11-10-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.03.86  ओम शान्ति   मधुबन


सर्वशक्ती संपन्न बनणे किंवा वरदान मिळवण्याचे वर्ष


आज सर्व खजान्याचे मालक आपल्या मास्टर मुलांना पाहत आहे.बालक सो मालक किती बनले आहेत,हे पाहत आहेत.या वेळेत जे श्रेष्ठ आत्मे,सर्व शक्तीचे,सर्व खजान्याचे मालक बनतात,ते मालक पणाचे संस्कार,भविष्यामध्ये विश्वाचे मालक बनतात.तर काय पाहिले?बालक तर सर्व आहेत, बाबा आणि मी हे आकर्षण, सर्व मुलांमध्ये,चांगल्या प्रकारे आहे.बालक पणाचं नशा सर्वा मध्ये आहे परंतु बालकच मालक म्हणजे बाप समान संपन्न.तर बालक पणाची स्थिती आणि मालक पणाची स्थिती,यामध्ये अंतर पाहिले.मालक पण म्हणजेच प्रत्येक पाऊल स्वतःच संपन्न स्थितीमध्ये असेल आणि सर्वां प्रती असेल, याला म्हणतात मास्टर,म्हणजेच बालक सो मालक.मालक पणाची विशेषता,जितके मालक पणाचा नशा तेवढेच,विश्व सेवाधारीचे संस्कार,नेहमी स्पष्ट रुपामध्ये असतील.जितका मालक पणाचा नशा,तेवढाच सोबत विश्व सेवाधारी चा नशा.दोघांची समानता हवी.हे आहे बाप समान मालक बनणे.हा परिणाम पाहत होते की,बालक आणि मालक दोन्ही स्वरूप नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये येतात की,फक्त ज्ञाना पुरते मर्यादित आहे.परंतु ज्ञान आणि प्रत्यक्ष कर्मामध्ये अंतर आहे. काही मुलं या समानता मध्ये बाप समान प्रत्यक्ष कर्म रूपामध्ये चांगल्या प्रकारे आहेत.काही मुलं आज पण बालक पणा मध्ये राहतात,परंतु मालक पणाच्या त्या आत्मिक नशेमध्ये,बाप समान बनण्याच्या शक्तिशाली स्थितीमध्ये, कधी स्थिर राहतात,तर कधी स्थिर होण्या मध्येच वेळ चालला जातो.लक्ष सर्व मुलांचे हेच श्रेष्ठ आहे की,बाप समान बनायचे आहे. लक्ष शक्तिशाली आहे.आता लक्ष्याला संकल्प,बोल,कर्म संपर्का मध्ये आणायचे आहे,यामध्येच अंतर पडते.काही मुलं संकल्पा पर्यंत समान स्थितीमध्ये राहतात.काही संकल्पाच्या सोबत वाणी पर्यंत येतात.कधीकधी कर्मामध्ये पण येतात.परंतु जेव्हा सबंध संपर्का मध्ये येतात,सेवेच्या संबंधांमध्ये येतात किंवा परिवाराच्या संबंधांमध्ये येतात,या संबंध आणि संपर्का मध्ये टक्केवारी कधी कमी जास्त होते.बाप समान बनणे म्हणजेच एकाच वेळेत, संकल्प, बोल, कर्म संबंध,सर्वामध्ये बाप समान स्थितीमध्ये राहणे.कोणी दोन्ही मध्ये राहतात,कोणी तीन मध्ये राहतात,परंतु चारही स्थितीमध्ये,ज्या सांगितल्या आहेत, त्यामध्ये कधी कसे,कधी कसे होतात.तर बापदादा मुलांच्या प्रति नेहमीच अती स्नेही पण आहेत. स्नेहाचे स्वरुप फक्त अव्यक्तचे व्यक्त रूपामध्ये भेटणेच नाही,परंतु स्नेहाचे स्वरुप समान बनणे आहे. काही मुलं विचार करतात की,बाप दादा निर्मोही बनत आहेत,परंतु हे निर्मोही बनणे नाही,हे तर विशेष स्नेहा चे स्वरूप आहे.बाप दादांनी ह्यापूर्वी पण ऐकवले होते की अनेक वर्षाच्या प्राप्तीच्या हिशोबाचा वेळ तर खूप कमी आहे,म्हणून बापदादा मुलांना खूप वर्षासाठी विशेष तपास्याद्वारा स्वतःला मजबूत करणे,परिपक्व करणे यासाठी विशेष वेळ देत आहेत.तसे तर स्वर्णजयंती मध्ये सर्वांनी संकल्प केला की,समान बनू,विघ्नविनाशक समाधान स्वरूप बनू,हे सर्व वायदे बाबांच्या जवळ चित्रगुप्ताच्या रूपामध्ये,हिशोबाच्या खात्यामध्ये नोंदलेले आहे.आज पण काही मुलांनी दृढ संकल्प केला.समर्पण होणे म्हणजे स्वतःला सर्व प्राप्तीने परिपक्व बनवणे,संपूर्णतेचा अर्थच आहे की,संकल्प,बोल,कर्म आणि सबंध या चारी मध्ये बाप समान बनणे.पत्र जे लिहून दिलेले आहेत,ते पत्र किंवा संकल्प, सुक्ष्मवतन मध्ये त्यांच्याजवळ नेहमीसाठी नोंदलेले आहेत.सर्वांच्या फाईल तेथे वतन मध्ये आहेत. प्रत्येकाचा संकल्प आविनाशी झाला आहे.

या वर्षी मुलांच्या दृढ तपस्या द्वारे,प्रत्येक संकल्पाला अमर, अविनाशी,बनवण्यासाठी स्वतःला नेहमी,दृढतेच्या अभ्यासा द्वारे आत्मिक सुसंवाद करण्यासाठी,स्व अनुभूती करण्यासाठी आणि पुर्नअवतरीत स्वरुप बणून,परत कर्मामध्ये येण्यासाठी,या स्थितीला नेहमीसाठी आणि मजबूत करण्यासाठी,बापदादा वेळ देत आहेत.सोबतच विशेष रूपामध्ये शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे,ज्यांचे खाते आणखी वृद्धिंगत करायचे आहे. विशेष शुद्ध संकल्पाच्या शक्तींचा विशेष अनुभव आणि अंतर्मुखी बणून करण्याची आवश्यकता आहे.शुद्ध संकल्पाची शक्ती सहज,व्यर्थ संकल्पना समाप्त करून दुसऱ्याच्या प्रतिपण शुभ भावना,शुभकामनाच्या स्वरूपा द्वारे परिवर्तन करू शकते.आता या शुद्ध संकल्पाच्या शक्तीचा विशेष अनुभव सहजच व्यर्थ संकल्पना समाप्त करतो.न फक्त आपल्या व्यर्थ संकल्पांना परंतु आपले शुद्ध संकल्प दुसऱ्यांच्या प्रति पण शुभ भावना,शुभकामनाच्या स्वरुपा द्वारे परिवर्तन करू शकतात.आता या शुद्ध संकल्पाच्या शक्तीचा भांडार,स्वत:च्या प्रतिपण जमा करण्याची खूप आवश्यकता आहे. मुरली ऐकण्याची आवड तर खूप चांगली आहे.मुरली म्हणजेच खजाना.मुरलीच्या प्रत्येक मुद्द्याला शक्तीच्या रूपामध्ये जमा करणे,हे आहे शुद्ध संकल्पाच्या शक्तीला वृद्धिंगत करणे,शक्तीच्या रूपामध्ये प्रत्येक वेळेत कार्यामध्ये लावणे. आता या विशेषतेला विशेष लक्षात ठेवायचे आहे.शुद्ध संकल्पाच्या शक्तीच्या महत्वाला,आता जितका अनुभव करत जावा,तेवढीच मनसा सेवेचा सहज अनुभवी बनत जाल. प्रथम तर स्वतःच्या प्रती शुद्ध संकल्पाच्या शक्तीला जमा करायला पाहिजे आणि परत सोबतच तुम्ही सर्व बाबांच्या सोबत विश्व कल्याणकारी आत्मे,विश्व परिवर्तक आत्मे आहात.तर विश्वाच्या प्रति पण शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे परिवर्तन करण्याचे कार्य,आत्ता खूप राहिले आहे.जसे वर्तमान वेळेत ब्रह्मा अव्यक्त रूपधारी बणून,शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे,तुम्हा सर्वांचे पालन करत आहेत.सेवेच्या वृध्दीमध्ये सहयोगी बणून पुढे घेऊन जात आहेत.ही विशेष सेवा शुद्ध संकल्पाच्या शक्तीची चालत आहे. तर ब्रह्मा बापसमान आत्ता,या विशेषतेला आपल्यामध्ये वाढवण्यासाठी तपास्याच्या रुपामध्ये अभ्यास करायचा आहे. तपस्या म्हणजेच दृढता संपन्न अभ्यास,साधारणतेला तपस्या म्हणत नाहीत.तर आता तपस्या साठी वेळ देत आहेत.आत्ताच का देत आहेत,कारण ही वेळ तुमच्या खूप वर्षामध्ये जमा करेल.बापदादा सर्वांना अनेक वर्षाची प्राप्ती करण्यासाठी निमित्त आहेत.बापदादा सर्व मुलांना अनेक वर्षाचे राज्य भाग्य अधिकारी बनवू इच्छितात.तर अनेक वर्षाचा वेळ खूप कमी आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीच्या अभ्यासाला तपस्याच्या रुपामध्ये करणे,यासाठी विशेष वेळ देत आहेत,कारण वेळ अशी येईल ज्यामध्ये तुम्हा सर्वांना दाता आणि वरदाता बणून थोड्या वेळामध्ये, अनेकांना द्यावे लागेल.तर सर्व जमेच्या खात्याला संपन्न बनविण्यासाठी वेळ देत आहेत. दुसरी गोष्ट विघ्नविनाशक किंवा समाधान स्वरूप बनण्याचा जो वायदा केला आहे,तो विघ्न विनाशक स्वतःच्या प्रति आणि सर्वांच्या प्रती बनण्याचा,विशेष दृढ संकल्प आणि दृढ स्वरुप दोन्ही हवे.फक्त संकल्प नाही परंतू स्वरूप पण हवे.या वर्षी बापदादा अतिरिक्त संधी देत आहेत.ज्यांना पण असे विघ्नविनाशक बनण्यासाठी विशेष भाग्य घ्यायचे आहे,ते या वर्षामध्ये घेऊ शकतात.या वर्षाला विशेष वरदान आहे,परंतु वरदान घेण्यासाठी विशेष दोन गोष्टी वरती लक्ष द्यावे लागेल.एक तर नेहमी बाप समान देणारे बनायचे आहे, घ्यायची भावना ठेवायची नाही.आदर मिळावा,स्नेह मिळावा, तेव्हा स्नेही बनू किंवा आदर मिळाल्यानंतर आदर देऊ,नाही. दाताची मुलं बणून मला द्यायचे आहे,घेण्याची भावना ठेवायची नाही.श्रेष्ठ कर्म करत असताना, दुसर्‍या प्रकारे मिळायला पाहिजे, ही भावना ठेवू नका.श्रेष्ठ कर्माचे फळ श्रेष्ठ असतेच.हे ज्ञान तुम्ही जाणता परंतु करण्याच्या वेळेस हा संकल्प ठेवू नका.एक तर वरदान घेण्यासाठी,पात्र बनण्यासाठी,नेहमी दाता बणून राहायचे आहे आणि दुसरे म्हणजे विघ्न विनाशक बनायचे आहे.तर सामवण्याच्या शक्तीला नेहमी विशेष रूपांमध्ये लक्षात ठेवा.स्वतःच्या प्रति पण सामवण्याची शक्ती आवश्यक आहे. सागराचे मुलं आहात,सागराची विशेषता आहेत सामावणे. ज्यांच्यामध्ये सामावण्याची शक्ती असेल,तर शुभ भावना,कल्याणाची कामना करू शकतील,म्हणून दाता बणून सामवण्याच्या शक्ती स्वरूप सागर बना.या दोन विशेषता नेहमी कर्मात आणायच्या आहेत.अनेक वेळेत,अनेक मुलं म्हणतात,विचार तर होता की, हे करू परंतु विचार च चालू राहीला.तर या वर्षामध्ये चारही गोष्टींमध्ये एकाच वेळेस समानते चा विशेष अभ्यास करायचा आहे,समजलं.तर एक गोष्ट खजाण्याला जमा करायचे आहे आणि दाता बनण्याचे संस्कार, नैसर्गिक रूपामध्ये धारण होईल, यासाठी वेळ देत आहेत.तर विघ्नविनाशक बनणे आणि बनवणे यामध्ये नेहमीसाठी आपला क्रमांक निश्चित करण्याची संधी देत आहेत. काही पण होऊदे,स्वतः तपस्या करा आणि दुसऱ्यांचे विघ्न समाप्त करण्यामध्ये सहयोगी बना.स्वतःला किती पण सहन करावे लागेल परंतु हे सहन करणे नेहमीसाठी झोक्यामध्ये झोके घेणे आहे.जसे श्रीकृष्णाला किती प्रेमाने झोके देतात,असेच बाबा तुम्हा मुलांना आपल्या गोदीमध्ये झोके देतील आणि भविष्यामध्ये रत्नजडित झोक्यामध्ये झोके देतील, आणि भक्तीमध्ये पुज्य बणून झोक्या मध्ये झोके घेत राहाल.तर सहन करणे, मिटवणे हीच महानता आहे.मी का सहन करू? यांनी सहन करायला पाहिजे,यामध्ये स्वतःला कमी समजू नका.हे सहन करणेच महानता आहे.हे सहन करणे,सहन करणे नाही,अविनाशी प्राप्ती मध्ये जगणे आहे,म्हणून सदा विघ्नविनाशक बनवायचे आहे आणि बनवायचे आहे.यामध्ये प्रथम वर्गामध्ये येण्याची,ज्यांना संधी घ्यायची आहे, ते घेऊ शकतात.ही विशेष संधी घेण्यासाठी बाप दादा,त्याचे महत्त्व ऐकवतत आहेत.तर वेळेच्या महत्त्वाला जाणून तपस्या करा. तिसरी गोष्ट वेळेप्रमाण जितके वातावरणा अशांत आणि हालचाल चे वाढत जात आहे, त्याप्रमाणे बुद्धीची लाईन पण खूप स्पष्ट असायला पाहिजे,कारण वेळेप्रमाणे बाबांची प्रेरणा आणि जाणीव(टचींग आणि कॅचींग) या दोन्ही शक्तीची आवश्यकता आहे.बापदादाच्या सूचनेला बुद्धी द्वारे धारण करू शकाल.जर बुध्दी ची लाइन स्पष्ट नसेल तर,बाबांच्या सूचनांमध्ये मनमत मिसळेल आणि मिक्स झाल्यामुळे वेळेवर धोका होऊ शकतो.जितकी बुद्धी स्पष्ट असेल,तेवढ्याच बाबांच्या सूचना स्पष्ट धारण करू शकतात.जितकी बुद्धीची लाईन स्पष्ट असेल,तेवढे स्वतःच्या प्रगती साठी,सेवेच्या वृद्धीसाठी आणि सर्व आत्म्यांना दाता बणून,देण्याची शक्ती सहज वृद्धिंगत होईल आणि जाणीव होईल. या वेळेत या आत्म्याच्या प्रति सहज सेवेचे साधन किंवा स्वतःच्या प्रगतीचे साधन, हेच बरोबर आहे. तर वर्तमान वेळेप्रमाण या दोन शक्तीची खूप आवश्यकता आहे, याला वाढवण्यासाठी एक एकनामी आणि (एकाॅनामी) बचत करणारे बना.एक बाबा दुसरे कोणी नाही. दुसऱ्यांचा लगाव,आकर्षण वेगळी गोष्ट आहे.लगाव आकर्षण तर चुकीचेच आहे परंतु दुसऱ्याच्या स्वभावाचा प्रभाव आपल्या अवस्थेला पण हलचल मध्ये घेऊन येतो.दुसऱ्याचे संस्कार बुद्धीला आपसात तक्रारी मध्ये घेऊन येतात. त्यावेळी बुद्धीमध्ये बाबा चे संस्कार आहेत? मग ते आकर्षणाच्या रुपमध्ये बुद्धीला प्रभावित करतील किंवा तक्रारीच्या रूपामध्ये बुद्धीला प्रभाव करतील परंतु बुद्धीची लाईन नेहमी स्पष्ट हवी.एक बाबा दुसरे कोणी नाही याला म्हणतात एकनामी आणि एकाॅनामी म्हणजे बचत काय आहे?धनाची बचत म्हणजेच बचत म्हणत नाही.ते पण जरुरी आहे परंतु वेळेनुसार,वेळ पण धन आहे,संकल्प पण धन आहे,शक्ती पण धन आहे.या सर्वांची बचत व्यर्थ गमवू नका. बचत करणे म्हणजे जमाचे खाते वृद्धिंगत करणे. हे एकनामी आणि बचतीचे संस्कार,अशा दोन्ही शक्तीचा अनुभव करू शकाल परंतू हा अनुभव विनाशाच्या वेळेत करू शकणार नाहीत.हा अभ्यास आतापासूनच पाहिजे.तेव्हा वेळेनुसार या अभ्यासाच्या मुळे अंत काळामध्ये श्रेष्ठ मत आणि गतीला प्राप्त करू शकाल.तुम्ही समजा की आत्ता विनाशाचा वेळ काहीतरी आहे.चला दहा वर्ष असतील परंतु दहा वर्षाच्या नंतर हा पुरुषार्थ करू शकणार नाहीत.कितीही कष्ट करा फरंतू करू शकणार नाहीत,कमजोर बनाल.परत अंतकाळ युद्धामध्ये जाईल,सफलता मिळणार नाही. त्रेतायुगी तर बनायचे नाही ना.कष्ट म्हणजेच बाण आणि भातोडा. नेहमी आनंदात,प्रेमामध्ये राहणे कुशीमध्ये राहणे म्हणजे मुरलीधर बनणे,सूर्यवंशी बनणे.मुरली आनंदामध्ये नाचवते आणि बाण लक्ष्यापर्यंत लावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.तर बाणधारी नाही परंतु मुरलीधर बनायचे आहे,म्हणून अंत काळात कोणी तक्रार करायला नको,थोडासा वेळ आणखी द्या. संधी द्या किंवा कृपा करा.हे चालणार नाही,हे आत्ताच सुचित करत आहे.मग ते उशीरा आले आहेत किंवा सुरुवातीला आले आहेत,तरी वेळे प्रमाणे सर्वांना अंतिम स्थिती पर्यंत पोहोचण्याची वेळ आहे.तर असे तीव्र गतीने चालावे लागेल, समजले,अच्छा.

चोहूबाजूच्या सर्व स्नेही मुलांना, नेहमी ह्रदयासीन मुलांना,नेहमी संतुष्टतेची झलक दाखवणाऱ्या मुलांना,नेहमी प्रसन्नतेच्या व्यक्तिमत्वा मध्ये राहणाऱ्या मुलांना, नेहमी विशाल बुद्धी धारण करणार्‍या,विशाल आत्म्यांना बापदादांची स्नेह संपन्न प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
पाच विकार रुपी दुष्मनाला परिवर्तन करून,सहयोगी बनवणारे मायाजीत जगतजीत भव.

विजय दुश्मनाचे रूप परिवर्तन जरूर करते.तर तुम्ही,विकार रुपी दुष्मनाला परिवर्तन करून सहयोगी स्वरूप बनवा,ज्याद्वारे ते नेहमी तुम्हाला नमस्ते करत राहतील. काम विकाराला शुभ इच्छाच्या रूपामध्ये,क्रोधाला आत्मिक नशेच्या रूपामध्ये,लोभाला अनासक्त वृत्तीचे रूपामध्ये, मोहाला स्नेहाच्या रूपामध्ये आणि देहाभिमानाला स्वाभिमान'च्या रूपांमध्ये परिवर्तन करा,तर मायाजीत जगतजीत बनाल.

सुविचार:-
सोन्यामध्ये माझेपणा,मी पणाची भेसळ आहे,जे किंमत कमी करते,म्हणून मी-पणा माझे-पणाला नष्ट करा.