11-07-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,नेहमी एकच काळजी घ्या की,आम्हाला चांगल्या रीतीने शिकून स्वतःला राजतिलक द्यायचा आहे,राजयोग शिक्षणाद्वारे राजाई मिळते."

प्रश्न:-
मुलांना कोणत्या उल्हास मध्ये राहायचे आहे? दिलशिकस्त व्हायचे नाही, का?

उत्तर:-
नेहमी हाच उल्लास राहायला पाहिजे की,आम्हाला या लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे. यासाठीच पुरुषार्थ करायचा आहे.दिलशिकस्त कधीच व्हायचे नाही,कारण हे राजयोगाचे शिक्षण खूप सहज आहे.घरामध्ये राहत पण शिकू शकता,यासाठी कोणते शुल्क इत्यादी नाही,परंतु हिम्मत जरूर पाहिजे.

गीत:-
तुम्हीच माता आणि पिता पण तुम्हीच आहात..

ओम शांती।
मुलांनी आपल्या पित्याची महिमा ऐकली,बाकी कोणाची महिमा गायन केली जात नाही.जेव्हा ब्रह्मा विष्णू शंकराची पण कोणती महिमा नाही.ब्रह्मा द्वारे स्थापना करवतात, शंकरा द्वारे विनाश करवतात,विष्णू द्वारे पालना करवतात. लक्ष्मी-नारायणला पण असे लायक शिवबाबाच बनवतात.त्यांचीच महिमा आहे.त्यांच्या शिवाय परत कोणाची महिमा गायन केली जात नाही.यांना असे श्रेष्ठ बनवणारे शिक्षक नसतील, परत ते पण कसे श्रेष्ठ बनू शकतील.परत सूर्यवंशी घराण्याची महिमा आहे,जे राज्य करतात.बाबा संगम युगात आले नाही तर,यांना राजाई कशी मिळेल?बाकी कोणाची महिमा नाही.परदेशी इत्यादीची पण कोणती महिमा करण्याची आवश्यकता नाही.महिमा फक्त एकाची आहे,दुसऱ्या कोणाची नाही. त्यांच्याद्वारे उच्च पद मिळते तर त्यांची चांगल्या प्रकारे आठवण करायला पाहिजे ना.स्वतःला राजा बनवण्यासाठी स्वतः राज योगाचे शिक्षण घ्यायचे आहे.जसे कायद्याचा अभ्यास करतात,तर स्वता:ला शिक्षणाद्वारे वकील बनवतात ना. तुम्ही मुलं जाणता,शिव बाबा आम्हाला शिकवत आहेत.जे चांगल्या रीतीने शिकतील,तेच उच्चपद प्राप्त करतील.न शिकणारे तर पद प्राप्त करू शकत नाहीत.शिकण्यासाठी श्रीमत मिळते.मुख्य गोष्ट पावन बनायची आहे,त्यासाठी तुम्ही शिक्षण घेत आहात.तुम्ही जाणता,यावेळेस सर्व तमोप्रधान पतित आहेत.चांगले किंवा वाईट मनुष्यच असतात.पवित्र राहणाऱ्यांना चांगले म्हटले जाते. चांगले शिकून मोठे मनुष्य बनतात, तर महिमा होती परंतु आहेत तर पतीत ना.पतीतच पतितांची महिमा करतात.सतयुगा मध्ये पावन आहेत, तेथे कोणी कुणाची महिमा करत नाहीत.येथे पवित्र संन्यासी पण आहेत,तर अपवित्र ग्रहस्थी पण आहेत,तर पवित्रतेची महिमा केली जाते. तेथे तर यथा राजा राणी तथा प्रजा असतात.तेथे तर बाकी कोणता धर्म नाही,ज्यासाठी पवित्र,अपवित्र म्हणले जाते.येथे तर कोणत्या ग्रहस्थीची पण महिमा करत राहतात. त्यांच्यासाठी तेच खुदा अल्लाह आहेत,परंतु अल्लाहां ना पतित-पावन,मुक्तिदाता, मार्गदर्शक म्हटले जाते.ते परत कसे असू शकतात.दुनिये मध्ये खूपच अज्ञानाचा अंधकार आहे.आता तुम्ही मुलं समजतात.मुलांनाही काळजी राहायला पाहिजे,आम्हाला राजयोगाचे शिक्षण घेऊन स्वतःला राजा बनवायचे आहे.जे चांगल्यारितीने पुरुषार्थ करतील,तेच राजतिलक मिळवतील.मुलांना उल्हास मध्ये राहायला पाहिजे की, आम्ही पण या लक्ष्मीनारायण सारखे बनू.यामध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही.पुरुषार्थ करायला पाहिजे.दिल शिकस्त व्हायचे नाही.हे शिक्षण असे आहे,जे कॉटवर झोपून पण आठवण करू शकता.परदेशात राहून पण अभ्यास करू शकता. घरामध्ये राहून पण शिकू शकता. इतके सहज शिक्षण आहे.कष्ट करून स्वतःच्या पापाला नष्ट करायचे आहे, आणि दुसर्यांना पण समजून सांगायचे आहे.दुसऱ्या धर्माच्या लोकांना पण तुम्ही समजाऊ शकता. कोणालाही हे सांगायचे आहे की,तुम्ही आत्मा आहात.आत्म्यांना सुधारणारे एकच आहेत.यामध्ये काही फरक पडू शकत नाही.शरीरा द्वारेच अनेक धर्म होतात.आत्मा तर एकच आहे.यामध्ये काही फरक पडू शकत नाही.शरीरा द्वारेच अनेक धर्म होतात.आत्मा तर एकच आहे.सर्व एक पित्याची मुलं आहेत.आत्म्याला बाबांनी दत्तक घेतले आहे,म्हणून ब्रह्मामुखाचे गायन केले जाते. कोणालाही समजाऊ शकता, आत्म्यांचे पिता कोण आहेत.तुम्ही जे फॉर्म भरता,त्यामध्ये मोठा अर्थ आहे ना.शिवपिता तर जरुर आहेत,ज्याची आठवण पण करतात.आत्मा आपल्या पित्याची आठवण करते.भारतामध्ये तर कोणालाही पिता म्हणतात.महापौर ला पण पिता म्हणतात परंतु आत्म्याचे पिता कोण आहेत,त्यांना कोणी जाणत नाहीत. गायन पण आहे,परंतु ते कोण आहेत, कसे आहेत,काहीच माहिती नाही. भारतामध्येच तुम्ही तुम्हीच माता पिता म्हणून बोलवतात.बाबाच येऊन रचना करतात,भारतालाच मातृभूमी म्हटले जाते,कारण येथे शिवबाबा मातपित्याच्या रूपामध्ये भूमिका वठवतात.येथेच भगवंताला मातपित्याच्या रूपामध्ये आठवण करतात.परदेशामध्ये फक्त ईश्वरीय पिता म्हणून बोलतात,परंतु माता पण पाहिजे ना,ज्याद्वारे मुलांना दत्तक घेतील.पुरुष पण पत्नीला दत्तक घेतात,परत त्यांच्याद्वारे मुलं होतात,रचना केली जाते.येथे पण यांच्यामध्ये,परमपिता परमात्मा प्रवेश करून दत्तक घेतात.मुलं होतात म्हणून त्यांना मात पिता म्हटले जाते. ते आत्म्याचे पिता परत येथे येऊन उत्पत्ती करतात.येथे तुम्ही मुलं बनतात,तर पिता आणि माता म्हटले जाते.ते तर गोड घर आहे,जेथे सर्व आत्मे राहतात.तेथे पण बाबांच्या शिवाय कोणी घेऊन जाऊ शकत नाही.कोणीही भेटले तर तुम्ही सांगा आपण गोड घरी जाऊ इच्छितात का? परत पावन जरूर बनावे लागेल. आत्ता तुम्ही पतित आहात,ही लोहयुगी तमोप्रधान दुनिया आहे. आता तुम्हाला परत घरी जायचे आहे,तर लोहयुगी आत्मे परत जाऊ शकत नाहीत.आत्मे गोड घरांमध्ये पवित्रच राहतात.तर बाबा समजवतात,आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.कोणत्याही देहधारी ची आठवण करू नका,जितकी बाबांची आठवण कराल,तेवढे पावन बनाल आणि परत उच्चपद क्रमानुसार मिळेल.लक्ष्मी-नारायणच्या चित्रावरती कोणालाही समजून सांगणे सहज आहे.भारतामध्ये यांचे राज्य होते.हे राज्य करत होते,तेव्हा विश्वामध्ये शांती होती.विश्वा मध्ये शांती बाबाच करू शकतात,दुसरे कोणी नाही.आता बाबा आम्हाला शिकवत आहेत,नवीन दुनियेसाठी राजांचे राजा कसे बनू शकतो,ते सांगतात.बाबा ज्ञानाचे सागर आहेत,परंतु त्यांच्यामध्ये कोणते ज्ञान आहे,हे कोणी जाणत नाहीत.सृष्टीच्या आदी मध्य अंतचा इतिहास भूगोल,बाबाच ऐकवतात.मनुष्य तर कधी सर्वव्यापी म्हणतात,तर कधी सर्वांच्या मनातील जाणारे असे म्हणतात,परत स्वतःला असे म्हणू शकणार नाहीत.या सर्व गोष्टी बाबाच सन्मुख समजवतात.ज्ञान चांगल्या रीतीने धारण करून आनंदित व्हायचे आहे.या लक्ष्मी-नारायणचे चित्र नेहमी हर्षित चेहरा असलेलेच बनवतात. शाळेमध्ये पण उच्च शिक्षण घेणारे खूप आनंदित राहतात,दुसरे पण समजतात,हे फार मोठी परीक्षा पास करत आहेत,खूप उच्च शिक्षण आहे. या ज्ञानयोगा साठी तर कोणत्या शुल्क इत्यादीची तर कोणतीच गोष्ट नाही,फक्त हिम्मत पाहिजे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे,यामध्येच माया विघ्न आणते.बाबा म्हणतात पवित्र बना.बाबांशी प्रतिज्ञा करुन परत काळे तोंड करतात,माया खूप जबरदस्त आहे.नापास होतात,तर त्यांचे नाव पण गायन करत नाहीत. अमके अमके,सुरुवाती पासून चांगले चालत आले आहेत,महिमा पण केली जाते.बाबा म्हणतात,आपल्यासाठी स्वतः पुरुषार्थ करून,राजधानी मिळवायची आहे.शिक्षणाद्वारे उच्च पद मिळवायचे आहे.हा राज योग आहे,प्रजा योग नाही.परंतु प्रजा पण बनेल ना.चेहरा आणि सेवेद्वारे माहीत होते की,हे काय बनण्याचे लायक आहेत.घरामध्ये पण विद्यार्थ्याच्या चालचलन द्वारे समजतात,हे प्रथम क्रमांकाचे आहेत,हे तिसऱ्या क्रमांकाचे आहेत,येथे पण असेच आहेत.शेवटी जेव्हा परीक्षा पूर्ण होईल,तेव्हा सर्व साक्षात्कार होतील. साक्षात्कार होण्यामध्ये उशीर लागत नाही,परत लाज वाटेल,नापास झालो. नापास होणाऱ्यांशी कोण प्रेम करेल. मनुष्य सिनेमा पाहून खुशी चा अनुभव करतात परंतु बाबा म्हणतात क्रमांक एकचा खराब बनवणारा सिनेमा आहे.सिनेमा पाहणारे सहसा नापास होतात.कोण कोणत्या स्त्रीया अशा आहेत,ज्यांना सिनेमा पाहिल्या शिवाय झोप येत नाही.सिनेमा पाहणारे,अपवित्र बनण्याचा पुरुषार्थ जरुर करतील.येथे जे काही होत आहे,त्यामध्ये मनुष्य खुशी समजतात,ते सर्व दुःखासाठी आहे.ही विनाशी खुशी आहे.अविनाशी खुशी तर अविनाशी बाबा द्वारेच मिळते. तुम्ही समजता,बाबा आम्हाला या लक्ष्मीनारायण सारखे बनवतात.तसे तर अगोदर २१जन्मासाठी म्हणत होते.आत्ता बाबा म्हणतात पन्नास-साठ जन्म,कारण द्वापरयुगा मध्ये पण,प्रथम खूप सुखी राहत होते ना.जरी पतित बनत होते,तरी धन पण खूप होते.हे तर अगदीच जेव्हा तमोप्रधान बनतात,तेव्हा दुःख सुरू होते.प्रथम तर सुखी राहतात.जेव्हा खूप दुःखी होतात,तेव्हा बाबा येतात. महा-अजामिल सारख्यांचा पण उद्धार करतात.बाबा म्हणतात मी सर्वांना मुक्तिधाम ला घेऊन जातो. परत सतयुगाची राजाई पण तुम्हाला देतो.सर्वांचे कल्याण तर होते ना. सर्वांना आपल्या ठिकाणी,शांती किंवा सुखांमध्ये पोहचवतात.सतयुगा मध्ये सर्वांना सुख राहते,शांतीधाम मध्ये पण सुख राहते.विश्वामध्ये शांती हवी, असे म्हणतात.तुम्ही सांगा या लक्ष्मी-नारायणाचे जेव्हा राज्य होते, तर विश्वामध्ये शांती होती ना.दुःखाची गोष्ट होऊ शकत नाही.न दु:ख,ना अशांती.येथे तर घराघरांमध्ये अशांती आहे,देशा देशा मध्ये अशांती आहे. साऱ्या विश्वामध्ये अशांती आहे, किती तुकडे तुकडे झाले आहेत. किती विभाग आहेत.१०० मैला वरती भाषा वेगवेगळी आहे.आता म्हणतात भारताची प्राचीन भाषा संस्कृत आहे. आता आदी सनातन धर्मा बद्दल कोणाला माहिती नाही,परत कसे म्हणतात ही प्राचीन भाषा आहे.तुम्ही सांगू शकता आदी सनातन देवी-देवता धर्म केव्हा होता?तुमच्या मध्ये पण क्रमानुसार आहेत.काही तर बुध्दू आहेत,ते दिसून येते.असे पाहण्यात येते,हे तर जसे पत्थर बुद्धी आहेत.अज्ञान काळात पण म्हणतात ना,हे भगवान यांच्या बुद्धीचे कुलुप उघडा.बाबा तुम्हा सर्व मुलांना ज्ञानाचा प्रकाश देतात,त्याद्वारे कुलूप उघडते.तरीही काही-काही मुलांचे बुद्धीचे कुलूप उघडत नाही.असे म्हणतात,बाबा तुम्ही तर बुद्धीवानांचे बुद्धी आहात,आमच्या पतीच्या बुद्धीचे कुलूप उघडा.बाबा म्हणतात मी थोडेच यासाठी आलो आहे,जे एका-एकाच्या बुद्धीचे कुलूप उघडेल. परत सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडेल, सर्व महाराजा महाराणी बनतील.मी कसे सर्वांचे कुलूप उघडू?ज्यांना सतयुगामध्ये यायचे नाही तर,मी त्यांचे कुलूप कसे उघडू?वैश्विक नाटकानुसार,वेळेप्रमाणे त्यांच्या बुद्धीचे कुलूप उघडेल,मी कसे उघडू? पूर्वनियोजित नाटकावर पण आधारित आहे ना.सर्व पूर्ण रितीने पास थोडेच होऊ शकतात? शाळेमध्ये पण क्रमानुसार असतात ना.हे पण शिक्षण आहे,प्रजा पण बनणार आहे.सर्वांचे कुलूप उघडल्यावर प्रजा कुठून येईल?हा कायदा नाही.तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे.प्रत्येकाच्या पुरुषार्था नुसार जाणले जाते.चांगल्या रीतीने शिकतात त्यांना,सर्व ठिकाणी बोलावले जाते.कोण कोण चांगली सेवा करतात.मुलांना चांगल्या रीतीने शिकायचे आहे.चांगल्या रीतीने शिकाल तर,घरी घेऊन जाईल,परत स्वर्गामध्ये पाठवले जाईल,नाहीतर खूप कडक सजा खावी लागेल आणि पद पण भ्रष्ट होईल.विद्यार्थ्यांनी शिक्षकाला प्रत्यक्ष करायला पाहिजे. स्वर्णयुगामध्ये पारस बुद्धी होते,आता लोह युगामध्ये स्वर्णबुद्धी कसे होऊ शकतील? विश्वामध्ये शांती होती, जेव्हा एक राज्य,एक धर्म होता. वर्तमानपत्रांमध्ये पण तुम्ही देऊ शकता,भारतामध्ये जेव्हा यांचे राज्य होते,तर विश्वामध्ये शांती होती.शेवटी जरूर समजतील.तुम्हा मुलांचे नाव प्रसिद्ध होणार आहे.त्या शिक्षणामध्ये तर खूप पुस्तके इत्यादी असतात,इथे तर काहीच नाही.हे ज्ञानचे शिक्षण खूपच सहज आहे,बाकी आठवणींमध्ये चांगले चांगले महारथी पण नापास आहेत.आठवणीची शक्ती भरत नाही,तर ज्ञान तलवार चालणार नाही.खूप आठवण करतील,तेव्हाच शक्ती भरली जाईल.जरी बंधनांमध्ये आहेत,तरीही आठवण करत राहतात, तर खूप फायदा आहे.कधी बाबांना पाहिले नाही,आठवणी मध्येच प्राण सोडतात,तर खूप चांगले पद प्राप्त करू शकतात,कारण खूप आठवण करतात.बाबाच्या आठवणी मध्ये प्रेमाचे अश्रू येतात,ते अश्रू मोती बनतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःसाठी स्वतःच पुरुषार्थ करुन उच्चपद प्राप्त करायचे आहे. शिक्षणाद्वारे स्वतःला स्वत:च राजतिलक द्यायचा आहे.ज्ञानाला चांगल्यारीतीने धारण करून,नेहमी हर्षित राहायचे आहे.

(२) ज्ञान तलवारी मध्ये आठवणी द्वारे शक्ती भरायची आहे.आठवणी द्वारेच बंधन मुक्त बनायचे आहे.कधी पण खराब सिनेमा पाहून,आपल्या संकल्पाला अपवित्र बनवायचे नाही.

वरदान:-
नेहमी एकांत आणि स्मरण मध्ये व्यस्त राहणारे,बेहद्दचे वानप्रस्थी भव.

वर्तमान वेळेच्या प्रमाण,तुम्ही सर्व वानप्रस्थ अवस्थांच्या जवळ आहात,तर कधी बाहुल्यांचा खेळ करु शकत नाही.ते नेहमी एकांत आणि स्मरण मध्ये राहतात.तुम्ही सर्व बेहद्दचे वानप्रस्थी नेहमी,एकाच्याअंतमध्ये म्हणजेच निरंतर एकांत मध्ये रहा,सोबत एकाचे स्मरण करत, स्मृती स्वरूप बना.सर्व मुलांच्या प्रति बापपदाची हीच शुभेच्छा आहे की, आता बाबा आणि मुलं समान बनावीत.नेहमी आठवणीमध्ये सामावून जावीत.समान बनणे म्हणजे सामावणे,हीच वानप्रस्थ स्थिती ची लक्षणं आहेत.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- तुमच्या हीम्मतीचे एक पाऊल टाका,तर बाबा मदतीचे हजार पाऊल पुढे करतील.