10-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही जेव्हा कोणालाही समजवता किंवा भाषण करतात,तर बाबा-बाबा म्हणून समजून सांगा,बाबांची महिमा करा, तेव्हाच ज्ञानाचा बाण लागेल"

प्रश्न:-
बाबा भारतवासी मुलांना विशेष कोणता प्रश्न विचारतात?

उत्तर:-
तुम्ही भारतवासी मुलं,जे सावकार होते,सर्वगुणसंपन्न,सोळा कला संपुर्ण,देवता धर्माचे होते, तुम्ही पवित्र होते.काम कटारी चालवत नव्हते,खूप धनवान होते, परत तुमचे इतक दिवाळं कसे निघाले? कारण काय आहे?मुलांनो तुम्ही गुलाम कसे बनले?सर्व धन-दौलत कुठे नष्ट केली.तुम्ही विचार करा,तुम्ही पावन पासून पतित कसे बनल?तुम्ही मुलं पण अशा गोष्टी बाबा-बाबा म्हणून दुसऱ्यांना समजून सांगा,तर सहज समजतील.

ओम शांती।
ओम शांती म्हटल्यामुळे बाबांची जरूर आठवण यायला पाहिजे.बाबांचे प्रथम सांगणे आहे मनमनाभव.जरूर अगोदर पण सांगितले होते,तेव्हा तर आत्ता पण म्हणतात ना.तुम्ही मुलं बाबांना जाणतात,जेव्हा कधी तुम्ही सभांमध्ये भाषण करण्यासाठी जातात,ते लोक तर बाबांना जाणत नाहीत,तर त्यांना असे सांगायला पाहिजे की,शिव बाबा म्हणत आहेत.तेच पतित पावन आहेत, जरूर पावन बनवण्यासाठी येथे येऊन समजवतात.जसे बाबा येथे येऊन तुम्हाला सांगतात,हे मुलांनो तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले होते.तुम्ही आदी सनातन देवी-देवता धर्मवासी विश्वाचे मालक होते,तसे तुम्हाला पण बोलायला पाहिजे, बाबा असे म्हणतात.असा कोणाचा भाषण करण्याचा समाचार बाबांकडे आला नाही.शिवबाबा म्हणतात,मला उच्च ते उच्च मानतात,पतित-पावन पण मानतात.मी भारतामध्ये येतो आणि राजयोग शिकवतो,आता तुम्ही माझीच आठवण करा.उच्च ते उच्च पित्याची आठवण करा,कारण मी शिवपिताच दाता आहे.बरोबर भारतामध्ये तुम्ही विश्वाचे मालक होते ना.दुसरा कोणता धर्म नव्हता. बाबा आम्हा मुलांना समजवतात, आम्ही परत आपल्‍याला समजून सांगतो.बाबा म्हणतात,तुम्ही भारतवासी खूप सावकार होते,सर्व गुण संपन्न,१६ कला संपूर्ण देवता धर्माचे होता,तुम्ही पवित्र होते,काम करणारी चालवत नव्हते.खूप धनवान होते,परत बाबा म्हणतात, तुम्ही इतके दिवाळी तुमचे इतके दिवाळं कसे निघाले?कारण माहिती आहे?तुम्ही विश्वाचे मालक होते, आता तुम्ही विश्वाचे गुलाम का बनले?सर्वांकडून कर्ज घेत राहतात, इतके सर्व पैसे कुठे गेले?जसे बाबा भाषण करतात,तसेच तुम्ही पण भाषण करा,तर अनेकांचे आकर्षण होईल.तुम्ही लोक बाबांची आठवण करत नाहीत,तर कोणाला ज्ञानाचा बाण लागत नाही,ती शक्‍ती मिळत नाही.नाही तर तुमचे एकच भाषण ऐकतील,तर कमाल होऊन जाईल. शिव बाबा समजवतात,भगवान तर एकच आहेत,जे दुखहर्ता सुखकर्ता आहेत.नवीन दुनिया ची स्थापना करणारे आहेत.याच भारतामध्ये स्वर्ग होता,हिऱ्या जवाहरतांचे महल होते.एकच राज्य होते,सर्व खीर खंड बनून राहत होते.जशी बाबांची महिमा अपरंअपार आहे,तसेच भारताची महिमा पण अपरंपार आहे.भारताची महिमा ऐकून खुश होतील.बाबा मुलांना विचारतात, इतकी धन-दौलत कुठे गमावली? भक्तिमार्ग मध्ये तुम्ही खूप खर्च करत आले,अनेक मंदीरं बनवले. बाबा म्हणतात विचार करा,तुम्ही पावन पासून पतित कसे बनले आहात?तुम्ही म्हणतात ना बाबा दुःखामध्ये आपली आठवण करत होतो,सुखामध्ये करत नव्हतो.परंतु दुःखी तुम्हाला कोणी बनवले? सारखे-सारखे बाबांचे नाव घेत रहा. तुम्ही बाबाचा संदेश देत आहात. बाबा म्हणतात मी तर स्वर्ग, शिवालयाची स्थापना केली. स्वर्गामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते,तुम्ही हे विसरले आहात का? तुम्हाला हे माहित नाही की, राधाकृष्ण स्वयंवराच्या नंतर लक्ष्मीनारायण बनतात.कृष्ण जे विश्वाचे मालक होते,त्यांना पण कलंक लावले आहेत.मला पण कलंक लावले आहेत.मी तुमचा सद्गती दाता,तुम्ही मला कुत्र्या मांजरा मध्ये,कणांमध्ये म्हणतात. बाबा म्हणतात तुम्ही खूप पतित बनले आहात.बाबांचा सर्वांचे सद्गती दाता,पतित पावन आहेत.तुम्ही परत पतित पावनी गंगा म्हणतात. माझ्याशी योग न लावल्यामुळे, तुम्ही आणखीनच पतित बनले आहात.माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील.सारखे-सारखे बाबांचे नाव घेऊन समजून सांगा,तर शिव बाबांची आठवण राहील.बोला आम्ही बाबांची महिमा करत.बाबा स्वतः म्हणतात,मी कसे साधारण पतित तनामध्ये,अनेक जन्माच्या अंत मध्ये येतो.यांचे अनेक जन्म झाले आहेत.हे आता माझे बनले lआहेत,तर या रथाद्वारे मी तुम्हाला समजवतो.हे आपल्या जन्माला जाणत नाहीत,भागीरथ आहेत. यांच्याही वानप्रस्थ अवस्थेमध्ये मी येतो.शिवबाबा असे समजवतात. असे भाषण कोणाचे ऐकले नाही. बाबाचे तर नावही घेत नाहीत.सारा दिवस बाबांची बिलकुल आठवण करत नाहीत.इकडच्या-तिकडच्या फालतू गोष्टी करत राहतात आणि लिहतात,आम्ही असे भाषण केले, आम्ही हे समजून सांगितले.बाबा समजवतात आणखी तुम्ही मुंग्याच्या गतीचे आहात,पखांचे मुंगळे पण बनले नाहीत आणि अहंकार किती आहे.असे समजत नाहीत की,बाबा ब्रह्मा द्वारे सांगत आहेत.बाबांना तुम्ही विसरतात. ब्रह्मा वरती लगेच बिघडतात.बाबा म्हणतात,तुम्ही माझीच आठवण करा.तुमचे काम माझ्याशी आहे. माझी आठवण करतात ना.परंतू तुम्हाला माहित नाही की,बाबा कोण आहेत? कसे आहेत.गुरु लोक म्हणतात,कल्प लाखो वर्षाचे आहे आणि बाबा म्हणतात कल्प तर पाच हजार वर्षाचे आहे.जुनी दुनियाच परत नवीन होते आणि नवीन दुनियाच परत जुनी होते. आता नवीन दिल्ली कोठे आहे? दिल्ली तर जेव्हा परीस्थान असेल, तेव्हा नवीन दिल्ली म्हणू शकतो. नवीन दुनिया मध्ये नवीन दिल्ली होती, ती तर यमुना नदीच्या काठावरती होते.यमुना नदीच्या किनाऱ्यावरती लक्ष्मीनारायण चे महल होते,परिस्तान होते.आता तर कब्रस्तान होणार आहे,सर्व दफन होणार आहेत,म्हणून बाबा म्हणतात,मज उच्च ते उच्च बाबाची आठवण करा,तर पावन बनाल. नेहमी असे बाबा बाबा म्हणून समजून सांगा.बाबांचे नाव घेत नाहीत, त्यामुळे तुमचे कोणी ऐकत नाहीत.बाबांची आठवण न केल्यामुळे तुमच्यामध्ये ती शक्ती भरत नाही.देह अभिमाना मध्ये तुम्ही येतात.बंधना मध्ये असलेल्या माता,तुमच्यापेक्षा जास्त आठवणीमध्ये राहतात.बाबांना खूप बोलवत राहतात.बाबा म्हणतात तुम्ही सर्व द्रोपदी आहात ना.आता तुम्हाला विकारी होण्यापासून वाचवतात.माता पण काही अशा असतात,ज्यांना कल्पा पूर्वी पण पुतळा इत्यादी नावं दिली होते. तुम्ही विसरला आहात.

बाबा म्हणतात,भारत जेव्हा शिवालय होता,तर त्याला स्वर्ग म्हटले जाते.येथे परत ज्यांच्याजवळ मोठी घरं,विमान इत्यादी आहेत,ते समजतात,आम्ही तर स्वर्गामध्ये आहोत.खूप मूडमती झाले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणा बाबा सांगत आहेत.हे हठयोगी तुम्हाला मुक्ती थोडीच देऊ शकतात.जेव्हा सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत,परत गुरु कशासाठी करतात?काय तुम्हाला संन्यासी बनायचे आहे किंवा शिकून ब्रह्ममध्ये विलीन व्हायचे आहे.विलीन तर कोणी होऊ शकत नाहीत. भूमिका,अभिनय तर सर्वांना करायचा आहे.सर्व कलाकार अविनाशी आहेत,हे आदी अविनाशी नाटक आहे.मोक्ष कोणाला मिळू शकत नाही.बाबा म्हणतात मी या साधू संताचा पण उद्धार करण्यासाठी येतो,परत पतित पावनी गंगा कसे होऊ शकते?पतीत पावन तुम्ही मला म्हणतात ना.तुमचा माझ्याशी योग नसल्यामुळे असे हाल झाले आहेत. आता परत माझ्याशी योग लावा, तर विकर्म विनाश होत.मुक्तीधाम मध्ये तर पवित्र आत्मा राहतात. आता तर सारी दुनिया पतित आहे. पावन दुनियाची तुम्हाला माहिती नाही.तुम्ही सर्व पुजारी आहात,पुज्य एक पण नाहीत.तुम्ही बाबाचे नाव घेऊन सर्वांना सुजाग म्हणजेच जागृत करू शकता.बाबाच विश्वाचे मालक बनवतात,त्यांची तुम्ही निंदा करत आहात.श्रीकृष्ण लहान मुलगा सर्वगुणसंपन्न,तो असा धंदा कसा करेल आणि कृष्ण सर्वांचे पिता कसे होऊ शकतात.भगवान तर एकच आहेत ना.जो पर्यंत माझ्या श्रीमतानुसार चालत नाही,तोपर्यंत गंज कसा उतरेल.तुम्ही सर्वांची पूजा करत राहतात,तर काय हाल झाले आहेत,म्हणून परत मला यावे लागते.तुम्ही खूप धर्मभ्रष्ट कर्म भ्रष्ट झाले आहात.तुम्ही विचारा हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? असे चांगल्यारितीने ललकार करून भाषण करा.तुम्हाला नेहमी बाबांची आठवण येत नाही.कधी कधी कोणी लिहतात,आमच्यामध्ये जसे बाबांनी येऊन भाषण केले.बाबा खूप मदत करत राहतात.तुम्ही आठवणीच्या यात्रे मध्ये राहत नाहीत,म्हणून मुंगीच्या गतीची सेवा करत आहात.बाबा चे नाव घ्याल, तेव्हाच कोणाला ज्ञानाचा बाण लागेल.बाबा समजवतात,मुलांनो तुम्हीच सर्वांगीन ८४ चे चक्र लावले आहे,तर तुम्हालाच येऊन समजावे लागते.मी भारतामध्येच येतो.जे पुज्य होते,तेच पुजारी बनतात.मी तर पूज्य पुजारी बनत नाही.

बाबा म्हणतात,बाबा म्हणतात ही धुन लावायला पाहिजे.जेव्हा तुम्ही असे भाषण कराल,जेव्हा असे आम्ही ऐकू,तेव्हा समजू की आता तुम्ही मुंगीपासून,पंखाचे मुंगळे बनले आहात.बाबा म्हणतात मी तुम्हाला शिकवतो,तुम्ही फक्त माझी आठवण करा.या रथाद्वारे तुम्हाला फक्त म्हणतो की,माझी आठवण करा.रथाची थोडीच आठवण करायची आहे.बाबा असे म्हणतात, बाबा असे समजवतात,असे तुम्ही म्हणत राहा,परत पहा तुमचा प्रभाव किती निघतो.बाबा म्हणतात,देहा सहित,सर्व संबंधा पासून बुद्धीयोग तोडा.आपला देह पण सोडला तर बाकी आत्मा राहिली.स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा.काहीजण तर म्हणतात,"अहम ब्रह्मस्मी" मायेचे आम्ही मालक आहोत.बाबा म्हणतात,तुम्ही हे पण जाणत नाहीत की,माया कोणाला म्हटले जाते आणि संपत्ती कशाला म्हटले जाते.तुम्ही धनाला माया म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही समजावू शकता. अनेक चांगली चांगली मुलं पण मुरली वाचत नाहीत.बाबांची आठवण करत नाहीत,तर ज्ञानाचा बाण लागत नाही,कारण आठवणीची शक्ती मिळत नाही. शक्ती तर आठवणी द्वारेच मिळते ना.या योगबळाद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनतात.मुलांनो,प्रत्येक गोष्टीत बाबांचे नाव घेत राहा,तर कधी कोणी काहीच बोलू शकणार नाहीत.सर्वांचे पिता भगवान एकच आहेत की?सर्वच भगवान आहेत. असे म्हणतात आम्ही आमक्या संन्याशाचे शिष्य आहोत.आता ते सन्याशी आणि तुम्ही गृहस्थी तर शिष्य कसे झाले.गायन पण आहे, खोटी माया,खोटी काया,खोटा सर्व संसार.खरे तर एक बाबाच आहेत. जोपर्यंत बाबा येत नाहीत तोपर्यंत आम्ही खरे बनू शकत नाहीत.मुक्ति जीवन मुक्तिदाता तर एकच आहेत. बाकी कोणीही मुक्ती थोडेच देऊ शकतात,जे आम्ही त्यांचे बनू.बाबा म्हणतात ही पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.आता सावधान बनून डोळे उघडा.बाबा असे म्हणतात,हे म्हटल्यामुळे तुम्ही सुटू शकाल.तुमच्या बरोबर कोणी वाद-विवाद करणार नाहीत.त्रिमूर्ती शिवबाबा म्हणायचे आहे,फक्त शिव म्हणायचे नाही.त्रिमूर्तीची स्थापना कोणी केली?ब्रह्मा द्वारे स्थापना कोण करतात?काय ब्रह्मा रचनाकार आहेत?अशाप्रकारे नशाद्वारे बोला, तेव्हाच काम करू शकतात,नाही तर देह अभिमानामध्ये येऊन भाषण करतात.बाबा समजवतात हे अनेक धर्माचे कल्पवृक्ष आहे.प्रथम देवी-देवता धर्म आहे,आता तो देवता धर्म कोठे गेला?ते कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात,ही तर पाच हजार वर्षाची गोष्ट आहे.तुम्ही मंदिर पण त्यांचे बनवत राहतात.असे दाखवतात पांडव आणि कौरवाची लढाई लागली,पांडवाचा डोंगरावरती मृत्यू झाला,परत काय झाले?मी अशी हिंसा कसे करू शकतो?मी तर तुम्हाला वैष्णव बनवतो.काम कटारी न चालवणे त्यांनाच वैष्णव म्हणतात.ती विष्णूची वंशावळ आहे,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी,अहंकाराला सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचे नाव घेत राहा.आठवणी मध्ये राहून सेवा करायची आहे.इकडच्या-तिकडच्या फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही.

(2) खरे वैष्णव बनायचे आहे. कोणतीही हिंसा करायची नाही.देह सहित सर्व संबंधापासून बुद्धीयोग तोडायचा आहे.

वरदान:-
विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये नेहमी व्यस्त राहणारे विश्वाचे आधार मूर्त भव.

विश्व कल्याणकारी मुलं स्वप्नामध्ये पण रिकामे राहू शकत नाहीत.ते रात्रंदिवस सेवेमध्ये व्यस्त राहतात. त्यांना स्वप्नांमधे पण अनेक नवीन नवीन गोष्टी,सेवा चे नियोजन व सेवेचे अनेक प्रकार दिसून येतात.ते सेवेमध्ये व्यस्त झाल्यामुळे,आपल्या पुरुषार्थ चर्या व्यर्थ पासून आणि दुसऱ्याच्या व्यर्थ पासून सुरक्षित राहतात.त्यांच्या समोर विश्वाच्या आत्मे नेहमी स्पष्ट राहतात.त्यांना जरा पण आळस येऊ शकत नाही. असे सेवाधारी मुलं आधार मूर्त बनण्यासाठी वरदान मिळते.

बोधवाक्य:-
संगमयुगाचा एक-एक सेकंद वर्षाच्या बरोबर आहे,म्हणून आळसांमध्ये वेळ घालवू नका.