11-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुम्हाला खूप आनंद व्हायला पाहिजे , की आम्ही आत्ता जुने वस्त्र सोडून घरी जाऊ , परत नवीन वस्त्र ( शरीर ) नवीन दुनियेत मिळेल .

प्रश्न:-
नाटकाचे कोणते रहस्य खूपच चांगल्या रीतीने समजायचे आहे ?

उत्तर:-
अविनाश नाटक चालत राहते,टिक टिक होत राहते,जे कार्य झाले,हुबेहुब पाच हजार वर्षांनंतर त्याची पुनरावृत्ती होते,हे रहस्य खूपच समजण्याचे आहे.जी मुलं या रहस्याला चांगल्या प्रकारे समजत नाहीत, ते म्हणतात अविनाश नाटकामध्ये असेल तर पुरुषार्थ करू,अशी मुलं उच्च पद मिळवू शकत नाहीत.

ओम शांती।
मुलांना बाबांचा परिचय मिळाला परत बाबांकडून वारसा घ्यायचा आहे आणि पावन बनायचे आहे.असे म्हणतात हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा कारण समजतात आम्ही पतित बुद्धी आहोत.बुद्धी पण म्हणते ही पतित दुनिया आहे.नवीन दुनिये ला सतोप्रधान,जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते.मुलांना आता बाबा मिळाले आहेत,भक्तांना भगवान मिळाले आहेत. असे म्हणतात,भक्तीच्या नंतर भगवान येऊन भक्तीचे फळ देतात कारण कष्ट करतात,तर फळ पण मागतात.भक्त काय कष्ट करतात,ते पण तुम्ही जाणतात.तुम्ही भक्तिमार्गात धक्के खाऊन थकले आहात. भक्तीमध्ये खूप कष्ट आहेत केले आहेत,ही पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. फायदा मिळण्यासाठी कष्ट केले जातात. असे समजतात भगवान येऊन भक्तीचे फळ देतील,फळ देणारे भगवानच आहेत. भक्त भगवंतांची आठवण करतात कारण भक्तीमध्ये खूप दुःख आहे,म्हणून म्हणतात येऊन आमचे दुःख दूर करा,पावन बनवा, पण कोणीही जाणत नाहीत.हे रावण राज्य आहे.रावणानेच पतित बनवले आहे.असे म्हणतात रामराज्य पाहिजे परंतु ते कधी, कसे होईल हे कोणीच जाणत नाहीत. आत्मा समजते हा भक्तिमार्ग आहे. भक्तीमध्ये खूप नाचत किर्तन इत्यादी करतात.खुशी पण होते,परत रडतात पण. भगवंताच्या प्रेमामध्ये आश्रू येतात परंतु भगवंताला जाणत नाहीत,ज्याच्या प्रेमा मुळे आश्रु येतात,त्यांना ओळखायला पाहिजे ना.चित्राद्वारे काहीच मिळू शकत नाही.होय खूप भक्ती करतात तर साक्षात्कार होतो,बस तीच त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.भगवान स्वतःहून आपला परिचय देतात की,मी कोण आहे? मी जो आहे,जसा आहे,दुनिया जाणत नाही.तुमच्या मध्ये पण जे बाबा बाबा म्हणतात त्यांच्यामध्ये पण काही पक्के,काही कच्चे आहेत.देह अभिमान नष्ट होण्यास कष्ट लागतात.देही अभिमानी बनावे लागेल.बाबा म्हणतात तुम्ही आत्मा आहात.तुम्ही 84 जन्म भोगुन तमोप्रधान बनले आहात.आता आत्म्याला तिसरा नेत्र मिळाला आहे.आत्मा समजत आहे.तुम्हा मुलांना साऱ्या सृष्टीच्या चक्राचे ज्ञान बाबा देत आहेत.बाबा ज्ञानाचे सागर आहेत,तर मुलांना ज्ञान देतात.कोणी पण विचारले तुम्ही फक्त 84 जन्म घेतात का?तर सांगा आमच्यामध्ये पण कोणी 84 कोणी 82 जन्म घेतात. जास्तीत जास्त ८४ जन्मच घेतात.८४ जन्म त्यांचेच आहेत, जे सुरुवातीला येतात. जे चांगल्या रीतीने अभ्यास करतात, ते उच्चपद मिळवतात, ते सृष्टीच्या सुरुवातीला येतील. माळेमध्ये जवळ गुंफले जातील.जसे नवीन घर बनत राहते,तर मनामध्ये येते आता लवकर घर बनेल आणि आम्ही नवीन घरांमध्ये जाऊ. तर मुलांना आनंद व्हायला पाहिजे की, आम्ही हे जुने वस्त्र सोडून नवीन घेणार आहोत.नाटकांमध्ये कलाकार अर्धा तास अगोदरच घड्याळ पाहतात,वेळ पूर्ण होत आहे,घरी जायचे आहे,ती वेळ येते.तुम्हा मुलांसाठी हे बेहदचे घड्याळ आहे.तुम्ही जाणता जेव्हा कर्मातीत अवस्था प्राप्त होईल,तर आम्ही इथे राहू शकणार नाहीत. कर्मातीत बनण्यासाठी बाबांच्या आठवणी मध्ये राहावे लागेल,यासाठी खूप कष्ट घ्यायचे आहेत.नवीन दुनिये मध्ये तुम्ही जाता,परत एकेक जन्मा मध्ये कला कमी होत जातात.नवीन घरांमध्ये सहा महिने झाल्यानंतर काहीना काही डाग इ.पडतात ना,थोडा फरक पडतो. तर तेथे नवीन दुनिया मध्ये कोणी प्रथम येतील,कोणी थोडे उशिरा येतील.प्रथम जे येतील त्यांना सतोप्रधान म्हणू परत हळूहळू कला कमी होत जातात.हे नाटकाचे चक्र हळूहळू चालत राहते.टिक टिक होत राहते.तुम्ही जाणता या दुनिया मध्ये,जे पण कार्य चालते,चक्र फिरत राहते.या खूप सूक्ष्म गोष्टी समजण्याच्या आहेत.बाबा अनुभवाद्वारे ऐकवतात. तुम्ही जाणता, हे शिक्षण परत पाच हजार वर्षांनंतर पुनरावृत्त होईल.हे पूर्वनियोजित नाटक आहे,खेळ आहे.या चक्राची कोणालाच माहिती नाही.याचे निर्माता-दिग्दर्शक मुख्य कलाकार कोण आहेत,काहीच जाणत नाहीत.आता तुम्हाला माहिती आहे,आम्ही 84 जन्म भोगुन परत जात आहोत.आम्ही आत्मा आहोत.देही अभीमानी बनल्या नंतरच खुशीचा पारा चढेल.ते हदचे नाटक आहे,हे बेहदचे नाटक आहे.आम्हा आत्म्यांना बाबा शिकवत आहेत.बाबा हे सांगत नाहीत अमक्या वेळेत असे होईल,हे होईल. बाबांना कोणी विचारतात तर म्हणतात, बेहदच्या नाटकांमध्ये जे सांगायचे आहे ते सांगतो.नाटकाच्या नियमा नुसार जे उत्तर मिळायचे आहे,ते मिळाले,बस.त्यावरती चालायचे आहे.नाटकाच्या नियमा शिवाय बाबा पण काहीच करू शकत नाहीत. काही मुलं म्हणतात अविनाश नाटकांमध्ये असले तर पुरुषार्थ करू,असे म्हणनारे कधीच उच्च पद मिळवू शकत नाहीत.बाबा म्हणतात तुम्हाला पुरुषार्थ तर जरुर करायचा आहे.हे नाटक तुम्हाला पुरुषार्थ करवते,कल्पा पूर्वीप्रमाणे.कोणी नाटका वरती थांबतात आणि म्हणतात जे भाग्या मध्ये असेल ते होईल,तर समजले जाते यांच्या भाग्य मध्ये नाही. आता तुम्हाला स्मृती आली आहे,आम्ही आत्मा आहोत. आम्ही ही भूमिका करण्यासाठी आलो आहोत. आत्मा पण अविनाशी, भुमिका पण अविनाशी. तीच भूमिका परत वठवतील, याला कुदरत म्हटले जाते. कुदरतचा आणखी काय विस्तार करणार.आता मुख्य गोष्ट हीच आहे की पावन जरूर बनायचे आहे.हीच काळजी आहे,कर्म करत बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.तुम्ही एका साजनच्या सजनी आहात.एका साजनची सर्व सजनी आठवण करतात.ते साजन म्हणतात, माझी आठवण करा,मी तुम्हाला पावन बनवण्यासाठी आलो आहे.तुम्ही मलाच पतित-पावन म्हणतात,परत मला विसरून गंगेला पतित पावनी का म्हणतात?आता तुम्ही समजले आहे,तर ते सर्व सोडून दिले आहे.तुम्ही समजता बाबाच पतित पावन आहेत.आता पतित-पावन कृष्णाला समजून कधी आठवण करणार नाहीत. भगवान कसे येतात हे तर कोणी जाणत नाहीत.कृष्णाची आत्मा जी सतयुगा मध्ये होती,ती अनेक रूप धारण करत करत,आत्ता तमोप्रधान बनली आहे,परत सतोप्रधान बनेल.ग्रंथांमध्ये ही चूक केली आहे.अशी चूक जेव्हा होईल तेव्हाच मी येऊन तुम्हाला अभुल बनवेल.या चुका पण यावेळी नाटकांमध्ये आहेत,परत होतील. आता तुम्हाला समजले आहे,शिव भगवानुवाच.भगवान शिवालाच म्हणतात. भगवान तर एकच असतात.सर्व भक्तांना फळ देणारे एकच भगवान आहेत,त्यांना कोणीच जाणू शकत नाही.आत्मा म्हणते हे ईश्वरीय पिता.ते लौकिक पिता तर येथे पण आहेत,तरी त्या पारलौकिक पित्याची आठवण करतात,तर आत्म्याचे दोन पिता झाले ना.भक्तिमार्ग मध्ये पण त्याची आठवण करत राहतात.आत्मा तर आहेच. इतक्या सर्व आत्म्यांना आपापली भूमिका मिळाली आहे.एक शरीर सोडून दुसरे घेत भूमिका वठवत राहते.या सर्व गोष्टीं बाबाच समजवतात.असे म्हणतात,आम्ही येथे भूमिका,अभिनय करण्या साठी आलो आहोत.हा मंडप आहे,यामध्ये चंद्र-तारे इत्यादी सर्व प्रकाश देणारे आहेत.या सूर्य चंद्र ताऱ्यांना मनुष्य देवता समजतात, कारण हे खूप चांगले काम करतात, प्रकाश देतात,कोणाला काहीच कष्ट देत नाहीत. सर्वांना सुख देतात.खूप काम करतात म्हणून त्यांना देवता म्हणतात.चांगले काम करणाऱ्यांना म्हणतात,हे तर जसे देवता आहेत.वास्तव मध्ये देवता तर सतयुगा मध्येच असतात.सर्वांना सुख देणारे होते. सर्वां सोबत प्रेम होते,म्हणुन देवतां सोबत तुलना केली जाते.देवतांच्या गुणांचे गायन केले जाते. त्यांच्यापुढे जाऊन म्हणतात आम्हा निर्गुण मध्ये काहीच गुण नाहीत. तुम्ही दया करा.तुम्हाला दया तर करावी लागेल ना.बाबा म्हणतात दया आली म्हणून तर मी परत आलो आहे,तुम्हाला गुणवान बनवण्या साठी.तुम्ही जे पुज्य होते,ते आता पुजारी बनले आहात,परत पुज्य बना.हम सो चा अर्थ,आम्हीच देवता होतो परत ब्राह्मण बनलो,हे पण तुम्हाला समजावले आहे.मनुष्य म्हणतात आत्माच परमात्मा,परमात्माच आत्मा.बाबा म्हणतात हे चुकीचे आहे.तुम्ही देवता होते परत क्षत्रिय,वैश्य, शूद्र बनले.आता ब्राह्मण वर्णा मध्ये आले आहात.आता तुम्ही मुलं समजता,हे ज्ञान बाबा आम्हाला,कल्प कल्प येऊन देतात. बरोबर भारत स्वर्ग होता,तेथे खूप थोडे मनुष्य होते.आता कलियुग आहे,सर्व धर्म आले आहेत.सतयुगा मध्ये दुसरे धर्म नसतात. तेथे एकच धर्म असतो.बाकी सर्व आत्मे चालले जातात.तुम्ही जाणतात,आत्ता या जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे.बाबा राजयोग शिकवत आहेत.कोणी पण आले तर सांगा,हे बेहदचे घड्याळ आहे.बाबांनी दिव्यदृष्टी देऊन हे घड्याळ बनवले आहे.जसे ते घड्याळ तुम्ही सारखे सारखे पाहता,आता या बेहदच्या घड्याळा ची आठवण येते.शिव पिता ब्रह्मा द्वारे एक धर्माची स्थापना,शंकरा द्वारे आसुरी दुनिये चा विनाश करवतात.बुद्धी पण म्हणते चक्र जरूर फिरणार आहे.कलियुगाच्या नंतर सतयुग येईल.आता मनुष्य पण खूप आहेत,तर उपद्रव पण खूप होत राहतात. मुसळ पण तेच आहेत.ग्रंथांमध्ये खूप गोष्टी बनवल्या आहेत.बाबा येऊन वेद,ग्रंथ इत्यादी चे रहस्य समजवतात.मुख्य धर्म चार आहेत,हा ब्राह्मण धर्म पाचवा आहे. सर्वात छोटा धर्म आहे.यज्ञाची संभाळ करणारे ब्राह्मण आहेत.हा ज्ञान यज्ञ आहे. उपद्रव नष्ट करण्यासाठी यज्ञाची स्थापना करतात,ते समजतात लढाई इत्यादी लागायला नको.अरे लढाई नाही लागली तर सतयुग कसे येईल?इतके सर्व मनुष्य कोठे जातील?मी सर्व आत्म्यांना घेऊन जातो,तर जरूर शरीर येथेच सोडावे लागेल.तुम्ही बोलवता पण,हे बाबा येऊन आम्हाला पतित पासून पावन बनवा. बाबा म्हणतात, मला जरूर जुन्या दुनियेचा विनाश करावा लागेल.पावन दुनिया सतयुग आहे.सर्वांना मुक्तीधाम मध्ये घेऊन जातो.सर्व काळाला बोलवतात ना.हे समजत नाहीत आम्ही तर महा काळाला बोलवत आहोत.बाबा म्हणतात,हे पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे.आत्म्याला छी छी दुनियेपासून शांतीधाममध्ये घेऊन जातो. ही तर चांगली गोष्ट आहे ना.तुम्हाला मुक्तीमध्ये जाऊन परत जीवनमुक्ती मध्ये यायचे आहे आणि परत जीवन बंधन मध्ये पण यायचे आहे.इतके सर्व सतयुगा मध्ये येणार नाहीत परत क्रमा नुसार येतील कारण आता शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा.अंतकाळात जे येतात,त्यांची भूमिका थोडीच असते.प्रथम जरूर ते सुख प्राप्त करतील.तुमची भूमिका सर्वात श्रेष्ठ आहे.तुम्ही खूप सुख प्राप्त करतात. धर्म संस्थापक तर फक्त धर्माची स्थापना करतात,कोणालाच मुक्त करत नाहीत.बाबा तर भारतामध्ये येऊन सर्वांना ज्ञान देतात.तेच सर्वांचे पतित पावन आहेत, सर्वांना मुक्त करतात.दुसरे धर्म स्थापक,सदगती करण्यासाठी येत नाहीत, ते धर्म स्थापन करण्यासाठी येतात.ते काही शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जात नाहीत.सर्वांना शांतीधाम सुखधाम मध्ये बाबाच घेऊन जातात.जे दुःखापासून सोडवून सुख देतात,त्यांचेच तिर्थ होतात. मनुष्य समजत नाहीत,वास्तव मध्ये खरे तिर्थ तर बाबाच आहेत.महिमा पण एक बाबांची आहे.सर्व त्यांना बोलतात,हे मुक्तिदाता या.भारतच खरे तीर्थ आहे जेथे बाबा येऊन सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देतात.त्यामुळे तुम्ही परत भक्तिमार्ग मध्ये त्यांचे मोठे मोठे मंदिर बनवतात.हिरे जवाहर चे मंदिर बनवतात.सोमनाथ मंदिर खूपच सुंदर बनवतात आणि आता पहा बाबा कसे बसले आहेत,पतित शरीर,पतित दुनिया मध्ये.तुम्हीच ओळखता,जाणतात. तुम्ही बाबांचे मदतगार बनतात.दुसऱ्यांना जे रस्ता दाखवतात त्यांना उच्चपद मिळते.हा तर कायदा आहे.बाबा म्हणतात कष्ट करा,अनेकांना ज्ञानाचा रस्ता दाखवा की,बाबा आणि वारशाची आठवण करा. 84 चे चक्र समोर आहे,हे जसे अंधाच्या पुढे आरसा आहे.हे नाटक हुबेहुब पुनरावृत्त होते,तरीही मला कोणी जाणत नाहीत.असे नाही की माझे मंदिर लुटतात,तर मी काय करावे? या अविनाशी नाटकांमध्ये लुटण्याची,जर नोंद असेल,तर लुटतील.मला बोलवतातच पतिता पासून पावन बनवा,तर मी येऊन तुम्हा मुलांना शिकवतो.या नाटकांमध्ये विनाशाची नोंद आहे,तर विनाश पण होईलच.मी काही फुकं देत नाही,ज्यामुळे विनाश होईल.हे मुसळ बनवले आहेत,याची पण नाटकांमध्ये नोंद आहे.मी पण या नाटकाच्या नियमां मध्ये बांधलेला आहे. माझी भूमिका सर्वात श्रेष्ठ आहे,सृष्टीला बदलवणे,पतीता पासून पावन बनवणे. आता समर्थ कोण? मी आहे की हे अविनाश नाटक? रावणाला पण अविनाश नाटका अनुसार यावे लागते.ज्ञान माझ्या मध्ये आहे,ते येऊन मी देतो.तुम्ही शिव बाबांची सेना आहात,रावणावर विजय प्राप्त करतात.बाबा म्हणतात सेवा केंद्र सुरु करत राहा.मी तुम्हाला शिकवण्यासाठी येतो,मी काही घेत नाही.जे तुमच्याजवळ पैसे आहेत,ते सर्व या कार्यामध्ये सफल करा.असे पण नाही सर्व सफल केल्यामुळे भूक मराल.भुख कोणी मरू शकत नाही. बाबांनी सर्व काही दिले,परत भूक मेले काय? तुम्ही भूक मरतात का?शिवबाबाचा भंडारा आहे.आजकाल तर दुनिया मध्ये किती मनुष्य भुखबळी पडतात.आता तुम्हा मुलांना बाबा पासून पूर्ण वारसा घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. हे आत्मिक नैसर्गोपचार केंद्र आहे. बाबा सहज गोष्ट मुखाद्वारे म्हणतात मनमनाभव.आत्म्याला निरोगी बनवतात म्हणून बाबांना अविनाशी सर्जन पण म्हणतात.खूपच चांगल्या प्रकारे ऑपरेशन शिकवतात.माझी आठवण करा,तर तुमचे सर्व दुःख दूर होतील.चक्रवर्ती राजा बनाल.या काट्यांच्या जंगलामध्ये राहत असे समजा,की आम्ही फुलांच्या बागे मध्ये जात आहोत,घरी जात आहोत. एक दोघाला आठवण देत रहा. अल्लाहची आठवण करा तर बादशाही मिळेल,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती,मात पिता,बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
स्व प्रगतीद्वारे सेवेमध्ये प्रगती करणारे , खरे सेवाधारी भव

स्वतःची प्रगतीच,सेवेच्या प्रगतीचा विशेष आधार आहे.स्वतःची प्रगती कमी आहे,तर सेवा पण कमी होते.कोणाला मुखाद्वारे परिचय देणेचं सेवा नाही परंतु प्रत्येक कर्माद्वारा,श्रेष्ठ कर्माची प्रेरणा देणे, ही पण सेवा आहे.जे मन्सा वाचा कर्मणा मध्ये, तत्पर राहतात, त्यांना सेवेद्वारे श्रेष्ठ भाग्याचा अनुभव होतो. जितकी सेवा करतात तेवढे स्वता:च पुढे जात राहतात.आपल्या श्रेष्ठ कर्मा द्वारे सेवा करणारे नेहमी प्रत्यक्ष फळाची प्राप्ती करत राहतात.

बोधवाक्य:-
बाप समान बनण्या साठी,संकल्प,बोलणे आणि करणे समान बनवा.