो, शांती किंवा बळ मिळो, सहज विधी मिळो, आनंद मिळो, अनुभवाच्या वृध्दीची अनुभूती व्हावी. प्रत्येकाला काहीतरी द्यायचे आहे, घ्यायचे नाही, द्यायचे आहे. देण्यामध्ये घेणे सामावलेले आहे. परंतू मज आत्म्याला मा. दाता बनायचे आहे. याप्रमाणे तुम्हाला आपल्या स्वभाव संस्कारात बाप समान बनण्यासाठी नाविन्य आणावे लागेल. माझा स्वभाव नाही, जो बाबांचा स्वभाव, तो माझा स्वभाव. जे ब्रह्माचे संस्कार, तेच ब्राह्मणांचे संस्कार. अशा रीतीने रोज स्वत:मध्ये नवीनता आणल्याने, आपोआपच नवीन जगाची स्थापना होईल. तर समजले, नवीन वर्षात कायकरणार? जे होऊन गेले त्याचा समाप्ती समारंभ साजरे करणे, वर्तमानातील समानता आणि समिपताचा समारंभ साजरा करणे, आणि भविष्यातील चिरंतन यशाचा समारंभ साजरे करणे. उत्सवाचे वर्ष साजरे करा आणि प्रगती करत राहा. तुम्हा दुहेरी परदेशींना आनंदात राहायला आवडते ना. तर आनंदासाठी दोन शब्द लक्षात ठेवा, एक बिंदू (डॉट) आणि दुसरा नाही(नॉट)? नाही कोणाला म्हणायचे आहे, माहित आहे ना. मायेला परवानगी द्यायची नाही. तुम्हाला नाही म्हणता येते ना? का थोडी थोडी परवानगी देणार. बिंदू लावला तर माया येणार नाही. दुहेरी नशा आहे ना. भारतवासी काय करणार? भारत महान देश आहे, ही आज-कालची घोषणा आहे, भारतातील महान आत्म्यांचे म्हणजे महात्म्यांचे पण गायन आहे. तर भारत महान आहे, म्हणजेच भारताचे महान आत्मे आहेत. तर प्रत्येक वेळी आपल्या महानतेने, भारत महान आत्म्यांचे स्थान आणि देवतांचे स्थान साकार रूपात बनवायचे आहे. चित्र समाप्त करुन प्रत्येकाला चैतन्य देवतांचे स्थान दाखवणार ना. तर, दुहेरी परदेशी आणि भारताचे रहिवासी नसून दोघेही आता मधुबनचे रहिवासी आहेत, अच्छा. सभोवतालच्या सर्व मा. दाता आत्म्यांना, पित्याकडून नेहमी आशीर्वाद प्राप्त करणार्‍या विशेष आत्म्यांना, सतत आनंदात राहणार्‍या भाग्यवान आत्म्यांना, स्वतःमध्ये नेहमी नावीन्य आणणार्‍या महान आत्म्यांना, फरिश्ता सो देवता बनणाऱ्या सर्वश्रेष्ठ आत्म्यांना, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. प्रत्येक क्षणाच्या शुभेच्छा आणि नमस्ते.

अव्यक्त बापदादांची संगठन सोबत वार्तालाप:-

(१) अचल अडोल आत्मा आहात, असा अनुभव करता का? एका बाजूला हलचल आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ब्राह्मण आत्मे सदैव अचल आहात. जितकी जास्त हलचल, गोंधळ होईल, तितका तुमचा अचल स्थितीचा अनुभव वाढत आहे. काहीही झाले तरी, नवीन काहीच नाही, ही अचल राहण्याची सर्वात सोपी युक्ती आहे. कोणती नविन गोष्ट नाही. काय चालले आहे, काय होईल, याचे कधी आश्चर्य वाटते का? जेव्हा एखादी नवीन गोष्ट असेल, तेव्हाच आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार केला नसेल, ऐकले नसेल, समजले नसेल आणि अचानक घडले, तर आश्चर्य वाटते. त्यामुळे आश्चर्यचकित होऊ नका परंतु पुर्णविराम लावा. दुनिया गोंधळून जाणार आहे आणि आपण आनंदात राहणार आहोत. जगातील मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळून जातील, काय करावे, कसे करावे. . . आणि तुम्ही नेहमी मजेत राहाल. ब्राह्मण म्हणजे सुख, क्षत्रिय म्हणजे गोंधळून जाणे, कधी आनंद तर कधी गोंधळ. तुम्ही सर्व स्वतःचे नाव, ब्रह्माकुमार आणि कुमारी म्हणतात ना. क्षत्रिय कुमार आणि क्षत्रिय कुमारी तर नाहीत ना? तुम्ही नेहमी तुमच्या नशिबाच्या आनंदात राहा. हृदयात नेहमी एक गाणे वाजत राहायला पाहिजे, वाह बाबा आणि वाह माझे भाग्य! हे गाणे वाजत राहते. याला वाजवण्याची पण गरज नाही. ते कायम वाजत राहते. हाय हाय संपले, आत्ता वाह! वाह! हाय हाय म्हणणारे खूप आणि वाह वाह म्हणणारे फार कमी आहेत. तर नवीन वर्षात काय लक्षात ठेवणार? वाह!वाह!जे समोर पाहिलं, जे ऐकलं, जे बोलले सर्व वाह-वाह! हाय-हाय, नाही. हाय, काय झालं! नाही, व्वा, छान झाले. कोणी वाईट करू द्या, परंतू तुमच्या सामर्थ्याने वाईटाला चांगल्यामध्ये बदला. हेच परिवर्तन आहे, नाही का? तुमच्या ब्राह्मण जीवनात काहीही वाईट घडत नाही. कुणी शिवी जरी दिली, तरी त्याचे पण धन्यवाद कारण त्यांनी सहनशक्तीचा धडा शिकवला. बलिहारी तर झाली ना, जे तुमचे मास्टर बनले! माहिती तर झाले, किती सहनशक्ती आहे, ते कळलं, तर वाईट झालं की चांगलं झालं? ब्राह्मणांच्या दृष्टीने वाईट होत नाही. ब्राह्मणांच्या कानात वाईट ऐकू येत नाही, म्हणूनच ब्राह्मण जीवन, हे सुखाचे जीवन आहे. आत्ता वाईट, आत्ता चांगले, तर अशाप्रकारे आनंद मिळू शकत नाही. मजा नेहमीच मजा असते. सर्व कल्पांमध्ये ब्रह्माकुमार आणि कुमारी उच्च आहात. ब्राह्मणांसमोर देव आत्मेसुद्धा काहीच नाहीत. सदैव या नशेत राहा, नेहमी आनंदी राहा आणि इतरांना नेहमी आनंदी ठेवा. राहा आणि ठेवा. मी आनंदी आहे, असे नाही. मी सर्वांना आनंदी ठेवतो, हे देखील असू द्या. मी आनंदी आहे, हा देखील स्वार्थ आहे. ब्राह्मणांची सेवा काय आहे ? तुम्ही आनंदासाठीच ज्ञान देता.

(२) जगातील सर्वश्रेष्ठ आत्म्यांपेक्षा पण तुम्ही श्रेष्ठ आहात. बाबा तुमचे झाले. तर तुम्ही किती महान झाले! सर्वोत्कृष्ट ठरले. हे नेहमी तुमच्या स्मरणात ठेवा की, सर्वोच्च पित्यानी तुम्हाला सर्वोच्च आत्मा बनवले आहे. दृष्टी किती उच्च झाली आहे, वृत्ति किती उच्च झाली आहे? सर्व काही बदलले. आता तुम्ही कोणाकडे ही बघितले, तर तुम्ही अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहाल आणि सर्वांप्रती कल्याणाची वृत्ती विकसित केली आहे. ब्राह्मण जीवन, म्हणजेच प्रत्येक आत्म्याप्रती पाहण्याची दृष्टी आणि वृत्ती श्रेष्ठ बनवणे.

(३) तुम्ही यशाचे तारे आहात, असे तुम्ही अनुभव करता का? जिथे सर्वशक्ती आहेत, तिथे यश हे जन्मसिद्ध अधिकारी आहे. तुम्ही कोणतेही काम करा, मग ते शरीराचे भरण पोषणाच्या दृष्टीने असो, ईश्वरीय सेवेच्या भावनेने असो, काम करण्यापूर्वी हा निश्चिय ठेवा. निश्चय असणे ही, चांगली गोष्ट आहे, परंतु विश्वासाने व्यावहारिक अनुभवी आत्मा बनून, निश्चय आणि नशेमध्ये राहा. सर्व शक्ती या ब्राह्मण जीवनातील यशाचे सोपे साधन आहेत. सर्व शक्तींचे स्वामी आहात, म्हणून जेव्हा आपण कोणत्याही शक्तीला आदेश द्याल, तेव्हा उपस्थित राहवेत. जसे काही सेवक असतात, जे तुम्ही आदेश दिल्यावर सेवा करण्यास तयार असतात, त्याचप्रमाणे सर्व शक्ती तुमच्या आज्ञेखाली असावेत. जितके तुम्ही सर्वशक्तिमान स्वामीच्या आसनावर विराजमान आहात, तितकेच सर्व शक्ती नेहमी, तुमच्या आदेशानुसार राहतील. स्मृतीच्या आसनावरून थोडेसेही खाली आले, तर शक्ती आदेशाचे पालन करणार नाहीत. सेवक पण काही आज्ञाधारक असतात आणि काही थोडे वर खाली करणारे असतात. तर मग सर्वशक्ती तुमच्या पुढे कशा आहेत? आज्ञाधारक आहेत की, थोड्या वेळाने पोहचतात? ज्याप्रमाणे या शारीरिक कर्म इंद्रिया, जेव्हा तुम्ही आदेश देता, त्या वेळी त्या आदेशानुसार कार्य करतात, त्याचप्रमाणे या सूक्ष्म शक्तींनीही तुमच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. सर्वशक्ती दिवसभर व्यवस्थित आहेत का? हे तपासा. कारण जेव्हा या सर्वशक्ती आतापासून तुमच्या आज्ञेवर असतील, तेव्हाच तुम्ही अंतकाळी यश मिळवू शकाल. यासाठी खूप सराव करावा लागेल. तर, या नवीन वर्षात, शक्तींनी आदेशांचे पालन करावे, यासाठी विशेष सराव करायचा आहे, कारण तुम्हाला जगाचे राज्य प्राप्त करायचे आहे, नाही का? जागतिक राज्य अधिकारी होण्याआधी, प्रथम स्वराज्य अधिकारी व्हा. आत्मविश्वास आणि नशा प्रत्येक मुलाला, उडत्या कलेचा अनुभव करवत आहेत. उडती कलाच्या वेळी आलेले, दुहेरी परदेशी भाग्यवान आहेत. चढण्याचे कसलेही कष्ट करावे लागले नाही. विजयाचा टिळा सदैव मस्तकावर चमकत आहे. हाच विजयाचा टिळा इतरांना आनंद देईल, कारण विजयी आत्म्याचा चेहरा नेहमीच प्रसन्न असतो. तर तुमचा आनंदी चेहरा पाहून प्रत्येकजण आनंदाच्या मागे आकर्षित होतात, कारण जगातील आत्मा आनंदाच्या शोधात असतात आणि जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसेल, तेव्हा ते स्वतः पण आनंदी होतील. त्यांना समजते की, यांना काहीतरी मिळाले आहे. पुढे चालून तुमचे चेहरे आनंदाच्या आकर्षणामुळे आणखी जवळ आणतील. कोणाला ऐकायला वेळ नसला तरी, तुमचा चेहरा क्षणार्धात त्या आत्म्यांची सेवा करेल. प्रेम आणि आनंद पाहूनच, तुम्ही सर्व ब्राह्मण झालात ना? तर तपस्या वर्षात अशी सेवा करा.

(४) एक पिता, दुसरा न कोणी, अशा परिस्थितीत सतत स्थिर राहणारे सहयोगी आत्मा आहेत का? एकाची आठवण करणे तर सोपे आहे ना. अनेकांची आठवण करणे कठीण असते ना. अनेक विस्ताराला सोडून, सार स्वरुप एकच पिता, या अनुभवात खूप आनंद आहे. आनंद हा जन्मसिद्ध हक्क आहे, पित्याचा खजिना आहे, तर तो खजिना मुलांचा जन्मसिद्ध अधिकारी असतो. आपला खजाना असेल, तर स्वतःच्या खजान्या वर नशा असतो, आणि तो तुम्हाला मिळाला कोणाकडून ? अविनाशी पित्याकडून. तर अविनाशी पिता, जे काही देईल, ते तुम्हाला अविनाशी देतील. या अविनाशी खजिन्याचा नशाही अविनाशी आहे. या नशेतून कोणीही मुक्त होऊ शकत नाही कारण हा हानिकारक नशा नाही. हे प्राप्त करण्यासाठीचा नशा आहे. तो व्यर्थ नशा, प्राप्ती गमावणारा नशा आहे. तुम्हाला नेहमी काय आठवते? एक बाबा, दुसरे कोणी नाही. दुसरा तिसरा आला, तर खिटखिट होईल, आणि जर एकच बाबा असतील तर समान अवस्था असेल. एक बाबाच्या रसात मग्न राहणे, खूप छान वाटते कारण आत्म्याचा मूळ स्वभाव एकरस आहे.

निरोपाच्या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुभेच्छा:-

आजूबाजूच्या सर्व प्रेमळ आणि भाग्यवान मुलांना, विशेष नवीन उमंग आणि, उत्साहाच्या प्रत्येक क्षणाच्या शुभेच्छा. तुम्ही स्वतः हिरा आहात आणि जीवन देखील हिरा आहे आणि तुमची नेहमी हिऱ्यासारखी सकाळ, संध्याकाळ आणि हिऱ्याची रात्र राहावी. या पध्दतीने, लवकरच तुम्ही तुमचे राज्य स्थापन कराल आणि राज्य कराल. तुमचे राज्य प्रिय आहे, नाही का? तर, आता लवकर आणा आणि त्यावर राज्य करा. आपले राज्य समोर दिसतंय ना? तर, आत्ता देवदूत बनून देवता बना. चहूबाजूच्या मुलांना विशेष पद्मगुणा प्रेम पुर्वक आठवण स्विकार करा. परदेशी किंवा देशवासी तपस्याच्या उमंग आणि उत्साहात चांगले आहे आणि जिथे तपस्या असते तिथे सेवा अवश्य असते. तुम्हाला सदैव यशाच्या शुभेच्छा. सर्व जग तुमच्याकडे पाहील, अशी नविनता दाखवा. नवीनतेचे प्रकाशगृह बना. अच्छा. प्रत्येकाने स्वतःसाठी प्रेमपुर्वक आणि शुभेच्छा स्वीकार करा.

वरदान:-
शुद्ध विचार आणि श्रेष्ठ संगती द्वारे हल्के बनून आनंदाची रास करणारे, अलौकिक फरिश्ता भव.

तुमच्या ब्राह्मण मुलांसाठी, तुमची रोजची मुरली शुद्ध विचार आहे. तुम्हाला रोज सकाळी बाबाकडून कितीतरी शुद्ध विचार मिळतात, या शुद्ध विचारांमध्ये तुमची बुद्धी व्यस्त ठेवा आणि सदैव बाबाच्या सहवासात राहा, तर तुम्ही प्रकाशमय होऊन आनंदात नाचत राहाल. आनंदी राहण्याचा सोपा मार्ग, म्हणजे नेहमी हलके राहणे. शुद्ध विचार हलके असतात आणि फालतू विचार जड असतात. म्हणून नेहमी शुद्ध विचारात व्यस्त राहा, हलके बना आणि आनंदाचा रास करत राहा, तेव्हाच तुम्हाला अलौकिक, फरिश्ता देवदूत म्हटले जाईल.

सुविचार:-
सहज योगी जीवन हे, परमात्म प्रेमाच्या पालनेच स्वरूप आहे. .