10-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही राजयोग अभ्यासाद्वारे आपल्या सुखधामला व्हाया शांतीधाम जाता,हे तुमचे मुख्य उद्देश आहे,हे कधी विसरायचे नाही"

प्रश्न:-
तुम्ही मुलं साक्षी होऊन या वैश्विक नाटकांमधील कोणते दृश्य पाहतात?

उत्तर:-
या वेळेत वैश्विक नाटकामध्ये एकूणच दुःखाचे दृश्य आहेत.जरी कोणाला सुख असेल,ते पण अल्पकाळाचे,कागविष्टा समान आहे. बाकी तर दुःखच दुःख आहे.तुम्ही मुलं आत्ता प्रकाशामध्ये आले आहात.तुम्ही जाणता सेकंद सेकंद बेहद्द सृष्टीचे चक्र फिरत राहते,एक दिवस दुसऱ्या दिवसाशी मिळू शकत नाही.साऱ्या दुनियेचे कार्य बदलत राहते,नवीन दृश्य येत राहतात.

ओम शांती।
दोनदा ओम शांती. एक- बाबा स्वधर्मा मध्ये स्थिर आहेत,दुसरे म्हणजे मुलांना पण म्हणतात,आपल्या स्वधर्मा मध्ये स्थिर रहा आणि पित्याची आठवण करा.असे दुसरे कोणी मनुष्य शकत नाही की,तुम्ही स्वधर्मा मध्ये स्थिर राहा.तुम्हा मुलांना बुद्धीमध्ये निश्चय आहे,निश्चय बुद्धी विजयंती,तेच विजय मिळवतील. कोणता विजय मिळवतील?शिव पित्याच्या वारशाचा.स्वर्गा मध्ये जाणे, हे आहे शिवपित्याचा वारसा मिळवणे,बाकी पदासाठी पुरुषार्थ जरूर करायचा आहे.स्वर्गा मध्ये तर जरुर जायचे आहे.मुलं जाणतात ही पतित दुनिया आहे.अनेक दुःख येणार आहेत.या नाटकाच्या चक्राला तुम्हीच जाणतात.अनेक वेळेस बाबा आले आहेत,पावन बनवून,सर्व आत्म्यांना मच्छरा सारखे घेऊन जाऊन,परत स्वतः निर्वाण धाम मध्ये निवास करतील.मुलं पण जातील. तुम्हा मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे.राजयोग अभ्यासाद्वारे आम्ही आपल्या सुखधाम व्हाया शांतीधाम जाऊ.हे तुमचे मुख्य लक्ष आहे.ते विसरायला नाही पाहिजे.तुम्ही रोज रोज ऐकता.तुम्ही समजता आम्हाला पतिता पासून पावन बनण्यासाठी बाबा शिकवत आहेत.पावन बनण्याचा सहज उपाय आहे आठवण करणे.ही पण नवीन गोष्ट नाही.असे लिहिले आहे,भगवंतांनी राजयोग शिकवला,फक्त ही चूक केली आहे,जे कृष्णा चे नाव लिहिले आहे.असे पण नाही,मुलांना जे ज्ञान मिळत आहे,ते गीते शिवाय दुसऱ्या कोणत्या ग्रंथांमध्ये असेल?मुलं जाणतात,कोणत्याही मनुष्याची महिमा नाही,जशी शिव पित्याची आहे.शिव पिता आले नाही तर सृष्टीचे चक्र फिरणार नाही.दुःखधाम, पासून सुखधाम कसे बनेल?सृष्टीचे चक्र तर फिरायचे आहे.बाबांना पण जरूर यायचे आहे.बाबा येतात आणि सर्वांना घेऊन जातात,परत चक्र फिरत राहते.बाबा आले नाही तर कलियुगा पासून सतयुग कसे बनेल? बाकी या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.राजयोग गिते मध्येच आहे.जर समजतील भगवान आबूमध्ये आले तर,अनेक भेटण्यासाठी येतील. संन्याशांची पण इच्छा असते भगवंतांना भेटावे.पतितपावनला आठवण करतात,परत जाण्यासाठी. आता तुम्ही मुलं पद्मापदम भाग्यशाली बनत आहात.तेथे खूप सुख असते.नवीन दुनिया मध्ये जो देवी-देवता धर्म होता,आता नाही. बाबा दैवी राज्याची स्थापना,ब्रह्मा द्वारे करतात.हे तर स्पष्ट आहे.तुमचे मुख्य उद्देशच हे आहे.यामध्ये संशयाची गोष्ट नाही.पुढे चालून तुम्ही समजतात,राजधानी ची स्थापना जरुर होणार आहे.आदी सनातन देवी देवता धर्म आहे.जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये राहतात,तर यांचे नाव भारतच राहते,परत जेव्हा तुम्ही नरकामध्ये येतात,तर हिंदुस्तान नाव पडते.येथे तर दुःखच दुःख आहे.ही सृष्टी बदलत राहते,परत स्वर्गामध्ये सुखधाम आहे.हे ज्ञान तुम्हा मुलांनाच आहे.दुनिया मध्ये मनुष्य काहीच जाणत नाहीत.बाबा म्हणतात आता अज्ञान अंधाराची रात्र आहे.रात्री मध्ये मनुष्य धक्के खात राहतात.तुम्ही मुलं ज्ञानाच्या प्रकाशात आले आहात.ते पण साक्षी होऊन बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. सेकंद सेकंद बेहद्द सृष्टीचे चक्र फिरत राहते.एक दिवस दुसऱ्या दिवसाशी मिळू शकत नाही. साऱ्या दुनियेचे कार्य बदलत राहते. नवीन दृश्य येत राहतात.यावेळेत एकूणच दुःखाचे दृश्य आहेत.जरी सुख असेल तेही,कागविष्टा समान आहे.बाकी तर दुःखच दुःख आहे.या जन्मामध्ये जरी सुख मिळाले,परत दुसऱ्या जन्मामध्ये दुःख आहे.आता तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये राहते, आम्ही आपल्या घरी जात आहोत. पावन बनण्यासाठी कष्ट करायचे आहेत.श्रीलक्ष्मी-नारायण बनण्यासाठी श्री श्री ने श्रीमत दिली आहे.वकील मत देतील,वकील बनण्यासाठी.आता बाबा म्हणतात श्रीमता द्वारे,तुम्ही असे लक्ष्मीनारायण सारखे बना.स्वतःला विचारायला पाहिजे,माझ्यामध्ये काही अवगुण तर नाहीत.या वेळेतच गायन करतात, मज निर्गुण मध्ये काहीच गुण नाहीत, तुम्ही दया करा.बाबा म्हणतात मी कोणावरही दया करत नाही.दया तर प्रत्येकाने स्वतःवरती करायची आहे. हे नाटक बनलेले आहे.बेरहमी रावण तुम्हाला दुःखामध्ये घेऊन येतात.ही पण नाटकांमध्ये नोंद आहे.त्यामध्ये रावणाचा काही दोष नाही.बाबा येऊन फक्त मत देत राहतात.हीच त्यांची दया आहे,बाकी हे रावण राज्य परत पण चालेल.नाटक अनादी आहे, न रावणाचा दोष आहे,न मनुष्यांचा दोष आहे, चक्र तर फिरत राहते.रावणा पासुन मुक्त होण्यासाठी बाबा युक्ती सांगत राहतात.तुम्ही खूप पापत्मा बनले आहात.आता जुनी दुनिया आहे,परत जरूर नवीन दुनिया येईल.चक्र तर फिरेल ना.सतयुग पण परत जरूर येईल.आता संगमयुग आहे. महाभारत लढाई पण या वेळेतील आहे.विनाशकाले विपरीत बुद्धि विनाशंती हे होणारच आहे.आम्ही विजयी स्वर्गाचे मालक बनू बाकी सर्व असणार नाहीत.तुम्ही हे पण समजता,पवित्र बनल्या शिवाय देवता बनणे कठीण आहे.आता बाबा कडून श्रेष्ठ देवता बनण्यासाठी श्रीमत मिळत आहे.अशी मत परत कधी मिळू शकत नाही.श्रीमत देण्याची त्यांची भूमिका पण संगमयुगा मध्येच आहे.दुसऱ्या कोणा मध्ये तर,हे ज्ञानच नाही.भक्ती म्हणजे भक्ती,त्याला ज्ञान म्हणत नाहीत. आत्मिक ज्ञान ज्ञानसागरच ज्ञान देतात,त्यांची महिमा ज्ञानाचे सागर,सुखाचे सागर अशी आहे.बाबा पुरुषार्थाच्या युक्त्या सांगत राहतात,हा विचार यायला पाहिजे की,आता नापास झालो तर,कल्पातंर नापास खूप होऊ.खुप आघात होईल.श्रीमतावरती न चालल्यामुळे आघात होतो.ब्राह्मणांच्या झाडाची वृध्दी पण जरूर व्हायची आहे.झाडाची वृध्दी पण इतकी होईल,जेवढे देवतांचे झाड आहे.तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे आणि करून घ्यायचा आहे.कलम लागत राहते.झाड मोठे होत राहील. तुम्ही जाणता,आता आपले कल्याण होत आहे.पतीत दुनिये पासून पावन दुनिया मध्ये गेल्यामुळे कल्याण होते. आत्ता तुम्हा मुलांच्या बुद्धीचे कुलूप उघडत आहे.बाबा बुद्धीवानांची बुध्दी आहेत ना.आता तुम्ही समजत आहात,परत पुढे चालून पहा कोणाकोणाच्या बुध्दीचे कुलूप उघडत जाईल.हे पण नाटक चालत राहते,परत सतयुगा पासून त्याची पुनरावृत्ती होईल.लक्ष्मी-नारायण जेव्हा सिंहासनावरती बसतील,तेव्हा पासून नवीन दुनियेचे इसवी सन सुरू होते.तुम्ही लिहितात १-१-१ पासून १२५० वर्षापर्यंत स्वर्ग,खूप स्पष्ट आहे.सत्यनारायण ची गोष्ट आहे ना. अमरनाथची कथा पण आहे.तुम्ही आता खरीखुरी अमरनाथ ची कथा ऐकता,परत त्याचे गायन होत राहते.हे सन इत्यादी सर्व या संगमयुगा मधील आहेत.शिव बाबांची जयंती म्हणजे महाशिवरात्री क्रमांक एकचे पर्व किंवा सण आहे.कलियुगाच्या नंतर जरूर बाबांना दुनियाचे परिवर्तन करण्यासाठी यावे लागते.चित्रांना कोणी चांगल्यारितीने पाहिले,हे खूप स्पष्ट बनवले आहेत,पुर्ण हिशेब आहे.तुम्हाला ही खात्री आहे, जितका पुरुषार्थ कल्पापूर्वी केला होता,तेवढा जरूर करतील.साक्षी होऊन दुसऱ्यांचा पण पुरुषार्थ पाहतील.स्वतःच्या पुरुषार्थाला पण जाणतात.तुम्ही पण जाणतात. विद्यार्थी आपल्या अभ्यासाला जाणत नसतील काय?मन खात राहते,जरूर आम्ही या विषयांमध्ये खूप कच्चे आहोत,परत नापास होतात. परीक्षेच्या वेळेत जे कच्चे असतील त्यांचे हृदय धडकत राहील.तुम्ही मुलं पण साक्षात्कार कराल परंतु नापास झाले तर काय करू शकणार? शाळेमध्ये नापास झाल्यानंतर संबंधी इत्यादी नाराज आणि शिक्षक पण नाराज होतात.ते समजतात आमच्या शाळेमधून कमी विद्यार्थी पास झाले, तर समजले जाते,शिक्षक एवढे चांगले नाहीत,म्हणून कमी पास झाले आहेत.बाबा पण जाणतात सेवा केंद्रा वरती कोण-कोणते चांगले शिक्षक आहेत,कसे शिकवतात.कोण कोण चांगल्या रितीने शिकवून घेऊन येतात.सर्व माहिती पडते.बाबा म्हणतात,जे चांगले विद्यार्थी त्यांना घेऊन या.लहान मुलांना घेऊन आले तर त्यांच्यामध्ये मोह राहतो.एकटे यायला पाहिजे,तर बुद्धी चांगल्या रीतीने ग्रहण करू शकेल.मुलांची पालना तर तेथे पण होत राहते.

बाबा म्हणतात की जुनी दुनिया,तर कब्रस्तान होणार आहे. नवीन घर बनवतात तर बुद्धी मध्ये राहते ना,आमचे नवीन घर बनत आहे.धंदा इत्यादी करत राहतात परंतु बुद्धी नवीन घराकडे राहते.शांत बसणार नाहीत ना.ती हद्दची गोष्ट आहे,ही बेहद्दची गोष्ट आहे.प्रत्येक कार्य करताना बुध्दीत राहतेकी आता आम्ही घरी जात आहोत,परत आपल्या राजधानीमध्ये येऊ तर, खुशी राहील.बाबा म्हणतात आपल्या मुलांची संभाळ पण करायची आहे परंतु बुद्धी तेथे लागून राहावी.आठवण न केल्यामुळे पण पवित्र बनू शकत नाहीत.आठवणी द्वारे पवित्र,ज्ञानाद्वारे कमाई होते.येथे तर सर्व पतित आहेत.दोन किनारे आहेत.बाबांना नावाडी पण म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत.तुम्ही जाणता,बाबा सतयुगाच्या किनाऱ्या कडे घेऊन जातात.आत्मा जाणते, आम्ही आता बाबांची आठवण करून खूप जवळ जात आहोत.नावाडी नाव पण अर्थ सहित ठेवले आहे ना.ही सर्व महिमा करतात,माझी नाव किनाऱ्याला लावा.सतयुगा मध्ये असे म्हणतील काय?कलियुगा मध्येच बोलवत राहतात.तुम्ही मुलं समजतात, बेसमजला तर येथे घेऊन यायचे नाही.बाबांची मनाई आहे,निश्चय नाहीतर कधीच घेऊन यायला नाही पाहिजे.काहीच समजणार नाहीत. प्रथम तर सात दिवसाचे राजयोगाचे प्रशिक्षण द्या.कोणाला तर दोन दिवसांमध्ये पण ज्ञानाचा बाण लागतो.अच्छा ज्ञानाचा बाण लागला परत ज्ञान थोडेच सोडायचे आहे.ते म्हणतील आम्ही आणखी सात रोज शिकू.तुम्ही लगेच समजाल,हे या कुळाचे आहेत.जे हुशार असतील ते कोणत्या गोष्टीची काळजी करणार नाहीत.अच्छा एक नोकरी सुटली,तर दुसरी मिळेल.जी मुलं दिलवाले असतात,त्यांची नोकरी इ.सुटत नाही. स्वतःच आश्चर्य खात राहतात.मुली म्हणतात आमच्या पतीच्या बुद्धीचे कुलूप उघडा.बाबा म्हणतात,तुम्ही मला सांगू नका.तुम्ही योग बळा मध्ये राहून परत ज्ञान द्या.बाबा थोडेच बुद्धीचे कुलप उघडतील,परत तर सर्व असे धंदे करत राहतील.जे रिती रिवाज निघतात,त्याला पकडतात. कोणत्या गुरु द्वारे कुणाला फायदा झाला तर, त्यांच्या पाठीमागे लागतात.नवीन असतात तर त्यांची महिमा होते ना,परत त्यांचे अनेक शिष्य बनतात,म्हणून या सर्व गोष्टींना पाहिचे नाही, तुम्हाला स्वत:ला पाहिचे आहे.स्वतःला आम्ही किती शिकवत आहोत? हे तर बाबा सविस्तर मध्ये जसे मुलांसोबत गोष्टी करत राहतात.बाकी फक्त बाबांची आठवण करा असे सांगणे,तर घरी पण राहून करू शकता, परंतु ज्ञानाचे सागर आहेत तर,जरूर ज्ञान पण देतील ना.मुख्य गोष्ट मनामनाभव आहे.सोबत सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य पण समजवतात. यावेळेस चित्र पण खूप चांगले चांगले निघाले आहेत.त्यांचा अर्थ पण बाबा समजवतात.विष्णूच्या नाभीद्वारे ब्रह्माला दाखवले आहे.त्रिमूर्ती पण आहेत,परत विष्णूच्या नाभीद्वारे ब्रह्मा हे काय आहे?बाबा स्पष्ट करतात,हे बरोबर आहे की चुकीचे आहे? चित्र पण पुष्कळ बनवत राहतात ना.काही काही ग्रंथांमध्ये चक्र पण दाखवले आहे परंतु कोणी किती अवधी लिहिला आहे,कोणी किती लिहिले आहे.अनेक मतं आहेत ना.ग्रंथांमध्ये सर्व हद्दच्या गोष्टी लिहिल्या आहेत. बाबा बेहद्दच्या गोष्टी समजवतात,की साऱ्या दुनिया मध्ये रावण राज्य आहे.हे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, आम्ही कसे पतित बनलो परत पावन कसे बनत आहोत,नंतर अनेक धर्म येतात.विविधता आहे ना.एक दुसऱ्याशी मिळू शकत नाही.एक सारखे चेहरे पण दोन होऊ शकत नाहीत.हे पूर्वनियोजित नाटक आहे, त्याची पुनरावृत्ती होत राहते.बाबा मुलांना समजवतात,बाकी थोडा वेळ आहे.स्वतःलाच तपासायचे आहे, आम्ही किती खुशी मध्ये राहतो. आम्हाला कोणतेही विकर्म करायचे नाहीत.मनात वादळ तर येतील ना. बाबा समजवत राहतात मुलांनो, अंतर्मुख होऊन आपली दिनचर्या, चार्ट ठेवा,तर ज्या चुका होतात त्याचा पश्चाताप करु शकाल.हे जसे योगबळा द्वारे आपल्याला माफ करणे आहे ना.बाबा काही क्षमा किंवा माफ करत नाहीत.या वैश्विक नाटकामध्ये क्षमा अक्षरच नाही. तुम्हाला स्वतःसाठी कष्ट करायचे आहेत.पापांचा दंड पण मनुष्य स्वता:च भोगतात.क्षमा ची गोष्ट नाही.बाबा म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट करा.बाबा सांगत राहतात,बाबांना जुन्या रावणाच्या देशांमध्येच बोलतात,येऊन पावन बनवा परंतु मनुष्य समजत नाहीत.ते आसुरी संप्रदाय आहेत,तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात,दैवी संप्रदाय बनत आहात.पुरुषार्थ पण मुलं क्रमानुसार करत राहतात,परत म्हणतात त्यांच्या भाग्य मध्ये एवढेच आहे.आपला वेळ वाया घालवत राहतात,परत जन्मजन्मांतर कल्पकल्पां तर उच्च पद मिळवू शकत नाहीत.स्वतःचे नुकसान करायला नाही पाहिजे, कारण आत्ताच जमा होते,परत तर नुकसान करत राहतात.रावण राज्या मध्ये खूप नुकसान होत राहते,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) अंतर्मुखी बनून स्वतःला तपासायचे आहे,ज्या पण चुका होतात,त्याचा मनापासून पश्चाताप करून योगबळा द्वारे माफ करायचे आहे.स्वतःसाठी कष्ट घ्यायचे आहेत.

(२) बाबांचे जे श्रीमत मिळत आहे, त्यावरती पूर्ण रितीने चालून, स्वतःवरती स्वतः दया करायची आहे. साक्षी होऊन स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या पुरुषार्थला पाहिचे आहे. कधीच आपले नुकसान करायचे नाही.

वरदान:-
निरंतर आठवणी द्वारे अविनाशी कमाई जमा करणारे सर्व खजान्याचे अधिकारी भव.

निरंतर आठवणी द्वारे प्रत्येक पाऊल कमाई जमा करत रहा,तर सुख, शांती,आनंद,प्रेम सर्व खजाण्याच्या अधिकाराचा अनुभव करत राहाल. कोणतेही कष्ट अनुभव होणार नाहीत.संगमयुगामध्ये ब्राह्मणाला कोणतेही कष्ट होऊ शकत नाहीत. जर काही कष्ट होतात,तेही बाबांची आठवण करुन देण्यासाठी.जसे गुलाबाच्या फुला सोबत काटे,त्याचे संरक्षणाचे साधन बनतात,तसेच हे कष्ट आणखीनच बाबांची आठवण देण्यासाठी निमित्त बनतात.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- परमात्म श्रीमताच्या आधारावर कर्म रुपी बीजाला शुभ संकल्पाचे पाणी मिळत राहिले तर बीज शक्तिशाली बनेल.