09-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, ज्या बाबांची तुम्ही अर्धाकल्प स्मरण केले होते, त्याची आज्ञा आता तुम्हाला मिळाली आहे, तर त्यांचे पालन करा, त्यामुळे तुमची चढती कला होईल.

प्रश्न:-
मुलांनो, तुम्हा मुलांना स्वतःच, स्वतः चे नैसर्गिक उपचार करायचे आहेत, कसे?

उत्तर:-
एका पित्याच्या स्मरणात राहून आणि प्रेमाने यज्ञ सेवा केल्याने नैसर्गिक उपचार होतात, यामुळेच आत्मा स्वस्थ होते आणि सेवेने अपार सुख मिळते. म्हणून जे आठवण आणि सेवेत व्यस्त राहतात, त्यांचा नैसर्गिक उपचार होतो, म्हणजे प्रकृती चांगली राहते.

गीत:-
गाणे:तुने रात गवाई सो के, दिन गवाया खा के. .

ओम शांती।
मुलांनी गित ऐकले. माळ जपत जपत युग निघून गेले. किती युग? दोन युग. सतयुग त्रेतामध्ये तर कोणी ही माळ जपतत नाही. आपली प्रगती होते, परत खाली येतो म्हणजे अधोगती होते, हे कोणाच्याही बुद्धीत नसते. आमची आत्ता चढती कला होत आहे. जितकी आपली, म्हणजेच भारतातील लोकांची चढती कला आणि उतरती कला होते, तितकी इतर कोणाची होत नाही. भारतच श्रेष्ठाचारी आणि भारतच भ्रष्टाचारी बनतो. भारत च निर्विकारी आणि विकारी बनतो आणि त्याचा फारसा संबंध इतर खंड किंवा धर्मांशी नाही. ते कोणी स्वर्गात येत नाही. फक्त भारतातील लोकांची चित्रे आहेत. तेच राज्य करत होते. तर बाबा समजवतात, आता तुमची चढती कला आहे. ज्याचा हात पकडला आहे, तेच तुम्हाला सोबत घेऊन जातील. ही आम्हा भारतीयांची चढती कला आहे. मुक्तीमध्ये गेल्यावर तुम्ही मुक्ती-जीवनात याल. अर्धाकल्प देवी देवता धर्माचे राज्य चालते. २१ पिढ्या चढतात, परत उतरती कला होते. चढती कला मुळे सर्वांचे भले होते, असे म्हणतात. आता सर्वांचे चांगले होते, नाही का? पण तुम्ही चढत्या अवस्थेत आणि उतरत्या अवस्थेत येता. सध्या भारत जितके कर्ज घेतो, तितके दुसरे कोणीही घेत नाही. तुम्हा मुलांना माहित आहे की, आपला भारत सोन्याची चिमणी होता. अनेक सावकार होते. आत्ता भारताची उतरती कला पुर्ण होत आहे. कलियुगाचे आयुष्य आणखी ४० हजार वर्षे आहे, असे विद्वान इ. समजतात. ते पूर्ण अंधारात आहेत. मोठ्या युक्तीने समजावून सांगायचे आहे, नाहीतर भगत लोक चमकतात. सर्व प्रथम, तुम्हाला दोन पित्याचा परिचय द्यायचा आहे. भगवंत म्हणतात की, गीता ही सर्वांची माता पिता आहे. गीतेतून वारसा मिळाला आहे, बाकी सर्व त्यांची मुले आहेत. मुलांकडून वारसा मिळू शकत नाही. तुम्हा मुलांना गीताद्वारे वारसा मिळतोय ना? गीता माताचे परत पिता पण आहेत. बायबल वगैरे कुणालाही माता म्हणणार नाही. तेव्हा सर्वप्रथम विचारायचे आहे की, परमपिता परमात्म्याशी तुमचा संबंध काय आहे ? सर्वांचा पिता एकच आहे ना? सर्व आत्मे भाऊ बहिण आहेत. एका पित्याची मुलं आहेत. शिवपिता, प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे मानवी जगाची निर्मिती करतात, म्हणून तुम्ही आपसात भाऊ-बहिण होता. तर जरूर पवित्र राहत असले पाहिजे. पतित पावन पिताच येऊन तुम्हाला, युक्तीने पावन बनवतात. मुलं जाणतात की, आम्ही पवित्र बनलो तर, पवित्र दुनियेचे मालक बनू. खुप मिळकत आहे. असा कोण असेल, जो२१जन्मांचे राज्य घेण्यासाठी पवित्र बनणार नाही? आणि मग तुम्हाला श्रीमतही प्राप्त होते. ज्या बाबाची तुम्ही अर्धाकल्प स्मरण केले, त्यांची आज्ञा तुम्ही मानणार नाही, तुम्ही त्यांच्या आदेशाचे पालन केले नाही, तर तुम्ही पापी आत्मा बनाल. ही दुनिया पापी आत्म्यांची आहे. रामराज्य हे सत्पुरुषांचे जग होते. आता रावणाचे राज्य, पापी आत्म्याचे जग आहे. तुम्हा मुलांची आता चढती कला आहे. तुम्ही जगाचे मालक बनता. कसे गुप्त बसले आहात? तुम्हाला फक्त बाबांचे स्मरण करायचे आहे. जपमाळ जपण्याचा प्रश्नच येत नाही. बाबाचे स्मरण करून कामकाज करा. बाबा, तुमच्या यज्ञाची सेवा स्थूल आणि सूक्ष्म, दोन्ही कसे एकत्रित करतो. बाबांनी आज्ञा केली आहे की, अशा प्रकारे आठवण करा. निसर्ग उपचार करतात, नाही का? जेव्हा तुमची आत्मा बरी होईल, त्यामुळे तुमचे शरीरही बरे होईल. फक्त पित्याच्या स्मरणानेच तुम्ही पतिता पासून पावन बनता. तुम्ही पावन पण बना आणि यज्ञाची सेवा पण करत राहा. सेवा करण्यात मोठा आनंद मिळतो. इतके दिवस पित्याच्या स्मरणात राहून, आपण स्वतःला निरोगी बनवले आहे किंवा भारताला शांतते चे दान दिले आहे. तुम्ही भारताला शांती आणि सुखाचे, श्रीमतानुसार दान देता. जगात तर अनेक आश्रम आहेत, परंतू तिथे काहीच मिळत नाही. २१ पिढ्या स्वर्गाचे राज्य कसे मिळते, ते त्यांना माहीत नाही. तुम्ही आता राजयोगाचा अभ्यास करत आहात. ते लोक सुद्धा म्हणत राहतात की, ईश्वर पिता आले आहेत. कुठे तरी जरूर आहेत? तर जरूर आले असतील. बॉम्ब देखील विनाशासाठी निघाले आहेत. स्वर्गाची स्थापना आणि नरकाचा विनाश बाबांनीच केला असावा. हा नरक आहे, नाही का? खूप लढाया, मारामारी वगैरे आहेत. खूप भयाचे वातावरण आहे. मुलांना कसे पळवून घेऊन जातात? किती उपद्रव होतात? आता तुम्हाला माहीत आहे की, हे जग बदलत आहे. कलियुग बदलून सतयुग येत आहे. सुवर्णयुग प्रस्थापित करण्यात आम्ही बाबांचे सहाय्यक आहोत. केवळ ब्राह्मणच मदत करतात. प्रजापिता ब्रह्मापासून ब्राह्मणांचा जन्म होतो. ते कुख वंशावळ आहेत आणि आपण मुख वंशावळ आहोत. ते ब्रह्माची मुलं होऊ शकत नाहीत. तुम्हला दत्तक घेतले आहे. तुम्ही ब्राह्मण आहात - ब्रह्मची मुलं आहात. प्रजापिता ब्रह्मा तर संगमयुगातच असतात. ब्राह्मणच नंतर देवता बनतात. तुम्ही त्या ब्राह्मणांनाही समजावून सांगू शकता की, तुम्ही कुख वंशावळ आहात. ब्राह्मण देवी देवतां नमः असे म्हणतात. ब्राह्मणांना व देवतांना नमस्कार करतात. परंतू ब्राह्मणांना पण तेव्हाच नमस्कार करतात, जेव्हा संगमयुगात असतील. तन, मन आणि धनाने बाबांच्या श्रीमताचे पालन करणारे, ब्राह्मण आहेत, हे त्यांना समजते. ते ब्राह्मण तर शारीरिक यात्रेला घेऊन जातात. हा तुमचा आध्यात्मिक प्रवास आहे. तुमची ही आत्मिक यात्रा आहे. त्या शारीरिक यात्रा तर अनेक आहेत. अनेक गुरु लोक आहेत. सगळ्यांनाच गुरू म्हणतात. तुम्हा मुलांना आता माहित आहे की, गोड शिवबाबांच्या उपदेशाचे पालन करून, आपण ब्रह्माकडून शिवबाबांचा वारसा घेत आहोत. तुम्ही इथे आल्यावर मी पटकन विचारतो? तुम्ही कोणाकडे आला आहात ? तुमच्या बुद्धीत आहे की, हा शिवबाबांचा भाड्याने घेतलेला रथ आहे. आम्ही त्यांच्याकडे जातो. ब्राह्मण लोक साखरपुडा करतात. परंतू साजन सजनीचा आपसात संबंध एकमेकांशी असतो, न की लग्न लावलेल्या ब्राह्मणाशी. पत्नी, पतीची आठवण करते की, लग्न लावलेल्या ब्राम्हणाची आठवण करते? तुमचा पण शिव साजन आहे. परत कोणत्या देहधारीची का आठवण करता? आठवण एका शिवाची करायची आहे. बाबानी हे लाॉकेट इ. समजावून सांगण्यासाठी बनवलेले आहेत. ब्रह्मा बाबा स्वतःच दलाल बनून साखरपुडा करवतात. तर दलाल ची आठवण करायची नाही. सजनींचा योग साजनाशी आहे. मम्मा बाबा येतात आणि तुम्हा मुलांद्वारे मुरली कथन करतात. बाबा म्हणतात: अशी अनेक मुले आहेत, ज्यांच्या भृकुटीमध्ये बसून मी मुरली चालवतो -कल्याण अर्थ. मी कोणाला साक्षात्कार करायला, मुरली वाचायला, कोणाचे कल्याण करायला, मी येतो. मला माहित आहे की, ब्राह्मणीमध्ये इतकी शक्ती नाही, यांना ही ब्राह्मणी व्यवस्थित ज्ञान देऊ शकणार नाही, म्हणून मी असा बाण मारतो की, ते ब्राह्मणीपेक्षा अधिक हुशार बनतील. ब्राह्मणी समजते की, मी यांना समजावले आहे. देह अभिमाना मध्ये येते. खरे तर हा अहंकार यायला नको. शिवबाबा च सर्व काही करत आहेत. इथे तर तुम्हांला म्हणतात, बाबाची आठवण करा. संबंध शिवबाबांशी असायला हवा. हे तर मध्यस्थ आहेत, यांना त्याचा मोबदला मिळतो. तरीही ते वृद्ध अनुभवी शरीर आहे. ते बदलू शकत नाही. नाटकात ते ठरलेले असते. दुसऱ्या चक्रात ते इतरांच्या शरीरात प्रवेश करतील, असे नाही. जे शेवटी आहेत, त्यांनाच आधी परत जावे लागेल. झाडामध्ये पाहा, शेवटी उभे आहात. तुम्ही आता संगमयुगात बसले आहात. बाबांनी या प्रजापिता ब्रह्मात प्रवेश केला आहे. जगत अंबा आहे, यांना कामधेनु आणि कपिल देव असेही म्हणतात. कपल म्हणजे जोडी, बाप-दादा, मात-पिता ही जोडी झाली ना? मातेकडून वारसा मिळणार नाही. तरीही शिवबाबांकडून तुम्हाला वारसा मिळतो. त्यामुळे त्यांचीच आठवण करावी लागेल. मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे, ब्रह्मा पण शिवबाबांचे स्मरण करतात. शंकरासमोर पण शिवाचे चित्र ठेवतात. हे सर्व महिमासाठी आहे. यावेळी शिवबाबा येतात आणि तुम्हाला आपला मुलगा बनवतात. परत तुम्ही पित्याची पूजा थोडीच करणार. बाबा येऊन, तुम्हा मुलांना फुला सारखे बनवतात. गटरमधून काढतात. परत कधीही अपवित्र होणार नाही, असे वचनही देता. बाबा म्हणतात, बाबांचे बनून, परत तोंड काळे करू नका. असे केल्यास, तुम्ही संपूर्ण कलंकित व्यक्ती बनाल. जर तसे झाले तर नाव बदनाम कराल. जर तुमचा मायेकडून पराभव झाला, तर उस्ताद चे नाव बदनाम कराल आणि पद भ्रष्ट होईल. इतर कोणतेही संन्यासी या गोष्टी शिकवत नाहीत. असे काही आहेत जे म्हणतील की, महिन्यातून एकदा विकारात जावा. काही म्हणतात ६ महिन्यातून एकदा जावा. काही खूप अजामिल पण आहेत. बाबांनी अनेक गुरू केले होते. ते कधीच असे म्हणणार नाही की, पवित्र राहा. ते समजतात की, आम्हीच राहू शकत नाही. जे समजदार असतील, ते लगेच म्हणतील की, तुम्हीच राहू शकत नाही, तर आम्हाला कसे सांगू शकाल? तरीही म्हणतात, जनकाप्रमाणे मला जीवनमुक्तीचा मार्ग एका सेकंदात सांगा. तेव्हा गुरू म्हणतात, ब्रह्माचे स्मरण करा, म्हणजे तुम्ही निर्वाणधाम मध्ये जाल. जात तर कोणी नाही, ताकदच नाही. सर्व आत्म्यांचे निवासस्थान मुळ वतन आहे, जिथे आपण आत्मे ताऱ्यांप्रमाणे राहतो. येथे पूजेसाठी मोठे लिंग बनवतात. बिंदीची पूजा कशी होईल? कपाळाच्या मध्यभागी एक विचित्र तारा चमकतो, असेही म्हटले जाते. ते आत्म्याचे पिता पण असेच असतील ना? पित्याला शरीर नाही. त्या ताऱ्याची पूजा कशी करता येईल? पित्याला परम आत्मा म्हणतात. ते तर पिता आहेत. जसा आत्मा बिंदू आहे, तसेच परमात्मा पण बिंदूच आहेत. त्यांचे रुप काही मोठे नाही. त्यांच्यामध्ये हे ज्ञान आहे. या बेहद्दच्या वृक्षाला इतर कोणीही जाणत नाहीत. फक्त पिताच ज्ञानाचे सागर आहेत, ते ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि पवित्रतेनेही परिपूर्ण आहेत. ते सर्वांसाठी सद्गती दाता आहेत. सर्वांना सुख आणि शांती देणारे आहेत. एवढा भारी वारसा तुम्हा मुलांना मिळतो, दुसऱ्या कोणाला मिळू शकत नाही. मनुष्य गुरूंची किती पूजा करतात? ते आपल्या सम्राटाची पण एवढी पूजाही करत नाहीत. तर ही सर्व अंधश्रद्धा आहे, नाही का? काय करत राहतात? कृष्णाला भगवानही म्हणतात आणि त्याला लॉर्ड पण म्हणतात. भगवान कृष्ण हे स्वर्गाचे पहिले राजकुमार, हे लक्ष्मी नारायणसाठी देखील म्हणतात, दोघेही भगवान भगवती आहेत. जुनी चित्रे खूप विकत घेतात. जुने स्टँम्पस पण विकले जातात, नाही का? खरे तर शिवबाबा हे सर्वात जुने आहेत. पण कोणाला माहीत नाही. सर्व महिमा शिवबाबांची आहे. ती वस्तू तर मिळू शकत नाही. सर्वात जुनी गोष्ट कोणती? नंबर वन शिवबाबा आहेत. आमचे पिता कोण आहेत? कोणालाच माहित नाही? त्याचे नाव रुप काय आहे? ते म्हणतात न नाव आहे, ना रूप आहे? मग तुम्ही कोणाची पूजा करता? शिव हे नाव तर आहे ना? एक देश आहे, एक काळ देखील आहे. ते स्वतः म्हणतात, मी संगमयुगात येतो. आत्मा शरीराद्वारे बोलते, नाही का? तुम्हा मुलांना आता समजले आहे की, शास्त्रात किती दंतकथा लिहल्या आहेत, ज्याद्वारे उतरती अवस्था झाली आहे. चढती कला म्हणजे सुवर्णयुग त्रेतायुग, उतरती कला म्हणजे द्वापर त्रेता. आत्ता परत चढती कला होईल. पित्याशिवाय कोणीही चढती कला बनवू शकत नाही. या सर्व गोष्टी धारण कराव्या लागतात, म्हणून कोणतेही काम वगैरे करताना, बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. जसे श्रीनाथाच्या मंदिरात प्रसाद बनवताना, तोंडाला कापड बांधतात. श्रीनाथांना कृष्ण म्हणतात. श्रीनाथांसाठी भोजन बनवतात ना? शिवबाबा तर प्रसाद वगैरे खात नाहीत. तुम्ही पवित्र भोजन बनवतात, तर तुम्ही आठवणीत राहून बनवायला पाहिजे, त्याद्वारे तुम्हाला शक्ती मिळेल. कृष्ण लोकात जाण्यासाठी ते व्रत, इ. करतात ना. आत्ता तुम्हाला माहीत आहे की, आम्ही कृष्णपुरी मध्ये जात आहोत आणि म्हणूनच तुम्हाला योग्य बनवले जात आहे. जर तुम्ही पित्याचे स्मरण केले, तर बाबा हमी देतात की, तुम्ही कृष्णपुरी मध्ये नक्की जाल. आपण आपल्यासाठी कृष्णपुरीची स्थापना करत आहोत, परत राज्य करू. श्रीमताची पालना करणारे कृष्णपुरी मध्ये येतील. लक्ष्मी-नारायण पेक्षा कृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. कृष्ण हा लहान मुलगा आहे, म्हणून ते महात्मा सारखे आहेत. बाल अवस्था सतोप्रधान आहे, म्हणूनच कृष्णाचे नाव अधिक प्रसिद्ध आहे. अच्छा!

गोड गोड खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादाची प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) एका शिवबाबाशी तुमचा पूर्ण संबंध ठेवायचा आहे. कधीही कोणत्याही देहधारीची आठवण करु नका. तुमच्या उस्तादांचे म्हणजे पित्याचे नाव कधीही बदनाम करू नका.

(२) जर आपल्या द्वारे कोणाचा फायदा होत असेल, तर मी त्याचे कल्याण केले आहे, या अहंकारात येऊ नका. हा सुद्धा देहभान आहे. ज्या बाबाने तुमच्याद्वारे करवले, त्याचे स्मरण करायचे आहे.

वरदान:-
अमृतवेळेला तिन्ही बिंदूचा तिलक लावणारे, का कसे ? या हलचल पासून मुक्त अचल अडोल भव.

बापदादा नेहमी म्हणतात, अमृतवेळेला रोज तीन बिंदूचा तिलक लावा. तुम्ही सुद्धा एक बिंदू आहात, पिता देखील एक बिंदू आहे आणि जे काही घडले आहे, ते काही नविन नाही, म्हणून या तीन बिंदूचा तिलक लावणे म्हणजेच स्मरणात राहणे. मग तुम्ही दिवसभर अचल अडोल राहाल. का, कसे याची हलचल संपेल? जेव्हा काही घडते तेव्हा पूर्णविराम द्या. काहीही नविन नव्हते, जे व्हायचे आहे, ते होत आहे. साक्षी बनून पाहत राहा आणि पुढे जात राहा.

बोधवाक्य:-
परिवर्तन शक्तीच्या सामर्थ्याने, व्यर्थ विचारांच्या प्रवाहाला नष्ट कराल, तर समर्थ बनाल.