12-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , सत्याचा संग ज्ञान मार्गा मध्ये च असतो , आता तुम्ही सत्य बाबा च्या संगती मध्ये बसले आहात , बाबाच्या आठवणी मध्ये राहणे म्हणजेच सत्संग करणे "

प्रश्न:-
सत्संगाची आवश्यकता तुम्हा मुलांना आत्ताच आहे, का?

उत्तर:-
कारण तमोप्रधान आत्मा एक सत बाप,सत शिक्षक आणि सद्गुरूच्या संगती द्वारे सतोप्रधान अर्थात काळ्या पासून गोरी बनू शकते.सत्संगा शिवाय निर्बल आत्मा बलवान बनू शकत नाही.बाबाच्या संगती मुळे पवित्रतेची शक्ती येते,२१जन्मासाठी त्यांची जीवन नौका किनारऱ्याला लागते.

ओम शांती।
मुलं आत्ता सत्संगा मध्ये बसले आहेत.या सतच्या संगामध्ये कल्प कल्प संगम युगा वरतीच मुलं बसतात.दुनिया तर हे जाणत नाही की सत्याचा संग कशाला म्हटले जाते? सत्संगाचे नाव अविनाशी चालत येते.भक्तिमार्ग मध्ये म्हणतात आम्ही अमक्या सत्संगा जातो. आत्ता भक्ती मार्गामध्ये कोणी सत्संगामध्ये जात नाही.सत्संग ज्ञानमार्गा मध्येच असतो.आता तुम्ही सतच्या संगा मध्ये बसले आहात. आत्मे सत्य बाबांच्या संगामध्ये बसले आहेत. दुसऱ्या कोणत्या जागी आत्मे परमपिता परमात्मा च्या संगती मध्ये बसत नाहीत कारण बाबांना जाणतच नाहीत.जरी म्हणतात आम्ही सत्संगामध्ये जातो, परंतु ते देह अभिमाना मध्ये येतात.तुम्ही देहाभिमान मध्ये येणार नाहीत.तुम्ही समजता आम्ही आत्मा आहोत,सत बाबा च्या संगती मध्ये बसलो आहोत.दुसरे कोणतेही मनुष्य सतच्या संगती मध्ये बसू शकत नाहीत.सत्याचा संग हे नाव आत्ताच आहे.सत चा संग याचा अर्थ बाबाच बसून समजवतात.तुम्ही जरी येथे बसले आहात किंवा घरी बसले आहात परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करतात. आम्ही आत्मा सत बाबांची आठवण करत आहोत अर्थात त्याच्या संगती मध्ये आहोत.बाबा मधुबन मध्ये बसले आहेत. बाबांना आठवण करण्याच्या अनेक युक्त्या पण मिळतात.आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.हे पण मुलंच जाणता आम्हीच१६ कला संपुर्ण बनतो,परत उतरत उतरत कला कमी होत जातात.भक्ती पण प्रथम अव्यभिचारी असते,परत हळूहळू व्यभिचारी भक्ती झाल्यामुळे तमोप्रधान बनतात,त्यामुळे त्यांना सत्यचा संग जरूर पाहिजे,नाहीतर पवित्र कसे बनतील?आता तुम्हा सर्वांना सत बाबांचा संग मिळाला आहे.आत्मा जाणते आम्हाला बाबांची आठवण करायची आहे,त्यांचाच संग आहे. आठवण करण्याला पण संग म्हटले जाते. हा सत्याचा संग आहे.हा देह असतानी पण तुम्ही आत्मा समजून माझी आठवण करा, हा सत्याचा संग आहे.जसे म्हणतात ना यांना मोठ्या माणसांचा संग लागला आहे, म्हणून देही अभिमानी बनले आहेत.आता तुम्हाला संग लागला आहे सत्य बाबांचा, ज्याद्वारे तुम्ही तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनतात.बाबा म्हणतात मी एकाच वेळेस येतो.आत्ता आत्म्याला परमात्माचा संग लागल्या मुळे,तुमची नाव २१ जन्मासाठी किनाऱ्याला लागते,परत तुम्हाला देहाचा संग मिळतो.हे पण अविनाशी नाटक बनलेले आहे.बाबा म्हणतात माझ्यासोबत तुम्हा मुलांचा संग झाल्यामुळे तुम्ही सतोप्रधान बनतात,ज्याला सुवर्णयुग म्हटले जाते.

साधुसंत इत्यादी समजतात आत्मा तर निर्लेप आहे,सर्व परमात्माच परमात्मा आहेत.तर त्याचा अर्थ परमात्मा मध्ये पण बनावट भेसळ झाली काय?परमात्मा मध्ये तर भेसळ,बनावट होऊ शकत नाही.बाबा म्हणतात काय मज परमात्मा मध्ये भेसळ झाली आहे काय? नाही.मी तर सदैव परमधाम मध्ये राहतो,कारण मला जन्म-मृत्यू मध्ये यायचे नाही.हे तर तुम्ही मुलं जाणता,तुमच्या मध्ये पण कोणाचा संग जास्त आहे,कोणाचा कमी आहे.काही तर चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून आठवणीमध्ये राहतात.जितका वेळ आत्मा बाबाच्या संगती मध्ये आहे,तेवढा फायदाच आहे.विकर्म विनाश होतील.बाबा म्हणतात,हे आत्म्यांनो माझी आठवण करा, माझी संगत करा.मला या शरीराचा आधार घ्यावा लागतो,नाही तर परमात्मा कसे बोलतील,आत्मा कसे ऐकेल?आता तुम्हा मुलांचा त्याच्या सोबत संग आहे.सत्य बाबाला निरंतर आठवण करायची आहे. आत्म्याला सत्संग करायचा आहे.आत्मा पण आश्चर्यकारक आहे,परमात्मा पण आश्चर्यकारक आहे आणि दुनिया पण आश्चर्यकारक आहे.ही दुनिया कशी चक्र लावते,आश्चर्य आहे ना.तुम्ही साऱ्या नाटकांमध्ये सर्वांगीण भूमिका वठवतात. तुमच्या आत्म्यामध्ये 84 जन्माची भूमिका नोंदलेली आहे, हे आश्चर्य आहे ना.सतयुगी आत्मे आणि आजकाल चे आत्मे,त्यामध्ये पण तुमची आत्मा सर्वात जास्त सर्वांगीन भूमिका करणारी आहे.नाटकांमध्ये कोणाची भूमिका सुरुवातीपासून असते, कोणाची मध्यंतरा पासून,कोणाची शेवटी पण असते.ते सर्व हदचे नाटक आहेत,ते आत्ता निघाले आहेत.आत्ता विज्ञानाचा इतका जोर आहे,सतयुगा मध्ये तर याचा खुप जोर असेल.नवीन दूनिया खुप लवकर बनते,तेथे पवित्रतेचे बळ मुख्य आहे.आत्ता निर्बल आहेत,तेथे बलवान आहेत. लक्ष्मी-नारायण बलवान आहेत ना. आत्ता रावणाने शक्तीहीन केले आहे,परत तुम्ही रावणावर विजय मिळवून खूप बलवान बनतात.जितका सत्यचा संग कराल,अर्थात जितकी सत बाबांची आठवण कराल, तेवढे बलवान बनता.शिक्षणा द्वारे बळ मिळते ना.तुम्हाला पण बळ मिळते,साऱ्या विश्वा वरती तुम्ही हुकुम चालवतात. आत्म्याचा सत्या सोबत योग,संगम युगा मध्येच असतो.बाबा म्हणतात आत्म्याला माझा संग मिळाल्यामुळे आत्मा खुप बलवान बनते.बाबा वैश्वैक सर्वशक्तीमान अधिकारी आहेत ना,त्यांच्याद्वारे बळ मिळते.यामध्ये सर्व वेद ग्रंथ इत्यादी च्या आदी मध्य अंतचे ज्ञान येते.जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत,तुम्हीपण सर्वशक्तीमान बनतात.विश्वावर तुम्ही राज्य करतात.तुमच्या द्वारे कोणी राज्य हिरावून घेऊ शकत नाही.तुम्हाला माझ्या द्वारे खूप शक्ती मिळते,यांना पण शक्ती मिळते.जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे बळ मिळेल.बाबा दुसरे कोणतेच कष्ट देत नाहीत.फक्त आठवण करायची बस. स्रुष्टी चक्र पूर्ण झाले आता परत जायचे आहे,हे समजून सांगणे काही मोठी गोष्ट नाही.जास्ती सांगण्याची पण आवश्यकता नाही. बीजाला जाणल्यामुळे समजतात यांच्याद्वारे हे सर्व झाड निघते,थोडक्यात बुद्धीमध्ये येते.या खूप विचित्र गोष्टी आहेत. भक्तिमार्ग मध्ये मनुष्य खूप धक्के खातात, कष्ट करतात,मिळत काहीच नाही.तरीही बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात. आम्ही योग बळा द्वारे विश्वाचे मालक बनतो.हाच पुरुषार्थ करायचा आहे.भारता चा योग प्रसिद्ध आहे.योगाद्वारे तुमचे आयुष्य खूप मोठे होते.सतच्या संगा द्वारे खूप फायदा होतो.आयुष्य पण मोठे आणि शरीर पण निरोगी बनते.या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये बसवल्या जातात. दुसऱ्या कोणाचा सतच्या सोबत संग नाही शिवाय तुम्हा ब्राह्मणांच्या.तुम्ही प्रजापिता ब्रह्माचे संतान आहात,दादाचे नातू आहात.तरीही खुश व्हायला पाहिजे ना,आम्ही दादाचे नातू आहोत.दादा कडून वारसा मिळतो.हीच आठवणीची यात्रा आहे.बुध्दी मध्ये हेच आठवणीत राहायला पाहिजे.त्या सत्संगा मध्ये तर एका जागेवर जाऊन बसतात,येथे ती गोष्ट नाही नाही. असे नाही एकाच जागेवर बसल्या मुळेच सत्संग होतो,नाही.उठता बसता,चालता फिरता,आम्ही सतच्या संगामध्ये आहोत,जर त्यांची आठवण करतो तर. आठवण करत नाही तर देह अभिमाना मध्ये आहोत.देह तर असत् गोष्ट आहे ना. देहाला सत म्हणणार नाही,शरीर जड आहे, पाच तत्वाचे बनलेले आहे,त्यामध्ये आत्मा नसते तर चुरपूर होत नाही.मनुष्याच्या शरीराची तर काहीच किंमत नाही,बाकी सर्वांच्या शरीराची किंमत आहे.सौभाग्य तर आत्म्याला मिळणार आहे,मी अमका आहे, आत्मा म्हणते ना.बाबा म्हणतात,आत्मा कशी झाले आहे,अंडी मासे काय काय खात राहते.प्रत्येकजण भस्मासुर आहे, स्वतःलाच भस्म करतात.कसे काम चिता वरती बसून प्रत्येक जण स्वताला भस्म करत आहे.तर आता तुम्ही ज्ञान चिते वरती बसून देवता बनतात.सारी दुनिया काम चिते वरती बसून भस्म झाली आहे,तमो प्रधान काळी झाली आहे.बाबा येतात मुलांना काळ्या पासून गोरा बनवण्यासाठी. तर बाबा म्हणतात देह अभिमान सोडून स्वतःला आत्मा समजा.शाळेमध्ये मुलं अभ्यास करतात,घरी आल्यानंतर पण बुद्धी मध्ये अभ्यास राहतो ना.या ज्ञानाच्या गोष्टी पण तुमच्या बुद्धी मध्ये राहायला पाहिजेत. हे तुमचे विद्यार्थी जीवन आहे.मुख्य लक्ष्य समोर आहे.उठता बसता,चालता फिरता,हे ज्ञान बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.

येथे मुलं येतात ताजेतवाने होण्यासाठी.युक्ती तर समजावली जाते की, अशाप्रकारे समजून सांगा.दुनियेमध्ये तर अनेक सत्संग असतात.अनेक मनुष्य एकत्रित होतात.वास्तव मध्ये तो काही सतचा संग नाही.सतचा संग तर,आता तुम्हा मुलांना मिळतो.बाबा च येऊन सत युगाची स्थापना करतात.तुम्ही मालक बनतात.देह अभिमाना मुळे किंवा खोट्या अभिमाना मुळे,तुम्ही खाली उतरतात आणि सत संगा मुळे तुम्ही परत वरती चढतात.अर्धा कल्प तुम्ही प्रारब्ध भोघतात. असे नाही तेथे पण तुम्हाला सत्संग आहे, नाही.सतचा संग आणि खोट्याचा संग तेव्हाच म्हणतात,जेव्हा दोघेही हजर आहेत.सत बाबा जेव्हा येतात तेव्हाच सर्व गोष्टी समजावून सांगतात.जोपर्यंत सत्य बाबा येत नाही तोपर्यंत कोणीच जाणत नाहीत.आता बाबा तुम्हा मुलांना म्हणतात, हे आत्म्यांनो माझ्या सोबत संग ठेवा.देहाचा जो संग मिळाला आहे,त्यापासून उपराम राहा.देहाचा संग जरी सतयुगा मध्ये असेल परंतु तुम्ही तेथे पावन आहात.आता तुम्ही सतच्या संगा पासून पावन बनतात,परत शरीर पण सतोप्रधान मिळेल.आत्मा पण सतोप्रधान राहील.आता तर दुनिया नवीन आणि जुनी होते ना.नवीन दुनिया मध्ये बरोबर आदी सनातन देवी देवता धर्म होता. आज त्या धर्माला गायब करून आदी सनातन हिंदू धर्म म्हणतात,संभ्रमित झाले आहेत.आता तुम्ही भारतवासी समजतात, आम्ही प्राचीन देवा देवता धर्माचे होतो. सतयुगा चे मालक होतो,परंतु तो नशा कुठे आहे? कल्पाचे आयुष्य च लांबलचक लिहिले आहे.सर्व गोष्टी विसरले आहेत. याचे नावच आहे,भुलभुलय्या चा खेळ. आता सत बाबा द्वारे तुम्ही सर्व ज्ञान जाणल्यामुळे उच्च पद मिळवता,परत अर्ध्या कल्पा नंतर उतरतात कारण रावण राज्य सुरु होते.दुनिया जुनी तर होईल ना. तुम्ही समजता आम्ही नवीन दुनिया चे मालक होतो.आता जुन्या दुनिया मध्ये आहोत.काही काहींना तर हे पण आठवणीत राहत नाही.बाबा आम्हाला स्वर्गवासी बनवत आहेत.अर्धा कल्प स्वर्गवासी राहणार परत खाली उतरता,कारण रावण राज्य सुरु होते.दुनिया जुनी तर होईल ना.तुम्ही समजता बाबा आम्हाला स्वर्गवासी बनवत आहेत.अर्धा कल्प स्वर्गवासी राहू,परत नर्कवासी बनू. तुम्ही पण मास्टर सर्वशक्तिमान बनतात परंतु क्रमा नुसार पुरुषार्थ प्रमाणे.हा ज्ञानामृत चा डोस आहे.शिवबाबांना कर्म इंद्रिय तर जुनेच मिळाले आहेत.नवीन कर्मेंद्रिय तर मिळणार नाहीत.जुनाच बाजा वाजवायचा आहे.मुलांना आनंद होतो तर बाबा पण खुश होतात.बाबा म्हणतात आम्ही जातो मुलांना ज्ञान देऊन,रावणा पासून सोडवण्यासाठी.भूमिका तर आनंदाने वठवायला पाहिजे ना.बाबा खूप आनंदाने भूमिका वठवतात.बाबांना कल्प कल्प यावे लागते,ही भूमिका कधी बंद होत नाही.मुलांना खूप आनंदी राहायला पाहिजे. जितका सत्याचा संग कराल तेवढा आनंद राहील.आठवण कमी करतात म्हणून इतका आनंदी राहत नाही.बाबा मुलांना मिळकत देतात.जी मुलं खऱ्या मनाची आहेत,त्यांच्या वरती बाबांचे खूप प्रेम राहते.खऱ्या मनावरती साहेब खुश राहतात.आत बाहेर जे खरे राहतात, बाबांचे मदतगार बनतात,सेवे मध्ये तत्पर राहतात,तेच बाबांना प्रिय वाटतात. आपल्या मनाला विचारायला पाहिजे आम्ही खरी खुरी सेवा करतो का?खऱ्या बाबांच्या सोबत सत चा संग आहे का?जर सत्य बाबाच्या सोबत संग ठेवत नाही तर काय गती होईल?अनेकांना रस्ता दाखवत राहाल तर उच्चपद मिळेल.सत बाबाकडून आम्ही किती वारसा मिळवला आहे, स्वतःला तपासायचे आहे. हे तर जाणता क्रमानुसार आहेत.कोणी किती वारसा प्राप्त करतात,कोणी किती? रात्रंदिवसा चा फरक राहतो.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
सुवर्णयोगी स्वभावा द्वारे सुवर्णयोगी सेवा करणारेश्रेष्ठ पुरुषार्थी भव .

ज्या मुलांच्या स्वभावा मध्ये ईर्ष्या,सिद्ध किंवा जिध्दचा भाव किंवा कोणत्याही जुन्या संस्काराची भेसळ नाही,तर ते सुवर्ण युगी स्वभाव वाले आहेत.असे सुवर्ण युगी स्वभाव आणि नेहमी 'होय' म्हणनारे,असे संस्कार बनवणारी,श्रेष्ठ पुरुषार्थी मुलं,जशी वेळ तशी सेवा करुन,स्वताला परिवर्तन करून खऱ्या सोन्यासारखे बनतात. सेवेमध्ये अभिमान किंवा अपमानाची भेसळ व्हायला नको,तेव्हा म्हणाल सुर्वण युगी सेवा करणारे.

बोधवाक्य:-
का कसे या प्रश्नांना समाप्त करून नेहमी प्रसन्नचित्त रहा.