08-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमच्या शिक्षणाचा पाया पवित्रता आहे,जर पवित्रता आहे तरच योगाची शक्ती मिळू शकेल,योगाची शक्ती असेल तर वाणीमध्ये पण शक्ती येईल"

प्रश्न:-
तुम्हा मुलांना आता कोणता प्रयत्न पूर्ण रीतीने करायचा आहे?

उत्तर:-
डोक्यावरती विकर्माचे जे ओझे आहे,त्याला उतरवण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करायचा आहे.बाबांचे बनून जर विकर्म केले तर खूप जोरात पडाल.ब्रह्मकुमार-कुमारींची जर निंदा केली,कोणते कष्ट दिले तर,खूप पाप होईल,परत ज्ञान ऐकणे ऐकवण्या पासून काहीच फायदा नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत की,तुम्ही पतीता पासून पावन बनून,पावन दुनियेचे मालक कसे बनवू शकतात?पावन दुनियेला स्वर्ग किंवा विष्णुपुरी लक्ष्मीनारायण चे राज्य म्हटले जाते. विष्णू म्हणजे लक्ष्मीनारायण चे एकत्रित चित्र बनवले आहे म्हणून समजवले जाते.विष्णूची जेव्हा पूजा करतात तर समजून येत नाहीत की, हे कोण आहेत?महालक्ष्मीची पूजा करतात परंतु समजत नाहीत की,ही कोण आहे? बाबा आता तुम्हा मुलांना वेगवेगळ्या रीतीने समजवतात,तर चांगल्या रीतीने धारण करा.कोणाकोणाच्या बुद्धीमध्ये राहते की,परमात्मा तर सर्वकाही जाणतात.आम्ही जे काही चांगले किंवा वाईट करतो,ते तर सर्वच जाणतात,आता याला अंधश्रद्धेचा भाव म्हटले जाते.भगवान या गोष्टीला जाणत नाहीत.तुम्ही मुलं जाणतात भगवान तर पतीतांना पावन बनवणारे आहेत.पावन बनवून स्वर्गाचे मालक बनवतात,परत जे चांगल्या रीतीने ते शिकतील तर उच्चपद मिळवतील.बाकी असे समजायचे नाही की,भगवान तर सर्वांच्या मनातील जाणतात.हे परत बेसमजी म्हटले जाते.मनुष्य जे काही काम करतात,त्यांचे चांगले किंवा वाईट करतात,त्याचे फळ वैश्विक नाटकानुसार त्यांना मिळतेच.यामध्ये बाबांचा काही संबंध नाही.हा विचार कधीच करायचं नाही की,बाबा तर सर्वकाही जाणतात.अनेक जण विकारांमध्ये जातात,पाप करत राहतात आणि परत मधुबनमध्ये किंवा सेवाकेंद्रावरती पण येतात. ते परत असे समजतात,बाबा तर जाणतच आहेत परंतु बाबा म्हणतात मी हा धंदा करत नाही.जानी-जानहार अक्षर चुकीचे आहे.तुम्ही बाबांना बोलवतातच येऊन पतितांना पावन बनवा,स्वर्गाचे मालक बनवा,कारण जन्म जन्मांतरचे डोक्यावरती खूप पापं आहेत,या जन्माचे पण आहेत. या जन्माचे पाप सांगतात पण. अनेकांनी असे पाप केले आहेत,जे पावन बनणे थोडे कठीण जाते.मुख्य गोष्ट पावन बनण्याची आहे.हे शिक्षण तर खूप सहज आहे परंतु विकर्माचे ओझे कसे उतरेल,यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.असे खूप आहेत, जे खूप पाप करतात,सेवेमध्ये खूप विघ्न घालतात.ब्रह्माकुमारी आश्रमाला कष्ट देण्याचा प्रयत्न करतात,यांचे खूप पाप होते.ते पाप ज्ञान इत्यादी दिल्यामुळे नष्ट होणार नाहीत.ते योगाद्वारे पाप नष्ट होतील. प्रथम योग पूर्ण रीतीने करायला पाहिजे,तेव्हाच कोणाला पण ज्ञानाचा बाण लागू शकेल.प्रथम पवित्र बना, योगी बना,तेव्हाच वाणी मध्ये शक्ती येईल,नाही तर कोणाला कितीही समजावून सांगा,कोणाच्या बुद्धीला पटणार नाही,ज्ञानाचा बाण लागणार नाही.जन्म जन्मांतर चे पाप आहेत ना.जन्म जन्मांतराचे पाप आहेत ना.आत्ता जे पाप करतात,ते जन्म जन्मांतरा पेक्षा खूप होतात,म्हणून गायन केले जाते,सद्गुरूचे निंदक श्रेष्ठ पद मिळवू शकत नाहीत.हे सत्य पिता,सत्य शिक्षक,सद्गुरु आहेत. बाबा म्हणतात ब्रह्मकुमार-कुमारी ची निंदा करणाऱ्यांचे खूप पाप होते. प्रथम स्वतः पावन बनवा.कोणाला समजून सांगण्याची खूप आवड आहे परंतू योग काहीच नाही,याद्वारे फायदा काय होईल?बाबा म्हणतात मुख्य गोष्ट आठवण करून पावन बनण्याचे आहे.पावन बनण्यासाठीच बाबांना बोलवतात.भक्तिमार्गा मध्ये सवय झालेली आहे,अनेक ठिकाणी तीर्थयात्रेला जाण्याची,धक्के खाण्याची,फालतू आवाज करत राहतात.प्रार्थना करतात परंतु भगवंताला कान नाहीत,काना शिवाय मुखा शिवाय,कसे ऐकतील किंवा बोलतील?ते तर अव्यक्त आहेत.सर्व अंधश्रद्धा आहे,तुम्ही बाबांची जितकी आठवण कराल,तेवढे पाप नाहीसे होतील.असे नाही की बाबा जाणतात,हे खूप आठवण करतात,हे कमी आठवण करतात.हे तर तुम्ही स्वतःची दिनचर्या किंवा चार्ट तपासायला पाहिजे.बाबांनी म्हटले आहे,आठवणी द्वारेच तुमचे विकर्म विनाश होतील.बाबा पण तुम्हाला विचारतात,किती आठवण करतात? चलन द्वारे पण माहिती होते. आठवणीशिवाय पाप नष्ट होऊ शकत नाहीत.असे नाही कोणाला ज्ञान ऐकवतात तर तुमचे किंवा त्यांचे पाप नष्ट होतील,नाही.जेव्हा स्वतः आठवण कराल,तेव्हाच पाप नष्ट होतील.मुख्य गोष्ट पावन बनण्याची आहे.बाबा म्हणतात माझे बनले आहात,तर कोणतेही पाप करू नका, नाहीतर खूप विकारात जाल,परत इच्छा पण ठेवायची नाही की,मी चांगले पद मिळवू शकतो. प्रदर्शनीमध्ये अनेकांना समजवतात तर,बस खुश होतात,आम्ही खूप सेवा केली परंतु बाबा म्हणतात प्रथम तर तुम्ही पावन बना,बाबांची आठवण करा.आठवणी मध्येच अनेक जण नापास होतात.ज्ञान तर खूप सहज आहे,फक्त ८४च्या चक्राला जाणायचे आहे.त्या शिक्षणामध्ये तर खूप लेखा-जोखा शिकवतात,कष्ट घेतात. किती कमावतील?शिकत शिकत मृत्यू झाला तर सर्व काही नष्ट होते. तुम्ही मुलं जितके आठवणीमध्ये राहाल,तेवढी धारणा होईल.पवित्र बनणार नाहीत,तर पाप नष्ट होणार नाहीत,परत खूप सजा खावी लागेल. असे नाही,माझी आठवण तर बाबा जवळ पोहोचते,बाबा काय करतील. तुम्ही आठवण कराल तर तुम्हीच पावन बनाल.बाबा त्यामध्ये काय करतील,काय शब्बासकी देतील? अनेक मुलं आहेत,ते म्हणतात आम्ही तर नेहमीच बाबांची आठवण करत राहतो,त्यांच्या शिवाय आहेच कोण? या पण थापा मारत राहतात, आठवणीमध्ये खूप कष्ट आहेत. आम्ही आठवण करतो की नाही? हे पण समजू शकत नाहीत.असेच म्हणत राहतात,आम्ही तर आठवण करतच राहतो.कष्टाशिवाय कोणी विश्वाचे मालक थोडेच बनू शकतात? उच्चपद मिळू शकत नाही. आठवणीची शक्ती तेव्हाच भरेल, जेव्हा सेवा करून दाखवतील,परत पाहिले जाते,किती सेवा करुन प्रजा बनवली आहे?हे पण तपासले पाहिजे आम्ही किती लोकांना आपल्यासारखे बनवले आहे?प्रजा बनवावी लागेल,तेव्हाच राजाइ पद मिळू शकते.ते तर आता काहीच नाही.योगा मध्ये राहतील,शक्ती भरतील,तेव्हाच कोणाला ज्ञानाचा बाण लागू शकतो.ग्रंथांमध्ये पण आहे ना,अंत काळात भीष्म पितामह, द्रोणाचार्य इत्यादींना ज्ञान दिले.जेव्हा तुमचा पतितपणा नष्ट होईल,आत्मा सतोप्रधान अवस्था पर्यंत येईल,तेव्हा शक्ती भरेल आणि लगेच ज्ञानाचा बाण लागेल.हा कधीच विचार करायचं नाही की,बाबा तर सर्वकाही जाणतात.बाबाला जानण्याची आवश्यकता आहे का? जे करतील त्यांना मिळेल,बाबा साक्षी होऊन पाहत राहतात. मुलं बाबांना लिहितात,आम्ही अमक्या ठिकाणी जाऊन सेवा केली,बाबा विचारतात तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहीले का? मुख्य गोष्ट हीच आहे, बाकी सर्व संग सोडून एका बाबांशी संग जोडायचा आहे.देही अभिमानी बनावे लागेल.घरामध्ये राहत समजावयाचे आहे,ही तर जुनी दुनिया,जुना देह आहे, हे सर्व नष्ट होणार आहे.आपले काम आहे पिता आणि वारसा.बाबा असे नाही म्हणत कि ग्रहस्थ व्यवहार मध्ये राहू नका, कोणाशी बोलू नका. बाबांना विचारतात,लग्नाला जाऊ का? बाबा म्हणतात,खुशाल जावा,तेथे जाऊन सेवा करा.बुध्दीचा योग शिवबाबांशी हवा.जन्म जन्मांतरचे विकर्म आठवणीच्या बळा द्वारेच भस्म होतील. येथे पण विकर्म केले तर, खूप सजा भोगावी लागेल.पावन बनत-बनत विकारांमध्ये गेले तर एकदम मृत्यू होईल,एकदम पुर्जा-पुर्जा होतील.श्रीमतावरती नाही चालले तर खूप नुकसान करतील. पावलो-पावली श्रीमतावर चालले पाहिजे.असे असे पाप करतात, त्यामुळे योग लागू शकत नाही, आठवण करू शकत नाहीत. कोणाला जाऊन म्हणतील,भगवान आले आहेत,त्यांच्यापासून वारसा घ्या तर ते मानणार नाहीत.ज्ञानाचा बाण लागणार नाही.बाबा म्हणतात, भक्ताला ज्ञान ऐकवा,व्यर्थ कोणाला ज्ञान देऊ नका,नाहीतर आणखीनच निंदा करतील.काही मुलं बाबांना विचारतात,बाबा आम्हाला दान करण्याची सवय आहे,आता तर आम्ही ज्ञानामध्ये आलो आहोत. आता काय करायचे?बाबा मत देतात, मुलांनो गरिबांना दान देणारे तर खूप आहेत,गरीब काही भूक मरत नाहीत. फकीरा जवळ इतके पैसे पडलेले असतात, म्हणून या सर्व गोष्टी पासून तुमची बुद्धी बाहेर निघायला पाहिजे. दान पण खूप खबरदारी ने द्यायला पाहिजे.अनेक असे असे काम करतात,काही विचारू नका.स्वतः समजत नाहीत की,आमच्या डोक्यावरती पापाचे ओझे खूप होत आहे.ज्ञान मार्ग काही हसण्या-खेळण्याचा मार्ग नाही.बाबा सोबत परत धर्मराज पण आहे. धर्मराजाच्या मोठ मोठ्या काट्या खाव्या लागतील.असे म्हणतात ना जेव्हा अंतकाळ येतो,तर धर्मराज हिशेब घेतात,तेव्हा माहीत पडते, जन्म जन्मांतरची सजा खाण्यामध्ये काही वेळ लागत नाही.बाबांनी काशी कलवटचे पण उदाहरण समजावले आहे.तो भक्तिमार्ग आहे, हा ज्ञानमार्ग आहे.मनुष्यांचा पण बळी चढवतात, ही पण नाटकांमध्ये नोंद आहे.या सर्व गोष्टीला समजायचे आहे,असे नाही की,हे नाटक का बनले?चक्र मध्ये का आणले?चक्रामध्ये तर येत राहणार. हे अनादी अविनाशी नाटक आहे ना. चक्र मध्ये आले नाही,तर परत दुनियाच राहणार नाही.मोक्ष तर कोणालाही मिळत नाही.जे मुख्य आहेत त्यांना सुद्धा मोक्ष मिळू शकत नाही.पाच हजार वर्षाच्या नंतर परत असे चक्र लावतील.हे पण वैश्विक नाटक आहे ना.कोणाला समजावल्या मुळे,वाणी चालवल्यामुळे,पद मिळणार नाही. प्रथम तर पतीता पासून पावन बनायचे आहे.असे नाही बाबा तर सर्वच जाणतात.बाबा जाणून पण काय करतील.प्रथम तुमची आत्मा जाणते की,श्रीमतनुसार आम्ही काय करतो? किती बाबांची आठवण करतो? बाकी बाबा हे जाणून काय करतीलल? यामुळे काय फायदा आहे?तुम्ही जे काय करता ते तुम्हालाच मिळेल.बाबा तुमच्या कार्यावरून आणि सेवे वरून जाणतात,हा मुलगा चांगली सेवा करतो.अमक्या ने बाबाचे बनून खूप विकर्म केले आहेत,तर त्यामुळे त्यांच्या मुरलीमध्ये शक्ती भरत नाही. ही ज्ञानाची तलवार आहे ना,त्यामध्ये आठवणीची धार पाहिजे.योगबळा द्वारे तुम्ही विश्वावरती विजय मिळवता,बाकी ज्ञानाद्वारे नवीन दुनिया मध्ये उच्चपद मिळवाल. प्रथमतर पवित्र बनायचे आहे,पवित्र बनल्याशिवाय उच्च पद मिळणार नाही.येथे येतात च नरापासून नारायण बनण्यासाठी,पतीत थोडेच नगरपासून नारायण बनतील.पावन बनण्याची पूर्ण युक्ती पाहिजे.जे असाधारण मुलं आहेत,जे सेवाकेंद्र सांभाळत आहेत,त्यांना तर खूप कष्ट घ्यायचे आहेत.इतके कष्ट करत नाहीत,म्हणून वाणीमध्ये शक्ती भरत नाही,ज्ञानाचा बाण लागत नाही. आठवणी ची यात्रा करत नाहीत, फक्त प्रदर्शनीमध्ये अनेकांना समजवत राहतात.प्रथम आठवणी द्वारे पवित्र बनायचे आहे,परत ज्ञान आहे.पावन बनतील तर ज्ञानाची धारणा पण होईल.पतितांना धारणा होणार नाही.मुख्य विषय आठवणीचा आहे.त्या शिक्षणामध्ये पण विषय असतात ना.तुमच्या कडे जरी ब्रह्माकुमार कुमारी बनतात परंतु ब्रह्मकुमार कुमारी बनणे, भाऊ-बहीण बनणे म्हणजे मावशीचे घर नाही,फक्त असेच बनायचे नाही. देवता बनण्यासाठी प्रथम पवित्र जरूर बनायचे आहे,परत राज योगाचे शिक्षण आहे.फक्त ज्ञान घ्याल पवित्र बनणार नाहीत,तर उच्च पद मिळू शकणार नाही.आत्मा पण पवित्र पाहिजे ना,पवित्र बनेल,तेव्हाच पवित्र दुनिया मध्ये उच्च पद मिळू शकेल. पवित्रते वरतीच बाबा जोर देतात. पवित्रते शिवाय कोणाला ज्ञान देऊ शकणार नाहीत,बाकी बाबा काहीच पाहत नाहीत.स्वतः बसले आहेत ना, सर्व गोष्टी समजावत राहतात. भक्तिमार्ग मध्ये भावना चे भाडे मिळते,हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.शरीरा शिवाय बाबा कसे बोलतील,कसे ऐकतील.आत्म्याला शरीर आहे म्हणून ऐकू शकते किंवा बोलू शकते.बाबा म्हणतात मला पण कर्मेंद्रिया पाहिजेत,ज्याद्वारे ऐकू शकेल,जाणू शकेल.काही मुलं समजतात,बाबा तर जाणतात, आम्ही विकारांमध्ये जातो.जर जाणत नाहीत तर,भगवान मानणार नाहीत,असे पण खूप आहेत.बाबा म्हणतात,मी आलो आहे तुम्हाला पावन बनण्याचा रस्ता दाखवण्यासाठी,साक्षी होऊन पाहत राहतो.मुलांच्या चलन द्वारे माहिती होते,हा कुपात्र आहे की सुपात्र आहे. सेवेचा पण पुरावा द्यायला पाहिजे ना.ते पण जाणता,जे करतील त्यांना मिळेल.श्रीमता वरती चालतील,तर श्रेष्ठ बनतील,जर चालणार नाही तर स्वतः खराब बनतील.कोणती गोष्ट समजली नसेल तर तुम्ही विचारू शकता,अंधश्रद्धा ची गोष्ट नाही.बाबा फक्त म्हणतात,आठवणीची शक्ती नाही,तर पावन कसे बनणार? या जन्मामध्ये पण असे पाप करतात काही विचारू नका?ही पाप आत्म्याची दुनिया आहे.सतयुग आहे पुण्य आत्म्याची दुनिया.हे संगम आहे.काही तर बुद्ध आहेत,जे धारणा करू शकत नाहीत.बाबांची आठवण करू शकत नाहीत,परत खूप उशीर होईल.या भंभोरला आग लागेल,परत योगा मध्ये राहू शकणार नाहीत.त्या वेळेत हाहाकार होतो,दुःखाचे डोंगर कोसळतील. हीच काळजी राहायला पाहिजे की,आम्ही आपले राज्य भाग्य बाबा पासून घेऊ.देह अभिमान सोडून सेवेमध्ये लागायला पाहिजे. कल्याणकारी बनायचे आहे.धन वाया घालवायचे नाही.जे लायक नाहीत, अशा पतीतांना कधीच दान द्यायचे नाही,नाहीतर दान देणार्‍या वरती पण पाप चढते.असे नाही की दवंडी द्यायचे आहे की,भगवान आले आहेत.असे स्वतःला भगवान म्हणणारे,भारतामध्ये खूप आहेत, कोणी मानणार नाहीत.हे पण तुम्ही जाणतात,तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे ना,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) शिक्षणासोबतच पवित्र जरूर बनायचे आहे,असे लायक किंवा सुपुत्र बनून, सेवेचा पुरावा द्यायचा आहे.श्रीमतावरती स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे.
(२) स्थूल धन पण वाया घालवायचे नाही,पतीतांना दान द्यायचे नाही.ज्ञान धन पण,पात्र पाहून द्यायचे आहे.

वरदान:-
नेहमी नम्र होण्याच्या विशेषते द्वारे,संपर्क आणि सेवेमध्ये सफल होणारे सफलता मूर्त भव.

ज्या मुलांमध्ये स्वतः नम्र होण्याची विशेषता आहे,ते सहजच सुवर्णयुगाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात.जशी वेळ जशी परिस्थिती असेल, त्याप्रमाणे आपल्या धारणेला प्रत्यक्ष करण्यासाठी,नम्र बनावे लागते,नम्र होणारेच खरे सोने बनू शकतात.जसे साकार पित्याची विशेषता पहिली,जशी वेळ जशी व्यक्ती,तसे रूप,असे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करा,तर सेवा आणि संपर्क सर्वांमध्ये सहज सफलता मुक्त बनाल.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- जिथे सर्वशक्ती आहेत, तेथे निर्विघ्नं सफलता सोबत आहे.