11-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,सर्वात प्रिय शिव बाबा आले आहेत, तुम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवण्यासाठी,तर त्यांच्या श्रीमता वरती चाला"

प्रश्न:-
मनुष्य परमात्म्याच्या बद्दल कोणत्या दोन गोष्टी,एकमेका पेक्षा वेग-वेगळ्या बोलतात?

उत्तर:-
एकीकडे म्हणतात,परमात्मा अखंड ज्योति आहेत आणि दुसरीकडे म्हणतात ते नावारूपा पेक्षा वेगळे आहेत.या दोन्ही गोष्टी एक दुसर्यापेक्षा वेग-वेगळ्या आहेत.अर्थ सहित न जाणल्यामुळे च पतित बनत जातात.बाबा जेव्हा येतात, तेव्हाच आपला सत्य परिचय देतात.

गीत:-
मरायचे तुझ्या गल्लीमध्ये, जगायचे तुझ्याच गल्लीमध्ये...

ओम शांती।
मुलांनी गित ऐकले. जेव्हा कोणी मरतात, तर पित्या जवळ जन्म घेतात.असे म्हणतात की,पित्याजवळ जन्म घेतला, मातेचे नाव घेत नाहीत.अभिनंदन पण पित्याचे च करतात.आता तुम्ही मुलं जाणतात,आम्ही आत्मा आहोत,ती झाली शरीराची गोष्ट.एक शरीर सोडून परत दुसऱ्या पित्याजवळ जन्म घेतात.तुमचे ८४ जन्मांमध्ये, ८४ साकारी पिता झाले आहेत.वास्तव मध्ये तुम्ही निराकार पित्याची मुलं आहात. तुम्ही आत्मा परमपिता परमात्मा चे मुल आहात. तुम्ही राहणारे पण तेथील आहात, ज्याला निर्वाण धाम किंवा शांतीधाम म्हटले जाते.वास्तविक तुम्ही तेथील रहिवासी आहात,बाबा पण तेथेच राहतात.येथे येऊन तुम्ही लौकिक पित्यांची मुलं बनतात,तर परत त्यालाच विसरतात. सतयुगामध्ये तुम्ही खूप सुखी बनतात,तर त्या पारलौकिक पित्याला विसरतात.सुखामध्ये कोणी पारलौकिक पित्याचे स्मरण करत नाही,दुःखामध्ये सर्व करतात. आणि आत्माच आठवण करते. जेव्हा लौकिक पित्याची आठवण करतात,तर दृष्टी शरिराकडे जाते.हे बाबा त्यांची आठवण करतील,तर म्हणतील ओ बाबा. दोन्ही बाबा आहेत.बरोबर अक्षर बाबाच आहे. हे पण पिता आहेत,ते पण पिता आहेत.आत्मा त्या आत्मिक पित्याची आठवण करते,तर बुद्धी तेथे जाते.हे पिताच सन्मुख मुलांना समजावतात.आता तुम्ही हे जाणतात, बाबा आले आहेत, आम्हाला आपले बनवले आहे. बाबा म्हणतात प्रथम मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते,तुम्ही खूप सावकार होते,परत ८४ जन्म घेऊन, वैश्विक नाटकानुसार आता तुम्ही दुःखी बनले आहात.आता वैश्विक नाटका नुसार जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुमची आत्मा आणि शरिर रुपी वस्त्र सतोप्रधान होते,परत सुवर्णयुगामधून चांदीच्या युगामध्ये आत्मा आली,तर शरीर पण चांदीच्या युगामध्ये आले,परत तांब्याच्या युगामध्ये आले.आता तुमची आत्मा बिलकुल्च पतित झाली आहे,तर शरीर पण पतित मिळाले आहे.जसे १४ कॅरेट सोने कोणी पसंत करत नाही,कारण काळे पडते.तुम्ही पण आत्ता काळे लोहयुगी बनले आहात.तर आत्मा आणि शरीर जे असे काळे बनले आहेत,परत पवित्र कसे बनतील?. आत्मा पवित्र बनली तर शरीर पवित्र मिळते.ते कसे होईल? काय गंगा स्नान केल्यामुळे होईल,नाही. बोलवतात हे पतित पावन असे आत्माच म्हणते.बुध्दी पारलौकिक पित्याकडे चालली जाते,हे बाबा.पहा,बाबा शब्द खूप गोड आहे.भारतामध्येच बाबा बाबा म्हणत राहतात.आता तुम्ही आत्माभिमानी बनून बाबाचे बनले आहेत.बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते,नवीन शरीर धारण केले होते.आता तुम्ही कसे बनले आहात.या गोष्टी नेहमी बुद्धीमध्ये राहिल्या पाहिजेत. बाबांची आठवण करायला पाहिजे ना. आठवण पण करतात ना,हे बाबा,आम्ही पतित बनलो आहोत. आता तुम्ही येऊन पावन बनवा. अविनाशी नाटकांमध्ये ही भूमिका आहे,तेव्हा तर बोलवतात.वैश्विक नाटकानुसार तेव्हाच येतील,जेव्हा जुन्या दुनिया पासून नवीन बनायची असेल,तर जरुर संगमयुगा मध्येच येतील.तुम्हा मुलांना निश्चय आहे की,सर्वात प्रिय बाबा आहेत.असे म्हणतात, गोड,फार गोड, खूप-खुप गोड.आत्ता गोड कोण आहेत? लौकिक संबंधांमध्ये प्रथम गोड पिता आहेत, परत शिक्षक आहेत. ते तर चांगले असतात.त्यांच्याद्वारे शिकून पद मिळवतात.ज्ञानाला कमाईचे साधन म्हटले जाते.ज्ञान म्हणजे नाॅलेज.योग म्हणजे आठवण.बेहदचे पिता ज्यांनी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले होते,त्यांना तुम्ही आता विसरले आहात.शिवबाबा कसे आले,हे कोणालाच माहिती नाही.चित्रा मध्ये पण स्पष्ट दाखवले आहे.ब्रह्माद्वारा स्थापना शिवबाबा करतात.कृष्ण कसे राजयोग शिकवतील?सतयुगा साठीच राजयोग शिकवतात.तर जरुर संगम युगामध्येच बाबांनीच शिकवला असेल.सतयुगाची स्थापना करणारे बाबाच आहेत.शिवबाबा यांच्याद्वारे करतात.करन-करावनहार आहेत ना.ते लोक त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात.उच्च ते उच्च तर शिव आहेत ना.हे साकार आहेत,ते निराकार आहेत.सृष्टी पण येथेच आहेत.या सृष्टीचे चक्र फिरत राहते, त्याची पुनरावृत्ती होत राहते.सूक्ष्म वतनच्या सृष्टीचे गायन केले जाते. विश्वाचा इतिहास भूगोल,मनुष्यांची पुनरावृत्ती होत राहते.सूक्ष्म वतनचे चक्र इत्यादी नसते.गायन पण आहे, विश्वाचा इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते.त्या गोष्टी येथीलच आहेत.सतयुग त्रेता मध्ये जरूर संगमयुग पाहिजे,नाहीतर कलियुगाला सतयुग कोण बनवेल. नरकवासींना स्वर्गवासी बनवण्यासाठी बाबा संगमयुगा मध्येच येतात.ते तर सर्वोच्च अधिकारी,ईश्वरीय शासन आहे. सोबत धर्मराज पण आहेत.आत्माच म्हणते मज निर्गुण मध्ये कोणते गुण नाहीत.कोणत्याही देवताच्या मंदिरांमध्ये जाल,तर त्यांच्यापुढे असेच म्हणतात.असे फक्त शिव पित्याच्या मंदिरामध्येच म्हणायला पाहिजे.त्यांना सोडून जे भाऊ देवता आहेत,त्यांच्यापुढे म्हणतात.देवता तर आपले भाऊ झाले ना.भावा द्वारे वारसा काहीच मिळत नाही.भावांची पूजा करत करत खाली उतरत आले आहेत. आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आले आहेत,त्यांच्याद्वारे आम्हाला वारसा मिळतो.बाबांना जाणत नाहीत,सर्वव्यापी म्हणतात.कोणी म्हणतात,अखंड ज्योतीस्वरुप आहेत,तर कोणी म्हणतात,ते तर नावारूपा पेक्षा वेगळे आहेत.जेव्हा अखंड ज्योति स्वरूप आहेत,तर नावावर पेक्षा वेगळे कसे होतील? बाबांना न झाल्यामुळेच पतित बनले आहेत.तमोप्रधान पण बनायचे आहेच,परत जेव्हा बाबा येतात, तेव्हाच येऊन सर्वांना सतोप्रधान बनवतात.आत्मे निराकारी दुनिया मध्ये सर्व शिव पित्याच्या सोबत राहतात,परत येथे सतो,रजो, तमोमध्ये येऊन भूमिका वठवतात.आत्माच पित्याची आठवण करते.बाबा येतात पण, आणि म्हणतात मी ब्रह्मा तनाचा आधार घेतो.हा भाग्यशाली रथ आहे.आत्म्या शिवाय रथ थोडेच असू शकतो.आत्ता तुम्हा मुलांना समच आली आहे.ही ज्ञानाची वर्ष आहे,ज्ञान आहे,याद्वारे काय होते. पतित दुनिये पासून पावन दुनिया बनते.गंगा-जमना तर सतयुगा मध्येच असतात.असे म्हणतात कृष्ण जमुनाच्या किनाऱ्यावरती खेळपान करतात.अशा कोणत्या गोष्टी नसतात.ते तर सतयुगाचे राजकुमार आहेत.खूप चांगल्या प्रकारे त्यांचे पालनपोषण होते, कारण फुला सारखे आहेत ना.फुलं खूप सुंदर असतात.फुलांद्वारे सुगंध घेऊन.काट्यांचा थोडाच सुगंध घेतला जातो.आता तर ही काट्याची दुनिया आहे.बाबा येऊन काट्याच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवतात,म्हणून त्यांचे नाव बाबुलनाथ पण ठेवले आहे. काट्यांना सन्मुख फुल बनवतात, म्हणून त्यांची महिमा गायन करतात की,ते काट्यांना फुल बनवणारे आहेत.आता तुम्हा मुलांचे बाबा सोबत खूप प्रेम असायला हवे.ते लौकिक पिता तर तुम्हाला,गटर मध्ये घेऊन जातात,म्हणजे विकारांमध्ये घेऊन जातात.हे बाबा तर २१ जन्मासाठी तुम्हाला गटर मधून काढून पावन बनवतात.तर तुम्हाला ते तुम्हाला पतित बनवतात,तेव्हा तर लौकिक पिता असताना पण पारलौकिक पित्याचीच आत्मा आठवण करते. आता तुम्ही जाणता की,अर्धा कल्प त्याची आठवण करत आलो आहोत.बाबा येतात पण, जरूर. शिवजयंती पण साजरी करतात ना. तुम्ही जाणतात आम्ही बेहद्दच्या बाबांचे बनलो आहोत.आता आमचा संबंध त्यांच्याशी आहे.तर लौकिकशी पण आहे,त्याची आठवण केल्यामुळे तुम्ही पावन बनतात.आत्मा जाणते ते आमचे लौकिक आणि ते पारलौकिक पिता आहेत.भक्तिमार्गा मध्ये आत्मा जाणते,तेव्हा तर म्हणतात हे भगवान,ओ ईश्वरीय पिता.अविनाश पित्याची आठवण करत आले आहेत.तर बाबा येऊन स्वर्गाची स्थापना करतात,हे कोणालाही माहिती नाही.ग्रंथांमध्ये तर युगाचे आयुष्य पण खूप लांबलचक दिले आहे. हे कोणाच्या विचारात येत नाही की,बाबा पावन बनवण्यासाठी येतात,तर जरूर संगम मध्ये येतील.कल्पाचे आयुष्य लाखो वर्षे लिहून मनुष्याला अंधारामध्ये घेऊन गेले आहेत‌. बाबांना भेटण्यासाठी धक्के खात राहतात.असे म्हणतात जे खूप भक्ती करतात,त्यांना भगवान भेटतात‌.सर्वात जास्त भक्ती करणाऱ्यांना जरूर प्रथम भेटायला पाहिजेत ना.बाबांनी हिशोब सांगितला आहे,सर्वात जास्त भक्ती तुम्हीच करतात,तर तुम्हालाच प्रथम भगवंता द्वारे ज्ञान मिळाले पाहिजे,जे तुम्हीच नवीन दुनिया मध्ये राज्य कराल. ‌बेहद्दचे पिता तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. यामध्ये कष्टाची कोणतीच गोष्ट नाही. बाबा म्हणतात तुम्ही अर्धा कल्प आठवण केली.सुखामध्ये तर कोणी आठवण करत नाहीत. अंतकाळात जेव्हा दुःखी बनतात, तेव्हाच मी येऊन सुखी बनवतो. आता तुम्ही खूप मोठे मनुष्य बनतात, पहा मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचे बंगले किती चांगले असतात. स्वर्गामध्ये तर गाई,सर्व फर्निचर इत्यादी खूप चांगले असतात.तुम्ही तर खूप मोठे मनुष्य बनतात.दैवी गुणांचे देवता स्वर्गाचे मालक बनतात. तेथे तुमचे महल पण हिरे जवाहरतांचे असतात. तुमचे फर्निचर केलेले खूप चांगले असते हे तर झोके इत्यादी तर सर्व काही साधारण आहेत.स्वर्गामध्ये तर खूप चांगले हिऱ्या मोत्यांनी सजवलेले असतात.हा रूद्र ज्ञान यज्ञ आहे.शिवला रुद्र पण म्हणतात. जेव्हा भक्तीपूर्ण होते तर भगवान रुद्र यज्ञ स्थापन करतात, त्यांचेच गायन करतात.भक्ती सदैव तर चालत राहत नाही.भक्ती आणि ज्ञान. भक्ती रात्र आहे आणि ज्ञान दिवस आहे.बाबा येऊन दिवस बनवतात.तर मुलांचे बाबा सोबत खूपच प्रेम असायला हवे.बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात. सर्वात प्रिय बाबा आहेत.त्यांच्या पेक्षा जास्त प्रिय कोणती वस्तू असू शकत नाही.अर्ध्याकल्पा पासून आठवण करत आले आहेत.बाबा येऊन आमचे दुःख दूर करा.बाबा समजवतात तुम्हाला आपल्या ग्रहस्त मध्येच राहायचे आहे.येथे बाबा जवळ किती दिवस राहणार? बाबाच्या सोबत तर परमधाम मध्येच राहू शकतात.येथे इतकी सर्व मुलं तर राहू शकत नाहीत.शिक्षक प्रश्न कसे विचारतील,लाऊडस्पीकर वरती प्रतिसाद कसे देऊ शकतील, म्हणून थोड्या-थोड्या विद्यार्थ्यांना शिकवतात.कॉलेज तर खूप असतात.परत सर्वांची परीक्षा होते. त्यांची यादी काढतात.येथे तर एक बाबाच शिकवतात.हे पण समजावयाला पाहिजे,दुःखामध्ये स्मरण तर त्या पारलौकिक पित्याचे करतात. आत्ता हे बाबा आले आहेत.महाभारी महाभारत लढाई पण समोर आहे.ते समजतात, महाभारत लढाईमध्ये कृष्ण आले, असे तर होऊ शकत नाहीत.बिचारे खूप गोंधळून गेले आहेत.परत कृष्ण कृष्ण असे आठवण करत राहतात.आता सर्वात प्रिय तर शिव आहेत आणि कृष्ण पण आहेत. परंतु ते निराकार आणि हे साकार आहेत.निराकार पिता सर्व आत्म्याचे पिता आहेत.दोन्ही प्रिय आहेत कृष्ण पण विश्वाचे मालक आहेत ना.आता तुम्ही निर्णय करू शकता, सर्वात प्रिय कोण आहेत?शिवबाबा तर असे लायक बनवतात.कृष्ण काय करतात.बाबाच त्यांना असे लायक बनवतात.तर गायन पण त्यांचे व्हायला पाहिजे.शंकराचे नृत्य इत्यादी दाखवतात.वास्तव मध्ये नृत्य इत्यादीची गोष्टच नसते.तुम्ही सर्व पार्वती आहात.हे शिव अमरनाथ तुम्हाला कथा ऐकवत आहेत.ती निर्विकारी दुनिया आहे. विकारीच गोष्टच नाही.बाबा विकारी दुनिया थोडीच स्थापन करतील. विकारांमध्येच दुःख आहे.मनुष्य हठयोग इत्यादी खूप शिकतात. गुफे मध्ये जाऊन बसतात,अग्नीमधून चालत राहतात. रिद्धी-सिद्धी पण खूप आहे.जादूगर पण अनेक गोष्टी काढत राहतात. भगवंताला पण जादुगर, रत्नगर सौदागर म्हणतात. तर जरूर चैतन्य मध्ये आहेत ना. असे म्हणतात, मी येतो,जादूगर आहे ना.मनुष्याला देवता, गरिबाला राजकुमार बनवतात.अशी जादू कधी पाहिले आहे का,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) फुलांच्या बागेमध्ये जायचे आहे, म्हणून सुगंधित फुल बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही.एका पारलौकिक बाबांशी सर्व संबंध जोडायचे आहेत.

(२) शिवबाबा सर्वात प्रिय आहेत, चर्या एकाशीच प्रेम करायचे आहे. सुखदाता बाबांची आठवण करायची आहे.

वरदान:-
या लोका मधील व्यक्तीच्या लगावा पासून मुक्त बनून, अव्यक्त वतन ची सहल करणारे उडणारे पक्षी भव.

बुद्धि रुपी विमानाद्वारे अव्यक्त वतन आणि मूळ वतन चे सहल करणारे उडणारे पक्षी बना.बुद्धी द्वारा जेव्हा पाहिजे जिथे पाहिजे,तेथे पोहोचा. हे तेव्हाच होईल,जेव्हा बिल्कुल ह्या लोकांतील लोकांच्या लगावा पासून मुक्त राहा.हा असार संसार आहे, असा संसारा मध्ये,जेव्हा कोणतेच काम नाही, कोणतीच प्राप्ती नाही तर, बुद्धी पण जायला नको. हा रौरव नर्क आहे,यामध्ये जाण्यासाठी संकल्प आणि स्वप्न पण यायला नको.

बोधवाक्य:-
आपला चेहरा आणि चलन द्वारे सत्यताच्या सभ्यतेचा अनुभव करवणेच श्रेष्ठता आहे.