09-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो'तुम्ही समजदार बनले आहात,तर कमाई करण्याची खूप आवड राहिली पाहिजे,धंदा इत्यादींमधून वेळ काढून बाबांची आठवण करत राहा,तर कमाई होत राहील"

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणती अशी श्रीमत मिळाली आहे,जी कधी मिळाली नाही?

उत्तर:-
(१) तुम्हाला या वेळेत बाबा श्रीमत देतात,गोड मुलांनो,सकाळी सकाळी उठून,बाबांच्या आठवणी मध्ये बसा,तर पूर्ण वारसा मिळेल. (२) गृहस्थ व्यवहारा मध्ये राहत कमलफुल समान राहा,अशी श्रीमत दुसऱ्या सत्संगामध्ये कधी मिळू शकत नाही.त्या सत्संगामध्ये पिता आणि वारशाची गोष्टच राहत नाही.

गीत:-
तुम्हीच माता आणि पिता आहात

ओम शांती।
या भारतामध्ये खास आणि सर्व दुनिया मध्ये अनेक प्रकारचे सत्संग असतात.असा कोणताही सत्संग,चर्च किंवा मंदिर नसेल,जिथे मनुष्याच्या बुद्धी मध्ये राहते की,आम्ही हा वारसा मिळवत आहोत.येथे तुम्ही मुलं बसले आहात,सर्व सेवा केंद्र मध्ये आपल्या बेहद्द पित्याच्या आठवणी मध्ये बसले आहेत- या विचारात की आम्ही आपल्या पित्याकडून बेहद्दचा वारसा घेत आहोत,असे दुसऱ्या कोणत्या सत्संग इत्यादी मध्ये समजत नाहीत.तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्येच आहे.तुम्ही मुलं जाणतात,आम्ही बाबांच्या आठवणीत बसलो आहोत,नवीन दुनिया स्वर्गाचा वारसा घेत आहोत. सर्व मुलं एक पित्याकडून वारसा घेत आहेत.मुलं वृद्धी होत राहतात. सर्वांना श्रीमत मिळते की,सकाळी-सकाळी उठून बाबाची आठवण करा,आम्ही बाबा पासून हा वारसा घेत आहोत.आम्ही त्या पित्याचे बनलो आहोत.आत्म्याला आत्ता ओळख मिळाली आहे.बाबा सुचना देतात की, मज पित्याची आठवण करा,गृहस्थ व्यवहारात राहून कमलफुला सारखे पवित्र बना. सर्वांना येथे राहायचे नाही.शाळेमध्ये शिकून परत आपापल्या घरी चालले जातात.प्रत्येक मुलगा,मुलगी आपल्या शिक्षकाकडून वारसा मिळवू शकतात.हे पण असे आहे.रोज शिक्षण घेऊन,परत घरी जाऊन धंदा इत्यादी खुशाल करा.तुम्ही गृहस्थ व्यवहारा मध्ये पण आहात आणि विद्यार्थी पण आहात. गृहस्थ व्यवहारांमध्ये राहात, कमलफुला सारखे राहायचे आहे. असे कोणी संन्यासी म्हणू शकत नाहीत.येथे तुम्ही प्रत्यक्षात बसले आहात.ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत पवित्र बनत आहात.पवित्र बनून परमपिता परमात्माला दुसरे कोणी आठवण करत नाहीत.जरी गीता ऐकतात,वाचतात,परंतु आठवण तर करत नाहीत ना.सांगणे आणि करणे यामध्ये फरक राहतो ना.तुम्ही जाणतात,आमचे बाबा ज्ञानाचे सागर आहेत,त्यांच्यामध्ये सर्व नाटकाचे ज्ञान आहे.आता आम्हाला ज्ञान मिळत आहे.हे सृष्टिचक्र खूप चांगले आहे.हे पुरुषोत्तम युग असल्यामुळे तुमचा हा जन्म पण पुरुषोत्तम आहे. अधिक मास असतो ना.

तुम्ही मुलं जाणतात,आम्ही बरोबर बाबा कडून पुरुषोत्तम बनत आहोत. आम्ही मर्यादा पुरुषोत्तम परत बनत आहोत.परत ८४ जन्म घेतले, आता बुद्धीमध्ये ज्ञान आहे.असे, दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये समजवत नाहीत.तुम्ही समजतात,आम्हाला असे बनायचे आहे,बनवणारे शिव पिताच आहेत.या लक्ष्मी-नारायणच्या चित्रावरती तुम्ही चांगल्या रीतीने समजावू शकतात.बरोबर ब्रह्माद्वारे योगबळाने यांनी हे पद मिळवले,असे बुद्धीमध्ये स्पष्ट राहायला पाहिजे. ब्रह्मा-सरस्वती,लक्ष्मीनारायण चे दोन रूप दाखवले आहेत.ब्रह्मा-सरस्वती परत प्रजा पण दाखवयाला पाहिजे.प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे.बाबा म्हणतात,माझी आठवण करा.ब्रह्माला पण म्हणतात माझी आठवण करा,तर हे बनाल,म्हणजे ब्रह्मा मुख वंशावळ सर्वांना म्हटले,माझी आठवण करा. कशी आठवण करायची,हे पण बुद्धीमध्ये आहे.चित्र समोर आहेत, यावरती समजवणे खूप सहज आहे. बाबांचा परिचय द्यायचा आहे. प्रदर्शनीमध्ये पण यावरती समजून सांगा, हा निश्चय बसवा की बरोबर, हे सर्वांचे बेहद्दचे पिता आहेत.या हिशोबा द्वारे आम्हाला बेहद्दचा वारसा मिळाला पाहिजे.आम्ही निराकारी आत्मे तर भाऊ-भाऊ आहोत.जेव्हा साकार मध्ये येऊ, तेव्हा तर भाऊ-बहीण बनू,तेव्हाच शिकू शकतो.भाऊ बहिण,ब्रह्माची मुलंच बनतील.पित्या कडून वारसा मिळतो.हे बुद्धी मध्ये बसवायचे आहे.कोणाला ही समजून सांगा.प्रथम शिव पित्याचा परिचय द्या.आम्ही भाऊ भाऊ आहोत. सर्वव्यापी म्हटल्यामुळे पितृत्व भाव होतो.पितृत्व भाव असल्याने वारसा कसा मिळेल.पिता-पिता म्हणत खाली उतरत आलेले आहेत,वारसा काहीच मिळाला नाही.आता भाऊ भाऊ समजल्यामुळे वारसा मिळेल,तर त्यावरती चांगल्या प्रकारे समजून सांगितल्यामुळे बुद्धीमध्ये जे अष्ट देवता इत्यादी बसले आहेत,ते सर्व निघून जाईल.तुम्ही स्पष्ट करा दोन पिता आहेत.आत्मिक पिता ज्यांच्या कडून सर्वांची सद्गती होणार आहे,तेच सुख शांती चा वारसा देतात.सर्व सुखी होतात,त्यांना म्हटले जाते ईश्वरी स्वर्गीय पिता, स्वर्ग रचणारे.प्रथम पित्याचा प्रभाव बुद्धीमध्ये बसवायला पाहिजे.हे आत्म्याचे बेहद्दचे पिता आहेत, त्यांनाच पतित-पावन म्हणतात. तुम्ही आत्मा,परमपिता परमात्माची मुलं आहात,हा निश्चय पक्का करा. ही मुख्य गोष्ट बुद्धीमध्ये बसवायला पाहिजे.हे समजायला पाहिजे, तेव्हाच खुशीचा पारा चढेल आणि म्हणतील आम्ही पित्याची आठवण जरूर करू.आम्हाला निश्चय होतो, आम्ही बाबांच्या आठवण करून विश्वाचे मालक बनू.याची खुशी खूप राहील.समजदार असतील आणि बुद्धी मध्ये पूर्ण निश्चय असेल,तर म्हणतील असे बेहद्दचे बाबा, दादाच्या तना मध्ये येतात,त्यांना अगोदर भेटू. शिव बाबा ब्रह्माद्वारेच आमच्याशी गोष्टी करू शकतात. तुम्ही आत्मा त्यांना भेटले नाहीत,तर आठवण कसे करणार.मुलाला दत्तक घेतले तर आठवणीत येतात.दत्तक नसतील तर आठवणीत कसे येतील.प्रथम त्यांचे बना.अशा बाबांना तर लगेच,भेटायला पाहिजे.बाबा पण असे विचारतात,तुम्ही स्वतःला आत्मा समजतात?मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे.शिवबाबा तुमच्याशी गोष्टी करत आहेत.माझ्या आत्म्यांचे पिता, ते तुमचे पिता आहेत.ते विचारतात तुम्हाला निश्चय आहे की,सर्व आत्म्यांचे पिता बरोबर एकच आहेत, तेच वारसा देतात,पवित्र पण बनायचे आहे.बाबां शिवाय बाकी सर्वांना विसरायचे आहे.तुम्ही आत्मा परमधाम घरातून अशरीरी आले होते,कोणताही देह,संबंध नव्हता. आत्मा जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करेल,मोठी होईल,तेव्हा त्यांना समजवले जाते की,हे तुमचे बाबा आहेत,अमके आहेत.आत्मा तर सर्व संबधापासून वेगळी आहे.आत्मा जाते,तर म्हटले जाते तुम्ही मेले,तर दुनिया पण मेल्यासारखीच आहे.बंधन रहीत होते,जोपर्यंत दुसरे शरीर मिळेल.मातेच्या गर्भामध्ये जाऊन,बाहेर निघते,समजदार बनतील,परत संबंधामध्ये येतात.येथे पण तुम्हा मुलांना समजायचे आहे, जिवंतपणी सर्वकाही विसरायचे आहे.एका बाबांची आठवण करणे,ही अव्यभिचारी आठवण आहे.आत्मा जाणते,यालाच योग म्हटले जाते.येथे तर मनुष्यांना अनेकांची आठवण राहते.तुमची अव्यभिचारी आठवण आहे.आत्मा जाणते,हे सर्व शरीराचे संबंध नष्ट होणार आहेत,आमचे संबंध एक शिवपित्या सोबत आहेत,शिव पित्याची जितकी आठवण कराल,तर विकर्म नष्ट होतील.असे पण नाही मित्र संबंधीची आठवण केल्यामुळे काही विकर्म बनतील, नाही.विकर्म तर तेव्हाच बनतील जेव्हा असे कोणते चुकीचे कर्म कराल,बाकी कोणाची आठवण केल्यामुळे विकर्म बनणार नाहीत, होय,वेळ वाया जाईल.एक बाबाची आठवण केल्यामुळे च विकर्म विनाश होतील.ही युक्ती आहे पाप नष्ट करण्याची,बाकी मित्र संबंधीची आठवण येत राहते.शरीर निर्वाह कामधंदा इत्यादी सर्व करा परंतु जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करत राहा,तर भेसळ निघून जाईल.मुख्य गोष्ट तर ही आहे.मनामध्ये विचार करा की, पतिता पासून पावन कसे बनायचे? बाबांची आठवण करावी लागेल. गृहस्थ व्यवहार मध्ये राहायचे आहे. संन्यासी लोक पण शरीर सोडून परत ग्रहस्थीच्या जवळ जाऊन जन्म घेतात,असे तर नाही जन्मजन्मांतर साठी पावन बनतात.निर्विकारी दुनिया तर आत्ता नाही, ही तर विकारी दुनिया आहे,यामधून कोणी बाहेर निघू शकत नाही.विकारी दुनिया मध्ये राहिल्यामुळे काही न काही अवगुण जरूर आहेत.बाकी दुनिया दोन आहेत.विकारी दुनिया दुनिया आणि पावन दुनिया.पावन दुनियेत देवता राहत होते,तर समजावून सांगणे सहज होईल.या पतित दुनियेचा आत्ता विनाश होणार आहे.विनाशाच्या अगोदर बेहद्दच्या बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.बाबा म्हणतात,देहाचे सर्व संबंध सोडून,स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा, तर तुम्ही पावन बनाल.बाबा म्हणतात,तुम्ही मला पतित-पावन म्हणतात ना.गंगे मध्ये स्नान करणारे तर खूप आहेत.असे थोडेच पावन बनू शकतात.प्रदर्शनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे आहे.प्रजापिता तर येथेच पाहिजेत. वृक्षाखाली हे ब्रह्मा आणि ब्रह्मकुमार कुमारी तपस्या करत आहेत.तर ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून सांगायची आहे.स्पष्ट पणे समजायचे आहे. पहा आम्ही कुठे संभ्रमीत होतो,तर म्हणा अच्छा, तुम्ही थोड़ थांबा,आमची दुसरी बहीण येऊन समजावून सांगेल.एक दोघा पेक्षा हुशार असतात ना.प्रदर्शनी मेळ्यामध्ये तपासायला पाहिजे की, मी ठीक प्रकारे समजावून सांगतो? कोणता वादविवाद तर करत नाही. गेट वरती पण ओळखीच्या व्यक्तीने थांबवायला पाहिजे.अनेक प्रकारचे मनुष्य येतात.मोठ्या मनुष्यांना जरूर सन्मान आदर द्यायला पाहिजे.फर्क तर जरुर राहील ना.यामध्ये असे वाटायला नाही पाहिजे की, यांच्यावरती विशेष स्नेह आहे, यांच्यावर नाही.द्वैत भाव आहे,परंतु असे नाही.यांना द्वैत म्हटले जात नाही.असे समजतात येथे मोठ्या मनुष्यांची खात्री केली जाते. सेवाधारीची खात्री करतील ना. कोणी घर बनवून दिले आहे,त्यांची खात्री तर जरूर करावी लागेल ना. तुमच्यासाठीच हे घर इत्यादी बनवले आहेत ना.जे कष्ट करुन राजा बनतील तर, प्रजा आपोआप त्यांची खात्री करतील ना.कमी दर्जा असणाऱ्या पेक्षा,उच्च दर्जा असणाऱ्याची जरुर खात्री होईल ना.बेहद्दच्या बाबांची सर्व दुनिये मधील मुलं आहेत ना, परंतु जन्म भारतामध्ये घेतला आहे. भारतवासी जे प्रथम उच्च होते, ते आता कनिष्ठ बनले आहेत.तर बाबा म्हणतात मी तुम्हाला शिकवण्यासाठी आलो आहे.मी भारतामध्ये येतो,तर सर्वांचे कल्याण होते.खास आणि साधारण तर असतात ना.आता भारतच नर्क आहे, परत स्वर्ग असणार आहे.तर भारतामध्ये जातील ना,बाकी कुठे जाऊन काय करतील.भारतामध्येच भक्तिमार्गा मध्ये प्रथम सोमनाथ चे मोठे आलीशान मंदीर बनवले होते. जसे परदेशामध्ये मोठ मोठे चर्च बनवतात,कारण पोपचे राज्य आहे ना. सर्व चर्च पण एक सारखे नसतात, क्रमानुसर आसतात. सोमनाथाचे मंदिर खूप हिरे जवाहर रत्नानी भरपूर होते.मुसलमान इत्यादीने लुटून घेऊन गेले.खूप धनवान होते.चर्चमध्ये काय लूटणार. मनुष्य धनाच्या पाठीमागे पडतात ना.मोहम्मद गजनवी खूप लुटून घेऊन गेला,परत इंग्रज आले ते पण धन येथून त्यांच्या देशात पाठवत होते.खूप धन घेऊन गेले,आता तुम्हाला वापस मिळत आहे.करोडो रुपये देतात,हे सर्व वेळेवर देत आहेत.हिशोब मिळाला नाही तर, कामात कसे येतील.बाबा समजवतात,हे पूर्वनियोजित नाटकच असे बनले आहे.हे देवाण-घेवाणचा हिशोब असा आहे.तरीही तुम्हा मुलांना आता स्वर्गाचे मालक बनायचे आहे.या विश्वाचा इतिहास भूगोलाचे चक्र कसे फिरते,ते पण मुलांनी समजले आहे.तरी मुलांनो मनमनाभव.या सर्वांची पुनरावृत्ती होत राहते.प्रत्येक गोष्ट सतो पासून तमोप्रधान बनते.दिवसा तर काम धंदा इत्यादी करतात,तर वेळ थोडा असतो,बाकी जितका वेळ मिळेल तेवढी माझी आठवण करा.काम धंद्यामध्ये कधीकधी वेळ पण मिळतो.काही जणांची नौकरी अशी असते,फक्त सही केली बस.असे पण खूप रिकामे राहतात.रात्र तर आपलीच आहे.दिवसा शरीर निर्वाह साठी कमाई करतात.रात्री परत ही ज्ञान योगाची कमाई आहे.ही कमाई तर भविष्य २१ जन्मासाठी आहे. असे म्हटले जाते,एक घडी,अर्धी घडी, जितके शक्य होईल,बाबांच्या आठवणी मध्ये राहा,तर तुमची खूप कमाई होत राहील.जे समजदार असतील तर समजतील,बरोबर खूप कमाई करू शकतो.काही काही दिनचर्ये मधे लिहतात,आम्ही इतका वेळ आठवण केली.अज्ञान काळामध्ये कोणी आपली दिनचर्या लिहितात,तुम्ही पण दिनचर्या लिहा, तर लक्ष राहील.वेळ तर वाया जात नाही.कोणते विकर्म तर नाही केले, अच्छा.

गोड गोड,खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणत्याही देहधारी ची आठवण करून आपला वेळ वाया घालवायचा नाही.कोणते असे चुकीचे कर्म करून आपले विकर्म बनायला नको.

(२) जीवंत पणी सर्व काही विसरून एक बाबांची आठवण करायची आहे.शरीर निर्वाहअर्थ कर्म पण करायचे आहे,सोबत समजदार बनवून रात्री जागरण करून पण, अविनाशी कमाई करायची आहे. आठवणीची नोंद ठेवायची आहे.

वरदान:-
बेहद्दच्या वैराग्य वृत्ती द्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणारे अचल अडोल भव.

जे नेहमी बेहद्दच्या वैराग्य वृत्ती मध्ये राहतात,ते कधी कोणत्याही दृश्याला पाहून घाबरत नाहीत.कारण नेहमीच अचल अडोल राहतात, कारण बेहद्दच्या वैराग्य वृत्ती द्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनतात.जर थोडे फार पाहून,अंशमात्र पण हालचाल होते, तर मोह होतो.तर अगंद समान अचल अडोल राहू शकत नाही.बेहद्दच्या वैराग्य वृत्ती सोबतच गंभीरते सोबत रमणीकता पण सामावलेली आहे.

बोधवाक्य:-
राज्य अधिकारा सोबत बेहद्दचे वैरागी बनून राहाणेच, राजऋर्षी ची लक्षणं आहेत.