10-10-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   11.08.88  ओम शान्ति   मधुबन


सफलतेचे चुबंक भेटणे आणि नम्र बनणे.


सर्वांचा स्नेह,स्नेहाच्या सागरा मध्ये सामावला.असेच नेहमी स्नेहामध्ये सामावलेले आणि दुसर्यांना पण स्नेहाचा अनुभव करत चला. बापदादा सर्व मुलांचे विचार समान भेटणाऱ्याचे संमेलन पाहून आनंदित होत आहेत.उडत येणारे आणि नेहमी उडती कलाचे वरदान स्वतः प्राप्त होत राहतील.बापदादा सर्व आलेल्या मुलांच्या उमंग उत्साहाला पाहून,सर्व मुलावरती स्नेहाच्या फुलांची वर्षा करत आहेत.संकल्प समान मिलन आणि बाप समान संस्कार बनुन भेटणेच,हे बाबा सोबत मिलन आहे. हेच बापसमान बनणे आहे.संकल्प, मिलन,संस्कार मिलन,हे मिलनच निर्माण बनून निमित्त बनणे आहे. जवळ येत आहात आणि येत राहाल.सेवेच्या सफलतेची लक्षणे पाहून आनंदित होत आहेत.स्नेह मिलन मध्ये आले आहात,तर सदा स्नेही बनून,स्नेहाची लाट विश्वाला द्या,परंतु प्रत्येक गोष्टींमध्ये स्वतःपासून सुरुवात करा.प्रथम स्वतः आणि सर्वात गोड आपले घर आहे.तर प्रथम स्वतःपासून, परत ब्राह्मण परिवारापासून, परत विश्वा पासून सुरुवात करा.प्रत्येक संकल्पा मध्ये स्नेह,निस्वार्थ खरा स्नेह, मनापासूनच स्नेह, प्रत्येक संकल्प मध्ये सहानुभूती,प्रत्येक संकल्पा मध्ये दया, दातापणाचे नैसर्गिक संस्कार बनावेत,असे स्नेहमिलन संकल्प मिलन, विचार मिलन, संस्कार मिलन.सर्वांच्या सहयोगाच्या कार्याच्या अगोदर,नेहमी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याचा सहयोग,विश्वाला सहयोगी सहज आणि स्वतः बनवतो, म्हणून सफलता जवळ येत आहे. मिलन करणे आणि नम्र होणे हेच सफलतेचे चुंबक आहे.खूप सहज,या चुंबकाच्या पुढे सर्व आत्मे आकर्षित होऊन आले की आले. मीटिंग मधल्या मुलांना,बापदादा स्नेहाच्या शुभेच्छा देत आहेत.जवळ आहात आणि नेहमी जवळ राहाल.न फक्त बाबांचे,परंतू आपसामध्ये पण समिपतेचे दृश्य बापदादांना दाखवले.विश्वाला दृश्य दाखवण्याच्या आगोदर,बाप दादाने पाहिले.येणाऱ्या सर्व मुलांचे कर्म पाहून,कोणते कार्य करायचे, होणार आहे,ते सहज च समजतील.तुमचे कार्यच,कार्याचे नियोजन आहे, अच्छा.

नियोजन चांगले बनवले आहे आणखी जसे हे कार्य सुरु करतात,तर बापदादाचा विशेष इशारा वर्गीकरणला तयार करण्याचा होता,आणि आत्ता पण आहे.तर हे जरूर लक्ष ठेवा की,या महान कार्या मध्ये कोणताही वर्ग राहायला नको. वेळे प्रमाण जास्त करू शकत नाही परंतु प्रयत्न किंवा लक्ष जरूर ठेवा की,उदाहरण जरूर तयार करायचे आहे.बाकी हेच कार्य,पुढे चालून वाढत जाईल,तर वेळ प्रमाण करत राहायचे आहे.परंतु समाप्तीला जवळ आणण्यासाठी सर्वांचा सहयोग पाहिजे.परंतु इतक्या सर्व दुनियाच्या आत्म्यांना एकाच वेळेस, संपर्क मध्ये घेऊन येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही उत्साहाद्वारे म्हणतात की,आम्ही सर्व आत्म्यांना,सर्व वर्गाच्या आधारा द्वारे सहयोगी बनवले आहे.तर हे लक्ष सर्वांच्या मुळे पूर्ण होते.कोणत्याही वर्गाची तक्रार राहणार नाही की,आम्हाला तर माहित नाही की,आम्ही पण बीज घातले असते.बाकी वेळेनुसार,जसा वेळ मिळेल,तसे वृध्दी करू शकता. यामध्ये भारी व्हायचे नाही,कसे करू? किती करायला पाहिजे? जितके होणार आहे,तेवढेच होईल. जितके केले,तेवढे सफलतेच्या जवळ आले आहात.उदाहरण तर तयार करू शकतात ना.

बाकी जे भारत सरकारला जवळ आणण्याचा श्रेष्ठ संकल्प केला आहे, तो वेळे प्रमाण सर्वांच्या बुद्धीला जवळ घेऊन येत आहे,म्हणून सर्व ब्राह्मण आत्मे विशेष कार्य अर्थ सुरुवातीपासून अंत काळापर्यंत, विशेष शुद्ध संकल्प, "सफलता होणारच आहे" या शुद्ध संकल्प द्वारे आणि बाप समान प्रकंपन बनवणे,मिळवणे यामुळे, विजयाच्या निश्चयाच्या दृढतेद्वारे पुढे जात राहा. परंतु जेव्हा कोणतेही मोठे कार्य करतात,तर प्रथम जसे स्थुलमध्ये पाहिले,कोणतेही ओझे उचलतात तर, काय करतात? सर्व मिळून सहयोग देतात आणि एक दोघांची हिम्मत वाढवण्याचे बोल बोलतात.हे पाहिले आहे ना.असेच कोणीही निमित्त बनतात,परंतु नेहमी या कार्यात विशेष कार्यासाठी,सर्वांचा स्नेह, सर्वांचा सहयोग,सर्वांच्या शक्तीचा उमंग उत्साहाचे प्रकंपन, कुंभकर्णाला निद्रे मधून जागृत करतील. या विशेष कार्य वरती लक्ष जरुर द्यायचे आहे.विशेष स्व, सर्व ब्राह्मण आणि विश्वाच्या आत्म्यांचा सहयोग घेणेच, सफलतेचे साधन आहे.यामध्ये थोडे पण आंतर पडते,तर ते सफलते मध्ये अंतर होते, म्हणून बापदादा सर्व मुलांच्या हिम्मतीचा आवाज ऐकून,त्या वेळेत आनंदित होतात,आणि खास संघटनेच्या स्नेहामुळे, स्नेहाचा मोबदला देण्यासाठी आले आहेत. खूप चांगले आहात आणि चांगल्यातले चांगले अनेक वेळेस बनले आहात आणि बनणार आहात. म्हणून दुहेरी परदेशी मुलांना नेहमी तयार राहण्यासाठी,तीव्र गतीने पुरुषार्थ करण्यासाठी निमित्त, बापदादा विशेष मुलांना ह्रदयाचा हार बनवून सामावून घेतात,अच्छा. कुमारी तर कन्हैया च्या आहेत, म्हणजे कृष्णाच्या आहेत.बस, एक शब्दाची आठवण करायची आहे. सर्वांमध्ये एक, एक मत,एक रस,एक पिता.भारताच्या मुलांना पण

बापदादा मनापासून शुभेच्छा देतात. जसे लक्ष ठेवले आहे,असे लक्षणं प्रत्यक्षामध्ये आणले आहेत,समजले. कोणाला म्हणतात,कोणाला म्हणायचे नाही, सर्वांना म्हणतात.जे दादी निमित्त बनतात,त्यांना विचार तर राहतो ना.हीच सहानुभूती लक्षणं आहेत. अच्छा.

मिटिंग मध्ये आलेल्या सर्व बहिणींना बाबांनी स्टेजवरती बोलवले .

सर्वांनी बुद्धी चांगल्या प्रकारे चालवली आहे.बापदादा प्रत्येक मुलांच्या सेवेच्या स्नेहाला जाणतात. सेवांमध्ये पुढे गेल्यामुळे, चहूबाजूला सफलता आहे.यामध्ये फक्त थोडा सा विचार करावा लागतो आणि पाहायचे आहे.बाकी सेवाची आवड चांगली आहे.दिवस-रात्र एक करून सेवेसाठी पळत राहतात.बापदादा तर कष्टाला,प्रेमाच्या रूपांमध्ये पाहतात.कष्ट नाही परंतु प्रेम दिसून येते.अच्छा.चांगल्या उमंग उत्साहाचे सोबती मिळाले आहेत.विशाल कार्य आहे.आणि विशाल मन आहे, म्हणून जिथे विशालता आहे तिथे सफलता आहेच.बापदादा सर्व मुलांच्या सेवेची आवड पाहून रोज आनंदाचे गीत गातात.अनेक वेळेस हे गिता ऐकवले आहे, वाह! मुलांनो वाह! अच्छा. येण्या मध्ये किती रहस्य होते.

रहस्याला समजणारे आहात ना. रहस्य जाणतील आणि बाबा जाणतील.आज दृष्टीनेच स्वीकार करतील.सर्वांची बुद्धी चांगल्याप्रकारे चालत आहे आणि एक दोघांच्या जवळ पण आहेत ना,म्हणून सफलता अती जवळ आहे.समिपता सफलतेला समीप म्हणजे जवळ आणेल.थकले तर नाहीत ना,खूप काम केले आहे परंतु अर्धे काम तर बाबाच करतात.सर्वांचा चांगला उमंग आहे,दृढता पण आहे.समिपता पण किती समीप आहे,चुंबक ला ठेवा,तर समिपता,सर्वांच्या गळ्यामध्ये माळ घालेल.असा अनुभव होतो ना,अच्छा.सर्व चांगल्यातले चांगले आहात.

दादीजींच्या प्रती उच्चारलेले अव्यक्त महावाक्य , ३१ / ३ / ८८ .

बाबा मुलांना शुभेच्छा देतात आणि मुलं बाबांना.एक-दोघांना शुभेच्छा देत, पुढे जात आहेत.हीच विधी आहे पुढे जाण्याची,या विधीद्वारे तुम्हा लोकांचे संघटन खूप चांगले आहे. एक-दोघांना होय होय करत, शुभेच्छा देत, पुढे जात राहीले.याच विधीचे सर्वांनी अनुकरण केले तर फरिश्ता बनतील,देवदूत बनतील. बापदादा लहान माळेला पाहून पण खुश होतात.आता कडे बनले आहे, गळ्याची माळा तयार होत आहे, तयार करण्यामध्ये लागले आहेत. आता आणखी लक्ष पाहिजे,जास्त सेवेमध्ये चालले जातात,तर स्वतः वरती लक्ष कधी-कधी कमी होते. विस्तारा मध्ये सारांश कधी विलिन होतो,स्पष्ट रूपामध्ये राहत नाही. तुम्ही लोक म्हणतात,आत्ता हे व्हायचे आहे.कधी असा पण दिवस येईल,जे म्हणतील,जे व्हायला पाहिजे,तेच होत आहे.प्रथम दीपकांची माळ येथेच तयार होईल. बापदादा तुम्हा लोकांना,प्रत्येकाचा उमंग उत्सव वाढवण्यासाठी उदाहरण समजतात.तुम्ही लोकांची एकता च यज्ञाचा किल्ला आहे.परत ते १० असतील किंवा १२ असतील परंतु किल्ल्याची भिंत आहात.तर बाप दादा किती खुश होतील.बाप दादा तर आहेतच,परत निमित्त तुम्ही आहात.असेच दुसरे संघटन, तिसरे संगठन, बनेल तर कमाल होईल.आत्ता असा ग्रुप तयार करा, जसे पहिल्या ग्रुप साठी सर्व म्हणतात,यांचा आपसमध्ये खुप स्नेह आहे. स्वभाव वेगवेगळे आहेत,ते तर राहतील परंतु आदर आहे,प्रेम आहे, होय जी करत राहतात.वेळेनुसार स्वतःला नम्र बनवतात,म्हणून या किल्ल्याची भिंत मजबूत आहे. यामुळे पुढे जात आहेत,पायाला पाहून खुशी होते ना.जसा हा प्रथम ग्रुप दिसून येतो,असे शक्तिशाली ग्रुप बनवले तर, सेवा पाठीमागे येईल. बेहद नाटकांमध्ये विजय माळेची नोंद आहे.तर जरूर एक दोघांच्या जवळ येतील,तेव्हा तर माळ बनेल. एक मणी एकिकडे असेल,एक मणी दुसरी कडे,तर माळ बनणार नाही.मणी भेटत जातील,जवळ येत जातील,तेव्हाच माळ तयार होईल. तर उदाहरण चांगले आहे,अच्छा. आता तर भेटण्याचा कोटा पूर्ण करायचा आहे.ऐकवले होते ना,रथाला पण जास्त शक्तीने चालवत आहे,नाही तर साधारण गोष्ट नाही.बाबांना सर्व पाहावे लागते. तरीही सर्व मुलींची शक्ती जमा आहे म्हणून आपण रथ पण इतका सहयोग देत आहे.शक्ती जमा होत नसेल तर, इतकी सेवा झाली नसती.हे पण नाटकांमध्ये प्रत्येक आत्म्याची भूमिका आहे.ज्यामुळे श्रेष्ठ कर्माची पुंजी जमा होते,तर ती वेळेनुसार कामात येते.किती आत्म्याचे आर्शिवाद मिळतात, ते पण जमा होतात.काही न काही विशेष पुण्याची पुंजी जमा झाल्यामुळे,विशेष भूमिका आहे.

निर्विघ्न रथ चालेल,हे पण नाटकांमध्ये भूमिका आहे.सहा महिने काही काम राहीले नाही. अच्छा.

अव्यक्त मुरली मधून निवडलेले काही अनमोल महावाक्य .

(१) प्रश्न:-
कोणत्या एका शब्दाच्या अर्थ स्वरूपामध्ये स्थिर राहाल, त्यामुळे सर्व कमजोरी नष्ट होतील?

उत्तर:-
फक्त पुरुषार्थी शब्दाच्या अर्थ स्वरूपामध्ये स्थिर राहा.पुरुष म्हणजे या रथाचे रथी,प्रकृतीचे मालक.एका शब्दाच्या स्वरूपामध्ये स्थिर राहा,तर यामुळे सर्व कमजोरी समाप्त होतील.पुरुष प्रकृतीचे अधिकारी आहेत,न की आधिन.रथी रथाला चालवणारे आहेत,न की रथाच्या आधिन होणारे.

(२) प्रश्न :-
आदी काळाचे राज्य अधिकारी बनण्यासाठी कोणते संस्कार आत्तापासून धारण करा?

उत्तर:-
आपले आदी अविनाश संस्कार,आत्तापासून धारण करा.जर खूप काळाचे युद्धाचे संस्कार राहतील म्हणजेच युद्ध करत करत वेळ निघून जाईल,आज जिंकता उद्या हार होते,आत्ता आत्ता जिकंता आत्ता हार होते.तर नेहमीसाठी विजय पणाचे संस्कार बनले नाहीत, तर क्षत्रिय म्हटले जाईल ना की ब्राह्मण.ब्राह्मण च देवता बनतात. क्षत्रियतर क्षत्रिय घराण्यात चालले जातील.

(३) प्रश्न:-
विश्व परिवर्तक बनण्यासाठी कोणत्या परिवर्तन करण्याच शक्ती आवश्यक आहे?

उत्तर:-
विश्व परिवर्तक बनण्यासाठी प्रथम आपल्या संस्काराला परिवर्तन करण्याची शक्ती पाहिजे.दृष्टी आणि वृत्तीचे परिवर्तन पाहिजे.तुम्ही दृष्टा या दृष्टी द्वारे पाहणारे आहात.दिव्य नेत्रा द्वारे पहा ना की कातडीच्या नेत्र द्वारे.दिव्य नेत्राद्वारे पहाल,तर स्वतः दिव्य रूप दिसून येईल.कातडीचे डोळे कातडीला पाहतात,कातडी साठी विचार करतात.हे काम फरिश्ता किंवा ब्राह्मणाचे नाही.

(४) प्रश्न:-
आपसामध्ये भाऊ- बहिणीच्या संबंधांमध्ये असताना पण कोणत्या दिव्य नेत्रा द्वारे पहाल,तर दृष्टी किंवा वृत्ती कधी चंचल होऊ शकणार नाही?

उत्तर:-
प्रत्येक नारी शरीरधारी आत्म्याला,शक्तिरूप जगत मातेचे रूप, देवीच्या रूपामध्ये पाहा,हेच दिव्य नेत्र द्वारे पाहणे आहे.शक्तीच्या पुढे कोणी आसुरी वृत्तीद्वारे येतात, तर भस्म होतात,म्हणून आमची बहीण किंवा शिक्षक नाहीत परंतु शिवशक्ती आहे.माता बहिणी पण नेहमी आपल्या शिवशक्ती स्वरूपामध्ये स्थिर राहा,माझा विशेष भाई,माझा विशेष विद्यार्थी,नाही, ते महावीर आहेत आणि मी शिवशक्ती आहे.

(५) प्रश्न:-
महावीरची विशेषता काय दाखवतात?

उत्तर:-
त्यांच्या मनामध्ये नेहमी एक राम राहतो.महावीर रामाचे आहेत, तर शक्ती पण शिवाची आहे. कोणत्याही शरीरधारीला पाहता तर मस्तका कडे पाहा.मस्तका मध्ये आत्म्याला पाहा,आत्म्याशी गोष्टी करायच्या आहेत,ना की शरीराशी. नजरच मस्तका वरती जायला पाहिजे.

(६) प्रश्न:-
कोणत्या शब्दाला अलबेला रूपामध्ये न वापर केल्यामुळे फक्त एक सावधानी ठेवा,ती कोणती?

उत्तर:-
पुरुषार्थी शब्दाला अलबेला रूपामध्ये न वापरता,फक्त ही सावधानी ठेवा की,प्रत्येक गोष्टीमध्ये दृढ संकल्पधारी बनायचे आहे.जे पण करायचे आहे,ते श्रेष्ठ काम करायचे आहे,श्रेष्ठच बनायचे आहे.

वरदान:-
विकाराच्या वंशाच्या अंशला पण समाप्त करणारे सर्व समर्पण किंवा विश्वस्त भव.

जे काही कामासाठी जुन्या संस्काराच्या संपत्तीला, किनारा करून ठेवतात,तर माया कोणत्या न कोणत्या रीतीने पकडते.जुन्या रजिस्टरच्या लहानशा तुकड्याला पण पकडेल,माया खूप तेज आहे. तिची पकडण्याचे शक्ती काही कमी नाही,म्हणून विकाराच्या वंशाच्या अंशला पण समाप्त करा.जरा पण कोणत्या जुन्या खजान्याचे लक्षण असायला नको,त्याला म्हटले जाते सर्व समर्पण विश्वस्त किंवा यज्ञाचे स्नेही सहयोगी.

सुविचार:-
कोणत्याही विशेषते मुळे विशेष स्नेह होणे,हा पण लगाव आहे.