08-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आता विदेही म्हणजे अशरीरी बनण्याचा अभ्यास करा, आपल्या विनाशी देहामधून प्रेम काढून एका शिवबाबाशी प्रेम करा"

प्रश्न:-
बेहदच्या जुन्या दुनियेपासून ज्यांना वैराग आले आहे,त्यांची लक्षणं कोणती असतील?

उत्तर:-
या डोळ्यांनी जे काही पाहतील,ते पाहून पण जसे पाहणार नाहीत.त्यांच्या बुद्धी मध्ये असेल,हे सर्व नष्ट होणार आहे,या सर्वांचा मृत्यू झालेला आहे.आम्हाला तर शांतीधाम सुखधाम मध्ये जायचे आहे,तर त्यांचे ममत्त्व नष्ट होत जाईल.योगामध्ये राहून कोणाशी गोष्टी कराल,तर त्यांना पण आकर्षण होईल,त्यांना नशा चढलेला असेल.

गीत:-
ओम नमः शिवाय.

ओम शांती।
बाबा म्हणतात,गोड मुलांनो तुम्ही शिवबाबांना जाणले आहे,परत हे गीत गाणे जसे भक्तिमार्गाचे होते.भक्तिमार्गात शिवाय नमः पण म्हणतात, मात-पिता पण म्हणतात परंतु जाणत नाहीत.शिवबाबा पासून स्वर्गाचा वारसा मिळाला पाहिजे. तुम्हा मुलांना तर बाबा मिळाले आहेत,त्यांच्याद्वारे वारसा मिळत आहे,म्हणून बाबांची आठवण करत चला.तुम्हाला शिवबाबा मिळाले आहेत,दुनियेला मिळाले नाहीत. ज्यांना मिळाले आहेत,ते चांगल्या प्रकारे चालत नाहीत.बाबांच्या सूचना खूप गोड आहेत,आत्म अभिमानी भव,देही अभिमानी भव.बाबा आत्म्याशी गोष्टी करतात.देही अभिमानी पिता,देही अभिमानी मुलांशी गोष्टी करतात.ते तर एकच आहेत.ते मधुबन मध्ये तुम्हा मुलांच्या सोबत बसले आहेत.तुम्ही मुलं जाणता की,बरोबर शिव पिता शिकवण्यासाठी आले आहेत. हे शिक्षण शिवबाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही, न ब्रह्मा,ना विष्णू. हे तर शिव पिता पतितांना पावन बनवतात आणि अमर कथा ऐकवतात.ते पण येथेच येतील ना.अमरनाथ वरती तर ऐकणार नाहीत ना.हीच अमर कथा, सत्यनारायणाची कथा आहे.बाबा म्हणतात,मी तुम्हाला हे ज्ञान येथेच ऐकवतो.बाकी सर्व भक्तिमार्गाच्या दंतकथा आहेत.सर्वांचे सद्गती दाता राम एकच निराकार आहेत,तेच पतित पावन, ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत.ते येतातच जेव्हा, विनाशाचा वेळ असतो.सर्व जगतचे गुरु तर एकच परमपिता परमात्मा होऊ शकतात.ते निराकार आहेत ना. देवतांना पण मनुष्य म्हटले जाते, परंतु ते दैवी गुण असणारे मनुष्य आहेत,म्हणून त्यांना देवता म्हटले जाते.तुम्हाला आत्ता ज्ञान मिळाले आहे, तर ज्ञान मार्गामध्ये अवस्था खूप मजबूत ठेवायचे आहे.जेवढे शक्य होईल, तेवढी बाबांची आठवण करायची आहे. विदेही बनायचे आहे,परत देहाशी प्रेम का करायचे? बाबा तुम्हाला म्हणतात, शिवबाबाची आठवण करुन, त्यांच्याकडे(ब्रह्मा कडे) या.मनुष्य समजतात,ते दादांना भेटण्यासाठी जातात.हे तर तुम्ही जाणता, शिव बाबाची आठवण करून आम्ही त्यांच्याशी भेटतो.तेथे तर निराकारी आत्मे बिंदू आहेत,बिंदुशी तर भेटू शकत नाहीत.तर शिवबाबाशी कसे भेटणार? म्हणून समजवले जाते,हे आत्म्यांनो,स्वतःला आत्म समजून बुद्धीमध्ये ठेवा की,आम्ही शिवबाबांना भेटतो.हे खूप मोठे रहस्य आहे ना.अनेकांना शिवबाबा ची आठवण राहत नाही.बाबा समजवतात,नेहमीच शिवबाबाची आठवण करा,शिवबाबा आम्ही आपल्याला भेटण्यासाठी येत आहोत.बस आपले बनले आहोत. शिवबाबा यांच्यामध्ये येऊन ज्ञान ऐकवतात.ते पण निराकार आत्मा आहेत,तुम्ही पण निराकार आत्मा आहात.एक पिताच आहेत, जे मुलांना म्हणतात माझीच आठवण करा, तेही बुद्धी द्वारे आठवण करायची आहे.आम्ही पित्याच्या जवळ आलो आहोत,बाबा या पतित शरीरामध्ये आले आहेत.आम्ही समोर आल्यामुळेच निश्चय करतो, शिवबाबा आम्ही आपले बनलो आहोत.मुरली मध्ये पण हेच ऐकतात,की माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही जाणतात तेच पतित-पावन पिता आहेत,खरे-खुरे सद्गुरु तेच आहेत.आता तुम्हा पांडवाची परमपिता परमात्माशी प्रीत बुद्धी आहे,बाकी सर्वांची कोणा ना कोणा सोबत विपरीत बुद्धी आहे.त्यांना खुशीचा पारा खूप जोरात चढलेला राहिला पाहिजे.जितकी वेळ जवळ येईल,तेवढी खुशी होत राहते. आमचे आत्ता ८४ जन्म पूर्ण झाले,हा आमचा अंतिम जन्म आहे.आम्ही आपल्या घरी जातो.ही शिडी तर खूप चांगली आहे,यामध्ये खूप कष्ट आहेत.तर मुलांना सर्व दिवस बुद्धी चालवयाला पाहिजे.चित्र बनवणाऱ्यांनी तर खूप विचार सागर मंथन करायला पाहिजे.जे मुख्य आहेत,त्यांचे विचार चालायला पाहिजेत.तुम्ही आव्हान देता की, सतयुगी श्रेष्ठाचारी दैवी राज्यामध्ये नऊ लाखच असतील.कोणी विचारतील,याचा पुरावा काय?तुम्ही सांगा,ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे,सतयुगामध्ये झाड अगदी लहान असेल,धर्म पण एक आहे,तर जरूर मनुष्य पण थोडे असतील. शिडी मध्ये सर्व ज्ञान येते,जसे कुंभकर्णाचे चित्र आहे.तर असे बनवायला पाहिजे,ब्रह्मकुमारी ज्ञान अमृत देत आहेत,ते विष (विकार) मागतात.बाबा मुरली मध्ये सर्व सूचना देत राहतात.प्रत्येक चित्रामध्ये माहिती खुप चांगली आहे. लक्ष्मीनारायणच्या चित्रा वरती सांगा हाच भारत स्वर्ग होता.एक धर्म होता,तर किती मनुष्य असतील. आता तर सृष्टीरुपी वृक्ष खूप मोठे झाले आहे.आता विनाश होणार आहे,जुन्या सृष्टीला परिवर्तन करणारे एकच शिव पिता आहेत.चार पाच चित्र मुख्य आहेत,ज्यामुळे कोणालाही लगेच ज्ञानबाण लागेल. वैश्विक नाटका नुसार दिवसेंदिवस ज्ञानाच्या गोष्टी रहस्य युक्त होत जातात.तर चित्रांमध्ये पण बदल होईल ना.मुलांच्या बुद्धी मध्ये पण बदल होत जातो.अगोदर हे थोडेच समजत होते की,शिवबाबा बिंदू आहेत.असे थोडेच म्हणतील की, अगोदर असे का नाही सांगितले. बाबा म्हणतात सर्व गोष्टी अगोदर थोड्याच समजवल्या जातात.बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत,तर ज्ञान देत राहतील,सुधारणा होत जाईल. अगाऊ थोडेच सांगतील,परत तर कृत्रिम होईल,अचानक काही घटना होते,तर म्हणाल ड्रामा,वैश्विक नाटक.असे नाही,हे व्हायला नाही पाहिजे,मम्मा तर अंत काळापर्यंत राहायला पाहिजे होती,परत मम्मा का चालली गेली.वैश्विक नाटकांमध्ये जे झाले, ते बरोबर आहे.बाबांनी जे पण सांगितले,ते बरोबरच आहे. ड्रामा मध्ये माझी भूमिका अशीच आहे,बाबा पण ड्रामा(पुर्वनियोजित नाटक ) वरती ठेवतात.मनुष्य म्हणतात,ईश्वराची भावी.ईश्वर म्हणतात हे पूर्वनियोजित नाटक आहे.ईश्वराने म्हटले किंवा यांनी म्हटले,नाटकांमध्ये होते.कोणी उलटे काम केले तेही वैश्विक नाटकांमध्ये होते, परत सुलटे होईल.चढती कला जरूर आहे,प्रगती होत जाईल. डोंगरावरती जातात,तर कधी डगमग होतात.ही सर्व मायेची वादळं आहेत. जो पर्यंत माया आहे,विकल्प जरूर येतील. सतयुगा मध्ये मायाच नसते, तर विकल्पाची गोष्टच नाही.सतयुगा मध्ये कधी कर्म, विकर्म होत नाहीत. बाकी थोडे दिवस आहेत,खुशी राहते,हा आमचा अंतिम जन्म आहे. आता अमरलोक मध्ये जाण्यासाठी शिवबाबा पासून अमर कथा ऐकत आहोत.या गोष्टी तुम्हीच समजतात. ते लोक कुठे कुठे अमरनाथ वरती जाऊन धक्के खात राहतात.हे समजत नाहीत की,पार्वतीला कथा कोणी ऐकवली? तेथे तर शिवाचे चित्र दाखवतात अच्छा, शिव कोणामध्ये बसले,शिव आणि शंकर दाखवतात.काय शिवा नी शंकरा मध्ये बसून कथा ऐकवली,काहीच समजत नाहीत.भक्तिमार्गात आतापर्यंत तीर्थ करण्यासाठी जातात,कथा पण वास्तव मध्ये मोठी नाही,वास्तविक मनमनाभव आहे.बस बीजाची आठवण करा.वैश्विक नाटकाच्या चक्राची आठवण करा.जे ज्ञान, बाबा जवळ आहे,ते ज्ञान आमच्या आत्म्यामध्ये पण आहे.ते ज्ञानाचे सागर आहेत,तर आम्ही आत्मा पण मास्टर ज्ञानाचे सागर बनतो.तर नशा चढायला पाहिजे ना.ते आम्ही भावांना (आत्म्यांना) ऐकतो.यामध्ये संशय यायला नाही पाहिजे.बाबांची आठवण करत करत सर्व ज्ञान बुद्धी मध्ये येते.बाबाच्या आठवणी द्वारेच विकर्म नष्ट होतील,ममत्व नष्ट होईल. कोणाचे नाममात्र प्रेम असते,आमचे पण असेच आहे.आता तर आम्ही सुखधाम मध्ये जातो.हे मनुष्य सर्व मृत झालेले आहेत,त्यांच्याशी काय मन लावायचे?शांतीधाम मध्ये जाऊन परत सुखधाम मध्ये येऊन राज्य करू.याला म्हटले जाते जुन्या दुनिये पासून वैराग्य.बाबा म्हणतात, या डोळ्यांनी जे काही पाहतात,ते सर्व नष्ट होणार आहे,त्यानंतर स्वर्गाला पाहाल.आता तुम्हा मुलांना खूप गोड बनायला पाहिजे. योगामध्ये राहून कोणाशी गोष्टी कराल,तर त्यांना बाबांचे खूप आकर्षण होईल.हे ज्ञान असे आहे, बाकी सर्व विसरते.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ज्ञानमार्गामध्ये आपली अवस्था खूप मजबूत बनवायची आहे. विदेही बनायचे आहे.एका बाबांशी खरेखुरे प्रेम करायचे आहे.

(२) वैश्विक नाटकाच्या भावीवरती अडोल राहयचे आहे.वैश्विक नाटकांमध्ये जे झाले,ते बरोबर आहे. कधी डगमग व्हायचे नाही.कोणत्या गोष्टी मध्ये संशय येऊ द्यायचा नाही.

वरदान:-
दाता बनून प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पा मध्ये दान देणारे उदार चित भव.

तुम्ही दाताची मुलं देणारे आहात, घेणारे नाहीत.प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पा मध्ये द्यायचे आहे.जेव्हा असे दाता बनाल तेव्हा, उदारचित महादानी बनाल.असे महादानी बनल्यामुळे स्मरणशक्तीची प्राप्ती स्वतः होते,परंतु देण्यासाठी स्वतः जवळ भंडारा भरपूर पाहिजे.जे घ्यायचे होते,ते सर्व घेतले, बाकी द्यायचे राहिले आहे.तर देत जा, दिल्यामुळे आणखी भंडारा भरत जाईल.

बोधवाक्य:-
प्रत्येक विषयांमध्ये पूर्ण गुण घ्यायचे असतील,तर गंभीरतेचा गुण धारण करा.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य - " एक निराकार परमात्माचे राखीव तन ब्रह्मा तन आहे "

हा तर पूर्ण विषय आहे की, परमात्माच आपल्या साकार ब्रह्मा तना द्वारे येऊन शिकवत आहेत.या गोष्टीवरती खूप जिज्ञासु प्रश्न विचारतात की,अमृत वेळेत निराकार परमात्मा जेव्हा आपल्या साकार तना मध्ये प्रवेश होतात,तर त्या वेळात शरीरामध्ये काय बदल होतो? ते विचारतात की काय,तुम्ही त्या वेळेत बसून त्यांना पाहतात की, कसे परमात्मा येतात? आता यावरती समजावून सांगितले जाते की,परमात्म्याची प्रवेशता ज्यावेळेस होते,त्यावेळेस शरीरामध्ये काही डोळे, चैन बदली होतात, नाही. परंतु आम्ही जेव्हा ध्याना मध्ये जातो,तेव्हा डोळे चैन बदली होतात,परंतु या साकार ब्रह्माची भूमिका तर गुप्त आहे.जेव्हा परमात्मा यांच्या तना मध्ये येतात तर,काहींना माहित पण होत नाही.त्यांचे राखीव तन आहे म्हणून सेकंदामध्ये येतात आणि सेकंदा मध्ये जातात.आता या रहस्याला समजायचे आहे.बाकी असे नाही,कोणती गोष्ट समजली नाही, तर या अभ्यासाला च सोडून द्यायचे आहे.अभ्यास तर दिवसेंदिवस रहस्ययुक्त आणि स्पष्ट होत जाते. सर्व कोर्स एकदम तर शिकू शकत नाहीत.तसे तुम्हाला समजवले जाते, दुसरे जे पण धर्मपिता आहेत,त्यांच्यामध्ये पण आपली पवित्र आत्मा येऊन आपली भूमिका वठवते.परत त्या आत्म्याला सुख-दुःखाच्या खेळामध्ये यायचे आहे, ते परत जाऊ शकत नाहीत, परंतु जेव्हा निराकार सर्वोच्च आत्मा येतात,तर ते सुख-दुःखा पासून वेगळे आहेत.ते फक्त आपली भूमिका वठवतात आणि परत चालले जातात.तरी या गोष्टीला आम्हाला बुद्धीने समजायचे आहे. (२) आत्मा आणि परमात्माच्या गुण आणि शक्ती मध्ये फरक.

आत्मा आणि परमात्मा चे अंतर यावरती समजून सांगितले जाते की, आत्मा आणि परमात्माच्या रूप तर एक सारखे ज्योती रूप आहे.आत्मा आणि परमात्माची साइज एक सारखीच आहे.बाकी आत्मा आणि परमात्माच्या फक्त गुणांच्या शक्ती मध्ये फरक आवश्य आहे.आता हे जितके गुण आहेत,ती सर्व महिमा परमात्माची आहे.परमात्मा दुःखापासून वेगळे आहेत, सर्वशक्तिमान आहे, सर्वगुणसंपन्न आहेत,सोळा कला संपूर्ण आहेत, त्यांचीच सर्व शक्ती काम करत आहे. बाकी मनुष्य आत्म्याची कोणती शक्ती चालू शकत नाही.परमात्माची सर्व भूमिका चालते.जरी परमात्मा भूमिकेमध्ये येतात,तरी ते स्वतः वेगळे राहतात. परंतु आत्मा भूमिकांमध्ये येते तर भूमिका वठवणाऱ्याच्या रूपामध्ये येते. परमात्म भूमिका करण्यासाठी येतात परंतू ते कर्म बंधनापासून वेगळे आहेत.आत्मा भूमिका वठवते तर कर्म बंधनामध्ये येते.हे आत्मा आणि परमात्मा मध्ये अंतर आहे,अच्छा.