09-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,सकाळी सकाळी उठून बाबांशी गोड गोष्टी करा, विचार सागर मंथन करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे"

प्रश्न:-
भक्त पण भगवंताला सर्वशक्तिमान म्हणतात आणि तुम्ही मुलंही,परंतु दोघांमध्ये अंतर काय आहे?

उत्तर:-
ते म्हणतात भगवान तर,जे पाहिजे ते करू शकतात.सर्व काही त्यांच्या हातामध्ये आहे परंतु तुम्ही मुलं जाणतात,बाबा पण म्हणतात, मी या वैश्विक नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेला आहे.हे वैश्विक नाटकच सर्वशक्तिमान आहे.बाबांना सर्वशक्तिमान,यामुळे म्हटले जाते कारण त्यांच्याजवळ सर्वांना सद्गती देण्याची शक्ती आहे.असे राज्य स्थापन करतात,ज्याला कोणी लुटू शकत नाही.

ओम शांती।
कोणी म्हटले?बाबांनी. ओम शांती,हे कोणी म्हटले,दादानी. आता तुम्हा मुलांनी ओळखले आहे, भगवंताची उच्च ते उच्च महिमा तर खूप भारी आहे.ते म्हणतात भगवान सर्वशक्तिमान आहेत,तर काय करू शकत नाहीत?आता हे भक्ती मार्गातले सर्वशक्तिमानचा अर्थ खूप भारी काढत राहतात.बाबा म्हणतात वैश्विक नाटकानुसार सर्व काही होते,मी काहीच करत नाही.मी पण या नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेला आहे.तुम्ही मुलं बाबांची आठवण केल्यामुळे,सर्वशक्तिमान बनतात. पवित्र बनल्यामुळे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनतात.बाबा सर्वशक्तिमान आहेत तर त्यांना शिकवायचे असते,मुलांनो माझी आठवण करा,तर विकर्म विनाश होऊन,परत सर्वशक्तिमान बणून विश्वावर राज्य कराल.शक्ती असणार नाही तर,राज्य कसे कराल.योगाद्वारे शक्ती मिळते म्हणून भारताच्या प्राचीन योगाचे खूप गायन आहे.तुम्ही मुलं क्रमानुसार आठवण करून आनंदामध्ये राहतात.तुम्ही जाणतात आम्ही बाबांची आठवण केल्यामुळे विश्वा वरती राज्य मिळवू शकतो. कोणाची ताकद नाही जे परत घेऊ शकतात.बाबांची महिमा सर्व करतात परंतु अर्थ सहित समजत नाहीत.एक पण मनुष्य नाही,ज्याला हे माहिती आहे की,हे वैश्विक नाटक आहे.जर समजतात की,हे नाटक आहे तर आदीपासून अंत काळापर्यंत आठवण यायला पाहिजे,नाहीतर नाटक म्हणने चुकीचे होते.असे म्हणतात हे नाटक आहे,आम्ही कलाकार,अभिनय करण्यासाठी आलो आहोत.तर त्या नाटकाच्या आदी मध्य अंतला पण जाणायला पाहिजे ना.हे पण म्हणतात,आम्ही वरून येतो तेव्हाच वृद्धी होत राहते ना.सतयुगामध्ये तर थोडे मनुष्य असतात.इतके सर्व मनुष्य कोठून आले?हे कोणीच समजत नाहीत की,अनादी पूर्वनियोजित अविनाश नाटक आहे.आदीपासून अंतापर्यंत पुनरावृत्ती होत राहते.तुम्ही सिनेमा स्वरूवाती पासून शेवट पर्यंत पाहिला,परत दुसऱ्या वेळेस पाहिला तर,चक्र जरूर हुबहू पुनरावृत्ती होत राहते.जर पण फर्क पडू शकत नाही.

बाबा गोड गोड मुलांना,कसे सन्मुख समजवतात.बाबा खूप गोड आहेत. मुलं म्हणतात,बाबा तुम्ही किती गोड आहात,बाबा बस आम्ही आपल्या सुखाधामध्ये येतो.आता ही माहिती झाली आहे की,आत्मा पावन बनेल तर,स्वर्गामध्ये दूध पण चांगले मिळेल.श्रेष्टाचारी माता खूप गोड असतात,वेळेवरती मुलांना दूध पाजतात,मुलांना रडण्याची आवश्यकता राहत नाही.अशा प्रकारे विचार सागर मंथन करायचे असते.सकाळी बाबांशी गोष्टी करण्यामध्ये खूप आनंद येतो.बाबा तुम्ही श्रेष्टाचारी राज्य स्थापन करण्याची किती चांगली युक्ती सांगत आहात.परत आम्ही श्रेष्ठाचारी मातांच्या गोदीमध्ये जाऊ. अनेक वेळा आम्हीच नवीन सृष्टी मध्ये गेलो आहोत.आता आमच्या आनंदाचे दिवस आले आहेत.हे खुशीचे खुराक आहे,त्यामुळे गायन पण आहे.अतिइंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपींना विचारा.आता आम्हाला बेहद्दचे पिता मिळाले आहेत.आम्हाला परत स्वर्गाचे मालक श्रेष्टाचारी बनवत आहेत.कल्प-कल्प आम्ही आपले राज्य भाग्य घेतो.हार होते परत जिंकतो.आता बाबांची आठवण करुन रावणावरती विजय मिळवायचा आहे, परत आम्ही पावन बनू.तेथे लढाई दुःख इत्यादीचे नाव नसते,काही खर्च नसतो.भक्तिमार्गा मध्ये तर जन्म जन्मांतर खूप खर्च केला,अनेक ठिकाणी तिर्थयात्रेला जाऊन धक्के खाल्ले.अनेक गुरू केले,आता परत अर्धा कल्प कोणी गुरु करणार नाही,शांतीधाम सुखधाम मध्ये जाऊ.बाबा म्हणतात तुम्ही सुखधामचे प्रवासी आहात.आता दुखधाम मधुन सुखधाम मध्ये जायचे आहे.आमचे बाबा,आम्हाला किती चांगल्या प्रकारे शिकवत आहेत.आपले स्मृती स्थळ,दिलवाडा मंदिर पण येथे आहे.हे पण खूप आश्चर्य आहे.या दिलवाडा मंदिराची अपरम-अपार महिमा आहे.आता आम्ही राजयोग शिकत आहोत.त्याचे स्मृतिस्थळ तर जरुर बनेल.हे दिलवाडा मंदिर हुबेहूब आमचे स्मृतिस्थळ आहे. बाबा मम्मा आणि मुलं योगामध्ये बसले आहेत.खाली योग करत आहे,छतावरती स्वर्गाची राजाई आहे.झाडांमध्ये पण ज्ञान खूप स्पष्ट आहे.बाबांनी कसा साक्षात्कार करवला,परत चित्र इत्यादी बनवले. बाबांनीच साक्षात्कार करवला आणि परत त्यामध्ये सुधारणा पण केली.किती आश्चर्य आहे,सर्व नवीन ज्ञान आहे,कोणालाही या ज्ञानाची माहिती नाही.बाबाच सन्मुख समजवतात.मनुष्य किती तमोप्रधान बनत जातात.मनुष्य सृष्टीची वृद्धी होत जाते,भक्ती पण वृद्धी होत, तमोप्रधान बनत जाते.येथे आत्ता तुम्ही सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करत आहात.गीतेमध्ये पण मनमनाभव हे अक्षर आहे.ते फक्त जाणत नाही की,भगवान कोण आहेत?आता तुम्हा मुलांना सकाळी सकाळी उठून विचार सागर मंथन करायचे आहे की,मनुष्यांना भगवंताचा परिचय कसे देऊ शकतो.भक्तीमध्ये मनुष्य सकाळी सकाळी उठून खोलीमध्ये बसून भक्ती करतात.ते पण विचार सागर मंथन झाले ना.आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबांना तिसऱ्या नेत्राची कथा ऐकवतात,यालाच परत तिजरीची कथा म्हटले जाते.तिजरीची कथा, अमरकथा,सत्यनारायणाची कथा पण प्रसिद्ध आहे.या कथा ऐकवणारे एक बाबाच आहेत,ज्या भक्तिमार्ग मध्ये चालत येतात. ज्ञानाद्वारे तुम्ही मुलं पवित्र बनतात म्हणून देवतांना पदमपती म्हणतात. देवता खूप धनवान,पदमपती बनतात.कलियुगाला पण पहा आणि सतयुगाला पण पहा, रात्रंदिवसा चा फरक आहे.साऱ्या दुनियेची सफाई,स्वच्छता होण्यामध्ये वेळ तर लागतो ना.ही बेहदची दुनिया आहे.भारतच अविनाशी खंड आहे,हा कधी नष्ट होत नाही.अर्धा कल्प एकच खंड राहतो,परत दुसरे खंड होतात.तुम्हा मुलांना किती ज्ञान मिळत आहे. तुम्ही समजून सांगायचे,विश्वाच्या इतिहास भूगोलाचे चक्र कसे फिरते,हे येऊन समजून घ्या.प्राचीन ऋषीमुनींचा किती मान आहे,परंतु ते पण सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणत नाहीत.ते तर हठयोगी आहेत.होय,बाकी त्यांच्यामध्ये पवित्रतेची शक्ती आहे,ज्याद्वारे भारताला अपवित्रते पासून थोपवतात,नाहीतर भारताचे हाल माहित नाही,काय झाले असते. घराची दुरुस्ती तर केली जाते, त्यामुळे शोभा येते ना.भारत महान पवित्र होता,तोच आता पतित बनला आहे.तेथे तुम्हाला सुख पण खूप काळ मिळते.तुमच्याजवळ खूप धन राहते.तुम्ही भारतामध्येच राहतात.तुमचे राज्य होते,कालचीच गोष्ट आहे,परत अनेक धर्म येतात. त्यांनी येऊन काही सुधारणा केल्या आणि आपले नाव प्रसिद्ध केले. आता ते पण तमोप्रधान बनले आहेत.आता तुम्हाला खूप आनंद व्हायला पाहिजे.या सर्व गोष्टी नवीन मुलांना शिकवायचे नाहीत,प्रथम तर शिव पित्याचा परिचय द्यायचा आहे. बाबाचे नाव रूप देश काळ जाणतात का?बाबांची भूमिका तर प्रसिद्ध आहे ना.आता तुम्ही जाणतात,ते बाबाच आम्हाला श्रीमत देत आहेत.तुम्ही परत आपली राजधानी स्थापन करत आहात.तुम्ही मुलं माझे मदतगार आहात.तुम्हीच पवित्र बनतात. तुमच्यासाठी पवित्र दुनियेची जरूर स्थापना होणार आहे.तुम्ही लिहू शकता की जुनी दुनिया बदलत आहे,परत हे सूर्यवंशी चन्द्रवंशीचे राज्य येईल,नंतर रावण राज्य बनेल. चित्रावरती समजवणे खूप गोड वाटते,यामध्ये तिथी तारीख सर्व लिहिले आहे.भारताचा प्राचीन राजयोग म्हणजे आठवण,या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतात आणि ज्ञानामुळे पद मिळते. दैवी गुण धारण करायचे आहेत. इतके जरुर आहे की,मायेची वादळं पण येतील.सकाळी उठून बाबांशी गोष्टी करणे खूप चांगले आहे.भक्ती आणि ज्ञान दोघांसाठी,सकाळची वेळ चांगली आहे.गोड गोड गोष्टी करायच्या आहेत.आता आम्ही श्रेष्ठाचारी दुनिया मध्ये जाऊ.वृद्ध मनुष्याच्या मनामध्ये राहते की, आम्ही हे शरीर सोडून गर्भामध्ये जाऊन व लहान मुलगा बनू.बाबा खूप नशा चढवतात.अशा गोष्टी तुम्ही कराल,तर तुमची कमाई होत राहील.शिव बाबा आम्हाला नर्कवासी पासून स्वर्गवासी बनवत आहेत.प्रथम आम्ही येतो,सर्वांगीण भूमिका करतो.आता बाबा म्हणतात,या शरीराला सोडायचे आहे.देह सहित सर्व दुनियेला विसरा.हा बेहद्दचा सन्यास आहे.तेथे तुम्ही वृद्ध बनाल तर साक्षात्कार होतो,आम्ही मुलगा बनू,लहानपण तर सर्वात चांगले आहे ना.अशा प्रकारच्या गोष्टी सकाळी उठून विचार सागर मंथन करायच्या आहेत.ज्ञानाचे मुद्दे निघतील,तर तुम्हाला आनंद होईल,त्यामध्ये तास-दीड तास निघून जाईल.जितका अभ्यास होईल तेवढा आनंद वाढत जाईल, खूप मजा येईल आणि परत चालता-फिरता आठवण करायची आहे.वेळ तर खूप आहे.होय यामध्ये विघ्न पण येतील.यामध्ये काही संशय नाही.धंद्यामध्ये मनुष्याला झोप येत नाही.आळशी लोक झोप घेतात.तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे शिवबाच्या आठवणीमध्ये राहा.तुमच्या बुद्धीमध्ये राहते की,शिवबाबांसाठी आम्ही भोजन बनवत आहोत.शिवबाबांसाठी आम्ही हे करत आहोत.भोजन पण शुद्धीने,बाबांच्या आठवणीत बनवायचे आहे.अशी गोष्ट व्हायला नको, ज्याद्वारे खिटपीट होईल.ब्रह्मा बाबा पण आठवण करतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सकाळी सकाळी उठून बाबांशी गोड -गोड गोष्टी करा.रोज आनंदाचा खुराक घेत अतिइंद्रिय सुखाचा अनुभव करायचा आहे.

(२) राजधानी स्थापन करण्यामध्ये बाबांचे पूर्णपणे मदतगार बनण्यासाठी,पावन बनायचे आहे. आठवणी द्वारे विकर्म विनाश करायचे आहेत.भोजन पण आठवणीमध्ये,स्वच्छतेमध्ये बनवायचे आहे.

वरदान:-
स्वस्थिती द्वारे परिस्थिती वरती विजय मिळवणारे संगमयुगी विजय रत्न भव.

परिस्थितीवरती विजय मिळवण्याचे साधन स्वस्थिती आहे.हा देह पण पर आहे,स्वतःचा नाही.स्व स्थिती आणि स्वधर्म नेहमी सुखाचा अनुभव करवतात आणि प्रकृती धर्म म्हणजे पर धर्म किंवा देहाची स्मृति, कोणत्या न कोणत्या प्रकारच्या दुःखाचा अनुभव करवते.तर जे नेहमी स्व स्थितीमध्ये राहतात,ते सदा सुखाचा अनुभव करतात, त्यांच्याजवळ दुःखाची लाट येऊ शकत नाही.ते संगमयुगी विजय रत्न बनतात.

बोधवाक्य:-
परिवर्तन शक्ती द्वारा व्यर्थ संकल्पाच्या लाटेला समाप्त करा.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य

हे अविनाशी ईश्वरीय ज्ञान मिळवण्यासाठी कोणतीही भाषा शिकावी लागत नाही.

आपले जे ईश्वरीय ज्ञान आहे, ते खूप सहज आणि गोड आहे.या द्वारे जन्म जन्मांतरासाठी कमाई जमा होते.हे ज्ञान इतके सहज आहे,जे कोणतेही महान आत्मा,अहिल्या सारखी पत्थर बुद्धी,कोणत्याही धर्माच्या मुलापासून वृद्धापर्यंत कोणीही घेऊ शकतात.हे इतके सहज असून पण दुनियावी मनुष्य ज्ञानाला खूप भारी समजतात. कोणी समजतात,जेव्हा आम्ही अनेक वेद,ग्रंथ,उपनिषदचा अभ्यास करून मोठमोठे विद्वान बनलो, त्यासाठी तर वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात,खूप हठयोग केल्यानंतरच प्राप्ती होऊ शकते परंतु हे तर आम्ही अनुभव द्वारे जाणले आहे की हे ज्ञान खूप सहज आणि सरळ आहे,कारण स्वतः परमात्मा शिकवत आहेत.यामध्ये न कोणते हठयोग,न जप-तप,ग्रंथवादी पंडित बनवायचे आहे, न यासाठी संस्कृत भाषा शिकण्याची आवश्यकता आहे.हे तर नैसर्गिक पणे,प्रथम आपल्या परमपिता परमात्म्याच्या सोबत योग लावायचा आहे.जरी कोणी या ज्ञानाला धारण केले नाही,तरी फक्त योगामध्ये राहिल्यामुळे खूप फायदा होतो. याद्वारे एक तर पवित्र बनतात,दुसरे परत कर्मबंधन नष्ट होतात आणि कर्मातीत बनतात.इतकी ताकत या सर्वशक्तिवान परमात्म्याच्या आठवणीमध्ये आहे.जरी ते स्वतःला साकार ब्रह्मा तनाद्वारे आम्हाला योग शिकवत आहेत परंतु तरीही आठवण,प्रत्यक्ष त्या ज्योती स्वरूप शिव परमात्म्याची करायची आहे. त्यांच्या आठवणी द्वारेच कर्म बंधनाचा मळ निघून आत्म स्वच्छ बनेल.