08-11-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   01.10.87  ओम शान्ति   मधुबन


ईश्वरीय स्नेह- जीवन परिवर्तनचा पाया आहे.


आज स्नेहाचे सागर आपल्या स्नेही मुलांना भेटाण्यासाठी आले आहेत. बाबा आणि मुलांचे स्नेह विश्वाला स्नेहाच्या सूत्रांमध्ये बांधतात. जेव्हा स्नेहाचे सागर स्नेह संपन्न नद्यांचा मेळा होतो, तर स्नेहाने भरलेल्या नद्या पण बाप समान मास्टर स्नेहाचे सागर बनतात म्हणून विश्वाचे आत्मे स्नेहाच्या अनुभवा द्वारे स्वतः जवळ येत आहेत. पवित्र प्रेम किंवा ईश्वरीय परिवाराच्या स्नेहा द्वारे कितीही अनोळखी आत्मे आहेत, खूप वर्षांपासून परिवाराच्या प्रेमापासून वंचित, दगडासारखे बनणारे आत्मा आहेत परंतु असे दगडा समान आत्मे पण ईश्वरीय परिवाराच्या स्नेहामुळे खूप नम्र बनतात. ही ईश्वरीय परिवाराच्या प्रेमाची कमाल आहे. कितीही स्वतः किनारा करूद्यात परंतु ईश्वरीय प्रेम चुंबका सारखे स्वतः जवळ घेऊन येते, याला म्हणतात ईश्वरीय स्नेहाचे प्रत्यक्ष फळ. कितीही कोणी स्वतःला वेगळे मानतील परंतु ईश्वरीय स्नेह सहयोगी बनवून "आपसामध्ये एक आहोत" पुढे जाण्याच्या सूत्रांमध्ये बांधतात. असा अनुभव केला ना. . . स्नेह प्रथम सहयोगी बनवते, सहयोगी बनवत-बनवत स्वतःच वेळेवरती सर्वांना सहजयोगी बनवते. सहयोगी बनण्याची लक्षणं आज सहयोगी आहेत, उद्या सहजयोगी बनतात. ईश्वरीय स्नेह परिवर्तनाचा पाया आहे किंवा जीवन परिवर्तनाचे बिज स्वरूप आहे. ज्या आत्म्यामध्ये ईश्वरीय स्नेहाच्या अनुभूतीचे बीज पडते, तर हे बीज सहयोगी बनण्याचे वृक्ष स्वतःच उत्पन्न करत राहते आणि वेळेवरती सहजयोगी बनण्याचे फळ दिसून येते, कारण परिवर्तनाचे फळ जरूर दिसून येते. फक्त कोण कोणते फळ लवकर निघते, कोणते फळ वेळेनुसार निघते. चोहूबाजूला पाहिले, तुम्ही सर्व मास्टर स्नेहाचे सागर, विश्व सेवाधारी मुलं कोणते कार्य करत आहात? विश्वामध्ये ईश्वरीय परिवाराच्या स्नेहाचे बीज पेरत आहात. जेथे पण जातात, मग तो नास्तिक असेल किंवा आस्तिक असेल, शिव पित्याला जाणत नाहीत किंवा मानत नाहीत, परंतु इतका अवश्य अनुभव करतात की, असे ईश्वरीय परिवाराचे प्रेम, जे तुम्हा शिववंशी ब्रह्मकुमार कुमारी द्वारे मिळते, ते कुठेही मिळू शकत नाही. आणि हे पण मानतात की, हा स्नेह किंवा प्रेम साधारण नाही, हे अलौकिक प्रेम आहे किंवा ईश्वरीय स्नेह आहे. तर अप्रत्यक्षपणे नास्तिक पासून आस्तिक बनतात ना. तर ईश्वरीय प्रेम आहे, ते कुठून आले? प्रकाशाची किरणे सूर्याला स्वतः सिद्ध करतात. ईश्वरीय प्रेम, अलौकिक स्नेह, निस्वार्थ स्नेह, स्वतःच दाता शिव पित्याला सिध्द करतात. अप्रत्यक्ष ईश्वरीय स्नेह, प्रेम, स्नेहाचे सागर शिवपित्याशी संबंध होतात परंतु जाणत नाहीत, कारण प्रथम बीज गुप्त राहते आणि वृक्ष स्पष्ट दिसून येते. तर ईश्वरीय स्नेहाचे बीज सर्वांना सहयोगी सो सहजयोगी प्रत्यक्ष रूपामध्ये वेळेप्रमाणे प्रत्यक्ष करत आहे आणि करत राहील. तर सर्वांनी ईश्वरीय स्नेहाचे बीज पेरण्याची सेवा केली. सहयोगी बनवण्याची शुभ भावना आणि शुभकामनाची विशेष दोन पाने, पण प्रत्यक्ष पाहिले. आता या खोडाची वृध्दी प्राप्त करत, प्रत्यक्ष दिसून येईल.

बाप दादा सर्व मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारची सेवा पाहून आनंदीत होत आहेत. खुशाल भाषण करणारे मुलं असतील किंवा स्थुल सेवा करणारे मुलं असतील, सर्वांच्या सहयोगाच्या सेवेद्वारे सफलताचे फळ प्राप्त होते. खुशाल ते सुरक्षा करणारे असतील किंवा भांडी सांभाळणारे असतील परंतु जसे पाच बोटांच्या सह्योगा द्वारे, किती पण श्रेष्ठ कार्य, मोठे कार्य सहज शक्य होते. असेच प्रत्येक ब्राह्मण मुलांच्या सह्योगा द्वारे, जितका विचार केला होता, असे होईल, त्या विचारा द्वारे, हजार पटीने सहज कार्य झाले. ही कोणाची कमाल आहे? सर्वांची कमाल आहे. जे पण कार्यामध्ये सहभागी बनले, मग ते स्वच्छता असेल किंवा टेबल स्वच्छ करायची सेवा असेल, परंतु सर्वांच्या सहयोगाद्वारे, परिणाम सफलता शक्य होते. ही संघटनेची शक्ती महान आहे. बापदादा पाहत होते, न की फक्त मधुबन मध्ये येणारे मुलं परंतु जे साकार मध्ये नव्हते, चोहू बाजूचे ब्राह्मण मुलांची, मग ते देश किंवा परदेश, सर्वांच्या मनाची शुभ भावना आणि शुभकामनाचा सहयोग राहिला. ही सर्व आत्म्यांची शुभभावना, शुभकामनांचा किल्ला, आत्म्याला परिवर्तन करतो. मग त्या निमित्त शक्ती असतील किंवा पांडव पण आहेत. निमित्त सेवाधारी विशेष प्रत्येक कार्यामध्ये सहभागी बनतात परंतु वातावरणाचा किल्ला सर्वांच्या सह्योगा द्वारेच बनतो. निमित्त बनणाऱ्या मुलांना पण बापदादा शुभेच्छा देत आहेत परंतु सर्वात जास्त शुभेच्छा तुम्हा मुलांना आहेत. बाबांना मुलं शुभेच्छा काय देतील कारण पिता तर अव्यक्त झाले. व्यक्त मध्ये तर मुलांना निमित्त बनवले, म्हणून बाबा नेहमी मुलांचे गीत गात राहतात. तुम्ही बाबांचे गीत गात राहता आणि बाबा मुलांचे गीत गात राहतात.

जे पण केले, खूप चांगले केले. भाषण करणाऱ्यांनी भाषण चांगले केले, स्टेजची सजावट करणाऱ्यांनी चांगले बनवले आणि विशेष योग युक्त भोजन बनवणाऱ्यांनी, खाऊ घालणारे आणि भाजी निवडणारे असतील, परंतु पाया तर भाजी निवडण्यापासून होतो. भाजी कापली नाहीतर भोजन कसे बनेल? सर्व विभाग वाले सर्व प्रकारच्या सेवा करण्यासाठी निमित्त आहेत. तुम्हाला ऐकवले ना, जर स्वच्छता करणारे, स्वच्छता करणार नाही तर, प्रभाव पडणार नाही. प्रत्येकाचा चेहरा ईश्वरीय स्नेह संपूर्ण होत नाही, तर सेवेची सफलता कशी मिळेल? सर्वांनी जे पण कार्य केले, स्नेह पूर्ण केले, म्हणून त्यांच्यामध्ये पण स्नेहाचे बीज पडले. उमंग उत्साहाने केले म्हणून, त्यांच्यामध्ये उमंग उत्साह राहिला. अनेकता असतानाही स्नेहाच्या सुत्रामुळे एकताच्या गोष्टी करत राहिले. ही वातावरणाची छत्रछायाच विशेषतः राहिली. वातावरण छत्रछाया बनते, तर छत्रछाये मध्ये असल्यामुळे, कोणतेही संस्कार असणारे, स्नेहाच्या प्रभाव मध्ये सामावलेले होते, समजले? सर्वांची मोठ्यात मोठी जबाबदारी होती. सर्वांनी सेवा केली. कितीही ते दुसरे काही बोलू इच्छितात तरी, वातावरणाच्या प्रभावामुळे बोलू शकणार नाहीत. मनामध्ये दुसरे विचार येतील परंतु मुखाद्वारे बोलू शकणार नाहीत, कारण प्रत्यक्ष तुम्हा सर्वांच्या जीवन परिवर्तनाला पाहून, त्यांच्यामध्ये पण परिवर्तनाची प्रेरणा स्वतः येत राहील. प्रत्यक्ष प्रमाण पाहिले ना. ग्रंथाच्या प्रमाणा पेक्षा पण, सर्वात मोठे प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या पुढे बाकी सर्व प्रमाण सामवले जातात. हा सेवेचा परिणाम राहीला. आता पण स्नेहाच्या सहयोगाच्या विशेषते द्वारे आणखी जवळ आणत राहाल, तर आणखी सहयोग करण्यात पुढाकार घेतील. तरीही प्रत्यक्षतेचा आवाज प्रसिद्ध तेव्हाच होईल, जेव्हा सर्व सत्तांचा सहायोग मिळेल.

विशेष सर्व सत्ता मिळून, जेव्हा एक आवाज बुलंद करतील, तेव्हाच प्रत्यक्षतेचा पडदा विश्वाच्या पुढे उघडेल. सद्यस्थिती मध्ये सेवेचे जे नियोजन बनवले आहे, ते यामुळेच बनवले आहे ना. सर्व वर्गवाले म्हणजे सत्ताधीश संपर्का मध्ये, सहयोगासाठी यावेत. स्नेहा मध्ये आले तर, परत संबंधांमध्ये येतील, परत सबंधा मध्ये येऊन सहजयोगी बनतील. जर कोणती पण सत्ता सहयोगा मध्ये येत नाही तर सर्वांच्या सहयोगाचे जे कार्य राहिले आहे, ते सफल कसे होईल. आता विशेष सत्तेचा पाया पडला आहे. धर्मसत्ता सर्वात मोठ्यात मोठी सत्ता आहे ना. त्या विशेष सत्तेच्या पायाचा आरंभ झाला. स्नेहाचा प्रभाव पाहिला नाही. तसे लोक असे म्हणत होते की, हे सर्व इतके एकत्र कसे बोलवत आहात. हे लोक पण विचार करत राहिले ना. परंतु ईश्वरीय स्नेहाचे सूत्र एक होते, म्हणून अनेकताचे विचार असताना पण, सहयोगी बनण्याचा विचार एकच राहिला. असे आता सर्व सत्ताना सहयोगी बनवा, बनत पण आहेत परंतु आणखी जवळ, सहयोगी बनवत चला, कारण आता स्वर्णजयंती समाप्त झाली. तर आत्तापासून आणखी प्रत्यक्षतेच्या जवळ आले आहेत. हिरक जयंती म्हणजे प्रत्यक्षतेचा आवाज बुलंद करणे. तर यावर्षी प्रत्यक्षतेचा पडदा उघडण्यास सुरू झालेला आहे. एकीकडे परदेशा द्वारे भारतामध्ये प्रत्यक्षत झाली, दुसरीकडे निमित्त महामंडलेश्वरां द्वारे कार्याच्या श्रेष्ठतेची सफलता झाली. परदेशा मध्ये पण आंतरराष्ट्रीय संघाचे निमित्त बनले, ते पण विशेष प्रसिद्ध आणि भारतामध्ये पण प्रसिद्ध धर्मसत्ता आहे. तर धर्मसत्तेचा अधिकार असणाऱ्या द्वारे, धार्मिक आत्म्यांची प्रत्यक्षता व्हावी, हा प्रत्यक्षताचा पडदा उघडणे सुरू होणे. आणखी उघडणे सुरू झाले आहे. आत्ता उघडणे सुरू होणार आहे. पुर्ण पुणे पडदा उघडला नाही, सुरू झाले आहे. परदेशी मुलं, जे या कार्याच्या निमित्त बनले, हे पण विशेष कार्य राहिले. प्रत्यक्षतेच्या विशेष कार्यामध्ये, या कार्यामुळे निमित्त बनले. तर बापदादा परदेशी मुलांना, या अंतिम प्रत्यक्षतेच्या, हिरोच्या भुमिके मध्ये निमित्त बनल्यामुळे, सेवेच्या विशेष शुभेच्छा देत आहेत. भारतामध्ये हालचाल तर झाली ना. सर्वांच्या कानापर्यंत आवाज गेला. हा परदेशातील बुलंद आवाज, भारतामधील कुंभकर्णाला जागृत करण्याच्या निमित्त बनला, परंतु आता फक्त आवाज गेला आहे. आता आणखी जागृत करायचे आहे, त्यांना उठवायचे आहे. आता फक्त कानापर्यंत आवाज पोहोचला आहे. जे झोपलेले आहेत, त्यांच्या कानावर आवाज जातो, तर थोडे हालतात ना, हालचाल तर करतात ना. तर हालचाल झाली. हालचाल मध्ये थोडे जागे झाले आहेत, समजतात हे पण काही तरी आहेत. आता जागृत तेव्हाच होतील, जेव्हा आणखी जोरात आवाज होईल. आता पुर्वीपेक्षा थोडे जोरात झाले आहे. अशीच कमाल तेव्हा होईल, जेव्हा सर्व सत्ता मध्ये असणारे एकत्र स्टेजवर स्नेहमिलन करतील. सर्व सत्ताच्या आत्म्याद्वारे ईश्वरीय कार्याची प्रत्यक्ष सुरू होईल, तेव्हा प्रत्यक्षतेचा पडदा पूर्णपणे उघडेल. यामुळे आत्ता जो कार्यक्रम बनवत आहात, त्यामध्ये लक्ष ठेवा की, सर्व सत्ताचे स्नेहमिलन व्हावे. सर्व वर्गाचे स्नेहमिलन तर होऊ शकते. जसे साधारण साधूंना तर बोलवतात, कोणती मोठी गोष्ट नाही परंतु महामंडलेश्वरांना बोलवले ना. असे तर शंकराचार्य आले असते तर, या संघटनाची आणखी शोभा झाली असती. परंतु आत्ता त्यांचे पण भाग्य जागृत होईल. मनामधुन सहयोगी तर आहेत. मुलांनी कष्ट पण चांगले घेतले आहेत, परंतु तरी लोकलाज तर ठेवावी लागते ना. तर तो दिवस पण येईल, जेव्हा सर्व सत्ता मिळून म्हणतील की, श्रेष्ठ सत्ता, ईश्वरीय सत्ता, अध्यात्मिक सत्ता आहे तर, एकच परमात्म सत्ताच आहे, म्हणून खूप लांबलचक नियोजन केले आहे ना. इतका वेळ मिळाला आहे की, सर्वांना स्नेहाच्या सूत्रांमध्ये बांधून, घेऊन या. हे स्नेह चुबंक बनेल, जे सर्व एका सोबत संघटीत रूपामध्ये, बाबांच्या स्टेजवरती पोहचले. असे नियोजन केले आहे ना. अच्छा. सेवाधारींना सेवेचे प्रत्यक्ष फळ मिळाले ना, नाहीतर आत्ता नवीन मुलांचा क्रमांक आहे ना. तुम्ही लोक तर मिलन करत करत आता वानप्रस्थ अवस्थेत पर्यंत पोहोचला आहात. आता आपल्या लहान भाऊ बहिणींची वेळ आहे ना. स्वता: वानप्रस्थील तेव्हाच, दुसऱ्यांना संधी देऊ शकाल. इच्छा तर सर्वांच्या वाढत जातात. सर्वजण म्हणतात आता पण भेटण्याची संधी मिळायला पाहिजे. जितके भेटाल तेवढ्या ईच्छा वाढत जातील, परत काय करणार? दुसऱ्यांना संधी देणे पण स्वतः तृप्तीचा अनुभव करणे आहे, कारण जुने तर अनुभवी आहेत, प्राप्ती स्वरूप आहेत. तर प्राप्ती स्वरूप आत्मे, सर्वावरती शुभ भावना ठेवणारे, दुसऱ्यांना पण पुढे घेऊन जाणारे आहेत, की असे समजतात आम्ही तर भेटू? यामध्ये पण निस्वार्थी बनायचे आहे, समजदार आहात. आदी मध्य अंतला समजणारे आहात. वेळेला पण समजतात, प्रकृतीच्या प्रभावाला पण समजतात, आपल्या भूमिकेला पण समजतात. बापदादा पण नेहमीच मुलांना भेटू इच्छितात. जर मुलं भेटू इच्छितात, तर प्रथम बाबांची इच्छा असते, तेव्हाच मुलांची पण इच्छा होते, परंतु बाबांना पण वेळ आणि प्रकृतीला पहावे तर लागते ना. जेव्हा या दुनिया मध्ये येतात, तर या दुनियेच्या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. जेव्हा यांच्यापासून दूर अव्यक्त वतन मध्ये आहात, तर तेथे पाण्याची, वेळेची, राहण्याची समस्या, तर नाही. गुजराती जवळ राहतात ना. तर याचे पण फळ मिळत आहे ना. ही गुजरातींची विशेषता आहे, जे नेहमी तयार राहतात, हाॅ जी चा पाठ पक्का आहे आणि जिथे पण राहण्याचे स्थान मिळाले, तेथेच राहतात. प्रत्येक परिस्थितीमध्ये खुश राहण्याची विशेषता आहे. गुजरात मध्ये वृध्दी चांगली होत आहे. सेवेचा उमंग उत्साह स्वतःला पण निर्विघ्न बनवतो, तर दुसऱ्यांचे पण कल्याण करतो. सेवाभावाची सफलता आहे‌ सेवाभाव मध्ये जर अहंकार आला तर त्याला सेवाभाव म्हणत नाहीत. सेवाभाव सफलता देतो. सेवेमध्ये जर अहंकार असेल तर, कष्ट पण जास्त, वेळ पण जास्त, तरीही स्वतः संतसेवाभाव असणारे मुलं नेहमी स्वतः पण पुढे जातात आणि दुसऱ्यांना पण पुढे करतात. नेहमी उडती कलेचा अनुभव करतात. चांगल्या हिंमतीचे आहात. जेथे हिम्मत आहे तेथे, बाबा पण प्रत्येक वेळेत कार्यामध्ये मदतगार आहेत.

महारथी तर आहेतच महारांनी. जे पण महारथी सेवेच्या प्रति आले आहेत, महादानी, वरदानी आहात ना. दुसऱ्यांना संधी देणे हे पण महादान वरदान आहे. जशी वेळ तशी भूमिका वठाण्यामध्ये सर्व खूप प्रिय मुलं, नेहमीच सहयोगी आहेत आणि राहतील. इच्छा तर होईल, कारण ही शुभ इच्छा आहे. परंतु याला सामवणे पण जाणतात, त्यामुळे सर्व नेहमी संतुष्ट आहेत. बापदादाची पण इच्छा आहे की, प्रत्येक मुलांनी भेटावे आणि वेळेची सीमा पण असायला नको. तुम्हा लोकांच्या दुनिया मध्ये, या सर्व सीमा असतात. नाही तर एक एक विशेष रत्नाच्या महिमाचे जर गायन केले तर खूप महिमा आहे. कमीत कमी एक एक मुलांची विशेषताचे एक एक गीत तर बनू शकते परंतु. यामुळे म्हणतात वतन मध्ये या. जिथे कोणतेही सीमा नाही, अच्छा.

नेहमी ईश्वरीय स्नेहा मध्ये सामावलेले, नेहमी प्रत्येक सेकंद सर्वांच्या सर्वांचे सहयोगी बनणारे, नेहमी प्रत्यक्षतेचा पडदा दूर करून, बाबांना विश्वाच्या पुढे प्रत्यक्ष करणारे, नेहमी सर्व आत्म्याला प्रत्यक्ष प्रमाण स्वरुप बनून आकर्षित करणारे, नेहमी बाबा आणि सर्वांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहयोगी बनून एकाचे नाव प्रसिद्ध करणारे, अशा विश्वाच्या इष्ट मुलांना, विश्वाच्या विशेष मुलांना, बापदादाचा अती स्नेह संपन्न प्रेमपूर्वक आठवण. सोबत सर्व देश परदेशाचे स्नेहाने बाबांच्या समोर पोहचणारे, सर्व जवळाच्या मुलांना, सेवेच्या शुभेच्छा देत, सोबत बापदादांची विशेष प्रेमपूर्वक आठवण स्विकार करा.

वरदान:-
ज्ञानसंपन्नतेच्या विशेषते द्वारे, संस्काराच्या टक्कर पासून वाचणारे, कमलपुष्प समान अनासक्त व त्रयस्थ भव.

संस्कार तर शेवटपर्यंत कोणाचे दासीचे राहतील, कोणाचे राजाचे. संस्कार बदलतील अशी वाट पाहू नका परंतु माझ्यावरती कोणाचा प्रभाव पडायला नको, कारण एक तर प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत. दुसरे म्हणजे माया पण अनेक रूप बनून येते, म्हणून कोणत्याही गोष्टीचा निर्णय, मर्यादांच्या रेषेच्या आत मध्ये करा. वेगवेगळे संस्कार असून पण टक्कर व्हायला नको, म्हणून ज्ञानसंपन्न बनून कमलपुष्प समान अनासक्त व साक्षी बना.

सुविचार:-
हट्ट किंवा कष्ट करण्याच्या ऐवजी, आनंदाने पुरुषार्थ करत रहा.