08-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे,हा पण दैवी गुण आहे, जे हुशार चांगले समजवणारे आहेत, त्यांचे अनुकरण करायचे आहे"

प्रश्न:-
सतयुगा मध्ये कोणताही भक्तीचा रीतिरिवाज नसतो,कारण काय?

उत्तर:-
कारण ज्ञानाचे सागर बाबा ज्ञान देऊन सद्गती मध्ये पाठवतात, भक्तीचे फळ मिळते.ज्ञान मिळाल्यामुळे भक्तीला जसे सोडचिठ्ठी मिळते.जेव्हा ज्ञानाच्या प्रारब्धची वेळ आहे,तर भक्ती,दान, पुण्य करण्याची आवश्यकता नसते. तेथे भक्तीची कोणतीही पध्दत नसते.

ओम शांती।
पतित पावन शिव भगवानुवाच.बाबा सन्मुख मुलांना ज्ञान ऐकवतात.मुलांना समजवले आहे,जेव्हा मी येतो तर पतितांना पावन बनवण्यासाठी ज्ञान ऐकवतो, आणि दुसरे कोणी हे ज्ञान शिकवू शकत नाही.ते भक्ती शिकवतात. ज्ञान फक्त तुम्ही मुलंच शिकतात. तुम्ही स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी समजतात.दिलवाडा मंदिर तुमच्यासमोर आहे.तेथे पण राजयोगाच्या तपस्या मध्ये बसले आहेत.जगदंबा पण आहे,प्रजापिता पण आहेत,कुमारी कन्या,अधर कुमारी पण आहेत.बाबा राजयोग शिकवत आहेत,वरती राजाईचे चित्र आहे.भक्ती त्यांचीच करतात,जे शिकवून गेले आहेत,परंतु त्यांना माहित नाही की राजयोग कोण शिकवून,राजाई स्थापन करून गेले आहेत.तुम्ही मुलंच जाणता भक्ति वेगळी गोष्ट आहे,ज्ञान वेगळी गोष्ट आहे.ज्ञान ऐकवणारे एकच आहेत, दुसरे कोणी ऐकवू शकत नाहीत. ज्ञानाचे सागर एकच आहेत,ते येऊन ज्ञानाद्वारे पतितांना पावन बनवतात. दुसरे जे पण सत्संग आहेत,त्यामध्ये कोणी सत्य ज्ञान शिकवू शकत नाहीत.जरी स्वतःला श्री श्री १०८ जगद्गुरु,भगवान पण म्हणतात,परंतु असे कोणी म्हणत नाहीत की,मी सर्वांचा परमपिता ज्ञानाचा सागर आहे.कोणी परमपिता तर म्हणू शकत नाहीत.हे तर जाणतात की, मी परमपिता पतित पावन आहे.हे ज्ञानाचे मुद्दे बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे ठेवायचे आहेत.मनुष्य म्हणतात,या ब्रह्मकुमारी तर भक्तीला सोडून देतात,परंतु जेव्हा ज्ञान मिळते तर भक्तीला सोडचिट्टी द्यायचीच आहे. असे पण नाही भक्तीमध्ये जातात, तर त्यावेळेस माहिती पडते की, आम्ही ज्ञानाला सोडचिठ्ठी देत आहोत,नाही.ते तर आपोआप रावण राज्यांमध्ये येतात.तर आत्ता तुम्हाला समज मिळाली आहे की,बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. राजयोगाचे ज्ञान आहे,यास भक्ती म्हणणार नाही.भगवान ज्ञानाचे सागर आहेत,ते कधी भक्ती शिकवत नाहीत.भक्तीचे फळ ज्ञान मिळते, ज्ञानाद्वारे सदगती होते.सर्व दुःखी आहेत,म्हणून या जुन्या दुनियेला दुखधाम म्हटले जाते.या गोष्टींना तर तुम्ही मुलं समजतात,बाबा आले आहेत,भक्तीचे फळ म्हणजे सद्गती देण्यासाठी,राजयोग शिकवत आहेत. या जुनी दुनिया आहे,ज्याचा विनाश होणार आहे.आम्हाला नवीन दुनियेत राज्य पाहिजे.हे राजयोगाचे ज्ञान आहे,ज्ञान शिकवणारे परमपिता परमात्मा शिव आहेत,त्यांना ज्ञानसागर म्हटले जाते,कृष्णाला नाही.कृष्णाची महिमा वेगळी आहे. जरूर पुर्वजन्मात श्रेष्ठ कर्तव्य केले आहेत,जे राजकुमार बनले आहेत. आता तुम्ही जाणतात, आम्हाला राजयोगाचे ज्ञान घेऊन नवीन दुनियेमध्ये,स्वर्गाचे राजकुमार राजकुमारी बनू.स्वर्गाला सद्गती दाता,तर नर्काला दुर्गती म्हटले जाते. आम्ही स्वतःसाठी राजयोग स्थापन करत आहोत.बाकी हे ज्ञान घेणार नाहीत,पावन बनणार नाहीत,ते राजधानीमध्ये येऊ शकणार नाहीत, कारण सतयुगामध्ये खूप थोडे देवता असतात.कलियुगांत मध्ये जे इतके मनुष्य आहेत,ते जरूर मुक्तिधाम मध्ये असतील,गायब होऊ शकत नाहीत.सर्व घरी चालले जातात. आत्ता तर मुलांना घराची आठवण राहते की,आता ८४ जन्माचे चक्र पूर्ण होत आहे,नाटक पूर्ण होत आहे. अनेक वेळा चक्र लावले आहे,हे तुम्ही ब्राह्मण मुलंच जाणतात. ब्राह्मण तर बनत जातात.सोळा हजार एकशे आठची माळ आहे.सतयुगाचे मॉडेल रूपं दाखवतात.मोठ्या गोष्टीचे मॉडेल लहान बनवतात.जसे सोन्याची द्वारका दाखवतात,असे म्हटले जाते द्वारका मध्ये कृष्णाचे राज्य होते. आता द्वारका मध्ये म्हणा किंवा दिल्लीमध्ये म्हणा,यमुना चा किनारा तर येथे दिल्लीमध्ये आहे.तेथे तर सागर आहे.हे तर मुलं जाणतात, यमुनाच्या किनाऱ्यावर राजधानी होती.द्वारका राजधानी नाही,दिल्ली प्रसिद्ध आहे.यमुना नदी पण पाहिजे, यमुना नदी ची महिमा आहे.परिस्तान दिल्लीला म्हटले जाते.मोठी गादी दिल्ली मध्येच असेल.आता तर मुलं समजतात,भक्तिमार्ग खलास होऊन ज्ञानमार्ग येईल.येथे दैवी राजधानी स्थापन होत आहे.बाबा म्हणतात पुढे चालून तुम्हा सर्व मुलांना माहिती पडेल,कोण कोण किती गुणांने पास होतात.शाळेमध्ये पण माहित होते, अमके अमके,या क्रमांकाने पास झाले.आता दुसऱ्या वर्गामध्ये जातात.अंत काळात जास्ती माहित होईल,कोण कोण पास झाले,परत परिवर्तन होतील,वर्ग तर मोठा आहे. बेहद्दचा वर्ग आहे.सेवा केंद्र दिवसेंदिवस वृध्दिंगत होत जातील. कोणी येऊन सात दिवसाचा कोर्स चांगल्या प्रकारे करतात.दोन-तीन दिवसाचा कोर्स पण कमी नाही. आपण पाहतो कलियुगाचा विनाश समोर आहे.आत्ता सतोप्रधान बनायचे आहे.बाबा म्हणतात, माझ्याशी योग लावा,तर सतोप्रधान बनाल,पवित्र दुनियेमध्ये याल. भूमिका तर जरूर वठवायची आहे. जसे नाटकांमध्ये कल्पा पूर्वी भूमिका केली होती,भारतवसीच राज्य करत होते परत वृध्दींगत झाले.झाडाची वृध्दी होत जाते.भारतवासी देवी-देवता धर्माचे आहेत परंतु पावन नसल्यामुळे,ते पावन देवतांची पूजा करतात.जसे ख्रिश्चन लोक ख्रिस्ताची पूजा करतात.आदी सनातन देवी-देवता धर्माचे सतयुगामध्ये आहेत.सतयुगाची स्थापना करणारे शिव पिताच आहेत.बरोबर सतयुगामध्ये देवतांचे राज्य होते,तर जरूर एक जन्मपूर्व त्यांनी खूप पुरुषार्थ केला असेल.जरूर संगम युग एकच असेल,जेव्हा जुनी दुनिया बदलून सतयुग येते.कलियुग बदलून सतयुग येणार आहे तर जरुर पतित असतील.बाबांनी समजवले आहे, लक्ष्मीनारायण चे चित्र बनवतात किंवा साहित्य इत्यादी छपाई करतानत,तर त्यामध्ये लिहायला पाहिजे,यांनी या सहज राजयोगाच्या ज्ञानाद्वारे,पूर्वजन्मा मध्ये खूप पुरुषार्थ केला आहे.फक्त राजाराणी तर नसतील ना, प्रजा पण बनते ना. अज्ञान काळामध्ये मनुष्य काहीच जाणत नाही,फक्त पूजा करत राहतात.ते फक्त लक्ष्मी नारायणला पाहत राहतात,ज्ञान काहीच नाही. लोक समजतात,भक्ती शिवाय भगवान मिळू शकणार नाहीत.तुम्ही कोणाला म्हणतात,भगवान आले आहेत,तर तुम्हाला लोक हसतात. भगवंत तर कलियुगाच्या अंत मध्ये येतील,आता कुठून येणार? कलियुगाचा अंत पण का म्हणतात? हे पण समजत नाहीत.तेथे कृष्णाला द्वापर मध्ये घेऊन गेलेत.मनुष्याला जे येते,ते ज्ञानाशिवाय बोलतात, म्हणून बाबा म्हणतात,अगदीच बेसमज झाले आहेत.बाबांना सर्वव्यापी म्हणतात.भक्ती बाहेरून खूप सुंदर दिसून येते.भक्तीची चमक खूप आहे.तुमच्या जवळ तर काहीच नाही.दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये जातात,आवाज जरुर करतील,गित म्हणतील.येथे तर बाबांना हे गीत इत्यादी पण पसंत नाहीत.पुढे चालून हे गित पण बंद होतील. बाबाच या गीत इत्यादींचे रहस्य तुम्हाला समजवतात.तुम्ही अर्थ जाणतात.हे शिक्षण आहे.मुलं जाणतात,आम्ही राजयोग शिकत आहोत.जर कमी शिक्षण घ्याल तर प्रजा मध्ये चालले जाल,म्हणून जे खूप हुशार आहेत,त्यांचे अनुकरण करायला पाहिजे,कारण त्यांचे लक्ष अभ्यासात जास्त असते,त्यामुळे फायदाच होईल.जे चांगले समजवणारे आहेत,त्यांच्यापासून शिकायला पाहिजे.जे चांगले समजतात त्यांना सेवा केंद्रावरती आठवण करतात ना.ब्रह्माकुमारी तर बसली आहे,तरी म्हणतात अमकी यायला पाहिजे.ते समजतात हे मोठे आहेत,हुशार आहेत,असे आहेत तर त्यांचा आदर पण करावा लागेल. मोठ्यांचा नेहमी आदर ठेवला जातो, हे ज्ञानामध्ये आमच्या पेक्षा हुशार आहेत.जरूर यांचा आदर पण करावा लागेल.मोठ्यांचा खूप सन्मान असतो.राष्ट्रपतीचा जरूर जास्त सन्मान असेल.प्रत्येकाची क्रमानुसार इज्जत असते.एक दोघांचा आदर तर ठेवतात ना.वकीला मध्ये पण क्रमानुसार असतात.मोठ्या केस मध्ये मोठा हुशार वकील नेमतात. कोणी कोणी लाखो रुपये घेतात क्रमानुसार तर असतात ना.आमच्या पेक्षा हुशार आहेत,तर त्यांचा आदर ठेवला पाहिजे.सेवा केंद्र सांभाळायचे आहे,तर सर्व कामं पण करायची आहेत.बाबांना सर्व दिवस विचार चालत राहतात,प्रदर्शनी कशी बनवावी,ज्यामुळे पूर्ण लक्षात येईल. पूर्ण लक्ष द्यायचे आहे.तमोप्रधान पासून,सतोप्रधान आम्ही कसे बनू. बाबा सतोप्रधान बनवण्यासाठी आले आहेत,पतित पावन पिताच आहेत. येथे परत म्हणतात,पतित पावनी गंगा आहे,त्यामध्ये पण जन्म-जन्मांतर स्नान करण्यासाठी जातात,पावन तर कोणी बनत नाहीत.हा सर्व भक्ती मार्ग आहे.जेव्हा म्हणतात,पतितपावन या,तर जरूर येतील. संगमयुगा मध्येच येतात आणि एकदाच येतात.प्रत्येकाचे आपापले रितीरिवाज आहेत,जसे नेपाळमध्ये अष्टमीला बळी देतात. लहान मुलाच्या हाता मध्ये बंदूक देऊन चालवतात.ते पण बळी चढवतात,मोठे असतील तर एका झटक्यात बकऱ्याची मान कापतात. कोणी एका झटक्यात मान कापली नाही,तर ते बळी झाले नाही,ते देवी वरती अर्पण झाले नाही,असे समजतात.तो सर्व भक्ती मार्ग आहे. प्रत्येकाचे आपापली कल्पना आहे. कल्पना नुसार अनुयायी बनतात. येथे परत नवीन गोष्टी आहेत,यांना तर मुलंच जाणू शकतात.एकच बाबा सन्मुख सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतात.तुम्हाला खुशी राहते की,आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत,दुसरे कोणी समजू शकत नाहीत.तुम्ही सभांमध्ये म्हणतात, सर्वोत्तम ब्राह्मण कुळभूषण स्वदर्शन चक्रधारी,तर याचा अर्थ तुम्ही समजाल,नवीन कोणी असेल तर संभ्रमित होतात,हे काय म्हणतात. सुदर्शन चक्रधारी तर विष्णू आहेत, या नवीन गोष्टी आहेत ना. तुमच्यासाठी म्हणतात बाहेर मैदान मध्ये या,तर माहित होईल.तुमचा ज्ञानमार्ग आहे.तुम्ही पाच विकाराला जिंकतात,या विकाराशी तुमची लढाई आहे,परत तुम्ही देवता बनतात,आणि दुसऱ्या कोणत्या लढाईची गोष्ट नाही.जेथे देवता आहेत तेथे आसुर असू शकत नाहीत.तुम्ही ब्राह्मणच देवता बनणारे आहात,ज्याच्यासाठी पुरुषार्थ करतात.रुद्र ज्ञान यज्ञा मध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत,ब्राह्मणाशिवाय यज्ञ होत नाही.रुद्र तर शिव आहेत,परत कृष्णा चे नाव कुठून आले? तुम्ही दुनिया पेक्षा अगदीच वेगळे आहेत आणि खूप थोडे आहात.असे म्हणतात चिमण्यांनी सागराला हप केले.ग्रंथांमध्ये अनेक दंतकथा आहेत,आत्ता ते सर्व विसरून माझीच आठवण करा.आत्मा बाबांची आठवण करते ना.बाबा तर एकच आहेत ना.हे परमात्मा किंवा प्रभू म्हणतात,तर त्या वेळेत लिंगाची आठवण येत नाही,फक्त ईश्वर किंवा प्रभू म्हणतात.आत्म्याला शिव पित्याकडून अर्ध्या कल्पाचे सुख मिळाले आहे.तर परत भक्ती मार्गामध्ये आठवण करतात.आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे,आत्म काय आहे, परमात्मा काय आहे. आम्ही सर्व आत्मे मूळ वतन मध्ये राहणारे आहोत,तेथुन क्रमानुसार भूमिका वठवण्यासाठी येतो.प्रथम देवी-देवता येतात.असे म्हणतात ख्रिस्तपूर्व देवी-देवता धर्म होता.पाच हजार वर्षाची गोष्ट,ते लोक म्हणतात,पन्नास हजार वर्षाच्या जुन्या गोष्टी आहेत परंतु पन्नास हजार वर्षांची जुनी गोष्ट कोणती असू शकत नाही.हे वैश्विक नाटक पाच हजार वर्षाचे आहे.मुख्य धर्मच हा आहे.या धर्माचेच घरे इत्यादी असतील.प्रथम तर रजोगुणी बुद्धी होते,आत्ता आणखीनच तमोगुणी बुद्धी बनले आहेत. प्रदर्शनीमध्ये किती समजवतात,कोणी थोडेच समजून घेतात.ब्राह्मणांचे कलम लागणार आहे. तुम्हा मुलांना समजवले आहे ज्ञान वेगळी गोष्ट आहे.भक्ती वेगळी गोष्ट आहे. ज्ञानाद्वारे सदगती होते,यामुळे म्हणतात की,पतित पावन या आणि दुःखापासून मुक्त करा.मार्गदर्शक बनून सोबत घेऊन चला.बाबा येऊन आत्म्यांना घेऊन जातात,शरीर तर सर्व नष्ट होतात,विनाश होईल ना. ग्रंथांमध्ये पण एक महाभारत लढाईचे गायन आहे.असे म्हणतात तीच महाभारताची लढाई आहे,ती तर लागणार आहेच.सर्वांना शिव पित्याचा परिचय देत राहा.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्याचा उपाय एकच आहे.माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि आत्मा माझ्यासोबत येईल.सर्वांना संदेश देत राहा तर सर्वांचे कल्याण होईल,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जे ज्ञान योगामध्ये हुशार आहेत,चांगले समजवतात त्यांचा, संग करायचा आहे.त्यांना सन्मान द्यायचा आहे. कधी अहंकारांमध्ये यायचे नाही.

(2)ज्ञानाच्या नव-नवीन गोष्टी चांगल्या प्रकारे समजायच्या आणि समजून सांगायच्या आहेत.याच खुशी मध्ये राहायचे आहे की,आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत.

वरदान:-
एक बाबांच्या आठवणी मध्ये नेहमी मग्न राहून,एक रस अवस्था बनवणारे साक्षी दृष्टा भव.

आता असे पेपर येणार आहेत,जे संकल्प स्वप्नामध्ये पण नसतील परंतु आपला अभ्यास असं व्हायला पाहिजे,जसे हद्दचे नाटक साक्षी,त्रयस्थ होऊन पाहिले जाते,परत दर्दनाक असेल किंवा हसवायचे असेलं,अंतर राहत नाही. जसे कोणाची हसविण्याची भूमिका असेल,मग ते स्नेही आत्मा किंवा गंभीर भूमिका करणारे असतील, प्रत्येकाची भूमिका त्रयस्थ होऊन पाहा,एकथस अवस्था व्हावी.परंतु अशी अवस्था तेव्हाच राहील,जेव्हा नेहमी एक बाबाच्या आठवणीमध्ये मग्न राहाल.

बोधवाक्य:-
दृढनिश्चया द्वारे आपल्या भाग्याला निश्चित करा,तर नेहमी निश्चिंत राहाल.