11-10-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो,योग अग्नी द्वारे पापाला भस्म करून संपूर्ण सतोप्रधान बनायचे आहे,कोणतेही पाप कर्म करायचे नाही"

प्रश्न:-
सतयुगांमध्ये उच्च पद कोणत्या आधारावर मिळते,तेथील कोणता कायदा सर्वांना सांगा?

उत्तर:-
सतयुगामध्ये पवित्रतेच्या आधारावरती उच्च पद मिळते,जे पवित्रतेची कमी धारणा करतात,ते सतयुगा मध्ये उशिरा येतील आणि पद पण कमी मिळेल.येथे जेव्हा कोणी येतात,तर त्यांना कायदा ऐकवा,दान दिले तर ग्रहण सुटेल,पाच विकाराचे दान द्या तर तुम्ही१६ कला संपुर्ण बनाल.तुम्ही मुलं स्वतःला विचारा की,माझ्यामध्ये कोणता विकार तर नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता,आत्मिक मुलांना समजावतात की,मनुष्यांना कसे समजून सांगावे की,आत्ता स्वर्गाची स्थापना होत आहे.पाच हजार वर्षांपूर्वी पण भारतामध्ये स्वर्ग होता, लक्ष्मी-नारायणचे राज्य होते, विचार करायला पाहिजे त्या वेळेत किती मनुष्य होते.सतयुगाच्या सुरुवातीला नऊ दहा लाख असतील,सुरुवातीला झाड लहान असते.या वेळेत जेव्हा कलियुगाचा अंत आहे,तर वृक्ष खूप मोठे झाले आहे.आत्ता याचा विनाश पण जरुर होणार आहे.मुलं समजतात ही तीच महाभारत लढाई आहे,या वेळेतच गीताच्या भगवंतानी राजयोग शिकवला होता आणि देवी-देवता धर्माची स्थापना केली होती.संगम युगामध्ये अनेक धर्माचा विनाश आणि एक धर्माची स्थापन झाली होती.मुलं हे पण जाणतात की,आज पासून पाचहजार वर्षेपुर्व भारतामध्ये स्वर्ग होता आणि दुसरा कोणता धर्म नव्हता.अशी नवीन दुनिया स्थापन करणारे बाबा संगम युगा मध्येच येतात.आता ती स्थापन होत आहे, जुन्या दुनियेचा विनाश होईल.सतयुगामध्ये एकच भारत खंड होता आणि दुसरा कोणता खंड नव्हता.आत्ता तर खूप खंड आहेत. भारत खंड पण आहे परंतु यामध्ये आदी सनातन देवी देवता धर्म नाही, तो प्राय:लोप झाला आहे.आत्ता परत परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत,बाकी सर्व धर्माचा विनाश होईल.हे आठवणीत ठेवायचे आहे की,सतयुग त्रेतामध्ये दुसरे कोणते राज्य नव्हते आणि सर्व धर्म तर आत्ता आले आहेत.या दुनिया मध्ये खूप दुःख,अशांती, मारामारी आहे. महाभारी महाभारत लढाई पण तीच आहे.एकीकडे युरोपवासी यादव पण आहेत,पाच हजार वर्षपूर्व त्यांनी मिसाईलचा शोध लावला होता.कौरव-पांडव पण होते.पांडवा कडे स्वतः परमपिता परमात्मा मदतगार होते.सर्वांना हे सांगा की ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत माझी आठवण केल्यामुळे तुमचे पाप वृद्धिंगत होणार नाहीत आणि भूतकाळातील विकर्म विनाश होतील.आत्ता पण बाबा समजवतात,तुम्ही भारतवासीच सतोप्रधान होते,तेच यावेळेत ८४ जन्म घेत घेत आत्मा तमोप्रधान बनली आहे.आत्ता सतोप्रधान कसे बनतील.सतोप्रधान तेव्हाच बनाल, जेव्हा मज पतित-पावन पित्याची आठवण कराल.या योगा अग्नी द्वारेच पाप भस्म होतील आणि आत्मा सतोप्रधान बनेल आणि परत स्वर्गामध्ये २१ जन्मासाठी वारसा मिळेल. बाकी या जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे.भारत सतयुगामध्ये खूप श्रेष्ठ होता आणि सृष्टीच्या सुरुवातीला खूप थोडे मनुष्य होते.भारत स्वर्ग होता दुसरा कोणताही खंड नव्हता.आत्ता दुसरे धर्म वाढत वाढत झाड खूप मोठे झाले आहे आणि तमोप्रधान जड जडीभुत झाले आहे.आता या झाडाचा विनाश आणि नवीन देवी-देवता धर्माच्या झाडाची स्थापना,जरुर संगम युगामध्येच पाहिजे.आता तुम्ही संगम युगामध्ये आहात,आदी सनातन देवी-देवता धर्माची आत्ता कलम लागत आहे. पतित मनुष्यांना बाबा पावन बनवत आहेत,तेच परत देवता बनतील.जे प्रथम क्रमांक मध्ये होते,ज्यानी ८४ जन्म घेतले आहेत,तेच परत प्रथम क्रमांका मध्ये येतील.सर्वात प्रथम देवी-देवतांची भूमिका होती,तेच प्रथम दूर गेलेले आहेत,परत त्यांचीच भूमिका असायला हवी. सतयुगामध्ये सर्व गुण संपन्न,आत्ता तर विकारी दुनिया आहे,रात्रंदिवसाचा फरक आहे.आता विकारी दुनियेला निर्विकारी दुनिया कोण बनवेल. बोलवत राहतात,हे पतित पावन या, आत्ता ते आले आहेत.बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला निर्विकारी बनवत आहोत.या विकारी दुनियाच्या विनाशासाठी लढाई पण लागणार आहे.आता ते म्हणतात एक मत कसे होईल,कारण आत्ता अनेक मतं आहेत ना.अनेक मत-मतांतरा मध्ये एक धर्माचे मत,कोण स्थापन करेल? बाबा समजवतात,आता एक मताची स्थापना होत आहे,बाकी सर्व विनाश होतील.आदी सनातन देवी-देवता धर्माचे जे पावन होते,तेच आत्ता ८४ जन्म भोगून आता पतित बनले आहेत,परत बाबा येऊन भारताला स्वर्गाचा वारसा देत आहेत,म्हणजेच आसुरा पासून देवता बनवत आहेत. तुम्ही कोणालाही समजावू शकता की,बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुम्ही पतिपासून पावन बनाल.आता तुम्ही ज्ञान चितेवर बसल्यामुळे पावन बनतात,परत द्वापार युगामध्ये रावण राज्य झाल्यामुळे काम चितावर बसत बसत भ्रष्टाचारी दुनिया बनली आहे. आज पासून पाच हजार वर्ष पूर्ण देवी-देवता होते,थोडे मनुष्य होते.आत्ता तर खूप आसुरी बनले आहेत.दुसरे धर्म पण येवून झाड मोठे झाले आहे.बाबा समजवतात, झाड जडजडीभुत झाले आहे.आता परत मला एका मताचे राज्य स्थापन करायचे आहे.असे म्हणतात एक धर्म आणि एक मत हवे.हे भारतवासी विसरले आहेत की सतयुगा मध्ये एकच धर्म होता,येथे तर अनेक धर्म आहेत.आता बाबा म्हणतात,परत एका धर्माची स्थापना करत आहे. तुम्ही मुलं राजयोग शिकत आहात.जरुर भगवानच राजयोग शिकवतील.हे कोणालाही माहिती नाही.प्रदर्शनीचे उद्घाटन जेव्हा कोणी करतात,तर त्यांना समजवलं पाहिजे, तुम्ही कशाचे उद्घाटन करत आहात? बाबा भारताला स्वर्ग बनवत आहेत.बाकी नरकवासी सर्व विनाश होतील.विनाशाच्या अगोदर,ज्यांना बाबा पासून वारसा घ्यायचा असेल, तर येऊन समजून घ्या.हा ब्रह्माकुमारींचा जो आश्रम आहे,हा आगळा-वेगळा मुरलीचा वर्ग आहे, येथे सात रोज क्लास करायचा आहे, जो पर्यंत पाच विकार निघत नाहीत. देवी देवतांमध्ये पाच विकार नसतात. आता येथे पाच विकाराचे दान द्यायचे आहे,तेव्हा ग्रहण सुटेल, ग्रहण सुटले परत तुम्ही १६ कलासंपन्न बनाल,भारत सतयुगा मध्ये १६ कला संपन्न होता.आत्ता तर कोणत्याही कला नाहीत.सर्व अगदी गरीब बनले आहेत.कोणी उद्घाटन करतात,तर बोला येथे कायदा आहे,बाबा म्हणतात पाच विकाराचे दान दिले तर ग्रहण सुटेल. तुम्ही १६ कला संपूर्ण बनाल.पवित्रते नुसार पद मिळेल.जर काही ना काही कला कमी बनतील,तर जन्म पण उशिरा मिळेल.विकारांचे दान देणे तर चांगले आहे ना.चंद्राला ग्रहण लागते,तेव्हा ब्राह्मण लोक दान घेत होते,आता तर ब्राह्मण खूप मोठे मनुष्य झाले आहेत,श्रीमंत झाले आहेत.गरीब लोक तर बिचारे भीक मागत राहतात,जुने कपडे घेतात.वास्तव मध्ये ब्राह्मण जुने कपडे घेत नाहीत,त्यांना नवीन दिले जातात.तर आत्ता तुम्ही समजता भारत सोळा कला संपूर्ण होता. आता लोहयुगी झाला आहे,पाच विकाराचे ग्रहण लागले आहे.आता तुम्ही पाच विकाराचे दान दिले, अंतिम जन्म पवित्र राहिले तर,नवीन दुनिये चे मालक बनाल.स्वर्गामध्ये तर खूप थोडे मनुष्य असतात, त्यानंतर वृद्धी होते.आता तर विनाश समोर आहे.बाबा म्हणतात पाच विकाराचे दान दिले,तर ग्रहण सुटेल. आता तुम्हाला श्रेष्टाचारी बनून स्वर्गाचे सूर्यवंशी राज्य घ्यायचे आहे, तर भ्रष्टाचाराला सोडावे लागेल.पाच विकाराचे दान द्या.आपल्या मनाला विचारा,आम्ही सर्व गुण संपन्न संपूर्ण निर्विकारी बनलो आहोत,नारदाचे उदाहरण आहे ना.एक पण विकार असेल, तर लक्ष्मीशी स्वयंवर कसे करू शकाल ? प्रयत्न करत राहा,जी भेसळ आहे त्याला योग अग्नी द्वारे शुद्ध करा.सोने जेव्हा गाळतात,तर गाळत गाळत अग्नी थंड होते,तर सर्व भेसळ निघून जाते,म्हणून पूर्ण अग्नीमध्ये घालतात.परत जेव्हा पाहतात त्याच्यातील भेसळ वेगळी झाली आहे,तेव्हा त्याचे चांगले दागिने बनवतात.बाबा स्वतः म्हणतात कोणत्याही विकारांमध्ये जाऊ नका,तीव्र गतीने पुरुषार्थ करा. प्रथम तर पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करा,बाबा तुम्ही पावन बनवण्यासाठी आले आहात,तर आम्ही कधी विकारांमध्ये जाणार नाहीत.आत्म अभीमानी बनायचे आहे.बाबा आत्म्यांना समजवतात,ते सर्वोच्च आत्मा आहेत.तुम्ही जाणता आम्ही आत्मा आहोत.आत्म्यामध्येच संस्कार असतात.मी तुमचा पिता परमात्मा आहे,तुम्हाला पावन बनवण्यासाठी आलो आहे.तुम्ही प्रथम सतोप्रधान होते,परत सतो रजो तमो मध्ये आले.आत्ता तमोप्रधान बनले आहात.या वेळेत पाच तत्व पण तमोप्रधान आहेत,म्हणून दुःख देत राहतात.प्रत्येक गोष्ट दुःख देत देत राहते.हेच तत्व जेव्हा सतोप्रधान होते,तेव्हा सुख देत होते.त्याचे नाव सुखधाम होते आणि हे दुःखधाम आहे. बेहद्दच्या बाबाचा वारसा सुखधाम आहे.रावणाचा वारसा दुःखधाम आहे.आता जितके श्रीमतावरती चालाल तेवढे उच्च पद मिळेल,परत प्रसिद्ध होऊन जाल, परत कल्प-कल्प असाच पुरुषार्थ करत राहाल.ही कल्प-कल्पची बाजी आहे.जे जास्त पुरुषात करतात,ते आपलं राज्य भाग घेत आहेत.जर ठीक पुरुषार्थ केला नाही, तर तिसऱ्या वर्गामध्ये चालले जातील. प्रजा मध्ये पण माहित नाही काय पद मिळेल? लौकिक पिता पण म्हणतात,तुम्ही माझे नाव बदनाम करता,तर घरामधून निघून जावा. तुम्हाला मायेची चापट अशी लागेल, जे सूर्यवंशी चंद्रवंशी मध्ये येऊ शकणार नाहीत.स्वतःला च चापट मारतात.बाबा तर म्हणतात वारस बना,राजतिलक घ्यायचा असेल, तर माझी आठवण करा आणि वारशाची पण आठवण करा,तर तुम्ही राजा बनाल,क्रमानुसार तर असतात ना. कोणी वकील एका केसचे लाख रुपये घेतात आणि काहींना तर पाहा,कोट पण व्यवस्थित नसेल. सर्व पुरुषार्था वरती आधारित आहे. तुम्ही पण पुरूषार्थ कराल तर उच्चपद मिळेल. मनुष्यापासून देवता बनायचे आहे, परत मालक बना किंवा प्रजा, प्रजेमध्ये पण नोकर चाकर बनतात.विद्यार्थ्यांच्या चलनाद्वारे शिक्षक समजतात.हे आश्चर्य आहे की,जे उशीरा येणारी मुलं आहेत,ते अगोदर येणाऱ्या पेक्षा पुढे जातात,कारण दिवसेंदिवस ज्ञानाचे खूप चांगले मुद्दे मिळत राहतात.कलम लागत जाते. सुरुवातीला जे आले,ते तर भागंती झाले आणि नवीन येत राहतात. नव-नवीन ज्ञानाच्या गोष्टी मिळत राहतात.खूप व्यक्तीना समजवले जाते.बाबा म्हणतात, तुम्ही खूप रहस्ययुक्त गोष्टी ऐकता,ज्याद्वारे तुम्ही लगेच निश्चय बुद्धी बना.जो पर्यंत माझी भूमिका आहे,तुम्हाला शिकवत राहील,याची पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.जेव्हा कर्मातीत अवस्था होईल,तेव्हा शिक्षण पूर्ण होईल.मुलं पण समजातील.अंत काळात परीक्षेचा परिणाम तर माहीत होतो ना.या अभ्यासामध्ये पण क्रमांक एकचा विषय पवित्रतेचा आहे.जोपर्यंत बाबांची आठवण राहत नाही,तोपर्यंत बाबांची सेवा करू शकत नाहीत. तोपर्यंत आराम करायला नाही पाहिजे.तुमची लढाई माया सोबत आहे.रावणाला जरी जाळतात परंतु जाणत नाहीत, हे कोण आहेत. दसरा खूप साजरा करतात. तुम्हाला आश्चर्य वाटते,राम भगवंताच्या, भगवती सितेचे अपहरण झाले परत वानराची सेना घेतली,असे कधी होऊ शकते का? काहीच समजत नाहीत.तर जेव्हा प्रदर्शनी पाहण्यासाठी येतात तर प्रथम सांगायला पाहिजे, भारतामध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य होते,तेव्हा किती मनुष्य असतील,पाच हजार वर्षाची गोष्ट आहे.आता कलियुग आहे,तीच महाभारी महाभारत लढाई आहे.बाबा येऊन राजयोग शिकवतात.विनाश पण होईल.येथे एक धर्म किंवा एक मत किंवा शांती कसे होऊ शकती ? जितके एकमत होण्यासाठी माथा मारतात,तेवढी लढाई पण करतात.बाबा म्हणतात, आता मी त्या सर्वाना आपसमध्ये लढवून,लोणी तुम्हाला देतो.बाबा समजवतात,जे करतील त्यांना मिळेल.काही काही मुलं बाबा पेक्षा उच्च बनू शकतात,माझ्यापेक्षा सावकर विश्वाचे मालक बनाल,मी बनत नाही.मी तुम्हा मुलांची निष्काम सेवा करतो,मी तर दाता आहे.असे कोणी समजू नका की, मी बाबांना पाच रुपये देतो परंतु शिवबाबा कडून पाच पदम स्वर्गामध्ये घेतात.तर हे काही देणे झाले का?जर समजतात, आम्ही देतो,हा तर शिवबाबांचा अपमान करतात.बाबा तुम्हाला खूप उच्च बनवतात.तुम्ही पाच रुपये जरी शिवबाबाच्या भंडारी मध्ये देतात, बाबा तुम्हाला पाच करोड देतात, कवडी पासून हिरे तुल्य बनवतात. असा कधी संशय आला नाही पाहिजे की, मी शिव बाबांना दिले.हे तर खूप भोलेनाथ आहेत.हा कधीही विचार यायला नाही पाहिजे,की आम्ही शिवबाबाना देतो,नाही.शिव बाबा कडून आम्ही २१ जन्मासाठी स्वर्गाचा वारसा घेतो.शुद्ध विचाराने दिले नाही तर स्वीकार कसे करतील? सर्व गोष्टी ची समज बुद्धीमध्ये पाहिजे.ईश्वर अर्थ देतात, म्हणजे ते काही भुकेले आहेत का?नाही. ते समजतात, आम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये मिळेल.मी तुम्हाला कर्म,अकर्म,विकर्माची गती सन्मुख समजवतो.येथे जे काम करतात,ते विकर्मच बनतात,कारण रावण राज्य आहे.सतयुगा मध्ये कर्म अकर्म बनतात.मी तुम्हाला आता त्या दुनिया मध्ये परिवर्तित करतो,जेथे तुमच्या द्वारे काहीच विकर्म होणार नाहीत.खूप उच्च बनाल.पुढे चालून अनेक मुलं येतील,परत तुमचे पैसे पण घेऊन काय करतील.मी काही कच्चा सराफ नाही,जे घेइल आणि कामांमध्ये येणार नाही,परत त्याची भरपाई द्यावी लागेल.मी पक्का सराफ आहे.अंत काळात म्हणतील आत्ता आवश्यकता नाही,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) तीव्र वेगाने पुरुषार्थ करून विकाराला योगा अग्नी द्वारे नष्ट करायचे आहे.

(2) पवित्रतेची पुर्ण प्रतिज्ञा करायची आहे.कर्म अकर्म, विकर्माच्या गतीला बुद्धी मध्ये ठेवून आपले सर्व काही नवीन दुनियेसाठी परिवर्तन करायचे आहे.

वरदान:-
आपल्या बुद्धी रुपी नेत्राला स्पष्ट आणि काळजीपूर्वक ठेवणारे मास्टर ज्ञानवान शक्तिशाली भव.

जसे ज्योतिषी आपल्या ज्योतिषाच्या विद्या द्वारे,ग्रहांच्या विद्या द्वारे, येणाऱ्या संकटाला जाणतात.असे तुम्ही मुलं अगोदरच माया द्वारे येणाऱ्या परिस्थितीला पारखून, चांगल्या मार्काने पास होण्यासाठी आपल्या बुद्धी रुपी नेत्राला स्पष्ट बनवा आणि काळजीपूर्वक राहा.दिवसेंदिवस आठवण किंवा शांतीच्या शक्तीला वृद्धींगत करा,तर प्रथमच माहिती होईल की,आज काय होणार आहे.मास्टर ज्ञानवान शक्तिशाली बना, तर कधी हार होऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
पवित्रताच नवीनता आहे म्हणून आणि हाच ज्ञानाचा पाया आहे.