08-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो बाबा अविनाश वैद्य आहेत जे एकाच महामंत्रा द्वारे तुमचे सर्व दुःख दूर करतात"

प्रश्न:-
माया तुमच्या पुरुषार्थ मध्ये विघ्न का घालते, कारण सांगा?

उत्तर:-
(१)कारण तुम्ही मायाचे मोठे ग्राहक आहात तिचे ग्राहक कमी होतील म्हणून विघ्न आणते. (२)जेव्हा अविनाशी वैद्य तुम्हाला औषध देतात तर मायेचे आजार पण दूर होते म्हणून विघ्ना पासून घाबरायचे नाही.मनमनाभव च्या मंत्राद्वारे माया पळून जाईल.

ओम शांती।
बाबा सन्मुख मुलांना समजावत आहेत, मनुष्य मनाची शांती,मनाची शांती म्हणून कष्टी होतात.रोज म्हणतात पण ओम शांती परंतु याचा अर्थ न समजल्यामुळे शांती मागत राहतात.मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, माझा स्वधर्म शांती आहे, जेव्हा स्वर्धम शांती आहे, तर मागायची काय आवश्यकता?परंतू अर्थ न समजल्यामुळे तरीही मागत राहतात.तुम्ही समजता हे रावण राज्य आहे.रावण सारी दुनिया आणि खास भारताचा दुश्मन आहे म्हणून रावणाला दरवर्षी जाळत राहतात.असा कोणताही मनुष्य नाही ज्याला वर्ष-वर्ष जाळतात, यांना तर जन्म जन्मातंर कल्प कल्पातंर जाळतच आले आहेत, कारण हा तुमचा खूप मोठा दुश्मन आहे.पाच विकारांमध्ये तर सर्वच जातात.जन्मच भ्रष्टाचारा द्वारे होतो,तर रावणाचे राज्य झाले ना.यावेळेस खुपच दुःख आहे,याचे निमित्त कोण?रावण. हे कुणालाही माहिती नाही. दुःख कशामुळे होते,हे तर रावण राज्य आहे, सर्वात मोठा दुश्मन हाच आहे.प्रत्येक वर्षी त्याचा पुतळा बनवून जाळत राहतात,दिवसेंदिवस पुतळा मोठाच बनवत राहतात,दुःख पण वाढत जाते. इतके मोठ मोठे साधुसंत,महात्मा,राजे इत्यादी आहेत परंतु एकालाही माहित नाही की, रावण आपला दुश्मन आहे.ज्याला आम्ही वर्ष-वर्ष जाळतो आणि तरीही आनंद साजरा करतात.रावणाचा मृत्यू झाला असे समजतात आणि आम्ही लंका चे मालक बनलो परंतु मालक बनले नाहीत.किती पैसे खर्च करतात. बाबा म्हणतात तुम्हाला इतके अगणित पैसे दिले होते, सर्व कोठे गमावले.दसऱ्या वरती लाखो रुपये खर्च करतात.रावणाला मारून परत लंकेला लुटतात, काहीच समजत नाहीत, रावणाला का जाळतात?या वेळेत सर्व विकाराच्या जेलमध्ये आहेत.अर्धाकल्प रावणाला जाळतात कारण दुखी आहेत,समजतात रावणाच्या राज्यांमध्ये आम्ही खूपच दुःखी आहोत.हे पण समजत नाहीत की, सतयुगा मध्ये हे ५ विकार नसतात, रावणाला जाळत पण नाहीत. विचारा, कधीपासून रावणाला जाळत आले, तर म्हणतील, अनादी काळा पासुन चालत आलेले आहे.रक्षाबंधन कधी सुरू झाले, म्हणतील अनादी काळापासून चालत आले आहे. तर या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत ना.मनुष्याची बुद्धी कशी झाली आहे, न जनावर आहेत ना मनुष्य आहेत.कोणत्याही कामाचे नाहीत.स्वर्गाला तर बिलकुलच जाणत नाहीत.समजतात बस हीच दुनिया भगवंतानी बनवली आहे.दुःखामध्ये तरीही भगवंताची आठवण करतात,हे भगवान, दुःखा पासून सोडवा, परंतु कलियुगामध्ये तर सुखी होऊ शकत नाहीत. दुःख तर जरूर भोगायचे आहे.शिडी उतरायची च आहे.नवीन दुनिये पासून जुन्या दुनियेच्या अंत पर्यंत, सर्व रहस्य बाबा समजावून सांगतात. मुलांच्या जवळ येतात आणि सांगतात, सर्व दुःखांचे एकच औषध आहे.अविनाश वैद्य आहेत ना. २१जन्मासाठी सर्वांना दुःखापासून मुक्त करतात,ते वैद्य लोक तर स्वतः आजारी पडतात.हे तर अविनाश वैद्य आहेत.हे पण समजतात दुःख पण खूप आहे,तर सुख पण खूप आहे.बाबा खूप सुख देतात,स्वर्गामध्ये दुःखाचे नाव रूप नसते.सुखी बनवण्याचे हेच औषध आहे,फक्त माझी आठवण करा तर, पावन सतोप्रधान बनाल.सर्व दुःख दूर होतील,परत सुखच सुख होईल.गायन पण आहे, बाबा दुखहर्ता सुखकर्ता आहेत.अर्ध्या कल्पासाठी तुमचे सर्व दुःख दूर होतात, तुम्ही फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.दोघांचा खेळ आहे निराकार आत्मा अविनाशी आहे आणि साकारी शरीर आहे, याचा खेळ आहे. आता बाबा म्हणतात देहा सहित देहाचे सर्व संबंध विसरून जावा.ग्रहस्थ व्यवहारां मध्ये राहात,स्वतःला असे समजा की आम्हाला आता परत जायचे आहे. पतीत तर जाऊ शकत नाहीत म्हणून माझीच आठवण करा,तर सतोप्रधान बनाल.बाबांच्या जवळ औषध आहे ना.हे पण सांगतो,माया विघ्न जरुर आणेल.तुम्ही रावणाचे ग्राहक आहात ना, तिचे ग्राहक चालले जातील,तर जरूर त्रास देईल. बाबा समजवतात हा अभ्यास आहे, कोणते औषध नाही.औषध आहेच आठवणीची यात्रा.या एकाच औषधामुळे तुमचे सर्व दुःख दूर होतात,जर तुम्ही माझी निरंतर आठवण करण्याचा पुरुषार्थ केला तर.भक्तिमार्ग मध्ये असे अनेक आहेत,ज्यांचे मुख चालतच राहते, कोणता न कोणता मंत्र, राम नाम ई. जपतच राहतात.त्यांना गुरुचा मंत्र मिळाला आहे,इतक्या वेळेस जप करायचा आहे. त्यांना म्हणतात रामाच्या नावाची माळ जपायची आहे.यालाच राम नावाचे दान म्हणतात.अशा अनेक संस्था बनल्या आहेत.रामराम जप करत राहतील,तर भांडण इत्यादी करणार नाहीत.व्यस्त राहतील तर कोणी काही म्हनले,तरी प्रतिसाद देणार नाहीत.खुप थोडेच असे करतात.येथे परत बाबा समजवतात राम राम काही मुखाद्वारे जपायचे नाही. हे तर अजापा जाप आहे,फक्त बाबांची मनापासून आठवण करायची आहे. बाबा म्हणतात मी काही राम नाही,राम तर त्रेतायुगामध्ये होते,ज्यांचे राज्य होते,त्यांना तर जपायचे नाही. आता बाबा म्हणतात भक्तिमार्ग मध्ये,माळ जपत, पूजा करत करत,तुम्ही शिडी उतरतचआले आहात. कारण ते सर्व असत्य आहे,सत्य तर एक बाबाच आहेत.ते तुम्हा मुलांना सन्मुख समजावत आहेत. हा कसा भुलभुलया चा खेळ आहे.ज्या बाबांकडून इतका बेहदचा वरसा मिळतो,त्यांची आठवण केली तर चेहरा चमकत राहिल.आनंदामध्ये चेहरा उजळतो,चेहऱ्या वरती हास्य येते.तुम्ही जाणता बाबांची आठवण केल्यामुळे आम्ही लक्ष्मीनारायण सारखे बनू.अर्धाकल्प आमचे सर्व दुःख दूर होतील. असे नाही बाबा काही,कृपा करतील,नाही हे समजायचे आहे.आम्ही बाबांची जितकी आठवण करू तेवढे सतोप्रधान बनू. हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक,खूपच हर्षित मुख आहेत,असे बनवायचे आहे.बाबांची आठवण करून मनामध्ये खुशी होते,परत आम्ही विश्वाचे मालक बनू.हे खुशीचे संस्कार आत्मा सोबत घेऊन जाते,परत थोडी थोडी खुशी कमी होत जाते. या वेळेत माया तुम्हाला खूपच त्रास देते,माया प्रयत्न करेल तुमची आठवण विसरण्यासाठी.सदैव असे हर्षित मुख राहू राहू शकणार नाहीत,जरूर कधी घुटका पण येईल. मनुष्य जेव्हा आजारी पडतात तर म्हणतात शिव बाबांची आठवण करा परंतु शिवबाबा कोण आहेत,हे कुणालाच माहिती नाही.तर काय समजून आठवण करतील. तुम्ही मुलं जाणता,बाबांची आठवण केल्यामुळे आम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनू.देवी-देवता सतोप्रधान आहेत ना. त्यांना म्हटले जाते दैवी दुनिया.मनुष्यांची दुनिया म्हटले जात नाही. मनुष्य नाव नसते,अमका देवता. ती आहे दैवी दुनिया,ही आहे मानवी दुनिया.या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.पिताच समजवतात, बाबांना च ज्ञानाचे सागर म्हणतात. बाबा अनेक प्रकारे समजावून सांगतात,परत महामंत्र देतात मुलांनो तुम्ही माझी आठवण करा,तर तुम्ही स्वतोप्रधान बनाल आणि तुमचे सर्व दुःख दूर होतील.कल्पा पूर्वी पण तुम्ही देवी-देवता होते, तुमचे कर्म देवता सारखे होते.तेथे कोणीही उलटे सुलटे बोलत नव्हते,अशा प्रकारचे कोणतेच काम नसते.ती आहे दैवी दुनिया,ही आहे मानवी दुनिया, फरक आहे ना.हे बाबाच समजवतात.दैवी दुनियेला लाखो वर्ष झाले असे म्हणतात, येथे तर कोणाला देवता म्हणू शकत नाही.देवता तर स्वच्छ होते महान आत्म्यांना देवी-देवता म्हणले जाते, मनुष्याला कधीच असे म्हणले जात नाही. ही रावणाची दुनिया आहे,रावण खूपच मोठा दुश्मन आहे,यासारखा दुश्मन दुसरा कोणता असत नाही. प्रत्येक वर्ष तुम्ही रावणाला जाळतात,हे कोण आहेत,कुणालाच माहिती नाही.कोणी मनुष्य तर नाही,हे पाच विकार आहेत,म्हणून याला रावण राज्य मानले जाते.पाच विकारांचे राज्य आहे ना, सर्वांमध्ये पाच विकार आहेत. दुर्गति आणि सद्गगती चा खेळ बनलेला आहे.आता तुम्हला सद्गगतीच्या आदी काळा बाबत,बाबांनी समजावले आहे.दुर्गती बाबत पण बाबांनी समजावले आहे.तुम्हीच प्रगती करता आणि तुमचीच अधोगती होते.शिवजयंती पण भारतामध्येच साजरी करतात,रावण जयंती पण भारतामध्ये होते.अर्धाकल्पआहे लक्ष्मीनारायण राम-सिताचे राज्य.आता तुम्ही मुलं सर्वांच्या जीवन चरित्राला जाणतात,महिमा सारी तुमची आहे. नवरात्रीमध्ये पूजा इत्यादी सर्व तुमचीच होते.तुम्ही स्थापना करतात,श्रीमता वरती चालुन तुम्ही विश्वाला परिवर्तन करतात, तर श्रीमत वरती पूर्ण रीतीने चालायला पाहिजे.नंबरा नुसार पुरुषार्थ करत राहतात. स्थापना होत राहते, यामध्ये लढाई ची कोणतीच गोष्ट नाही.आत्ता तुम्ही समजता हे पुरुषोत्तम संगम युग,बिलकूलच वेगळे आहे.जुन्या दुनिये चा अंत नवीन दुनिये ची सुरुवात आहे.बाबा जुन्या दुनियेला परिवर्तन करण्यासाठी च येतात. तुम्हाला खूप समजावून सांगतात परंतु अनेक मुलं हे विसरतात.भाषण केल्या नंतर आठवणीत येते, या गोष्टी समजून सांगायच्या होत्या.हुबेहूब कल्पापुर्वी जशी स्थापना झाली होती तशीच होत राहील,ज्यांनी जे पद मिळवले,तेच परत मिळवतील.सर्व एकसारखे पद मिळवू शकत नाहीत.श्रेष्ठ पद मिळवणारे पण आहेत आणि कमी दर्जाचे पद मिळवणारे पण आहेत.जे महारथी मुलं आहेत,त्यांना पुढे चालून माहिती होईल,हे साहुकारांची दासी बनतील, ही राज घराण्या मधील दासी बनतील,हे मोठे सावकार बनतील,ज्यांना कधी कधी आमंत्रित करत राहू.सर्वांना थोडेच आमंत्रित करतात,सर्वतर तोंड पण पाहू शकणार नाहीत.

बाबा पण ब्रह्मा मुखाद्वारे समजतात,सन्मुख सर्व थोडेच पाहू शकतात. तुम्ही आत्ता सन्मुख, पवित्र बनण्यासाठी आले आहात.असे पण होते,अपवित्र मधुबन मध्ये येऊन बसतात,काही ऐकतात तर देवता बनतील,थोडे फार ऐकले तर त्याचा परिणाम होतो.ऐकलेच नाही तर येतील कसे.तर मुख्य गोष्ट बाबा म्हणतात,मनामनाभव या एकाच मंत्राद्वारे तुमचे सर्व दुःख दूर होतील.मनमनाभव हे पिताच म्हणतात, परत शिक्षक होऊन मध्याजीभव म्हणतात. हे पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत आणि गुरु पण आहेत.तिघांची आठवण राहिली तर खूपच हर्षितमुख अवस्था राहिल.बाबा शिकवतात आणि बाबाच सोबत पण घेऊन जातात.अशा बाबांची खूपच आठवण करायला पाहिजे.भक्ती मार्गामध्ये पण बाबाला कोणी जाणत नाहीत,फक्त इतके जाणतात भगवान आहेत,आम्ही सर्व मुलं भाऊ भाऊ आहोत.पित्या पासून काय मिळणार आहे,त्यांना काहीच माहिती नाही.तुम्ही आत्ता समजतात एकच पिता आहेत,आम्ही त्यांची मुलं सर्व आपसात भाऊ भाऊ आहोत.या बेहदच्या गोष्टी आहेत ना.सर्व मुलांना शिक्षक बनवून शिकवतात परत सर्वांचा हिशेब चुक्त करून परत घेऊन जातील.या छी छी दुनिया मधून परत घरी जायचे आहे आणि नवीन दुनिया मध्ये येण्यासाठी तुम्हाला लायक बनवत आहेत.जे जे लायक बनतात तेच सतयुगा मध्ये येतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपल्या अवस्थेला सदा एक रस आणि हर्षितमुख ठेवण्यासाठी पिता, शिक्षक आणि सद्गुरू तिघांची आठवण करायची आहे.येथूनच आनंदाचे संस्कार भरायचे आहेत. वारशाच्या स्मृती द्वारे चेहरा नेहमीच चमकत रहावा.

(२) श्रीमता वरती चालून साऱ्या विश्वाला परिवर्तन करण्याची सेवा करायची आहे.पाच विकारांमध्ये जे फसले आहेत,त्यांना बाहेर काढायचे आहे.आपल्या स्वधर्माची ओळख द्यायची आहे.

वरदान:-
स्वतःच्या राज्य द्वारा आपल्या सोबत्यांना स्नेही सहयोगी बनवणारे मास्टर दाता भव.

राजा अर्थात दाता.दाताला सांगावे लागत नाही किंवा मागावे लागत नाही. प्रत्येक जण राजाला आपल्या स्नेहाची भेट ऑफर करतात,तुम्ही पण स्व:ता वरती राज्य करणारे राजा बना तर प्रत्येक जण तुमच्यापुढे सहयोग देतील. ज्याचे स्वतःवरती राज्य आहे त्याच्यापुढे लौकिक,अलौकिक साथी जी हजुर,जी हाजीर,होय आम्ही हे करू, अशाप्रकारे स्नेही सहयोगी बनतील .परिवारामध्ये कधीच हा आदेश चालवायचा नाही. आपल्या कर्मेंद्रिया ला आदेशामध्ये ठेवायचे आहे,तर तुमचे सर्व साथी स्नेही सहयोगी बनतील.

बोधवाक्य:-
सर्व प्राप्तीचे साधन असताना पण वृत्ती उपराम राहावी,तेव्हाच वैराग धारण केली असे म्हणू.