11.03.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


" गोड मुलांनो, तुम्ही बाबांची ची मुलं मालक आहात, तुम्ही काही बाबांजवळ शरण आले नाहीत, मुलगा कधी पित्या कडे शरणार्थी होत नाही "

प्रश्न:-

कोणत्या गोष्टीचे स्मरण होत राहील तर माया तंग करणार नाही ?

उत्तर:-

आम्ही बाबा जवळ आलो आहोत,ते आपले बाबा पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत,पण ते निराकार आहेत.आम्हा निराकारी आत्म्यांना शिकवणारे निराकार बाबा आहेत.हे बुद्धीमध्ये आठवणीत राहील तर खुशीचा पारा चढलेला राहील आणि माया तंग करणार नाही.

ओम शांती :-त्रिमूर्ती बाबांनी मुलांना समजवले आहे.त्रिमूर्ती पिता पण आहेत ना.तिघांना रचनारे,ते सर्वांचे पिता आहेत कारण उच्च ते उच्च पिताच आहेत.मुलांच्या बुद्धी मध्ये आहे,आम्ही त्यांची मूलं आहोत.जसे बाबा परमधाम मध्ये राहतात,असेच आम्ही आत्मे पण तेथील रहिवासी आहोत.बाबांनी हे पण समजवले आहे,हे नाटक आहे,जे काही होते,ते नाटकांमध्ये एकाच वेळेस होते. बाबा पण एकाच वेळेत शिकवण्या साठी येतात.तुम्ही काय शरणार्थी नाहीत,हे अक्षर भक्ती मार्गातले आहे. मी शरण आलो तुझ्याकडे,मुलगा कधी पित्याचा शरणार्थी होत नाही,कारण मुलं तर मालक असतात.तुम्ही मुलं बाबांचे शरणार्थी नाहीत.बाबांनी तुम्हाला आपले बनवले आहे,मुलांनी पित्याला आपले बनवले आहे.तुम्ही मुलं बाबांना बोलवतातच,हे बाबा येऊन आम्हाला,आपल्या घरी घेऊन चला किंवा राजाई द्या.एक शांतीधाम आहे दुसरे सुखधाम आहे.सुखधाम बाबांची संपत्ती आणि दुःख धाम रावणाची संपत्ती आहे.पाच विकारांमध्ये फसल्यामुळे दुःखच दुःख आहे.आता मुलं जाणतात आम्ही बाबांच्या जवळ आलो आहोत,ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत परंतु निराकार आहेत.आम्हा निराकारी आत्म्यांना शिकवणारे,निराकार आहेत.ते आत्म्या चे पिता आहेत.हे नेहमी बुद्धीमध्ये आठवणीत राहील तर,खुशीचा पारा चढलेला राहील.हे विसरल्यामुळे माया तंग करते.आता तुम्ही बाबा जवळ बसले आहात,तर बाबांचा वारसा आठवणीत येतो.मुख्य लक्ष तर बुद्धीमध्ये आहेना.आठवण शिवबाबांची करायची आहे.कृष्णाची आठवण करणे तर खूपच सहज आहे.शिव बाबांची आठवण करण्या मध्येच कष्ट आहेत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे.कृष्णा वरती तर सर्व लगेच फिदा होतीत.खास मातांना तर,कृष्ण फार आवडतो,आम्हाला कृष्णा सारखा मुलगा मिळावा,कृष्णा सारखा पती मिळावा,म्हणजेच यांच्या सारखा गुणवान, सर्वगुणसंपन्न,सोळा कला संपूर्ण,सुख देणारा मिळावा.स्वर्ग किंवा कृष्णपुरी मध्ये सुखच सुख आहे.मुलं जाणतात येथे आम्ही शिकत आहोत,कृष्ण पुरी मध्ये जाण्यासाठी.स्वर्गाची सर्वच आठवण करतात ना.कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात,अमक्याचा स्वर्गवास झाला,तर खुश व्हायला पाहिजे,टाळ्या वाजवायला पाहिजेत.नरका मधून निघून स्वर्गामध्ये गेले,हे तर खूप चांगले झाले ना.जेव्हा कोणी म्हणतील अमका स्वर्गवासी झाला,तर विचारा कोठून गेला?तर जरूर नरका मधून गेले ना.तर त्यामध्ये खुशीची गोष्ट आहे ना.सर्वांना बोलुन प्रसाद द्यायला पाहिजे परंतु ही तर समजदारीची गोष्ट आहे.ते असे म्हणणार नाहीत की,२१ जन्मासाठी स्वर्गवासी झाला,फक्त म्हणतात स्वर्गामध्ये गेला.अच्छा,परत त्यांच्या आत्म्याला येथे का बोलवतात?नरकाचे भोजन का खाऊ घालतात? नरकामध्ये तर बोलवयाला नाही पाहिजे.हे बाबाच सन्मुख समजवतात,प्रत्येक गोष्ट ज्ञानाची आहे ना.बाबांना बोलवतात आम्हाला पतिता पासून पावन बनवा, तर जरूर पतित शरीराला नष्ट करावे लागेल.सर्व मरतील परत कोण कोणासाठी रडेल?आता तुम्ही जाणता आम्ही हे शरीर सोडून आपल्या घरी जाऊ.आता अभ्यास करत आहोत कसे शरीर सुटेल.असा पुरुषार्थ दुनिया मध्ये कोणी करत असेल? तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की, आमचे हे जुने शरीर आहे,बाबा पण म्हणतात मी जुने शरीर भाड्याने घेतो. नाटकांमध्ये हा रथच निमित्त बनलेला आहे,हा बदलू शकत नाही.यांना परत तुम्ही पाच हजार वर्षा नंतरच पाहू शकतात.नाटकाच्या रहस्याला समजले ना.हे बाबांच्या शिवाय कोणामध्ये ताकत नाही,जे समजावू शकतील.ही शाळा खूपच आश्चर्यकारक आहे.वृद्ध पण म्हणतात,आम्ही ईश्वराच्या शाळेमध्ये जात आहोत,भगवान भगवती बनण्यासाठी.अरे वृद्ध स्त्रिया थोडेच कधी शाळेमध्ये जातात?तुम्हाला कोणी विचारले,तुम्ही कुठे जाता,तर बोला आम्ही ईश्वरीय विद्यापीठ मध्ये जात आहोत.तेथे आम्ही राजयोग शिकत आहोत.अक्षर असे ऐकवा,ज्यामुळे चक्रीत होतील.वृद्ध पण म्हणतील आम्ही ईश्वराच्या शाळेमध्ये जात आहोत.येथे हे आश्चर्य आहे,आम्ही भगवंताच्या जवळ शिकण्यासाठी जात आहोत,असे कोणी म्हणू शकत नाहीत. निराकार भगवान परत कोठून आले? असे म्हणतील,कारण ते समजतात भगवान नावा रूपा पेक्षा वेगळा आहे. आता तुम्ही ज्ञान सहित गोष्टी करतात. प्रत्येक मूर्तीच्या कर्तव्याला तुम्ही जाणतात.बुद्धीमध्ये पक्के आहे,उच्च ते उच्च शिवबाबा आहेत,ज्याची आम्ही संतान आहोत.अच्छा परत सूक्ष्मवतन वासी,ब्रह्मा विष्णू शंकर.तुम्ही फक्त सांगण्यासाठी म्हणत नाही.तुम्ही तर चांगल्या प्रकारे जाणतात,की ब्रह्मा द्वारा स्थापना कशी होते.तुमच्याशिवाय कोणी पण त्यांचे चरित्र सांगू शकत नाही. आपले चरित्र जाणत नाहीत,तर दुसऱ्यांचे कसे जाणतील.तुम्ही आता सर्व काही जाणले आहे.मी जाणतो तर तुम्हा मुलांना पण समजावून सांगतो.राजाई पण बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाहीत.या लक्ष्मी नारायण ने लढाई द्वारे राज्य मिळवले नाही.तेथे लढाई नसते.येथे तर खूप भांडणं करत राहतात.असंख्य मनुष्य आहेत.तुम्हा मुलांच्या मनामध्ये पाहिजे,आम्ही बाबा पासुन ब्रह्मा द्वारे वारसा मिळवत आहोत.बाबा म्हणतात,माझीच आठवण करा,अस म्हणत नाहीत,ज्यांच्या मध्ये प्रवेश केला त्यांची पण आठवण करा.नाही.ते संन्यासी लोक तर आपला फोटो नावासहित देतात.बाबांचा फोटो काढू शकता का? बिंदी च्या वरती नाव कसे लिहिणार? बिंदीवर शिवबाबा चे नाव लिहिले तर, बिंदी पेक्षा नावच मोठे होईल.या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.तर मुलांना खूप खुश राहायला पाहिजे,आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत.आत्माच शिकते ना.आत्माच संस्कार घेऊन जाते.आत्ता बाबा आत्म्या मध्ये संस्कार भरत आहेत.ते बाबा पण आहेत,शिक्षक पण आहेत,आणि गुरु पण आहेत.बाबा तुम्हाला शिकवतात,तर तुम्ही दुसऱ्याला पण शिकवा.सृष्टिचक्राची आठवण करा आणि दुसर्यांना पण करवून द्या.जे त्यांच्यामध्ये गुण आहेत,ते मुलांना पण देतात.मी ज्ञानाचा सागर,सुखाचा सागर आहे.तुम्हाला पण मी असेच बनवतो. तुम्ही पण सर्वांना सुख द्या,कोणाला मनसा वाचा कर्मणा दु:ख देऊ नका. सर्वांच्या कानामध्ये या गोड गोड गोष्टी ऐकवा की,शिव बाबांचीआठवण करा तर आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.सर्वांना संदेश द्या की बाबा आले आहेत,त्यांच्याद्वारे हा वारसा घ्या. सर्वांना संदेश द्यावा लागेल.पेपर वाले पण या ज्ञानाच्या गोष्टी छापतील.हे तर जाणतात,अंत काळात सर्व म्हणतील,हे प्रभु तेरी लीला अपरंपार...तुम्हीच सर्वांना सद्गती देणारे आहेत.दुःखा पासून सोडवून सर्वांना शांतीधाम मध्ये घेऊन जातात.ही पण जादुगरी झाली ना.त्यांची अल्पकाळाची जादूगरी आहे. हे तर मनुष्या पासून देवता बनवतात,तेही २१ जन्मासाठी.या मनमनाभव च्या जादू मुळे तुम्ही लक्ष्मी नारायण बनतात.जादूगर रत्नागर हे सर्व नाव शिवबाबां वरती आहेत,ना की ब्रह्मा वरती आहेत.हे ब्राह्मण ब्राह्मणीया सर्व शिकत आहेत.त्या शिकून परत दुसऱ्यांना शिकतात.बाबा एकटे थोडेच शिकवतील,तुम्ही परत दुसऱ्यांना शिकवतात.बाबा तुम्हाला एकत्रीत शिकवतात.तुम्ही परत दुसऱ्याना शिकवतात. बाबा राज योग शिकवत आहेत.ते पिता पण आहेत,कृष्ण तर रचना आहे ना.वारसा रचनाकारा द्वारेच मिळतो, ना की रचना द्वारे.कृष्णा द्वारे वारसा मिळत नाही. विष्णूचे हे दोन रूप लक्ष्मी नारायण आहेत.लहानपणी राधाकृष्ण आहेत.या गोष्टी पण चांगल्या रीतीने आठवणीत ठेवायच्या आहेत.वृध्द जर चांगला पुरूषार्थ करतील,तर उच्च पद मिळू शकते.वृध्द मातांना थोडा मोह राहतो,आपल्याच रचने मध्ये फसतात.अनेकांचे आठवण येते,त्यांच्या मधुन बुद्धी काढून एक बाबा सोबत जोडणे या मध्ये कष्ट आहेत.जिवंतपणी मरायचे आहे.बुद्धीमध्ये एका वेळेस ज्ञानाचा बाण लागला तर बस.परत युक्तीने चालायचे आहे.असे पण नाही कोणाशी गोष्टीच करायचं नाहीत.गृहस्थ व्यवहारा मध्ये खुशाल राहा,सर्वांशी गोष्टी करा,त्यांच्याशी संबंध पण ठेवा. बाबा म्हणतात आपल्या घरापासून ज्ञान देण्यास सुरुवात करा.जर त्यांच्याशी बोलणार नाही तर त्यांचा उद्धार कसा होईल,दोन्हीकडे संबंध ठेवायचे आहेत. बाबांना विचारतात,लग्नामध्ये जाऊ का?बाबा म्हणतात का नाही जायचे?बाबा म्हणतात कामं महाशत्रू आहे,त्यावरती विजय मिळवायचा आहे,तर तुम्ही जगतजीत बनाल. निर्विकारी सतयुगा मध्येच असतात.योगबळा द्वारे मुलं होतात. बाबा म्हणतात निर्विकारी बना.एकतर हे पक्के करा की,आम्ही शिवबाबा जवळ बसलो आहोत,ते आम्हाला चौऱ्यांशी जन्माची गोष्ट सांगतात.हे सृष्टी चक्र फिरत राहते.प्रथम सतोप्रधान देवी-देवता असतात,परत पुनर्जन्म घेत घेत तमोप्रधान बनतात.दुनिया जुनी पतित बनते.आत्माच पतित आहे ना. येथील कोणत्या गोष्टींमध्ये रस नाही. कुठे सतयुगातील फळं फुलं,कुठे येथील.तेथे कधी आबंट,वास येणाऱ्या गोष्टी नसतात.तुम्ही तेथील साक्षात्कार पण करुन येतात.तुमची इच्छा होते, तेथील फळं फुलं घेऊन जाऊ परंतु येथे येतात,तर सर्व काही गायब होते.हे सर्व साक्षात्कार करून,बाबा मुलांची करमणुक करतात.हे आत्मिक पिता आहेत,जे तुम्हाला शिकवत आहेत.या शरीरा द्वारे आत्मा शिकते, शरीर नाही. आत्म्याला शुद्ध अभिमान आहे,मी पण हा वारसा घेत आहे,स्वर्गाचे मालक बनत आहे.स्वर्गामध्ये तर सर्व जातील परंतू सर्वांचे नाव तर लक्ष्मीनारायण असणार नाही.वारसा आत्म्याला मिळतो.हे ज्ञान दुसरे कोणी देऊ शकत नाही.हे तर विद्यापीठ आहे,यामध्ये लहान मुलं,जवान सर्व शिकत आहेत. असे कॉलेज कधी पाहिले? त्या कॉलेजमध्ये तर वकील डॉक्टर इत्यादी बनतात.येथे तर तुम्ही मनुष्या पासून देवता बनतात.

तुम्ही जाणतात बाबा आमचे शिक्षक सद्गुरु आहेत,ते मला सोबत घेऊन जातील.परत आम्ही शिक्षणा नुसार येऊन सुखधाम मध्ये पद प्राप्त करू. बाबा तर कधीच तुमचे सतयुग पाहत पण नाहीत.शिवबाबा विचारतात,मी सतयुग पाहतो का?त्याना तर आपले शरीर नाही,तर कसे पाहतील.येथे तर तुम्हा मुलांशी गोष्टी करतात,पाहतात ही सर्व जुनी दुनिया आहे.शरीरा शिवाय तर काहीच पाहू शकत नाहीत.बाबा म्हणतात मी पतीत दुनिया पतित शरीरा मध्ये येऊन तुम्हाला पावन बनवतो.मी स्वर्ग पाहत पण नाही.असे पण नाही की कोणाच्या शरीराद्वारे लपून पाहतो.नाही, भूमिकाच नाही.तुम्ही खूप नवीन नवीन गोष्टी ऐकत राहतात.तर आता या जुन्या दुनिये मध्ये मन लावायचे नाही.बाबा म्हणतात,जितके पावन बनाल तेवढे उच्चपद मिळेल.सर्व आठवणी च्या यात्रे वरती अवलंबून आहे.यात्रे वरती पण मनुष्य पवित्र राहतात,जेव्हा परत येतात तर अपवित्र बनतात.तुम्हा मुलांना खूप खुश व्हायला पाहिजे.तुम्ही जाणता बाबाकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत,तर त्यांच्या श्रीमता वर चालायला पाहिजे.बाबांच्या आठवणी द्वारे सतोप्रधान बनायचे आहे.६३ जन्माचा गंज चढलेला आहे.ते या जन्मात उतरायचा आहे.दुसरे कोणतेच कष्ट नाहीत.विष पिण्याची म्हणजे विकारी बनण्याची जी भूक लागली आहे,ती सोडून द्यायची आहे,विकाराचा तर विचार पण करू नका.बाबा म्हणतात या विकारा द्वारे तुम्ही जन्म जन्मातंर दुःखी झाले आहात.कुमारी वरती तर खूप दया येते.सिनेमा पाहिल्या नंतर खराब होतात,यामुळेच नरका मध्ये जातात.जरी कोणाला बाबा म्हणतात, पाहण्यामध्ये हरकत नाही परंतु तुम्हाला पाहून दुसरे पण जायला लागतात, म्हणून तुम्हाला जायचे नाही.हा भाग्यशाली रथ आहे.भाग्यशाली रथ आहे ना,जो निमित्त बनला आहे,या अविनाश नाटकांमध्ये रथ देण्यासाठी. तुम्ही समजता,बाबा यांच्या मध्ये येतात. हा हुसेन चा घोडा आहे.तुम्हा सर्वांना हसीन बनवतात.बाबा स्वतः सुंदर आहेत परंतु हा रथ घेतला आहे.या नाटकांमध्ये यांची भूमिकाच अशी आहे. आत्ता जे आत्मे काळे बनले आहेत, त्यांना सुवर्णयोगी बनवायचे आहे.

बाबा सर्वशक्तिमान आहेत,की ड्रामा (नाटक)? नाटक आहे,त्यामध्ये जे पण कलाकार आहेत,त्यांच्यामध्ये सर्वशक्तिमान कोण आहेत? शिवबाबा.त्यांच्या नंतर परत रावण. अर्धा कल्प रामराज्य,अर्धाकल्प रावण राज्य आहे.घडी घडी बाबांना मुलं लिहतात,आम्ही बाबा ची आठवण विसरतो,उदास होतो.अरे तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी आलो आहे परत तुम्ही उदास का राहतात? कष्ट तर करायचे आहेत ना,पवित्र बनायचे आहे.असाच राज तिलक द्यायचा का? स्वतःच स्वताला राजतिलक देण्या लायक बनायचे आहे, ज्ञान आणि योगाद्वारे.बाबांची आठवण करत रहा तर, तुम्ही स्वतःच तिलकच्या लायक बनाल.बुद्धीमध्ये आहे,शिवबाबा आमचे गोड पिता,शिक्षक,सद्गुरु आहेत.आम्हाला पण खूप गोड बनवतात.तुम्ही जाणतात आम्ही कृष्णपुरी मध्ये जरूर जाऊ.प्रत्येक ५००० वर्षानंतर भारत जरूर स्वर्ग बनतो,परत नर्क बनतो.मनुष्य समजतात,जे धनवान आहेत त्यांच्यासाठी येथेच स्वर्ग आहे,जे गरीब आहेत,ते नरकामध्ये आहेत परंतु असे नाही. हा तर नर्कच आहे. अच्छा

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) सिनेमा पाहणे म्हणजे नरकाचा रस्ता आहे म्हणून सिनेमा पाहायचा नाही. आठवणीच्या यात्रे द्वारे पावन बणुन उच्चपद घ्यायचे आहे.या जुन्या दुनियेशी मन लावायचे नाही.
  2. (२) मनसा वाचा कर्मणा कोणालाही दुःख द्यायचे नाही.सर्वांच्या कानामध्ये गोड गोष्टी ऐकावयाच्या आहेत.सर्वांना बाबांची आठवण द्यायची आहे. बुद्धी योग बाबांशी जोडायचा आहे.

वरदान:-

पवित्रता च्या शक्तीद्वारे नेहमी सुखाच्या संसारांमध्ये राहणारे बेगमपूर चे बादशाह भव .

सुख शांती चा पाया पवित्रता आहे.जी मुलं मनसा वाचा कर्मणा पवित्र बनतात तेच उच्च आणि सर्वश्रेष्ठ पवित्र आहेत. जिथे पवित्रतेची शक्ती आहे,तिथे सुख शांती स्वतःच आहे.पवित्रता सुख शांती ची माता आहे.पवित्र आत्मा कधीच उदास होऊ शकत नाहीत.ते बेगमपूर चे बादशहा आहेत.त्यांचा ताज पण वेगळा आणि सिंहासन पण वेगळे आहे. लाईटचा ताज पवित्रता ची खुण आहे.

बोधवाक्य:-

मी आत्मा आहे शरीर नाही,हे चिंतन करणेच स्वचिंतन आहे.

||| ओम शांती |||

ओम शांती.