09-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,माता-पित्याचे अनुकरण करून राज सिंहासन अधिकारी बना,यामध्ये काहीच कष्ट नाहीत,फक्त बाबांची आठवण करा आणि पवित्र बना"

प्रश्न:-
गरीब निवाज बाबा आपल्या मुलांचे भाग्य बनवण्यासाठी कोणते मत देतात?

उत्तर:-
मुलांनो शिवबाबाला तुमचे काहीही नको,तुम्ही खा,प्या,अभ्यास करा,ताजेतवाने होऊन घरी जावा परंतु मुठ्ठीभर तांदळाचे पण गायन आहे.२१ जन्मासाठी सावकार बनायचे आहे,तर गरीबाचा एक पैसा पण,सावकाराच्या शंभर रुपया बरोबर आहे,म्हणून बाबा जेव्हा प्रत्यक्षात येतात तर आपले सर्व काही सफल करायचे आहे.

गीत:-
तुम्हीच माता,पिता तुम्हीच आहात.

ओम शांती।
गीताचा अर्थ तर मुलांनी समजला.जरी ते बोलवतात परंतू समजत नाहीत.तुम्ही जाणता ते आपले पिता आहेत,वास्तव मध्ये फक्त ते तुमचे पिता नाहीत परंतु सर्वांचे पिता आहेत,हेपण समजायचे आहे.जे पण सर्व आत्मे आहेत,त्या सर्वांचे पिता परमात्मा जरूर आहेत. बाबा-बाबा म्हटल्यामुळे वारसा जरूर आठवणीत येतो.तर बाबांची आठवण केल्यामुळे च विकर्म विनाश होतील.बाबा मुलांना म्हणतात तुमची आत्मा पतित बनलेली आहे,आत्ता तिला पावन बनवायचे आहे.सर्वांचे बाबा आहेत, तर मुलं जरूर निर्विकारी असायला हवेत,कधीकाळी निर्विकारी होते. बाबा स्वतः समजवतात,जेव्हा श्री लक्ष्मीनारायणचे राज्य होते,तेव्हा सर्व निर्विकारी होते.इतके सर्व जे पण मनुष्य पाहतो,ते पण निर्विकारी असतील कारण शरीराचा तर नाश होतो,बाकी आत्मे जाऊन निराकारी दुनिया मध्ये राहतील.तेथे विकाराचे तर नाव रूप नव्हते,शरीरच नव्हते. तेथूनच सर्व आत्मे या दुनिया मध्ये आपली भूमिका वठवण्यासाठी येतात.प्रथम भारतवासी येतात. भारतामध्ये प्रथम या लक्ष्मी- नारायणचे राज्य होते,बाकी सर्व धर्माचे निराकारी दुनिया मध्ये होते. या वेळेत सर्व साकार दुनिया मध्ये आहेत.आत्ता बाबा तुम्हा मुलांना निर्विकारी बनवतात,निर्विकारी देवी-देवता बनवण्यासाठी.जेव्हा तुम्ही देवी-देवता बनतात,तर तुमच्यासाठी जरूर नवीन दुनिया पाहिजे.जुनी दुनिया नष्ट व्हायला पाहिजे.ग्रंथांमध्ये महाभारत लढाई पण दाखवतात,परत असेही दाखवतात फक्त पाच पांडव राहिले, त्यांचा पण डोंगरावरती मृत्यू झाला, कोणीच वाचले नाही.अच्छा, इतके सर्व आत्मे कुठे गेले,आत्म्याचा तर विनाश होत नाही.तर म्हणतील, निराकारी, निर्विकारी दुनिया मध्ये गेले.बाबा विकारी दुनियेतून निराकारी निर्विकारी दुनियेमध्ये घेऊन जातात.तुम्ही जाणतात बाबा पासून जरूर वारसा मिळाला पाहिजे.आता दुःख वाढले आहे,या वेळेस आम्हाला सुख-शांती दोन्ही पाहिजे.सर्व भगवंताकडे मागतात, हे भगवान आम्हाला सुख-शांती द्या. प्रत्येक मनुष्य धन मिळवण्यासाठीच पुरुषार्थ करतात,पैसे आहेत,तर सुख आहे.तुम्हाला बेहद्दचे बाबा तर खूप पैसे देतात,तुम्ही सतयुगा मध्ये खूप धनवान होते,हिरे रत्नांचे महल होते. तुम्ही मुलं जाणता,आम्ही बेहद्दच्या बाबा पासून बेहद्द स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत.सर्व दुनिया तर येणार नाही.बाबा भारतामध्येच येतात.भारतवासीच या वेळेत नर्कवासी आहेत,परत बाबाच स्वर्गवासी बनवतात.भक्तीमध्ये दुःख असल्यामुळे बाबांची जन्म जन्मांतर आठवण करत आले आहेत,हे परमपिता परमात्मा,हे कल्याणकारी, दुखहर्ता-सुखकर्ता बाबा.त्यांची आठवण करतात,तर जरूर ते आले पण असतील,असे फुकट थोडीच आठवण करतात.ते समजतात भगवान पिता भक्तांना फळ देतील, होय ते तर जरूर देतील ना.बाबा तर सर्वांचे आहेत.

तुम्ही जाणतात आम्ही सुखधाम मध्ये जाऊ,बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये जातील.जेव्हा सुखधाम आहे,तर सुख-शांती सर्व सृष्टीवरती असते.पित्याचे तर मुलां वरती प्रेम राहते ना आणि परत मुलांचेही मात-पित्यावर प्रेम असते. हे पण गायन आहे,तुम्हीच माता, पिता तुम्हीच आहात.शारीरिक पिता असताना पण गायन करतात, तुम्हीच मात-पिता आहात, तुमच्या कृपेने खूप सुख मिळते.असे गायन लौकिक पित्यासाठी करत नाहीत. जरी ते मुलांची सांभाळ करतात, कष्ट करतात,वारसा देतात साखरपुडा करतात,तरीही सुख तर पारलौकिक मातपिताच देतात. आता तुम्ही ईश्वरीय धर्माची मुलं आहात,ते आसुरी धर्माची मुल आहेत.सतयुगा मध्ये कधी कोणी मुलं दत्तक घेत नाहीत.तिथे तर सुखच सुख आहे,दुःखाचे नाव रूप नसते.बाबा म्हणतात,मी तुम्हाला २१ पिढीसाठी,स्वर्गाचे सुख देण्यासाठी आलो आहे.

आता तुम्ही जाणतात, बेहद्दच्या बाबाकडून, आम्हाला स्वर्गाचे सुख मिळत आहे.दुःखाचे सर्व बंधन नष्ट होतील.सतयुगा मध्ये सुखाचे संबध आहेत,कलियुगामध्ये तर दुःखाचे बंधन आहेत.बाबा सुखाच्या संबंधांमध्ये घेऊन जातात,त्यांनाच दुखहर्ता सुखकर्ता म्हटले जाते.बाबा मुलांची सेवा करतात.मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे,तुम्ही माझी अर्ध्या कल्पापासून आठवण केली आहे,हे बाबा येऊन आम्हाला खूप सुख द्या.तर आता मी सुख देण्यासाठी आलो आहे.तर श्रीमता वरती पण चालायचे आहे.हा मृत्युलोक नष्ट होणार आहे. अमरलोकची स्थापना होत आहे. अमरपुरीमध्ये जाण्यासाठी,अमरनाथ बाबा कडून तुम्ही अमर कथा ऐकत आहात.तेथे सुखधाम मध्ये असे म्हणत नाहीत की,अमक्याचा मृत्यू झाला.आत्मा म्हणते,आम्ही हे जडजडीभुत शरीर सोडून नवीन घेतो.हे तर चांगलेच झाले ना.तेथे कोणतीही रोगराई इत्यादी नसते, मृत्यू लोकांचे नावच नाही.मी तुम्हाला अमरपुरीचे मालक बनवण्यासाठी आलो आहे.तेथे जेव्हा तुम्ही राज्य कराल,तर मृत्यू लोकांमधील कोणत्याही गोष्टीची आठवण येणार नाही.खाली उतरत उतरत आम्ही काय बनलो आहोत,हे पण माहिती होणार नाही,नाहीतर सुखाचा आनंद नष्ट होऊन जाईल. येथे तर तुम्हाला सर्व चक्र बुद्धीमध्ये ठेवायचे आहे.बरोबर स्वर्ग होता, आता नाही,तेव्हा तर बाबांना बोलवतात.तुम्ही आत्मे शांतीधामचे राहणारे आहात.येथे येऊन तुम्ही भुमिका वठवतात.येथूनच तुम्ही संस्कार घेऊन जातात.परत तेथून येऊन,नविन शरीर धारण करुन,राज्य कराल.आत्ता तुम्हांला निराकारी,आकारी आणि साकारी दुनियेचा समाचार ऐकवतात.सतयुगा मध्ये हे थोडेच माहिती होईल.तेथे तर फक्त राज्य कराल.अविनाशी नाटकाला तर तुम्ही जाणता.तुमची आत्मा जाणते,सतयुगासाठी आम्ही पुरुषार्थ करत आहोत,स्वर्गा मध्ये जाण्यासाठी लायक जरूर बनू. आपले पण कल्याण करायचे आहे आणि दुसऱ्याचे पण कल्याण करायचे आहे,परत त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतील.तुमचे नियोजन पाहा कसे आहे.या वेळेत सर्वांचे आपपले नियोजन आहे. बाबांचे पण नियोजन आहे.ते लोक तलाव इत्यादी बनवत राहतात, विद्युत निर्मिती साठी करोडो रुपये खर्च करत राहतात.बाबा समजवतात त्यांचे सर्व आसुरी नियोजन आहे,माझे ईश्वरीय नियोजन आहे.आता कोणाच्या नियोजनाचा विजय होईल.ते तर आपसामध्येच भांडण करत राहतात. सर्वांचे नियोजन मातीमध्ये मिळतील,ते काही स्वर्गाची स्थापना तर करत नाही.जे काही करतात, दुःखासाठीच करतात.बाबांचे नियोजन तर स्वर्ग बनवण्याचे आहे. नर्कवासी मनुष्य नरकामध्ये राहण्यासाठीच नियोजन करत राहतात.बाबांचे नियोजन स्वर्ग बनवण्यासाठी चालत आहे.तर तुम्हाला खूप खुशी राहिली पाहिजे. गायन पण करतात,तुमच्या कृपेने खूप सुख मिळते,ते तर पुरुषार्थ करून घ्यायचे आहे.बाबा म्हणतात, जे पाहिजे ते घ्या.तुम्ही विश्वाचे मालक राजाराणी किंवा दासदासी बना,जितका जो पुरुषार्थ करेल. बाबा फक्त म्हणतात,पवित्र बना आणि प्रत्येकाला बाबांचा परिचय देत राहा.अल्लाहची आठवण करा, तर बादशही तुमचीच आहे.बाबांची आठवण करण्या मध्येच माया खूप विघ्नन आणते.बुध्दीयोग दूर घेऊन जाते.माझी आठवण कराल तर विकर्म भस्म होतील आणि उच्च पद पण मिळेल,म्हणून भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे.बाबांना मुक्तिदाता पण म्हणतात.२१ जन्मासाठी बाबा तुम्हाला दुःखापासून मुक्त करतात. भारतवासी सुखधाम मध्ये असतील, बाकी सर्व शांतीधाम मध्ये असतील. निराकारी दुनिया आणि साकारी दुनियाचे नियोजन दाखवल्यानंतर लगेच समजतील, बाकी दुसऱ्या धर्माचे स्वर्गा मध्ये येऊ शकत नाहीत.स्वर्गामध्ये देवी देवता आहेत. या नाटकाचे ज्ञान बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाहीत.मुलं येतातच पित्यापासून वारसा घेण्यासाठी.सुख तर सतयुगा मध्येच असते,नंतर रावण राज्य येते, त्यामध्ये खूप दुःखी होतात.आत्ता तुम्ही समजतात,बाबा आम्हाला खरीखुरी कथा ऐकवून अमर लोक मध्ये जाण्यासाठी लायक बनवतात. आता असे कर्म करतात,तेव्हा तर २१ जन्मासाठी धनवान बनतात.असे म्हणतात,धनवान भव,पुत्रवान भव...तेथे तुम्हाला एक मुलगा,एक मुलगी असते.आयुष्यमान भव पण असाल,तुमचे आयुष्य तेथे दीडशे वर्ष असेल,अचानक मृत्यू पण कधी होणार नाही.हे बाबा समजवतात, तुम्ही अर्ध्या कल्पासाठी मला बोलवत आले आहात.संन्यासी पण असे म्हणतील काय?ते काय जाणतील? बाबा खूप प्रेमाने सन्मुख समजतात,मुलांनो हा एक जन्म जर पावन बनाल, तर २१ जन्म स्वर्गाचे मालक बनाल.पवित्रते मध्ये सुख आहे ना.तुम्ही पवित्र दैवी धर्माचे होते,आता अपवित्र बनून दुःखामध्ये आले आहात.स्वर्गामध्ये निर्विकारी होते,आता विकारी बनल्यामुळे नरकामध्ये दुःखी झाले आहात. बाबा तर पुरुषार्थ करवतात,स्वर्गाचे महाराजा महाराणी बना.तुमचे मामा बाबा बनतात,तर तुम्ही पुरुषार्थ करा.यामध्ये गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.बाबा तर कोणाला पाया पण पडू देत नाहीत.

बाबा समजवतात,मी तुम्हाला सोन्या हिऱ्यांचे महल दिले होते,स्वर्गाचे मालक बनवले होते.परत अर्धाकल्प तुम्ही भक्ती मार्गामध्ये आपला माथा घासत आले,पैसे पण देत आले.ते सोने हिऱ्यांचे महल सर्व कुठे गेले? तुम्ही स्वर्गामधून उतरत उतरत नरकामध्ये येऊन पडले आहात. आता तुम्हाला परत स्वर्गामध्ये घेउन जातो.तुम्हाला कोणते कष्ट देत नाही, फक्त तुम्ही माझी आठवण करा आणि पवित्र बना.खुशाल एक पैसा पण देऊ नका.खा,प्या,अभ्यास करा, ताजेतवाने होऊन चालले जावा. बाबा तर फक्त शिकवतात, शिक्षणाचे काहीच पैसे घेत नाहीत.तर मुलं म्हणतात बाबा, आम्ही तर जरूर देऊ,नाहीतर स्वर्गामध्ये महाल इत्यादी कसे मिळतील.भक्तिमार्गा मध्ये तुम्ही ईश्वर अर्थ गरिबांना देत होते,त्याचे फळ ईश्वर देतील.गरीब थोडेच देतील,परंतु ते तर एक जन्मासाठी मिळते.आता बाबा प्रत्यक्षात आले आहेत,आम्ही थोडे पैसे देतो,तुम्ही आम्हाला २१ जन्मासाठी स्वर्गामध्ये द्या.बाबा सर्वांना सावकार बनवतात, तुम्ही पैसे देतात,तर ते तुमच्याच राहण्यासाठी,इमारती इत्यादी बनवतात,नाहीतर सर्व मुलं कसे राहतील.मुलांसाठीच इमारती इत्यादी बनवतात,बाबा म्हणतात मला तर या इमारतीमध्ये राहायचे नाही. शिवबाबा तर निराकर,दाता आहेत ना.तुम्ही देतात तर तुम्हालाच २१ जन्मासाठी त्याचे फळ मिळते. मी तर स्वर्गामध्ये येत नाही,मला तर नरकामध्येच यावे लागते.तुम्हाला नरका मधून काढण्यासाठी यावे लागते.तुमचे गुरु लोक तर आणखीनच दलदलीमध्ये फसवतात, ते काही सद्गती देत नाहीत.आत्ता बाबा पवित्र दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत,परत अशा बाबांची आठवण का नाही करत? बाबा म्हणतात,काहीच पैसे देऊ नका फक्त माझी आठवण करा, तरीही पाप नष्ट होतील आणि तुम्ही माझ्याजवळ याल.या इमारती इत्यादी तुम्हा मुलांनाच राहण्यासाठी बनवल्या आहेत.येथेच मुठ्ठी भर तांदळाचे गायन आहे ना.गरीब आपल्या हिमती नुसार जेवढे देतात, तेवढे त्यांचे भाग्य बनते.जितके सावकाराचे भाग्य बनते,तेवढेच गरिबाचे बनते.दोघांचे एक सारखेच होते,गरिबांच्या जवळ शंभर रुपये आहेत त्यातील एक रुपये दिला आणि सावकारांच्या जवळ खूप आहेत तर त्यांनी शंभर रुपये दिले, दोघांचे फळ एक सारखेच मिळते. म्हणून बाबांना गरीब निवाज म्हटले जाते. सर्वात गरीब भारत आहे, त्यांनाच येऊन मी सावकार बनवतो. गरिबांना दान दिले जाते ना.बाबा हे ज्ञान, खूप स्पष्ट करून सांगतात, मुलांनो,आत्ता मृत्यू समोर आहे. आता लवकर पुरुषार्थ करुन संपुर्ण बना,आठवणीची गती वाढवा.सर्वात गोड बाबांची जितकी आठवण कराल,तेवढा वारसा मिळेल.तुम्ही खूप धनवान बनाल.बाबा तुम्हाला असे म्हणत नाहीत की,माथा टेकवा,यात्रा इत्यादीमध्ये जावा,नाही. घरामध्ये बसून बाबा आणि वारशाची आठवण करा,बस बाबा बिंदू आहेत, त्यांनाच परमपिता परमात्मा म्हटले जाते.सर्वोच्च आत्मा,उच्च ते उच्च आहेत.बाबा म्हणतात,मी पण बिंदू आहे,तुम्ही पण बिंदू आहात.फक्त भक्तिमार्गासाठी माझे मोठे रूप बनवून ठेवले आहे,नाहीतर बिंदूची पूजा कसे कराल,त्यांना शिवबाबा म्हणतात.शिवबाबा कोणी म्हटले? आता तुम्ही म्हणतात,शिवबाबा आम्हाला वारसा देत आहेत.हे ८४ चे चक्र फिरत राहते.अनेक वेळेत तुम्ही वारसा घेतला आहे आणि घेत राहाल.बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप- दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मृत्यू समोर आहे म्हणून आठवणीची गती वाढवायची आहे.सतयुगी दुनिये मध्ये उच्च पद मिळवण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.

(2) आपले आणि दुसऱ्याचे कल्याण करून आशीर्वाद घ्यायचा आहे.पवित्र दुनिये मध्ये चालण्यासाठी पवित्र जरुर बनायचे आहे.

वरदान:-
नवीन जीवनाच्या स्मृती द्वारे कर्मेंद्रिया वरती विजय मिळवणारे मरजीवा भव.

जी मुलं पूर्ण मरजीवा बनवतात, त्यांना कर्मेंद्रियाचे आकर्षण होऊ शकत नाही.मरजीवा बनले म्हणजे सर्व बाजूने मेले,जुने आयुष्य समाप्त झाले.जेव्हा नवीन जन्म झाला,तर नवीन जन्मात,नवीन जीवनामध्ये, कर्मेंद्रियाच्या वश कसे होऊ शकतात.ब्रह्माकुमार कुमारीच्या नवीन जीवनामध्ये कर्मेंद्रियांच्या वश होणे काय गोष्ट आहे?या ज्ञानापासून पण दूर,क्षुद्रपणाचा जरा पण श्वास म्हणजे संस्कार कुठे अडकलेला नको.

बोधवाक्य:-
अमृतवेळेला मनामध्ये परमात्म स्नेह समावून घ्या तर, बाकी कोणतेही स्नेह आकर्षित करू शकत नाही.