10-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , सर्वांना ही खुशखबर सांगा भारत परत स्वर्ग बनत आहे , स्वर्गीय ईश्वरीय पिता आलेले आहेत "

प्रश्न:-
ज्या मुलांना स्वर्गाचे मालक बनण्याचा आनंद आहे , त्यांची लक्षणे कोणती असतील ?

उत्तर:-
त्यांच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचे दुःख येऊ शकत नाही.त्याना नशा राहील की आम्ही तर फार मोठे मनुष्य आहोत.आम्हाला बेहदचे बाबा असे लक्ष्मी-नारायण सारखे बनवत आहेत. त्यांची चलन फारच चांगली असेल. दुसऱ्यांना खुशखबर ऐकवल्या शिवाय राहू शकत नाहीत.

ओम शांती।
भारत खास आणि बाकी सर्व दुनियेला संदेश द्यायचा आहे.तुम्ही सर्व संदेशी आहात.खूपच खुशीचा संदेश सर्वांना द्यायचा आहे की,भारत परत स्वर्ग बनत आहे किंवा स्वर्गाची स्थापना होत आहे. भारतामध्येच पिता ज्यांना स्वर्गिय ईश्वरीय पिता म्हणतात, तेच स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आले आहेत. तुम्हा मुलांना सूचना आहेत की, ही खुशखबर सर्वांना चांगल्या रीतीने ऐकवा. प्रत्येकाला आपल्या धर्माची आवड असतेच, तुम्हाला पण आहे. तुम्ही खुशखबर ऐकवत राहतात. भारताच्या सूर्यवंशी धर्माची स्थापना होत आहे,म्हणजेच भारत परत स्वर्ग बनत आहे. ही खुशी मना मध्ये राहायला पाहिजे, की आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत. ज्यांच्या मना मध्ये आनंद आहे त्यांना कोणत्याच प्रकारचे दुःख होऊ शकत नाही.हे तर मुलं जाणतात नवीन दुनिया ची स्थापना होण्यामध्ये कष्ट पण होतात.अबला वरती खूप अत्याचार होतात. मुलांना ही स्मृती नेहमीच राहायला पाहिजे, आम्ही भारताला खुशखबर ऐकवत आहोत, भावांनो आणि बहिणींनो, येऊन ही खुशखबर ऐका. दिवस भर विचार चालला पाहिजे, संदेश सर्वांना कसा ऐकवता येईल?बेहद चे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी आले आहेत. लक्ष्मी-नारायण च्या चित्राला पाहून सर्व दिवस आनंदित राहिले पाहिजे.तुम्ही तर खूप मोठे मनुष्य आहात,म्हणून तुमची कोणत्याच प्रकारची जंगली चलन असायला नको.तुम्ही जाणता आम्ही माकड पेक्षा पण जास्त खराब झालो होतो. आत्ता बाबा आम्हाला देवी देवता सारखे बनवत आहेत.तर खूप आनंद व्हायला पाहिजे परंतु आश्चर्य आहे मुलांना खुशी राहत नाही.ना त्या उमंग उत्साहा द्वारे सर्वांना खुशखबर ऐकवतात.बाबांनी सर्वाना संदेशी बनवले आहे.सर्वांच्या कानां मध्ये हा संदेश देत रहा.भारतवासींना माहित नाही की,आपल्या आदी सनातन धर्माची स्थापना कधी झाली?परत कुठे गेला?आता तर फक्त चित्र आहेत आणि सर्व धर्म आहेत,फक्त आदी सनातन धर्म नाही.भारतामध्ये च चित्र आहेत. ब्रह्मा द्वारे स्थापना करतात.तर तुम्ही सर्वांना ही खुशखबर ऐकवा,तर तुम्हाला पण मनातून आनंद राहील.प्रदर्शनी मध्ये तुम्ही ही खुशखबर सर्वांना ऐकवता ना.बेहद च्या बाबा कडे,येऊन स्वर्गाचा वारसा घ्या.हे लक्ष्मी-नारायण स्वर्गा चे मालक होते,परत ते कुठे गेले? ते पण कोणी समजत नाहीत, म्हणून म्हटले जाते,चेहरा मनुष्याचा आणि चलन माकडा सारखी आहे.आत्ता तुमचा चेहरा मनुष्यचा आहे आणि चलन देवतासारखी बनत आहे.तुम्ही जानता आम्ही परत सर्वगुण संपन्न बनत आहोत,परत दुसऱ्यां कडुन पण हा पुरूषार्थ करून घ्यावयचा आहे.प्रदर्शनीची सेवा तर खूपच चांगली आहे.ज्यांना गृहस्थ व्यवहाराचे बंधन नाही,वानप्रस्थीआहेत किंवा विधवा, कुमारी आहेत,त्याना तर सेवेची खूपच संधी आहे.सेवे मध्ये लागुन राहिले पाहिजे.या वेळेत लग्न करणे म्हणजे बरबादी करणे आहे,लग्न न करणे म्हणजे आबादी आहे. बाबा म्हणतात ही पतित दुनिया विनाश होणार आहे.तुम्हाला पावन दुनिया मध्ये जायचं असेल तर या सेवेमध्ये लागून राहायला पाहिजे.प्रदर्शनीच्या नंतर प्रदर्शनी करत राहिले पाहिजे.सेवाधारी मुलं आहेत त्यांना चांगली आवड आहे.बाबांना काही जण विचारतात आम्ही,लौकिक सेवा सोडून देऊ का?बाबा पाहतात,लायक आहे,तर सुट्टी देतात,खुशाल सेवा करा. अशी खुशखबर सर्वांना सांगायची आहे. बाबा म्हणतात आपले राज्य भाग्य येऊन घ्या.तुम्ही पाच हजार वर्षापूर्वी राज्य भाग्य घेतले होते,आता परत घ्या,फक्त माझ्या मतावर चालत राहा. स्वता:ला तपासयला पाहिजे की,माझ्या मध्ये कोण,कोणते अवगुण आहेत? तुम्ही या बैज वरती पण खूप छान सेवा करू शकता,ही फारच चांगली गोष्ट आहे.जरी पाई पैशाची गोष्ट आहे परंतु याद्वारे खूप श्रेष्ठ पद मिळवू शकता.मनुष्य शिकण्या साठी,पुस्तक इत्यादी वर किती खर्च करतात.येथे तर पुस्तकाची गोष्टच नाही, फक्त सर्वांच्या कानांमध्ये संदेश द्यायचा आहे.हा बाबांचा खरा मंत्र आहे,बाकी तर सर्व खोटे मंत्र देत राहतात.खोट्या गोष्टीची किंमत थोडीच असते.हिऱ्याची किंमत असते दगडांची नाही.हे जे गायन आहे, एकेक महावाक्य एक,एक लाख रुपयांची मिळकत आहे,ते ज्ञानासाठी म्हटले जाते. बाबा म्हणतात ग्रंथ पुष्कळ आहेत.तुम्ही अर्धा कल्प वाचत आले त्याद्वारे काहीच मिळाले नाही.आता तुम्हाला ज्ञानाचे रत्न देत आहे.ते आहेत शास्त्रांचे अधिकारी.बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत.त्यांचे एकेक महावाक्य लाखो करोडो रुपयांचे आहेत.तुम्ही विश्वाचे मालक बनतात,पदम पती बनतात.या ज्ञानाची ही महिमा आहे. हे ग्रंथ इत्यादी वाचत वाचत तर अगदीच कंगाल बनले आहात.तर आत्ता या ज्ञान रत्नाचे दान पण करायचे आहे.बाबा खूपच सहज युक्ती समजवतात.तुम्ही सांगा आपल्या धर्माला विसरल्यामुळे तुम्ही भटकत राहिले.तुम्हा भारत निवासींचा आदी सनातन देवी देवता धर्म होता,तो धर्म कुठे गेला? 84 लाख योनी म्हटल्यामुळे काहीच बुद्धीमध्ये बसत नाही.आता बाबा समजवतात,तुम्ही तर आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते,परत 84 जन्म घेतले.लक्ष्मीनारायण आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहेत,आता धर्म भ्रष्ट,कर्म भ्रष्ट बनले आहेत.बाकी सर्व धर्म आहेत,हा आदी सनातन धर्म नाही.जेव्हा हा धर्म होता तर,दुसरा कोणताच धर्म नव्हता.किती सहज आहे. हे पिता,हे दादा.प्रजापिता ब्रह्मा आहेत,तर जरूर ब्रह्मकुमार कुमारी पण अनेक असतील ना.बाबा येऊन रावणाच्या जेल मधुन सोडवतात.बाबा येऊन शोक वाटिका पासून सोडवतात.शोक वाटिका चा अर्थ पण कोणी समजत नाहीत.बाबा म्हणतात ही दुःखाची जुनी दुनिया आहे.ती सुखाची दुनिया आहे.तुम्ही आपल्या शांतीच्या दुनियेची आणि सुखाच्या दुनियेची आठवण करत रहा.निराकारी दुनिया म्हणतात ना.हे इंग्रजी अक्षरं चांगले आहेत. इंग्रजी तर चालत येते ना.आता तर अनेक भाषा झाल्या आहेत.मनुष्य काहीच समजत नाहीत.आता म्हणतात निर्गुण बालक संस्था.निर्गुण म्हणजे कोणतेच गुण नाहीत,अशीच संस्था बनवली आहे.निर्गुण चा अर्थ पण समजत नाहीत,बिगर अर्थ नाव ठेवतात.अनेक संस्था आहेत.भारता मध्ये आदी सनातन धर्माची संस्था होती,तेव्हा दुसरे कोणतेच धर्म नव्हते,परंतु मनुष्यांनी पाच हजार वर्षांच्या ऐवजी कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिले आहे. तर सर्वांना या अज्ञान अंधारातुन बाहेर काढायचे आहे.सेवा करायचे आहे.जरी नाटक पूर्वनियोजित आहे परंतु शिव बाबांच्या यज्ञा द्वारे खाता,पिता आणि सेवा काहीच करणार नाहीत,तर धर्मराजाचा उजवा हात,धर्मराज जरुर आहे.तो जरूर सजा देईल,म्हणून सावधान केले जाते. सेवा करणे तर खूपच सहज आहे.प्रेमाने कोणालाही समजावत रहा.बाबांच्या जवळ काही जणांचा समाचार येतो,आम्ही मंदिरा मध्ये गेलो,गंगाकिनारी गेलो,सकाळी उठून मंदिरामध्ये जातात.धार्मिक मनुष्यांना समजवणे सहज होते.लक्ष्मीनारायण च्या मंदिरामध्ये सेवा करणे सर्वात चांगले आहे. अच्छा,परत त्यांना असे श्रेष्ठ बनवणारे शिवबाबा आहेत,हे त्यांना समजून सांगा.या जंगलाला आग लागेल,हे सर्व नष्ट होऊन जाईल,परत तुमची भूमिका पण पूर्ण होईल.तुम्ही जाऊन राजाई कुळामध्ये जन्म घ्याल.राजाई कशी मिळेल,हे पण पुढे चालून माहिती होईल.नाटकांमध्ये पुढे काय होईल,हे सांगत नाही.तुम्ही जाणाल आम्हाला कोणते पद मिळेल.जास्ती दान पुण्य करणारे राजाई घराण्यामध्ये जन्म घेतात ना.राजांच्या जवळ धन खूप राहते.आता तुम्ही अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करतात.

भारत निवासी साठी हे ज्ञान आहे.असे सांगा आदी सनातन धर्माची स्थापन होत आहे.पतिता पासून पावन बनवणारे बाबा आले आहेत.बाबा म्हणतात माझी आठवण करा,हे तर खूपच सहज आहे परंतु इतकी तमोप्रधान बुध्दी आहेत,काहीच धारणा करत नाहीत.विकारांची प्रवेशता आहे. जनावरं पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अनेकां मध्ये क्रोध खूप असतो.प्रत्येक जनावरांचा स्वभाव वेग वेगळा असतो. दुःख देण्याचे अनेक प्रकारचे स्वभाव असतात.काम विकारांमध्ये घेऊन जाणे हे सर्वात मोठे दुःख आहे.रावण राज्या मध्ये या विकारांचे राज्य आहे.बाबा तर रोज समजावत राहतात,अनेक मुली बंधनात आहेत,ज्यांना बांधेली म्हणतात.वास्तव मध्ये त्यांच्यामध्ये ज्ञानाचे आचरण चांगल्या रीतीने झाले तर,त्यांना कोणी बंधन घालणार नाहीत परंतु मोहाची रग खूप आहे.सन्याशी इत्यादी ना घरादाराची आठवण येते,खूप कष्टाने मोहाची रग नष्ट होते.आता तुम्हाला मित्र संबंधी इत्यादी ना विसरायचे आहे,कारण ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.या शरीराला विसरायचे आहे,स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण करायची आहे.पवित्र बनायचे आहे.84 जन्माची भूमिका तर वठवायची आहेच,मधेच कुणी परत जाऊ शकत नाही.आता नाटक पूर्ण होत आहे.तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे,आता आम्हाला परत घरी जायचे आहे.भूमिका पूर्ण झाली,उत्कंठा व्हायला पाहिजे,बाबांची खुप आठवण करायची आहे.आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.घरी जाऊन परत सुखधाम मध्ये येवू.काही समजतात लवकर या दुनिया पासून सुटुन जाऊ परंतु जाणार कोठे? प्रथम तर उच्चपद मिळवण्या साठी कष्ट घ्यायला पाहिजेत ना.प्रथम आपली नाडी तपायसायला पाहिजे,आम्ही किती लायक बनलो आहोत? स्वर्गा मध्ये जाऊन काय करणार?प्रथम तर लायक बनायला पाहिजे ना? बाबांचे सुपुत्र बनायला पाहिजे ना. लक्ष्मी-नारायण सूपुत्र आहेत ना.मुलांना पाहून भगवान स्वतः म्हणतात,हे तर फार चांगले आहेत,सेवा करण्यासाठी लायक आहेत.काही जणां साठी म्हणतील,हे लायक नाहीत.मोफत आपले पद भ्रष्ट करत आहेत.बाबा तर सत्यच सांगतात ना. हे पतित पावन आम्हाला सुखधाम चे मालक बनवा,असे बोलवत राहतात.खुप सुखाची इच्छा ठेवतात.तर बाबा म्हणतात काही तरी सेवा करण्यासाठी लायक बना. माझे भक्त आहेत त्यांना ही खुशखबर ऐकवा.आत्ता शिवबाबा वारसा देत आहेत, ते म्हणतात माझी आठवण करा आणि पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल.या जुन्या दुनियेला आग लागणार आहे.समोर मुख्य लक्ष आहे,हे पाहिल्या मुळे तर खूप आनंद होतो.आम्हाला असे लक्ष्मी-नारायण सारखे बनायचे आहे.दिवस भर बुद्धीमध्ये हेच आठवणीत राहावे,तर कधी कोणते आसुरी काम होणार नाही. आम्ही असे श्रेष्ठ बनत आहोत,परत उलटे काम कसे करू शकतो?परंतु कोणाच्या भाग्या मध्ये नाही तर अशी युक्ती करत नाहीत.आपली कमाई करत नाहीत.कमाई फारच चांगली आहे.घरी बसल्या बसल्या सर्वांना आपली कमाई करायची आहे आणि दुसऱ्यांकडून करून घ्यायची आहे. घरी बसल्या बसल्या हे सुदर्शनचक्र फिरवत रहा,दुसऱ्यांना पण सुदर्शन चक्रधारी बनवायचे आहे.जितके अनेकांना बनवाल,तेवढे तुमचे पद श्रेष्ठ होईल. या लक्ष्मी-नारायण सारखे बनू शकतात.मुख्य लक्ष्य हे आहे.सूर्यवंशी बनण्यासाठी सर्व हात वरती करतात.हे चित्र इत्यादी प्रदर्शनी मध्ये खूप कामाला येऊ शकतात.यावरती समजून सांगायचे आहे.आम्हाला उच्च ते उच्च बाबा जे सांगतात,तेच आम्ही सांगतो.भक्ती मार्गातील गोष्टी ऐकणे आम्ही पसंत करत नाहीत.हे चित्र तर खूपच चांगले आहेत.या चित्रा वरती तुम्ही खूप सेवा करू शकतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती प्रेम पूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
निश्चित भावीला जाणून श्रेष्ठ कार्याला प्रत्यक्ष रूप देणारे सदा समर्थ भव.

नवीन श्रेष्ठ विश्व बनण्याची निश्चित भावी असुन पण समर्थ भवचे वरदानी मुलं फक्त कर्म आणि फळाच्या,पुरुषार्थ आणि भाग्याच्या,निमित्त आणि निर्माणच्या कर्म सिध्दांता नुसार निमित्त बणुन कार्य करतात.दुनियावी लोकांना काही दिसून येत नाही आणि तुम्ही म्हणता हे कार्य अनेक वेळेस केले आहे.आत्ता पण झालेलेच आहे, कारण स्व परिवर्तनाच्या प्रमाणा पुढे दुसऱ्या कोणत्याच प्रमाणाची आवश्यकताच नाही. सोबत परमात्म कार्य नेहमीच सफल आहेच.

बोधवाक्य:-
कमी सांगणे आणि जास्त करणे,हे श्रेष्ठ लक्ष महान बनवेल.