10-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही आत्मिक पित्याद्वारे नवनवीन आत्मिक गोष्टी ऐकत आहात,तुम्ही जाणतात जसे आम्ही आत्मा आपले रूप बदलून आलो आहोत,तसेच बाबा पण आले आहेत"

प्रश्न:-
जर लहान-लहान मुलं बाबांच्या ज्ञानावर चांगल्या प्रकारे लक्ष देतील, तर कोणती पदवी मिळवू शकते?

उत्तर:-
अध्यात्मिक नेत्याची पदवी मिळवू शकतात.जर कोणत्या लहान मुलांनी हिम्मतीचे काम करून दाखवले,बाबा जे ऐकवतात त्यावरती लक्ष दिले आणि दुसऱ्यांना समजून सांगितले तर त्यांना सर्व खूप प्रेम करतील.बाबा चे नाव प्रसिद्ध होईल.

गीत:-
छोड भी दे सिंहासन,तू धरती पर .

ओम शांती।
मुलांनी बोलवले बाबानी प्रतिसाद दिला.प्रत्यक्षामध्ये मुलं काय करतात,म्हणतात की बाबा तुम्ही परत रावण राज्यांमध्ये या.असे म्हणतात ना,परत मायेची सावली पडली आहे.माया रावणाला म्हटले जाते.तर पुकारतात रावण राज्य आले आहे,म्हणून आता परत या.रावण राज्यांमध्ये आम्ही खूप दुःखी आहोत.आम्ही खूप दुःखी, पाप आत्मा बनलो आहोत.आता बाबा प्रत्यक्षामध्ये आहेत.मुलं जाणतात ,परत तीच महाभारत लढाई उभी आहे.बाबा ज्ञान आणि राजयोग शिकवत आहेत.बोलवतात पण,हे निराकार परमपिता परमात्मा, निराकारी वतन मधून येऊन साकारी रूप घ्या,रूप बदला.बाबा समजवतात,तुम्ही येथे राहणारे आहेत,ब्रह्म तत्व किंवा निराकारी दुनिया मध्ये तुम्ही पण रूप बदलले आहे ना.बाबा समजवतात,तुम्ही तेथे राहणारे आहात,ब्रह्म महतत्त्व किंवा निराकारी दुनिया मध्ये.बाबा समजवतात तुम्ही ब्रह्म तत्व किंवा निराकारी दुनिया मध्ये राहणारे आहात.तुम्ही रूप बदलले आहे.येथे कोणीही जाणत नाहीत,जे आत्मा निराकार आहेत,ते येऊन साकारी शरीर धारण करतात,ती निराकारी दुनिया आहे,ही साकारी दुनिया आणि ती आकारी दुनिया आहे.ती वेगळी आहे.तुमच्या बुद्धी मध्ये आहे, आम्ही शांतीधाम किंवा निर्वाणधाम मधून येतो.बाबांना जेव्हा नवीन रचना,रचायची असते,तर सूक्ष्मवतनची स्थापना करतील ना. सूक्ष्मवतन मध्ये आत्ता तुम्ही जाऊ शकता,परत कधीही जाऊ शकत नाही.प्रथम तुम्ही या सूक्ष्म वतन मधून येत नाहीत, सरळ येता.आत्ता तुम्ही सूक्ष्म वतन मधून येऊ जाऊ शकता. पैदल इत्यादी जाण्याची गोष्ट नाही.हा तर तुम्हा मुलांना साक्षात्कार होतो.मुळ वतनचा पण साक्षात्कार होऊ शकतो परंतु जाऊ शकत नाहीत.वैकुंठाचा साक्षात्कार होऊ शकतो,परंतु जाऊ शकत नाहीत, जोपर्यंत संपूर्ण पवित्र बनले नाहीत. तुम्ही असे म्हणू शकता की,आम्ही सूक्ष्मवतन मध्ये जाऊ शकतो.तुम्ही साक्षात्कार करू शकतात,शिवबाबा, दादा आणि तुम्ही मुलं आहात.तुम्ही मुलं कसे नव नवीन गोष्टी ऐकत आहात.या गोष्टी दुनिया मध्ये कोणी जाणत नाहीत.जरी म्हणतात निराकारी दुनिया परंतु हे माहीत नाही की,ती कशी असते.प्रथम तर आत्म्याला जाणत नाहीत, तर निराकारी दुनियेला कसे जाणू शकतात.बाबा प्रथम येऊन आत्म्याची अनुभूती करवतात,तुम्ही आत्मा आहात परत रूप बदलले आहे,म्हणजेच निराकारी दुनिया मधून साकार मध्ये आले आहात.

आता तुम्ही समजता आमची आत्मा ८४ जन्म कशी घेते,ती सर्व भूमिका आत्म्या मध्ये नोंदलेली आहे.प्रथम या गोष्टी ऐकवत होते.बाबा म्हणतात,आता तुम्हाला रहस्ययुक्त रमणीक गोष्टी ऐकवतो,अगोदर तुम्ही जाणत नव्हते,आत्ता जाणातात. नवनवीन गोष्टी बुद्धीमध्ये येतात म्हणून दुसऱ्यांना पण समजावू शकतात.दिवसेंदिवस हे ब्राह्मणांचे झाड वाढत जाते.हेच परत दैवी झाड बनायचे आहे.ब्राह्मणाची वृद्धी होत राहते,दिसायला लहान दिसून येते,जसे जगाच्या नकाशामध्ये भारत दाखवतात,तर किती लहान दिसून येतो.वास्तव मध्ये भारत खूप मोठा आहे.तसेच ज्ञानासाठी म्हटले जाते, मनमनाभव,म्हणजे एक परमात्म्याची आठवण करा.बीज खूप लहान आहे,झाड खूप मोठे आहे.तर हे ब्राह्मण कुळ पण लहान आहे,वृद्धी होत राहते.तुमच्या बुद्धीमध्ये आहे आम्ही या वेळेत ब्राह्मण आहोत, परत देवता बनू.८४ जन्माची शिडी तर खूप चांगली आहे.मुलं समजावू शकतात,जे ८४ जन्म घेतात,तेच येऊन समजतात,परत कोणी ८४ घेत असतील,कोणी ८० पण घेत असतील. हे तर समजतात आम्ही या दैवी कुळाचे आहोत.आम्ही सूर्यवंशी घराण्याचे बनू,जर नापास झाले तर परत उशीरा येऊ.सर्व एकत्रित येणार नाहीत.जरी खूप ज्ञान घेत राहतात, परंतु एकत्र येऊ शकत नाहीत.एकत्र जातील परंतु येतील थोडे-थोडे,ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे.सर्व कसे एकत्र ८४ जन्म घेतील.बाबांना बोलवतातच बाबा परत येऊन गीतेचे ज्ञान ऐकवा.हे तर सिद्ध होते,जेव्हा महाभारत लढाई होते,त्या वेळेत येऊन गीता ज्ञान ऐकवतात, त्यालाचच राजयोग म्हटले जाते.आता तुम्ही राजयोग शिकत आहात.कल्प-कल्प पाच हजार वर्षानंतर,बाबा आम्हाला ज्ञान देतात, सत्यनारायणाची कथा ऐकवतात.

हे कुठून आले,परत कुठे गेले,ते जाणत नाहीत.बाबा समजवतात मुलांनो,ही रावणची सावली,जी पडली आहे,आत्ता पुर्वनियोजीत नाटकानुसार रावण राज्य नष्ट होणार आहे. सतयुगामध्ये राम राज्य असते आणि या वेळेत रावण राज्य आहे. आता तुम्ही समजता आमच्या कडे जे ज्ञान आहे,ते दुनिया मध्ये कोणाजवळ नाही.आमचा हा नवीन अभ्यास क्रम नवीन दुनिये साठी आहे. गीतेमध्ये कृष्णाचे नाव लिहिले आहे,ही जुनी गोष्ट झाली ना,आता तुम्ही नवीन गोष्टी ऐकत आहात.ते म्हणतात,हे तर कधी ऐकले नाही, शिव भगवानुवाच,आम्ही तर कृष्ण भगवानुवाच ऐकत होतो.तुम्ही नवीन दुनिये साठी सर्व काही नवीन ऐकत आहात.हे सर्वच जाणतात की, भारत प्राचीन आहे परंतु कधी होता,या लक्ष्मीनारायणाचे राज्य कसे चालले, यांनी कसे राज्य मिळवले? परत कोठे गेले?हे कोणाच्याच बुद्धी मध्ये येत नाही.तर काय झाले? जे यांचे राज्य नष्ट झाले.कोणी जिंकले काहीच समजत नाहीत.ते तर लोक लाखो वर्ष म्हणतात,हे तर होऊ शकत नाही की,लाखो वर्षे राज्य केले असेल,परत तर सूर्यवंशी राजे पण पुष्कळ होतील.कोणाचे नाव तर नाही,१२५० वर्षा बद्दल कोणाला माहित नाही,परत लक्ष्मीनारायणचे राज्य कोठे गेले,कुठपर्यंत चालले, हे कोणालाच माहीत नाही.तर लाखो वर्षाची माहिती कशी होईल. कोणाची बुद्धी काम करत नाही. आता तुम्ही लहान लहान मुलं लगेच समजावू शकतात.हे तर खूप सहज आहे.भारताची गोष्ट आहे.सतयुग त्रेतामध्ये भारतवासी राजे होते. वेगवेगळे चित्र पण आहेत.येथे तर हजारो वर्ष म्हणतात,बाबा तर म्हणतात ही तर पाच हजार वर्षाची गोष्ट आहे.आज पासून पाच हजार वर्ष पूर्व लक्ष्मीनारायणाचे राज्य होते, त्यांचे राजघराणे होते,परत पुनर्जन्म घ्यावे लागतात.लहान मुली हे ज्ञान थोडे जरी समजून सांगतील,तर समजतील यांनी तर खूप चांगला अभ्यास केला आहे.हे अध्यात्मिक ज्ञान,अध्यात्मिक पित्याशिवाय दुसऱ्या कोणाजवळ नाही.तुम्ही म्हणाल,आम्हाला अध्यात्मिक पित्याने येऊन सांगितले आहे,आम्ही आत्मा शरीराद्वारे ऐकतो.आत्माच म्हणते,की आम्ही अमका बनतो.मनुष्य आत्म अनुभूती करत नाहीत.आम्हाला बाबांनी अनुभूती करवली आहे.आम्ही आत्मा पूर्ण ८४ जन्म घेतो.अशा गोष्टी सन्मुख समजवल्या तर म्हणतील यांच्याजवळ तर खूप चांगले ज्ञान आहे.ईश्वर तर ज्ञानाचे सागर आहेत ना,गायन पण करतात ईश्वर ज्ञानाचे सागर,दयावान,मुक्तीदाता,मार्गदर्शक आहेत,परंतु कोठे घेऊन जाणार आहेत,हे कोणीही जाणत नाहीत.हे मुलं समजावू शकतात.अध्यात्मिक पिता ज्ञानाचे सागर आहेत,त्यांनाच दयावान म्हटले जाते.जेव्हा मनुष्य खूप दु:खी होतात,तेव्हा येऊन रावणाच्या राज्यापासून मुक्त करतात,त्यांना ईश्वरीय पिता म्हटले जाते.नरकाला रावण राज्य म्हटले जाते,हे ज्ञान कोणाला ऐकवतील,तर म्हणतील,हे सर्वांना ऐकवा,परत धारणा पण खूप चांगली पाहिजे. प्रदर्शनीच्या चित्राचे मासिक पण आहे आणि समजतील याच्यावर खूप सेवा होऊ शकतो.

ही मुलगी (जयंती बहीण),लंडनमध्ये आपल्या शिक्षकाला समजावू शकते,ती लंडनमध्ये ही सेवा करू शकते.दुनिया मध्ये फसवणूक तर खूप आहे ना.रावणाने एकदम सर्वांना ठग बनवले आहे.मुलं विश्वाच्या इतिहास-भूगोलला समजावू शकतात.लक्ष्मीनारायणाचे राज्य किती वेळ चालले,परत अमक्या सवंत पासून इस्लामी,बौध्दी ख्रिश्चन येतात.वृद्धी होत होत विविध धर्माचे झाड खूप मोठे होते.अर्ध्या कल्पाच्या नंतर,दुसरे धर्म येतात. अशा गोष्टी बसून ऐकवल्या तर, ऐकणारे म्हणतील हे तर आध्यात्मिक नेते आहेत,यांच्यामध्ये अध्यात्मिक ज्ञान आहे.ही परत म्हणेल,हे ज्ञान तर भारतामध्ये मिळत आहे. ईश्वरीय पिता देत आहेत,ते बीजरूप आहेत.हे उलटे झाड आहे,बीज ज्ञानसंपन्न असते ना. बीजाला झाडाचे ज्ञान तर असते ना. हे विविध धर्माचे झाड आहे.भारताचा दैवी धर्म याला म्हटले जाते.प्रथम लक्ष्मी-नारायणचे राज्य असते,परत राम-सिता चे राज्य अर्धा कल्प चालते,परत इस्लामी बुद्धी इत्यादी झाडाची वृद्धी होत राहते.असे जाऊन ही मुलगी भाषण करेल आणि समजून सांगेल,की हे वृक्ष कसे इमर्ज होते.हे सृष्टीचे चक्र कसे फिरते,आम्ही समजावू शकतो. परदेशामध्ये तर दूसरे कोणी नाहीत. ही जयंती मुलगी जाऊन समजाऊन सांगेल की आत्ता लोह युगाच अंत आहे,सुवर्णयुग येणार आहे,तर ते लोक खूप खुश होतील.बाबा युक्ती सांगत राहतात,त्यावरती ध्यान द्यायला पाहिजे. लहान मुलांना खूप मान मिळेल.लहान कोणी हिमतीचे कार्य करतात,तर त्यांना खूप प्रेम मिळेल.पित्याला वाटते की,अशी मुलं यामध्ये लक्ष देतील,तर आध्यात्मिक नेते बनतील. अध्यात्मिक ईश्वरीय पिताच सन्मुख ज्ञान देत आहेत.कृष्णाला ईश्वरी पिता म्हणने चुकीचे आहे.ईश्वर तर निराकर आहेत.आम्ही सर्व आत्मा भाऊ-भाऊ आहोत,ते पिता आहेत.सर्व लोहयुगा मध्ये जेव्हा दुःखी होतात,तेव्हा बाबा येतात. जेव्हा लोहयुग असते,तेव्हा बाबा सुवर्णयुग स्थापन करण्यासाठी येतात. भारत प्राचीन सुखधाम होता,स्वर्ग होता, खूप थोडे मनुष्य होते.बाकी इतके सर्व आत्मे कोठे होते,ते शांतीधाम मध्ये होते ना.तर असे समजावून सांगायला हवे, यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही,ही तर कहाणी आहे. कहाणी आनंदाने ऐकवली जाते. विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ति कशी होते, याला आपण कहाणी पण म्हणू शकतो,ज्ञान पण म्हणू शकतो.तुम्हाला ही पक्की आठवण राहायला पाहिजे.बाबा म्हणतात,माझ्या आत्म्या मध्ये सर्व झाडाचे ज्ञान आहे,ज्याची मी पुनरावृत्ती करतो.ज्ञान सागर बाबा मुलांना ज्ञान देत आहेत.या मुलीने जाऊन ज्ञान दिले तर म्हणतील दुसऱ्यांना पण बोलवा.तुम्ही सांगू शकता, होय,बोलवू शकतो,कारण लोक जाणू इच्छितात की,भारताचा प्राचीन राजयोग काय होता,ज्याद्वारे भारत स्वर्ग बनला.कोणी समजावून सांगावे? आता संन्यासी काय ऐकवतील? अध्यात्मिक ज्ञान फक्त गीतेमध्ये आहे.तर ते जाऊन गिता च ऐकवतील.गीता खूप वाचतात,कंठ पण करतात.काय हे अध्यात्मिक ज्ञान आहे? हे तर मनुष्यानी त्यांच्या नावावरती बनवले आहे.अध्यात्मिक ज्ञान तर कोणी मनुष्य देऊ शकत नाहीत.तुम्ही आत्ता फरक समजतात,त्या गीतेमध्ये आणि बाबा जे ज्ञान ऐकवतात,त्यामध्ये रात्रं दिवसाचा फरक आहे.गीता ज्ञान पित्याने दिले आणि नाव घातले कृष्णाचे.सतयुगा मध्ये कृष्णाला हे ज्ञान नसते.ज्ञानाचे सागर तर एकच पिता आहेत.खूप अटपटी गोष्टी आहेत, कृष्णाची आत्मा जेव्हा सतयुगात होती,तेव्हा हे ज्ञान नव्हते, सूत एकमेकांत गुंतले आहे.हे सर्व परदेशांमध्ये जाऊन नाव काढू शकतात,भाषण करू शकतात. तुम्ही सांगा,विश्‍वाच्या इतिहास भूगोलाचे ज्ञान आम्ही देऊ शकतो. ईश्वर स्वर्गाची स्थापना कसे करतात, स्वर्ग परत नर्क कसा बनतो,ते ही आम्ही आपल्याला समजावून सांगू शकतो.असे बसून लिहा,परत पाहा,काही मुद्दे विसरणार नाहीत, परत आठवण करून लिहा.असा अभ्यास करणारे खूप चांगले लिहू शकतात.चांगले समजावले तर प्रसिद्ध बनाल.येथून पण बाबा कोणाला बाहेर पाठवू शकतात.हे जाऊन समजावले,तर खूप चांगले आहे.सात दिवसांमध्ये पण खूप हुशार बनू शकतात.बुद्धीमध्ये धारणा आहे बीज आणि झाड,सविस्तर ज्ञान आहे.चित्रावर खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकता.सेवा करण्याची आवड पाहिजे. खुप उच्च पद मिळू शकते. ज्ञान तर खूप सहज आहे.ही छी छी जुनी दुनिया आहे. स्वर्गाच्या तुलनेत ही जुनी दुनिया जसे शेणा सारखी आहे,याचा दुर्गंध येतो.ती सोन्याची दुनिया आहे,ही शेणाची दुनिया आहे.तुम्ही मुलं जाणतात,आत्ता आम्ही हे शरीर सोडून,राजकुमार राजकुमारी बनू.अशाप्रकारे शाळेमध्ये शिकण्यासाठी जाऊ.तेथे विमान वगैरे असतील आणि त्याचा अपघात पण होणार नाही.हा आनंद मुलांच्या मध्ये राहायला पाहिजे,तर नाराज होणार नाहीत किंवा रडायला येणार नाही.तुम्ही समजता ना,आम्हीच राजकुमार राजकुमारी बनू.तर तुम्हाला मनामध्ये का खुशी राहिली नाही पाहिजे.भविष्यामध्ये अशाप्रकारे शाळेमध्ये जाऊ,हे करू?माहित नाही,मुलं आठवण का विसरतात? खूप नशा चढायला पाहिजे,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या जुन्या शेणा सारख्या दुनियेला बुद्धीने विसरून,नविन दुनियेची आठवण करुन,अपार खुशी व नशेमध्ये राहायचे आहे.कधीही रडायचे नाही.

(२) बाबा जे रहस्ययुक्त गोष्टी ऐकवतात त्यांना धारण करून सर्वांना समजावून सांगायच्या आहेत. अध्यात्मिक नेत्याची पदवी घ्यायची आहे.

वरदान:-
कर्म करत कर्माच्या बंधनापासून मुक्त राहणारे सहज योगी,स्वतः योगी भव.

जे महावीर आहेत,त्यांना साकार दुनियेमध्ये कोणतेही आकर्षण आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही.ते स्वतः एका सेकंदामध्ये अनासक्त आणि बाबांचे प्रिय बनू शकतात.सुचना मिळाल्या कि, शरीरापासून परे अशरीरी,आत्म अभिमानी,बंधनमुक्त,योगयुक्त स्थितीचा अनुभव करणारे,सहज योगी, स्वतः योगी,सदा योगी कर्मयोगी आणि श्रेष्ठ आहेत.ते जेव्हा पाहिजे,जितका वेळ पाहिजे,आपले संकल्प,श्वास,एक प्राणेश्वर बाबाच्या आठवणी मध्ये स्थिर करू शकतात.

बोधवाक्य:-
एक रस स्थितीच्या श्रेष्ठ आसनावर विराजमान राहणेच, तपस्वी आत्म्याची लक्षणं आहेत.