09-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला नशा पाहिजे की आपले पारलौकिक पिता आश्चर्यकारक दुनिया,स्वर्ग बनवतात ज्याचे आम्ही मालक बनत आहोत"

प्रश्न:-
बाबांच्या संगती मुळे,तुम्हाला कोणत्या कोणत्या प्राप्ती होतात?

उत्तर:-
बाबा च्या संगती मुळे आम्ही मुक्ती, जीवनमुक्ती चे अधिकारी बनतो.आमची नाव किनाऱ्याला लागते.बाबा आम्हाला आपले बनवून आस्तिक आणि त्रिकालदर्शी बनवतात.आम्ही रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला जाणतो.

गीत:-
धैर्य धरा आत्म्यानो

ओम शांती।
हे कोण म्हणते मुलांनो?बाबाच मुलांना म्हणतात,सर्व मुलांना सांगावे लागते कारण सर्व दुःखी आहेत,धैर्य शील नाहीत. बाबांची आठवण करतात,तुम्ही येऊन दुःखा पासून मुक्त करा,सुखाचा रस्ता दाखवा.आता मनुष्यांना त्यामध्ये पण खास भारत वासींना आठवणीत नाही की,आम्ही भारत वासी खूप सुखी होतो.भारत प्राचीन आश्चर्यकारक भूमी होता,आश्चर्यकारक दुनिया म्हणतात ना.येथे मायेच्या राज्या मध्ये सात आश्चर्याचे गायन आहे.हे स्थूल,जड आहेत.बाबा समजवत आहेत,हे मायेचे आश्चर्य आहेत,यामध्ये दुःख आहे. राम पित्याचा स्वर्ग आहे.तीच आश्चर्यकारक दुनिया आहे.भारत स्वर्ग होता,तेथे देवी-देवतांचे राज्य होते.हे भारतवासी सर्व विसरले आहेत.जरी त्यांच्यापुढे डोके टेकवतात,ज्यांची पुजा करतात परंतू त्यांचे चरित्र तर जाणायला पाहिजे ना.हे बेहदचे बाबा सन्मुख समजवतात,येथे तुम्ही पारलौकिक बाबां जवळ आले आहात.पारलौकिक बाबाच स्वर्गाची स्थापना करणारे आहेत.हे कोणी मनुष्य करू शकत नाहीत.यांना पण बाबा म्हणतात,हे कृष्णाची जुनी तमोप्रधान आत्मा,तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत नाहीत.तुम्हीच कृष्ण होते तेव्हा सतोप्रधान होते,परत 84 जन्म घेत-घेत आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात.तुमचे वेग वेगळी नावं झाली आहेत.आता तुमचे नाव ब्रह्मा ठेवले आहे.ब्रह्मा पासून विष्णू किंवा श्रीकृष्ण बनतील.ब्रह्मा पासून विष्णू किंवा विष्णू पासून ब्रह्मा,गोष्ट एकच आहे.ब्रह्मा मुख वंशावळ ब्राह्मणच देवता बनतात, परत तेच देवी-देवता क्षुद्र बनतात.आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात.आता बाबा तुम्हा मुलांना समजतात,हे भगवानुवाच आहे.तुम्ही विद्यार्थी झाले तर तुम्हाला खूप खुशी व्हायला पाहिजे परंतु इतकी खुशी राहत नाही.धनवान धनाच्या नशा मध्ये खूप खुश राहतात.येथे भगवंताची मुलं बनले आहात,तरीही इतक्या खुशी मध्ये राहत नाहीत,समजत नाहीत कारण पत्थर बुद्धी आहेत ना.भाग्या मध्ये नाहीत तर,ज्ञानाची धारणा करू शकत नाहीत.आता तुम्हाला बाबा मंदिर लायक बनवतात परंतु मायेचा संग पण कमी नाही.गायन आहे संग तारतो,कुसंग बुडवतो.बाबाचा संग तुम्हाला मुक्ती जीवनमुक्ती मध्ये घेऊन जातो,परत रावणाचा संग तुम्हाला दुर्गती मध्ये घेऊन जातो.५ विकाराचा संग होतो.भक्तीमध्ये सत्संग म्हणतात परंतू शिडी तर खाली उतरत राहतात.शिडी मुळे कोणी धक्का खातात,तर खाली पडतील ना.सर्वांचे सद्गती दाता एकच बाबा आहेत.कोणीपण भगवंताचा इशारा वरतीच करतात.आता बाबा शिवाय मुलांना परिचय कोण देईल? बाबाच मुलांना आपला परिचय देतात, त्यांना आपले बनवून सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात.बाबा म्हणतात मी तुम्हाला आस्तिक बनवतो,त्रिकालदर्शी पण बनवतो.हे नाटक आहे,हे कोणी साधू-संत आदी जाणत नाहीत.ते हदचे नाटक आहे, हे बेहदचे आहे.या नाटकांमध्ये आम्ही खुप सुख पण, खूप पाहतो तर दुःख पण खूप पाहतो.या नाटकामध्ये कृष्ण आणि क्रिश्चनचा कसा हिशोब आहे.त्यांनी भारताला लढवुन राजाई घेतली.आता तुम्ही लढाई करत नाहीत.ते आपसा मध्ये लढाई करतात,राजाई तुम्हाला मिळते,याची पण नाटकांमध्ये नोंद आहे.या गोष्टी कोणीही जाणत नाहीत.ज्ञान देणारे ज्ञानसागर एक बाबाच आहेत.जे सर्वांची सद्गती करतात. भारतामध्ये देवी-देवतांचे राज्य होते तर सद्गती होती,बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये होते.भारत सोन्याचा होता,तुम्ही राज्य करत होते.सतयुगा मध्ये सूर्यवंशी राज्य होते.आता तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकत आहात. नरा पासून नारायण बनण्याची ही कथा आहे.हे पण मोठ्या अक्षरांमध्ये लिहा,खऱ्या गीते द्वारे भारत सत्यखंड, हिऱ्या सारखा बनतो.बाबा येऊन खरी गीता ऐकवतात.सहज राजयोग शिकवतात,तर हिरे तुल्य बनतात.बाबा, ज्ञानाच्या गोष्टी तर खुप समजवतात परंतु मुलं देह अभिमाना मुळे विसरतात. देही अभिमानी बनाल तर धारणा पण होईल.देह अभिमाना मुळे धारणा होत नाही.

बाबा समजवतात मी थोडेच म्हणतो मी सर्वव्यापी आहे.मला तर म्हणतात,तुम्हीच मात पिता... तर याचा अर्थ काय आहे? तुमच्या कृपेमुळे सुख पुष्कळ मिळते.आता तर दुःख आहे.हे गायन कोणत्या वेळेचे आहे,हे पण समजत नाहीत.जसे पक्षी चू चू करत राहतात अर्थ काहीच नाही.तसेच हे पण चू चू करत राहतात,काहीच समजत नाहीत.बाबा सन्मुख समजवतात,हे सर्व चुकीचे आहे.कोणी चुकीचे बनवले? रावणाने.भारत सत्य खंड होता त्यावेळेत सर्व खरे बोलत होते.चोरी इत्यादी काहीच नव्हते.येथे तर किती चोर इत्यादी करतात.दुनिया मध्ये तर फसवा फसवी पुष्कळ आहे,याला म्हटले जाते पापाची दुनिया,दुःखाची दुनिया. सतयुगाला सुखाची दुनिया म्हटले जाते.ही विकारी दुनिया,वेश्यालय आहे.सतयुग शिवालय आहे.बाबा खूपच चांगल्या रीतीने समजवतात.नाव पण खूपच चांगले आहे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय.आता बाबा येऊनन समजदार बनवतात.या विकाराला जिंकाल तर तुम्ही जगजीत बनाल. हा काम विकारच महाशत्रू आहे. आम्हाला येऊन देवी-देवता बनवा असे मुलं म्हणतात.

बाबांची यथार्थ महिमा तुम्ही मुलंच जाणतात.मनुष्य तर न बाबाला जाणतात, न बाबांच्या महिमेला जाणतात.तुम्ही जाणतात ते प्रेमाचे सागर आहेत.बाबा तुम्हाला इतके ज्ञान ऐकवतात,हाच त्यांचा स्नेह आहे.शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, तर विद्यार्थी किती श्रेष्ठ बनतात.तुम्हा मुलांना पण बाबासारखे प्रेमाचे सागर बनायचे आहे.कोणालाही प्रेमाने समजून सांगू शकता.तुम्ही पण एक दोघांशी प्रेमाने गोष्टी करा.नंबर एक प्रेम आहे,बाबांचा परिचय देणे.तुम्ही गुप्त दान करतात.एक दोघा साठी घ्रूणा पण असायला नको. नाहीतर तुम्हाला सुद्धा सजा खावी लागेल. कोणाचा तिरस्कार कराल तर सजा खावी लागेल.कोणाशी नफरत द्वेष करू नका.देह अभिमाना मध्ये आल्या मुळेच पतित बनले आहात. बाबा देही अभिमानी बनवतात, तर तुम्ही पावन बनतात.सर्वांना सांगा,आता ८४चे चक्र पूर्ण झाले.जे सूर्यवंशी महाराजा महाराणी होते,तेच परत 84 जन्म घेत उतरत उतरत खाली आले आहेत.आता बाबा परत महाराजा महाराणी बनवत आहेत,फक्त माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल.तुम्हा मुलांना दयाळू बणून सेवे बाबत, सर्व दिवस विचार चालायला पाहिजेत.बाबा सूचना देत राहतात,गोड मुलांनो दयाळू बणुन,जे बिचारे आहेत त्या दुखी आत्म्यांना सुखी बनवा.त्यांना थोडक्यात पत्र लिहा.माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा.एका शिव बाबांची च महिमा आहे.मनुष्याला बाबांच्या महिमा बद्दल काहीच माहिती नाही. हिंदीमध्ये पण पत्र लिहू शकता.सेवा करण्याची पण मुलांना आवड पाहिजे. अनेक आहेत जिवघात करण्यासाठी प्रवृत्त होतात,त्यांना तुम्ही सांगू शकता जीव घात महापाप आहे.आता तुम्हा मुलांना श्रीमत देणारे शिव बाबाच आहेत.ते श्री श्री शिवबाबा आहेत.तुम्हाला श्रीलक्ष्मी-श्रीनारायण बनवतात.श्री श्री तर ते एकच आहेत.ते कधी चक्रा मध्ये येत नाहीत.बाकी तुम्हाला टायटल मिळते, पदवी मिळते.आजकाल तर सर्वांना पदवी मिळत राहते.कुठे ते निर्विकारी,कुठे हे विकारी,रात्रं दिवसाचा फरक आहे.बाबा मुलांना रोज समजवत राहतात,एक तर देही अभिमानी बना,आणि सर्वाना संदेश द्या.पैंगबर ची मुलं तुम्ही पण आहात. सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत.बाकी धर्म स्थापकाला गुरु थोडेच म्हणणार.सद्गती करणारे एकच आहेत,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादाची प्रेम पूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणाची घ्रूणा किंवा द्वेष करायचा नाही.दयाळू बणुन दु:खी आत्म्याला सुखी बनवण्याची सेवा करायची आहे.बाप समान मास्टर प्रेमाचे सागर बनायचे आहे.

(२) भगवंताची आम्ही मुलं आहोत,याच नशा किंवा खुशी मध्ये राहायचे आहे. कधीच मायेच्या उलट्या संगती मध्ये जायचे नाही.देही अभिमानी बनवून ज्ञानाची धारणा करायची आहे.

वरदान:-
स्मृतीच्या बटना द्वारे स्व कल्याण आणि सर्वांचे कल्याण करणारे सिद्धी स्वरुप भव.
 

स्थितीचा आधार स्मृती आहे.शक्तिशाली स्मृती रहावी की,मी बाबांचा आणि बाबा माझे.तर याच स्थिती द्वारे स्वतःची स्थिती शक्तिशाली राहील आणि दुसर्यांना पण शक्तिशाली बनवाल.जसे लाईटचे बटन चालू केल्यानंतर प्रकाश होतो,असेच ही पण स्मृती रुपी एक बटन आहे.नेहमी स्मृती रुपी बटना कडे लक्ष असेल तर स्वतःचे आणि दुसऱ्या चे कल्याण करत रहाल.नवीन जन्म झाला तर नवीन स्मृती पाहिजे.जुन्या सर्व स्मृती समाप्त.याच विधीद्वारे सिद्धी स्वरूपचे वरदान प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
अतिद्रिंय सुखाची अनुभती करण्यासाठी आपल्या शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित रहा.


मातेश्वरी जी चे अनमोल महावाक्य
ज्ञानी तू मुलांची चूक झाल्यामुळे शंभर पटीने दंड:-

या अविनाशी ज्ञान यज्ञामध्ये साक्षात परमात्मा चा हात घेऊन परत,कारणे अकारणे जर त्यांच्याकडून विकर्म होतात तर त्याची सजा खूप भारी आहे.जसे ज्ञान घेतल्यामुळे शंभर पटीने फायदा आहे,तसेच ज्ञान घेऊन पण कोणती चूक केली तर परत शंभर पटीने दंड पण आहे,म्हणून खूप खबरदारी घ्यायची आहे. चुका करत रहाल तर कमजोर बनाल. म्हणून छोट्या-मोठ्या चुका करू नका आणि पुढील जीवनासाठी त्याचे परीक्षण करत चला,तपासून पहा.जर समजदार मोठ्या मनुष्यानी जर कोणते वाईट काम केले,तर त्यासाठी खूप मोठी सजा आहे. आणि जे साधारण मनुष्य काही वाईट काम करतात,तर त्याची इतकी सजा नाही. आता तुम्ही तर परमात्मा ची मुलं आहात म्हणून तुम्हालाच दैवीगुण धारण करायचे आहेत.सत्य पित्याच्या जवळ आले आहात, तर खरे होऊन राहायचे आहे

परमात्म जानी जाननहार आहेत,कसे?

लोक म्हणतात परमात्मा जानी जाननहार आहेत,आत्ता जानी जाननहारचा अर्थ हा नाही की,सर्वांच्या मनातील जाणतात परंतु ते सृष्टीच्या आदी मध्य अंतला जानणारे आहेत.बाकी असे नाही,परमात्मा रचनाकार पालन कर्ता आणि संहार कर्ता आहेत,त्याचा अर्थ हा आहे की परमात्मा रचना करतात,खाऊ घालतात आणि मारतात,परंतु असे नाही.मनुष्य आपल्या कर्म भोगा मुळे जन्म घेतात,याचा अर्थ हा नाही की परमात्मा बसून त्यांचे वाईट विचार आणि चांगल्या विचाराला जाणतील.ते तर अज्ञानी च्या मनामध्ये काय चालत असेल,हे जाणतात.सर्व दिवस मायेचे विचार चालत राहतात आणि ज्ञानी च्या मनामध्ये शुद्ध संकल्प चालत राहतात. बाकी एक एक संकल्प थोडेच जाणतील. बाकी परमात्मा जाणतात,की आत्ता सर्वच आत्म्याची दुर्गती झालेली आहे,त्यांना सद्गती कसे मिळेल.हे सर्व ज्ञान त्यांना आहे. आता मनुष्य जे कर्म भ्रष्ट बनले आहेत त्यांना श्रेष्ठ कर्म शिकवणे आणि त्या कर्म बंधनापासून मुक्त करणे,हे परमात्मा जाणतात.परमात्मा म्हणतात मज रचनाकार आणि माझ्या रचने च्या आदी मध्य अंतचे सर्व ज्ञान मी जाणतो.ते ज्ञान तुम्हा मुलांना देत आहे.आता तुम्हा मुलांना पित्याच्या निरंतर आठवणीमध्ये राहायचे आहे,त्यामुळे सर्व पापापासून मुक्त व्हाल अर्थात अमरलोक मध्ये जाल.आता या ज्ञानाला जानणे,यालाच जानी जाननहार म्हणतात.अच्छा.