10-11-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आत्म्याला सतोप्रधान बनवण्याची काळजी करा, कोणतेही अवगुण राहायला नकोत, माया गफलत करायला नको"

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या मुखाद्वारे कोणते शुभ बोल नेहमी निघायला पाहिजेत?

उत्तर:-
नेहमी मुखाद्वारे हेच शुभ बोल बोला की, आम्ही नरापासून नारायण बनू, कमी नाही. आम्हीच विश्वाचे मालक होतो, परत बनू. परंतु हे लक्ष उच्च आहे, म्हणून खूप खबरदारी घ्यायची आहे. आपली दिनचर्या तपासायची आहे. मुख्य लक्ष समोर ठेवत, पुरुषार्थ करत राहायचे आहे. यामध्ये संभ्रमित व्हायचे नाही.

ओम शांती।
बाबा मुलांना समजवतात, येथे जेव्हा आठवणीच्या यात्रांमध्ये बसतात, तर भाऊ बहिणींना म्हणतात, तुम्ही आत्माभिमानी होऊन बसा आणि बाबांची आठवण करा. ही स्मृती द्यायला पाहिजे. तुम्हाला आत्ता ही स्मृती मिळत आहे. आम्ही आत्मा आहोत, आमचे पिता आम्हाला शिकवण्यासाठी येतात. आम्हीपण कर्मेंद्रिया द्वारे शिकत आहोत. बाबा पण कर्म इंद्रियाचा आधार घेऊन प्रथम यांच्याद्वारे म्हणतात की, बाबांची आठवण करा. मुलांना समजवले आहे की, हा ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग म्हणणार नाहीत. ज्ञान फक्त एकच ज्ञानसागर पतित पावन देतात. तुम्हाला प्रथम क्रमांकाचा हाच धडा मिळतो की, स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करा. हे खूप आवश्यक आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्संग मध्ये कोणाला असे म्हणता येत नाही. जरी आजकाल कृत्रिम संस्था खूप निघाल्या आहेत, तुमचे ऐकून कोणी म्हटले, तरीही अर्थ समजू शकणार नाहीत, समजावून सांगण्याची अक्कल येणार नाही. बाबा म्हणतात की, बेहद पित्याची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. विवेक पण म्हणतो की, ही जुनी दुनिया आहे. नवीन दुनिया आणि जुन्या दुनिया मध्ये खूप फरक आहे. ती पावन दुनिया आणि ही पतित दुनिया आहे. ईश्वराला बोलवतात, हे पतित-पावन येऊन पावन बनवा. गीतेमध्ये पण अक्षरं आहेत, माझीच आठवण करा. देहाचे सर्व संबंध त्याग करून, स्वतःला आत्मा समझा. हे देहाचे संबंध पूर्वी नव्हते. तुम्ही आत्मा येथे भूमिका वठण्यासाठी येतात. असे गायन पण आहे की, एकटे आले होते, एकटेच जायचे आहे. याचा अर्थ पण मनुष्य समजत नाहीत. आता तुम्ही प्रत्यक्षामध्ये जाणतात. आत्ता आम्ही आठवणीच्या यात्रा द्वारे किंवा आठवणीच्या शक्तीद्वारे पावन बनत आहात. हे राजयोगाचे बळ आहे. तो हठयोग आहे, ज्याद्वारे मनुष्य थोड्यावेळासाठी निरोगी राहतात. सतयुगामध्ये तुम्ही खूप निरोगी राहतात. हठयोग योगाची आवश्यकता नाही. हे सर्व, याच छी छी दुनिया मध्येच करतात. ही जुनी दुनिया आहे. सतयुग नवीन दुनिया आहे, जी भूतकाळात होऊन गेली. त्यामध्ये या लक्ष्मी नारायणचे राज्य होते, हे कोणालाच माहीत नाही. तेथे प्रत्येक गोष्ट नवीन आहे. गित पण आहे ना, जाग सजनी जाग. सतयुग नविन दुनिया आहे. जुने युग कलियुग आहे. आत्ता याला कोणीही सतयुग म्हणू शकत नाही. आता कलियुग आहे, तुम्ही सतयुगासाठी शिकत आहात. तर असे शिकवणारा कोणीही नसेल, जे म्हणतील तुम्हाला या शिक्षणाद्वारे नवीन दुनियेमध्ये राज्यपद मिळेल. बाबां शिवाय कोणी बोलू शकत नाही. तुम्हा मुलांना प्रत्येक गोष्टीची स्मृती दिली जाते. चुका करायच्या नाहीत. बाबा सर्वांना समजावून सांगतात. कुठेपण बसा, धंदा इत्यादी करा, स्वतःला आत्मा समजून करा. कामधंद्या मध्ये जर कठिणाई वाटत असेल, तर जितके होईल तेवढा वेळ काढून, आठवणीमध्ये बसा, तेव्हाच आत्मा पवित्र‌ बनेल. दुसरा कोणताही उपाय नाही. तुम्ही नवीन दुनियेसाठी राजयोग शिकत आहात. तेथे लोहयुगी आत्मा जाऊ शकत नाही. मायाने आत्म्याचे पंख कापले आहेत. आत्मा उडते ना. एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा सर्वात तीव्र वेगी राॅकेट आहे. तुम्हा मुलांना या नवीन गोष्टी ऐकून आश्चर्य वाटते. आत्मा खूप छोटे रॉकेट आहे. त्यामध्ये८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे. अशा गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे उमंग उत्साह येईल. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये अभ्यास आठवणीत राहतो. तुमच्या बुद्धीमध्ये आता काय आहे? बुद्धी काही शरीरामध्ये नाही. आत्म्या मध्येच मन बुद्धी आहे, आत्माच शिकते. नोकरी इत्यादी सर्व काही आत्माच करते. शिवबाबा पण आत्माच आहेत, परंतु त्यांना परम म्हणतात. ते ज्ञानाचे सागर आहेत. ते खुप लहान बिंदू आहेत. हे पण कोणालाच माहिती नाही. जे पित्यामध्ये संस्कार आहेत, तेच तुम्हा मुलांच्या मध्ये भरले जातात. आत्ता तुम्ही योगबळाद्वारे पावन बनत आहात. त्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल. शिक्षणामध्ये काळजी तर राहते की, आम्ही नापास व्हायला नको. यामध्ये प्रथम क्रमांकाचा विषय हाच आहे की, आम्ही आत्माच सतोप्रधान बनू. काही अवगुण राहायला नको. नाहीतर नापास व्हाल. माया तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विसरायला लावते. आत्म्याची इच्छा असते, दिनचर्या लिहावी. संपूर्ण दिवसांमध्ये कोणते आसुरी काम व्हायला नको, परंतु माया दिनचर्या लिहू देत नाही. तुम्ही मायेच्या पंज्यामध्ये येतात. मनात पण येते दिनचर्या लिहावी. व्यापारी लोक नेहमी फायदा आणि नुकसान चा हिशोब ठेवतात. तुमचा तर खूप मोठा हिशोब आहे. २१ जन्माची कमाई आहे, यामध्ये चुक करायची नाही. अनेक मुलं चुका करतात. या बाबांना तुम्ही मुलं सूक्ष्मवतन मध्ये, स्वर्गामध्ये पाहतात. बाबा पण खूप पुरुषार्थ करतात. आश्चर्य पण करतात. बाबाच्या आठवणीमध्ये स्नान करतो, भोजन करतो, तरी विसरतो, परत आठवण करावयास लागतो. हा मोठा विषय आहे. या गोष्टी मध्ये कोणी मतभेदा मध्ये येऊ शकत नाहीत. गीतेमध्ये पण आहे, देहाचे सर्व धर्म सोडा, बाकी राहते आत्मा. देहाला विसरून स्वतःला आत्म समजा. आत्माच तमोप्रधान बनली आहे. मनुष्य परत म्हणतात, आत्मा निर्लेप आहे. आत्माच परमात्मा, सो आत्मा आहे, म्हणून समजतात आत्म्याला कोणताही लेप-छेप लागत नाही. तमोगुणी मनुष्य शिक्षा पण तमोगुणी च देतात. सत्त्वगुणी बनू शकत नाहीत. भक्तिमार्ग मध्ये तमो प्रधान बनायचे आहे. प्रत्येक गोष्ट प्रथम सतोप्रधान, परत रजो तमो बनते. स्थापन आणि विनाश होतो. बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात, तर जुन्या दुनियेचा विनाश होतो. भगवान तर नवीन दुनियेची स्थापन करणारे आहेत. ही जुनी दुनिया बदलून नवीन होईल. नवीन दुनियेच्या खुणा तर हे लक्ष्मी नारायण आहेत. हे नवीन दुनियेचे मालक आहेत. त्रेताला नविन दुनिया म्हणू शकत नाही. कलियुगाला जुनी, तर सतयुगाला नवीन दुनिया म्हटले जाते. कलियुग अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीलचा हा संगम आहे. कोणी एम. ए, बी. ए शिकतात तर उच्च पद मिळवतात ना. तुम्ही या शिक्षणाद्वारे खूप उच्च बनतात. दुनिया या गोष्टीला जाणत नाही की, यांना इतके श्रेष्ठ कोणी बनवले. तुम्ही आता आदी मध्य अंतला जाणले आहे. सर्वांच्या जीवन कहाणीला तुम्ही जाणतात. हे ज्ञान आहे, भक्तीमध्ये ज्ञान नाही, फक्त कर्मकांड शिकवतात‌. भक्ती तर खूप आहे, खूप वर्णन करत राहतात, खूप सुंदर दिसून येते. बिजा मध्ये काय सुंदरता आहे? इतके छोटे बीज आणि विस्तार किती मोठा होत जातो. भक्तीचे हे झाड आहे, खूप कर्मकांड आहेत. ज्ञानाचे एकच वाक्य म्हणजे मनमनाभव. बाबा म्हणतात तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा. तुम्ही म्हणतात हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. तुम्ही म्हणतात पण हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. रावण राज्या मध्ये सर्व पतित दुःखी आहेत. राम राज्यांमध्ये सर्व पावन सुखी आहेत. राम राज्य आणि रावण राज्याचे नाव तर आहे ना. राम राज्या बद्दल कोणालाही माहिती नाही, शिवाय तुम्हा मुलांच्या. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात. ८४ जन्माचे रहस्य पण तुमच्या शिवाय कोणी जाणत नाहीत. जरी म्हणतात भगवानुवाच- मनमनाभव. ते काही असे थोडेच समजवतील की, तुम्ही ८४ जन्म कसे घेतले आहेत‌. आता चक्र पूर्ण होत आहे. गीता ज्ञान देणाऱ्यांचे तुम्ही ऐका, गीते वरती काय बोलतात? तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञान टपकत राहते. बाबा विचारतात अगोदर कधी भेटले होते का? असे म्हणतात, होय कल्पापुर्वी भेटलो होतो. बाबा विचारतात, आणि तुम्ही अर्थसहीत उत्तर देतात. असे नाही की पोपटासारखे म्हणतात, परत बाबा विचारतात का भेटले होते? काय मिळवले होते? तर तुम्ही म्हणू शकता, आम्ही विश्वाचे राज्य भाग्य घेतले होते. त्यामध्ये सर्व काही येते. जरी तुम्ही म्हणतात, नरापासून नारायण बनलो होतो, परंतु विश्वाचे मालक बनणे, त्यामध्येही राजाराणी बनणे आणि दैवी घराने सर्व आहे. त्याचे मालक राजा, राणी, प्रजा सर्व बनतील. याला शुभ बोलणे म्हटले जाते. आम्ही तर नरा पासून नारायण बनू, कमी नाही. बाबा म्हणतात, होय मुलांनो, पुर्ण पुरुषार्थ करा. स्वत:ला तपासायचे आहे, या परिस्थितीमध्ये आम्ही श्रेष्ठ पद मिळवू शकू, की नाही? किती लोकांना रस्ता दाखवला आहे? किती अंधाची लाठी बनलो आहोत? जर सेवा करत नाही तर समजायला पाहिजे, आम्ही प्रजा मध्ये जाऊ. आपल्या मनाला विचारायला पाहिजे, जर माझे शरीर सुटले तर काय पद मिळेल? खूप मोठे लक्ष्य आहे, तर खबरदार राहायला पाहिजे? काही मुलं समजतात बरोबर आम्ही तर आठवण करत नाही, तर हिशेब, दिनचर्या लिहून काय फायदा? त्याला परत ह्रदयघाती म्हटले जाते. ते शिक्षण पण असेच घेतात, लक्ष देत नाहीत. पोपटासारखे बनून बसायचे नाही, ज्यामुळे शेवटी नापास होतील. स्वतःचे कल्याण करायचे आहे. मुख्य लक्ष्य समोर आहे, आम्हाला शिकून असे बनायचे आहे. हे पण आश्र्चर्य आहे ना. कलियुगामध्ये तर राजाई नाही. सतयुगामध्ये परत त्यांना राजाई कुठून आली? सर्व शिक्षणावर आधारित आहे. असे नाही की देवता आणि आसुरांची लढाई लागली, देवतांनी जिंकून राज्य केले. आता आसुर आणि देवतांची लढाई कशी लागू शकते? न कौरव आणि पांडवाची लढाई आहे. लढाईच्या गोष्टीचा निषेध केला जातो. प्रथमतः हे सांगा की, बाबा म्हणतात देह सहीत सर्व संबंध सोडून, स्वतःला आत्मा समजा. तुम्ही आत्मा अशरीरी आले होते, आता परत जायचे आहे. तमोप्रधान असल्यामुळे इतके दूर, पवित्र ठिकाणी जाऊ शकत नाहीत. आता तुमची आत्मा म्हणेल, आम्ही वास्तव मध्ये परमधामचे राहणारे आहोत. येथे हा पाच तत्वाचा पुतळा, भूमिका वठण्यासाठी घेतला आहे. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात, स्वर्गवासी झाले? तेथे शरीर गेले की, आत्मा गेली? शरीर तर नष्ट झाले. बाकि राहिली आत्मा. ती स्वर्गामध्ये तर जाऊ शकत नाही‌. मनुष्य तर ज्यांनी जे ऐकवले, ते सत्य म्हणत राहतात. भक्तिमार्गात असणाऱ्यांनी भक्तीच शिकवली आहे. देवतांच्या कर्तव्याबद्दल कोणालाच माहिती नाही. शिवाची पूजा सर्वात उच्च मानतात. उच्च ते उच्च शिव आहेत. त्यांचीच आठवण करा, स्मरण करा. माळ पण देतात. शिव शिव म्हणून माळ जपत राहतात. बिगर अर्थ माळ जपत शिव शिव असे म्हणत राहतात. अनेक प्रकारच्या शिक्षा गुरु लोक देतात. येथे तर एकच गोष्ट आहे, बाबा स्वतः म्हणतात, माझी आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतील. शिव शिव मुखाद्वारे म्हणायचे नाही. पित्याचे नाव मुलगा थोडेच जपत राहतो. या सर्व गुप्त गोष्टी आहेत. कोणालाही माहिती नाही की, तुम्ही काय करत आहात. ज्यांनी कल्पापूर्वी समजले असेल, तेच समजतील. नवीन नवीन मुलं येत राहतात, वृध्दी होत राहते. पुढे चालून पहा, हे वैश्विक नाटक काय-काय दाखवते? , ते त्रयस्त होऊन पाहायचे आहे. अगोदर बाबा साक्षात्कार करणार नाहीत की, असे होईल, परत नाटक तर कृत्रिम होईल. या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला समज मिळाली आहे. भक्तिमार्गा मध्ये बेसमज होते. तुम्ही जाणता, वैश्विक नाटकांमध्ये भक्तीची पण नोंद आहे.

आता तुम्ही मुलं समजतात, आम्ही या जुन्या दुनिये मध्ये राहणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये जसे शिक्षण राहते, तसे तुम्हाला पण मुख्य मुख्य ज्ञानाच्या मुद्द्याला बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. क्रमांक एकची गोष्ट अल्फचा पाठ पक्का करा, तेव्हाच पुढे जावा, नाही तर फालतू प्रश्न विचारत राहतात. मुली लिहतात, अमक्याने लिहून दिले की, गीताचे भगवान शिव आहेत. हे तर बिलकुल ठीक आहे. जरी असे म्हणतात परंतु बुद्धीमध्ये थोडेच बसते. जर समजले की शिवपिता आले आहेत, तर म्हणतील अशा बाबांना आम्ही जाऊन भेटू. एकाला पण निश्चय बसत नाही. लगेच एकाची पण चिठ्ठी येत नाही. जरी म्हणतात की, खूप चांगले आहे, परंतु इतकी हिंमत होत नाही, जे समजतील, असे बाबा ज्यांच्यापासून आम्ही इतका वेळ दूर राहिलो, भक्तिमार्ग मध्ये अनेक धक्के खाल्ले, आत्ता ते बाबा विश्वाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत, तर लगेच भेटायला पाहिजे. पुढे चालून अशी मुलं येतील. जर शिवपित्याला ओळखले आहे, जर उच्च ते उच्च भगवान आहेत, तर त्यांचे बनायला पाहिजे ना. असे ज्ञान द्यायला पाहिजे, ज्यामुळे बुद्धीचे कपाट उघडेल, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कामधंदा इत्यादी करत आत्म्याला पावन बनवण्यासाठी वेळ काढून आठवण करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. कोणतेही आसुरी काम कधीच करायचे नाही.

(२) आपले व दुसऱ्याचे कल्याण करायचे आहे. शिकायचे आणि शिकवायचे आहे. फक्त पोपटासारखे बनायचे नाही. आठवणीचे बळ जमा करायचे आहे.

वरदान:-
साकार पित्याचे अनुकरण करून क्रमांक एक घेणारे संपूर्ण फरिश्ता भव.

क्रमांक एक मिळण्याचे सहज साधन आहे, जे क्रमांक एकचे ब्रह्मा पिता आहेत, त्यांनाच पहा. अनेकांना पाहण्याच्या ऐवजी, एकाला पहा आणि त्यांचेच अनुकरण करा. आम्हीच फरिश्ता आहोत, हा मंत्र पक्का करा, तर अंतर नष्ट होईल. परत विज्ञानाचे यंत्र आपले काम सुरु करेल आणि तुम्ही संपूर्ण फरिश्ता देवता बनून नवीन दुनिया मध्ये अवतरित व्हाल. तर संपुर्ण फरिश्ता बनणे, म्हणजेच साकार पित्याचे अनुकरण करणे.

बोधवाक्य:-
मनन केल्यामुळे जे आनंद रुपी लोणी निघते, तेच जीवनाला शक्तिशाली बनवते.