10-03-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, पदाचा आधार राजयोगाचा अभ्यास आहे, जे जुने भक्त असतील, ते चांगल्या प्रकारे शिकतील, आणि पद पण चांगले मिळवतील.

प्रश्न:-
जे बाबांच्या आठवणी मध्ये राहतात त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
आठवणी मध्ये राहणाऱ्या चे चांगले गुण असतील.ते पवित्र बनत जातील.श्रेष्ठत्व येत जाईल.आपसा मध्ये गोड, खीर खंड बणुन राहतील. दुसऱ्याला न पाहता स्वता:ला पाहतील. त्यांच्या बुद्धी मध्ये राहील जे करेल त्यांनाच मिळेल.

ओम शांती।
मुलांना समजवले आहे की,भारत जो आदी सनातन देवी देवता धर्म आहे,त्याचा गीता ग्रंथ आहे.ही गीता कोणी ऐकवली,हे कोणीच जाणत नाहीत.या ज्ञानाच्या गोष्टी आहेत.बाकी हे होळी इत्यादी काही आपले सण नाहीत.हे सर्व भक्तिमार्गाचे सण आहेत. एक त्रिमूर्ती शिवजयंतीच सण आहे,बस.फक्त शिवजयंती कधीच म्हणायचे नाही,त्रिमूर्ती अक्षर न म्हटल्यामुळे मनुष्य समजणार नाहीत. जसे त्रिमूर्ती चे चित्र आहे त्याच्या खाली लिहिले आहे,दैवी स्वराज्य आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.शिव भगवान पिता पण आहेत ना.जरूर येतात,येऊन स्वर्गाचे मालक बनवतात.स्वर्गाचे मालक राजयोग शिकल्या मुळेच बनले आहेत. चित्रांमध्ये खूप ज्ञान आहे,चित्र असे बनवले पाहिजेत,ज्यामुळे मनुष्य आश्चर्य खातील.ते पण ज्यांनी खूप भक्ती केली आहे,तेच ज्ञान पण चांगल्या प्रकारे घेतील.कमी भक्ती करणारे ज्ञान पण कमी घेतील.दास-दासी मध्ये पण क्रमा नुसार आहेत ना.सर्व आधार राजयोगाच्या अभ्यासा वरती अवलंबून आहे.तुमच्यामध्ये पण खूप थोडेच आहेत,जे चांगल्या प्रकारे,युक्तीने गोष्टी करू शकतात.चांगल्या मुलांचे कार्य व्यवहार पण चांगलेच असते.गुण पण चांगले असायला हवेत.जितके बाबांच्या आठवणीमध्ये राहाल,तर पवित्र होत जाल आणि श्रेष्ठत्व पण येत राहील.कुठे कुठे शूद्रांची पण चलन चांगली असते आणि येथे ब्राह्मण मुलांची चलन पण अशी आहे,तुम्ही विचारू नका,म्हणून ते लोक पण म्हणतात,काय यांना ईश्वर शिकवतात?तर मुलांची चलन अशी असायला नको.खूपच गोड,खीर-खंड बणुन राहायला पाहिजे.जे करतील त्यांनाच मिळेल.काहीच करणार नाही तर मिळणार काहीच नाही.बाबा चांगल्या रीतीने समजावत राहतात. प्रथम तर बेहदच्या बाबांचा परिचय द्यायचा आहे.त्रिमूर्ती चे चित्र पण खूप चांगले आहे,स्वर्ग आणि नरक दोन्हीकडे आहे.सृष्टिचक्रा मध्ये पण स्पष्ट आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला तुम्ही या सृष्टिचक्रा वरती किंवा कल्पवृक्षा वरती समजू शकतात,या हिशेबा द्वारे तुम्ही नवीन दुनिया,स्वर्गामध्ये तर येऊ शकत नाहीत.जो सर्वात उच्च धर्म होता,सर्वात सावकार होते,तेच आता गरीब बनले आहेत.जे सर्वात प्रथम आले होते,त्यांची संख्या पण जास्त असायला पाहिजे, परंतु हिंदू लोक अनेक अनेक धर्मांमध्ये, धर्मांतरित झाले आहेत.आपल्या धर्माला न जाणल्यामुळे दुसऱ्या धर्मात चालले गेले आहेत किंवा स्वतःला हिंदू धर्माचे म्हणतात.आपल्या धर्माला समजत नाहीत.ईश्वराला पुकारतात,शांती देवा परंतु शांती चा अर्थ समजत नाहीत. एक-दोघांना शांतीचे बक्षीस देत राहतात येथे तुम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्याच्या निमित्त बनले आहात,म्हणुन मुलांना बाबा विश्वाच्या राजाईचे बक्षीस देतात.हे बक्षीस पण क्रमा नुसार पुरुषार्था प्रमाणे मिळते,देणारे भगवान पिता आहेत.इतके मोठे बक्षीस सूर्यवंशी विश्वाची राजाई मिळते.आता तुमच्या बुद्धीमध्ये साऱ्या विश्वाचा इतिहास भूगोल वर्ण इत्यादी सर्व आहेत.विश्वाची राजाई घेण्यासाठी काही कष्ट पण करावे लागतील.गोष्टी तर खूपच सहज आहेत. शिक्षक जे काम देतात ते करून दाखवायला पाहिजेत.तर बाबा पाहतील कोणा मध्ये पूर्ण ज्ञान आहे.काही मुलं तर मुरली वरती ध्यान देत नाहीत, दररोज मुरली वाचत नाहीत.जे मुरली वाचत किंवा ऐकत नाहीत,ते कोणाचे कल्याण करू शकणार नाहीत.अनेक मुलं काहीच कल्याण करत नाहीत,न स्वतःचे न दुसऱ्याचे कल्याण करतात, म्हणून घोडेस्वार प्यादे म्हटले जाते. कोणी थोडेच महारथी आहेत,स्वतः पण समजू शकतात,कोण-कोण महारथी आहेत.गुलजार,कुमारका,मनोहर ला पाठवा,असे मुलं म्हणतात,कारण स्वतः घोडेस्वार आहेत,ते महारथी आहेत. बाबा तर सर्व मुलांना चांगल्या रीतीने जाणू शकतात.कोणा वरती गृहचारी पण बसते ना.कधी चांगल्या चांगल्या मुलांना पण मायेचे वादळ येतात,तर बेताले बनतात.ज्ञान योगा कडे लक्ष राहत नाही.बाबांना तर प्रत्येकाच्या सेवेद्वारे माहिती तर होते ना.सेवा करणारे आपला पूर्ण समाचार बाबांना देत राहतात.

तुम्ही मुलं जाणता गीताचे भगवान आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत.अनेक असे आहेत जे गीता पाठ करतात,हजारो रुपये कमावतात.तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात परत दैवी संप्रदाय बनतात.ईश्वराचे संतान तर सर्व स्वतःला मानतात,तरी म्हणतात आम्ही सर्व ईश्वर आहोत.ज्याला जे येईल ते बोलत राहतात.भक्तीमार्गा मध्ये मनुष्याची हालत कशी झाली आहे?ही दुनियाच लोहयुगी पतित आहे.या चित्रा द्वारे तुम्ही चांगल्या रीतीने समजावू शकतात,त्यासोबत दैवी गुण पण पाहिजेत.आत-बाहेर सत्यता पाहिजे. आत्माच खोटी बनली आहे.त्यालाच परत सत्य बाबा सत्य बनवत आहेत. बाबाच स्वर्गाचे मालक बनवत आहेत. दैवी गुण धरण करवतात.तुम्ही मुलं जाणतात आम्ही असे लक्ष्मी-नारायण सारखे गुणवान बनत आहोत.आपली तपासणी करत राहायचे आहे,माझ्या मध्ये कोणते आसुरी गुण तर नाहीत. चालता-चालता मायेची चापट अशी लागते,जे विकारात जातात. तुमच्या साठी हे ज्ञान आणि विज्ञान च होळी आणि धुळवट आहेत.ते लोक होळी आणि धुळवट साजरे करतात परंतु त्याचा अर्थ कोणीही जाणत नाहीत.वास्तव मध्ये ज्ञान आणि विज्ञान आहे,ज्याद्वारे तुम्ही स्वतःला खूप श्रेष्ठ बनवतात.ते तर काय काय करतात, चिखल इत्यादी अंगावर टाकतात, कारण हा रौरव नर्क आहे.नवीन दुनिया ची स्थापना आणि जुन्या दुनिये च्या विनाशाचे कर्तव्य चालत आहे. तुम्हा ईश्वरीय मुलांना पण माया एकदम असा ठोसा मारते,जे विकाराच्या दलदली मध्ये फसतात.परत दलदली मधुन बाहेर निघणे कठिण होते.यामध्ये आशीर्वाद इत्यादीची कोणतीच गोष्ट राहत नाही. परत इकडे थोडेच प्रगती करतात, म्हणून खूप खबरदारी घ्यायला पाहिजे. मायेच्या आघाता पासून वाचण्यासाठी कधीच देह अभिमाना मध्ये फसू नका. नेहमी खबरदार राहा,सर्व भाऊ बहिणी आहेत.बाबांनी जे शिकवले आहे,तेच बहिणी शिकवत आहेत.सर्व महिमा बाबांची आहे,ना की बहिणींची आहे. ब्रह्मा ची पण महिमा नाही,हे पण पुरुषार्था द्वारे शिकत आहेत.पुरुषार्थ चांगला केला आहे,म्हणजेच स्वतःचे कल्याण केले.आम्हाला पण शिकवतात तर स्वतःचे कल्याण करायचे आहे. आज होळी आहे,आता होळीचे ज्ञान पण ऐकवत राहतात.ज्ञान आणि विज्ञान.शिक्षणाला ज्ञान म्हटले जाते. विज्ञान काय गोष्ट आहे,कुणालाच माहिती नाही.विज्ञान ज्ञानापेक्षा पुढे आहे.ज्ञान तुम्हाला येथे मिळते,ज्याद्वारे तुम्ही प्रारब्ध मिळवतात.बाकी ते शांतीधाम आहे.ते भूमिका करून थकून जातात म्हणून शांती मध्ये जाण्याची इच्छा ठेवतात.आता तुमच्या बुद्धीमध्ये चक्राचे ज्ञान आहे. आता आम्ही स्वर्गा मध्ये जाऊ,परत ८४ जन्म घेत नरका मध्ये येऊ.परत तीच हालत होईल,हे चालत च राहिल.याद्वारे कोणी सुटू शकत नाही.कोणी म्हणतात,असे नाटक का बनले?अरे ही तर नवीन दुनिया आणि जुन्या दुनिये चा खेळ आहे.या पासुन कोणी सुटू शकत नाहीत,अनादी बनलेला आहे.झाडाच्या चित्रावरती समजावणे तर फारच चांगले आहे. सर्वात मुख्य गोष्ट आहे,बाबांची आठवण करा,तर पावन बनाल.पुढे चालून माहित होईल कोण कोण या कुळाचे आहेत. जे दुसऱ्या धर्मांमध्ये परिवर्तन झाले आहेत ते पण निघून येतील.जेव्हा सर्व येतील त्यावेळेस मनुष्य आश्चर्य खातील. सर्वांना हेच सांगा,देह अभिमान सोडून देही अभिमानी बना.तुमच्यासाठी शिक्षणच मोठा सन आहे,ज्याद्वारे तुमची खूप कमाई होते.ते लोक तर सणा वरती खूप पैसे खर्च करतात.खूप भांडणे इत्यादी होतात.पंचायती राज्या मध्ये खूपच भांडणे आहेत.कोणाला सुपारी देऊन पण मारण्याचा प्रयत्न करतात, असे खुप उदाहरणं आहेत.मुलंं जाणतात सतयुगा मध्ये कोणतेही उपद्रव होत नाहीत.रावण राज्यांमध्ये खूप उपद्रव आहेत.आता तर तमोप्रधान आहेत ना.एक दोघांशी मत न मिळाल्यामुळे भांडण होतात म्हणून बाबा समजवतात,या जुन्या दुनिये ला विसरून एकांतवासी बना,घराची आठवण करा.आपल्या सुखधामची आठवण करा.कोणाशी जास्त गोष्टी करू नका,नाहीतर नुकसान होते.खूप गोड,शांत प्रेमाने बोला.कमी बोलणे चांगले आहे.जास्त बोलणे चांगले नाही.शांती मध्ये राहणे सर्वात उत्तम आहे.तुम्ही मुलं शांती द्वारे विजय प्राप्त करतात.बाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणा बरोबर प्रेम करायचे नाही.जितकी बाबा पासून संपत्ती घेऊ इच्छितात तेवढे घेऊ शकता,नाहीतर लौकिक पित्यांच्या संपत्ती वरती खूप भांडण होत राहतात. यामध्ये काहीच खिटपिट नाही. जितके शक्य होईल तेवढा अभ्यास करू शकता,शिक्षण घेऊ शकता,अच्छा. अच्छा गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती,मातपिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) खरे बाबा, खरे बनवण्यासाठी आले आहेत, म्हणून खरेच वागायचे आहे.स्वतःला तपासायचे आहे,माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही? मी जास्ती गोष्टी तर नाही करत?खूप गोड बणुन शांती आणि प्रेमाने गोष्टी करायच्या आहेत.

(२) मुरली वरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे, रोज मुरली वाचायची आहे.स्वतःचे आणि दुसऱ्याचे कल्याण करायचे आहे. शिक्षक जे काम देतात,ते करून दाखवायचे आहे.

वरदान:-
अविनाशी आत्मिक रंगाच्या खऱ्या होळी द्वारे बाप समान स्थितीचे अनुभवी भव.
 

तुम्ही परमात्म रंगांमध्ये रंगलेली पवित्र आत्मा आहात.संगम युग पवित्र जीवनाचे युग आहे.जेव्हा अविनाशी आत्मिक रंग लागतो, तर सदा काळासाठी बाप समान बनतात.तर तुमची होळी संगाच्या रंगाद्वारे बाप समान बनणे आहे.असा पक्का रंग हवा,ज्यामुळे दुसऱ्यांना पण आपल्या सारखे बनवा.प्रत्येक आत्म्याला अविनाश ज्ञानाचा रंग,आठवणीचा रंग,अनेक शक्तीचा रंग,गुणाचा रंग,श्रेष्ठ वृत्ती दृष्टी,शुभ भावना,शुभ कामना चा आत्मिक रंग लावा.

बोधवाक्य:-
दृष्टीला अलौकिक,मनाला शितल, बुद्धीला दयाळू आणि मुखाला मधुर बनवा.


मातेश्वरी जी चे अनमोल महावाक्य.

गुप्त बंधनयुक्त गोपिकांचे गायन आहे.

गीत :-
न पाहता प्रेम करू,घरबसल्या आठवण करु

आता हे गीत कोणी बंधन युक्त मस्त गोपींचे गायन आहे.हा कल्प कल्पाचा विचित्र खेळ आहे.न पाहता प्रेम करणे,दुनियेतील बिचारे मनुष्य काय जाणतील,कल्पा पूर्वीची भूमिका हुबेहूब पुनरावृत्ती होत आहे.जरी त्या गोपीने घरदार सोडले नाही परंतु आठवणी मध्ये कर्मबंधन नष्ट करत आहेत.तर खूपच खुशी मध्ये नाचून मस्ती मध्ये गात आहेत.तर वास्तव मध्ये घर सोडण्याची गोष्टच नाही.घर बसल्या,न पाहता त्या सुखा मध्ये राहून सेवा करायची आहे.कोणती सेवा करायची आहे,पवित्र बणुन पवित्र बनवण्याची. तुम्हाला आता तिसरा नेत्र मिळाला आहे.आदी पासून अंता पर्यंत बीज आणि झाडाचे रहस्य तुमच्या दृष्टी मध्ये आहे.तर महिमा या जीवनाची आहे.या ज्ञानाद्वारे २१ जन्मासाठी सौभाग्य बनवत आहात.यामध्ये जरी काही लोक लाज,विकारी कुळाची मर्यादा आहे,तर ते सेवा करू शकत नाहीत,ही आपलीच कमी आहे.अनेकांना विचार येतो,या ब्रह्माकुमारी घरदार सोडवण्यासाठी आल्या आहेत,परंतु यामध्ये घरदार सोडण्याची गोष्टच नाही.घरांमध्ये राहून पवित्र राहायचे आहे आणि सेवा करायची आहे.यामध्ये काहीच कठीण नाही,पवित्र बनाल तेव्हाच पवित्र दुनियेमध्ये चालण्याच्या अधिकारी बनू शकाल.बाकी जे चालणार नाहीत,ते तर कल्पा पूर्वी प्रमाणेच शत्रुत्वा ची भूमिका वठवतील,यामध्ये त्यांचा दोष नाही.जसे आम्ही परमात्म्याच्या कार्याला जाणतो, तसेच नाटकांमध्ये प्रत्येकाच्या भूमिकेला जाणले आहे म्हणून द्वेष करु शकत नाही.अशा तीव्र पुरुषार्थी गोपी स्पर्धा करून विजय माळे मध्ये येऊ शकतात.अच्छा.