11.11.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही आता विश्व सेवाधारी आहात, तुम्हाला कोणत्याही गोष्टीं मध्ये देहाभिमान यायला नको"

प्रश्न:-

कोणती एक सवय ईश्वरीय कायद्याच्या विरुद्ध आहे, ज्यामुळे खूप नुकसान होते?

उत्तर:-

कोणत्या ही सिनेमाच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे, कादंबरी वाचणे. . . ही सवय खूप बेकायदा आहे, यामुळे खूप नुकसान होते. बाबांची मनाई आहे, मुलांनो कोणी कुमार कुमारी, अशी पुस्तके वाचत असतील, तर तुम्ही एक-दोघांना सावधान करा.

गीत:-

मुखडा देखले प्राणी दर्पनमे, कितना पाप और कितना पुण्य तेरे दामन मे…

ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलां प्रती आत्मिक पिता म्हणतात, स्वतःला तपासायचे आहे की, आठवणीच्या यात्रे द्वारे आम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान कडे किती वाटचाल करत आहोत, कारण जितकी आठवण कराल तेवढे पाप नष्ट होईल. हे वाक्य कोणत्या ग्रंथांमध्ये लिहलेले आहेत काय? कारण ज्यांनी धर्म स्थापन केला, त्यांनी जे समजले त्याचेच ग्रंथ बनवले आहेत, तेच परत वाचत राहतात. पुस्तकाची पण पूजा करत राहतात. आता या समजण्याच्या गोष्टी आहेत, जेव्हा हे लिहले आहे, देहाचे सर्व संबंध सोडून स्वत:ला आत्मा समजा. बाबा आठवण देतात की, तुम्ही मुलं प्रथम अशरीरी आले होते, तेथे तर पवित्र राहत होते. मुक्ती, जीवन मुक्ती मध्ये कोणी जाऊ शकत नाही. ती निराकारी, निर्विकारी दुनिया आहे. या दुनियेला साकारी, विकारी दुनिया म्हटले जाते, परत सतयुगामध्ये हीच दुनिया निर्विकारी बनते. सतयुगा मध्ये राहणाऱ्या देवतांची तर खूप महिमा आहे. आता तुम्हा मुलांना समजवले जाते, चांगल्या प्रकारे धारणा करून दुसऱ्यांना समजून सांगा. तुम्ही आत्मे जेथून आले आहात, पवित्र आले आहात, परत येथे येऊन अपवित्र पण जरूर होणार आहात. सतयुगाला निर्विकारी दुनिया, कलियुगाला विकारी दुनिया म्हटले जाते. आता तुम्ही पतित-पावन बाबांची आठवण करता की, आम्हाला पावन निर्विकारी बनवण्यासाठी, तुम्ही विकारी दुनियेमध्ये, विकारी शरीरामध्ये या. बाबा स्वतः समजवतात, ब्रह्माच्या चित्रा वरती पण खूप संभ्रमित होतात की, या चित्रामध्ये दादांना का बसवले आहे. असे समजावयला पाहिजे की, हे तर भागीरथ आहेत. शिव भगवानुवाच हा रथ मी घेतला आहे, कारण मला प्रकृतीचा आधार जरुर घ्यावा लागतो, नाहीतर मी तुम्हाला पतिता पासून पावन कसे बनवू. रोज मुरली पण ऐकायची आहे. आता बाबा तुम्हा मुलांना म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. सर्व आत्म्यांना आपल्या पित्याची आठवण करायची आहे. कृष्णाला सर्वांचे पिता म्हणू शकत नाहीत, त्यांना तर स्वतःचे शरीर आहे. तर हे शिवपिता खूप सहज समजवतात, जेव्हा कोणाला समजून सांगतात, तर स्पष्ट करा बाबा म्हणतात, तुम्ही अशरीरी आले होते, आता अशरीरी बनून जायचे आहे. तेथुन पवित्र आत्माच येतात. जरी कोणी येतात, तरीही ते पवित्र आहेत, तर त्यांची महिमा जरूर होते. संन्यासी उदासी यांचे नाव होते, जरूर त्यांचा हा प्रथम जन्म आहे ना. त्यांना धर्म स्थापन करण्यासाठीच यावे लागते. जसे बाबा गुरुनानक प्रती समजवतात. आत्ता गुरु अक्षर पण म्हणावे लागते, कारण नानक नावं तर अनेकांचे आहेत ना. जेव्हा कोणाची महिमा केली जाते, तर त्याचा अर्थ पण सांगितलं जातो. न सांगणे पण चांगले नाही. वास्तव मध्ये तुम्हा मुलांना समजवले आहे की, गुरु कोणीही नाहीत, शिवाय एकाच्या. ज्या नावावरती गायन करतात, सद्गुरु अकाल…. ते अकाल मुर्त आहेत, त्यांना कोणता काल खाऊ शकत नाहीत. ते पण आत्मा आहेत आणि तेव्हाच या गोष्टी बनवले आहेत. सिनेमाच्या गोष्टीची पुस्तकं, कादंबरी इत्यादी पण अनेक जण वाचतात. बाबा मुलांना खबरदार करतात, कोणत्याही कादंबरी इत्यादी वाचायचे नाहीत. कोणा-कोणाला सवय असते. येथे तर तुम्ही सौभाग्यशाली बनत आहात. कोणी ब्रह्माकुमार कुमारी कादंबरी वाचत असतील, म्हणून बाबा सर्व मुलांना म्हणतात, कधी कोणी कादंबरी वाचत असेल, तर ती लगेच फाडून टाकली पाहिजे, यामध्ये घाबरायचे नाही. आम्हाला कोणी श्राप देतील किंवा रागावतील, अशी कोणतीच गोष्ट नाही. तुमचे काम आहे एक दोघांना सावधान करणे. सिनेमाच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे बेकायदा आहे‌. बेकायदा कोणती चलन असेल तर लगेच रिपोर्ट करायला पाहिजे, नाहीतर सुधारणार कसे. ते आपलेच नुकसान करत राहतील. स्वतःमध्येच योगबळ नसेल तर, ते कसे शिकवतील? बाबांची मनाई आहे. जर असे काम करत असतील, तर मन जरूर खात राहील. आपले नुकसान होईल, म्हणून कोणा मध्ये अवगुण दिसत असेल तर, लिहायला पाहिजे. कोणती बेकायदा चलन तर चालत नाहीत? कारण ब्राह्मण या वेळेत सेवक आहेत ना. बाबा पण म्हणतात मुलांनो नमस्ते, अर्थ सहित समजावून सांगतात. ज्या मुली ज्ञान योग शिकवणार्‍या आहेत, त्यांच्यामध्ये अभिमान यायला नको. शिक्षक पण विद्यार्थ्यांचे सेवक असतात ना. राज्यपाल इत्यादी पत्र लिहतात, खाली सही करतात आपला आज्ञाधारक सेवक. बिल्कुल सन्मुख नाव लिहतात, बाकी कारकुन आपल्या हाता द्वारे लिहतात. कधी स्वतःचा मोठेपणा लिहणार नाहीत. आजकाल गुरु तर स्वतःलाच स्वतः श्री श्री लिहितात. येथे पण कोणी असे आहेत, जे श्री अमका लिहतात. वास्तव मध्ये असे पण लिहायला नको. न स्त्री श्रीमती लिहू शकते. श्रीमत तेव्हाच मिळते, जेव्हा श्री श्री स्वतःयेऊन मत देतात. तुम्ही समजावू शकता, जरूर कोणाच्या मताद्वारे हे देवता बनले आहेत ना. भारतामध्ये कोणालाच माहीत नाही की, हे इतके उच्च विश्वाचे मालक कसे बनले? तुम्हाला तर हा नशा चढायला पाहिजे. हे मुख्य लक्षाचे जे चित्र आहे, त्यास नेहमी छातीला लावून ठेवायला पाहिजे, म्हणजे नेहमी पाहत राहायचे आहे. कोणाला पण सांगा की, आम्हाला भगवान शिकवत आहेत, ज्याद्वारे आम्ही विश्वाचे महाराजा बनतो. बाबा या राज्याची स्थापना करण्यासाठी आले आहेत. या जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. तुम्ही लहान लहान मुली आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये कोणालाही समजावून सांगू शकता. मोठ-मोठे संमेलन इत्यादी होतात, तर त्यामध्ये तुम्हाला बोलवतात. हे चित्र तुम्ही घेऊन जावा आणि त्यावरती समजावून सांगा. भारतामध्ये, परत यांचे राज्य स्थापन होत आहे. कुठे पण मोठ मोठ्या सभेमध्ये तुम्ही समजावू शकता. सर्व दिवस सेवेचा नशा राहिला पाहिजे. भारतामध्ये यांचे राज्य स्थापन होत आहे. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. शिव भगवानुवाच, हे मुलांनो तुम्ही स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, तर तुम्ही असे श्रेष्ठ बनाल, ते पण २१जन्मासाठी. दैवी गुण पण धारण करायचे आहेत. आता तर सर्वांचे आसुरी गुण आहेत. श्रेष्ठ बनवणारे तर एकच श्री- श्री शिवबाबा आहेत. तेच उच्च ते उच्च पिता आम्हाला शिकवत आहेत. शिवभगवानुवाच मनमनाभव. भागीरथ तर प्रसिद्ध आहे. भागीरथला च ब्रह्मा म्हटले जाते, त्यांना महावीर पण म्हणतात. येथे दिलवाडा मंदिर मध्ये बसले आहेत ना. जैन इत्यादी जे मंदिर बनवणारे आहेत, ते कोणीही जाणत नाहीत. तुम्ही लहान लहान मुली कोणाचीही वेळ घेऊन, त्यांना समजावू शकता. आता तुम्ही खूप श्रेष्ठ बनत आहात. हेच भारताचे मुख्य लक्ष आहे ना. खूप नशा चढायला पाहिजे. येथे बाबा चांगल्या रीतीनें नशा चढवतात. सर्वजण म्हणतात आम्ही तर लक्ष्मीनारायण बनू. राम-सिता बनण्यासाठी कोणी हात वरती करत नाहीत. आता तर तुम्ही अहिंसक क्षत्रिय आहात. तुम्हा क्षत्रियांना कोणीही जाणत नाहीत. हे तुम्ही आत्ताच समजवतात. गीतेमध्ये पण मनमनाभव हे अक्षर आहे. स्वतःला आत्मा समजा. याच समजण्याच्या गोष्टी आहेत, दुसरे कोणीही समजू शकत नाहीत. बाबा सर्व मुलांना ज्ञान देतात, मुलांनो आत्माभिमानी बना. ही सवय परत २१ जन्मासाठी चालत राहते. तुम्हाला हे ज्ञान २१ जन्मासाठी मिळत आहे. बाबा नेहमीच मुख्य गोष्ट समजवतात, स्वतःला आत्मा समजून बसा‌. परमात्मा पिता आम्हा आत्म्यांना सन्मुख समजावत आहेत. तुम्ही सारखे देहाभिमान मध्ये येतात, परत घरदार इत्यादी आठवणीत येते, असे होत राहते. भक्तिमार्गा मध्ये भक्ती करत करत बुद्धी दुसरीकडे चालली जाते. एकटिक नवविध भक्ति करणारेच बसू शकतात, ज्याला तीव्र भक्ती म्हटले जाते. एकदम प्रेममय बनतात. तुम्ही आठवणी मध्ये बसतात, तर कधी एकदम अशरीरी बनतात. चांगली मुलं असतील तर, अशा अवस्थेमध्ये बसतील. देहाचे भान निघून जाईल. अशरीरी बनून त्या मस्ती मध्ये बसून राहा, तर ती सवय लागेल. संन्यासी तर तत्वज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी आहेत, ते म्हणतात आम्ही विलीन होऊन जाऊ. हे जुने शरीर सोडून ब्रह्म तत्वामध्ये विलिन होऊ. सर्वांचा आपापला धर्म आहे. कोणीही दुसऱ्या धर्माला मानत नाहीत. आदी सनातन देवी-देवता धर्माचे पण तमोप्रधान बनले आहेत. गीतेचे भगवान कधी आले होते? गीतेचे युग कधी होते? कोणीही जाणत नाहीत. तुम्ही जाणतात या सगंमयुगाध्येच बाबा येऊन राजयोग शिकवतात, तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवतात. भारताची मुख्य गोष्ट आहे. अनेक धर्म पण जरूर होते. गायन पण आहे, एक धर्माची स्थापना, अनेक धर्माचा विनाश. सतयुगा मध्ये एक धर्म होता, आत्ता कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत, परत एका धर्माची स्थापना होत आहे. अनेक धर्माचा विनाश होतो. सतयुगामध्ये एक धर्म होता, आता कलियुगामध्ये तर अनेक धर्म आहेत. परत एका धर्माची स्थापना होते. एक धर्म होता, आता नाही. बाकी सर्व आहेत, वडाचे झाडाचे उदाहरण पण बरोबर आहे, पाया नाही बाकी सर्व झाड पारंब्या वरती उभे आहे. तसेच यामध्ये पण देवी-देवता धर्म नाही, आदी सनातन देवी-देवता धर्म जो होता, तो नष्ट झाला आहे, परत बाबा स्थापना करतात. बाकी इतके सर्व धर्म तर नंतर येतात. चक्राची पुनरावृत्ती जरूर होते म्हणजे जुन्या दुनिये पासून नवीन दुनिया होते. नवीन दुनिये मध्ये यांचे राज्य होते. तुमच्याजवळ मोठे चित्र पण आहेत, लहान पण आहेत. मोठी गोष्ट पाहून विचारतील की, हे काय आहे? तुम्ही सांगा, आम्ही या गोष्टीचे ज्ञान घेतले आहे, ज्याद्वारे मनुष्य भिकारी पासून राजकुमार बनतील. मनामध्ये खूप उत्साह राहायला पाहिजे. आम्ही आत्मे भगवंताची मुलं आहोत. आम्हा आत्म्यांना भगवान शिकवत आहेत. बाबा आम्हाला डोळ्यावरती बसवून घेऊन जातात. या खराब दुनिया मध्ये तर आम्हाला राहायचे नाही. पुढे चालून त्राही त्राही होत राहतील, तुम्ही काही विचारू नका. करोडो मनुष्य मरत राहतात. हे तर तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही या डोळ्यांनी जे पाहतो हे काहीच राहणार नाही. येथे तर मनुष्य काट्यासारखे दुःख देत राहतात‌. सतयुग फुलांची बाग आहे. परत आमचे डोळे शितल होतील. बागेमध्ये गेल्यामुळे डोळे शितल होतात ना. तर तुम्ही आत्ता पद्मापदम भाग्यशाली बनत आहात. ब्राह्मण जे बनतात त्यांच्या पाऊलामध्ये पदम आहेत. तुम्हा मुलांना समजायला पाहिजे, आम्ही हे राज्य स्थापन करत आहोत, म्हणून बाबानं बाबानी बैज बनवले आहेत. सफेद साडी घातलेली असावी आणि बैज लावलेला असावा, तर यामुळे स्वतःच सेवा होत राहील. मनुष्य गायन करतात आत्मा परमात्मा वेगळे राहिले खूप काळ परंतु खूप काळाचा पण कोणी अर्थ समजत नाहीत. तुम्हाला बाबांनी समजले आहे की खूप काळ म्हणजे पाच हजार वर्षांच्या नंतर, तुम्ही मुलं बाबांना भेटतात. तुम्ही हे जाणतात की, या सृष्टी मध्ये सर्वात प्रसिद्ध राधा कृष्ण आहेत. हे सत्ययुगाचे प्रथम राजकुमार राजकुमारी आहेत. कधी कोणाच्या मनात विचार येणार नाहीत की, हे कुठून आले? सतयुगाच्या पुर्वी जरुर कलियुग असेल. त्यांनी कोणते काम केले, जे विश्वाचे मालक बनले. भारतवासींना कोणी विश्वाचे मालक समजत नाहीत. यांचे राज्य होते तर, भारतामध्ये दुसरा कोणता धर्म नव्हता. आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. आमचे मुख्य लक्ष हे आहे. जरी मंदिरांमध्ये त्यांचे चित्र इत्यादी आहेत, परंतु हे थोडेच समजतात की, या वेळेत स्थापना होत आहे. तुमच्या मध्ये पण क्रमानुसार समजतात. काही तर अगदीच विसरतात. चलन अशी होते, जसे पूर्वीसारखेच ‌होते. येथे तर खूप चांगले समजतात, येथून बाहेर निघाले की खलास. सेवेची आवड राहिली पाहिजे. सर्वांना संदेश देण्यासाठी युक्ती करा. कष्ट घ्यायचे आहेत, खूप आनंदाने सांगायला पाहिजे की, शिव बाबा म्हणतात माझी आठवण करा तर, पाप नष्ट होतील. आम्ही एक शिवबाबा शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करत नाहीत, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) जे मुख्य लक्षाचे चित्र आहे, ते नेहमी बरोबर ठेवायचे आहे. नेहमी आनंद राहायला पाहिजे की, आम्ही श्रीमता वरती विश्वाचे मालक बनत आहोत. आम्ही अशा बागेमध्ये जात आहोत, जिथे आमचे डोळे शितल होतील.
  2. (२) सेवेची खूप आवड ठेवायची आहे. मोठ्या मनाद्वारे, उमंग उत्साहाने, मोठ मोठ्या चित्रावरती सेवा करायची आहे. गरिबा पासून राजकुमार बनवायचे आहे.

वरदान:-

यज्ञ सेवेद्वारे सर्व प्राप्तीचा प्रसाद मिळवणारे, सर्वांगीण सेवाधारी भव.

संगम युगामध्ये सर्वांगीण सेवेची संधी मिळणे, ही पण वैश्विक नाटक नुसार एक भेट आहे. जे प्रेमाने यज्ञाची सर्वांगीण सेवा करतात, त्यांना सर्व प्राप्तीचा प्रसाद स्वतः मिळतो. एका वेळेत सेवा केली आणि हजार वेळ सेवेचे फळ प्राप्त होते. नेहमी स्थूल सूक्ष्म लंगर लागलेला राहावा. कोणाला पण संतुष्ठ करणे, ही खूप मोठी सेवा आहे. संतुष्ठ करणे हे सर्वात मोठे भाग्य आहे.

बोधवाक्य:-

स्वमान मध्ये स्थिर राहा, तर अनेक प्रकारचा अभिमान स्वतः समाप्त होतील.

||| ओम शांती |||

ओम शांती.