11-09-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो सत्य बाप सत्य खंड स्थापन करत आहेत, तुम्ही पित्याजवळ आला आहात, नारायण बनण्याचे सत्य ज्ञान ऐकण्यासाठी".

प्रश्न:-
तुम्हा मुलांना आपल्या ग्रहस्थ जीवनामध्ये सांभाळून चालायचे आहे का ?

उत्तर:-
कारण तुमची गत मत सर्वांपासून वेगळी आहे . तुमचे ज्ञान गुप्त आहे, म्हणून विशाल बुद्धी बनून सर्वांशी जुळवून घ्यायचे आहे. आम्ही सर्वजण भाऊ-बहीण आहोत, हे समजून घ्यायचे आहे. असे नाही की पत्नी आपल्या पतीला म्हणेल की तू माझा भाऊ आहेस, तेव्हा ऐकणारे काय म्हणतील, यांना काय झाले आहे? युक्तीने चालायचे आहे.

ओम शांती।
आत्मिक पिता मुलांना समजवतात, आत्मिक अक्षर न म्हणता फक्त बाबा म्हटले तरी मुलांना समजते. हे आत्मिक पिता आहेत. बाबा मुलांना समजावून सांगतात. सर्व जण स्वतःला भाऊ भाऊ तर म्हणतातच. बाबा मुलांना समजवतात, सगळ्यांना तर नाही समजवणार . गीतेमध्ये पण लिहिलेले आहे भगवानुवाच कुणासाठी ? ईश्वराची सर्व मुले आहेत . तो ईश्वर पिता आहे, तर ईश्वराची सर्व मुले भाऊ भाऊ आहेत. ईश्वरानी समजवलेल असेल, राज योग शिकवलेला असेल ना. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडलेले आहे . असे विचार तुमच्याशिवाय इतरांचे कोणाचे चालणार नाहीत. ज्यांना ज्यांना संदेश मिळत जाईल ते शाळेमध्ये येत जातील, शिकत जातील. समजतील प्रदर्शनी तर बघितलेली आहे आता जाऊन ऐकावे. मुख्य गोष्ट आहे ज्ञानसागर पतीत पावन गीता ज्ञानदाता शिव भगवानुवाच. त्यांना हे माहिती पडावे की यांना शिकवणारा, समजवणारा कोण आहे ? तो सर्वोच्च आत्मा ज्ञानसागर निराकार आहे, तो सत्य आहे तर तो सत्यच सांगेल. यामध्ये कोणी प्रश्न उठवू शकत नाही. तुम्ही सर्व काही सोडलेल आहे सत्यासाठी. तर प्रथम यावर समजवायचे आहे की, आम्हाला परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा राजयोग शिकवत आहेत. हे राजाई पद आहे .ज्यांना निश्चय होईल, जो सर्वांचा पिता आहे, तो पारलौकिक बाप आम्हाला समजवत आहेत.तेच सर्वात श्रेष्ठ आहेत. तर दुसरा कोणता प्रश्न निर्माणच होवू शकत नाही. ते आहेत पतित-पावन, ते वेळेनुसार च येतील. तुम्ही पाहता हीच ती महाभारत लढाई आहे. विनाशानंतर पवित्र दुनिया येणार आहे, हे मनुष्य जाणत नाहीत की भारत पवित्र होता. बुद्धी चालत नाही . गोदरेजचे कुलूप लागलेले आहे. त्याची किल्ली एक बाबा जवळच आहे,म्हणून कोणाला माहिती नाही की तुम्हाला शिकवणारा कोण आहे, दादा समजवतात तेव्हा तर टीका करतात .काही बोलण्यापूर्वी पूर्वी प्रथम हे सांगा-- या मध्ये लिहिलेला आहे शिव भगवानुवाच. ते तर आहेतच सत्य . बाबा आहेत ज्ञान संपन्न, सृष्टीच्या आदी - मध्य- अंताचे रहस्य समजवतात. हे ज्ञान आता तुम्हाला त्या बेहदच्या पित्या कडून मिळत आहे . तो सृष्टीचा रचनाकार आहे. पतीत सृष्टीला पावन बनवणारे आहेत. म्हणून प्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे. त्या परमपिता परमात्म्याशी आपला काय संबंध आहे? ते नरापासून नारायण बनण्याचे खरे ज्ञान देतात. मुले जाणतात बाबा सत्य आहेत. जे सत्य खंड बनवतात. तुम्ही येथे आलेला आहात नरा पासून नारायण बनण्यासाठी. बॅरिस्टर जवळ गेला तर समजतील आम्ही बॅरिस्टर बनण्यासाठी आलेलो आहोत. आता तुम्हाला निश्चय आहे भगवान आम्हाला शिकवतात. काहींना निश्चय होतो पण पुन्हा संशय बुद्धी होऊन जातात . तेव्हा त्यांना म्हणतात तुम्ही तर म्हणत होता आम्हाला भगवान शिकवतात मग भगवानाला का सोडले? संशय आल्या नेच पळून जातात . कोणतं ना कोणतं विकर्म करतात. भगवानुवाच - काम महा शत्रू आहे, त्याच्यावर विजय प्राप्त करण्यानेच जगतजीत बनाल. तेच पावन दुनिये मध्ये जातील. येथे आहेच राजयोगाचे ज्ञान. तुम्ही जाऊन राजाई कराल . बाकी ज्या आत्मा आहेत त्या आपापला कर्मभोग चुक्तू करून परत जातील.हा विनाशाचा (कयामतीचा) वेळ आहे .बुद्धी जाणते की सतयुगाची स्थापना जरूर होणार. पावन दुनियेला सतयुग म्हटले जाते. बाकी सर्वजण मुक्तीधाम मध्ये जातील त्यांना पुन्हा आपली भूमिका पुनरावृत्त (रिपीट) करायची आहे. तुम्ही आपला पुरुषार्थ करत राहा. पावन बनून पावन दुनियेचे मालक बनण्यासाठी. स्वताला मालक तर समजता ना . प्रजा पण मालक आहे. प्रजा पण म्हणते आमचा भारत. तुम्ही समजता आम्ही सर्वजण नर्कवासी आहोत. आता आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी राजयोग शिकत आहोत. सर्व तर स्वर्गवासी बनणार नाहीत. बाबा म्हणतात जेव्हा भक्तिमार्ग पुर्ण होतो, तेव्हाच मी येतो. मलाच येवुन सर्व भक्तांना भक्तीचे फळ द्यावे लागते. बहुतांश तर भक्त आहेत ना. सर्व जण बोलवतात, हे गॉड फादर,ईश्वरीय पिता म्हणून. भक्तांच्या तोंडून हे गॉडफादर, हे भगवान हे जरूर निघते. भक्ती आणि ज्ञानामध्ये फरक आहे . तुमच्या तोंडून कधी ही "हे ईश्वर, हे भगवान" निघू नये. मनुष्यांना तर अर्धा कल्पा पासून ही सवय झालेली आहे. तुम्ही जाणता तो आमचा पिता आहे. तुम्हाला "हे बाबा" थोडच म्हणायचे आहे. बाबा कडून तुम्हाला तर वरसा घ्यायचा आहे. प्रथम हा "निश्चय" झाला पाहिजे की आम्ही बाबा कडून "वारसा' घेतो. बाबा मुलांना वारसा घेण्याचे अधिकारी बनवतात. हे तर खरे पिता आहेत ना. बाबा जाणतात,याच मुलांना ज्ञानामृत पाजले, ज्ञान चितेवर बसवून विश्वाचे मालक, देवता बनवले होते. तेच काम चितेवर बसून भस्मीभूत झालेले आहेत. आता मी पुन्हा "ज्ञान चितेवर" बसवून, अज्ञान निद्रेतून जाग्रूत करून स्वर्गा मध्ये घेऊन जातो. बाबांनी समजवलेले आहे तुम्ही आत्मा शांतीधाम आणि सुखधाम मध्ये राहता. सुखधामला म्हटले जाते पवित्र दुनिया. संपूर्ण निर्विकारी. तेथे देवता राहतात. आणि ते आहे स्वीट होम, आत्म्याचे घर. सर्व अभिनेते शांतीधाम मधून येथे येतात भूमिका करण्यासाठी. आम्ही आत्मा येथील रहिवासी नाहीत. ते अभिनेते येथील रहिवासी असतात. फक्त घरांतून येऊन कपडे बदलून आपली भूमिका करतात. तुम्ही तर समजता आमचे घर शांतीधाम आहे . तेथे पुन्हा आम्हाला परत जायचे आहे. जेव्हा सर्व अभिनेते स्टेजवर येतात, तेव्हा बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात. म्हणून त्यांना मुक्ती दाता, मार्गदर्शक म्हटले जाते. दु:खहर्ता सुखकर्ता आहेत, तेव्हा एवढे सगळे मनुष्य कुठे जातील? विचार करा- पतितपावन म्हणून का बोलवतात ? आपल्या मृत्यू साठी, दु:खाच्या दुनियेमध्ये राहण्याची इच्छा नाही, म्हणून म्हणतात घरी घेवून चला. हे सर्व जण मुक्तिलाच मानणारे आहेत. भारताचा प्राचीन योग पण किती प्रसिद्ध आहे. विलायतेला पण जातात प्राचीन राज योग शिकण्यासाठी. ख्रिश्चनां मध्ये पण खूप जण असे आहेत की जे संन्यास्यांचा मान ठेवतात, भगवी कपडे घालणे ही हठयोगाची ओळख आहे. तुम्हाला तर घरदार सोडायचे नाही. न पांढऱ्या कपड्यांचे बंधन आहे. परंतु पांढरे कपडे चांगले वाटतात. तुम्ही भट्टी मध्ये राहिले असल्यामुळे ड्रेस निश्चित झाला. हल्ली पांढरी कपडे जास्त पसंत करतात. मनुष्य मरतात तेव्हा पांढरी चादर घातली जाते. प्रथम बाबाचा परिचय द्यायचा आहे. दोन पिता आहेत. ह्या गोष्टी समजायला वेळ लागेल. प्रदर्शनीमध्ये एवढे समजू शकणार नाहीत. सतयुगामधे एक बाप, या वेळी तुम्हाला आहेत तीन पिता,कारण भगवान येतात प्रजापिता ब्रह्मा च्या शरीरांमध्ये. ते पण सर्वांचे पिता आहेत. तर या तीन पित्यामध्ये सर्वात श्रेष्ठ वर्सा कोणाचा? निराकार पिता वर्सा कसा देणार? तर ते देतात ब्रम्हा द्वारा. ब्रह्म द्वारा स्थापना करतात आणि ब्रह्म द्वारा वर्सा पण देतात. या चित्रावर तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजवू शकता. शिवबाबा आहेत, पुन्हा हे प्रजापिता ब्रह्मा आदी देव, आदी देवी. हे आहेत ग्रेट ग्रेट ग्रँड फादर. बाबा म्हणतात मला 'शिवाला' ग्रेट ग्रेट ग्रँड फादर म्हणू शकत नाहीत. मी सर्वांचा पिता आहे. हा आहे प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही झालात भाऊ बहिण. विकारी दृष्टी ठेवू शकत नाही. जर विकारी द्रुष्टी झाली तर विकारांमध्ये जातात. बाबाला विसरतात, बाबा म्हणतात तुम्ही माझा मुलगा बनून काळं तोंड केले आहे. बेहदचे पिता मुलांना समजवतात, तुम्हाला हा नशा चढलेला आहे. समजताना ना गृहस्थ व्यवहारांमध्ये पण राहायचे आहे. लौकिक संबंधांना पण निभवायचे आहे. तोंड द्यायचे आहे. लौकीक पित्याला तुम्ही बापच म्हणणार ना. त्यांना तुम्ही भाऊ म्हणू शकत नाही. सर्वसाधारणपणे पित्याला पिताच म्हटले जाते. बुद्धीमध्ये असते की तो आमचा लोकीक पिता आहे . ज्ञान तर आहे ना. हे ज्ञान खूप विचित्र आहे . हल्ली तर नावाने बोलवले जाते. परंतु बाहेरच्या विजिटर समोर किंवा बाहेरच्या लोकांसमोर जर भाऊ म्हटले तर ते समजतील की,त्यांचे डोके खराब झाले आहे. म्हणून खूप युक्तीने चालले पाहिजे. लौकिकला पण निभवायचे आहे. तुमचे ज्ञान गुप्त आहे, संबंध पण गुप्त आहेत. विशेष करून स्त्रिया पतीचे कधी नाव घेत नाहीत. पती स्त्रीचे नाव घेवु शकतात . यामध्ये खूप युक्तीने चालायचे आहे. लौकिकला पण निभवायचे आहे . बुद्धी वर गेली पाहिजे . आम्ही बाबा कडून वरसा घेत आहोत. तसे काकाला काका, पित्याला पिताच म्हणावे लागेल . जे ब्रह्माकुमार- कुमारी बनलेले नाहीत, ते भाऊ बहीण पण समजणार नाहीत. जे बी. के. बनलेले आहेत तेच या सर्व गोष्टींना समजतील. बाहेरील लोक तर गोंधळूनच जातील . यामध्ये समजून घेण्याची बुद्धी पाहिजे. बाबा तर मुलांना विशाल बुद्धी बनवतात. तुमची आदी हदची बुद्धी होती. आता बुद्धी जाते बेहद मध्ये. तो आमचा बेहदचा पिता आहे. आम्ही सर्वजण भाऊ-बहीण आहोत. परंतु घरामध्ये सासू ला सासूच म्हणावे लागेल, बहीण थोडेच म्हणणार. घरामध्ये राहात असताना युक्तीने चालायचे आहे . नाहीतर लोक म्हणतील पतीला भाऊ, सासूला बहीण म्हणतात. हे काय आहे ? ह्या ज्ञानाच्या गोष्टी तुम्हीच जाणता, दुसरे कोणी जाणत नाहीत. असे म्हणतात ना, प्रभू तुझी गत मत तूच जानणार .आता तुम्ही त्यांची मुले बनलेले आहात. तर तुमची गत मत तुम्ही जाणता. खूप सांभाळून चालायचे आहे. गोंधळून जायचे नाही. प्रदर्शनीमध्ये तुम्हा मुलांनी, प्रथम हे समजवायचे आहे की, आम्हाला शिकवणारे भगवान आहेत. आता तुम्ही सांगा भगवान कोण? निराकार 'शिव' का देहधारी श्रीकृष्ण ? जे गीतेमध्ये भगवानुवाच आहे,ते शिव परमात्माने उच्चारलेले आहेत का श्रीकृष्णाने ? कृष्ण तर आहे स्वर्गातला पहिला राजकुमार. असे तर म्हणू शकत नाही कि कृष्ण जयंती सो शिवजयंती. शिवजयंती नंतर येते कृष्ण जयंती. शिवजयंती ने स्वर्गाचा राजकुमार श्रीकृष्ण कसा बनला ? ह्या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. शिवजयंती नंतर गीता जयंती. पुन्हा पटकन येते कृष्ण जयंती . कारण बाबा राजयोग शिकवतात. मुलांच्या बुद्धी मध्ये आलेले आहे ना? जो पर्यंत शिव परमात्मा येत नाहीत तो पर्यंत शिवजयंती साजरी करू शकत नाही. जोपर्यंत 'शिव' येऊन कृष्णपुरीची स्थापना करत नाहीत, तो पर्यंत कृष्ण जयंती कशी साजरी केली जाईल? कृष्णाचा जन्म दिवस साजरा केला जातो, परंतु समजतात थोडेच? कृष्ण राजकुमार होता. तर जरूर सतयुगामध्येच असणार ना . देवी-देवतांची राजधानी जरूर असणार . फक्त एक कृष्णालाच बादशाही तर मिळणार नाही ना ? जरूर कृष्णपुरी असेल, म्हणतात पण श्रीकृष्णपुरी आणि ही आहे कंस पुरी . कृष्णपुरी आहे नवीन दुनिया . कंस पुरी आहे जुनी दुनिया .असे म्हणतात देवता आणि असुरांची लढाई लागली होती, देवता जिंकले,परंतु असे तर नाही.कंसपुरी नष्ट झाली, पुन्हा कृष्णपुरी ची स्थापना झाली . कंसपुरी आहे जुन्या दुनियेमध्ये . नविन दुनियेत थोडेच,हे कंस, दैत्य आदी असतील. येथे तर पाहा, किती मनुष्य आहेत. सतयुगामध्ये खूप थोडे असतात. हे पण तुम्ही जाणता .आता तुमची बुद्धी चालते. देवतांनी तर कोणतीही लढाई केलेली नाही. दैवी संप्रदाय सतयुगामध्ये असतात. आसुरी संप्रदाय येथे आहेत. बाकी न देवतांची आणि असुरांची लडाई लागली, न पांडवांची. तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. बाबा म्हणतात या विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे, तरच जगजीत बनाल. यामध्ये काही लडाई वगैरे नाही . लडाई म्हटले तर हिंसक वाटेल. रावणावर विजय प्राप्त करायचा आहे, परंतु अहिंसेने. फक्त बाबांची आठवण करण्यानेच विकर्म विनाश होतात. भारताचा प्राचीन राजयोग प्रसिद्ध आहे.

बाबा म्हणतात "माझ्याशी बुद्धी योग लावा, तर तुमचे सर्व पाप भस्म होतील". बाप पतितपावन आहेत, तर बुद्धीचा योग्य त्या बाबाशीच लावायचा आहे, तरच तुम्ही पतीता पासून पावन बनाल. आता तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्याशी बुद्धी योग लावत आहात. आठवण करत आहात .यामध्ये लडाईची गोष्ट नाही . जे चांगल्यारितीने शिकतील, बाबांची आठवण करतील. तेच बाबा कडून वरसा घेतील,कल्पा पूर्वीप्रमाणे. या जुन्या दुनियेचा विनाश होणार. सर्व हिसाब किताब चुक्तू करून परत जातील. पुन्हा परिवर्तन होऊन क्रमवार जाऊन बसतील ना. तुम्ही पण क्रमवार जाऊन तेथे राज्य कराल . किती समजण्याची गोष्ट आहे. अच्छा

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची स्नेह पूर्वक आठवण. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१)या विनाशाच्या वेळी जेव्हा संगमयुगाची स्थापना होत आहे, तर जरूर पावन बनायचे आहे. बाबा आणि बाबाच्या कार्यासंबंधी कधीही संशय घ्यायचा नाही .

२)ज्ञान आणि संबंध गुप्त आहे. म्हणून लौकिक मध्ये खूप युक्तीने, विशाल बुद्धी बनून वागायचे आहे . कोणते असे शब्द बोलायचे नाहीत जेणे करून ऐकणारे गोंधळून जातील.

वरदान:-
मनमत, परमताला समाप्त करून श्रीमतावर पद्मांची कमाई जमा करणारे पद्मापदम भाग्यशाली बना.

श्रीमता वर चालणारे एक संकल्प पण मनमत किंवा परमतावर चालू शकत नाहीत.पुरूषार्थाची गती जर वाढत नसेल तर जरूर काही ना काही श्रीमतांमध्ये मनमत किंवा परमत मिक्स आहे. मनमत म्हणजे अल्पज्ञ आत्म्याचे संस्कारा नुसार जे संकल्प उत्पन्न होतात ते स्थितीला डगमग करतात. म्हणून चेक करा आणि करवून घ्या. एक पाऊल पण श्रीमता शिवाय नसावा, तेव्हाच पद्माची कमाई जमा करून, पद्मा पदम भाग्यशाली बनू शकाल .

बोधवाक्य:-
मनामध्ये सर्वांच्या प्रती कल्याणाची भावना ठेवणे, हेच विश्व कल्याणकारी आत्म्याचे कर्तव्य आहे.