10-05-2022      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा तुम्हाला श्रेष्ठ मत देऊन, कायम स्वरुपी सुखी आणि शांत बनवण्यासाठी आले आहेत, तर तुम्ही त्यांच्या मतावर चाला, आत्मिक अभ्यास करा आणि करवून घ्या, तर सदैव निरोगी बनाल. "

गीत:-
जाग सजनीया जाग . . . . .

ओम शांती।
सजनीं ना कोणी समजावले? सजनी साठी साजन आला असे म्हणतात. किती सजनी आहेत? एकाच साजनला इतक्या सजनी. . . . . अद्भुत आहे ना! मनुष्य तर म्हणतात की, कृष्णाला १६१०८ सजनी होत्या, पण असे नाही. शिवबाबा तर म्हणतात, मला करोडो सजनी आहेत. मी सर्व सजनींना माझ्यासोबत स्वीट होमला घेऊन जाईन. सजनीं ना पण समजते की, बाबा पुन्हा आम्हाला न्यायला आले आहेत. जीव आत्मा सजनी झाली. माझ्या हृदयात साजन आला आहे, आम्हांला श्रीमत देऊन शृंगार करण्यासाठी, मत तर प्रत्येकाला देतात. पती पत्नीला, पिता मुलांना, ऋषी शिष्यांना परंतु यांची मत तर सर्वात वेगळी आहे, म्हणूनच याला श्रीमत म्हटले जात. बाकी सर्व मानवी मत आहेत. बाकी सर्व देहाच्या उदरनिर्वाहासाठी मत देतात. साधू संत इत्यादी, सर्वांना आपल्या उदरनिर्वाहासाठी चिंता लागुन राहते. सर्व एकमेकांना श्रीमंत होण्यासाठी मत देत राहतात. ऋषी आणि गुरूंचे मत श्रेष्ठ मानले जाते. परंतू ते पण पोटासाठी किती पैसे जमवतात? मला तर स्वतःचे शरीर पण नाही. मी माझ्या पोटासाठी काहीच करत नाही. तुमचंही पोटाचं काम आहे की, आम्ही महाराजा-महाराणी बनू. प्रत्येकाला पोटाची चिंता असते. मग कुणी ज्वारीची रोटी खातात, तर कुणी अशोका हॉटेलमध्ये जेवण करतात. ऋषी धन गोळा करून, मोठी मंदिरे वगैरे बांधतात. शिवबाबा शरीर टिकवण्याच्या हेतूने काहीही करत नाहीत. तुम्हाला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी, तुम्हाला नेहमी सुखी बनण्यासाठी सर्वकाही देतात. तुम्ही सदैव निरोगी, संपत्तीवान बनाल. मी तर निरोगी होण्यासाठी प्रयत्न करत नाही. मी शरीरहीन, अशरीरी आहे. मी नेहमी तुम्हा मुलांना, सुखी बनवण्यासाठी येतो. शिवबाबा निराकार आहेत. बाकी सर्वांना पोटाची काळजी लागलेली आहे. द्वापर युगामध्ये महान संन्यासी, तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी होते. ईश्वराच्या आठवणीत राहायचे, तर घरी बसून सर्वकाही मिळायचे. प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येकाला भोजन आवश्यक आहे. पण ते योगात राहत होते, त्यामुळे त्यांना धक्के खावे लागत नव्हते. बाबा आता तुम्हा मुलांना युक्ती सांगत आहेत की, तुम्ही सदैव सुखी कसे राहू शकता. बाबा श्रीमत देतात आणि तुम्हाला जगाचे स्वामी बनवतात. तम्ही चिरंजीवी राहा, अमर राहा. त्याचे मत सर्वोत्तम आहे. मनुष्य तर अनेकानेक मत देतात. ​​काही परीक्षा उत्तीर्ण होतात आणि बॅरिस्टर होतात, परंतु ते सर्व थोड्या काळासाठी असते. मुलांच्या पोटासाठी प्रयत्न करत राहतात. आत्ता बाबा तुम्हाला श्रीमत देतात, अरे मुलांनो, श्रीमतचे पालन करा आणि हा आत्मिक अभ्यास करा, म्हणजे मनुष्य जगाचे स्वामी बनतील. प्रत्येकाला पित्याचा परिचय करून द्या, जेणेकरून पित्याच्या स्मरणात राहून, सदैव निरोगी आणि संपत्तीवान बनतील. ते अविनाशी सर्जन आहेत. तुम्ही बाबांची मुलेही अध्यात्मिक सर्जन आहात, यात काही अडचण नाही. केवळ मुखाद्वारे आत्म्यांना श्रीमत दिले जाते. तुम्हा मुलांना उत्तम सेवा करायची आहे. असे मत तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. आम्ही आता बाबाची मुलं झालो आहोत, म्हणून बाबांचा धंदा करायचा, की भौतिक धंदा करायचा. बाबांकडून आपण ज्ञानाच्या अविनाशी दागिन्यांनी बुध्दीरुपी झोळी भरतो. शिवासमोर म्हणतात, आमची झोळी भरा. ते समजतात १०-२० हजार मिळतील. जर त्यांना ते मिळाले, तर त्यांच्या वरती बलिहार जातील, परत त्यांची खुप खात्री करतील. तो सर्व भक्ती मार्ग आहे. आता सर्वांना बाबांचा परिचय करून द्या आणि बेहद्दचा इतिहास भूगोल सांगा. हे खूप सोपे आहे. सिमीत इतिहास भूगोलात तर अनेक गोष्टी आहेत. हा अमर्यादीत, बेहद्दचा इतिहास आणि भूगोल आहे. बेहद्दचे बाबा कुठे राहतात आणि कसे येतात. आम्ही आत्म्यात कशाप्रकारे ८४ जन्माची भुमिका नोंदलेली आहे? फक्त अल्फ आणि बे, जास्त काही सांगू नका. मी आत्मा पित्याचे स्मरण करून, जगाचे स्वामी बनू. तुम्हाला फक्त शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. अल्फ म्हणजे अल्लाह, बे म्हणजे राजसत्ता, बादशाही. आत्ता विचार करा, हा व्यवसाय करायचा, की भौतिक व्यवसाय करून २-४ शे कमवायचे ? बाबा म्हणतात, जर एखादी हुशार मुलगी असेल, तर मी तिच्या नातेवाईकांना काही देऊ शकतो, जेणेकरून त्यांचे उदारनिर्वाह राहावे. पण मुलगी चांगली, सेवाभावी, आतून-बाहेरून स्वच्छ असावी, ती खूप गोड असावी. खरे तर कुमारींची कमाई आई-वडील खाऊ शकत नाहीत. बाबाचे बनल्यानंतरही त्या भौतिक सेवेकडे फारसे लक्ष देणे, ही तर अवहेलना झाली. बाबा म्हणतात, मनुष्यांना स्वर्गाचे स्वामी बनवा. मुलं परत शारीरिक सेवेत डोकं लावतात!शाळा उघडणे हे सरकारचे काम आहे. हा तर बाबांचा अनादर झाला. आत्ता मुलींना त्यांच्या बुद्धीने काम करावे लागेल. कोणती सेवा करायची ईश्वरी सरकारची का, त्या सरकारची करावी? हा बाबा जसा दागिन्यांचा धंदा करत असे, परत मोठे बाबा म्हणाले की, हा ज्ञानाच्या अविनाशी दागिन्यांचा धंदा करायचा आहे, याने तुम्ही हे बनाल. चतुर्भुजचा साक्षात्कार करवला. त्याने आत्ता जगाची बादशाही घ्यावी की, हे करावे. हा सर्वोत्तम व्यवसाय आहे. कमाई चांगली असली, तरी बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आणि त्यांना मत दिले की, अल्फ आणि बे म्हणजे अल्लाह आणि बादशाहीची आठवण करा. किती सहज आहे, अगदी लहान मुलंही वाचू शकतात. शिवबाबा प्रत्येक मुलाला समजू शकतात. तुम्हीही हे शिकू शकता. हे बाह्यमुखी आहेत आणि शिवबाबा आंतरमुखी आहेत. हे बाबा सुद्धा, प्रत्येकाच्या दिसण्यावरून, बोलण्यातून, वागण्यावरून सर्व काही समजू शकतात. मुलींना आध्यात्मिक सेवेची संधी एकदाच मिळते. आत्ता मनात यायला हवे की, मनुष्याला देवता बनवायचे, की काट्याला काटे बनवायचे? विचार करा मी काय करावे? निराकार भगवानुवाच देहसहीत देहाशी असलेले सर्व संबंध तोडून टाका. स्वत:ला आत्मा समजून बाबाचे स्मरण करत राहा. ब्रह्माच्या तनाद्वारे बाबा ब्राह्मणांशीच बोलतात. ते ब्राह्मण असेही म्हणतात, ब्राह्मण देवी देवताये नमः, ते मुख वंशावळ आहेत, तुम्ही मुख वंशावळ आहात. बाबांना जरुर ब्रह्मा मुलाची गरज आहे. कुमारका सांगा, बाबांना किती मुले आहेत? कोणी म्हणतात 600 कोटी, कोणी म्हणतात एकच ब्रह्मा. जरी तुम्ही त्रिमूर्ती म्हणत असला तरी व्यवसाय वेग वेगळा आहे, नाही का? विष्णूच्या नाभीतून ब्रह्माचा उदय झाला. ब्रह्माच्या नाभीतून विष्णू, हे एकच झाले. विष्णू 84 जन्म घेतात किंवा ब्रह्मा, एकच गोष्ट आहे. बाकी राहीले शंकर. असे तर नाही, शंकरच शिव आहेत. नाही, त्यांना त्रिमूर्ती म्हणले जाते. परंतू तसे तर दोनच मुलं आहेत. या सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत. मग मुलींनी ही सेवा करणे चांगले आहे की, दहावी इत्यादी शिकणे चांगले आहे? तिथे तर तुम्हाला अल्पकालीन सुख मिळेल, थोडा पगार मिळेल. येथे, तुम्ही भविष्य २१ जन्मांसाठी श्रीमंत होऊ शकता, मग तुम्हाला काय करावे लागेल? कन्या तर निर्बंधन आहे. अधर कन्यापेक्षा, कुमारी तीक्ष्ण होऊ शकते, कारण ती पवित्र आहे. मम्मा सुद्धा कुमारी होती. पैशाची तर गोष्टच नाही. मम्मानी किती तीव्र पुरुषार्थ केला, तर कन्यांनी तिचे अनुकरण करायला पाहिजे. काट्यांना फुलं बनवा. ईश्वरी अभ्यासासाठी संधी घ्यायची, की त्या अभ्यासासाठी? मुलींचा सेमिनार घ्यायला पाहिजे. मातांना तर पती वगैरे आठवतात. संन्याशांचेही पुष्कळ स्मरण चालू असते. मुलींनी तर शिडी चढू नये. सहवासाचा रंग खूप लागतो. कोणत्या मोठ्या माणसाच्या मुलाला पाहून मन आकर्षित होते, परत लग्न झालं. खेळ संपला. सेवाकेंद्रातुन बाहेर गेलात, तर खेळ संपला. हे मधुबन आहे. येथे पण असे, अनेक जण येतात, म्हणतात घरी गेल्यानंतर सेवाकेंद्र उघडू. येथून बाहेर जातात आणि गायब होतात. येथे ज्ञानाचे मर्म धारण करतात, परत बाहेर गेल्याने नशा नाहीसा होतो. माया खूप विरोध करते. माया पण म्हणते वाह! यांनी बाबांना ओळखले आहे, तरीही बाबांची आठवण करत नाहीत, तर आपणही त्यांना ठोसा मारु. असे म्हणू नका, बाबा मायेला ठोसा मारु नको, म्हणून सांगा. हे रणांगण आहे, नाही का? एका बाजूला रावणाची सेना, तर दुसऱ्या बाजूला रामाची सेना. शूर होऊन रामाकडे जायचे आहे. आसुरी पंथाला च दैवी पंथात रूपांतर करण्याचा धंदा करायचा आहे. तुम्ही ज्याला लौकिक शिक्षण शिकवाल, ते अभ्यास करून मोठे होई पर्यंत, विनाशही समोर येईल. तुम्हीही युध्दाची लक्षणं पण बघत आहात. दोन ख्रिश्चन भाऊ-भाऊ एकत्र आल्यास, लढाई होऊ शकणार नाही, हे बाबांनी स्पष्ट केले आहे. पण भविष्य असे नाही. त्यांना समजत नाही. तुम्ही मुलं आत्ता योगाच्या बळावर राजाई स्थापन करत आहात. ही शिवशक्ती सेना आहे. जे शिवबाबांकडून भारताचे प्राचीन ज्ञान आणि योग शिकून, भारताला हिऱ्यासारखे बनवत आहेत. बाबा कल्पानंतरच येतात आणि अपवित्रांना पावन बनवतात. तुम्ही सर्व रावणाच्या तुरुंगात आहात, शोक वाटिकेत आहात, प्रत्येकजण दुःखी आहे. परत राम येतात आणि सर्वांना सोडवून, अशोक वाटिकेत म्हणजे स्वर्गात घेऊन जातात. श्रीमत सांगते की, काट्याला फुल आणि मनुष्याला देवता बनवा. तुम्ही मास्टर दु:ख दूर करणारे, सुखाचे कर्ता आहात. हा व्यवसाय केला पाहिजे. श्रीमताचे पालन केल्यानेच तुम्ही श्रेष्ठ व्हाल. बाबा मत देतात. आता बाबा म्हणतात, अर्जी माझी, मर्जी तुमची.

गोड गोड खुप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)सेवाभावी होण्यासाठी आतून-बाहेरून स्वच्छ व्हायला हवे. मुखाद्धारे खूप गोड शब्द बोलायचे आहेत. बुद्धी योग देहसहित, देहाच्या सर्व नातेसंबंधातून काढून टाकावा लागेल. तुम्हाला तुमची संगत ची काळजी घ्यावी लागेल.

(२) बाबाप्रमाणेच मास्टर दुःख हर्ता, सुखकर्ता बनून आत्मिक सेवा करून, खरी कमाई करायची आहे. आत्मिक पित्याच्या सूचनेनुसार तुम्हाला आत्मिक समाजसेवक बनायचे आहे.

वरदान:-
"मी आणि माझे बाबा" या विधीद्वारे जीवनमुक्ती स्थितीचा अनुभव करणारे सहजयोगी भव.

ब्राह्मण बनणे म्हणजे शरीर, नातेसंबंध आणि साधनांच्या बंधनातून मुक्त होणे. देहाच्या संबंधी सोबत, देहाच्या नात्याशी, दैहिक संबध नसून, आत्मिक नाते आहे. जर कोणी कोणाच्या ताब्यात गेले, तर बंधन आहे, परंतू ब्राह्मण अर्थात जीवनमुक्त. जोपर्यंत कर्मद्रियांचा आधार आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागेल, पण कर्मबंधन नाही, कर्म-संबंध आहे. जो असा मुक्त असतो, ते नेहमीच सफलतामुर्त आहेत. यासाठी सोपे साधन म्हणजे, मी आणि माझे बाबा. हे स्मरण, तुम्हाला सहज योगी, यशाचे मूर्त स्वरूप आणि बंधनातून मुक्त बनवते.

बोधवाक्य:-
खरे सोने बनणे म्हणजे मी आणि माझे, च्या अशुध्दतेला नष्ट करणे होय.

मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य

जे लोक, हे गीत गातात, हे गीतेचे भगवान, तुमचे वचन पूर्ण करण्यासाठी या. आत्ता स्वत: गीतेचे भगवान, आपले कल्पपुर्व दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आले आहेत आणि म्हणतात, हे मुलांनो जेव्हा भारताची मोठी धर्मग्लानी होईल, तेव्हा माझे वचन पूर्ण करण्यासाठी, मी आवश्य येतो. आता माझे येणे म्हणजे मी काही युगे-युगे येतो, असे नाही. सर्व युगात धर्मग्लानी होत नाही, धर्माची निंदा असते, कलियुगात, तर परमात्मा कलियुगाच्या शेवटी येतात. तर कलियुग पुन्हा प्रत्येक कल्पात येते, म्हणून परमात्मा प्रत्येक कल्पात जरुर येतात. एका कल्पात चार युगे असतात. त्यालाच कल्प म्हणतात. अर्धा कल्प, सतयुग त्रेता मध्ये सतोगुण सतोप्रधान आहेत, तिथे परमात्माला येण्याची गरज नाही आणि द्वापर युगापासून मग इतर धर्मांची सुरुवात होते, बाकी त्यावेळी पण इतकी धर्माची ग्लानी होत नाही. तर यामुळे सिध्द होते की, परमात्मा तिन्ही युगात येत नाहीत. बाकी राहिले कलियुग, त्याच्या शेवटी परमात्मा येतात आणि अधर्माचा नाश करून, खरा धर्म स्थापन करतात. जर ते द्वापर युगात आले असते, तर द्वापर नंतर सतयुग आले असते, मग कलियुग कसे आले ? अशाप्रकारे परमात्मा ने घोर कलियुगाची स्थापना केली, असे तर म्हणता येणार नाही, म्हणून भगवंत म्हणतात की, मी एक आहे आणि अधर्माचा किंवा कलियुगाचा विनाश करुन, सुवर्णयुगाची स्थापना करतो, तर माझ्या आगमनाची वेळ संगम आहे. अच्छा.