11-05-2022
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
"गोड
मुलांनो - तुम्ही खूप दिवसांपासून विभक्त आहात, तुम्ही संपूर्ण ८४ जन्मांची भूमिका
बजावली आहे, आत्ता तुम्हाला दु:खाच्या बंधनातून सुखाच्या सबंधाकडे जायचे आहे,
म्हणून अपार आनंदात रहा. "
प्रश्न:-
कोणत्या
मुलांना नेहमी अपार आनंद मिळू शकतो?
उत्तर:-
ज्यांची
श्रद्धा आहे की, १) बाबा आपल्याला जगाचे स्वामी बनवायला आले आहेत. २)- तेच गीतेचे
खरे खरे ज्ञान सांगण्यासाठी फक्त खरे बाबा आले आहेत. ३) आपण आत्मे आता भगवंताच्या
कुशीत बसलो आहोत. या देहासह आपण आत्मा बाबाचे बनलो आहोत. ४) बाबा आपल्याला भक्तीचे
फळ, सदगती देण्यासाठी आले आहेत. ५) बाबांनी आम्हाला त्रिकालदर्शी बनवले आहे. ६)
भगवंताने माता बनून दत्तक घेतले आहे. आम्ही ईश्वरनिष्ठ विद्यार्थी आहोत. जे या
स्मरणात आणि श्रद्धेत राहतात ते अपार सुखी राहतात.
ओम शांती।
तुम्ही आत्मा आहात, असा तुम्हा मुलांना निश्चय आहे. बाबा भगवान आम्हाला शिकवत आहेत,
त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. तुमच्या समोर आल्यावर आत्म्यांना समजते की,
बाबा सर्वांची सदगती करण्यासाठी आले आहेत. सर्वांना सदगती देणारे, जीवनमुक्तीचे दाता
तेच आहेत. तुम्ही मुलं जाणतात की, माया तुम्हाला वेळोवेळी विसरायला लावते. परंतू
आपण बाबांसमोर बसलो आहोत. निराकार बाबा या रथावर स्वार आहेत. जसे मुसलमान घोड्यावर
पटका ठेवतात. मुहम्मद या घोड्यावर स्वार होते, असे म्हणतात. एक खुण ठेवतात. इथे तर
निराकार बाबांचा प्रवेश आहे. तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे. तुम्हाला
स्वर्गाचे स्वामी बनवणारे बाबा किंवा जगाचे स्वामी बनवणारे, बाबा आले आहेत. बाबा हे
गीतेचे खरे खरे भगवान आहेत. आत्म्याची बुद्धी पित्याकडे जाते. हे पित्यावरील
आत्म्याचे प्रेम आहे. हा आनंद कोणाला होईल? जे बर्याच काळापासून वेगळे आहेत. खुद्द
बाबा म्हणतात, मी तुम्हाला सुखाच्या नात्यात पाठवले होते. आता तुम्ही दु:खाच्या
बंधनात आहात. आत्ता तुम्हाला समजले आहे की, प्रत्येकजण ८४ जन्म घेत नाहीत. ८४
लाखांचे चक्र तर कुणाच्या बुद्धीत बसू शकत नाही. बाबांनी ८४ चे चक्र अगदी बरोबर
सांगितले आहे. बाबांची मुले ८४ जन्म घेत राहतात. आता तुम्हाला माहित आहे की, आपण
आत्मा या इंद्रियांद्वारे ऐकतो. बाबा या मुखाद्वारे कथन करत आहेत. ते स्वतः म्हणतात,
मला या इंद्रियांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यांचे नाव ब्रह्मा ठेवावे लागेल.
प्रजापिता ब्रह्मा तर मनुष्य पाहिजे, नाही का? सूक्ष्म वतन मध्ये प्रजापिता ब्रह्मा
थोडेच म्हणनार? मी स्थुल वतन मध्ये येऊन, ब्रह्माच्या शरीरात प्रवेश करून, तुम्हाला
दत्तक घेतो. आपण आत्मे भगवंताच्या कुशीत जातो, हे तुम्ही जाणतात. शरीराशिवाय
अंगीकारता येत नाही. आत्मा म्हणते, मी शरीराद्वारे त्याचा बनतो. त्यांनी हा देह
भाड्याने घेतला आहे. हा जीव (शरीर) त्यांचा नाही. त्यांच्यात परमात्मा नी प्रवेश
केला आहे. तुमच्या आत्म्यानेही शरीरात प्रवेश केला आहे, नाही का? बाबा सुद्धा
म्हणतात, मी पण यांच्या मध्ये आहे, कधी मी मुलगा बनतो, तर कधी माता पण बनतो. जादूगर
आहेत ना. अनेकजण या खेळाला जादू मानतात. रिध्दी सिद्धीसाठी, जगात खूप काम चालते. ते
कृष्ण पण बनतात. ज्यांच्या भावना कृष्णात असतात, त्यांना लगेच कृष्णाचे दर्शन होते.
त्यांना मानतील आणि मग तुम्ही त्यांचे अनुयायीही बनतात. येथे तर सर्व ज्ञानाची
गोष्ट आहे. प्रथम, मी आत्मा आहे आणि बाबा म्हणतात की, मी तुमचा पिता आहे, मी तुम्हा
मुलांना त्रिकालदर्शी बनवतो, हा पक्का निश्चय हवा. असे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही.
भक्तीचा मार्ग संपला की बाबांना यावे लागते. जरी अनेकांना शिवलिंगाचे दर्शन होते,
अखंड ज्योती स्वरुपाचा साक्षात्कार होतो. जी काही भावना आहे, ती मी पूर्ण करतो.
परंतू मला कोणी मिळू शकत नाही. ते मला ओळखतही नाहीत. आता तुम्हाला समजले आहे की,
बाबा देखील एक बिंदू आहेत आणि तुम्ही देखील एक बिंदू आहात. माझ्या आत्म्यामध्ये हे
ज्ञान आहे, तुमच्या आत्म्यालाही हे ज्ञान आहे. कोणाला माहित नाही की, आपण आत्मे
परमधामात राहणारे आहोत. जेव्हा तुम्ही बाबांसमोर येऊन बसता की, उत्साह निर्माण होतो,
अंगावर शहारे येतात. ओहो! ज्ञानाचा सागर असलेले शिवबाबा, यांच्या मध्ये बसून
आपल्याला शिकवतात. बाकी कृष्ण किंवा गोपींचा प्रश्नच नाही. ना इथे ना सुवर्णकाळात.
तिथे तर प्रत्येक राजपुत्र आपापल्या महालात राहतो. या सर्व गोष्टींना तेच समजतील,
जे बाबाकडून वारसा घेतील. तर हा आनंदही मनापासून राहिला पाहिजे. ते म्हणतात की
तुम्ही मात पिता आहात. . . पण याचा अर्थही त्यांना कळत नाही. पिता तर बरोबर आहेत,
परत माता कोणाला म्हणतात? माता तर जरुर पाहिजे. या मातेची कोणीही माता असू शकत नाही.
हे रहस्य अगदी नीट समजून घ्यायचे आणि बाबाचे स्मरण करायचे आहे. बाबा म्हणतात,
तुमच्या मध्ये कोणताही अवगुण नसावा. गायन पण आहे की, मज निर्गुण मध्ये कोणताही गुण
नाही. तुम्हा मुलांना आत्ता गुणवान बनायचे आहे. काम विकार नाही, क्रोध पण नाही.
देहाचा अहंकार पण नसावा.
यावेळी तुम्ही मधुबन
मध्ये बसला आहात, हे तुम्हाला माहीत आहे, परत उदासीनता का यायला पाहिजे. परंतू हा
परिपक्व टप्पा अंतकाळात होईल. अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपींना विचारा,
असेही गायले जाते. हे शेवटी होईल, असे कोणीही म्हणू शकत नाही की, आम्ही ७५%
अतिद्रिंय सुखामध्ये राहतो. यावेळी, पापांचे ओझे खूप आहे. गुरूंच्या कृपेने किंवा
गंगेत स्नान करून , पाप नाहीसे होऊ शकत नाही. बाबाच शेवटी येतात आणि ज्ञान देतात.
महाभारता मध्ये दाखवतात की, कन्याने बाण सोडले आणि भिष्म पितामहाचा मृत्यू झाला.
त्यानंतर मृत्यूसमयी त्यांना गंगा जल पाजले. तर तुम्ही इथे जेव्हा बेहोश होतात, तर
बाबांची आठवण दिली जाते. फक्त बाबांची च आठवण करण्याची सवय, मुलांना झाली पाहिजे.
असे नाही, कोणी आठवण करून द्यायला पाहिजे. देह सोडताना आपोआप बाबांची आठवण यावी,
कोणाच्या मदतीशिवाय शिवपित्याची आठवण करायची आहे. ते लोक मंत्र देतात. ती तर एक
सामान्य गोष्ट आहे. अंतवेळी खूप गोंधळ होतो. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहता.
त्यावेळी शिव-शिव म्हणा असे म्हणनार नाही. अशा वेळी पूर्ण आठवण आणि प्रेम आवश्यक
असते, तरच तुम्ही पहिल्या क्रमांकाचे पद मिळवू शकाल. तुम्हा मुलांना माहीत आहे की,
मी तुमचा पिता आहे. कल्पापुर्वी पण तुम्हा मुलांना फुलासारखे बनवले होते.
सुवर्णयुगात फुलांसारखी मुलं, योगाच्या शक्तीने जन्माला येतील. दु:खाचे कोणतेही
कारण तेथे नसते. स्वर्ग हे नाव आहे, पण तेथे कोण राहतात, हे भारतातील लोकांना माहीत
नाही. हिरण्यकश्यपू वगैरे तेथे राहत होते असे शास्त्रात लिहले आहे -हे सर्व भक्तीचे
साहित्य आहे. भक्ती देखील प्रथम सतोप्रधान असते आणि नंतर हळूहळू तमोप्रधान होते.
बाबा म्हणतात, मी तुम्हाला खुप श्रेष्ठ, उच्च बनवतो. तुम्ही हळू हळू खाली येतात.
मानवाची काहीच महिमा नाही. सर्वांचे सदगती दाता, एकच पिता आहेत. बाकी गुरू लोक,
अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा वगैरे शिकवतात, तरीही ते खाली उतरत राहतात.
भक्तीमार्गात जरी मीराला साक्षात्कार झाला असला, परंतु मिरा काही, जगाचे मालक थोडीच
बनली, नाही. तुम्हाला बाबा म्हणतात, जिन्न बना. मी तुम्हाला काम देतो, फक्त अल्फ आणि
बे (अल्लाह आणि बादशाही) लक्षात ठेवा. जर तुम्ही थकले आणि बाबांची आठवण केली नाही,
तर माया तुम्हाला कच्चा खाईल. जिन ने खाल्ल्याचीही एक कथा पण आहे. बाबा पण म्हणतात,
जर तुम्ही माझी आठवण केली नाही, तर माया तुम्हाला कच्ची खाईल. आठवणी मध्ये बसल्याने
आनंद वाढतो. बाबा आपल्याला विश्वाचे स्वामी बनवतात. बाबा समोर बसले आहेत. तुम्ही
आत्मे ऐकत आहात. प्रिय मुलांनो, मी तुम्हाला मुक्तीधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो
आहे. अनेकांनी परत जाण्याचा प्रयत्न केला तरीही, कोणी जाऊ शकले नाही. कलियुगानंतर
सत्ययुग येणार आहे, रात्री नंतर दिवस येणार आहे. तुम्हाला माहित आहे की, फक्त
तुम्हीच सुवर्णयुगात असाल. बाबा पुन्हा राज्य भाग्य देतात. शेवटी आनंदाचा पारा चढेल.
जेव्हा संपूर्ण बनाल, तेव्हा विनाश होईल. तुम्ही साक्षीदार म्हणून पाहत राहाल.
रक्तरंजित खेळ आहे, नाही का? तुम्ही कोणता गुन्हा केला आहे, ज्यामुळे मारण्यासाठी
बॉम्ब वगैरे बनवले आहेत? अंतकाळी मरतील तर बरोबर. कोणीतरी आपल्यासाठी प्रेरक आहे,
हे देखील त्यांना समजते. त्यांची इच्छा नसतानाही, हे बॉम्ब वगैरे बनवतात. खर्च तर
खूप करतात. हे नाटकात ठरलेले आहे आणि त्यांच्याकडून विनाश व्हायचा असतोच. अनेक
धर्मांमध्ये, एक धर्म राज्य करू शकत नाही. आता अनेक धर्म नष्ट होऊन एकच धर्म स्थापन
होणार आहे. बाबांच्या श्रीमतावर आपण राज्य स्थापन करत आहोत, हे तुम्हाला माहीत आहे.
परत काही लोक मैदानावर जाऊन कवायती वगैरे शिकवतात. मरायचे आणि मारायचे आहे, हे
त्यांना समजते. इथे तसे नाही. बाबा आले आहेत, याचा खूप आनंद झाला पाहिजे. प्राचीन
भारताताचा राजयोग निराकार भगवंतानेच शिकवला होता, त्याचे नाव बदलून कृष्ण ठेवण्यात
आले आहे. संन्यासी समजतात की, आमचाच प्राचीन योग आहे. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे
समजावले जाते. मुलांनो, तुम्ही मला ओळखता की, मी तुमचा पिता आहे. मलाच पतित पावन,
ज्ञानाचे सागर म्हणतात. कृष्ण तर पतित जगात येऊ शकत नाही. त्यांनी कृष्णाला पुन्हा
द्वापारात नेले आहे. किती चुकीचा समज आहे. खुप गैरसमज आहेत, पूर्णपणे तमोप्रधान झाले
आहेत. मी तेव्हाच येतो, जेव्हा सर्वांना मुक्तीधाम मध्ये घेऊन जायचे असते.
तुम्हाला माहिती आहे,
आम्ही राजयोग शिकत आहोत. आम्ही ईश्वरनिष्ठ विद्यार्थी आहोत. हे स्मरण करत राहा, तर
तुम्ही खुप आनंदात राहाल. बाबा तुम्हा मुलांना, ज्ञानाचा अर्क धारण करवत आहेत. मग
हे का विसरता? मुल झाले आणि बाबा म्हणू लागले. ते समजतात आम्ही वारस आहोत, हे जाणून
घ्या. म्हणून सतत दादांची आठवण ठेवा. बाबा म्हणतात की, मुलांनो, काम विकार हा मोठा
शत्रू आहे. त्याने तुम्हाला सुरुवात, मध्य आणि शेवटपर्यंत खूप दु:ख दिले आहे. हा
मृत्यूलोक आहे, वेश्यालय आहे. राम शिवालय बनवतात, ज्यामध्ये देवी देवता धर्माचे
राज्य होते. पण त्यांनी राज्य कसे घेतले, ते केव्हा घेतले, हे आता तुम्हाला माहीत
आहे. देवी देवता कधीही पुनर्जन्म घेत नाहीत, असे समजतात, परंतु असे नाही. एखादया
मोठ्याने समजले, तर त्यांच्यामुळे अनेक समजतील. गरिबांचे तर कोणीच ऐकत नाहीत.
तुमच्या मध्येही क्रमानुसार धारणा करणारे आहेत. शाळा एकच आहे. एकच शिक्षक आहे. बाकी
सर्व क्रमानुसार आहेत, अच्छा.
गोड गोड खुप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)मायेचे हल्ले
टाळण्यासाठी जिन्न बनून अल्फ आणि बे, चे स्मरण करत राहा. डोक्यावरील पापांचे ओझे
योगसामर्थ्याने उतरायचे आहे. अतिद्रिंय सुखात राहा. फक्त तोंडाने शिव शिव म्हणू नका.
पित्यावर खरे प्रेम ठेवा. काट्यापासून फुलासारखे बनवण्याच्या सेवेत तत्पर राहायचे
आहे.
वरदान:-
निश्चिंत
स्थिती द्वारे अचूक निर्णय देणारे निश्चयबुध्दी भव.
विजय होण्याचे सोपे
साधन, म्हणजे एक बळ आणि एक भरोसा. जर तुमचा एकावर विश्वास असेल, तर तुम्हाला शक्ती
मिळते. निश्चय नेहमीच निश्चिंत बनवतो आणि ज्याची स्थिती निश्चित असते, ते प्रत्येक
कार्यात यशस्वी होतात, कारण निश्चिंत राहिल्यामुळे बुद्धी अचूक निर्णय घेते. तर
अचूक निर्णयाचा आधार आहे, निश्चय बुद्धी, निश्चिंत. विचार करण्याचीही गरज नाही कारण
तुम्हाला पित्याचे अनुसरण करायचे आहे, तुम्हाला पाऊलावर पाऊल ठेवायचे आहे आणि
तुम्हाला मिळालेल्या श्रीमताचे अनुसरण करायचे आहे. फक्त श्रीमताच्या पाऊलावर पाऊल
ठेवत राहा म्हणजे तुम्ही विजयी रत्न बनाल.
बोधवाक्य:-
मनात
प्रत्येकाच्या कल्याणाची भावना असणे, म्हणजेच विश्व कल्याणकारी बनणे होय.
मातेश्वरीजींचे अनमोल
महावाक्य :-
या संगमावर जे दैवी
ज्ञान आपल्याला मिळत आहे, हेच ज्ञान सुवर्णयुगात पुन्हा मिळेल का? यावर स्पष्ट केले
जाते की, सुवर्णयुगात आपण स्वतः ज्ञान स्वरुप आहोत. देवताई प्रारब्धाचा आनंद घेत
आहेत, ज्ञानाची देवाणघेवाण नाही, ज्ञानाची गरज अज्ञानींसाठी असते. सुवर्णयुगात सर्व
ज्ञानाचे मूर्तिमंत आहेत, ज्ञान देण्याची गरज नसते कारण तेथे कोणीही अज्ञानी नाही.
यावेळी, आपल्याला संपूर्ण विराट नाटकाची सुरुवात, मध्य आणि शेवट माहित आहे.
सुरुवातीला आपण कोण होतो, कुठून आलो आणि आपण कर्माच्या बंधनात कसे पडलो? शेवटी
आपल्याला कर्माच्या बंधनातून पुढे सरकून कर्मातीत देवता बनायचे आहे. सध्या सुरू
असलेल्या प्रयत्नाने, आपण भविष्यातील सतयुगी देवता बनू. बक्षीस मिळालेला सुवर्णकाळ.
जर तिथे आपण देवतांची उतरती कला होणार आहे, हे कळले तर, सुख नाहीसे झाले असते. तर
तेथे असा विचार राहत नाही, आता आपल्याला या ज्ञानातून कळून चुकले आहे की, आपल्याला
प्रगती करून आनंदाचे जीवन जगायचे आहे. अर्धाकल्प आपले प्रारब्ध भोगून, नंतर स्वत:
ला विसरून, मायेच्या अधीन होऊन, विकारात जातात. हा चढणे आणि उतरणे, हा अनादी
काळापासून बनलेला खेळ आहे. हे सर्व ज्ञान आता तुमच्या बुद्धीत आहे. ते सुवर्णयुगात
राहत नाही.