08-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आपल्या हृदयावर हात ठेवून विचारा की, बाबा जे ऐकवतात, ते काय आम्ही अगोदर जाणत होतो, जे ऐकले आहे, ते अर्थ सहीत समजुन आनंदामध्ये राहा"

प्रश्न:-
तुमच्या या ब्राह्मण धर्मांमध्ये सर्वात अधिक शक्ती आहे, कोणती आणि कशी?

उत्तर:-
ब्राह्मण धर्मच आहे, जो साऱ्या विश्वाची, श्रीमताद्वारे सद्गती करतो. ब्राह्मणच साऱ्या विश्वाला शांत बनवतात. तुम्ही ब्राह्मण कुलभूषण देवतांपेक्षा उच्च आहात, तुम्हाला बाबा द्वारे शक्ती मिळाले आहे. तुम्ही ब्राह्मण बाबाचे मदतगार बनतात, तुम्हालाच सर्वात मोठे बक्षीस मिळते. तुम्ही ब्राह्मणच ब्रह्मांडाचे मालक आणि विश्वाचे पण मालक बनतात.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति शिवपिता समजावत आहेत. आत्मिक मुलं जाणतात, आत्मिक पिता प्रत्येक पाच हजार वर्षानंतर, एकाच वेळेत जरूर येतात. कल्प नाव ठेवले आहे, जे सांगावे लागते. या वैश्विक नाटकाचे किंवा सृष्टीचे आयुष्य पाच हजार वर्षाचे आहे. या गोष्टी एक बाबाच समजवतात. हे कधी कोणत्या मनुष्याच्या मुखाद्वारे ऐकले नाही. तुम्ही आत्मिक मुलं बसले आहात, तुम्ही जाणतात बरोबर, आम्हा सर्वांचा पिता एकच आहे. बाबाच आपला परिचय सन्मुख देतात, कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत. कोणाला माहित नाही की, ईश्वर काय वस्तू आहे?जेव्हा त्यांना ईश्वरीय पिता म्हणतात, तर खूप प्रेम असायला हवे. बाबा आहेत, तर जरूर त्यांच्याद्वारे वारसा पण मिळत असेल. इंग्रजीमध्ये पण चांगले अक्षर आहे, ते म्हणतात 'हेवनली गॉडफादर' म्हणजे स्वर्गीय पिता. नवीन दुनियेला स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नर्क म्हटले जाते, परंतु स्वर्गाला कोणी जाणत नाहीत. सन्याशी तर मानतच नाहीत, ते कधी असे म्हणणार नाहीत की, स्वर्गाचे रचनाकार शिवपिता आहेत. स्वर्गीय पिता हे अक्षर खूप गोड आहे आणि स्वर्ग पण प्रसिद्ध आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये, स्वर्ग-नरकाचे, सृष्टीच्या आदी मध्यं अंतचे चक्र बुध्दी मध्ये फिरत राहते. जे-जे सेवाधारी आहेत, ते सर्व एकरस सेवाधारी बनू शकत नाहीत.

तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात. तुम्ही म्हणाल, आम्ही आत्मिक मुलं बाबांच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ मतांवर चालत आहोत. श्रीमद्भगवद्गीतेचे गायन आहे, हा प्रथम क्रमांकाचा ग्रंथ आहे. बाबांचे नाव ऐकून लगेच वारसा आठवणीमध्ये येतो. दुनिये मध्ये कोणी जाणत नाही की, ईश्वरीय पित्याकडून काय मिळते. प्राचीन योग असे म्हणतात परंतु समजत नाहीत की, प्राचीन योग कोणी शिकवला? ते तर कृष्णाला म्हणतात, कारण गिते मध्ये कृष्णाचे नाव लिहिले आहे. आता तुम्ही समजता बाबांनीच राज योग शिकवला, ज्याद्वारे सर्व जीवनमुक्तीला प्राप्त करतात. हे पण समजतात की भारतामध्येच शिवबाबा आले होते, त्यांची जयंती पण साजरी करतात परंतु गीते मध्ये नाव गायब झाल्यामुळे, महिमा पण गायब झाली आहे. ज्याद्वारे साऱ्या दुनियेला सुख शांती मिळते, त्या पित्यालाच विसरले आहेत. याला म्हटले जाते एकाच चूकीचे नाटक. मोठ्यात मोठी चूक ही आहे की, जे त्याला जाणत नाहीत. कधी म्हणतात ते नावारूपा पेक्षा वेगळे आहे, तर कधी कच्छ-मच्छ अवतार म्हणतात, तर कधी दगडा मातीमध्ये आहेत, असे म्हणतात. चूकीमध्ये चूक होत जाते. शिडी खाली उतरत जातात, कला कमी होत जातात. वैश्विक नाटका नुसार, जे बाबा स्वर्गाचे रचनाकर आहेत, ज्यांनी भारताला स्वर्गाचे मालक बनवले, त्यांनाच दगडा मातीमध्ये म्हणतात. आता बाबा समजवतात, तुम्ही कसे शिडी उतरत आले आहात, काहीच कोणाला माहिती नाही. हे नाटक कसे आहे, विचारत राहतात. नविन दुनिया कधी बनली?नवीन सृष्टी कधी होती, तर लाखो वर्षापूर्वी होती असे म्हणतात. असे समजतात जुन्या दुनिया मध्ये खूप वर्ष आहेत, याला अज्ञानाचा अंधकार म्हटले जाते. गायन पण आहे, ज्ञान अंजन सतगुरु ने दिले, अज्ञान अंधार विनाश. तुम्ही समजता रचनाकर बाबा जरूर स्वर्ग स्थापन करतील. बाबाच येऊन नर्काला स्वर्ग बनवतात. रचनाकार बाबाच येऊन सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतात. ते अंतकाळी येतात. वेळ तर लागतो ना. हे पण मुलांना समजवले आहे, ज्ञानासाठी इतका वेळ लागत नाही, जितका योगामध्ये लागतो. ८४जन्माची गोष्ट तर एक कहाणी आहे, आज पासून पाच हजार वर्षापूर्वी कोणाचे राज्य होते, ते राज्य कुठे गेले?

तुम्हा मुलांना सर्व ज्ञान आहे, तुम्ही किती साधारण आहात, अजामील सारखे पापी, अहिल्या, कुब्जा, भिलनी, यांना खूप उच्च बनवतात. बाबा समजवतात, तुम्ही किती श्रेष्ठ बनले आहात. बाबा येऊन समजवतात, जुन्या दुनियाचे हाल पहा, कसे झाले आहेत. मनुष्य तर काहीच समजत नाहीत की, सृष्टीचे चक्र कसे फिरते?तुम्ही आपल्या हृदयावर हात ठेवून विचारा, अगोदर आम्ही हे जाणत होतो का, काहीच नाही. आता तुम्ही जाणता, बाबा परत येऊन आम्हाला विश्वाची बादशाही देतात. कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही की, विश्वाचे बादशाही कशी असते. विश्व म्हणजे सर्व दुनिया. तुम्ही जाणतात, बाबा आम्हाला असे राज्य देतात, जे आमच्या कडून अर्धाकल्प कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तर मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे, बाबा पासून अनेक वेळेस राज्य घेतले आहे. शिवपिता सत्य आहेत, सत्य शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. कधी ऐकले नाही, आता अर्थसहीत तुम्ही समजतात. तुम्ही मुलं आहात, बाबांची आठवण करू शकतात. आजकाल तर लहानपणा मध्ये गुरू करतात, गुरु चे चित्र बनवून पण गळ्यामध्ये घालतात किंवा घरामध्ये ठेवतात. येथे तर पिता, शिक्षक, सद्गुरु सर्व एकच आहेत. बाबा म्हणतात मी सोबत घेऊन जाईल. तुम्हाला विचारतात, तुम्ही काय शिकत आहात?तुम्ही सांगा, आम्ही नवीन दुनिया मध्ये राजाई प्राप्त करण्यासाठी राजयोग शिकत आहोत. हा राजयोग आहे. जसे वकिली योग असतो, तर जरूर बुद्धीचा योग वकिलाकडे जाईल. शिक्षकाची जरूर आठवण तर करणार ना. तुम्ही म्हणाला, स्वर्गाची राजाई मिळवण्यासाठी शिकत आहोत. कोण शिकवत आहेत, शिवबाबा, भगवान. त्यांचे नाव तर एकच आहे जे चालत येते. रथाचे नाव तर नाही, माझे नाव शिव आहे. पिता शिवा आहे आणि रथ ब्रह्मा आहेत. आता तुम्ही जाणतात, हे किती आश्चर्यकारक आहे, शरीर तर एकच आहे. यांना भाग्यशाली रथ का म्हटले जाते, कारण शिवबाबा ची प्रवेशता आहे. तर जरूर दोन आत्मे झाले. हे पण तुम्ही जाणतात आणि कोणाला हा विचार पण येत नाही. भागीरथने गंगा आणली असे दाखवतात, काय पाणी आणले?आता तुम्ही प्रत्यक्षात पहात आहात, काय आणले आहे? कोणी आणले आहे? कोणी प्रवेश केला आहे?शिव पित्याने केला आहे ना. मनुष्या मध्ये पाणी थोडेच प्रवेश करेल. जटा द्वारे पाणी थोडेच निघेल? या गोष्टी वरती मनुष्य कधी विचार करत नाहीत. धर्मामध्ये ताकत आहे, असे म्हणले जाते. तुम्ही सांगा सर्वात जास्त ताकत, कोणत्या धर्मामध्ये आहे. (ब्राह्मण धर्मामध्ये आहे)होय हे तर ठीक आहे. जे काही ताकत आहे ती, ब्राह्मण धर्मामध्ये आहे. दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये ताकत नाही. तुम्ही आता ब्राह्मणा आहात. ब्राह्मणांना शिवबाबा कडून ताकत मिळते, ज्याद्वारे तुम्ही परत विश्वाचे मालक बनतात. तुमच्यामध्ये खूप ताकत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही ब्राह्मण धर्माचे आहोत. कोणाच्या बुद्धीमध्ये बसणार नाही‌. विराट रूप जरी बनवले आहे, परंतु ते पण अर्धे आहे. मुख्य रचनाकार आणि त्यांच्या प्रथम रचनेला कोणी जाणत नाहीत. बाबा रचनाकार आहेत, परत ब्राह्मण शेंडी म्हणजे उच्च आहेत, यांच्या मध्ये ताकत आहे. बाबांची आठवण केल्यामुळे ताकत मिळते. मुलं तर जरूर क्रमानुसार बनतील ना. तुम्ही या दुनिया मध्ये सर्वोत्तम ब्राह्मण कुलभुषण, देवतांपेक्षा उच्च आहात. तुम्हाला ताकद मिळत आहे. सर्वात जास्त ताकद ब्राह्मण धर्मामध्ये आहे. ब्राह्मण काय करतात?साऱ्या विश्वाला शांत बनवतात. तुमचा धर्म असा आहे, जे सर्वांचे सद्गती श्रीमता द्वारे करतात. तेव्हा बाबा म्हणतात, तुम्हाला माझ्यापेक्षा उच्च बनवतो. तुम्ही ब्राह्मण्डाचे पण मालक, तर विश्वाचे पण मालक बनतात. साऱ्या विश्वावरती, तुम्ही राज्य कराल. आता गायन पण करतात, भारत माझा देश आहे. कधी महिमा चे गीत, तर कधी म्हणतात भारताचे काय हाल झाले आहेत?ते जाणत नाहीत की, भारत इतका उच्च कधी होता?मनुष्य समजतात, स्वर्ग किंवा नर्क येथेच आहे. ज्यांना धन, मोटर इत्यादी आहे, ते स्वर्गामध्ये आहेत. हे समजत नाहीत, की स्वर्ग नवीन दुनियेला म्हटले जाते. येथेच सर्व काही शिकायचे आहे. विज्ञानाची कला पण स्वर्गा मध्ये कामाला येईल. हे विज्ञान पण तेथे सुख देईल. येथे तर याद्वारे अल्प काळाचे सुख आहे. तेथे तर तुम्हा मुलांसाठी कायमस्वरूपी सुख असेल. येथेच सर्व शिकायचे आहे, जे परत संस्कार घेऊन जाऊ शकतो. कोणते नविन आत्मे तर येणार नाहीत, जे शिकतील. येथील मुलंच विज्ञान शिकून तेथे येतील. खूप हुशार बनतील. ते सर्व संस्कार घेऊन जातील, परत तेथे कामाला येतील. आता तर अल्प काळाचे सुख आहे. हे बॉम्बस इत्यादी सर्वांना नष्ट करतील. मृत्यू शिवाय शांतीचे राज्य कसे होईल?येथे तर अशांतीचे राज्य आहे, हे पण तुम्हा मुलांमध्ये क्रमानुसार जाणतात. आम्ही अगोदर आपल्या घरी जाऊन, परत सुखधाममध्ये येऊ. सुखधाम मध्ये तर बाबा येत नाहीत. बाबा म्हणतात मला पण वानप्रस्थ रथ पाहिजे ना. भक्तिमार्गामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण करत आलो आहे. संदेशी द्वारा पण दाखवले आहे, कसे भक्त लोक तपस्या, पूजा इत्यादी करतात, देवींना सजवतात, पूजा इत्यादी करून परत समुद्रामध्ये विसर्जन करतात. खूप खर्च होतो. तुम्ही विचारा, हे कधीपासून सुरू झाले, तर म्हणतील परंपरा पासून चालत आले आहे. खूप भटकत राहतात, हे सर्व वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे‌.

बाबांनी अनेक वेळेस मुलांना समजवले आहे, मी तुम्हाला खूप गोड बनवण्यासाठी आलो आहे, हे देवता खूप गोड आहेत. आता तर मनुष्य खूप कडवे आहेत. ज्यांनी बाबांना खूप मदत केली होती, त्यांची पूजा करत राहतात. तुमची पण पूजा होते, पद पण तुम्ही खूप श्रेष्ठ मिळवतात. बाबा स्वतः म्हणतात, मी तुम्हाला माझ्यापेक्षा उच्च बनवतो. उच्च ते उच्च भगवंताचे श्रीमत आहे, कृष्णाचे तर म्हणणार नाही. गीतेमध्ये पण श्रीमत प्रसिद्ध आहे. कृष्ण तर या वेळेत बाबा पासून वारसा घेत आहेत. कृष्णाच्या आत्म्याच्या रथा मध्ये बाबांनी प्रवेश केला आहे. खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. कधी कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही. ज्ञान समजवणार्‍यां ना पण खूप कष्ट लागतात. बाबा खूप चांगल्या रीतीने मुलांना समजावतात. बाबा म्हणतात, सर्वोत्तम ब्रह्मा मुख वंशावळ ब्राह्मण आहेत. तुम्ही खूप सेवा करतात, तर हे बक्षीस मिळते. तुम्ही बाबांचे मदतगार बनतात, तर सर्वांना बक्षीस मिळते, परंतु क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे मिळते. तुमच्यामध्ये पण खूप शक्ती आहे. तुम्ही मनुष्यांना स्वर्गाचे मालक बनवू शकता. तुम्ही आत्मिक सेना आहात, तुम्ही हा बैज लावणार नाहीत, तर मनुष्य कसे समजतील, हे पण आत्मिक मिलिटरी आहेत. मिलिटरी वाल्यांना नेहमी बैज( बिल्ला ) लावलेला असतो. शिवबाबा नवीन दुनियेचेचे रचनाकार आहेत. तेथे देवतांचे राज्य असते, आता नाही. परत बाबा म्हणतात मनमनाभव, सर्व संबंध सोडून माझीच आठवण करा, तर कृष्णाच्या घराण्यामध्ये येऊ शकता. यामध्ये लज्जाची गोष्टच नाही. बाबांची आठवण राहील. शिवबाबा यांच्यासाठी(ब्रह्मा) पण सांगतात, हे नारायणाची पूजा करत होते, नारायणाची मूर्ती नेहमी बरोबर ठेवत होते. चालता फिरता त्यांना पाहत होते. आता तुम्हा मुलांना ज्ञान आहे, तर बैज जरूर लावायला पाहिजे. तुम्ही नराला नारायण बनवणारे आहात. राजयोग पण तुम्हीच शिकवतात. नरापासून नारायण बनवण्याची सेवा करतात, तर स्वतःला तपासायचे आहे, माझ्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत. तुम्ही मुलं बापदादांच्या जवळ येतात, पिता शिवबाबा आहेत, दादा त्यांचा रथ आहे. बाबा जरुर रथाद्वारेच भेटतील ना. बाबा जवळ तुम्ही ताजेतवाने म्हणजे शक्ती भरण्यासाठी येतात. सन्मुख असल्यामुळे आठवण येते. बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बाबांच्या सन्मुख बसले आहात तर जास्त आठवण यायला पाहिजे. आपल्या आठवणी च्या यात्रेला तुम्ही रोज वाढवू शकतात, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःला तपासयाचे आहे की, माझ्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत. जसे देवता खूप गोड आहेत, असे गोड बनलो आहे?

(२) बाबांच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ मतावर चालून आपली राजधानी स्थापन करायची आहे. सेवाधारी बनण्यासाठी सृष्टीच्या आदी मध्य अंताचे, स्वर्ग आणि नर्काचे ज्ञान बुध्दीमध्ये फिरवायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठ भावनांच्या आधारा द्वारे सर्वांना, शांती शक्तीची किरणे देणारे, विश्व कल्याणकारी भव. जसे बाबांच्या संकल्प किंवा बोलमध्ये, डोळ्यांमध्ये नेहमीच कल्याणाची भावना किंवा इच्छा आहे. असेच तुम्हा मुलांच्या संकल्पा मध्ये विश्वकल्याणाची भावना किंवा इच्छा नेहमी हवी. कोणते पण कार्य करत विश्वाचे सर्व आत्मे स्पष्ट रूपामध्ये समोर हवेत. मास्टर ज्ञानसूर्य बनून, शुभ भावना किंवा श्रेष्ठ इच्छाच्या आधारा द्वारे शांती आणि शक्तीचे किरणे देत राहा, तेव्हाच विश्व कल्याणकारी म्हणू शकतो, परंतु यासाठी सर्व बंधनापासून मुक्त स्वतंत्र बना.

बोधवाक्य:-
मी पणा आणि माझे पण हाच देह आभिमानाचा दरवाजा आहे, आता या दरवाज्याला बंद करा.