09-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,जेव्हा पण वेळ मिळेल एकांत मध्ये बसून,विचार सागर मंथन करा,ज्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकतात त्याची उजळणी करा"

प्रश्न:-
तुमच्या आठवणी ची यात्रा कधी पूर्ण होईल?

उत्तर:-
जेव्हा तुमच्या कोणत्याही कर्मेंद्रिया धोका देणार नाहीत,
कर्मातीत अवस्था होईल,तेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल.आता तुम्हाला पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. निराशवादी बनायचे नाही.सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे.

ओम शांती।
मुलांनो आत्मअभिमानी होऊन बसले आहात?मुलं समजतात अर्धाकल्प देहाभिमानी होतो,आता देहीअभिमानी राहण्यासाठी कष्ट करावे लागतात.बाबा समजवतात स्वतःला आत्मा समजून बसा, तेव्हाच बाबांची आठवण येईल, नाहीतर विसराल.आठवण करणार नाहीतर यात्रा कसे करू शकाल? पाप कसे नष्ट होतील?नुकसान होत राहील,म्हणून नेहमी आठवण करा. ही मुख्य गोष्ट आहे,बाकी बाबा तर अनेक प्रकारच्या युक्त्या सांगत राहतात,बरोबर काय आहे,चुकीचे काय आहे?हे पण समजवले जाते बाबा ज्ञानाचे सागर आहेत.भक्तीला पण जाणतात.मुलांना भक्ती मध्ये काय काय करावे लागते.असे समजतात यज्ञ इत्यादी करणे सर्व भक्ती मार्ग आहे.बाबांची महीमा करतात परंतु उलटी महिमा करतात.वास्तव मध्ये कृष्णाची पण महिमा पूर्ण रीतीने करत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजायला पाहिजे ना.जसे कृष्णाला वैकुंठनाथ म्हटले जाते.अच्छा,बाबा विचारतात कृष्णाला त्रिलोकीनाथ म्हणू शकतो का? गायन पण आहे ना, त्रिलोकीनाथ.आता त्रिलोकीनाथ अर्थात तीन लोक मूळ वतन,सूक्ष्म वतन,स्थुलवतन.तुम्हा मुलांना समजवले जाते,तुम्ही तर ब्रह्मांडाचे पण मालक आहात.कृष्ण समजत असतील का,मी ब्रह्मांडाचे मालक आहे?नाही.ते तर वैकुंठा मध्ये होते. वैकुंठ,स्वर्गाच्या नवीन दुनियेला म्हटले जाते.तर वास्तव मध्ये त्रिलोकीनाथ कोणी पण नाहीत.बाबा सत्य गोष्टी समजवत राहतात.तीन लोक आहेत.ब्रह्मांड चे मालक शिवबाबा आहेत आणि तुम्ही पण आहात.सूक्ष्मवतनची तर गोष्टच नाही. स्थुलवतन मध्ये पण ते मालक नाहीत,न स्वर्गाचे,न नर्काचे मालक आहेत.कृष्ण तर स्वर्गाचे मालक आहेत.नरकाचे मालक रावण आहेत. यांना रावण राज्य म्हटले जाते,आसूरी राज्य म्हणतात.मनुष्य म्हणतात परंतु समजत नाहीत.तुम्हा मुलांना बाबा समजवतात.रावणाला १० तोंड दाखवतात, ते पाच विकार स्त्रीचे,तर पाच विकार पुरुषाचे रुपक आहेत. आता पाच विकार तर सर्वा मध्ये आहेत.सर्व रावण राज्यांमध्ये आहेत. आता तुम्ही श्रेष्टाचारी बनत आहात. बाबा येऊन श्रेष्टाचारी दुनिया बनवतात.एकांत मध्ये बसून विचार सागर मंथन करायला पाहिजे.त्या शिक्षणासाठी पण विद्यार्थी एकांत मध्ये,पुस्तक इत्यादी घेऊन,अभ्यास करत राहतात.तुम्हाला तर पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही.होय तुम्ही ज्ञानाचे मुद्दे नोंद करतात, त्याची उजळणी करायला पाहिजे.या मोठ्या रहस्ययुक्त समजण्याच्या गोष्टी आहेत.बाबा म्हणतात,आज तुम्हाला रहस्ययुक्त नव-नवीन गोष्टी समजावतो.पारस पुरी चे मालक, लक्ष्मी-नारायण आहेत.असे पण नाही की विष्णू आहेत.विष्णूला पण समजत नाहीत की,हे लक्ष्मीनारायण आहेत.आता तुम्हीच थोडक्यात, मुख्य लक्ष समजावतात.ब्रह्मा सरस्वती काही आपसामध्ये पती-पत्नी नाहीत.हे तर प्रजापिता ब्रह्मा आहेत ना.प्रजापिता ब्रह्माला पंजोबा म्हटले जाते,बाकी सर्व भाऊ भाऊ आहेत.इतकी सर्व ब्रह्माची मुलं आहेत,सर्वांना माहीत आहे,आम्ही भगवंताची मुलं भाऊ आहोत,परंतु त्या निराकारी दुनिये मध्ये आहात.आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात.नवीन दुनिया सतयुगाला म्हटले जाते.त्यांचे नाव ठेवले आहे पुरुषोत्तम संगमयुग.या युगामध्येच पुरुषोत्तम बनतात,या खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत.तुम्ही नवीन दुनियेत जाण्यासाठी तयार होत आहात. या संगम युगामध्ये तुम्ही पुरुषोत्तम बनतात.असे म्हणतात आम्ही तर लक्ष्मीनारायण बनू.हे सर्वात उत्तम पुरुष आहेत.त्यांना परत देवता म्हटले जाते.उत्तम ते उत्तम लक्ष्मी-नारायण,परत क्रमानुसार तुम्ही मुलं बनतात.सूर्यवंशी घराण्याला उत्तम म्हणणार,क्रमांक एक आहेत ना. हळू हळू कला कमी होत जातात. आता तुम्ही मुलं नवीन दुनियेचा मुहूर्त करतात.जसे नवीन घर तयार होते, तर मुलं खूश होतात, वास्तुशांती करतात ना.तुम्ही मुलं पण नवीन दुनियेला पाहून खूष होतात,मुहूर्त करतात.असे लिहिले आहे,सोन्यांच्या फुलांची वर्षा होते.तुम्हा मुलांना खूप खुशीचा पारा चढायला पाहिजे. तुम्हाला सुख आणि शांती दोन्ही मिळते.दुसरे कोणी नाही,ज्यांना इतके सुख आणि शांती मिळेल.दुसरे धर्म येतात तर,द्वैत सुरु होते.तुम्हा मुलांना अपार खुशी आहे की,आम्ही पुरुषार्थ करून उच्च पद मिळवू.असे नाही जे भाग्य मध्ये असेल ते मिळेल,पास व्हायचे असेल तर होऊ,नाही.प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ जरूर करायचा आहे.पुरुषार्थ पोहोचत नाही तर म्हणतात,जे नशिबामध्ये असेल ते मिळेल.परत पुरुषार्थ करणेच बंद करतात.बाबा म्हणतात तुम्हा मातांना किती उच्च बनवतो.स्त्रियांचा मान सर्व ठिकाणी आहे,परदेशात पण मान आहे.येथे मुलगी होते तर उलटी चारपाई करतात.दुनिया खूपच खराब आहे.या वेळेत तुम्ही मुलं जाणतात भारत काय होता आणि आत्ता कसा झाला आहे.मनुष्य विसरले आहेत, फक्त शांती शांती माग मागत राहतात.विश्वा मध्ये शांतीची इच्छा करतात.तुम्ही हे लक्ष्मीनारायणचे चित्र दाखवा,यांचे राज्य होते तर पवित्रता सुख शांती होती.तुम्हाला असे राज्य पाहिजे ना.मूळ वतन मध्ये तर विश्वाची शांती म्हणणार नाहीत. विश्व मध्ये शांती तर येथे असेल ना. देवतांच्या राज्यांमध्ये साऱ्या विश्वामध्ये होती.मुळवतन तर आत्म्याची दुनिया आहे.मनुष्य हे पण जाणत नाहीत,आत्म्याची पण दुनिया असते.बाबा म्हणतात मी तुम्हाला खूप उच्च पुरुषोत्तम बनवतो.या समजण्याच्या गोष्टी आहेत.असे नाही की,ओरडत राहायचे आहे की, भगवान आले आहेत.तर कोणी मानणार नाहीत.आणखीनच निंदा होईल.ते म्हणतील ब्रह्मकुमारी आपल्या बाबांना भगवान म्हणतात. अशा प्रकारे सेवा होत नाही.बाबा युक्ती सांगत राहतात.एखाद्या खोलीमध्ये भिंतीवरती चांगल्या रितीने चित्र लावा आणि बाहेर लिहा, बेहद्दच्या पित्याकडून बेहद्द सुखाचा वारसा घ्यायचा असेल किंवा मनुष्या पासून देवता बनायचे असेल तर या, आम्ही तुम्हाला समजावून सांगू.असे खुप येत राहतील.आपोआप येत राहतील.विश्वा मध्ये शांती तर होती ना.आता अनेक धर्म आहेत.

तमोप्रधान दुनिया मध्ये शांती कसे होऊ शकते? विश्वा मध्ये शांती तर भगवान च करू शकतात.शिवबाबा येतात,तर जरूर काही भेट घेऊन येतील.एकच पिता आहेत,जे एवढ्या दूरवरून येतात आणि एकाच वेळेस येतात.इतके मोठे बाबा पाच हजार वर्षानंतर येतात.परदेशाहून परत येतात तर,मुलांसाठी काही भेट घेऊन येतात.पत्नीचे पती आणि मुलांचे पिता पण बनतात ना.त्यानंतर आजोबा,पंजोबा बनतात.यांना तुम्ही पिता म्हणतात,परत आजोबा,पंजोबा पण असतील ना.वंशावळ असते ना. आदिदेव नाव पण आहे परंतु मनुष्य समजत नाहीत.तुम्हा मुलांना बाबा सन्मुख समजवतात.बाबा द्वारे सृष्टिचक्राचा इतिहास भुगोल जाणून,तुम्ही चक्रवर्ती राजा बनत आहात.बाबा खूप प्रेमाने शिकवतात तर तेवढ्याच प्रेमाने शिकायला पण पाहिजे ना.सकाळची वेळ तर सर्वांना असतेच,सकाळची मुरली अर्धा पाऊन तास ऐकून परत जावा.आठवण तर कुठे पण राहून करू शकतात.रविवारचा दिवस सुट्टीचा असतो.सकाळी दोन-तीन तास बसून योग करा.दिवसाच्या कमाईला भरून काढा.पूर्ण रीतीने बुद्धी रुपी झोळी भरा. वेळ तर मिळतो ना.मायेचे वादळ आल्यामुळे आठवण करू शकत नाहीत.बाबा अगदी सहज समजून सांगतात.भक्ती मार्गामध्ये अनेक सत्संगामध्ये जातराहतात.कृष्णाच्या मंदिरामध्ये,श्रीनाथ मंदिरामध्ये,अनेक मंदिरामध्ये जातात. यात्रेमध्ये पण व्यभिचारी बनतात. इतके कष्ट पण घेतात आणि फायदा काहीच होत नाही.या वैश्विक नाटकांमध्ये हे नोंदलेले आहे परत असेच होईल.तुमच्या आत्म्यामध्ये भूमिकेची नोंद आहे.सतयुग त्रेतामध्ये जी भूमिका केली,तीच आत्ता पण वठवतील.मोठी बुद्धी असणारे समजू शकत नाहीत. ज्यांची सूक्ष्म बुद्धी आहे,ते चांगल्या रीतीने समजून परत समजावू शकतात.त्यांच्या मनामध्ये येते,हे वैश्विक नाटक बनलेले आहे. दुनिया मध्ये कोणी समजत नाही,हे बेहद्दचे नाटक आहे,या नाटकाला समजून सांगण्यामध्ये वेळ लागतो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थीत समजावून परत म्हटले जाते मुख्य आठवणीची यात्रा आहे.सेकंदामध्ये जीवन मुक्तीचे पण गायन आहे आणि परत पण गायन आहे की ज्ञानाचे सागर आहेत. साऱ्या समुद्राची शाई बनवा, जंगलातील लाकडाचा पेन बनवा, धरतीला कागद बनवा,तरीपण अंत लागू शकत नाही,एवढी महिमा आहे. सुरुवातीपासून तुम्ही लिहीत आले आहात,अनेक पुस्तकं होतील. तुम्हाला काही धक्के खायची म्हणजे अनेक ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही.आत्मा समजणे मुख्य आहे.शिवपित्याची आठवण करायची आहे.येथे तुम्ही शिवबाबा जवळ येतात,शिवबाबा यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला खूप प्रेमाने शिकवतात.ते काही स्वतःची महिमा करत नाही.बाबा म्हणतात मी तर जुन्या शरीरांमध्ये येतो.कसे साधारण रितीने येऊन शिकवतात,कोणताही अहंकार नाही.बाबा म्हणतात तुम्ही मला पतीत दुनिये मध्ये,पतित शरीरा मध्ये बोलवतात,येऊन आम्हाला ज्ञान द्या.सतयुगा मध्ये बोलवत नाहीत,की येऊन हिऱ्या मोत्यांच्या महलमध्ये बसा,भोजन इत्यादी स्वीकार करा.शिवबाबा तर भोजन करत नाहीत.अगोदर बोलवत होते की,येऊन भोजन स्वीकार करा.३६ प्रकारचे भोजन खाऊ घालत होते, परत असेच होईल.हे पण चरित्रच म्हणावे लागेल.कृष्णाचे चरित्र काय आहे?ते तर सतयुगाचे राजकुमार आहेत,त्यांना पतित पावन म्हटले जात नाही.सतयुगा मध्ये विश्वाचे मालक कसे बनले? हे पण तुम्हीच जाणतात.मनुष्य घोर अंधारांमध्ये आहेत.आत्ता तुम्ही प्रकाशामध्ये आले आहात.बाबा येऊन रात्रीला दिवस बनवतात.अर्धाकल्प तुम्ही राज्य करत होते,खूप खुशी व्हायला पाहिजे. तुमच्या आठवणी ची यात्रा केव्हा पूर्ण होईल,जेव्हा तुमच्या कोणत्याही कर्मेंद्रिया धोका देणार नाहीत.कर्मातीत अवस्था होईल, तेव्हा आठवणी ची यात्रा पूर्ण होईल. आता पूर्ण झाली नाही.आता तुम्हाला पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. निराशवादी बनायचे नाही. सेवा आणि सेवा करत राहायचे आहे. बाबा पण येऊन वृध्द तनाद्वारे सेवा करत आहेत ना.बाबा करताकरविता आहेत ना.मुलांची खूप काळजी राहते,हे बनवायचे आहे,इमारती बनवायच्या आहेत.जसे लौकिकपित्याला विचार राहतात,तसेच पारलौकिक पित्याला पण बेहद्दचे विचार राहतात.तुम्हा मुलांनाच सेवा करायची आहे.दिवसें-दिवस खूप सहज होत जाईल.जितके विनाशाच्या जवळ जाल,तेवढी शक्ती येत जाईल.गायन पण आहे,भिष्म पितामहा इ.ना शेवटी ज्ञानबाण लागतील.आता ज्ञानबाण लागेल तर खूप गोंधळ होईल.इतकी गर्दी होईल की,विचारु नका.असे म्हणतात ना डोकं खाजवण्यास पण वेळ नाही. असे कोणी नाही. परंतु गर्दी होते म्हणून असे म्हटले जाते.जेव्हा यांना पण ज्ञानाचा बाण लागेल,तेव्हा तुमचा प्रभाव होइल.सर्व मुलांना बाबांचा परिचय तर मिळणारच आहे. तुम्ही तीन पाऊल पृथ्वीमध्ये(कमी जागेत) अविनाशी दवाखाना आणि ईश्वरीय विद्यापीठ उघडू शकतात. पैसे नसतील तरी पण हरकत नाही. तुम्हाला चित्रं मिळून जातील. सेवेमध्ये मानापमान थंडी गरमी इत्यादी सर्व सहन करायचे आहे. कोणाला हिऱ्या सारखे बनवणे कमी गोष्ट आहे का?शिवपिता कधी थकतात का? तुम्ही का थकतात? अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सकाळच्या वेळेत,अर्धा-पाऊण तास खूप प्रेमाने मुरली ऐकायची आहे,व बाबाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे.आठवणीचा असा पुरुषार्थ व्हायला पाहिजे, ज्यामुळे सर्व कर्मेन्द्रिया वश होतील.

(२) सेवेमध्ये दुःख सुख मानापमान सर्व काही सहन करायचे आहे. कधीच सेवेमध्ये थकायचे नाही.तीन पाऊल पृथ्वीचे घेऊन, अविनाशी दवाखाना आणि विद्यापीठ उघडून हिऱ्यासारखे बनवण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
सर्व शक्तींच्या प्रकाशा द्वारे,आत्म्यांना रस्ता दाखवणारे चैतन्य दिपस्तंभ भव.

नेहमी या स्मृतीमध्ये राहा की,मी आत्मा विश्व कल्याणाच्या सेवेसाठी परमधाम वरून अवतरीत झालो आहे,तर जे पण विचार कराल, बोलाल,त्यामध्ये विश्वकल्याण सामावलेले असेल आणि हीच स्मृति दीपस्तंभाचे कार्य करेल.जसे त्या लाईट हाऊस (दिपस्तंभा) द्वारे एका रंगाचा प्रकाश निघतो.तसेच चैतन्य लाईट हाऊस द्वारा,सर्व शक्तींचा प्रकाश आत्म्यांना,प्रत्येक पाऊला मध्ये रस्ता दाखवण्याचे कार्य करत राहील.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:-स्नेह आणि सहयोगाच्या सोबत,शक्तिरूप बना तर, राजधानीमध्ये पुढचा क्रमांक मिळेल.