10-01-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
09.10.87 ओम शान्ति
मधुबन
अलौकिक राज्य दरबारचा
समाचार.
आज बापदादा आपल्या
स्वराज्य अधिकारी मुलांचा राज्य दरबार पाहत आहेत.ही संगमयुगाची असाधारण श्रेष्ठ शान
असणारा, अलौकिक दरबार सर्वकल्पा मध्ये वेगळा आणि अतिप्रिय आहे.या राज्यसभेची आत्मिक
चमक, आत्मिक कमल-आसन,आत्मिक -ताज आणि तिलक, चेहऱ्याची चमक,स्थितीच्या श्रेष्ठ
स्थितीच्या वातावरणामध्ये अलौकिक सुगंध, अती आकर्षित करणारे आहे.अशा सभेला पाहून,
बापदादा प्रत्येक राज्याधिकारी पाहत,आनंदीत होत आहेत.खूप मोठा दरबार आहे. प्रत्येक
ब्राह्मण मुलगा स्वराज्य अधिकारी आहे.तर किती ब्राह्मण मुलं आहेत! सर्व ब्राह्मणांचा
दरबार एकत्र करा तर किती मोठा राजदरबार होईल.इतका मोठा राज्य दरबार कोणत्या
युगांमध्ये असत नाही.ही संगम युगाची विशेषता
आहे,जे उच्च ते उच्च पित्याची,सर्व मुलं स्वराज्य अधिकारी बनतात.तसे तर लौकिक
परिवारा मध्ये प्रत्येक पिता मुलांना म्हणतात की,हा माझा मुलगा राजा मुलगा आहे किंवा
इच्छा ठेवतात की,माझा प्रत्येक मुलगा राजा बनावा परंतु सर्व मुलं राजा बनू शकत
नाहीत.ही म्हण परमात्म्याची कॉपी केलेली आहे. या वेळेत बापदादांची सर्व मुलं राजयोगी
म्हणजे स्वता:चे राजे क्रमवार जरुर आहेत, परंतु सर्व राजयोगी आहेत,प्रजायोगी
नाहीत.तर बापदादा बेहद्दची राज्यसभा पाहत होते. सर्व जण स्वतःला स्वराज्य अधिकारी
समजत आहात ना.नवीन-नवीन आलेली मुलं राज्याधिकारी आहात की, आत्ता बनायचे
आहे?नवीन-नवीन आहेत तर भेटणे इत्यादी शिकत आहेत.अव्यक्त बाबांच्या अव्यक्त गोष्टी
समजण्याची सवय लागेल. तरीही वेळेवर समजतील की, आम्ही सर्वात जास्त भाग्यवान आहेत.
तर बाबा अलौकिक राज्य दरबार चा समाचार ऐकवत होते.सर्व मुलांच्या विशेष ताज आणि
चेहऱ्याच्या चमकवरती, इच्छा नसतानी पण लक्ष जात होते.ताज ब्राह्मण जीवनाची विशेषता,
पवित्रतेचे सुचक आहे.चेहऱ्याची चमक,आत्मिक स्थितीमध्ये स्थिर राहिल्यामुळे
आत्मिकतेची चमक आहे.साधारण रीतीने कोणत्याही व्यक्तीला पहाल तर,सर्वात प्रथम दृष्टी
चेहर्याकडे जाईल.हा चेहराच वृत्ती आणि स्थितीचे दर्पण आहे. तर बापदादा पाहत होते
की,चमक तर सर्वांमध्ये होती परंतु एक होती नेहमी आत्मिकतेची स्थिती मध्ये स्थिर
राहणारे, स्वतः आणि सहज स्थिती असणारे आणि दुसरे होते नेहमी आत्मिक स्थितीच्या
अभ्यासामध्ये राहणारे.एक आहेत सहज स्थिती असणारे,तर दुसरे आहेत, प्रयत्न करून स्थिर
राहणारे. दुसरे म्हणजे एक होते सहज योगी दुसरे होते पुरुषार्थाद्वारे योगी,दोघांच्या
चमक मध्ये अंतर राहिले.त्यांची नैसर्गिक सुंदरता होती आणि दुसऱ्यांची पुरुषार्था
द्वारे सुंदरता होती.जसे आज कल तर मेकअप करून सुंदर बनतात ना. स्वभाविक सुंदरतेची
चमक नेहमी एकच राहते आणि दुसरी सुंदरता कधी खूप चांगली आणि कधी टक्केवारी मध्ये
राहते,एक सारखी,एकरस राहत नाही.तर नेहमी सहजयोगी,स्वत: योगी स्थिती क्रमांक एकचे
अधिकारी बनवते.सर्व मुलांचा वायदा आहे ब्राह्मण जीवन म्हणजे एक बाबाच संसार आहेत आणि
एक बाबा, दुसरे कोणी नाहीत. जेव्हा सर्व संबंध बाबांशी आहेत दुसरे कोणी नाहीत, तर
स्वतः आणि सहज योगी स्थिती नेहमी राहील,की कष्ट करावे लागतील?जर दुसरे कोणी आहेत तर
कष्ट करावे लागतात.,येथे बुद्धी जायला नको,तेथे जायला हवी. परंतु एक बाबाच सर्व काही
आहेत,तर बुध्दी कोठे जाईल? जेव्हा जाऊच शकत नाही,तर अभ्यास काय कराल? अभ्यासा मध्ये
पण अंतर असते ना.हे काय स्वतः अभ्यास आहेच आणि दुसरा कष्ट करणारा अभ्यास.तर
स्वराज्य अधिकारी मुलांनी सहज अभ्यासी बनणे, हे लक्षण सहजयोगी आणि स्वतः योगीची
आहेत.त्यांच्या चेहऱ्याची चमक अलौकिक असते की,जे चेहरा पाहत अन्य आत्मे अनुभव करतात
की,हे श्रेष्ठ प्राप्ती स्वरूप सहजयोगी आहेत.जसे स्थूल धन किंवा स्थुल पदाच्या
प्राप्तीची चमक चेहऱ्या द्वारे माहित होते की, हे सावकार कुळाचे किंवा उच्च पदाचे
अधिकारी आहेत,असेच हे श्रेष्ठ राज्याधिकार म्हणजे श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीचे नशा
किंवा चमक चेहऱ्याद्वारे दिसून येते.दूर वरूनच अनुभव करतात की,यांनी खूप काही मिळवले
आहे,प्राप्ती स्वरूप आत्मे आहेत.असेच सर्व राज्याधिकारी मुलांचे चमकणारे चेहरे
दिसून यायला हवेत.कष्टाचे चिन्ह दिसायला नको,प्राप्तीचे चिन्ह दिसायला पाहिजेत.आत्ता
तर पहा कोण कोणत्या मुलांच्या चेहऱ्याला पाहून हेच म्हणतात की यांनी काही प्राप्त
केले आहे आणि काही मुलांच्या चेहऱ्यांना पाहून हे पण म्हणतात की लक्ष मोठे आहे परंतु
त्याग पण खूप उच्च केला आहे. त्याग दिसून येते परंतु चेहऱ्याद्वारे भाग्य दिसून येत
नाही, किंवा असे म्हणतील की कष्ट खूप चांगले करत आहेत.
बापदादा हेच पाहू इच्छितात की, मुलांच्या चेहऱ्याद्वारे सहयोगाची चमक दिसून
येईल,श्रेष्ठ प्राप्तीची चमक दिसून येईल,कारण प्राप्तीचे भांडार बाबांची मुलं आहेत.
संगमयुगाच्या प्राप्तीच्या वरदानी वेळेचे अधिकारी आहेत. निरंतर योग कसा लावावा किंवा
निरंतर अनुभव करून,भंडाराची अनुभूती कशी करावी-आजपर्यंत याच कष्टा मध्ये वेळ वाया
घालवू नका परंतु प्राप्ति स्वरूपाचा सहज अनुभव करा. समाप्तीची वेळ जवळ येत आहे.
आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या कष्टा मध्ये तत्पर राहिले,तर तर प्राप्तीची
वेळ तर समाप्त होईल,परंतु प्राप्ती स्वरुपाचा अनुभव कधी करणार?संगमयुगाला ब्राह्मण
आत्म्यांना वरदान आहे"सर्व प्राप्ती भव". 'नेहमी पुरुषार्थी भव' चे वरदान
नाही,प्राप्ती भवचे वरदान आहे.प्राप्ती भवचे वरदानी आत्मे कधीच अलबेलेपणा मध्ये येऊ
शकत नाहीत, म्हणुन त्यांना कष्ट करावे लागत नाहीत.तर समजले काय बनायचे आहे?
राज्यसभे मध्ये राज्याधिकारी बनण्याची विशेषता काय आहे? हे स्पष्ट झाले
ना.राज्याधिकारी आहात ना,की आत्ता विचार करत आहात, की,आहेत की नाही? जेव्हा
विधात्याची मुलं,वरदाताचे मुलं बनले, राजा म्हणजे विधाता, देणारे. अप्राप्ती काहीच
नाही,तर काय घेणार? तर समजले,नवीन-नवीन मुलांना या आनुभवामध्ये राहायचे
आहे.युद्धामध्ये वेळ घालवायचा नाही.जर युध्दा मध्येच वेळ गेला तर,अंत काळात पण
युद्धामध्ये च राहाल.परत काय बनवावे लागेल? चंद्रवंशामध्ये जाल की,सूर्यवंशी मध्ये?
युद्ध करणारे तर चंद्रवंशी मध्ये जातील.चालत आहोत,करत आहेत, होऊन जाईल, पोहोचू,
आजपर्यंत असे लक्ष ठेवू नका. आज नाही तर कधीच नाही. बनायचे आहे तर आत्ता, मिळवायचे
आहेत तर आत्ता,असा उमंग उत्साह असणारेच वेळेवरती आपल्या संपूर्णतेच्या लक्षाला
प्राप्त करतील.त्रेतामध्ये रामसिता बनवण्यासाठी तर कोणीही तयार नाहीत.जेव्हा सतयुग
सूर्यवंशी मध्ये यायचे असेल तर, सूर्यवंशी म्हणजे नेहमी मास्टर विधाता आणि वरदाता,
घेण्याची इच्छा असणारे नाही. मदत मिळेल,असे झाले तर खूप चांगले आहे,पुरुषार्था मध्ये
चांगले क्रमांक घेऊ, नाही.मदत मिळत आहे,सर्व काही होत आहे, याला म्हणतात स्वराज्य
अधिकारी. पुढे जायचे आहे की, उशीरा आले आहेत तर, पाठीमागेच राहायचे आहे? पुढे
जाण्याचा सहज रस्ता आहे, सहज योगी,स्वतः योगी.खूप सहज आहे.जेव्हा एकच बाबा आहेत,
दुसरे कोणी नाही,तर कुठे जातील? प्राप्तीच प्राप्ती आहे,परत कष्ट का वाटतील? तर
प्राप्तीच्या वेळेचा लाभ घ्या.सर्व प्राप्ती स्वरूप बना,समजले?बापदादाची तर हीच
इच्छा आहे की,एक-एक मुलगा, मग तो शेवटी येणारा असेल किंवा स्थापनाच्या आदी मध्ये
येणारा असेल,प्रत्येक मुलगा क्रमांक एक बनावा,राजा बनावा,न की प्रजा. अच्छा.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाचा ग्रुप आलेला आहे.पहा,महा शब्द किती चांगला आहे.
महाराष्ट्र स्थान पण महा शब्दाचे आहे आणि बनायचे पण महान आहे. महान तर बनले ना,
कारण बाबाचे बनले म्हणजेच महान बनले.महान आत्मे आहात. ब्राह्मण अर्थात
महान.प्रत्येक कर्म महान,प्रत्येक बोल महान,प्रत्येक संकल्प महान,तर अलौकिक झाले
ना.तर महाराष्ट्र निवासी नेहमी स्मृती स्वरुप बना की,महान आहोत. ब्राह्मण म्हणजे
महान, शेंडी आहेत ना.
मध्यप्रदेश,नेहमी मध्याजी भवच्या नशेमध्ये राहणारे आहेत. मनमनाभवच्या सोबत मध्याजी
भवचे वरदान पण आहे.तर आपले स्वर्गाचे स्वरूप,याला म्हणतात मध्याजी भव.तर आपल्या
श्रेष्ठ प्राप्तीच्या नशे मध्ये राहणारे, म्हणजे मध्याजी भवच्या मंत्राच्या
स्वरूपामध्ये स्थिर राहणारे.ते पण महान झाले.मध्याजी भव आहेत, तर मनामनाभव पण जरुर
असतील.तर मध्यप्रदेश म्हणजे महा मंत्राचे स्वरुप बनणारे.तर दोघेही आपापल्या
विशेषतेने महान आहेत. समजले कोण आहात? जेव्हापासून प्रथम पाठ सुरू केला, तो पण हाच
केला की, मी कोण आहे? बाबा पण तीच गोष्ट आठवण करुन देतात.यावरतीच मनन करायचे आहे.
शब्दच एक आहे की,"मी कोण" परंतु याचे उत्तरं किती आहेत?यादी काढायची आहे की, मी कोण
आहे? अच्छा.
चहूबाजूच्या सर्व प्राप्तीस्वरुप श्रेष्ठ आत्म्यांना,सर्व राज्यसभा अधिकारी महान
आत्म्यांना,नेहमी आत्मिकतेची चमक धारण करणाऱ्या विशेष आत्म्यांना,नेहमी स्वतःयोगी,
सहजयोगी, उच्च ते उच्च आत्म्यांना, उच्च ते उच्च बापदादाचा स्नेह संपन्न
प्रेमपूर्वक आठवण.
अव्यक्त
बापदादाचा परदेशी भाऊ- बहिणी सोबत वार्तालाप:-
दुहेरी परदेशी म्हणजे नेहमी आपल्या स्वस्वरूप,स्वदेश, स्वराज्याच्या स्मृतीमध्ये
राहणारे. दुहेरी परदेशींना विशेष कोणती सेवा करायची आहे.आता शांतीच्या शक्तीचा
अनुभव विशेष रूपाद्वारे आत्म्यांना करावयाचा आहे.ही पण विशेष सेवा आहे.जसे
विज्ञानाची शक्ती प्रसिद्ध आहे ना,मुलां मुलांना माहित आहे की,विज्ञान काय आहे.असेच
शांतीची शक्ती विज्ञानापेक्षा उच्च आहे.तो दिवस पण येईल शांतीच्या शक्तीची
प्रत्यक्षता म्हणजे बाबांची प्रत्यक्षता. जसे विज्ञान प्रत्यक्ष पुरावा दाखवत
आहे,तसेच शांतीच्या शक्तीचा प्रत्यक्ष पुरावा,तुम्हा सर्वांचे जीवन आहे. जेव्हा इतके
सर्व प्रत्यक्ष पुरावा दिसून येतील तर,इच्छा नसताना सर्वांच्या नजर मध्ये सहज येऊ
शकाल.जसे पाठीमागील वर्षांमध्ये शांतीचे कार्य केले ना, याला रंगमंचावर प्रत्यक्षात
दाखवले.असेच चालता-फिरता शांतीचे उदाहरण मूर्त दिसून येतील तर वैज्ञानिकांची नजर पण
शांतीची शक्ती धारण करणाऱ्या, आत्म्यावरती आवश्य जाईल, समजले.विज्ञानाचे संशोधन
विदेशामध्ये जास्त होत राहते.तर शांतीच्या शक्तीचा आवाज पण तेथूनच सहज पसरेल.सेवेचे
लक्ष तर आहेच,सर्वांना उमंग उत्साह पण आहे.सेवेचे बिना पण राहू शकत नाहीत.जसे भोजना
शिवाय राहू शकत नाहीत,असेच सेवे शिवाय पण राहू शकत नाहीत म्हणून बापदादा खुश
आहेत,अच्छा. अव्यक्त बापदादाचे पार्टीसोबत वार्तालाप:-
स्वदर्शन चक्रधारी श्रेष्ठ आत्मा बनले, असा अनुभव करतात का? स्वतःचे दर्शन झाले
ना,स्वतःला जाणणे म्हणजेच स्वतःचे दर्शन होणे आणि चक्राच्या ज्ञानाला जाणने म्हणजेच
स्वदर्शन चक्रधारी बनणे.जेव्हा स्वदर्शन चक्रधारी बनतात तर बाकी सर्व चक्र समाप्त
होतात.देहभानाचे चक्र,संबंधाचे चक्र,समस्यांचे चक्र, मायचे अनेक चक्र आहेत परंतु
स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे,हे सर्व चक्र समाप्त होतात.सर्व चक्रापासून निघून
जातात,नाहीतर जाळ्यामध्ये फसतात.अगोदर फसलेले होते,आत्ता निघाले आहेत.६३ जन्म तर
अनेक चक्रामध्ये फसत राहिले आणि या वेळेत या चक्रा मधून निघून आले, तर परत फसायचे
नाही.अनुभव करून पाहिले ना,अनेक चक्रामध्ये फसल्यामुळे सर्व काही गमावले आणि
स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे बाबा भेटले.तर बाकी सर्व मिळाले तर स्वदर्शन चक्रधारी
बनून नेहमी पुढे जात रहा.यामुळे नेहमी हलके रहाल,कोणत्याही प्रकारचे ओझे अनुभव
होणार नाही. वजनच खाली घेऊन येते आणि हलके राहिल्यामुळे उंच उडत राहाल.तर उडणारे
आहात ना. कमजोर तर नाहीत ना.जर एक पण पंख कमजोर असेल तर,खाली घेऊन येईल,उडू देणार
नाही.दोन्ही पंख मजबूत असतील तर स्वतःच उडत राहाल.तर स्वदर्शन चक्रधारी बनणे
म्हणजे,उडत्या कलेमध्ये जाणे,अच्छा.
राजयोगी,श्रेष्ठ योगी आत्मे आहात ना.साधारण जीवनापासून सहजयोग,राजयोगी बनले.असे
श्रेष्ठ योगी,आत्मेच नेहमी अतींद्रिय सुखाच्या झोक्यामध्ये झोके घेत राहतात.हठयोगी
योगाद्वारे शरीराला पण उंच उठवतात आणि उडण्याचा अभ्यास करत करतात.वास्तव मध्ये
तुम्ही राजयोगीच उच्च स्थितीचा अनुभव करतात.याचीच कॉपी करून ते शरीराला उंच उठवतात.
परंतु तुम्ही कुठेही राहत उच्च स्थितीमध्ये राहतात,म्हणून म्हणतात योगी उच्च ठिकाणी
राहतात.तर मनाच्या स्थितीचे स्थान उच्च आहे, कारण दुहेरी हलके बनले आहात. तसेच
फरिश्त्यासाठी म्हटले जाते की, फरिश्त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत.फरिश्ता म्हणजे
ज्यांचे बुद्धी रुपी पाय धरतीवरती नाहीत, म्हणजेच देह अभिमानांमध्ये
नाहीत.देहाभिमाना पेक्षा नेहमी उंच असे फरिश्ते म्हणजेच राज योगी बनले.आत्ता या
जुन्या दुनियेपासून काहीच लगाव नाही.सेवा करणे वेगळी गोष्ट आहे परंतु लगाव असायला
नको.योगी बनणे म्हणजेच,बाबा आणि मी,तिसरे कोणी नाही,तर नेहमी या स्मृतीमध्ये
राहा,आम्ही राजयोगी,नेहमी फरिश्ता आहोत.या स्मृती द्वारे नेहमी पुढे जात
राहा.राजयोगी नेहमी बेहद्दचे मालक आहेत.हद्दचे मालक नाहीत,हद्द पासून निघाले,
बेहद्दचा अधिकार मिळाला.याच खुशीमध्ये रहा.जसे बेहद्दचे बाबा आहेत,तसेच बेहद्दच्या
खुशीमध्ये राहा,नशे मध्ये रहा,अच्छा.
निरोप घेते
वेळेस बापदादाचा वार्तालाप:-
सर्व अमृतवेळेच्या वरदानी मुलांना, वरदानी बाबांची गोड गोड प्रेमपुर्वक आठवण
स्वीकार करा.सोबतच सोनेरी दुनिया बनवण्याच्या सेवेच्या नियोजनाचे मनन करणारे आणि
नेहमी सेवेमध्ये दिल व जान, सिक व प्रेमा द्वारे,तन-मन-धना द्वारे सहयोगी
आत्म्यांना,बापदादांची सुप्रभात, हिरे तुल्य सुप्रभात करत आहेत आणि नेहमी हिरे
बनून,या हिरेतुल्य युगाच्या विशेषतेचे वरदान आणि वारसा घेऊन,स्वतः पण स्वर्ण
स्थितीमध्ये स्थिर राहणारे आणि दुसर्यांना पण असाच अनुभव करत राहाल.तर चोहू बाजूच्या
दुहेरी हिरो मुलांना,हिरेतुल्य सुप्रभात,अच्छा.
वरदान:-
दयाळू पणाच्या भावने द्वारे, अपकारी आत्म्या वरती पण उपकार करणारे शुभचिंतक भव.
कशी पण, कोणतीही आत्मा
असेल,मग ती सतोगुणी किंवा तमोगुणी,संपर्का मध्ये येईल परंतु सर्वांच्या प्रती
शुभचिंतक म्हणजेच अपकारी वरती पण उपकार करणारे.कधी कोणत्याही आत्म्याच्या प्रती
घृणादृष्टी जायला नको,कारण हे जाणतात की, अज्ञानाच्या वश आहेत,बेसमज आहेत.त्यांच्या
वरती दया किंवा स्नेह येईल,घृणा येणार नाही. शुभचिंतक आत्मा असा विचार करणार नाही
की,यांनी असे का केले परंतु या आत्म्याचे कल्याण कसे होईल,हीच शुभचिंतक स्थिती आहे.
सुविचार:-
तपस्याच्या बळा द्वारे
असंभवला पण संभव करून सफलता मूर्त बना.